थोडी प्रस्तावना:
बर्याच वर्षांनी हिंदी मध्ये काहीतरी सुचले (असं फार क्वचितचं होतं).
म्हटलं इथे प्रकाशित करावे पण मग विचार केला हे बरोबर नाही. मिपा हे मराठी भाषेला वाहिलेले जास्वंदी फुल आहे.
मग याच रचनेचा मराठीत अनुवाद केला. मला स्वतःला फारसा भावला नाही पण पहिला प्रयत्न म्हणून चालु शकेल असे वाटले.
खरंतर अनुवाद किंवा भावानुवाद हा माझा प्रांतच नाही. त्यातल्या त्यात इतर कोणाही कवीची रचना असेल तर काही खरं नाही.
हिंदीतली रचनाही माझीच असल्याने हिंमत करतोय.
ठहरे हुए पानी कि तरह
जिंदगी जम चुकी है अब
.
शाखसे लटके हुए पत्ते कि तरह
सासे अटकीसी रहती है
.
खिडकीसे बाहर बरसता हुआ पानी
कुछ लम्होंकी यादसी लाता है
खाली आसमांसा दिन गुजरता जाता है
.
शाम और दिन जब
तेरे होठोंकी तरह एक दुसरेसे
अलग होते है तब
दिल के खाली खालीसे कमरोंमे
जाने क्यु एक बेचैनीसी गुंजती रहती है
.
उपरी झरोकोंसे तिमतिमाते
इन कमरोंमें चांद उतरता है तो
रातके आने का एहसास
उभरता है
.
बस रात और चांद
दोनोंकी यही साजिश है
जो मेरे खिलाफ
इन दोनोंने चलायी है
.
बस्स....ठहरे हुए पानी कि तरह
जिंदगी जम चुकी है अब
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२२/०६/२०१३)
एकाकी तळ्यावर साचलेल्या
शेवाळासारखे जगणे घट्ट झाले आहे आता
.
पिवळे पडलेले जर्जर पान
जसे फांदीला लटकत अडकुन राहते
तसे काही श्वास अडकले आहेत
छातीतचं
.
उलटून गेलेल्या काही क्षणांच्या आठवणी
खिडकीसमोर बरणार्या पावसाने जाग्या होतायत
पण ते क्षण सरत नाहीत
.
रिकाम्या रिकाम्या फट्ट पांढर्या
नभासारखे दिवस सरकत जातात
.
संधीकाल जेव्हा दिवस अन् रात्र
यांना अलग करतो
तेव्हा अगदी थेट
तुझे ओलसर गुलाबी ओठ
अलगद एकमेकांपासून विलग होण्याचा
भास होतो
.
कां कुणास ठाऊक, पण
हृदयाच्या निर्वात कप्प्यांमध्ये
एक किर्र शांतता घुमत राहते
.
या कप्प्यांच्या वरच्या कोपर्यातल्या
झापांमधुन लुकलुकता
चांद्रप्रकाश पाझरतो तेव्हा
कुठे रात्र झाल्याचा अदमास येतो
.
ह्याच रात्रिने आणि चांद्रप्रकाशाने
माझ्या विरुद्ध चालवलेले हे
कारस्थान आहे
.
बस्स...
एकाकी तळ्यावर साचलेल्या
शेवाळासारखे जगणे घट्ट झाले आहे आता
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०९/०७/२०१३)
प्रतिक्रिया
10 Jul 2013 - 8:23 am | संजय क्षीरसागर
मस्त.
10 Jul 2013 - 9:40 am | सुधीर
हिंदी कविता जास्त आवडली. पण मराठीही चांगली जमली आहे.
10 Jul 2013 - 9:51 am | किसन शिंदे
मुळ रचनाच आधी वाचली होतीच आत्ता पुन्हा वाचली आणि पहिल्यापेक्षाही जास्त आवडली.
10 Jul 2013 - 9:55 am | मदनबाण
छान...
10 Jul 2013 - 10:10 am | गवि
मिका. जमलीय रे.. घट्ट होऊन साचलेला किंवा साचून घट्ट झालेला क्षण / मूड मस्त पकडला आहेस.
10 Jul 2013 - 10:14 am | चाणक्य
तुला न विचारता हे केलं म्हणून सर्वप्रथम तुझी माफी मागतो. प्रतिसाद लिहायला घेतला आणि या ओळी सुचत गेल्या. तुझ्या रचनेचा हा मराठी भावानुवाद गजलेच्या स्वरूपात. थोडं स्वातंत्र्य घेउन एक शेर वाढवला कारण गजलेत किमान ५ शेर लागतात. पण तुझ्या रचनेतल्या भावनेशी प्रामाणिक रहायचा प्रयत्न केला आहे...
प्रकार:- गजल
रदीफ:- आहे
अलामत:- अ
निश्चल पाण्यासारखे, आयुष्य ईथे थांबले आहे
गंजल्या पानापरी काही, उरात माझ्या अडकले आहे
कोसळताना तो बाहेर, आत काही चिंब आहे
निथळत्या काळजासंगे, आयुष्य एकटे चालले आहे
आत्ताच का आठवावी, थरथर तुझ्या ओठांची
संधीकालाने या तुझे, विभ्रम काही चोरले आहे(त)
झापांमधूनी या रात्री, चंद्र अलवार झिरपतो आहे
संगनमताने दोघांचे हे, कारस्थान चालले आहे
उद्या पुन्हा तोच सूर्य, उद्या पुन्हा तोच खेळ
तू गेलीस जिथून माझे, जगणे तिथेच थांबले आहे....
