एक विलक्षण अनुभव

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
25 May 2014 - 12:21 am

आताच दोन आठवड्यापूर्वी जे इ इ मेन चा लागला. मुलाचा निकाल फारसा चांगला आला नाही. तो आय आय टी च्या मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरला. आम्ही सुद्धा दोन दिवस बर्यापैकी निराश होतो. पण यात आपले नैराश्य बाजूला ठेवून मुलाला धीर देण आवश्यक होते त्यामुळे चेहेर्यावर तसे काही दिसू न देता आम्ही त्याला पुढच्या परीक्षांसाठी उत्तेजन देत होतो. तीन चार दिवसात गाडी रुळावर आली.
मुळात आयुष्यात अपयशी होण्याचा मला चांगला अनुभव असल्याने मी जास्त शांत होतो.आणि मी शांतपणे मुलाला जवळ घेऊन सांगितले की तू काही सलमान खान सारखा दारू पिऊन लोकांच्या अंगावर गाडी घालण्यसारखा गुन्हा केलेला नाहीस. जे झाले ते झाले आयुष्यात असे प्रसंग येत राहतात.मुळात त्याने आयुष्यात काय करावे हे त्याचे त्याने ठरवायचे आहे.आईबाप काही आयुष्याला पुरत नाहीत आणि तुम्ही फारतर मुलाला थोडे फार मार्गदर्शन करू शकता.

गमतिची गोष्ट म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या सुरस आणि चमत्कारिक होत्या की मला आश्चर्यच वाटले.
१) तुम्ही दोघे डॉक्टर असून मुलाला इतके कमी मार्क कसे मिळाले?.
२) आता मुलाचे कसे होणार?
३) त्याला इंजिनियरिंग झेपणार नाही त्याला बी एस सी ला टाका
४) तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. भरपूर डोनेशन भरून प्रवेश घ्या.
५) त्याला परत बारावीला बसावा
गमतीची गोष्ट हीच आहे कि लोक फुकटचे सल्ले देण्यात एकदम पुढे असतात. हा सल्ला दिल्यावर त्याचा परिणाम काय होईल याचा जरासुद्धा विचार न करता ते बोलत होते.
जे जवळचे मित्र होते त्यांनी फार मोलाचे सल्ले दिले. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला माझ्या वडिलांनी दिला.जेंव्हा मी त्यांना म्हटले कि लोक सांगत आहेत कि त्याला अभियांत्रिकी झेपेल का ते पहा. त्यांनी एकच सांगितले कि तो इंजिनियर झाल्यावर त्या विषयातच काम करेल असे आज कसे सांगता येईल? जर त्याने उद्या व्यवस्थापन विषय घेतला ( एम बी ए किंवा तत्सम केले) किंवा एखाद्या व्यवसायात शिरला तर त्याला बारावीत किंवा अभियांत्रिकीत किती गुण आहेत त्याचा तो पुढे काय करणार आहे याच्याशी काय संबंध असेल. त्याला अभियांत्रिकीत किती गुण आहेत या पेक्षा त्याला अभियांत्रिकीचे मुलभूत ज्ञान आहे एवढे बस आहे. जर तो सॉफ्टवेअर मध्ये गेला तरीही तो मेकानिकल अभियांत्रिकीच्या ज्ञानच शून्य वापर करेल आणि जर त्याने एम टेक वाहन( ऑटोमोबाइल) किंवा वैमान शास्त्र (एरोनौटीक्स) या विषयात केले तर त्याच्या चार वर्षाच्या अभियांत्रिकी ज्ञानापैकी फार तर २० टक्के ज्ञानाचा उपयोग होईल. तो आयुष्यात पुढे काय करणार आहे हे तुम्हाला कुठे माहिती आहे? एका परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून आयुष्यात काहीही फरक पडत नाही.
आमच्या वडिलांनी जमनालाल बजाज येथून व्यवस्थापनाची पदविका घेतलेली आहेत. हे वाचून मला खूप हुरूप आला.
मी इतके दिवस जो विचार करीत होतो त्याला वडिलांचाचआधार मिळतो आहे हे पाहून मला बरे वाटले.माझे एक मत मी पुष्कळ वेळा व्यक्त केले आहे कि शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते.
मी जेंव्हा इतर बर्याच लोकांशी बोललो तेंव्हा अशी बरीच पोळलेली माणसे मला भेटली ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मुलांना उज्ज्वल यश मिळालेले नव्हते आणि त्या सर्वांनी मला हेच सांगितले.
मुळात माझ्या मुलाने जेवढे प्रयत्न करायला पाहिजे होते तेवढे केलेले नव्हते हे मला स्वतःला माहित होते. त्याला आम्ही एक वर्ष अगोदर शाळेत टाकले असल्याने त्याला आपण अभ्यास करावा असा परिपक्व पणा( maturity ) आलेलाच नाही. हे अर्थात समर्थन होऊ शकत नाही हे मलाही माहित आहे कारण काही मुले त्याच्याच सारखी कमी वयाची आहेत आणि त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आणि उत्तम गुण मिळवले. पण प्रत्येक मुल वेगळे असते हे मला माहित आहे.
माझ्या मुलाच्या मित्रांपैकी काही खरच हुशार असलेली मुले या परीक्षात फारशी चमकू शकली नाहीत अशा काही मुलांच्या घरात एखादा मृत्यू झाला असावा अशी अवकळा पसरली होती. एक मुलगा भिंतीवर डोके आपटून घेऊ लागला. या मुलाच्या बापाचे वजन कमी झाले म्हणून त्याच्या बायकोने त्याला माझ्याकडे पाठविले तेंव्हा मला असे लक्षात आले कि बाप सुद्धा अत्यंत तणावाखाली आहे. त्याला पाहते ४ वाजता जाग येते आणि नंतर झोपच लागत नाही. हे दोघे आईबाप स्वतः अभियंते आहेत.
एका आईने सांगितले कि BITS( बिर्ला इन्स्टीट्युट) ची परीक्षा होई पर्यंत मी थांबले आहे. ती झाल्यावर मुलीच्या दोन मुस्कटात मारणार आहे. एवढ्या सगळ्या सुखसोयी देऊनही परीक्षेत हा निकाल कसा मिळू शकतो हेच मला कळत नाही? या बाई स्वतः आर्किटेक्ट आहेत.या बाईना मी एकच सांगितले कि तुमची मुलगी एखाद्या पान्वाल्याचा हात धरून पळून गेली असती तर? तिला एका परीक्षेत कमी गुण मिळाले तर एवढे अकांड तांडव कशासाठी? जर सुख सोयी किंवा सुविधा दिल्या तर गुण मिळत असते तर अंबानींची मुले आय आय टी मध्ये पहिल्या दहात आली असती.
या दोन्ही आईबापाना मी विश्लेषण करून सांगितले कि एक गोष्ट फार महत्त्वाची आहे कि आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हा आपण प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहात. आपली प्रतिष्ठा मुलाच्या परीक्षेतील यश अपयश यावर अवलंबून असू नये. हे त्यांना पचवणे फार जड गेले.
हि गोष्ट मी मुळात मान्य केली असल्याने (माझी प्रतिष्ठा माझ्या मुलांच्या शैक्षणिक यशावर मुळीच अवलंबून नाही हे मी मुलांना पहिल्यापासून सांगत आलो आहे) तूमच्या मुलाला कमी गुण कसे मिळाले यावर मी शांतपणे त्यांना सांगितले कि अहो तो ढ आहे काय करणार?
अशा कितीतरी घरात मी सुतकी वातावरण बघत आहे जेथे मुलाला चांगले गुण मिळालेले नाहीत. किंवा मुलाने काहीतरी गंभीर गुन्हा केला असल्यासारखे आई बाप त्यांना वागवत आहेत. मुळात आय आय टी मध्ये १४ लाख मुलांपैकी केवळ २००० मुलांना आपल्या आवडीचा विषय मिळतो बाकी दोन ते तीन हजार मुले आवडीचा विषय मिळाला नाही तरी आय आय टीच्या शिक्क्यासाठी तेथे मिळेल तो विषय शिकत असतात. मग आय आय टी मध्ये प्रवेश मिळाला नाही तर आयुष्य फुकट गेले असे लोकांना का वाटत राहते?
आज प्रत्त्येक बस, रेल्वे गाडी, ट्रक वर आय आय टी किंवा वैद्यकीय परीक्षेच्या क्लास ची जाहिरात दिसत आहे. हा स्वप्नांचा बाजार मुलांना कुठे घेऊन जाणार आहे ? कोटा येथे किंवा नारायण इन्स्टीटयुट हैद्राबाद किंवा फिट जी किंवा टाईम अकादमी येथे मुलांना आठवीपासून सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत पूर्ण वेळ आय आय टी च्या क्लास साठी जुंपले जाते. ( आता हेच क्लास सहावी पासून चालू होणार अशी जाहिरात पाहिली) म्हणजे मुलांना तेराव्या वर्षापासून आईबाप या चक्रात ढकलत असतात पाच वर्षे ढोर मेहनत करून शेवटी हातात एक डिग्री पडेल किंवा न पडेल पण त्यात मुलांचे कोवळे वय मात्र नक्कीच नसून चालले आहे.
मी माझ्या मुलाला सांगितले होते किया अभियांत्रिकीत तुला प्रवेश नक्की मिळेल पण तुला नक्की काय व्हायचे आहे हे तुला ठरवावे लागेल.पदवी मिळाल्यावर एक वर्ष तू काहीही केले नाहीस तरी चालेल. नुसता हातात कैमेरा घेऊन भारतभर फिरलास तरी चालेल. त्यात तुला आयुष्य जगायचे शिक्षण मिळेल ते तुला आयुष्यभर उपयोगी ठरेल. एकदा नोकरीला लागला कि माणूस त्या चरकात पिळून निघतो मग थोडे थांबून सिंहावलोकन करायचे असेल तर त्याला उसंत मिळत नाही. ( मी सहा महिने सुट्टी ( चार महिने भरपगारी आणि दोन महिने अर्ध पगारी) घेऊन कोणताही आजार नसताना नुसते घरी बसून काढले आहेत त्यामुळे त्याची किंमत किती अमुल्य आहे हे मला पूर्ण माहिती आहे.

जाता जाता -- माझी पत्नी पुण्यातील एका प्रथितयश खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया काय आहे ते जाणण्यासाठी जाऊन आली होती तेथे तिला एक कागद भरून दिला. आणि तेथे आम्ही दोघे डॉक्टर आहेत हे पाहून त्यांनी सतरा लाख रुपये रोख असा दर सांगितला यातील अर्धे पुढच्या चार दिवसात आणून द्या. गम्मत म्हणजे बारावीचा निकाल अजून लागलेलाच नाही. यावर तिने त्यांना विचारले कि तुमच्याकडे अभियांत्रिकी केल्यावर "प्लेसमेंट" कितीची मिळते त्यावर ते म्हणाले कि चार लाख वार्षिक. यावर मी शांतपणे पत्नीला म्हटले कि मुलाला जेथे मिळेल तेथे प्रवेश घेऊ. चार वर्षे मुलगा घरी बसला तरी चालेल एक लाख रुपये तरीही वाचतील(व्याज वेगळे). विस्तारभयास्तव येथेच थांबतो.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

विकास's picture

25 May 2014 - 1:43 am | विकास

सर्वप्रथम तुमच्या मुलाला शुभेच्छा! भारतीय पध्दतीत आईवडीलांना काही प्रमाणात मुलांच्या शिक्षणावरून ताण येतो हे काही अंशी(च) चांगले आहे. तो (चांगला) अंश म्हणजे शिक्षणाबद्दलची आस्था. त्यासाठी आपण सर्वांनीच आपापल्या पालकांचे आभार मानावेत. पण तेव्हढेच!

दुर्दैवाने आता शिक्षणापेक्षा स्टेटसला जास्त महत्व असते. वपुंच्या भाषेत, माणसे तीन शब्दांसाठी जगतातः "लोक काय म्हणतील?" आता जरी समाजात त्यात अनेक संदर्भात बदल होत गेला असला तरी या संदर्भात अजून झालेला नाही. आय आय टी मधल्या मुलांबद्दल मला कौतुक आहे, आदर देखील आहे. पण आय आय टीअन्स नी जेव्हढे महत्व दिले जाते, जेव्हढे (खरेच) वेगळे शिकवले जाते त्याचा विचार करता खूप काही नॉन आय आय टीअन्सच्या तुलनेत इंपॅक्ट घडेल असे केलेले दिसत नाही असे देखील वाटते. परत सांगतो याचा अर्थ आय आय टी कमी आहे असा नाही, पण ३ इडीयट्समधल्या चतुरच्या भुमिकेतच आपण कमी अधिक प्रमाणात अडकून पडतो आणि आपापल्या पाल्यांना देखील त्यात अडकवून ठेवतो...

वास्तवीक ९०च्या दशकातील सुरवातीच्या काळापर्यंत अशी काहीशी अवस्था होती की जर डॉक्टर अथवा इंजिनिअर नसलो तर पोटापाण्याचे काय होणार... पण आता खरेच असे आहे का? मुलांना नक्की काय आवडते ह्याचा आपण (म्हणजे आपण सर्वच) विचार करतो का? ह्याचा विचार करणे गरजेचे आहे असे वाटते. जितका मुलगा/गी स्वतंत्र विचार करू शकतील तितके चांगले असे वाटते. कुठल्यातरी पुढार्‍याच्या बोडक्यावर कॅपिटेशन फी घालून वर अजून काही लाख रुपये केवळ डिग्रीसाठी घालवण्याची जर सुदैवाने आर्थिक परीस्थिती असली तर, त्या परीस्थितीचा चांगला फायदा घेऊन मुलाला जे आवडते ते शिकून काही (कॅल्क्युलेटेड) रिस्क घेण्यास शिकवावे. त्यातून तो अधिक तरबेज आणि जीवनात यशस्वी होईल.

