उच्चारातल्या गमती...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
7 Jun 2014 - 10:52 am

भडकमकर या आडनावाचा भडक मकर असा उच्चार करणाऱ्या सरदारजीचा विनोद फार जुना झाला, नाही का. उच्चारातल्या या आणखी काही गमती-जमती..

कार्यबाहुल्यामुळे - या शब्दाचा उच्चार कार्यबाहु ल्ल्या मुळे असा केला जातो. (ल वर आघात)
नवख्या /अमराठी माध्यमात शिकलेल्या मुलांकडून कार्य बाहुल्या मुळे (बाहुला?) असा उच्चार ऐकून मौज वाटली.

'काटकसर' -काही वर्षांपूर्वी शेजारची पाचव्या इयत्तेत शिकणारी मुलगी लोकसत्ता घेऊन आली. मला एका पानावरची गोष्ट, खरं तर शीर्षक दाखवलं. ते होतं, 'काटकसर'.
तिची तक्रार - ताई, या गोष्टीत कोणीच काटक सर नाहीत...

क्वात्रोची - हे प्रकरण प्रसार माध्यमांमध्ये गाजत होतं, तेव्हाची गोष्ट. शिकाऊ पत्रकार बराच वेळ अनेक शब्दकोश ( अवांतर - शब्दकोशाला आमच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने शब्देश्वरी असा सुरेख शब्द बहाल केलाय) घेऊन बसला होता.
त्याला विचारलं, कोणत्या शब्दाचा अर्थ शोधतोयस?
तो उत्तरला, खूप मोट्ठ स्पेलिंग आहे. थांबा, बातमी दाखवतो. तो शब्द होता... Ottavio Quattrocchi.

अवांतर - त्याला हे दोन्ही शब्द समजले नव्हते. संदर्भाने हे नाव आहे, इतकं समजू शकलं असतं कदाचित, पण चुकीच्या पद्धतीने मजकुराचा अनुवाद करायचा प्रयत्न केला, अर्थात आधी शब्द नंतर प्रत्येक शब्दाचा अर्थ, नंतर वाक्य... त्यामुळे...
असो.
इथे मी चुकीच्या पद्धतीने अनुवाद करायचा प्रयत्न असं म्हटलंय. त्याचा अर्थ काय? तर इंग्रजी मजकुरावरून बातमी करायची असेल तेव्हा आमच्या आकाशवाणीतल्या वयाने, मानाने आणि अनुभवानेही ज्येष्ठ असणाऱ्या वरीष्ठांच्या शब्दात सांगायचं तर...
'इंग्रजी मजकूर पूर्ण वाचून घे. किमान पदवीधर इतकी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या व्यक्तीला त्या मजकुरातला महत्वाचा आशय कळावा, इतकी माफक अपेक्षा आहे. कदाचित खूप शब्द समजणारही नाहीत. पूर्ण मजकूर दोन वेळा वाचून घे. आता तो कागद बाजूला ठेव आणि त्यात काय म्हटलंय, ते मला सांग. तू मला जे सांगशील, तीच बातमी. आकडेवारी, महत्त्वाची नावं वगळता, नेमकं काय झालं, ते सांगता आलं पाहिजे. तो कागद समोर ठेवून बातमी करायची नाही'
हाच नियम भाषांतर अथवा अनुवादाच्या सर्व प्रकारांना लावता येईल, नाही का?
विषय थोडा भरकटला का? पण एका ओघात लिहून गेले हे सगळं... उच्चारांच्या आणखीही गमती असतील तुमच्याकडे, तर वाचायला आवडतील...

भाषाप्रकटन

प्रतिक्रिया

हॅ:! फारच लवकर आवरतं घेतलंत हो! आत्ता कुठे मी सरसावून बसायला लागलो होतो वाचायला एव्हढ्यात संपलंही? :-(
पण जे लिहिलयत ते एकदम झकास!

उच्चाराने अर्थ कसा बदलतो त्याचे जुने उदाहरण- शाळेत जाउन ये X शाळेत जाऊ नये!

आपल्या माजी राष्ट्राध्यक्षा स्वातन्त्र्यदिन वगैरे राष्ट्रीय महत्वाच्या दिवशी राष्ट्राला उद्देशून जे सन्देश प्रसारित करत, ते सन्देश सगळ्या भारताबाहेरील भारतीय वकिलातीत वाचून दाखवले जाताना अनेक वेळा त्यान्चे नाव "प्रतिभादेवी सिन्गपाटील" असे वाचले गेलेले ("प्रतिभा देवीसिन्ग पाटील" च्या ऐवजी) ऐकलेले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2014 - 2:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

खाडीदेशांत काम करताना माझ्या एका मराठी सहकारी मित्राचे "बामणीकर" हे आडनाव मल्याळी मंडळी "बाम पणिक्कर" असे उच्चारीत असत याची आठवण आली :)

नाना पळशीकर या नावावरचा पांवि तर प्रसिद्धच आहे ;)

टवाळ कार्टा's picture

7 Jun 2014 - 2:40 pm | टवाळ कार्टा

नाना पळशीकर या नावावरचा पांवि तर प्रसिद्धच आहे

=))

माझ्या मित्राचे आडनाव "धामोरीकर" आहे...कट्ट्यावर सगळे त्याला "धाव मोरीत कर" बोलवतात :)

आत्मशून्य's picture

7 Jun 2014 - 8:30 pm | आत्मशून्य

कंडक्टर.

