तू

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
29 Apr 2013 - 12:11 am

ओठांवर चिकटलेल्या मधाच्या
थेंबासारखी तू
.
पापण्यांच्या काठावर तरळणार्‍या
पाण्यासारखी तू
.

पहाटेच्या वेळी झाडावरुन घरंगळलेल्या
प्राजक्तासारखी तू
.
कमळाच्या पानावरुन नुकतेच गळालेल्या
दवथेंबासारखी तू
.
हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली
थरथरणार्‍या मांजराच्या पिलासारखी तू
.
टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून
वाहणार्‍या थंड वार्‍याच्या झुळकीसारखी तू
.
सूर्यास्ताच्या वेळी सागराच्या त्या दुसर्‍या टोकावर
दिसणार्‍या परिघरेघेसारखी तू
.
मनातल्या शेवटच्या कप्प्यातल्या लपवलेल्या
सोनगुपितासारखी तू
....
तू, तू आणि तू
...
सांग गं सखे, हो तूच
तू कुठे नाहीस?

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२८/०४/२०१३)

कविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

29 Apr 2013 - 3:02 am | किसन शिंदे

क्या बात!

'तिला' दिलेली प्राजक्ताची उपमा जास्त आवडली.

नीलकांत's picture

29 Apr 2013 - 3:12 am | नीलकांत

मस्त कविता

धमाल मुलगा's picture

29 Apr 2013 - 3:19 am | धमाल मुलगा

मिका काय ऐकत नाय बॉ! जोरात आहे एकदम.
बाकी, ह्या कवितेवरुन हरीहरननं गायलेलं केदार भागवतच्या 'सोनसडे' मधलं हे गाणं आठवलं बघ एकदम!

चाणक्य's picture

29 Apr 2013 - 3:19 am | चाणक्य

केल्यासारखी वाटली.... का कुणास ठाउक

अभ्या..'s picture

29 Apr 2013 - 3:26 am | अभ्या..

जर्राशी :(
तरीपण आवडली. :)

चाणक्य's picture

29 Apr 2013 - 3:52 am | चाणक्य

.

जेनी...'s picture

29 Apr 2013 - 3:57 am | जेनी...

:)

शुचि's picture

29 Apr 2013 - 6:47 am | शुचि

ओके!!

इन्दुसुता's picture

29 Apr 2013 - 8:14 am | इन्दुसुता

खूप आवडली.

प्यारे१'s picture

29 Apr 2013 - 2:08 pm | प्यारे१

आवडली आहेच्च! ;)

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 2:58 pm | विसोबा खेचर

>>सूर्यास्ताच्या वेळी सागराच्या त्या दुसर्‍या टोकावर
दिसणार्‍या परिघरेघेसारखी तू

वा..!

प्रीत-मोहर's picture

29 Apr 2013 - 3:26 pm | प्रीत-मोहर

मस्त !!!!

प्रीत-मोहर's picture

29 Apr 2013 - 3:29 pm | प्रीत-मोहर

पहिल्यांदाच अनुभवलेल्या सोनचाफ्याच्या सुगंधासारखी तू.

अनिदेश's picture

29 Apr 2013 - 5:29 pm | अनिदेश

सूर्यास्ताच्या वेळी सागराच्या त्या दुसर्‍या टोकावर
दिसणार्‍या परिघरेघेसारखी तू

खुप छान !