सरते शेवटी आय आय टी असो अथवा हार्वर्ड - आज तिथली मुले (आणि आपण सगळेच) जे काही संगणक आणि समाजमाध्यमांचा वापर करत आहेत, तो ज्यांनी हार्वर्ड शिक्षण पूर्ण न करताच सोडले अथवा पायरीपण चढली नाही अशा गेट्स, जॉब्स आणि झुकेरबर्गमुळे दाखवलेल्या innovation मुळे हे लक्षात ठेवावे... :)

मदनबाण's picture

25 May 2014 - 7:21 am | मदनबाण

शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते.
अगदी सहमत ! सहमत यासाठी कारण या सर्व गोष्टींचा मी आत्ता पर्यंत पूर्ण अनुभव घेतला आहे. कोणत्याही मुलाला इतके अपयश येउ नये तितके अपयश मी माझ्या शैक्षणिक कालखंडात पाहिले,अनुभवले आणि भोगले आहे.तरी सुद्धा आज जिथे मी आहे, तिथे पोहचल्यावर लक्षात येते की शिक्षणाच्या एकंदर टक्केवारीचा जितका बभ्रा आपल्या इथे केला जातो त्याचा काहीच उपयोग नाही.
समाजात तर अशी अनेक उदा. सापडतील की ज्यांचे शिक्षण वेगळ्या विषयात झाले आहे आणि ते व्यवसाय वेगळाच करत आहेत. अगदी डॉक्टर झालेली मंडळी अभिनय क्षेत्रात सुद्धा दिसतील ! ;) यात मी सुद्धा आहे, कारण ज्याच्या मी अभ्यास केला आणि आत्ता मी जे काम करतो त्याचा काडीचाही संबंध नाही !

थोडक्यात सांगायचे झाले तर :- तुम्ही रॅट रेस मधले रॅट होउ नका !

जाता जाता :- या विषयावरच एक सुंदर पिक्चरचा ट्रेलर !

जाता जाता :- डॉक तुमच्या या लेखाने मला कधी काळी इथेच लिहलेल्या माझी धडपड या लेखमालेची आठवण झाली.

आम्हाला दहावीला एक धडा होता, बहुतेक कुणी विदेशी कवी/संगीतकाराने आपल्या वडिलांबद्दल लिहिलेला लेख होता. त्यात शेवटी एक वाक्य होतं. " How much he has learned". सारांशाने लेखक असं म्हणत होता की 'आजपर्यंत मुल आणि वडिलांच्या नात्याबद्दल माझे वडिल किती शिकले होते ते बघून मी थक्क झालो!'त्या वयात या वाक्याचा अर्थच कळला नाही. माझ्या दृष्टीने तेव्हा (..आणि खरंतर अजूनही) माझे किंवा कुणाचेही वडील म्हणजे सर्वज्ञ! ते काय नवीन शिकणार?

एका मुलाच्या भविष्याचे इतके महत्त्वाचे निर्णय घेणे ही किती मोठी जबाबदारी आहे साहेब....आपल्याला शुभेच्छा!!! सुंदर चिंतन....अजून कितीही लिहिलं असतं तरी चांगलंच झालं असतं.....

स्पा's picture

25 May 2014 - 7:39 am | स्पा

परफेक्ट लिहिलय

सगळ्यात महत्वाचे मुलाला काय करायचे आहे, हे त्याचे त्याला ठरवुद्या , थोडे निर्णय स्वातंत्र्य त्यालाही असुद्या.

ब़जरबट्टू's picture

26 May 2014 - 9:21 am | ब़जरबट्टू

सगळ्यात महत्वाचे मुलाला काय करायचे आहे, हे त्याचे त्याला ठरवुद्या
हे वाक्य कधी कधी फार घोळ करते. मुळात प्रत्येक दहावी व बारावी चा मुलगा खरच एव्हडा विचार करु शकतो का ? म्हणुन मग ते मेंढ्याच्या कळपासारखे होते, व सगळे बावरुन एकाच दिशेला जातात..
मुले खरच बावरतात, असे सरळ तुझे तु ठरव सांगितले की.. खुपदा हे निर्णय त्यांना घेताच येत नाही.. अश्या वेळेस योग्य मार्गदर्शन नक्की हवे..

पिशी अबोली's picture

26 May 2014 - 1:08 pm | पिशी अबोली

मुळात प्रत्येक दहावी व बारावी चा मुलगा खरच एव्हडा विचार करु शकतो का ?

का नाही? पालकांचं प्रेशर असेल तर मे बी नाही... पण नसेल तर काय प्रॉब्लेम असतो? दहावीपर्यंत काय, सातवी-आठवीपर्यंतच आपला कल कुठे आहे ते तरी निश्चित कळतं...

ब़जरबट्टू's picture

28 May 2014 - 9:27 am | ब़जरबट्टू

मुळात मी प्रत्येक मुल म्हटंलय.. सातवी - आठवीत मुलाचा कल पालकाला कळेल, असे म्हणू शकता ... अहो आज नायक बघुन प्रधानमंत्री,व उद्या बार्डर बघुन कमांडो होण्याचे दिवस असतात ते, या वयात त्यांच्याकडुन तुम्ही एक जवाबदार निर्णय अपेक्षित करता ? काही अपवाद असतील, पण सगळ्यांना निश्चित कळतं असे वाटत नाही..
पालकांचे प्रेशर अती तर नक्कीच नसावे, पण काहीच नसेल, तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्या पाल्याला इलेक्टानिक्स मध्ये गती आहे, हे दिसतय, पण त्याला वाटते म्हणून त्याने त्यात ITI केलेले चालेल का ? का त्याला IIT ची स्पर्धा समजावी लागणार ? मग यासाठी आई ने हातात अभ्यास करण्यासाठी छडी घेतली तर त्याला पालकांच प्रेशर म्हणावे का ?

पिशी अबोली's picture

28 May 2014 - 3:48 pm | पिशी अबोली

कदाचित तुम्ही म्हणता ते योग्यही असेल... मला फक्त असं वाटतं, की मुलं थोडीतरी प्रॅक्टिकल असतात. माझ्या वर्गातल्या जवळपास सर्वांनाच चांगलीच कल्पना होती की आपल्याला कुठच्या बाजूने जायचंय. आणि जवळपास सगळ्यांनीच तेच केलं पुढे हेही महत्वाचं.. आणि मी 'कल' म्हटलं. एक सर्वसामान्य कॅटॅगरी लक्षात येते तोपर्यंत. अगदी कोणतं प्रोफेशन वगैरे दहावीपर्यंत निश्चित करायची गरज असते का?

पालकांचे प्रेशर असे स्पेसिफिक शब्द न वापरता इन जनरल प्रेशर असं म्हणायला हवं होतं मी.. एखादा वेगळा निर्णय असेल तर जग टोचत बसतं सतत. तेव्हा खरं तर पालकांचा सपोर्ट कामी येतो. तो नाही मिळाला तर मात्र ढासळायला होतं. मला दहावीनंतर आर्ट्स ला जायचं होतं तर लोकांनी काय काय ऐकवलंय ते अजून आठवतंय. अगदी जिथे अ‍ॅडमिशन घ्यायला गेले त्या कॉलेजमधेही मला सांगितलं गेलं की तू आमच्या सायन्स स्ट्रीमला प्रवेश घे, आर्ट्स ला जाऊ नकोस. त्यातही मी 'पुढे कोण होणार' याला काही ठाम उत्तर देत नव्हते. ह्युमॅनिटीज क्षेत्र आवडतं म्हणून जातेय एवढंच उत्तर ऐकून लोक दयाभावाने बघायचे.. 'तिला एक कळत नाही, पण आई-बाबांनाही कळू नये?' हा डायलॉग कितीजणांनी मारला. तेव्हा आई-बाबा खूप ठामपणे उभे राहिले माझ्या पाठीशी..
याउलट माझ्या एका अत्यंत हुशार मैत्रिणीला आधीपासूनच सायकॉलॉजी करायचं होतं. पण तिला सायन्सला जायला लावलं घरच्यांनी. बारावीत तिने स्पष्ट सांगितलं, मला झेपणार नाही. तिचा अभ्यासातला रस एकदम कमी व्हायला लागला तेव्हा कुठे त्यांनी ऐकलं आणि बीए ला प्रवेश घेऊ दिला.

मुलांचा कल पालकांना नक्कीच कळत असावा. आयआयटीची स्पर्धा झेपवण्याची कुवत आपल्या मुलात नक्की आहे ना, हा विचार करुनच हातात छडी घ्यावी.. त्याला अन्य क्षेत्रांत उत्कृष्ट करियर करता येणार असेल, तर केवळ आपली इच्छा म्हणून त्याच्या वर आयआयटीला जाण्याचा दबाव आणणे चुकीचे नाही का?

प्रभाकर पेठकर's picture

26 May 2014 - 2:01 pm | प्रभाकर पेठकर

बजरबट्टूंशी सहमत.

ह्या करीता, अचानक एक दिवस नाही तर, वरचेवर अनेकदा मुलाशी चर्चाकरून त्याचा कल जाणून घ्यावा. नवनविन क्षेत्रांची त्याला ओळख करून द्यावी, महत्व समजवावं, भविष्यावर - बदलत्या युगाबद्दल चर्चा करावी. आणि त्याला मार्ग निवडू द्यावा. नुसतेच तुझे तू ठरव सांगितल्यास मित्रांचा कल पाहून मुलं काय करायचं ठरवतात.

कांही मुलं असतीलही हुशार आणि परिपक्व पण सामान्यतः ती परिपक्वता, ज्ञान आणि विचारक्षमता त्या वयात सर्वांमध्ये नसते असे अनुभवले आहे.

आनन्दा's picture

26 May 2014 - 2:48 pm | आनन्दा

सहमत, निर्णय मुलावर सोडण्यापेक्षा तुमच्या निर्णयात मुलाच्या आवडीला स्थान द्या.

शिद's picture

26 May 2014 - 4:00 pm | शिद

निर्णय मुलावर सोडण्यापेक्षा तुमच्या निर्णयात मुलाच्या आवडीला स्थान द्या.

सहमत.

पेठकर काका: +१११

ब़जरबट्टू's picture

28 May 2014 - 8:50 am | ब़जरबट्टू

नवनविन क्षेत्रांची त्याला ओळख करून द्यावी, महत्व समजवावं.
अगदी सहमत काका.. आणि म्हणूनच आता पालक म्हणून आपल्यालासुध्धा अपडेटेड राहावे लागेल.. :)

+१११ आनन्दा.....

प्रभाकर पेठकर's picture

28 May 2014 - 12:37 pm | प्रभाकर पेठकर

>>>>आता पालक म्हणून आपल्यालासुध्धा अपडेटेड राहावे लागेल..

डोळे आणि कान उघडे असतील तर टिव्ही, वर्तमानपत्र, मित्रांच्या बरोबरच्या चर्चा, जाहिराती ह्यातून अशी अनेक क्षेत्र आपल्या समोर येत असतात. आपल्याला वाटतं, च्यायला, हल्लीच्या पिढीचं बरं आहे. आमच्या वेळेला असे इतर सोयिस्कर, व्यवहार्य मार्गही आहेत ज्यात उत्तम करियर करता येईल हे माहितच नव्हतं. आपल्याला आता त्याचा फायदा नाही पण आपल्या मुलाला/मुलीला होऊ शकतो. हि क्रिया दैनंदिन आयुष्यात सहज घडत असते. मुद्दाम कांही करावे लागत नाही. हं, एखादा चांगला पर्याय वाटला तर त्याची सखोल माहिती काढता येतेच.

पेठकर साहेब
कालच मी माझ्या मित्राला सांगत होतो कि माझा मुलगा अभ्यास सोडून सारखी पुस्तके वाचत असे म्हणून मी पुस्तके वडिलांच्या घरी माळ्यावर ठेवली होती आता परीक्षा झाली म्हणून ती परत आणली कि आता त्याने वाचायला हरकत नाही. त्यावर माझा मित्र म्हणाला कि अरे तू नशीबवान आहेस तुझी मुले पुस्तके वाचतात. माझ्या मुलाला शाळेत गणितात मार्क कमी पडले म्हणून मी त्याच्या अभ्यासाचा आढावा घेत असताना मला असे जाणवले कि त्याला गणित येत आहे पण वाचन आणि शब्द संपत्ती( vocabulary) कमी असल्याने त्याल गणिताचा प्रश्न कळलेच नाहीत. जेंव्हा ते प्रश्न त्याला फोडून सांगितले तेंव्हा त्याने पटकन ते सोडवले म्हणजे त्याल गणिताचा प्रश्न नाही.
हे चिरंजीव सध्या सातवीत आहेत आणि अगदी लहान असल्यापासून मोबाईल आणि ipad शीच खेळताना दिसलेले आहेत. घरी आई वडिलांनी जेंव्हा जेंव्हा कटकट करतो तेंव्हा हि इलेक्ट्रोनिक उपकरणे पुढे केली. हाच प्रकार माझ्या दवाखान्यात मला सर्रास दिसतो मुल कटकट करीत असेल तर लगेच आई नाहीतर बाप त्यांना मोठा मोबाईल किंवा टैबलेट काढून देतात. मग मुलाला सवय होते कि किरकिर केली कि मोबाईल किंवा टैबलेट मिळतो मग याची पुनरावृत्ती होत राहते. पण त्याचा होणारा दूरगामी परिणाम काय असू शकेल याची एक झलक मिळाली. एस एम एस भाषा आणि whats aap मुले कॉलेजातील मुलांची भाषा बिघडली आहेच पण त्याच्या पुढच्या पिढीचे काय होणार हि चिंता वाटते. म्हणूनच म्हणतो पालक म्हणून आपल्याला सुध्धा अपडेटेड राहावे लागेल.

सस्नेह's picture

25 May 2014 - 12:29 pm | सस्नेह

विलक्षण नाही पण. हेच अनुभव अलिकडे घरीदारी येत आहेत. आणखी काही मुद्दे
१) अभियांत्रिकी म्हणजेच उच्च शिक्षणाची सर्वोच्च पायरी का ? इतर कितीतरी चॅलेंजिंग क्षेत्रे आहेत जसे की, अर्किटेक्चर, बँकिंग, पॅथॉलॉजी, व्यवस्थापन, शैक्षणिक क्षेत्र. इथले जॉब अधिक सुखाचे आहेत असे वाटते.
२) मुलाचा कल आणि क्षमता ओळखली पाहिजे.
३) निकाल स्वीकारून मुलांना पर्याय सुचवत रहावे.
४) हजारो अभियंते आज विनानोकरी फिरत आहेत. तेव्हा स्वतःचा व्यवसाय करता येईल असा काही शैक्षणिक मार्ग शोधावा.