प्रभाकर पेठकर's picture

8 Jun 2014 - 2:18 am | प्रभाकर पेठकर

आमच्या फडके नांवाच्या मित्राला कुरियर घेऊन आलेला अमराठी माणूस 'ये फाडके कहाँ रहते है?' विचारत आला होता.

रमेश आठवले's picture

8 Jun 2014 - 9:31 am | रमेश आठवले

वर भडकमकर आडनावाच्या तोडफोडीतून घडलेला एक विनोद दिला आहे. याच आडनावावरील दुसरी एक कोटी ऐकण्यात आली आहे. एक थोड्या तापट स्वभावाच्या बाई एका सरकारी दप्तरात काम करत असत. त्यांच्याशी संपर्क येणारी काही माणसे त्यांना भडक कम कर असे सांगत.

योगी९००'s picture

9 Jun 2014 - 9:28 am | योगी९००

पुर्वी एके ठिकाणी काम करताना कंपनीत शॄंगारपुरे नावाचा माणूस होता. त्याच्याकडून काहीही चुक झाली तर त्याचा बॉस गंमतीने "आहो शॄंगारपुरे... आता शॄंगार पुरे करा, आणि काम करा लवकर" असे म्हणायचा. अर्थात तो शॄंगारपुरेही हे गंमतीनेच घ्यायचा...!!
कोठेतरी वाचनात आलेला विनोद : एक माणूस "एडवर्ड द अत्रे" कोठे आहे असे विचारत होता. नंतर काहीच्या लक्षात आले की ते "edward theatre" असे आहे. "theatre चे the atre" अशी तोडफोड केली होती.

बाकी नतुरे आणि फुटुरे चा विनोद सर्वांना माहित असेलच...

ब़जरबट्टू's picture

9 Jun 2014 - 4:45 pm | ब़जरबट्टू

आता "राण्डे" आपल्याला मार्गदर्शन करतील, असे भर सभेत म्हणून आमच्या "रानडे" ला एकाने जागीच झोपवला होता.. :)

आदूबाळ's picture

9 Jun 2014 - 5:25 pm | आदूबाळ

एक ऐकीव कथा, पण त्यातल्या प्रमुख पात्रांना भेटलो असल्यामुळे शक्यतेच्या कोटीतली:

---------------
एका कारखान्यात आरपीआय-शिवसेनेची कामगार यूनियन होती. युनियन चांगलीच ष्ट्राँग असल्याने मॅनेजमेंट दबकून असे. कारखान्याच्या फायनान्स कंट्रोलरपदी एक मल्लू गृहस्थ आले. सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकल्या असल्याने त्यांनी युनियनपासून चार हात लांबच रहायचं असं ठरवलं.

तसाही अकाऊंट्समध्ये असल्याने त्यांचा कामगारांशी थेट संबंध येत नसे. पण डोकेबाज युनियन प्रत्येक खात्यात आपला एकतरी माणूस पेरतेच. तसा त्यांनी अकाऊंट्समध्ये एक भालेराव नामक इसम बसवला होता. कंट्रोलरसाहेबांनी त्याच्याशी पंगा घ्यायचा नाही असं ठरवलं. जपून जपून वागायचे. शक्यतोवर भालेरावला कामं सांगायचे नाहीत.

तरी एक दिवस असा उजाडला की भालेरावला काम सांगणं कंट्रोलरसाहेबांना भाग पडलं. कामही काही ग्रेट नव्हतं - स्टँप व्हेंडरकडून काही कागद आणायचे होते (फ्रँकिंगपूर्व जमाना). कंट्रोलरसाहेब स्वतः उठून भीत भीत भालेरावच्या टेबलाशी गेले.

कंट्रोलरसाहेब: भालेराव, आर यू बीसी?

आख्खं ऑफिस दचकलं. टाचणीस्फोट शांतता पसरली. भालेरावही अवाक!

कंट्रोलरसाहेब: आय हॅड सम वर्क फॉर यू. टेल मी, आर यू बीसी?

भालेरावचा चेहेरा संतल्त व्हायला लागला होता. चारचौघांत जात काढतो म्हणजे काय!

कंट्रोलरसाहेब: (भालेराव काहीच बोलत नाही हे पाहून) डोंट वरी. इफ यू आर बीसी, आय विल आस्क समवन एल्स.

भालेराव संतापाने थरथरायला लागला होता. "बीसी" आहे म्हणून काम देत नाही? भेदभाव? अ‍ॅट्रोसिटी?

इतक्यात एकाच्या डोक्यात बल्ब पेटला.

"भालेराव, अरे बीझी आहेस का तू, असं विचारताहेत. बीझी."

खुदकन सगळे हसले. वातावरणातला ताण एकदम सैलावला. भालेराव स्वतः हसला, आणि कंट्रोलरसाहेबांकडून काम समजून घेऊन स्टँप आणायला गेला.

कंट्रोलरसाहेबांना शेवटपर्यंत आपण काय गोंधळ केला हे कळलं नाही!

