वास्तवदर्शी चित्रपट - चित्रपटांविषयी - २

ग्रंथपाल's picture
ग्रंथपाल in पुस्तक पान
5 Aug 2012 - 10:12 pm

१९५३
दायरा
निर्मिती - अमरोही पिक्चर्स
दिग्दर्शक - कमाल अमरोही
संगीत - जमाल सेन
कलाकार - मीना कुमारी, नासिर खान, कुमार, नाना पळशीकर.
कथानक सारांश - शीतलचे लग्न आपल्या वडिलांच्या वयाच्या एका वृध्दाशी होते. तिचे प्रेम शरण नामक युवकावर असते. या गुंत्यात सापडलेली शीतल अखेर आत्महत्या करते.

_________________________________________________

१९५४
बूटपॉलिश
निर्मिती - आर.के.फिल्म्स
दिग्दर्शक - प्रकाश अरोरा
संगीत -शंकर जयकिशन
कलाकार - बेबी नाझ, रतन कुमार, डेव्हिड, चांद बर्क, वीरा, शैलेंद्र, भुपेंद्र कपूर, भुदो अडवाणी, प्रभू अरोरा, राज कपूर.
कथानक सारांश - हि दोन अनाथ मुलांची कथा आहे. भोला आणि बेलू या दोन मुलांना जबरदस्तीने भिकारी बनविले जाते. त्यास जबाबदार असते त्यांची क्रूर कमला काकू. मात्र अंकल जॉन हा लंगडा सदगृहस्थ या मुलांना भिक मागणे सोडून बूटपॉलिश करण्याचा स्वाभिमानाचा मार्ग दाखवतो. 'डिसिका प्रेरित नव वास्तववाद.


_________________________________________________

१९५५
सीमा
निर्मिती - मार्स अँड मूव्हीज प्रॉडक्शन
दिग्दर्शक - अमिया चक्रवर्ती
कलाकार - नूतन, बलराज सहानी, शुभा खोटे, सुंदर, प्रतिमा देवी, शिवराज, कृष्णकांत, परवीन पॉल, दुबे.
कथानक सारांश - गौरी हि अनाथ मुलगी काका-काकूकडे राहते. धुणी-भांडी करून काका-काकूचे घर चालवते. पण काकू तिला खुप त्रास देते. तिच्यावर डोळा ठेवणारा मवाली, ती वश होत नाही म्हणून तिच्यावर चोरीचा आळ आणवतो. पोलीस तिची रवानगी सुधारगृहात करतात. गौरीला अन्यायाची चीड असते. सुधारगृहाच्या चालकाला गौरी गुन्हेगार नसल्याची खात्री पटते. गौरी निरपराध असल्याचे सिध्द झाल्यावर ते तिला आपल्या सहाय्यकाशी विवाह करण्याचा सल्ला देतात. मात्र माणसाची अचूक पारख करणार्‍या सुधारगृहाच्या चालकातच तिला आपला जीवनसाथी दिसतो.

_________________________________________________

१९५६
जागते रहो
निर्मिती -आर.के.फिल्म्स
दिग्दर्शक - शंभू मित्रा, अमित मित्रा
संगीत - सलील चौधरी
कलाकार - रा़ कपूर, प्रदिप कपूर, सुमित्रा देवी, स्मृती विश्वास, पहाडी सन्याल, निमो, सुलोचना चॅटर्जी, मोतीलाल, डेझी इरानी, नाना पळशीकर, इफ्तेखार, बिक्रम कपूर, मोनी चॅटर्जी, भुपेंद्र कपूर, भुदो अडवाणी, रशीद खान, प्राण, नर्गिस.
कथानक सारांश - एक तहानलेला व्याकुळ जीव, खेड्यातून कलकत्त्यात आलेला ग्रामिण तरूण रात्रभर पाण्याच्या शोधात कलकत्त्यात भरकटतो. पाण्यासाठी तो एका मोठ्या इमारतीत शिरतो. लोक 'चोर' म्हणून त्याच्या मागे लागतात. एका फ्लॅटमधून दुसर्‍या फ्लॅटमध्ये तो भटकतो व त्या प्रयत्नात बंगाली मध्यमवर्गीय जीवनाचे अनेक विनोदी आणि कारूण्यपुर्ण नमूने पुढे येतात. अखेर पहाटे त्याला एका मंदिरातल्या बागेला पाणी घालणार्‍या एका सुस्नात गृहिणीकडून पाणी मिळते.