सुबोध खरे's picture

27 May 2014 - 11:46 pm | सुबोध खरे

स्नेहांकिता ताई
अभियांत्रिकी हि उच्च शिक्षणाची सर्वोच्च पायरी नक्कीच नाही, मी माझी बायको किंवा मुलगी त्या क्षेत्रात नाही. मुल मुद्द्दा हा आहे कि साधारण आठवी पासून मुलाचा कल कोठे आहे याचा आम्ही शोध घेत गेलो. पहिली ते दहावी त्याला गणितात आणी शास्त्रात सर्वात जास्त गुण मिळत आले आहेत. भाषेत त्याला रस नाही तसाच जीवशास्त्रात त्याला रस नाही. आम्ही त्याला ICT मुंबईतील रसायनशास्त्रातील विविध शाखा(औषध, पोलीमर,पेट्रोलियम, रंग, सूक्ष्म रसायन इ इ) किंवा एम एस सी गणित किंवा भौतिकशास्त्र याबद्दल माहिती दिली.TIFR आणी BARC येथे होणार्या मुलभूत संशोधनाचे पर्याय दाखवले. गणितात पुढे काय करता येईल किंवा IISc (INDIAN INSTITUTE ऑफ SCIENCE) येथील शुद्ध शास्त्रीय अभ्यासक्रमांबद्दल माहिती दिली. परंतु त्याला मेकानिकल किंवा सिव्हील अभियान्त्रीकीतच जायचे आहे. संगणक विद्युत किंवा टेले कॉम यात रस नाही। मग यावर आता आम्ही का त्याच्या मनाविरुद्ध दुसरा विषय निवडण्याचा आग्रह धरावा
हजारो अभियंते आज नोकरी विना आहेत याचे कारण मी एकदा लिहिले होते कि एका विख्यात अभ्यान्त्रिकी तज्ञाच्या सर्वेक्षणाप्रमाणे फक्त २६ टक्के अभियंते नोकरीला पात्र किंवा लायक आहेत. आणी पन्नास टक्के अभियांत्रिकी महाविद्यालयात असा अभ्यासक्रम शिकवला जातो जो तिथेले शिक्षक शिकवू शकतात. पण उद्योग्धन्द्यासाठी लायक असे ज्ञान नाही. हे सर्वेक्षण बर्यापैकी खात्रीलायक मानले गेले आहे, अशा कारणांसाठी चागल्या महाविद्यालयात अभियांत्रिकी करणे आवश्यक झाले आहे.
राहिली गोष्ट कौशल्य(SKILL) बद्दल. आपले कौशल्य एक तर उत्तम दर्जाचे असायला पाहिजे किंवा आपला मित्रपरिवार आणी संबंध(CONTACTS) असे पाहिजेत कि आपण आपल्या मुलाला लागणारी एक सुरुवात आपण देऊ शकलो पाहिजे. माझ्या मित्राच्या मुलाची चित्रकला उत्कृष्ट आहे तय्च्या बोलताना मी त्याला एकाच गोष्ट सांगितली तुझा मुलग चित्रकलेत करियर करायचे म्हणतो आहे त्याला लागणारी सुरुवात तू दिली पाहिजे. कारण चित्रकला उत्कृष्ट असणारी माणसे रस्त्यावर चित्र काढून लोकांनी फेकलेले पैसे का उचलतात कारण आपली कला बाजारात विकायची कशी यासाठी लागणारे कौशल्य किंवा त्याला लागणारे संबंध त्यांच्याकडे नसतात.
मुलाचे करियर होण्यासाठी जी काही गोष्ट करावी लागेल ती करण्याची प्रत्येक बापाची तयारी असतेच. पण बर्याच बापाना/ मुलांना नक्की मार्ग सापडायला वेळ लागतो आणी तोवर त्यांना धक्के खायला लागतात. यासाठी मुलाबरोबर बापाने सुद्धा अभ्यास वाढवणे गरजेचे आहे.

प्रभाकर पेठकर's picture

28 May 2014 - 2:53 am | प्रभाकर पेठकर

सर्व मुद्द्यांशी सहमत. हेच मला सांगायचे होते.

पिशी अबोली's picture

28 May 2014 - 3:50 pm | पिशी अबोली

__/\__

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 May 2014 - 1:17 pm | निनाद मुक्काम प...

अभियांत्रिकी शिक्षण घेऊन पोटापाण्याचा प्रश्न सुटत नाही असे लक्षात आल्यावर कश्यासाठी तर पोटासाठी ह्या न्यायानुसार
जे उच्च शिक्षण घेतले जाते त्यात
व्यवस्थापनाचा क्रमांक वरचा आहे ,
आत तेच करायचे होते तर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला नसता का
मध्यमवर्गात स्वातंत्र्या नंतर कला शाखेत जाण्याकडे कल होता , साहित्या बद्दल आस्था आणि सरकारी नोकरीत शिरण्याचा राजमार्ग होता, पुढच्या पिढीत बेन्केत नोकरी व खाजगी कंपनीत शिरकाव करण्यासाठी वाणिज्य शाखेला महत्व आले ,
पुढे मंडळ आयोग व आर्थिक उदारीकरण एकाच काळात घडल्याने विज्ञान शाखेतून खाजगी शेत्रात वाव व परदेश गमानाला संधी म्हणून मध्यम वर्गाचा कल वाढला,
मध्यम वर्गाच्या स्टेटस च्या अवास्तव कल्पनांची पूर्ती करण्यासाठी
अनेक सहकार महर्षीं हे शिक्षण सम्राट होण्यास प्रवूत झाले.
व शिक्षणाचा बाजार मांडला गेला,
भारतीय चलनाच्या पेक्ष्या जास्त अवमूल्यन भारतीय शिक्षण पदव्यांचे झाले.
शिक्षण सम्राटांना शिक्षणाचा दर्जा वाढवण्यास काहीही स्वारस्य नव्हते व ह्यात त्यांचा पूर्ण दोष नाही , अनेक पालक अभियांत्रिक हि पदवी पाल्यास मिळते ह्या आनंदात आत्ममग्न असतात.
कसेही करून अभियांत्रिक झाले की एक तर आयटी मध्ये वर्णी लावून घ्यायची व आयटी मध्ये आहोत असे ऐटीत सांगण्यास मोकळे , किंवा मग व्यवस्थापनाची पदवी घेण्यास भरीस पाडले जाते.
परदेशात पाल्यास आपल्या आवडीनुसार शिक्षण हे प्रमुख तत्व आहे.
ह्याचे कारण तेथे लहन वयापासून मुलांना स्वावलंबी बनवणे व स्वतःचे निर्णय स्वतः घेणे उपजत शिकवले जाते, म्हणूनच भारतात ८ वी ते ९ वीच्या मुलांना काय कळते असे बाळबोध प्रश्न निर्माण होतात.

प्यारे१'s picture

25 May 2014 - 1:25 pm | प्यारे१

उत्तम संतुलित लेख नि विचार!
ह्या विषयातला दुसर्‍याला बोलण्याबाबत अनधिकारी मात्र रीसिव्हींग एन्डकडून अधिकारी ;) असल्यानं सांगावंसं वाटतंय.

इन्जिनिअरींगला विषय सुटत नसताना लोकांच्या प्रतिक्रिया हे पोरगं काहीही करु शकणार नाही. नंतर दुबै ला नोकरी ला जायला निघालो तेव्हा त्यातलेच एक जेवायला घरी घेऊन गेले. लोकांच्या प्रतिक्रिया हा एक करमणुकीचा विषय आहे. सो टेक अ चिल पिल!

आपलं काम व्यवस्थित करावं. (हे मी केलं नव्हतं, आता देखील कधीकधी करत नाही, त्या मुळं स्वतःचंच नुकसान होतं हे कळतंय, आधी कळत नाही हेच कळत नव्हतं. ;) ) नि जगाला योग्य वेळी फाट्यावर मारायला शिकावं.

बाकी कुणीतरी थोर माणूस म्हणून गेलंय. तीन वर्षं झटून मेहनत केली की आपण एखाद्या गोष्टीवर कमांड मिळवू शकतो. त्यामुळं ती तीन वर्षं नेमकी कुठली असावीत ते जेवढं लवकर ठरवू तेवढं लवकर रिझल्ट मिळतात. कृत्रिम उपग्रहाला त्याच्या कक्षेपर्यंत जाण्यासाठीच गुरुत्वाकर्षण बलाविरुद्ध लढावं लागतं.

ते एकदा झालं की तो आपसुक त्यात जाऊन बसतो. आपलं सुद्धा तसंच असावं. आपण सुरुवातीला मेहनत घेऊन त्या ऑरबिट मध्ये जाऊन बसावं नि पुढचं त्यातल्या त्यात बरं होतं. ह्या उप्पर पैसा/ प्रसिद्धी/ माहिती/कीर्ती कितपत मिळाला/ली/ले की समाधान मानावं हा ज्याचा त्याचा विषय. इथंही प्रतिक्रियांबाबत फाटाच उपयुक्त!

आत्मशून्य's picture

25 May 2014 - 2:59 pm | आत्मशून्य

फ़क्त ते एस्केप वेलोसिटी प्रकरण राहुल गांधी मुळे प्रचंड बदनाम झालय तेव्हड वगळा जमलं तर :)

प्यारे१'s picture

27 May 2014 - 4:02 pm | प्यारे१

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2014 - 1:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर विचारी लेख !

तुमचा मुलगा भाग्यवान आहे. अश्या परिस्थितीत निराश होऊन आकांडतांडव न करणारे पालक अभावानेच सापडतात.

याला मुख्यतः सद्याची शिक्षण व्यवस्था आणि डिग्री व त्यातले गुण यांना अवास्तव महत्व देणारी समाजव्यवस्था आहे. सर्वसामान्य पालकांना या प्रवाहाविरुद्ध जाण्याचे बळ अथवा धीर नसतो. ही प्रवृत्ती सिस्टिम बनवते आणि सिस्टिम प्रवृत्ती बळकट करते... असे व्हिशस सायकल आहे... जितक्या लवकर ते खंडीत होईल तितके बरे.

प्रकाश घाटपांडे's picture

25 May 2014 - 2:18 pm | प्रकाश घाटपांडे

तुमचा मुलगा भाग्यवान आहे. अश्या परिस्थितीत निराश होऊन आकांडतांडव न करणारे पालक अभावानेच सापडतात.
+१

प्रभाकर पेठकर's picture

25 May 2014 - 2:06 pm | प्रभाकर पेठकर

जशी गरज भासेल तसा शिकत गेलो. ७३ मध्ये क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीत कॉस्ट ऑडिट खात्यात क्लेरिकल असिस्टंट्ची नोकरी मिळाली. क्लार्क होण्यासाठी वाणिज्य शाखेची पदवी आवश्यक होती. क्लार्क होण्यासाठीही 'महत्वाकांक्षा' असावी लागते हे तेंव्हा अनुभवलं. नोकरी करून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. पण ह्या प्रक्रियेदरम्यान संगणक युग सुरू होऊन तिथे आकर्षित झालो. कोबोल प्रोग्रॅमिंग केलं. डेटा प्रोसेसिंग खात्यात ट्रेनि प्रोग्रॅमर आणि आखातात क्लार्कची नोकरी अशा दोन्ही ऑफर एकत्रच आल्या. आणि आखातात आलो (१९८१). इथे आल्यावर समजलं आपल्या आधीचे कोणीही नोकरी सोडत नाही त्यामुळे पदोन्नती अवघड आहे. कोबोल प्रोग्रॅमिंगचा फायदा नाही झाला. तेंव्हा PC आले कंपनीत. त्यामुळे ते शिकण्यासाठी कंपनीने क्लासला पाठवलं. तिथे PC ची तोंडओळख झाली. बाकी कौशल्य स्वतःच पुस्तके वाचून मिळविले. अपेक्षा होती कंपनी आपल्याला पदोन्नतीसाठी विचारात घेईल. पण दाक्षिणात्यांच्या प्रभावाखाली ज्याला संगणकातील 'सं' ही माहित नव्हता त्याला पदोन्नती मिळाली. मन खचलं, पण हरलं नाही. स्वयंरोजगाराचे विचार डोक्यात छळू लागले. झालं. नोकरीवर लाथ मारुन दुकान टाकलं. कुवेतचं युद्ध झालं आणि मस्कतच्या बाजाराची अवस्था रुग्णशय्येवरील अत्यवस्थ रुग्णासारखी झाली. धंदा बुडाला. मन डळमळीत झालं. मन पुन्हा नोकरीत जाऊ इच्छित नव्हतं. तेंव्हा एक अनुभवी गुजराथी गृहस्थ भेटले. त्यांनी कान कानमंत्र दिला. ज्या विषयात रस आहे त्या क्षेत्रात व्यवसाय कर. झालं. शांतपणे आणि रिकाम्या खिशाने विचार केला. मला जास्त रस होता खाण्यापिण्यात (त्या पिण्यात नाही, हो!), तेंव्हा, उपहारगृह व्यवसायावर विचार करू लागलो. पण त्याला भांडवल जबरदस्त लागत होतं. ते नव्हतं. अनुभव शून्य. तेंव्हा लहान प्रमाणात सुरुवात करायची हा विचार करून कॅफेटेरिया हा पर्याय निवडला. त्यालाही जवळचं भांडवल पुरणारं नव्हतं तेंव्हा इथूनतिथून मित्रांकडून उधार उसनवारी करत कॅफेटेरिया सुरु तर केला पण फिरत्या भांडवलाच्या अभावाने माझा गळा आवळला जाऊ लागला. गिर्‍हाईकांकडून चांगला फिडबॅक मिळत होता. ब्रेक इव्हन नजिकच्या भविष्यात दिसत होता पण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत दिवस काढायचे अत्यंत कठीण होतं. बहुतेक ओळखिच्यांनी आर्थिक मदत केली होती. त्याची परतफेड होईपर्यंत नविन मदत मागायला तोंड नव्हतं. कसेबसे दिवस काढले. एकदा दुकान मालकाने भाडं मिळालं नाही म्हणून पोलीस स्टेशनही दाखवलं. पण सुदैवाने सर्वातून सहिसलामत बाहेर पडलो. आणि कॅफेटेरीया सुरु केल्यापासून सहा-सात महिन्यात ब्रेक इव्हनला पोहोचलो. तो पर्यंत घरभाडं, दुकानाचं भाडं, स्टाफचा पगार, घरची आणि दुकानाची विज-पाण्याची बिलं इ.इ.इ. कसं भरत होतो माझं मलाच माहित. पण हळूहळू सर्व समस्या मिटत गेल्या, धंदा वाढत गेला, उत्पन्न वाढत गेलं. तरी, आधिची कर्जे फिटायलाच ४ वर्षे लागली.