बॅटमॅन's picture

9 Jun 2014 - 5:56 pm | बॅटमॅन

अगागागागागागागा =)) =)) =)) =))

धन्य _/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2014 - 6:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

थॉर माणूस's picture

10 Jun 2014 - 2:16 pm | थॉर माणूस

*lol*
मल्लूंच्या इंग्रजी उच्चारांविषयी काय बोलावं. या इसी, बिसीशिवाय आणि काही खास उच्चार मी स्वतः ऐकले आहेत.
"भोत बॉर हो गया"
"रॉड भोत हॉट था"
"मै णा कल होर्स राईड किया"... आणि मग बास्स आम्ही त्याला चारचौघात ओळख देणं बंद केलं. :D

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2014 - 2:42 pm | टवाळ कार्टा

"मै णा कल होर्स राईड किया"

=))

माझ्या एका क्लायंटचं आडनाव "होर" होतं. बंगाली गृहस्थ. त्याच्याकडून बिलाचे पैसे आले, की सहकारी म्हणायचे "ही इज द ओन्ली वन आय हॅव सीन हू गेट्स पेड बाय द होर." ;)

स्वप्नालीसा's picture

10 Jun 2014 - 3:15 am | स्वप्नालीसा

))::))::))::

स्वप्नालीसा's picture

10 Jun 2014 - 3:15 am | स्वप्नालीसा

:-))

इशा१२३'s picture

10 Jun 2014 - 11:33 am | इशा१२३

एकदा अशीच उच्चारातली गंमत माझ्या मुलानेही केली होती.मराठी पुस्तकातल काहितरी वाचत होता आणि एक शब्द काही त्याला समजेना.मला येउन विचारल की, आई सुतक ताई कोण ग?मलाही संदर्भ लागेना.शेवटी पुस्तक वाचल्यावर
कळले.तो शब्द 'सुतकताइ' असा होता.महात्मा गांधी सुतकताइ करत.असे वाक्य होते.आणि हा भलत्याच ठीकाणी शब्दफोड करत होता.

=))

यात खरेतर मुलाचाही दोष नसावा. "सूतकताई" ऐवजी "सुतकताई" लिहिल्यास असेच वाटणार.

माधुरी विनायक's picture

10 Jun 2014 - 1:05 pm | माधुरी विनायक

सगळेच किस्से अफलातून...

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jun 2014 - 2:29 pm | राजेंद्र मेहेंदळे

भयानक
ए चा उच्चार अ‍ॅ आणि आणि अ‍ॅ चा ए करुन वाट लावतात
थोडा "स्नेक" खावो ने असे म्हणुन एका मित्राने मला चक्कर आणली होती

सुनील's picture

10 Jun 2014 - 2:44 pm | सुनील

नुसता स्नेक काय कोणीही खाईल. "होल" मध्ये जाऊन स्नेक खाल्ला आहेत काय?

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2014 - 3:24 pm | अत्रुप्त आत्मा

हा माझ्या एका कामात घडलेला खरोखर खरा किस्सा आहे.. मी आणि एक गुर्जी एक लगिन लावायला गेलो होतो. पोरगी आपली आणि पोरगा आम्रविकेतला! आधि त्यानी आंम्हाला,तिथे गेल्या गेल्या ण्हःमॅस्क्कार - केला. आणि दुभाषा मार्फत मला(मंजे त्याला) मंत्रोच्चार करवून घ्यायला संकोचू नका..आरण त्यानी आपल्या उच्चारांची सवय केल्ये असं सांगितलं. कन्यादान,कंकणबंधन होइपर्यंत फार प्रश्न आला नाही.पण मंगळसूत्रा..वेळी उभौ गणपति-पूजनाचा संकल्प सांगायची वेळ आली..आणि मला काहि पूर्वानुभव अठवून बरचस भ्यायला झालं. तो दुभाषा म्हणून जो नेमलेला होता..त्याला पण मेल्याला..त्यादिवशी भारी आग आलिवती. मी त्याला फक्त "मम" म्हणायला लाऊन पुढला संकल्प ऐकायला लावायच्या बेतात होतो..पण "हा" ऐके ना! म..म्हटलं मरा आज हसून हसून...
आणि मग मी मख्ख चेहेरा ठेऊन सुरवात केली.. :- मम आत्मनः श्रुति:स्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं

(त्याचं डायरेक्ट उच्चा रण ऐकू आपण अता!)>>> ममा..आट् मुणः (इथे फोटोग्राफर "पडला!")
शूतीत..मुति... (अख्खा मांडव अडवा....सलग १० मिनिटं!)
फुल्नोख्त् फॅलाह्प्प्रा .. थॅर थम (आणि मी यमसदनाला पोहोचलो....!)

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Jun 2014 - 3:55 pm | लॉरी टांगटूंगकर

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2014 - 5:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) , =)) , =))

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2014 - 5:44 pm | अत्रुप्त आत्मा

हा वरील किस्सा घडला..ते ठिकाण मंजे एका थ्री स्टार हॉटेलातला ,बँक्वीट का कसलासा म्हणतात तो HiFi हॉल होता. त्यामुळे स्टेजवरची माइक व्यवस्था प्रचंड अपडेट होती..परिणामी..त्या फॉरे नरानी उच्चारलेलं अक्षर अन् अक्षर ..गर्दित शेवट पर्यंत प्रत्येकाला ऐकू जात होतं! =))

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2014 - 6:59 pm | टवाळ कार्टा

बँक्वीट का कसलासा म्हणतात तो HiFi हॉल होता.

अर्रे...ब्लांकेट हाल यारों...ब्लांकेट हाल मे घूसते ही पूरा लोगां नाचरेले...

