छगनलालांचे सापळे (भाग ५)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
24 Aug 2013 - 9:14 am

आधीचा भाग :http://www.misalpav.com/node/22197

त्या दिवशी मी जरा उशीराच कामावर गेलो होतो.आज काय काम करायचे त्याची योजना कालच तयार करून ठेवली होती.अशोकला रात्रीच कामाची कल्पना देवून ठेवली होती.तसा आमच्याकडे स्टाफ कमीच होता.बॉक्सेस आणि पी.सी.बी. आणि इतर इलेक्टॉनिक्स आयटेम आम्ही बाहेरून मागवत होतो.(लंगड्या घोड्यांकडून).

("लंगडे घोडे" ही औद्योगिक क्षेत्रातील एक वेगळीच जमात आहे.घोडा नाठाळ असेल तर त्याला एक लोढणे बांधतात.त्यामुळे घोडा जास्त जोरात धावु शकत नाही.साहेब मात्र आपल्या घोड्याचा एक पाय कापत होता.
प्रत्येक कं.च्या आधाराखाली इतरही काही कं. वाढत असतात.ह्या कं. शक्यतो सप्लायर असतात.साहेबाने असे ३/४ सप्लायर बांधून ठेवले होते.त्यांचे पेमेंट दर ठरवलेले होते आणि मुदत कागदोपत्री ९० दिवसांची होती.साहेबाने त्यांचे पैसे कधीच वेळेवर दिले नाहीत.तो सगळ्यांना २,३ आणि ४ नं.चे चेक्स देत असे. ते कधीच वटत नसत.१२० दिवस झाले की मग मात्र १ नं.चा चेक देत असे.५ महिने साहेब त्यांचे पैसे बिन व्याजी वापरत असे.पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे सप्लायर मंडळी त्यांचा बिसनेस वाढवू शकत नसत आणि त्यामुळे मिळेल त्या दराने साहेबाशी व्यवहार करत.)

तर अशा लंगड्या घोड्यांकडून बरेचसे सामान येत होते. त्यामुळे असेम्बींग साठी ४ माणसे आणि टेस्टींग साठी २ माणसे (मी आणि अशोक) असा आमचा ६ माणसांचाच स्टाफ होता.कायद्याप्रमाणे आम्हाला युनियन बांधता येत न्हवती. ७ पेक्षा जास्त माणसे असतील तरच युनियन बांधता येत होती.कायद्यातील प्रत्येक वाक्याचा अर्थ आपल्या मनाप्रमाणे लावण्यात साहेब हुषार होता.

वेळप्रसंगी आम्ही सगळेच जण आपापली कामे वाटून घेत होतो आणि इतरही कामे करत होतो.(चहा करण्या पासून ते झाडू मारण्या पर्यंत..)

स.९ ते सं.६ असे ऑफीसचे टायमिंग होते.मी ८:४५ लाच ऑफीसला पोहोचत होतो.सगळ्या किल्ल्या माझ्याकडे आणि अशोक कडे होत्या.त्यासुमारास मोबाईल नुकताच बाजारात आला होता. इनकमिंग कॉलला देखील पैसे पडत होते.येत्या एक दोन महिन्यांत आम्हाला पण मोबाईल मिळेल अशी आवई पण उठली होती.त्यादिवशी माझ्याकडे मोबाईल न्हवता.जवळ १० वा. मी ओफीस मध्ये पोहोचलो.नेहमी प्रमाणे लेथ मशिनवर नजर टाकली.विवेकचे काम सुरु झाले होते.असेम्ब्ली लाईन वर प्रकाश आणि विजय पी.सी.बी. आणि काँपोनंटसशी झटापट करत होते तर महेश आज फाइल्स धुंडाळत बसला होता.अशोक कुठेच दिसत न्हवता.मी सहज म्हणून साहेबाच्या केबिन मध्ये नजर टाकली तर...

साहेब येवून बसलेले होते.ऐन वेळी माझ्या नशिबाने खेळ दाखवले....

आता जे होईल ते बघू, ह्या विचारात मी माझ्या टेबलावर येवून बसलो.अपेक्षेप्रमाणे २/३ मिनिटातच साहेबाचे बोलावणे आलेच.केबिनमध्ये गेलो तर साहेबाने हसून स्वागत केले.गेल्या महिन्याभराचा सगळा रिपोर्ट त्याच्या हातात होता.सरासरी आम्ही दिवसाला १० मशिन तयार करायला हवी होती. आणि आम्ही ११ ते १२ मशिन करून देत होतो.