सांगायचा उद्देश. गरज भासेल तसे शिकत गेलो. शैक्षणिक क्षेत्रातही आणि प्रत्यक्ष आयुष्यातही.

प्रकाश घाटपांडे's picture

25 May 2014 - 2:21 pm | प्रकाश घाटपांडे

+१

तुमचा हा प्रतिसाद खरंच खुप काही सांगुन/शिकवुन गेला.
पुन्हा एकदा धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2014 - 11:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

औपचारीक शिक्षण जीवनाचा / व्यवसायाचा पाया बनवायला उपयोगी पडते पण तेच केवळ मजबूत पाया बनवू शकत नाही हेच तुम्ही तुमच्या उदाहरणाने अधोरेखीत केले आहे. आपले ध्येय पक्के करणे आणि ते मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करणे याशिवाय अंतिम यश मिळणे शक्य नाही.

तुमच्या चिकाटीला सलाम !

चला जरा १०वा माणूस हा नियम लावतो. सर्वप्रथम तुम्हाला लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर सांगतो हे चालूच असते. माझ्या परिचितांमध्ये एक॑दा एका मुलाला बारावीला कमी मार्क मिळाले, तर त्याच्या ओळखीतल्या एका म्हातारीने त्याला भर रस्त्यात झापले होते. मी तेव्हा तिच्यावर जाम उखडलो होतो.
बाकी नंतर लिहितो.

मुक्त विहारि's picture

25 May 2014 - 2:42 pm | मुक्त विहारि

सविस्तर प्रतिसाद....

जून मध्ये...(मुलांची शेती.... अंतिम भाग)

नेमका काय संदेश द्यायचा आहे ते बोल्ड केला तर मला आकलनाला सोपे जैल.

मस्त लेख-
धन्यवाद.

कवितानागेश's picture

25 May 2014 - 3:13 pm | कवितानागेश

ते १७ लाख रुपये वाचूनच मी खुर्चीतल्या खुर्चीतच अडखळून पडले!
ज्यांची आईवडील हे असे खर्च करत असतील, त्या मुलांना आभ्यासाच्या ओझ्याबरोबरच या फीचेपण ओझे होत असेल का? बिच्चारी मुलं.
मागे एका मुलाची इन्जिनीअरिन्गच्या पहिल्या वर्षच्या maths, physics ची ट्युशन घेत होते. त्या काळात सगळ्या टेन्शन्मुळे त्याचे बीपी ५०-७० झाले होतं, हे आठवलं. :( त्यातून त्याची आई सांगायची, त्यानी अभ्यास केला नाही तर त्याला मार!?
...... पुढे मीच फ्रस्ट्रेट होउन ट्युशन्स घेणं सोडून दिलं.
बरं झालं तुम्ही निवांत आहात ते. मुलगा लकी आहे.

तुमचा अभिषेक's picture

25 May 2014 - 3:27 pm | तुमचा अभिषेक

आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हा आपण प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहात.
यातील गंभीरता खरेच वाढत आहे.
दुर्दैवाने हल्ली तर हि शैक्षणिक प्रतिष्ठा नर्सरी अन बालवाडीपासून दिसू लागलीय.
लहान वयातच मुलाला मोबाईल आणि लॅपटॉपशी खेळायला मिळत असल्याने उद्या तो मोठा होऊन नक्कीच आयटी वा कॉम्युटर क्षेत्रात नाव काढेल अश्याही सुशिक्षित पालकांच्या भाबड्या अपेक्षा दिसून येतात.

स्मार्ट जनरेशन, आपला मुलगा कमी पडू नये या स्पर्धेत म्हणून नर्सरीमध्येच ६० हजार घाला जेवढे आपल्या वेळी इंजिनरींगला नव्हते घातले. आणि एकदा का हे पैसे घातले की मग त्याने ते वसूल करून द्यावेत हि अपेक्षा आलीच.

तसेच आपला "एवढे करून प्लेसमेंट ४ लाखाची" हा मुद्दाही योग्य. माझाही या आधी एका मैत्रीणीशी चर्चून झालेला. एवढे पैसे शिक्षणाला घालूनही जर साधारण याच रेंजमधील इंजिनीअर होणार असेल तर त्या दृष्टीने विचार करताही मग आपल्याच जनरेशनमध्ये ईंजिनीअर झालेले आपणच सरस जे आईवडिलांच्या तुटपुंज्या गुंतवणूकीवर एवढे कमावू लागलो की मुलांच्या नर्सरीसाठी ६० हजार फीज भरायची ऐपत ठेऊ लागलो. थोडक्यात पैसे गुंतवून कॉलेजातील सीट घेता येते पण टॅलेंट विकत घेता येत नाही हे आपल्याला पक्के ठाऊक असूनही आपण हि चूक करतो. किंबहुना या मागेही मग असते ती प्रतिष्ठाच !

अवांतर - मराठी लोकांमध्ये हे प्रमाण जास्त दिसते. मराठी माणसे धंदा करू शकत नाही वा व्यवसायात अपयशी का ठरतात याचेही कारण थोडेफार इथेच. आपण पैसे गुंतवतो ते प्रतिष्ठा कमवायला, पैसे चार कमी कमावले तरी मग चालतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 May 2014 - 4:55 pm | llपुण्याचे पेशवेll

अवांतराशी सहमत.

_मनश्री_'s picture

25 May 2014 - 7:51 pm | _मनश्री_

माझ्या भाऊ ८ वी पासून घरूनच शिक्षण करतोय
दहावीचा अभ्यास त्याने घरीच केला ,
फ़क्त गणितसाठी क्लास लावला होता बाकी सगळे विषय त्याने स्वतः पुस्तकं वाचून केले
७५% मिळाले दहावीला
आमच्या दृष्टीने ते पुरेसे होते
बारावीचा अभ्यास सुद्धा त्याने घरीच केला ,पुस्तक सतत वाचली ,गाइड्स वाचली आणि प्रश्नपत्रिका
सोडवल्या ,त्याला चांगले मार्क मिळण्याची खात्री आहे

विनायक प्रभू's picture

25 May 2014 - 9:38 pm | विनायक प्रभू

शक्य असल्यास भेटा?

सर्वप्रथम डॉक्टरसाहेब तुमच्या डेरिंगला सलाम. मुलाला अपेक्षित यश न मिळणे हे जणू घरातील कुणी मेल्यासारखे असल्यागत लोक समजतात. तुम्ही विचार योग्य तोच करताहात. तुमचा मुलगा लै भाग्यवान आहे.

सुबोध खरे's picture

25 May 2014 - 11:06 pm | सुबोध खरे

सर्व प्रतिसाद कर्त्यांना धन्यवाद. मुळात माझ्या मुलाला काय करायचे आहे हे त्यानेच ठरविले आहे. ( रच्याक्ने माझी मुलगी सुद्धा कॉमर्स ला गेली आहे) त्यामुळे दोघेही वैद्यकिय मार्गाकडे वळले नाहीत याने मला कोणताही फरक पडलेला नाही. त्यांचा निर्णय त्यांनीच घेतलेला आहे. यात त्यांना व्यवसाय मार्गदर्शन केंद्रातून मार्गदर्शनही घेतलेले आहे. दोन्ही मुलांना जर उद्या व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी भांडवलाची तरतूद करण्याच्या मार्गावर मी आहे.मुळात मी दोन्ही मुलांना दहावीत असताना लोकमान्य टिळकांचे विचार सांगितले त्यांनी आपल्या मुलाला हे सांगितले कि तू चांभार झालास तरी चालेल पण पुण्यातील उत्कृष्ट चांभार हो( चांभार हि जातीवाचक शिवी नसून व्यवसायाचे वर्णन आहे).
मी माझ्या पत्नीशी बोलताना तिला एक गोष्ट सांगितली कि एम बी बी एस करत असताना अभ्यास करताना मला खूप मजा आली होती. त्यातील सर्व विषय शिकताना मी रस घेऊन शिकलो असल्याने आजही मी वैद्यकाची पुस्तके खूप इंटरेस्टने वाचतो.
माझ्या मुलांनी असेच आपले शिक्षण "एन्जॉय" करावे असे मला वाटते. मग ते करीत असताना त्यांचा CGPA ५-६ च्या मध्ये आला तरी चालेल.
पं. मल्लिकार्जुन मन्सूर. पं शिवकुमार शर्मा यांचे गायन / वादन पाहताना एक गोष्ट जाणवते कि ते आपल्या कार्यक्रमाचा आनंद पूर्णत्वाने घेतात त्यात त्यांना कष्ट होताना दिसत नाहीत असेच आपले शिक्षण आणि व्यवसाय असावा मग त्यात पैसे किती मिळाले किंवा नाही हे गौण असावे.
राहिली गोष्ट शिक्षणाच्या बाजाराची त्याबद्दल सविस्तर नंतर

शेखर काळे's picture

26 May 2014 - 5:51 am | शेखर काळे

सुबोध,
तुम्ही तुमच्या मुलाला आपला विषय निवडू दिलात, याबद्दल मनापासून अभिनंदन.
त्याहून जास्त कौतुक तुमच्या मुलाचे आहे, ज्याला त्याचा मार्ग ठरवता आला आहे. सगळ्यांनाच इतक्या कमी वयात ठामपणे आयुष्यात काय करायचे हे ठरविता येत नाही. काही तर आयुष्यभर हा प्रयत्न करत असतात. म्हणूनच मुख्य शिक्षण एकीकडे आणि व्यवसाय दुसर्याच विषयांत अशी उदाहरणे आपण कितीतरी पाहतोच.
बरेच पालकही, त्यांचेच म्हणणे खरे करून मुलांना पालकांच्या आवडीच्या विषयात शिक्षण घ्यायला लावतात. काही वेळा मुलांना कुठे जायचे आहे हेच कळत नसते. मग आई-बाप तरी काय करणार ? ते मुलांना धोपट मार्गावरून जायला सांगतात. कमीतकमी पोटापुरते कमवून खाईल.
पालकच या धावपळीला जबाबदार आहेत बर्याच अंशी. कारण आपला मुलगा/मुलगी यांना सगळ्यात जास्त गुण हवेत असे त्यांनीच ठरवले आहे. पण काही मुले छान चित्रे काढतात, खेळ खेळतात, काहींत सभाधीटपणा, नेतृत्व हे गुण असतात. हे पालकांना महत्वाचे वाटत नाहीत याचे वाईट वाटते. पुढे नोकरीत, व्यवसायांत हेच गुण कामी येतात असा माझा अनुभव आहे. soft skills वर भर देणे हे आता फार आवश्यक झाले आहे.

प्रतिष्ठेचा मुद्दा तर खासंच. मराठी लोकांचा अत्यंत वाईट गुण. माझा पाल्य कुठ्ल्या क्लासला, शाळेत जातो हे, तो तिथे काय शिकतो, या पेक्षा जास्त महत्वाचे आहे.

शुभेच्छा !

- शेखर काळे

जॅक डनियल्स's picture

26 May 2014 - 6:09 am | जॅक डनियल्स

तुमच्या मुलाचे अभिनंदन ! लेख पण उत्कृष्ट झाला आहे, माझ्या अभियांत्रिकीचे दिवस आठवले. काही विषय राहिले लोक, मी सिरीयल किलर असल्या सारखा लुक द्यायचे. काही भाग मी माझ्या लेखात लिहिला आहे.
"फ्री फ्रोम स्कूल" राहुल अल्वारीस चे (गोवा मधला निसर्गतज्ञ ) उत्तम एक पुस्तक आहे, १०वी झाल्यावर त्याला त्याच्या बाबांनी जग जगायला सोडून दिले, त्याने एक वर्ष खूप वेगळ्या वेगळ्या विषयावर काम केले आणि शेवटी दिशा ठरवली.
इकडची काही माहिती लागली तर सांगा, सध्या मी अजून शिकत असल्यामुळे युनिवर्सिटी मधून काही पण माहिती काढून देऊ शकतो.
chemical.ojas @ जीमेल.

नाखु's picture

26 May 2014 - 9:13 am | नाखु

दोघेही भाग्यवान... त्रिवार सलाम. देव मलाही अशीच "सुबुद्धी" देवो

अच्छे दिन आगये हय म्हणावेसे वाटते(?)