साभार - "द" अंग्रेझ :)

सलीम फेकूच्या आठवणीने डॉळे पाणावले.

(फॅन ऑफ दि ओल्ड सिटी गाईज़) बॅटमॅन.

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2014 - 2:44 pm | टवाळ कार्टा

जांगीर को नक्को भूलो

अर्रे, इत्ते सालसे अंग्रेजा देख रा मै, कैसे भूलता की.

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2014 - 4:53 pm | टवाळ कार्टा

जांगिर दरवाजा मारनेमें उस्ताद है =))

ये अंग्रेजां पे १ धागा डाले क्या रे?

बॅटमॅन's picture

12 Jun 2014 - 5:02 pm | बॅटमॅन

डालो रे, अब्बी के अब्बी. क्रीश्ना ओबेरॉय मे दावत थी व्हा जाने को होना रे मेर्कु ;)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2014 - 5:44 pm | अत्रुप्त आत्मा

हा वरील किस्सा घडला..ते ठिकाण मंजे एका थ्री स्टार हॉटेलातला ,बँक्वीट का कसलासा म्हणतात तो HiFi हॉल होता. त्यामुळे स्टेजवरची माइक व्यवस्था प्रचंड अपडेट होती..परिणामी..त्या फॉरे नरानी उच्चारलेलं अक्षर अन् अक्षर ..गर्दित शेवट पर्यंत प्रत्येकाला ऐकू जात होतं! =))

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2014 - 5:45 pm | अत्रुप्त आत्मा

हा वरील किस्सा घडला..ते ठिकाण मंजे एका थ्री स्टार हॉटेलातला ,बँक्वीट का कसलासा म्हणतात तो HiFi हॉल होता. त्यामुळे स्टेजवरची माइक व्यवस्था प्रचंड अपडेट होती..परिणामी..त्या फॉरे नरानी उच्चारलेलं अक्षर अन् अक्षर ..गर्दित शेवट पर्यंत प्रत्येकाला ऐकू जात होतं! =))

मिपाची व्यवस्थाही तितकीच अपडेट असल्याने बुवांचा प्रतिसाद तीन लाटांत प्रत्येक मिपाकरामार्फत गेलेला आहे ;)

(पळा पळा मेलो)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2014 - 6:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

*help* *bomb* लै जोरात आडोश्याला पळ !!! बुवांकडे खूप्खूप बंदुकधारी स्मायल्या हाय्त. *diablo*

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2014 - 6:25 pm | अत्रुप्त आत्मा

दुष्ष्ट http://www.sherv.net/cm/emoticons/guns/big-machine-gun.gif खाटुकम्यान http://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-m16-smiley-emoticon.gif

रेवती's picture

12 Jun 2014 - 5:46 pm | रेवती

देवा! काय हे? नको ती हौस! श्श्या!

बबन ताम्बे's picture

10 Jun 2014 - 4:12 pm | बबन ताम्बे

आमच्या ऑफीसमधे घडलेला किस्सा.
अमेरीकेत आमच्या कंपनीचे हेडऑफीस आहे. तिकडून वीई हू नावाचा चिनी माणूस पुण्याच्या ऑफीसला भेट दयायला आला होता.एके दिवशी त्याच्या बायकोचा अमेरीकेवरून फोन आला. रिसेप्शनिस्ट जागेवर नसल्यामुळे सिक्युरीटीने फोन उचलला. त्याला तिचे उच्चार कळले नाहीत म्हणून त्याने आमच्या फॅसिलिटी मॅनेजरकडे फोन ट्रांस्फर केला. फॅसिलिटी मॅनेजरला कुणी चिनी पाहुणा आलाय याची कल्पना नव्ह्ती. अमेरीकेवरुन वीई हू ची पत्नी बोलत होती " हेल्लो, आय अ‍ॅम हूज वाइफ स्पीकिंग..."
"हाऊ डु आय नो हुज वाइफ इज स्पीकिंग?"- फॅसिलिटी मॅनेजर.
"नो नो, आय अ‍ॅम हूज वाइफ स्पीकिंग" ती.
मग त्या मॅनेजरला कुणीतरी सांगितले की वीई हू साठी फोन असेल. चूकून तुमच्याकडे ट्रांस्फर केलाय :-)

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2014 - 4:44 pm | टवाळ कार्टा
बबन ताम्बे's picture

10 Jun 2014 - 6:54 pm | बबन ताम्बे

सॉल्लीड ! :-)

फुंकुन चाय पी.
स्टो ची पीन
वस्कन ओरडलास्की

बॅटमॅन's picture

11 Jun 2014 - 12:14 am | बॅटमॅन

वस्कन ओरडलास्की

सोबतच उभा काबस्की, हे हुंग ते हुंग, इ. रशियन आणि चिनी व्यक्तिमत्त्वे आठवली.

बॅटमॅन's picture

11 Jun 2014 - 12:11 am | बॅटमॅन

अजूनेक जबरी किस्सा...

एका पेट्रोलियम कंपनीत एक ओडिया पोरगा. स-श-ष मध्ये काही फरक म्हणून असतो हे गावीच नाही. आडातच नाही तिथे पोहर्‍यात कुठून येणार? तर एक प्रयोग केला, त्यात करड्या रंगाची राख नंतर काळी झाली असे सांगायचे होते.

