वास्तवदर्शी चित्रपट - चित्रपटांविषयी-३

ग्रंथपाल's picture
ग्रंथपाल in पुस्तक पान
8 Aug 2012 - 5:31 pm

१९५९
कागज के फूल
निर्माता - गुरूदत्त
संगीत - एस.डी.बर्मन
दिग्दर्शक - गुरूदत्त
कलाकार - गुरूदत्त, वहिदा रहमान, जॉनी वॉकर, बेबी नाझ, महेश कौल, वीना, मीनू मुमताज.
कथानक सारांश - एका चित्रपट दिग्दर्शकाच्या शोकांतिकेचे दर्शन. वैवाहिक जीवन विस्कळीत असलेला एक दिग्दर्शक एका नव्या नयिकेला प्रकाशात आणतो, तिच्या प्रेमात पडतो. पुढे त्याची वाताहात होते. अखेर एक्स्ट्रॉ म्हणून काम करण्याची वेळ त्याच्यावर येते.


__________________________________________________

१९६०
अनुराधा
निर्मिती -एल.बी.फिल्म्स
दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी
संगीत - रवि शंकर
कलाकार - बलराज साहनी, लीला नायडू, अभि भट्टाचार्य, नजीर हुसैन.
कथानक सारांश - मर्यादित अर्थाने गुस्ताँव फ्लॉबेर यांच्या 'मादाम बोव्हरी'चे भारतीय संदर्भातील रूप. ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणारा व रुग्ण्सेवेने झपाटलेला व्रत म्हणून व्यवसाय अंगिकारलेला एक डॉक्टर. घरी कंटाळलेली, नवर्याच्या सहवासासाठी आसुसलेली त्याची शहरी पत्नी. अशा वेळी एका 'अपघातामुळे' तिचा जुना प्रियकर घरी दाखल होतो व डॉक्टरच्या संसारात वादळ निर्माण होते.


__________________________________________________

१९६१
काबुलीवाला
निर्मिती - बिमल रॉय प्रॉडक्शन
दिग्दर्शक - हेमेन गुप्ता
संगीत - सलिल चौधरी
कलाकार - बलराज सहानी, उषा किरण, सोनू, अमित सेन.
कथानक सारांश - काबुलहून कलकत्त्याला येऊन राहिलेल्या व सुकामेवा विकणार्या एका पठाणाची कथा. एका लहान मुलीकडे - मिनीकडे पाहून त्याला नेहेमी आपल्या काबूलमधील मुलीची आठवण येते. तिच्याशी त्याची छान मैत्री होते. तो स्वदेशी परत निघणार, त्याच सुमाराला त्याच्या हातून रागाच्या भरात त्याच्या एका अप्रमाणिक गिर्हाईकाचा खून होतो व पठाणाला जन्मठेपेची शिक्षा होते. त्याला कलकत्त्यात तुरूंगवास होतो. बाहेर आल्यावर त्याला ती मुलगी मोठी झाल्याचे दिसते. मात्र ती त्याला ओळखत नाही. आपली मुलगीही आपल्याला विसरली असेल असे वाटून तो दु:खी होतो.
(रवींद्रनाथ टागोरांच्या प्रसिध्द कथेवर आधारीत)


__________________________________________________

१९६२
साहिब बीवी और गुलाम
निर्माता - गुरूदत्त
दिग्दर्शक - अब्रार अल्वी
कलाकार - मीना कुमारी, गुरूदत्त, रहमान, सप्रू, धुमाळ, नजीर हुसैन, एस्.एन.बॅनर्जी, कृष्ण धवन, जवाहर कौल, बिक्रम कपूर.
कथानक सारांश - नोकरीच्या शोधात कलकत्त्यात आलेल्या भूतनाथ या मध्यमवर्गीय परंतू सुशिक्षित तरूणाच्या नजरेतून सांगितलेली एका पतनोन्मुख जमीनदार घराण्याची १९ व्या शतकातील कथा. जमीनदाराची पत्नी छोटी बहू हिच्याबद्दल त्याला सुप्त आकर्षण वाटते. तिचा नवरा मात्र मद्य आणि मर्तिका यांच्यात रमलेला असतो. जमीनदार घराण्याचे पतन सुरू होते व छोटी बहू दारूच्या आहारी जाते. जमीनदारांच्या पतनाची कथा सांगणारा चित्रपट.
(विमल मित्र यांच्या कादंबरीवर आधारीत)

___________________________________________________

१९६३
शहर और सपना
निर्मिती - नया संसार प्रॉडक्शन
दिग्दर्शक - के.ए.अब्बास
संगीत - जे.पी.कौशीक
कलाकार -दिलीप राज, सुरेखा, नाना पळशीकर, मनमोहन कृष्ण, डेव्हिड, अन्वर, असित सेन, जगदीश कमाल, रशीद खान, रविकांत.
कथानक सारांश - झोपडपट्टीतील जीवनावर कथा. पंजाबमधील ग्रामीण भागातील एक तरूण मुंबईत येतो. मुंबईत नोकरीपेक्षा घर मिळवणं अधिक कठीण आहे हे त्याच्या लक्षात येतं. अखेर तो पत्नीसोबत एका मोठ्या, वापरात नसलेल्या पाईपलाईनमध्ये राहू लागतो. तिथेच ती मुलाला जन्म देते. झोपडपट्टीच्या जागेवर नजर असणारे बिल्डर, झोपडपट्टीतील जीवन यांचेही या निमित्ताने चित्रण.

* दुर्दैवाने या चित्रपटाची प्रकाशचित्रे आंतर्जालावर उपलब्ध नाहीत.
*** फोटो आंतर्जालावरुन साभार****

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

9 Aug 2012 - 8:58 am | शिल्पा ब

ओळख परेड आवडली. मी यातले कुठलेच सिनेमे अजुन पाहीले नाहीत पण खुप ऐकलंय. आता हळुहळु पाहेन. शहर और सपना बद्दल नवीनच समजलं.

यातला काबुलीवाला एकदा बघितला होता. छान पिक्चर आहे :)

पैसा's picture

14 Aug 2012 - 7:27 pm | पैसा

काबुलीवाला मध्ये "ऐ मेरे प्यारे वतन" आहे ना?