(खरे तर आम्ही १६ मशिन पण बनवू शकलो असतो.अशोकचे पण म्हणणे असेच होते पण मीच मोडता घातला.एकदा १५च्या वर गेलो की साहेब २०चे टार्गेट ठेवायला कमी करणार नाही आणि मग आपल्याला १ ते २ तास फावला वेळ मिळणार नाही.मी जेवायला घरीच जात असे.जेवून झोपून मग २ ते २:३० पर्यंत कामावर येत असे. ३ ते ४ मी आणि अशोक उद्याच्या कामाची तयारी करत असू. ४ वा. अशोक घरी जायला निघत असे.वेळ-काळ बघून आमचे इतर सहकारी (मी त्यांना कधीच कामगार म्हणून वागवले नाही) दुपारी १२ ते २ सुट्टी घेत.साहेबाचा वाण नाही तर गूण आम्हाला पण लागला होता.

माझ्या आणि अशोकच्या प्रगतीवर साहेब खूष झाला होता.जवळ जवळ ६० ते ७० मशिन्स तयार होती आणि अजून १२० मशिन्सची ऑर्डर त्याच्या कडे होती.मार्केटची भूक ४०० ते ५०० होती आणि आता तर ती वाढतच जाणार होती.महाराष्ट्र आणि गुजरात मधील कारभाराची कुणकुण इतर राज्यात पण पसरली होती.साहेबाने इतर राज्यांत पण जाळे विणून ठेवले होतेच.गळाला एक मोठे राज्य लागले होतेच आणि एक छोटा मासा स्वतःहून तयार झाला होता.

वाङ्मयकथाप्रतिभा

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

24 Aug 2013 - 4:48 pm | अनिरुद्ध प

सगळे भाग आजच एकापाठोपाठ वाचले चान्गले जमले आहे पु भा प्र.

लिंक लागायला जरा वेळ लागला,पण मग एकदम समजल.
मस्तु!

श्रीरंग_जोशी's picture

24 Aug 2013 - 8:48 pm | श्रीरंग_जोशी

साडेतेरा महिन्यांची प्रतिक्षा फळाला आली :-).

कथानकाच्या पुढील घटनाक्रमासाठी वातावरणनिर्मिती परिणामकारकपणे झाली आहे.

पुढील भागांची उत्कंठा वाढलेली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2013 - 8:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

सगळे भाग आजच वाचले. मस्त आहेत. पुढचे भाग भरभर टाका.

पैसा's picture

25 Aug 2013 - 4:10 pm | पैसा

आधीचा भाग परत एकदा वाचला, मग परत लिंक जुळली. पुढचा भाग लवकर येऊ द्या. हा भागही मस्त जमला आहे. मधे गॅप पडल्यासारखे वाटत नाहीये!

होबासराव's picture

29 Aug 2013 - 2:39 pm | होबासराव

पुढिल भागाची वाट पाहतोय......

अमित खोजे's picture

7 Mar 2014 - 3:30 am | अमित खोजे

पुढचा भाग येतोय का? वाट पाहतोय

हेच मंतो , पुढचा भाग कदी ?

योगी९००'s picture

7 Mar 2014 - 9:49 am | योगी९००

सगळे भाग आजच एकापाठोपाठ वाचले....बर्‍याच दिवसांनी अशा तर्‍हेची कथा वाचायला मिळाली...

आवडेश...

पुढील भाग लवकर येऊ द्या...

आतिवास's picture

7 Mar 2014 - 11:30 am | आतिवास

ही लेखमाला होती? ;-)
बरं, आता आधीचे भाग वाचते.
हा भाग वाचला, आवडला. पण प्रत्यक्षात या भागात काही घडलं नाही असं जाणवलं. कदाचित आधीचे भाग वाचल्यावर समजेल काय घडतंय ते!

प्रमोद देर्देकर's picture

7 Mar 2014 - 11:44 am | प्रमोद देर्देकर

ओ मु.वि साहेब मस्त लिहताय की. सगळे भाग एका दमात वाचुन संपवले . तब्बल ४ महिने झाले की शेवटाचा भाग येवुन. आता लवकर पुढचा भाग येवुद्या. उत्सुकता लागुन राहिली आहे.

आत्मशून्य's picture

7 Mar 2014 - 12:49 pm | आत्मशून्य

थांबवु नका.

