आजही माझा तिचे शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न चालू होता
अगदी नेहमीसारखेच
आजही मी तसाच भांबावून नि:शब्द होतो
अगदी नेहमीसारखेच
कोणी किती गहरे असावे?
किती अलंकार शोधावे उपमांसाठी
किती वृत्ते धुंडाळावी लयीसाठी
कुठून आणावे रंग तुझे भाव रंगवण्यासाठी
कसे जमवावे शब्द तुला मांडण्यासाठी
न कळे हे नेमके माझेचं असे कां व्हावे?
दरवेळेस मी इरेला येतो
तुला कागदावर उतरवायला सरसावतो
लेखणीतून झरझरून हळवे शब्द पाझरतात
क्षणाक्षणाला मी तुझे शब्दचित्र पूर्णत्वाकडे घेऊन जातो
मनाचे समाधान होईतो रेखाटून घेतो
अन् परत एकदा खात्री करण्यास तुझ्या डोळ्यात पाहतो
नेहमीसारखेच
.
.
आता पुन्हा मी भांबावलेला
पुन्हा नि:शब्द
नाही नाही म्हणता,
तुझ्या डोळ्यातील काही छटा परत निसटल्याच
हम्म... हे ही नेहमीसारखेच
अगदी नेहमीसारखेच
|-मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१४/०२/२०१३)
प्रतिक्रिया
14 Feb 2013 - 4:40 pm | इनिगोय
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे :)
14 Feb 2013 - 10:57 pm | किसन शिंदे
+१
असेच म्हणतो.
14 Feb 2013 - 7:15 pm | तिमा
पण मिका, नेहमीसारखी मजा आली नाही. कदाचित माझंच वय झालंय म्हणून असेल.
14 Feb 2013 - 7:27 pm | अभ्या..
मला आवडली रे मिका. एकदम जमलीय.
माझ्यासाठी
हे तर नेहमीचेच :(
बहुतेक आजचा दिवस पण निसटतोय. :(
14 Feb 2013 - 9:31 pm | जेनी...
:(
अब्या माझ्या या स्मायलीनं गैरसमज नको करुन घ्यु बर्का :-/
:P :D
14 Feb 2013 - 9:22 pm | क्रान्ति
आवडली कविता.
थोडा वेगळा अर्थ असला तरी हे आठवलं. :)
14 Feb 2013 - 9:34 pm | जेनी...
आय डोन्नो ... बट
मिका ही कविता आणि घर दोन्हिहि नाहि जमल्या :(
कदाचित मी तुमच्याकडुन आणखी खुप अपेक्षा ठेवुन असेल कदाचित ..
पण क्रांति आणि मिका म्हटलं कि माझ्याकडुन आपोआप वाचलं जातं
सो खरी प्रतिक्रिया द्यायला मनापासुन आवडतं ... राग आला असेल त रागावुन
आणखी काहितरि चटपटित वाचायला द्या ... :-/
14 Feb 2013 - 9:55 pm | अभ्या..
क्रांती आणि मिका यांच्या कविता अप्रतिम असतातच. अपेक्षा पण असणारच पूजा, पण
एखादे चित्र आणि ते पण प्रत्यक्षातले, मनातले आणि उतरवलेले या प्रवासातली विफलता मला तर जाणवली.
ते चित्र शब्दात असो की रंगात, आशय अनुभवल्यानं भिडला मनाला. एवढंच.
बाकी तुला चटपटीत वाचायला भरपूर खाद्य आलय बघ सध्या नवीन नवीन. ;)
14 Feb 2013 - 10:03 pm | जेनी...
अब्या तुला भिडणारच ..
तु त्यात तुझी चित्रकला डोळ्यासमोर धरुन त्यात रंग भरत गेलास ...
पण मला चित्र काढता येत नैत ना :-/
15 Feb 2013 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा
हम्म... हे ही नेहमीसारखेच
अगदी नेहमीसारखेच >>>
15 Feb 2013 - 6:49 am | स्पंदना
सापडुन ही न सापडल्यासारखी, मनात उतरुनही समाधान न देणारी
वाटे काटे असतानाही साथ देणारी, फुलामुलांच्या संगती साद देणारी
अशी अचानक फुलत जाते, जशी पावशी(पावसात) वेल न्हाती
रुक्षपणीही, तशीच ताजी जखमांची साथी
का गे कविते तु न रहाशी सदा शेजारी
भटकत जाते, कडी कपारी, कधी बाजारी.
15 Feb 2013 - 11:43 am | फिझा
कविता आवडली !! शेवटचे कडवे विशेष छान आहे .....पण व्हेलेन्ताइन डे साठी कविता लिहिण्याचा हा अट्टाहास आहे का....
किंवा तशी डिमांड होती का म्हणे !!!!
15 Feb 2013 - 11:57 am | उर्जिता
मस्त.. छान, विशेषतः
अन् परत एकदा खात्री करण्यास तुझ्या डोळ्यात पाहतो..
ही ओळ आवडली..
15 Feb 2013 - 11:57 am | उर्जिता
मस्त.. छान, विशेषतः
अन् परत एकदा खात्री करण्यास तुझ्या डोळ्यात पाहतो..
ही ओळ आवडली..