डॉक्टर तुमच्या डोनेशन न देण्याच्या भूमिकेचे मी समर्थन करतो,
तुमच्या एकंदरीत प्रतिक्रियेवरून वरून, ऐक पिता म्हणून मला विश्वास वाटतो,
कि तुमचा मुलगा नक्कीच जीवनात यशस्वी होईल (तुम्हा दोघांच्या पालकांच्या मार्गदर्शनामुळे)

सुबोध खरे's picture

27 May 2014 - 11:58 pm | सुबोध खरे

डोनेशन देणार नाही असे मी म्हटलेले नाही. आज बिट्स(BIRLA) सारख्या कॉलेजात मिळणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी पैसा लागतो आणी सरकारी मदतीशिवाय अशा कोलेजची फी जास्त असल्याशिवाय त्यांना ते कोलेज चालविणे शक्य नाही. जर एखाद्या उत्तम अभियांत्रिकी विद्यालयात जर फी जास्त असेल तर ती चेकने भरण्याची तयारी आहे. पण माझे पांढरे पैसे काळे करून देण्याची तयारी नाही.
माझ्या मुलाला मी स्पष्ट शब्दात सांगितले कि अशा एखाद्या उत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयात जास्त फी असेल तर ती भरण्याची माझी तयारी आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव पैसे भरून तुला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल पण तेथे तू जर आपले कौशल्य यथातथा ठेवलेस तर नोकरी मिळवण्यासाठी बापाचा पैसा कामाला येणार नाही.चिखलाचे कुल्ले फार वेळ टिकत नाहीत.

जीवनात कौशल्याची शिदोरीच कामी येते, एकदम सहमत.

पैसा's picture

26 May 2014 - 11:30 am | पैसा

तुमचे आणि तुमच्या बाबांचे विचार आवडले. मुलगा नशीबवान आहेच. त्याला पुढील निर्णयासाठी शुभेच्छा!

या अनुभवातून गेल्या वर्षीच गेले आहे त्यामुळे सगळे अगदी ताजे अनुभव आहेत. माझ्या मुलाचे आणखीच दुर्दैव. त्याला जे ई ई मधे गोवा एन आय टीला पाहिजे त्या स्ट्रीमला प्रवेश मिळेल इतके मार्क्स होते. आणखीही काही एन आय टी मधे प्रवेश मिळू शकला असता जर जे ई ई चे मार्क्स फक्त विचारात घेतले असते तर. पण सिब्बल यांच्या डोक्यात आपले शैक्षणिक स्मारक करायची योजना आली आणि त्यानी आयत्या वेळी, म्हणजे जे ई ई ची परीक्षा होऊन गेल्यानंतर बोर्डाच्या मार्काना वेटेज द्यायचे ठरवेले. सर्व तज्ञानी विरोध केला तरीही हा निर्णय घेतला गेला होता. (यावर्षी तो निर्णय परत फिरवण्यात आला आहे, पण गेल्या वर्षीच्या बॅचचे नुकसान व्हायचे ते झालेच.)

आता हे वेटेज कसे दिले गेले? सोप्या शब्दात सांगते. तो जे ई ई ला पहिल्या ५% मुलात होता आणि त्याच्याखाली ९५% मुले होती. मात्र भाषांमधे कमकुवत असल्याने बोर्डात त्याला ७०% मार्क्स होते. बोर्डात त्याचा नंबर २५% मुलात होता. त्याच्याखाली ७५% मुले होती. या लोकानी वेटेज देताना बोर्डात जे मार्क्स असतील ते जे ई ई च्या परीक्षेला धरायचे ठरवले. आता जे ई ई च्या परीक्षेत २५% मार्काच्या लेव्हलच्या मुलाचे ९५ मार्क्स त्याच्या १२८ ऐवजी धरले. त्यामुळे जे ई ई ला गोव्यात पहिल्या ४० मधे असलेला त्याचा नंबर १५० झाला. याउलट गोवा बोर्डात ९०-९२% मार्क्स असलेले पण जे ई ई ला ९५-१०० मार्क्स असलेल्या मुलांना गोवा एन आय टी ला अ‍ॅडमिशन मिळून गेली.

आता महत्त्वाचे, आम्ही सुरुवातीला निराश झालो होतो. पण त्याला सी ई टी ला उत्तम मार्क्स असल्याने इथल्या सरकारी अभियांत्रिकी कॉलेजात आरामात बी ई मेक. ला प्रवेश मिळाला. डोनेशन भरून प्रवेश घेणार नाही हे त्याला आधीपासून सांगितलेले होते. नंतर त्याला म्हटले, तुला जर सी ई टी ला चांगले मार्क्स पडले नसते तर तू काय केलं असतंस? त्यावर तो म्हणाला, मी मॅथ्स घेऊन बी एस सी ला गेली असतो! त्या क्षणी माझ्या मुलाचा प्रचंड अभिमान वाटला. त्याचवेळी एका नातेवाईकाने त्याच्या मुलाला ९ लाख डोनेशन भरून बी ई मेक ला अ‍ॅडमिशन घेऊन दिली होती. (त्या मुलाची डिग्री सरळ पास होत गेला तर १४ लाखाला पडणार आहे.) त्यामुळे तर मुलाच्या बाबतीत मी किती नशीबवान आहे हे अजूनच ठळकपणे समजलं!

वेल्लाभट's picture

26 May 2014 - 11:37 am | वेल्लाभट

अत्तिशय खरं आणि सुरेख लिहिलंयत... माझीही अशीच मतं असल्याने मी तुमच्या प्रत्येक म्हणण्याशी सहमत तर आहेच; पण मांडणी सुरेख झालीय. आणि अनुभवकथन सुद्धा. अधिकाधिक पालकांचं असं प्रबोधन होवो हीच प्रार्थना. तुमच्या मुलाला शुभेच्छा ! :)

बाबा पाटील's picture

26 May 2014 - 12:20 pm | बाबा पाटील

बारावीत ४५% वर पास झाला, तेंव्हा आमच्या सासरेबुवांनी पेढे वाटले होते.हेच आमच्या सौभाग्यवती ९४% पास झाल्या व मेरीट वर डॉक्टर झाल्या तरी त्यांच्या पप्पांना त्याचे फारसे काही वाटले नव्हते...असो तर हा माझा ४५% वाला हुंडा आज पुन्यात एक यशस्वी फिजिओथेरपिस्ट आहे.पुन्यातील प्रतिथयश आर्थोपेडीक त्यांच्या क्रिटीकल केसेस याच्याकडे पाठवतात.बेल्स पाल्सीमध्ये एका स्टीमुलेटरच्या सहायाने हा प्राणी १० ते १५ दिवसात जे काही रिझल्ट ते खरच अप्रतिम आहेत.त्यामुळे या मेरीटचा आणी तुमच्या गुणवत्तेचा खुप काही संबध येतो असे वाटत नाही.

वैशाली माने's picture

26 May 2014 - 1:53 pm | वैशाली माने

अगदी योग्य निर्णय. ज्याना आपल्या पाल्याच्या शैक्षणिक विकासापेक्षा पैशातच जास्त रस आहे तिथे न गेलेलेच बरे.

मध्यम्वर्गीय मुलांनी प्रथम जे शिक्षण स्वताच्या पायावर उभे करु शकेल ते घ्यावे. आवड असो वा नसो, नसल्यास आवड निर्माण करावी.

मुलांचा कल ओळखा / जाणा असे सर्व जण लिहीता आहेत, पण काहीही झाले, कुठल्याही क्षेत्रात गेले तरी स्वताच्या पायावर त्यांना उभे रहायचे आहे हे विसरुन चालणार नाही.

१. कीतीजणांच्या मुलांना नीट काय करायचे आहे ते १२ वी मधे कळले आहे? आणि जी मुले माझा xxx कल आहे असे म्हणत आहेत ते त्यांना कीती कळले आहे?
२. मुलाचा कल xxx क्षेत्रात असेल ( असे तो म्हणतो ) त्या क्षेत्रात स्वताच्या पायावर उभे रहाण्याची संधी कीती? कोणी म्हणत असेल मी गाणार, चित्र काढणार, पण अश्या क्षेत्रात फकत वरची ५-१० लोक यशस्वी होतात. त्यापेक्षा जी साधी BE, MCA अशी क्षेत्रे आहेत त्यात बर्‍याच टक्के लोकांना चांगल्या पगार देणार्‍या नोकर्‍या मिळतात.

महत्वाचे म्हणजे
जर आवडीचे क्षेत्र असेल तर ज्ञान घ्यायला कोणी आडवले नाहीये. तुम्ही BE MCA होताना मॅथ्स मधे प्राविण्य मिळवू शकता, गाण्यात, चित्र काढण्यात किंवा अगदी CA सुद्धा होऊ शकता.

प्रभाकर पेठकर's picture

26 May 2014 - 3:50 pm | प्रभाकर पेठकर

सहमत.

माझा एक मित्र आहे. कमर्शियल आर्टीस्ट आहे. हे करीयर निवडण्याआधी त्याला फाईन आर्ट्सची ओढ होती. व्यक्तिचित्र रंगविणं (Portraits), देखावे रंगविणं ही त्याची आवड होती. पण त्याला त्याच्या प्रोफेसरने सांगितले. फाईन आर्ट्सने तुला 'टाळ्या' मिळतील पण घर संसार चालवायला तू 'कमर्शियल आर्ट्स'लाच जा. आता तो व्यवसायाने कमर्शियल आर्टीस्ट आहे आणि हौशीखातीर व्यक्तिचित्र, देखावे वगैरे करतो. त्याच्या मते (कारण मला त्यातलं कांही कळत नाही) त्याला करियरच्या सुरुवातीला हा एक चांगला सल्ला मिळाला होता.

आत्मशून्य's picture

26 May 2014 - 3:51 pm | आत्मशून्य

उगाच त्यांच्या कलाने घ्या वगैरे गोश्टी नापास होण्या इतपत मुलांसाठी असतात. त्याचे सरसकटीकरण का केले जाते ? आता इथे पोराची आय आय टी हुकली, नक्किच वाइट गोष्ट आहे. आता तो पैसा, प्रतिष्ठा (व काही प्रमाणात ज्ञान) मिळवायला हातपाय जास्त मारावे लागतील हे खरयं पण तो जगाचा/पोराचा शेवट नाही, म्हणुन फरक पडत नाही इतकचं.

इथे उगाच घाउक प्रमाणात तुमचा मुलगा भाग्यवान आहे वगैरे दुतोंडे प्रतिसाद वाचुन मी स्वप्नात तर नाहीना वाटु लागले होते आता ठीक आहे. ही अमेरीका आहे का ? जीथे बहुतांश बिलेनिअर फर्स्ट जनरेशनचे असतात, शिक्षणापेक्षा कौशल्यातुन लोक तग धरतात, ज॑ग बदलतात ? इंग्राजांनी गुलाम बनवुन इंग्रजाळवले/कारकुनी शिकवली म्हणून आज जगात कोठेही सर्व्हायव व प्रभाव करायची थोडी क्षमता विकसीत झालेले लोक आपण पोराच्या कलाने घ्यायच्या गफ्फा कशा हाणू शकतात ? रोमेल जाणे.

हां तुमचा मुलगा भाग्यवान आहे कारण त्याला स्वकमाइ करायची आवश्यकता फार नाही (वा मनगुटीवर अजिबात नाही) हे एकमेव वास्तववादी कारण आहे आणी त्याबद्दल मी डॉक अन त्यांचे चिरंजीव यांचे भरघोस अभिनंदन करतो. त्याने या लेवरेजचा कसा फायदा घ्यायचा याची स्ट्रेटेजी तयार न करता कलाकलांच्या अनाकलनीय चर्च्या कशा झोडल्या जातात बुवा ?

आत्मशून्य साहेब,
आज मी मुलासाठी( आणि मुलीसाठी) थोडा फार पैसा जमवून ठेवला आहे ज्यामुळे त्यांना आपले शिक्षण कर्ज न काढता करता येऊ शकेल असे वाटते. या गोष्टी मी गेल्या आठ वर्षात जाणीवपूर्वक केल्या आहेत( आठ वर्षपूर्वी मी लष्करात होतो आणि जो काही थोडा फार पैसा जमविला आहे तो त्यानंतर काटकसरीने राहून ). हि वस्तुस्थिती असली तरी अशी परिस्थिती प्रत्येकाची असेल असे नाही त्यामुळे मी माझ्या परिस्थितीचे लिव्हरेज कसे करतो याचा इतर जणांना फारसा फायदा होईल असे वाटत नाही. पण मी आजूबाजूला पाहिलेली परिस्थिती मी विशद केली तसे आपल्या मित्रांपैकी कोणाचे होत असेल तर ते टाळता यावे यासाठी हा लेख होता. मुलाला मृगजलापाठी उरी फुटेस्तोवर धावायला लागू नये इतके जरी झाले तरी बरे.
मुलाच्या कलाने का जायचे ते मी खाली एका प्रतिसादात लिहिले आहेच कि एकतर सुंदर मुलीशी लग्न करा किंवा बायकोला सुंदर माना. माझ्या मुलाला संगणक किंवा आय ती मध्ये मुळीच रस नाही. केवळ पैसे मिळतात म्हणून मी त्याला तेथे जबरदस्तीने पाठविले तर तो कदाचित आयुष्यभर निरुत्साहाने काम करेल. त्यापेक्षा त्याला आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेऊन त्यात व्यवसाय सुरु करण्यात मी जर भांडवल पुरवले तर तो उत्साहाने आनंदी आयुष्य जगेल असे वाटते. यात "पोराच्या कलाने घ्यायच्या गफ्फा" कशा येतात ते समजले नाही. अर्थात प्रत्यक्ष प्रारब्ध काय आहे हे कुणास ठाऊक?
बाकी प्रतीसादानबद्दल म्हणाल तर छान छान आणि चान चान असे दोन्ही प्रतिसाद तितकेच चांगले किंवा वाईट असतात. एखादा मुद्दा एखाद्याला आवडला किंवा भावला तर त्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद येतो आणि नाही आवडला तर एक तर लोक गप्प बसतात किंवा चान चान म्हणून मोकळे होतात. यात दुतोंडे पण कुठे आला ते समजले नाही.

पण तरी माझ्या प्रतिसादानुशंगाने आपण प्रश्न करत आहात तर काही गोश्टी स्पश्ट कराव्या वाटतात.