मुक्त विहारि's picture

15 Mar 2014 - 11:35 pm | मुक्त विहारि

तुमच्या सल्ल्याची मला गरज नाही....

ते फार चांगले लक्षण नाही. उठसुठ "मी, माझा, माझे" असे स्वतःचा उल्लेख असलेले धागे काढणे अथवा काढायला लावणेपेक्षा तुमचा अनूल्लेख असलेले तुमचे धागे अतिशय सुरेख आहेत. तुम्ही स्वतःला जितके अनुल्लेखाने माराल तिक्तके तुमचे लिखाण सकस होत जाइल याची खात्री आहे.

मुक्त विहारि's picture

15 Mar 2014 - 11:54 pm | मुक्त विहारि

मी तुमच्या साठी लिहीत नाही...

तुम्हाला काय योग्य वाटते आणि काय नाही, ह्याच्याशी मला काही घेणे देणे नाही....

जोपर्यंत संपादक मंडळींना माझ्या लिखाणाविषयी आक्षेप नाही, तोपर्यंत मी लिहाणार.

मी तुमच्या साठी लिहीत नाही...

सर असेच म्हणायचे.

तुम्हाला काय योग्य वाटते आणि काय नाही, ह्याच्याशी मला काही घेणे देणे नाही....

कुणी काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त आपलं एक निरीक्षण नोंदवले.

जोपर्यंत संपादक मंडळींना माझ्या लिखाणाविषयी आक्षेप नाही, तोपर्यंत मी लिहाणार.

आपले लिखाण उत्तरोतर सकस होत जावो व दुधो, भलो, फुलो न्हावो, हीच इश्वरचरणी प्रार्थना.

"सर असेच म्हणायचे."

कुठले सर? त्यांचा आणि माझा काय संबंध?

"कुणी काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त आपलं एक निरीक्षण नोंदवले."

तुमचे निरीक्षण तुमच्या पाशी, आमचे लेखन आमच्यापाशी.....तुमच्या निरीक्षणाशी मला काही घेणेदेणे नाही.......

"आपले लिखाण उत्तरोतर सकस होत जावो व दुधो, भलो, फुलो न्हावो, हीच इश्वरचरणी प्रार्थना."

तुमच्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद....

आत्मशून्य's picture

16 Mar 2014 - 12:14 am | आत्मशून्य

तुमच्या निरीक्षणाशी मला काही घेणेदेणे नाही.......

मग त्याला प्रतिसाद प्रपंच का करताय ?

कुठले सर? त्यांचा आणि माझा काय संबंध?

तुमची आणी त्यांची "प्रतिसादात्मक वागणुक" एकसमान आहे हे सोडले तर इतर कोणताही संबंध मी तरी जोडणार नाही.

योग्य बोललात....

मी थांबतो....

बास करा.

मुक्त विहारि's picture

16 Mar 2014 - 12:28 am | मुक्त विहारि

मग कशाला उगाच माझा शिक्षक व्हायचा प्रयत्न करत आहात?

मग कशाला उगाच माझा शिक्षक व्हायचा प्रयत्न करत आहात?

कारण मी जे सांगतोय ते तुम्ही "योग्य" असे बोलताय व ते अनुसरत आहात असे लिहताय म्हणून. थोडक्यात आपणच माझे विद्यार्थी बनायची हौस सोडा मे तुमचा कधीच शीक्षकशीन्हवतो हे आपोआप उमजेल.

मुक्त विहारि's picture

16 Mar 2014 - 12:34 am | मुक्त विहारि

तुमच्यापेक्षा बरेच थोर लोक इथे आहेत.

तुमच्यापेक्षा बरेच थोर लोक इथे आहेत.....

म्हणून आम्हाला पण मिपा आवडते....

आत्मशून्य's picture

16 Mar 2014 - 12:51 am | आत्मशून्य

आणी हे फार चांगले लक्षण आहे.

आत्मशून्य's picture

16 Mar 2014 - 12:53 am | आत्मशून्य

आता थांबणार की... अजुन काही लिहायचे आहे ?

मग आता जर मन हलके जाहले असेल तर आपणास पुन्हा सांगतो तुम्हाला मिपा कोणत्याही कारणाने आवडो, तुमी जो पर्यंत स्वतःला अनुल्लेखाने मारणार नाही तो पर्यंत तुम्हाला सकस लिखाण कधीही करता येणार नाही.