निश्चल पाण्यासारखे, आयुष्य ईथे थांबले आहे......
मिका, खरच सांगतो, नाही आवडलं तर सरळ प्रतिसाद उडवायला सांगितलास तरी चालेल.
10 Jul 2013 - 1:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हाच सार आहे त्या रचनेचा, मला तीच गोष्ट सांगायला इतके शब्द लागले, तुम्ही दोन ओळीत मांडलात.
__/\__!!
10 Jul 2013 - 10:21 am | चाणक्य
हिंदी रचनेवर गुलजार चा प्रभाव जाणवतोय. चु.भु.द्या.घ्या.
10 Jul 2013 - 10:34 am | किसन शिंदे
:)
त्यापेक्षा गुलजारच त्याच्या खर्जातल्या आवाजात हि रचना बोलतोय असं इमॅजिन करत वाचा.
10 Jul 2013 - 10:57 am | निनाव
मी. का. : १ नंबर लिहिले आहे. सुधीर जी प्रमाणे हिंदी कविता जास्त आवडली.
चाणक्य ह्यांनी केलेले बदल देखील आवडले.
10 Jul 2013 - 11:14 am | दिपक.कुवेत
हिंदी कविता जास्त भावली. मराठि अनुवाद आणि चाणक्य ह्यांनी केलेली गजलहि छान.
10 Jul 2013 - 11:23 am | वेल्लाभट
गुड वन ! खरच मस्त आहे!
10 Jul 2013 - 11:26 am | मदनबाण
उद्या पुन्हा तोच सूर्य, उद्या पुन्हा तोच खेळ
तू गेलीस जिथून माझे, जगणे तिथेच थांबले आहे....
चाणाक्या हे मस्तच रे...
10 Jul 2013 - 3:24 pm | प्यारे१
मस्तच.
चाणक्य पण भारीच.
10 Jul 2013 - 3:30 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त...मस्त...!!!
10 Jul 2013 - 3:33 pm | स्पा
मिका , चाणक्य
__/\__
साष्टांग :)
कसं काय सुचत हे असलं म्हणतों मी :)
तुफान शेर !!!
10 Jul 2013 - 4:23 pm | Bhagwanta Wayal
वा ! दोन्हीही कविता आवड्ल्या.
10 Jul 2013 - 4:33 pm | बॅटमॅन
हिंदी रचनाच जास्त भारीये!!!!!!! अन किती भारीये ते सांगायला आमच्या श्लोकजिलब्या असमर्थ आहेत.
10 Jul 2013 - 5:35 pm | अभ्या..
हमना मराठीच आवड्या.
मिकामिया बहुतही आला लिखा है आपने.
शुक्रीया
10 Jul 2013 - 11:37 pm | कवितानागेश
feast! :)
11 Jul 2013 - 12:06 am | रेवती
हिंदीतले काव्य मूळ असल्याने जास्त आवडले. याचे गाणे तयार व्हायला हरकत नाही. संगीतकारही तेवढ्या तरल मनाचा असायला हवा तरच मूड पकडता येईल.
इजाजत शिनेमातील गाण्यांची आठवण झाली.
12 Jul 2013 - 10:01 am | अनिदेश
मस्तच रे...!!!!
12 Jul 2013 - 10:15 am | उगा काहितरीच
___/\___
12 Jul 2013 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
और भी आने दो....!
-दिलीप बिरुटे
12 Jul 2013 - 3:55 pm | अनुरोध
तसा मि मिसळपाव वर वाचन मात्र सदस्य असुन कविता या प्रांताच्या फारसा वाटेल जात नाहि. झेपेल कि नाहि हि भिति तर वटतेच पन खरा सांगयच तर ले़ख वाचायलाच वेळ पुरत नहि हो....
पण आज तुमच्या कवितेचे shishrak ( हे मराठी नाहि जमते... ष वर रफार नाहि हो देता येत आहे... ) वाचले आणि ओढला गेलो.
किसन रावानी म्हटल्या प्रमाणे गुलजार च्या खर्जातल्या आवाजात इमॅजिन करत वाचत होतो खाली हि कॉमेंट वाचुन अजुन आनंद वाटला.
मुळ कविता फारच आवडली.... Smile आणि गुलजार च्या आवाजात इमॅजिन करत अजुनच मजा आली.
आपला अनुवाद हा मल शब्दशहा अनुवाद वाटला त्यामुळे त्यातल्या 'भाव' थोडा कमी उतरला आहे असे वाटले....
तर चाणक्य यांनी तोच भाव सुंन्दर पकडल्यामुळे ती कविता देखिल कमाल सुंन्दर झाली आहे.... अप्रतिमच.... Smile
-----------------------------------
बाकी आवांतर.....
१:- 'फट्ट पांढर्या ' म्हंजे काय रे....
२:- अरे ते as a उपमा भाव म्हणुन वापरत असतात रे....
कवि:- अरे मोकळ्या आभाळाला कवि 'फट्ट पांढरे' म्हणतो आहे रे....
हा देउळ चित्रपटातला संवाद आठवला.... Wink
12 Jul 2013 - 3:57 pm | बॅटमॅन
प्रतिसाद आवडला.
अवांतरः shIrShak असे टाईप करा मग "शीर्षक" मिळेल.