_________________________________________________

१९५६
आवाज
निर्मिती - मेहबूब प्रॉडक्शन
दिग्दर्शक - झिया सरहद्दी
संगीत - सलील चौधरी
कलाकार - नलिनी जयवंत, उषाकिरण, राजेंद्र कुमार, सप्रू.
कथानक सारांश - रशियन विचारसरणी आणि साहित्य यांचा प्रभाव असलेला चित्रपट. एक उद्योगपती व त्याच्याकडे फोरमन म्हणून काम करणार्‍या वयस्कर माणासाची कथा. मुलीच्या लग्नासाठी फोरमन पैशाची थोडीफर तजवीज करून ठेवतो, परंतु मुलीच्या प्रियकराचे वडील मोठ्या रकमेची मागणी करतात. या धक्क्याने फोरमनचा मृत्यू होतो. त्या पश्चात संपुर्ण कुटूंबाची वाताहत व शोकांतिका होते.
_________________________________________________

१९५७
दो आँखे बारह हाथ
निर्मिती - राजकमल फिल्म्स
दिग्दर्शक - व्ही. शांताराम
संगीत - वसंत देसाई
कलाकार - व्ही. शांताराम, संध्या, उल्हास, बाबुराव पेंढारकर, बी. एम. व्यास, पॉल शर्मा, के. दाते, एस. के. सिंग
कथानक सारांश - माणूस मुळात गुन्हेगार नसतो यावर विश्वास असलेला आदिनाथ नावाचा एक पोलीस निरीक्षक खुनाचा गुन्हा असलेल्या सहा कैद्यांना घेऊन त्यांना 'माणूस' करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना गावाबाहेर नेऊन शेतीत राबवतो. 'जेलर'चा या 'मुक्त तुरूंगावर' विश्वास नसतो, परंतू अखेर आदिनाथचा विश्वास सार्थ ठरतो. मुक्त वातावरण आणि पळून जाण्याची संधी मिळूनही कैदी आदिनाथकडे परत येतात.


_________________________________________________

१९५७
मुसाफिर
निर्मिती - फिल्म गृप प्रॉडक्शन
दिग्दर्शक -हृषिकेश मुखर्जी
संगीत -सलील चौधरी
कलाकार - सुचित्रा सेन, दिलीप कुमार, किशोर कुमार, शेखर, निरूपा रॉय, उषा किरण, दुर्गा खोटे, डेव्हिड, डेझी इरानी.
कथानक सारांश - कलकत्ता शहरातील एका जुन्या घरात घडलेले अपारंपारिक कथानक. या घरात राहून गेलेल्या तीन कुटूंबाची कथा यात आहे. नवर्‍याचे व आपल्या आई-वडिलांचे संबंध सुधारावेत म्हणून प्रयत्नशील असणारी तरूणी, आपल्या वडिलांना व वहिणीला अर्थसहाय्य करण्याची धडपड करणारा एक तरूण, शेजारच्या एका तरूणावर प्रेम करणारी व लग्नाच्या रात्रीच गायब झालेली रहस्यमय तरूणी. या तीन कुटूंबातील व्यक्तींमधील एका अज्ञात संबंधावरील प्रायोगिक चित्रपट.

_________________________________________________

१९५७
प्यासा
निर्मिती -गुरूदत्त फिल्म्स
दिग्दर्शक -गुरूदत्त
संगीत -एस. डी. बर्मन
कलाकार - गुरूदत्त, माला सिन्हा, वहिदा रहमान, जॉनी वॉकर, रहमान, मेहमूद, कुमकूम, श्याम, लीला मिश्रा, माया दास, राध्येश्याम, अशिता मुझुमदार, तनवीर, मोहन सँडो.
कथानक सारांश - एका कवीची शोकांतिका. त्याची व्यवहारी प्रेयसी एका श्रीमंत प्रकाशकाशी लग्न करते. जग त्याच्या कवितांच मुल्यही ओळखत नाही. तो निराश होतो. जगाविषयी त्याच्या मनात चीड निर्माण होते. अशा स्थितीत एक वेश्या मात्र या कवीवर व त्याच्या कवितांवर प्रेम करते. एका अपघातात कवी मेला अशी जगाची समजुत होते. प्रत्यक्षात तो जिवंत असतो. त्याच्या निधनानंतर प्रकाशक त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊ इच्छितो तर वेश्येला फक्त त्याच्या कविता जगासमोर आणायच्या असतात. कवी जेव्हा स्वतःची ओळख सांगतो तेव्हा त्याच्यावर स्वार्थी जग विश्वास ठेवत नाही. त्याची साथ देते ती त्याच्यासारखीच जगाकडून तिरस्कृत, उपेक्षित झालेली वेश्या.