केवळ पैसे मिळतात म्हणून मी त्याला तेथे जबरदस्तीने पाठविले तर तो कदाचित आयुष्यभर निरुत्साहाने काम करेल

फार मोठी चुकीची विचारसरणी आहे. म्हणतात ना सुरुवातीला थोडा त्रास होतो पण नंतर हळुहळु सगळं व्यवस्थीत होते ग. आपल्या पाल्यास हेच अनुभवाला आले असते. पण मुळात पोराला व्यवसाय करायचा आहे तर त्याचे IIT भेटले नाही म्हणून असे हिरमुसणे पटले नाही. IIT केवळ एक ओप्शन असणे अपेक्षीत होते प्रायोराय्टी न्हवे ? म्हणुन सकृतदर्शनी त्याला व्यवसायात रस नाही, पदवी घेतल्या नंतर किमान ५ वर्षे तरी हे वास्तव आहे. पुरेशी नोकरी करुन तो यात उडी घेइलही.

जसे अमिशने १५(?) वर्षे बँकींग करुन ब्लॉकबस्टर शिवा ट्रिलो़जी लिहली व त्यात प्रस्तावनेत पुन्हा त्याने १५वर्षे कंटाळवाणे बँकींग केल्यावर वैतागुन लेखक बनलो (I was boring banker)असे तोंड वर करुन लिहले आहे. गाढवा दुतोंडेपणा टाळुन सुरुवातिला पैसा कमावुन सेफ झालो नंतर लेखनात उतरलो लिहल्याने त्याचे नक्कि काय खड्यात जाणार होते त्यालाच माहीत. असो.... पदोपदी दुतोंडीपणा भरला आहे भारतियांच्यात.

यात "पोराच्या कलाने घ्यायच्या गफ्फा" कशा येतात ते समजले नाही

सहमत. म्हणजे मी नेमके कोणाला व काय बोललो आहे ते आपण नक्किच समजलेले नाहीय.

पण मी आजूबाजूला पाहिलेली परिस्थिती मी विशद केली तसे आपल्या मित्रांपैकी कोणाचे होत असेल तर ते टाळता यावे यासाठी हा लेख होता. मुलाला मृगजलापाठी उरी फुटेस्तोवर धावायला लागू नये इतके जरी झाले तरी बरे.

खरे साहेब कसे ? नक्कि कसे ? तुमचा लेख हे टाळायला मदत करतोय यावर थोडे भाष्य कराल काय ?

जसे अमिशने १५(?) वर्षे बँकींग करुन ब्लॉकबस्टर शिवा ट्रिलो़जी लिहली व त्यात प्रस्तावनेत पुन्हा त्याने १५वर्षे कंटाळवाणे बँकींग केल्यावर वैतागुन लेखक बनलो (I was boring banker)असे तोंड वर करुन लिहले आहे. गाढवा दुतोंडेपणा टाळुन सुरुवातिला पैसा कमावुन सेफ झालो नंतर लेखनात उतरलो लिहल्याने त्याचे नक्कि काय खड्यात जाणार होते त्यालाच माहीत. असो.... पदोपदी दुतोंडीपणा भरला आहे भारतियांच्यात.

हा हा हा, एकदम चाबूक प्रतिसाद!!!!

प्यारे१'s picture

28 May 2014 - 1:17 pm | प्यारे१

आशू चा प्रतिसाद आवडला.
माणसाच्या मेंदूची 'बॅण्डविड्थ' ;) मोठ्ठी असल्यानं जे आवडेल तेच करु शकतो असं नाही. जे आवडत नाही ते आधी करुन जर जास्त पैसा मिळत असेल तर ते करा. आर्थिक स्थैर्य घ्या नि नंतर आयुष्यभर आवडतंय ते करत बसा की!

माझ्या मते बर्‍याच जणांना वीस वर्षानंतर विचारलं की बाबा रे तुझा तेव्हाचा कल तोच आहे का जो तेव्हा होता तर तो निश्चित गोंधळलेला असेल. बारावीच्या वयात माणसाला खूप काही करावंसं वाटत असतं. त्यानुसार सगळ्यांनी करायचं ठरवलं तर झालंच्च्च! वय जातं, वेळ जातो, पैसा जातो, एनर्जी जाते... सगळं गणित फसतं आयुष्याचं.
(एक 'चिगो' आयएएस होतो, शेकडो/ हजारो 'चिगो' लटकतात ही वस्तुस्थिती आहे. 'चिगो' हे फक्त एक उदाहरण आहे.)

स्वतःचं कॅलिबर ओळखून पावलं उचलावीत. ठामपणं करु शकण्याची जिद्द, महत्त्वाकांक्षा नि सगळ्यात महत्त्वाचं त्यानुसार 'सातत्यानं प्रयत्न' असं असेल तर भिडावंच मग! पण स्वतःला अक्कल कमी असली तर गपगुमान पालकांनी कान पकडले तर पकडून घ्यावेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 May 2014 - 1:43 pm | निनाद मुक्काम प...

गाढवा दुतोंडेपणा टाळुन
हा तुमचा एकांगी दृष्टीकोन आहे.
ह्या संधर्भात एक अनुभव असा ऐकला की सलिल कुलकर्णी हे म्युनिक मध्ये दिवाळी पहाट च्या निमित्ताने आले होते , त्यांनी स्वतः संधर्भात किस्सा सांगितला ,
डॉक्टर म्हणून पुण्यात टेल्को मध्ये काम करत असतांना काही वर्षात आपण पूर्णवेळ कलाकार व्हावे असे त्यांना वाटले व त्यांनी आपली नोकरी सोडली तेव्हा त्यांना आर्थिक स्थिरता लाभली नव्हती व त्यावेळी त्यांच्या घरच्या लोकांनी साथ दिली ,
माझे अनेक परिचित उमेदीच्या काळात नोकरी सोडून आपल्या आवडत्या शेत्रात करियर करत आहेत.
एक उदाहरण द्यायचे तर हर्षा भोगले ह्याने व्यवस्थापनात शिक्षण घेतल्यावर सुद्धा उमेदीच्या काळात समालोचन करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात क्रिकेटर नसतांना हा पूर्णवेळ पेशा त्यांनी निवडणे हा धाडसी निर्णय होता ,
पेशाने अभियांत्रिक असलेले संझीगिरी हे क्रीडा पत्रकार व्हायचे ठरवतात ते उमेदीच्या काळात
पेशाने डॉक्टर असलेले अनेक मराठी नटश्रेष्ठ आर्थिक स्थिरता सोडून कलाकार झाले.

बॅटमॅन's picture

28 May 2014 - 1:58 pm | बॅटमॅन

पूर्ण सहमत. यद्यपि अमिश त्रिपाठीबद्दल आशूशी सहमत.

आदूबाळ's picture

28 May 2014 - 4:15 pm | आदूबाळ

अमिश त्रिपाठीचं ते वाक्य माझ्या आठवणीप्रमाणे "I am a boring banker turned happy author" असं आहे.

आर्थिक आघाडी सेफ करून मग हवं ते करण्यात - आणि ते कबूल करण्यात काय दुतोंडीपणा आहे ते कळलं नाही.

आर्थिक आघाडी सेफ करून मग हवं ते करण्यात - आणि ते कबूल करण्यात काय दुतोंडीपणा आहे ते कळलं नाही.

नाही, त्यात दुतोंडीपणा नाहीच-फक्त इतकी वर्षे जणू बोअर मारल्यागत इंप्रेषण होते तो दुतोंडीपणा इतकेच.

आत्मशून्य's picture

28 May 2014 - 3:36 pm | आत्मशून्य

कारण त्यात दुतोंडी नसलेल्यांचा भरणा आहे. असे लोक फार कमी आहेत.प्रत्यक्षात प्रथम आर्थीक नियोजन मग स्वप्नांच्या मागे धावणे हेच केले जाते पण सांगताना ही गोष्ट मुद्दाम लपवली जाते याला मी दुतोंडीपणा मानतो.

अगदी इथेसुध्दा मुलांच्या कलाकलांच्या अनाकलनीय चर्चा करणारे त्यांच्या मुलांना काय सल्ला देतात ? आणी महत्वाचे म्हणजे त्यांचा आर्थीक स्तर काय आहे ? भारतात विवीध आर्थीक गटातील मुले अभ्यास करतात, शिक्षण घेतात त्यापैकी अनेकांच्या प्रमुख गरजा या आर्थीक बाबी आहेत हे वास्तव असताना उगाच प्रत्येकाने हवे ते करावेचा अट्टहास का धरला जातोय ?

असो, पुन्हा सांगतो

१) ज्यांच्या खिषात पैसा असतो फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात.

२) ज्यांच्यामधे जन्मजात धमक असते फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. आणी हे त्यांना नक्किच सांगावे लागत नाही कारण अशा कार्ट्यांना न्हवे त्यांच्या पालकांना कौन्सेलींगची गरज भासु शकते.

३) आणि ज्यांना जगाची न्हवे कोणाचीच परवा नसते फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात.

आपण वरील प्रकारात कुठे बसतो का हे ज्या व्यक्तीला प्रांजळपणे माहीत आहे त्यानेच कलाकलांच्या आकलनीय चर्चा झोडाव्यात...

llपुण्याचे पेशवेll's picture

29 May 2014 - 3:34 pm | llपुण्याचे पेशवेll

१) ज्यांच्या खिषात पैसा असतो फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात.

सहमत. माझ्या ओळखीतले अनेक जण असे आहेत जे उत्कृष्ठ अभिनय, गायन करू शकतात तरीही बँकेत नोकरी करून मग नाटक, गाणं वगैरे करतात. आर्थिक स्थैर्य नसलेला कलाकार कदाचित नैराश्यातून नाहीसा होण्याचीच शक्यता जास्त असते.
२) ज्यांच्यामधे जन्मजात धमक असते फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. आणी हे त्यांना नक्किच सांगावे लागत नाही कारण अशा कार्ट्यांना न्हवे त्यांच्या पालकांना कौन्सेलींगची गरज भासु शकते.

पुन्हा सहमत. आणि अशी कार्टी त्यांच्या मार्गावरून स्वतःच चालत जातात. उदा. भीमसेन घर सोडून पळून गेले, गाणं शिकायचं म्हणून.

शशिकांत ओक's picture

4 Jun 2014 - 12:47 am | शशिकांत ओक

पु . पे. व आत्मशून्य आपले वरील निवेदन खऱ्यांना
तत्वतः अमान्य असूदे पण व्यवहारात तेच सत्य आहे.

हि गोष्ट मान्य नाही. मी डॉक्टर आहे माझी पत्नी डॉक्टर आहे आमचे दोघांचे दवाखाने आहेत. आम्ही त्याला भरल्या ताटावर आणून बसवू शकलो असतो. म्हणून मी मुलाला (ज्याला जीवशास्त्रात बिलकुल रस नाही) डॉक्टर हो म्हणून भरीस घातले असते तर तो आयुष्य भर दुःखी राहिला असता. बरेचसे अभियंते याला दुजोरा देतील अशी मला खात्री आहें माझा भाऊ विद्युत अभियंता आहे आणी मेहुणा मेकानिकल. त्या दोघांना जीवशास्त्र म्हणजे कार्ल्याच्या भाजीसारखे वाटते( त्याचे नाव घेतले तरी तोंड कडू होईल)
माझी मुलगी शास्त्र शाखे कडेच जायचे नाही म्हणाली मग तिला तर डॉक्टर बनवणे म्हणजे मूर्खपणाच झाला असता. ती आनंदाने कॉमर्स ला गेली आहे.
आय आय टी मध्ये त्याने केलेल्या अभ्यासावर त्याला प्रवेश मिळालाच नसता. जे ई ई मेन परीक्षेचे गुण हे इतर सर्व अभियांत्रिकी विद्यालयांसाठी धरले जातात तेथे त्याला कमी गुण मिळाले म्हणून तो हिरमुसला झाला हे आपणाला पटले नाही. मग त्याने काय आनंदी असायला हवे होते?
"मुलाला मृगजलापाठी उरी फुटेस्तोवर धावायला लागू नये इतके जरी झाले तरी बरे." माझ्या वर्गातील एक मुलगा अतिशय हुशार होता. त्याच्या आईवडिलांनी ठरविले कि त्याने डॉक्टर होऊन सर्जन व्हायचे. (त्याच्या बहिणीसाठी त्यांनी ठरविले होते कि तिने डॉक्टर होऊन स्त्रीरोग तज्ञ व्हायचे तशी ती झाली सुद्धा). मुलाला इंजीनियर व्हायचे होते. पण घरच्यांनी स्पष्टपणे नकार दिला. यातून हाय खाऊन मुलाने बारावीला एक वर्ष " ग्याप" घेतली. दुसर्या वर्षी त्याने उत्तम गुण मिळवले आणी त्याला व्ही जे टी आय ला सुद्धा प्रवेश मिळत असताना त्याच्या आई वडिलांनी त्याला शीवच्या लो.टिळक रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायला लावला.मुलाने एम बी बी एस पूर्ण केले पण मनाविरुद्ध असल्याने त्याला शेवटच्या वर्षी चांगले गुण मिळाले नाहीत त्यामुळे त्याला सर्जरीला प्रवेश मिळाला नाही त्याने भूलशास्त्र( ANAESTHESIA ) मध्ये प्रवेश घेतला. हे त्याच्या आईनेच ठरविले होते. एक वर्ष झाल्यावर हा मुलगा कल्याण जवळ एका झाडाखाली स्वतःला बेशुद्ध करण्याचे औषध (PENTOTHAL) शिरेत घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला. आजही त्याचा हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट पणे उभा राहतो.
हे टोकाचे उदाहरण आहे परंतु अशी अनेक उदाहरणे मी जवळून पाहिली आहेत. विस्तारभयास्तव इतकेच पुरे.

संजय क्षीरसागर's picture

28 May 2014 - 10:18 pm | संजय क्षीरसागर

ज्यांनी प्रोफाईलमधेच असं म्हटलंय...

मी इथे मिसळपाववर लीहलेल्या व्यक्त केलेल्या माझ्या वैयक्तीक लेखनाशी/प्रतीसादांशी/मतांशी/माहीतीशी मी स्वतः सहमत असेनच असे नाही.