तर साहेब सुरू झाले: "माय अ‍ॅ$$ वॉज ब्राऊन, देन इट गॉट ब्लॅक". सहकारी पोरे हसूनहसून मरायच्या घाईला. त्याला वाटलं आपल्यावर विश्वास ठेवेनात कोणी, मग परत म्हणतो कसा, "नो नो, आय अ‍ॅम नॉट जोकिंग, इट रियली हॅपन्ड!!" =)) =)) =)) =)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2014 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/blue-face/about-to-puke-smiley-emoticon.png

झकासराव's picture

13 Jun 2014 - 1:30 pm | झकासराव

:lol: :lol: :lol:

कहर किस्से आहेत एकेक.

यसवायजी's picture

20 Jun 2014 - 10:41 am | यसवायजी

Mattomme.
व आणि ब एकच असल्याने >>
१ भन्नाट किस्सा आमच्या ऑफिसात घडला होता. एका बंगाल्याला विचारले की तुला यायला उशीर का झाला बाबा?
त्याला म्हणायचे होते I got my walls painted today. (अर्थातच घरच्या भिंती)
फक्त व चा ब केला त्याने.

एक सर्वसाधारण निरीक्षण आहे की महाराष्ट्रातील मराठी मातृभाषा असणार्‍या (आणि मराठी तसेच इंग्रजी माध्यमात शिकलेल्या) व्यक्तींचे इंग्रजी उच्चार भारतातील इतर प्रांतातील लोकांच्या तुलनेने फारच सफाईदार असतात.

खटपट्या's picture

12 Jun 2014 - 1:39 am | खटपट्या

पंजाबी लोकांचे उच्चार तर अजूनच विचित्र असतात

मारुती = मृत्ति
बारीक = ब्रिक

एक विनोद - एका महिलेने सरदारजींना वेळ विचारली तर त्यांनी त्यांच्या उच्चारात १२:३५ सांगतिले आणि मार खाल्ला.

का ते तुम्हीच बघा :)

भृशुंडी's picture

12 Jun 2014 - 2:25 am | भृशुंडी

एका मराठी सरांनी कालेजात anna नावाच्या मुलीची हजेरीबुकात बघून "अण्णा, प्लीज स्टॅंड अप" म्हणून विकेट घेतलेली बघितली आहे. *biggrin*

बापरे! हसून पुरेवाट झालीये.

हैदराबादेस एक संपूर्ण तेलुगु महिला (हिंदीचा गंध नसलेली) काहीतरी विचारायला आली. अशा महिला नेहमी माझी कामवाली बाई असतानाच येत असत कारण ती आमची दुभाषी असे. ते धुणे भांड्यापेक्षा वेगळे काम करताना मजाही वाटत असे, कारण इथे ती आमची बॉस! तर ही येऊन काहीतरी विचारती झाली बहुतेक "अम्मा आहे का?" यावर पद्माने उत्साहाने हातातील ओले फडके बाजूला टाकले व हसत हसत त्या बाईंना "रंडी, रंडी" व आणखी काहीतरी म्हणू लागली. मी घाबरून एकाजागी गप्प उभी. त्यावर त्या बाई हसत हसत येऊन बसल्या. थोडावेळ दुभाषीगिरी करून पद्माने त्यांना काम विचारले तर त्यांच्याकडचा कढीपत्ता संपल्याने आमच्या झाडाचा थोडा नेऊ का हे विचारायला आल्या होत्या. नंतर तिनेच माझा गैरसमज दूर केला व या, बसा असे म्हणताना रंडी म्हणावे असे सुचवले. तसेच शेजार्‍यांना सांगून मी पालेभाज्या विकणारी बाई आली की पाठवा म्हणून सांगितले. एक बाई येऊन अककुरा पाहिजे का असे विचारून गेली. मी नको म्हणून सांगितले. नंतर ती शेजार्‍यांना घेऊनच आली मग समजले.

माझ्या मुलाने सध्या अभ्यासातला एक प्रश्न विचारताना कांड्रगप्ट मोरया कोण हे विचारले. तो इंडियन आहे व असोका त्याचा ग्रँडसन आहे वगैरे विचारले. आता मला काही लक्षात नाही म्हणून पाहिले तर (पुस्तकातील स्पेलींग चुकल्याने)चंद्रगुप्त मौर्य व अशोका यांचा एक धडा होता.

योगी९००'s picture

12 Jun 2014 - 10:25 am | योगी९००

तेलगू मध्ये आदरपुर्वक (with respect ) या बसा म्हणायचे असेल तर रंडी म्हणतात.. हेच जर उद्या या असे म्हणायचे असेल तर "रेप रंडी" (उच्चार रेप्परंडी) असे म्हणतात.

तसेच कुंडी (म्हणजे आपण घरी रोपटे लावतो ते) याचा कन्नड मध्ये भलताच अर्थ आहे. माझ्या एका कोल्हापुरस्थित मित्राने हुबळीला एका रोपटी लावायच्या कुंड्या विकणारीला "यष्ट कुंडी?" असे विचारून आम्हाला फेफरे आणले होते. सुदैवाने जवळअसलेल्या दुसर्‍या दुकानदाराला आमचे मराठी कळत होते म्हणून वाचलो नाहीतर मारच पडणार होता...