_________________________________________________

१९५७
नया दौर
निर्मिती -बी. आर. फिल्म्स
दिग्दर्शक - बी. आर. चोप्रा
संगीत -ओ.पी. नय्यर
कलाकार -दिलीप कुमार, वैजंयती माला, अजित, चांद उस्मानी, जीवन, मनमोहन कृष्ण, नझीर हुसैन, लीला चिटणीस, राधाकृष्ण, जॉनी वॉकर, प्रतिमा देवी, डेझी इरानी, एस. एन. बॅनर्जी, एस. नाझीर.
कथानक सारांश -यंत्रयुगाची चाहूल लागल्यावर सुरू झालेल्या यंत्र व मानव यांच्यातील संघर्षाचे चित्रण. शंकर व कृष्णा या दोन मित्रांची कथा. प्रेमाचा त्रिकोण, यंत्राची हार आणि कामगार शक्तीचे बळ सांगणारा व्यावसायिक तरीही वेगळा चित्रपट.


_________________________________________________
१९५८
फिर सुबह होगी
निर्माता - पारिजात पिक्चर्स
दिग्दर्शक - रमेश सैगल
संगीत - खय्याम
कलाकार - राज कपूर, माला सिन्हा, रहमान, लीला चिटणीस, मुबारक, जगदीश सेठी, नाना पळशीकर, कमल कपूर, मिश्रा.
कथानक सारांश - डोस्टोव्हस्कीच्या 'क्राइम अँड पनिशमेंट' वर आधारीत. एखाद्या व्यक्तीनं, विशिष्ठ परिस्थितीत, विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तीचा खून केला तर त्याला शिक्षा व्हावी का? याचा उहापोह. कॉलेजची फी भरण्यासाठी घड्याळ गहाण टाकून वीस रुपये घेऊन येताना रामला रस्त्यात एक अपघात दिसतो. पतंग उडविताना छपरावरून पडलेल्या त्या मुलावर औषधोपचार करणार्‍या डॉक्टरला तो फी म्हणून ते पैसे देतो. त्या मुलाच्या घरचे दारिद्र्य अधिकच गहिरे असते. मुलाच्या बहिणीच्या प्रेमात राम पडतो मात्र तिचे वडील या लग्नाच्या मोबदल्यात आपल्या कर्जाची जबाबदारी घेण्यास सांगतात. कर्ज चुकविण्यासाठी सावकाराच्या घरी चोरी करताना रामच्या हातून त्या अन्यायी सावकाराचाच खून होतो. मात्र न्यायालय रामला फाशी देत नाही. केवळ तीन वर्षांची शिक्षा देते. राम व त्याची प्रेयसी एका नव्या पहाटेकडे डोळे लावून असतात.

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

6 Aug 2012 - 1:50 am | सुहास झेले

मस्त... ह्या भागात दिलेले बहुतेक चित्रपट बघितले आहेत, त्यामुळे त्यांची वास्तविकता जास्त भिडली.

त्यातल्यात्यात प्यासा आणि दो आंखें बारा हाथ अगदी आवडीचे सिनेमे. सीमा आणि दायरा बघायचे आहेत :) :)

पैसा's picture

14 Aug 2012 - 7:26 pm | पैसा

मात्र यातील दायरा पाहिलेला नाही. कोणी पाहिला असेल तर जास्त लिहू शकाल का?

शैलेन्द्र's picture

15 Aug 2012 - 10:14 pm | शैलेन्द्र

+१ असेच म्हणतो..