त्यांचे प्रतिसाद विचारात घ्यावे किंवा कसं ते तुम्ही ठरवा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2014 - 8:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी उत्खनन ! =))

आत्मशून्य's picture

2 Jun 2014 - 11:52 pm | आत्मशून्य

चरचा चालु असताना लूजर्स ना विरोधी बोलायला एक तरी भासमय पण ठाम मुद्दा लिहावा मिळावा म्हणुन जन्मो जन्मी प्रोफाइल ला जपून ठेवलेले ते वाक्य आहे इतकेच. मुळात संजय सरां परमाने मला लोकांना चर्चेतून काहीच शिकवायचे नाहिये म्हणुन मी मांडलेल्या मुद्यांशी मी सहमत असेन अथवा नसेन(कारण मी हेकट वा ब्रम्हज्ञानी असल्याचा दावा करू शकत नाही) तुम्ही त्या मुद्यांशी सहमत आहात की नाही हे प्हाने महत्वाचे आहे असे ते वाक्य सुचवते!

.

मूवी (मुक्त विहारी )समजत असतील इतका मी गवि( गहन विचारी) नाही. म्हणून आपणास माझ्या कोणत्या मुद्यावर नक्की आक्षेप आहे हे उमजत नाहिये. अन सुर मात्र विरोधी चर्चात्मक झाला आहे. आपण जर काही मुद्दे ओब्जेकटीवली सामोरे आणले तर मी नक्कीच ठोस मत प्रदर्शित करू शकेन. यातून राहून राहून एकच गोष्ट फक्त स्पष्ट होतेय... सुख कशाला म्हणतात हे मुलाने शिक्णे फार आवश्यक आहे. कल कोणता का असेना....

सुबोध खरे's picture

28 May 2014 - 12:11 am | सुबोध खरे

याच्याशी मी सहमत नाही.
जीवनात सुखी राहण्याचे दोन मार्ग आहेत
१)सुंदर मुलीशी/मुलाशी लग्न करा
२) बायकोला/ नवर्याला सुंदर मानून घ्या.
पहिला पर्याय नक्कीच चांगला आहे.
सौंदर्य च्या ऐवजी कोणताही गुण गृहीत धरता येईल.
माझ्या स्वतःच्या बाबतीत मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश २ गुणांनी (टक्क्यांनी नव्हे) चुकला होता म्हणून मी फार्मसी ला प्रवेश घेतला होता. (दंत वैद्यकाला प्रवेश मिळाला होता सेन्त जॉर्ज मध्ये) फार्मसीच्या पहिल्या वर्षाला पहिला वर्ग मिळवला होता.तेथील पुढचा मार्ग स्पष्ट दिसत होता मी कमीत कमी पी एच डी केले असते (हि आत्मस्तुती नाही वस्तुस्थिती होती) पण एकही दिवस असा गेला नव्हता कि आपल्याला डॉक्टर व्हायचे आहे हे माझ्या डोक्यातून गेले नव्हते. तेंव्हा पहिल्या वर्षाच्या परीक्षेबरोबर मी वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिली आणी सुदैवाने त्यात पास झालो आणी ए एफ एम सी मध्ये प्रवेश मिळाला आणी डॉक्टर झालो.
आजपर्यंत एकदाहि असे वाटले नाही कि आपण डॉक्टर का झालो?

आत्मशून्य's picture

7 Jun 2014 - 2:11 am | आत्मशून्य

जीवनात सुखी राहण्याचे दोन मार्ग आहेत
१)सुंदर मुलीशी/मुलाशी लग्न करा
२) बायकोला/ नवर्याला सुंदर मानून घ्या.
पहिला पर्याय नक्कीच चांगला आहे.

हम्म!
१) एक तर सदाशीव पेठेत मिसळपावकट्टा करा. विषय संपला... बावन्नकशी सोने. नथिंग अनोफिशीअल अबॉट इट.
२) अथवा नांदत आहात त्या डबक्याला ब्रम्हांडाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणत समवाक्यी टोणगे जमा करुन त्यात कत्टा करा.
यात सदाशीव पेठेचा कट्टा योग्य(अधिकृत) पर्याय आहे यात दुमत नाही. पहिला पर्यायच मस्त आहे म्हणूनच मी कुठेही सुखी होण्याचा मार्ग म्हणून कॉम्प्रोमाइज करायला शिका हे अगदी आडुनही सुचवत नाही. पण... समजा सुदैवा ऐवजी दुर्दैवाने वैद्यकीय प्रवेश परीक्षा नापास झाहला असता तर काय केले असते ? न्हवे वरील उदाहरणात सध्या दुधाची तहान ताकावरच भागवताना ? भलेही "ताक कीती आरोग्यदाही", "पिल्याने ताक जत्री" वगैरे लिखाण जरी छापुन आणले तरी.... आपला कमीत कमी पी एच डी हा ओप्शन नक्किच वाइट न्हवता... हे लक्षात सहज येइल ना ? किम्बहुना... कदाचीत पुढे मागे त्यातही तितकाच उत्साह निर्माण झाला असता (मान्य हे वाक्य सर्वसामान्य वादासाठी आहे आपल्याला वैयक्तीक हिशेबात ते बहुदा लागु पडत नाही) पण मुद्दा हा आहे की कलाच्या चर्चा आणी हवे तेच करण्याचा ठामपणा या दोन मुलभौत विलग संकल्पना आहेत. आणी कल न्हवे आणी ठामपणाही न्हवे तर नक्कि काय हवय.. हे ओळखणे जरी सुखाची किल्ली आहे तरी कलापेक्षा जे करु ते व्यवस्थीतच हा ठामपणा व्यक्तीमत्वात विकसीत होणे फार आवश्यक आहे. आयुश्याची सगळी दाने आपल्या कलाच्या बाजुने पडतिल असे अजिबात नाही. जे जगतो तेच लिहतो हा भंपकपणा असतो, खरे तर लिहायचे आहे त्यासाठी जगतो हा दांभिकपणा लपवायचा तो भास असतो.तरीही रॉक करायचे असेल तर कल न्हवे व्यक्तीमत्वामधे ठामपणा महत्वाचा. मग हवा तो कलकलाट हव्यात्या कलेने हवा तसा कलवता येतो... वाटले तर गहन बनता येते अथवा मुक्तपणे विहारसुधा जमुन जाते

खरे साहेबः- मला जे नेमके मुद्दे बोलायचे आहेत ते मी आधिच या धाग्यावर सुस्प्श्टपणे नमुद केलेले आहेत. मी अतिशय सहज सुलभपणे त्यातील गाभा किती दाट व यथोचीत आहे हे समोर आणू शकतो. पण मुळातच त्याची आवश्यकता नाहीये हे वैयक्तीक मत आहे. आणी मुख्य म्हणजे इथे उजेड टाकायला जाणकार उपलब्ध्द आहेतच. हा प्रतिसाद म्या मुददाम मला निव्वळ वेळ जात नाही व महणून खरडला आहे. क्षमस्व.

असंका's picture

7 Jun 2014 - 10:38 am | असंका

अहो असे प्रस्थापितांना शिंगावर का घेत आहात? वेळ अगदीच जात नाहिये का? :-))
आत्मशून्यसाहेब,

आपला मुद्दा बरोबर आहे. अगदी पहिल्यापासूनच मान्य होता. पण हा धागा इतका वैयक्तिक स्वरूपाचा आहे, की यावर थोडंही विरोधी लिहिलं की त्याला वैयक्तिक वादाचे स्वरूप येतंय.

मिपावर अनेक लोक बिनदिक्कीत वैयक्तिक अनुभव मांडतात याचे तर मला कायमच अप्रूप वाटत आलेले आहे. त्यावर जे लोक प्रतिसाद देतात, त्यांचे स्वरूपही ठरलेले आहे. " फारच छान! यापेक्षा अधिक योग्य असे कुणी काही करूच शकले नसते. तुम्ही जे केलेत ते सगळ्यात परीपूर्ण." आपण त्याला छेद दिला आहे खरा, पण असे करणे योग्य आहे अशी आपली स्वतःची तरी खात्री आहे ना! शेवटी हे नुसते विचार नाहीत. कुणाच्या तरी आयुष्याशी निगडीत गोष्टी आहेत.

आत्मशून्य's picture

7 Jun 2014 - 7:18 pm | आत्मशून्य

अहो असे प्रस्थापितांना शिंगावर का घेत आहात? वेळ अगदीच जात नाहिये का?

प्रस्थापित म्हणजे काय ?

आपण त्याला छेद दिला आहे खरा, पण असे करणे योग्य आहे अशी आपली स्वतःची तरी खात्री आहे ना! शेवटी हे नुसते विचार नाहीत. कुणाच्या तरी आयुष्याशी निगडीत गोष्टी आहेत.

सुदैवदुर्दैवयोगायोगाने जो पुरेसा अनुभव गाठी आहे त्यावरुन मत मांडतो. माज्या समोर काही चुकिचे घडतय वाटत असेल तर स्पश्टपणे सांगतो. माझ्या पाठी जे घडते त्या घटनांवर जरी माझे नियंत्रण नसते तरीही अशांना एक शुभेछ्चा मी फार मनापासुन देतो... ती म्हणजे Hope your knife won't get hurt, while stabbing me in the ब्याक! *new_russian*

समीरसूर's picture

27 May 2014 - 5:40 pm | समीरसूर

खरेसाहेब,

शैक्षणिक यश अगदीच कामाचे नसते असे नाही पण आयुष्याच्या एवढ्या मोठ्या पसार्‍यात शैक्षणिक यश क्षणिक सुख देणारे वाटायला लागते. मुलाचा खरा कल कशात आहे हे ओळखणे महत्वाचे. दहावीला ८०-९०% मिळाल्यानंतर मुलाने डॉक्टर किंवा इंजिनीअरच व्हायला पाहिजे हा अट्टहास चुकीचा आहे. माझ्या एका नात्यातल्या हुशार मुलाने दहावीला उत्तम गुण मिळवून देखील कॉमर्सला जाऊन पुढे सीए पूर्ण केल्याचे उदाहरण मला माहित आहे. मुलांचे कौशल्य जास्त कशात आहे हे तपासून मगच निर्णय घेणे योग्य. पुढे कुठली दिशा कुणाला कुठे घेऊन जाईल हे आपला वकूब ओळखणे, त्यानुसार ध्येय ठरवणे, परिश्रम करणे, आणि प्रयत्नांमध्ये कठोर सातत्य ठेवणे यावरच अवलंबून असते. आजकाल करीअरच्या असंख्य वाटा उपलब्ध आहेत. मुलांची सुप्त कौशल्ये ओळखणे आणि त्यानुसार एखादे क्षेत्र निवडणे मुलांना आयुष्यात चांगले आणि समाधानकारक यश मिळवून देते असे वाटते. शेवटी यश म्हणजे तरी काय? आपल्याला आवडते ते काम मनापासून करण्याची जिद्द असणे आणि त्यायोगे सनदशीर मार्गाने चरितार्थासाठी आवश्यक असणार्‍या साधनांची आणि भौतिक सुखासाठी आवश्यक असणार्‍या समृद्धीची भक्कम तजवीज करणे आणि त्यासाठी सक्षम असणे. पुढे एखाद्या क्षेत्रात नाव कमवणे, प्रसिद्ध होणे, लोकप्रिय होणे ही यशाची आणखी वरची पायरी म्हणता येईल. आजच्या युगात हे सगळं करण्यासाठी असंख्य संधी आहेत. एका आयआयटीच्या पूर्वपरीक्षेतील अपयशाने एवढ्या मोठ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. एक संधी हुकते कारण इतर अधिक चांगल्या संधी पायघड्या टाकून आपलं स्वागत करायला सज्ज असतात यावर माझा जबरदस्त विश्वास आहे कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे काहीही काळजी करू नका. सगळं एकदम झकास होणार आहे यावर विश्वास ठेवा आणि आपल्या मुलाला तो विश्वास अवश्य द्या. मग बघा चमत्कार. :-)

मला दहावीला ८८.७१% गुण होते. आणि मी अकरावीमध्ये चक्क नापास झालो होतो आणि माझे एक वर्ष व्यर्थ गेले होते. अभिमान वाटण्यासारखी गोष्ट नाही. चूक माझीच होती. आणि आता मी काही फार प्रकाशमान दिवे लावलेले आहेत असंही नाही. पण आता ते अपयश माझ्या लक्षात नाही हे खरे. :-) आणि त्या अपयशाने मला खूप काही शिकवले हे ही खरे.

सो, डोण्ट वरी! इट्स ऑल पार्ट ऑफ लाईफ. योग्य धडे शिकणं मात्र महत्वाचं आहे एवढं नक्की सांगा आपल्या मुलाला. म्हणजे मग सगळं नीट होईल. त्याला अनेक शुभेच्छा! :-)

--समीर

लेख आणि पेठकरकाकांचा प्रतिसाद दोन्हीही छान!!

सुधांशुनूलकर's picture

27 May 2014 - 6:07 pm | सुधांशुनूलकर

छान लेख.
सध्या आम्ही उभयता साधारणतः याच अनुभवातून जात आहोत. लेक दहावीत आहे आणि तिने पुढे विज्ञान संशोधन करायचं ठरवलं आहे. त्यामुळे ती बारावीनंतर कोणत्याच प्रवेश परीक्षेला बसणार नाहीये.
हे ऐकल्यावर, डॉ.खरेंना जशा प्रतिक्रिया/सल्ले मिळाले, अगदी तशाच प्रतिक्रिया मित्रमंडळी, नातेवाईक व्यक्त करतात.
आता लवकरच दहावीचा निकाल लागेल, नंतर बघू.

खरेसाहेब, तुमच्या मुलाला आणि तुम्हाला शुभेच्छा.

वाचतीये आणि हळूहळू मनाची तयारी करतीये. एकवेळ आपण आपल्यात (मूल व आईवडील, खरे हितचिंतक) काहीही म्यानेज करू पण या आजूबाजूच्या नातेवाईकांच्या, शेजार्‍यापाजर्‍यांच्या टीका टिप्पण्यांना, शेरेबाजीला आवर कसा घालावा कळत नाही. अजून आम्ही सुपात आहोत पण वर्षे पटापट संपतायत.
आपली ही वेळ नीट पार पडो व मुलास योग्य त्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळो या शुभेच्छा!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 May 2014 - 1:59 pm | निनाद मुक्काम प...