लॉरी टांगटूंगकर's picture

12 Jun 2014 - 12:05 pm | लॉरी टांगटूंगकर

==)) ==))

रेवती's picture

12 Jun 2014 - 4:01 pm | रेवती

आता मीही मूळची कन्नडिगा असल्याने व त्या भाषेबद्दल माहिती नसल्याने वरील विनोदाला आधी हसले नव्हते, दोनेक वर्षांपूर्वी खरा अर्थ समजला.;)

मग अककुरा म्हणजे पालेभाजी का?

रेवती's picture

12 Jun 2014 - 4:02 pm | रेवती

हो.

मराठी देखील इतर भाषिकांसाठी कन्फ्युजिंगच आहे.
एक वाचलेला किस्सा. एक फॉरेनर मराठी शिकत होती. तिला छोटीशी शंका विचारायची होती, तर तिने विचारले, "मला एक लघुशंका आहे." बाकीचे हसायला लागले. नंतर तिला कुणी तरी खुलासा केला की मराठीत लघुशंका म्हणजे छोटी शंका नाही तर त्यांच्या भाषेत रेस्ट रूमला जाणे.

जय - गणेश's picture

12 Jun 2014 - 3:33 pm | जय - गणेश

एक आमच्या ऑफिसात बंगाली आहे, दुपारी जेवायला बसलो असतांना तो प्यान्टरी बॉय ला म्हणाला.
एक "कार्ड" तो देना.

नंतर समजल त्याला "दही" पाहिजे होतं.

बंगाली भद्रजन उर्दूची कशी वाट लावतात याचा, माझ्या एका बंगाली मित्राने सांगितलेला किस्सा:

त्यांना म्हणायचे असते: ना गिला करेंगे ना शिकवा करेंगे, तुम सलामत रहो यही दुआ करेंगे.
आणि ते म्हणतात: ना गीला करेंगे ना शूका करेंगे तुम साला मत रहो यही दुआ करेंगे!

अवांतर: बंगाली (मुली) बोलत असताना त्यांच्या बोलण्याच्या अर्थापेक्षा त्यांच्या बोलण्याच्या लयीतच तरंगायला होतं!

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Jun 2014 - 4:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

माझा एक बॉस आणि त्याची बायको १० वर्षे अमेरिकेत राहतात...आणि बंगाली अ‍ॅक्सेंट्मध्ये भयंकर ईंग्लिश बोलतात...क्लायंट्ला कसे समजते देव जाणे
१. ईन ऊईंटर हियड इट इज सो कोल्ड
२.आय वाज ड्रायभिंग भेडी फास्ट
३.फास्ट यु काम टु आफिस अँड देन उइ उइल टाक अबाऊट इट

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Jun 2014 - 4:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

गुडु यु आर भेडी स्मार्ट(guru you are very smart)

आमच्या हापिसात एक बंगाली मुलगी होती, तिचे आवडते गाणे: बादा डहा प्याडसे प्याडका

बंगालीमध्ये व चा उच्चार ब असा होतो आणि त्या मुलीला र उच्चारता यायचा नाही त्यामुळे र च्या ऐवजी ती ड बोलायची.

बंगाल्यांचे बंगाली सोडून अन्य कुठल्याही भाषेचे उच्चार इतके दिव्य असतात की सांगता पुरवत नाही. संस्कृत उच्चार तर तौबा!!! "धॉर्मोखेत्रे कुरुखेत्रे शॉमोबेता जुजुत्शॉबा | मामोका पाण्डोबाश्चोइबो किमोकुर्बत शाँजोय ||" वगैरे ऐकून गीतेच्या पुस्तकाच्या पानातून कृष्णाच्या अगोदर अर्जुनच एक अमोघ बाण सोडून जीभ कलम करेल की काय असे वाटू लागते. =))

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2014 - 3:30 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying-with-laughter.gif

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jun 2014 - 9:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

   आणि ही...ही...ही...

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2014 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा

माझ्याकडे काहि बंगाली यजमान आहेत..त्यांच्याकडे कामाला गेल्यावर हसण्यावर भयंकर संयम ठेवावा लागतो! *biggrin*

विशेषतः ..
गणानांत्वा गणपतिं हवामहे.. हा मंत्र म्हणवून घेताना,मृत्यू ओढवलेला बरा असं वाटायला लागतं! =))

आदूबाळ's picture

18 Jun 2014 - 4:51 pm | आदूबाळ

जुन्या जमान्यात इंग्रजी शिकलेले लोक we ला "वुई" का बरं म्हणत असावेत? "फायू", "आय नीव", "वॅटसन", "सप्टेबर" वगैरे उच्चार कुठून आले?

बॅटमॅन's picture

18 Jun 2014 - 5:45 pm | बॅटमॅन

जसा सप्टेबर आहे तसा ऑक्टोम्बरही आहे बरंका आदूबाळशेठ ;)

आदूबाळ's picture

18 Jun 2014 - 6:41 pm | आदूबाळ

हा हा हा ... मग काय ट्याली झालं म्हणायचं का? :))

बॅटमॅन's picture

18 Jun 2014 - 6:47 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी =))

बाकी जानेवारी हा उच्चार ऐकून लहानपणी पाचवारी, नौवारी, इ. सारखा हा साडीचा कुठलासा प्रकार आहेसे वाटत असे त्याची आठवण झाली.

वामन देशमुख's picture

18 Jun 2014 - 6:16 pm | वामन देशमुख

weचा योग्य उच्चार "उइ" असाच आहे.
वस्तुतः, सर्वसाधारणपणे Wचा उच्चार हा "उअ" असा आहे आणि Vचा उच्चार भारतीय भाषांतील "व" च्या जवळपास आहे.