ह्यासाठीच माझी मुलगी जर्मनी मध्ये लहानशी मोठी होईल तेव्हा युरोपियन युनियन मधील कोणत्याही युनि मध्ये ती वाट्टेल त्या शेत्रात शिक्षण घेऊ शकते , तेही वाजवी दरात ,कारण शिक्षणाचा अर्धा खर्च सरकार करते,
पण ती काय व किती शिकणार ह्याचा सर्वस्वी निर्णय ती स्वतः घेईल , आम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत असू . अंतिम निर्णय तिचा ,
उद्या तिला उच्च शिक्षण घ्यायचे नसेल तर नोकरी मिळण्याच्या अनुषंगाने ती कोर्स करून आरामात जगू शकेल .
काय करायचे हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे
मी आता एकच करू शकतो , तिला लहान वयात ती ज्या शहरात राहते ते म्युनिक शहर , विज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते , तेथील युनि व जगातील सर्वात मोठे विज्ञान संग्रहालयाचा वार्षिक पास काढून महिन्यातून एकदा तेथे तिला घेऊन जाईल .
ह्याचा कुठेतरी तिचे आपले करियर निवडतांना उपयोग झाला तर
सोन्याहून पिवळे नाहीतर किमान विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन तिच्या आयुष्यात एक महत्वाचे स्थान राखेल , हे देखील माझ्यालेखी खूप महत्वाचे आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 May 2014 - 6:57 pm | राजेंद्र मेहेंदळे

डॉक्टरसाहेबांचा लेख आवडला आणि कौतुकही वाटले.कमी मार्क पडले म्हणुन आइवडीलांनी नावे ठेवण्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. कारण जिथे आइवडीलच बोलु लागतात तिथे इतर लोक २ पावले पुढे जाउन मुलावर टीका करतात, भले त्यांची त्या विषयातली अक्कल शून्य असो.आणि मग मुले अजुनच खचतात,जणु काय त्यांनी एखादा खुनच केलाय.
मला हे ही पटते कि सर्वच मुलांन १०वी /१२वी च्या वयात आपल्याला काय करायचे आहे ही द्रुष्टी नसते.त्यामुळे निदान ३-४ मार्ग डोळ्यासमोर असणे आवश्यक आहे. जसे की जे इ इ ची तयारी करतानाच सी इ टी, बिट्स आणि तत्सम परीक्षासुद्धा देणे. किवा नाहीच जमले तर बी.एस्सी,एमेस्सी हा मार्गही आहेच.
कॉमर्स असेल तर सी.ए फाउंडेशन्,सी एस ची तयारी किवा इतर कोर्स आहेत्,बँकेच्या स्पर्धा परीक्षा आहेत्,किंवा सर्वांसाठी एम पी एस सी /यु पी एस सी आहेत्.अजुन थोडा स्पार्क असेल तर आय ए एस /आय पी एस आहेत.
थोड्क्यात काय २१व्या वर्षी नोकरी, २५ व्या वर्षी २ बी एच के फ्लॅट २७ व्या वर्षी लग्न असा मध्यमवर्गीय बाणा ठेवण्यात काही पॉईंट नाही. त्याला जरा वेळ द्या, २-३ लाईन ट्राय करु द्या.कुठे ना कुठे स्थिरावेल तो.
पहीले ३-४ वर्षे एका फिल्ड्मध्ये राहुन नंतर आयुष्यभर वेगळाच मार्ग पत्करणारे लोकही पाहीलेत.आणि यशस्वी झालेलेही पाहीलेत.
सो डॉक्टर...मुलाला शुभेच्छा आणि तुम्हालापण

राही's picture

27 May 2014 - 7:21 pm | राही

लेख आणि बहुतेक सर्व प्रतिसादही आवडले. विशेषतः प्र.पे., पैसा, समीरसूर, शेखर काळे, प्रसाद१९७१ यांचे. मुलाने स्वतःचा कल ओळखून मार्ग ठरवावा हे थोड्या प्रमाणातच व्यवहार्य आहे. कारण सतरा-अठराव्या वर्षी आयुष्यभरासाठीचा निर्णय घेण्याइतकी परिपक्वता मुलामध्ये असतेच असे नाही. अमेरिकेमध्ये मुले उच्चशिक्षणासाठीच्या पैशांची जुळवाजुळव स्वतःच करतात. यामध्ये काही वर्षे निघून जातात. नंतर हव्या त्या अभ्यासक्रमाला जातात. पण तेथे वाढलेल्या वयातही प्रवेश मिळू शकतो आणि स्थिरस्थावर होण्याचे वय एकूणच मोठे असल्याने समाजाच्या दृष्टीने फरक पडत नाही. एरवीही कोणी खाजगी गोष्टीत दखल देत नाही म्हणा. आपल्याकडे तसे नाही. त्यामुळे तणाव येतो. लहान वयात घेतलेले निर्णय बरोबरच ठरतील असे नाही. तेव्हा जो काही आयुष्यक्रम वाट्याला आला आहे त्यात सर्वोत्तम ठरण्याची आस धरावी हे उत्तम. आमच्या एका मामेभावाने दहावीपर्यंतची वर्षे ट्रेकिंग, फुट्बॉल, क्रिकेट यात (लोकांच्या मते उंडारण्यात) घालवली. दहावीनंतर अगदी कमी मार्कांमुळे कुठेही प्रवेश मिळेना. शेवटी एका आय्टीआय मधून ऑटोमोबाइल रिपेअरिंगची पदविका घेऊन चक्क एका गॅरेजमध्ये कामाला लागला. पण त्या कळकट वातावरणात राहूनही जबरदस्त मेहनतीच्या जोरावर आज मुंबईत त्याने स्वतःचे वर्क-शॉप उभे केले आहे. कुठल्याही मेकच्या गाडीसंबंधी लोक आज त्याचा सल्ला घेतात. डॉ.खरे यांनी लो.टिळकांचे चांभाराचे उदाहरण दिले आहे ते अगदी समर्पक आणि दिशादर्शक आहे.

विलासराव's picture

27 May 2014 - 10:07 pm | विलासराव

मला १० वीला ८४ साली ६६% मिळाले. वडील म्हणाले आता काय करतोस. मी म्हणालो सायंसला जातो.गेलोही.
पण त्या कॉलेजला लेक्चर पध्दती. मेडीयम इंग्रजी असल्याने सगळे डोक्यावरुन जायचे. मग सहामाहीत नापास झालो. चंबुगबाळ आवरुन सरळ गावी गेलो.म्हणलो बास झाले शिक्षण. वडील म्हणाले परत जा , तसेही वर्ष जाणारच आहे , जमेल तसा अभ्यास कर मी काहीही बोलणार नाही. मग परत गेलो , मन लावुन पाठांतर केले अनी कसाबसा ११ वी पास झालो.मग १२ वी ला परीक्षेआधी गॅप घ्यायची साथ आली, मीही बळी पडलो, परीक्षा दिलीच नाही. निकालाच्या दिवशी वडीलांना सांगितले. मग परत रेग्युलर १२ वीला प्रवेश घेतला. पुन्हा परीक्षा आली , अभ्यास केलाच नव्ह्ता. मग ईज्जत वाचवायला कॉपी केली. पकडलाही गेलो. रिझल्ट आलाच नाही तेंव्हा कळले कॉपी केस झालीय. मग वडीलांनी कोणतरी माणुस शोधला, बोर्डात गेलो चौकशी झाली पण वर्ष गेलेच. परत ३ र्या वर्शी १२ वी ला रेग्युलर प्रवेश. आता तर असा ग्रुप होता की पहील्या दोन्ही वर्शापेक्षा अभ्यास कमी झाला. आमच्या ८ जणांच्या ग्रुपमधे बाकी सगळ्यांनी गॅप घेतला आनी मी एकटा परीक्षा देणार होतो. पण परीक्षा दिली.गणीत सुटणे शक्य नव्ह्ते मग पुनः पुढच्या मुलाला दम देउन कॉपी केली.यावेळी पास झालो पण गणीतात ३५ आले.पास झालो यातच खुश झालो.
घरी गेलो वडील म्हणाले आता काय करतोस. मी म्हणालो इंजिनिअरींग ला पैसे भरा आता चांगला अभ्यास करेल. परिस्थिती नसताना त्यांनी पैसे भरले, मित्र म्हनायचे १२ वी ला गणितात ३५ आहेत तर कशाला इकडे आलास बाबा?कशाला बापाला बुडवतोस. गप्प बसावे लागायचे. मग पहिले वर्श पीऑल झालो. दुसर्या वर्शीही ९ सुट्ले. मॅथ्स-३ दिला नव्हता. मग टीई ला मॅथ्स ४ आला. बारावीला गणित काहीच न केल्याने हे मॅथ्स सुटणे अशक्यच वाटायचे. पण खुप लढलो आनी शेवटी बीई झालो. मुंबईला आलो. पहीली नोकरी ९३ ला १२०० रुपये पगार. वदीलांच्या जागी पंचायत समीतीमधे क्लार्क व्हॉयचा चान्स होता पण मी नाही म्हणालो. वडीलांच्या आजारत पुढे २००३ पर्यंत कर्जबाजारी झालो.
मग काहीच पर्याय नसल्याने धंदा चालु केला. २००५ ला कर्जमुक्ती आनी कामकाजातुन मुक्ती दोन्हीही एकदमच. पुढे भारतभर फिरलो, काही परदेशवार्याही झाल्या.
पण हे सगळे शक्य झाले ते माझ्या वडीलांमुळेच कारण एवढा त्रास होउनही त्यांनी मला कधीच दुखावले नाही.
मग २००३ ला माझ्या चुलत्याचा मुलगा आला तो ८ वी पास. आज तो सर्व बिजीनेस संभाळतोय. भरपुर पैसे कमावतोय.
आनी मी पून्हा भारतभर विपश्यना करत फिरतोय. चुलत्याला तर आपला मुलगा नक्की काय करतोय तेही माहीत नाही.
असो.

अनुप ढेरे's picture

27 May 2014 - 10:31 pm | अनुप ढेरे

__/\__

आदूबाळ's picture

27 May 2014 - 10:37 pm | आदूबाळ

बाबौ!!

बादवे हे "गॅप घेणे" प्रकर्ण काय असायचं? म्हणजे परीक्षा द्यायचीच नाही का?

हा संदर्भ जुन्या पुस्तकांत / आत्मचरित्रांत वगैरे वाचलाय, पण नक्की काय याबद्दल उत्सुकता आहे.

विलासराव's picture

28 May 2014 - 10:51 am | विलासराव

गॅप घेणे म्हणजे परिक्षाच न देणे.

आत्मशून्य's picture

27 May 2014 - 10:56 pm | आत्मशून्य

आयुष्यभर उत्कृष्ट नोकरी करणारे व त्यासोबत भरघोस पैसा, प्रतिष्ठा व मुबलक अशिक्शीतपणा असणारे कोणी बहाद्दर असतील तर त्यांचेही डोळे उघडणारे अनुभव ऐकायला आवडेल.

सुबोध खरे's picture

28 May 2014 - 12:21 am | सुबोध खरे

आपलेच एक मिपावरील मित्र श्री विनायक प्रभू हे मी लेख लिहिल्याच्या दुसर्या दिवशी स्वतः ठाण्याहून मला आणि माझ्या मुलाला भेटायला आले आणि त्यांनी आमच्या झालेल्या चुका अतिशय मृदू शब्दात समजावून दिल्या आणि आमच्या मुलाच्या काय चुका झाल्या ते दाखवून दिल्या आणि पुढच्या प्रवासासाठी मुलाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रभू सरांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आम्हाला केलेल्या मार्गदर्शनासाठी मी आणि माझा मुलगा त्यांचा आजन्म ऋणी राहीन. माझी मिपाकरांना एक विनंती आहे कि आपली मुले दहावी झाल्यावर त्यांना प्रभू सरांकडून मार्गदर्शन घावे म्हणजे आमच्या झालेल्या चुका टाळता येतील. अर्थात हा आगाऊपणा मी प्रभू सराना न विचारता करीत आहे. ते मला क्षमा करतील अशी अपेक्षा आहे.
ते आल्यानंतर मिपा काही काळ बंद होते म्हणून हा ऋण निर्देश करण्यास उशीर होत आहे.

अतिषय सहमत. प्रश्नच नाही.

नेत्रेश's picture

28 May 2014 - 4:57 am | नेत्रेश

डॉक्टरसाहेब, अतीशय उत्तम लेख आणी अत्यंत महत्वाच्या विशयावर लिहील्यापद्दल अनेक धन्यवाद.
प्रभुसरांचा सल्ला सर्वांनाच घेता येईल असे नाही. पण बहुतेक पालक आणी मुले जवळ जवळ सारख्याच चुका करतात.

तेव्हा जर प्रभुसरांनी दाखविलेल्या चुका व त्या टाळण्यासाठी केलेले मार्गदर्शन इथे लिहीले तर आमच्या सारख्या बहुसंख्य पालकांना त्या चुका टाळण्यासाठी उपयोगी पडेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 May 2014 - 2:04 pm | निनाद मुक्काम प...

विनायक प्रभू
ह्यांनी ह्या संधर्भात एक लेखमाला लिहावी ज्याचा सर्व मिपाकरांना व मूकवाचकांना फायदा होईल.

प्यारे१'s picture

28 May 2014 - 2:23 pm | प्यारे१

+११११

एज्युकेशनल+ क्लिनिकल काऊन्सेलर असावेतच ह्या मताचा!

सुबोध खरे's picture

28 May 2014 - 2:34 pm | सुबोध खरे

विनायक प्रभू यांनी बरेच लेख मिसळपाव वर लिहिलेले आहेत आपण त्यांना track केलत तर ते आपल्याला वाचता येतील. कालपासून मी ते वाचायला सुरुवात केली आहे. त्यांच्या लेखांचा दुवा बनवून धाग्यावर तक्ता आला तर बरे होईल असे मला संपादक मंडळाला नम्रपणे सुचवावेसे वाटते.