खरंतर, सर्वच भारतीय शब्दांतील व साठी V हेच स्पेलिंग वापरायला हवे.

(वस्तुतः म्हणजे in fact, जमलं का?)

मिहिर's picture

18 Jun 2014 - 6:38 pm | मिहिर

vi सारखा दंतोष्ठ्य व वापरून वी उच्चार होऊ नये, त्यात थोडा तरी ओष्ठ्यपणा असावा म्हणून मध्ये उ घालत असावेत असे वाटते. जर 'व'चा उच्चार तोंडाचा चंबू करून ओष्ठ्य होत असेल, तर आणखी उ खुपसण्याची गरज नाही.

बंगाली लोक लिंगभेदामध्येही गडबड करतात. ही ला शी किंवा उलटे. ;) जे काही बंगाली भाषेत बोलतात ते लाडालाडाने बोलल्यासारखे असते.

मराठे's picture

18 Jun 2014 - 8:44 pm | मराठे

"वी नीड मोर हार्ड डिक्स" म्हणून एका बंगाल्याने (बंगाली किंवा ओरिया) सगळी प्रोजेक्ट रूम हलवली होती.

शिद's picture

18 Jun 2014 - 9:08 pm | शिद

*lol* *ROFL*

टवाळ कार्टा's picture

19 Jun 2014 - 4:06 pm | टवाळ कार्टा

=))

खटपट्या's picture

18 Jun 2014 - 10:29 pm | खटपट्या

माझ्या एका मित्राचे नाव हार्दिक आहे ?
इथले गोरे नेहमी त्याचे नाव घेवून आपआपसात कुजबुजत असतात :)

टवाळ कार्टा's picture

19 Jun 2014 - 4:07 pm | टवाळ कार्टा

सुखदीप बाबत सुध्धा तस्सेच होते...कदाचित जास्तच ;)

कानडाऊ योगेशु's picture

18 Jun 2014 - 10:52 pm | कानडाऊ योगेशु

मुंबईत असताना आमच्या कंपनीत एक बंगाली सहकारी होता. काम संपवुन आम्ही पाच सहा जण एकत्र जात असू. बस मिळाली तर बसने अथवा चालत स्टेशन्पर्यंत जात असु.कधी बस मिळायची तर कधी नाही. त्यामुळे बसनेच जायचे असा काही नियम नसायचा. तर एकदा असेच जात असताना तो बंगाली सहकारी हात दाखवत जोरात ओरडला " अरे उधरसे बास आ रही है!" आमच्यापैकी एकाने म्ह्हटले "नही रे कहा बास आ रही है". तो पुन्हा ओरडला "अरे देखो उधर से बास आ रहे है". पुन्हा आम्ही "नही रे कोई बास नही आ रही है". तेवढ्या अवधीत ती बस निघुन गेली तेव्हा अजुन एक सहकारी ओरडला " अरे बस चली गई" त्यावर तो बंगाली सहकारी उत्तरला " मै याही तो बोल रहा था बास आ रही है.."

चौकटराजा's picture

19 Jun 2014 - 7:08 am | चौकटराजा

एक गुजुभाईक मला म्हणाला म्हणाला होता " सचिन तेंदूलकर एक ग्रेट प्ल्यर है वो बेटिंग इमाननदारीसे करता है !

सुबोध खरे's picture

19 Jun 2014 - 11:51 am | सुबोध खरे

चर्चगेट ला सुंदराबाई हॉल मध्ये पुस्तकाचे प्रदर्शन लागले असताना माझा एक गुजु भाई मित्र म्हणाला चलते क्या बुक खरीदने? मी किधर विचारल्यावर म्हणाला सुन्दराबाई नो होल.
कहर म्हणजे भावेस स्टेट्स मा गयो
म्हणजे भावेश (STATISTICS) मध्ये नापास झाला

प्रभाकर पेठकर's picture

19 Jun 2014 - 12:42 pm | प्रभाकर पेठकर

एकदा एक माणूस आपली गाडी रिव्हर्स पार्कींग करीत होता. त्याने त्याच्या बंगाली नोकराला सांगितलं जरा मागे बघून मला सांग.
ह्याने गाडी मागे घ्यायला सुरुवात केली. नोकर सांगत होता कोम बॅक..कोम बॅक.
ह्याने गाडी अजून मागे घेतात गाडी एका खांबावर आपटली. हा संतापला.
खाली उतरून नोकराला म्हणाला, तुम बोल नही सकते थे, पिछे खंबा है?
नोकर म्हणाला, वोई तो बोल र्‍हा ता, कोम्बा हे कोम्बा हे।

एकदा एक बंगाली नोकर, अगदी दु:खी चेहर्‍याने, आपल्या मालकाला म्हणाला, 'साब, सिरिया का बाद्शाह मर गया।'
मालकाने विचार केला सिरिया मधे बादशहा कुठे? तो नोकराला म्हणाला, 'अरे सिरियामे बादशाह वगैरे नही होता'
पण नोकर त्याचा मुद्दा सोडेना. शेवटी मालकाने विचारले 'तुमको कौन बोला की सिरियाका बादशाह मर गया?'
नोकर म्हणे, 'हॉमने कुद देका'
आता मालकाला राहवेना, 'किधर?'
नोकर, 'आओ..'
तो मालकाला अंगणात घेऊन गेला तिथे एक चिमणीचं पिल्लू मरुन पडलं होतं. तेंव्हा मालकाच्या डोक्यात प्रकाश पडला की त्याच्या नोकराला म्हणायचंय की, 'चिडीया का बच्चा मर गया।'

आमचा एक मित्र होता, अर्थात बंगाली. एकदा म्हणाला, 'म्येरेको शार्प लेना है।'
झालं. आम्ही सगळे मित्र त्याला घेऊन 'शार्प'च्या शोरुम मध्ये गेलो. तिथे आख्खी शोरुम पालथी घातली पण ह्याला कुठला पीस पसंत पडेना. शेवटी मी म्हणालो,' क्या यार, इतना बेकारका टाईमपास किया, तुमने कुछ लिया नही।'
तो चकित चेहर्‍याने म्हणाला,' म्येरेको कुछ लेनेकाई नई।'
मी - ' तो क्यूं बोला 'शार्प' लेनेका है? तेरे लिए हम सब लोग यहाँ आए है नं।'
त्यावर तो म्हणाला, ' आरे ये शार्प नही, कपडा धोनेका शार्प'.
त्याला 'सर्फ' पावडर घ्यायची होती. जाम धोपटला त्याला.

ह्याहून वाईट्ट अनुभव मी घेतला आहे. पण त्या बंगाल्याच्या उचारातून ध्वनीत होणार्‍या अश्लिल अर्थामुळे इथे देता येत नाही.

हुकुमीएक्का's picture

19 Jun 2014 - 11:49 pm | हुकुमीएक्का

हा किस्सा मी ह्युंडाई च्या शोरुम मध्ये पाहिला होता. एक साधारण ४०-५० दरम्यान वय असलेला माणूस आपल्या भावासोबत शोरूम मध्ये आला होता. बरोबर एक पोते होते. त्यांने एंट्री मारल्याबरोबर तेथील लोकांना वाटले कदाचित पत्ता विचारायला आला असेल. तो आल्याबरोबर २-३ Sales person त्यांना अटेंड करायला गेले.

माणूस - "आमास्नी गाडी घ्याची हायं."

Sales-person - "कोणती घ्यायचीय? सेकंड-हँड गाड्यापण आहेत" (वास्तविक त्या माणसाकडे पाहून या लोकांना वाटले असेल की हा काय नवीन कार घेणार ?")

माणूस - "आमास्नी सेकंड हँड नगं नवीनच हवी हाय. आमचं पोरगं यकदा 'वापरलेली' गाडी परतं वापरत नाय. अन ते आमास्नी बी पटत नाय."

ते लोकं अजुनच गार.

Sales-person - "कोणती घ्यायचीय?".

माणूस - "आत्ता नवीनच आलीयां बगां. नाव 'इलो'."

Sales-person(brochure मध्ये पाहून) - "छे हो अशी कुठलीच कार कंपनीने लाँच नाही केलीय अजून.".

माणूस - "आवं आमच्या गावांत तसल्या ४ हायतं की. नायं काय म्हनता? तोंडावरनं तरी ४ इयत्ता शिकलेले वाटतां. *lol* "

ते विचारायला गेलेले ३-४ जण खरच खुप गोंधळून गेले की अशी कुठली कार आलीय की जी आपल्या शोरूममध्ये नाहीये.
शेवटी त्यांनी शोरूमच्या मालकाला बोलवले. मालकपण तेच बोलला की अशी कोणतीच कार नाहीये.

शेवटी त्या माणसाने त्या मालकाला बाहेर नेऊन ती कार दाखवली. कार होती शोरूममध्ये.

कारचे नाव होते "Hyundai i10".

ते पाहून मालकासकट सगळ्यांनी (अगदी आम्हीसुध्धा) डोक्याला हात लावला. *lol*

जाताना त्या माणसाने सर्व "याक्सेसरी" (Accessories) हव्यात असे सांगितले आणि जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा त्या माणसाने बरोबर आणलेले पोते उघडले त्यात तसल्या अजून २ गाड्या येतील एव्हडी रक्कम होती. *biggrin*

खटपट्या's picture

20 Jun 2014 - 2:05 am | खटपट्या

नोईडा भागात जागांचे भाव वाढल्यामुळे तिथले जाट अचानक श्रीमंत झाले आहेत. तेही असेच पैसे घेवून शोरूम मध्ये जातात आणि सांगतात कि आम्हाला चार गोलवाली गाडी पाहिजे. (चार गोल वाली गाडी म्हणजे आपली आवडी (ऑडी))

वामन देशमुख's picture

20 Jun 2014 - 10:06 am | वामन देशमुख

"ऑडी"लाच काहीजण "चूडियों वाली गाडी" असेही म्हणतात.

जय - गणेश's picture

20 Jun 2014 - 8:51 am | जय - गणेश

ऑफीसातली एक बंगाली मुलगी एकदा काही पेपर घेवुन आली आणी म्हणाली.....
सार, आपके पास "पांच मशिन" हे क्या ??

*lol*

जय - गणेश's picture

20 Jun 2014 - 8:54 am | जय - गणेश

साहेबांनु, बंगाल्यांवर एक शेपरेट धागा काढा की.

पैसा's picture

20 Jun 2014 - 2:07 pm | पैसा

सगळे किस्से लै भारी!