१९४७
डॉ. कोटणीस की अमर कहाणी
निर्मीती - राजकमल कलामंदिर
दिग्दर्शन - व्ही. शांताराम
पटकथा - के.ए. अब्बास, वसंत साठे
संगीत - वसंत देसाई
कलाकार - व्ही. शांताराम, जयश्री, दीवान शरार, बाबूराव पेंढारकर, विनायक, उल्हास, केशवराव दाते, राजश्री इत्यादी.
कथानक सारांश - मार्च १९३८ मध्ये नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांनी चीनला पाच डॉक्टरांचे एक सद्भावना पथक भारतातून पाठवले. त्यातील चार डॉक्टर आपल्या पथकाची मोहीम संपवून भारतात परतले परंतू डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस मात्र जखमी सैनिकांची, जखमी नागरीकांची सेवा करीत तिथंच राहिले, चिंगलान या चिनी युवतीशी विवाह करून त्यांनी संसार थाटला. बहादूर डॉक्टर कोटणीसांनी आपले वैद्यकिय कर्तव्य पुर्ण करण्यासाठी केलेल्या प्राणार्पनाची वास्तवदर्शी, ह्रदयस्पर्शी कथा यात आहे.
______________________________________________
१९४९
स्वंयसिध्दा
निर्माता - इंडियन नॅशनल आर्ट पिक्चर
दिग्दर्शन - श्याम दास
संगीत - प्रफुल्ल चक्रवर्ती
कलाकार - शांता आपटे, समर रॉय, मोलिना, बिपीन गुप्ता, हिरालाल, अमरनाथ, गीताश्री, प्रिती मुजूमदार, भुपेंद्र कुमार.
कथानक सारांश - स्त्री शक्तीचा प्रत्यय आणून देणारे कथानक. दुर्बल पती व कारस्थानी सासू यांना तोंड देत पतीमधील 'पौरूष' जागे करणार्या व स्त्रीच्या निर्धारशक्तीचा प्रत्यय देणार्या सुनेची कथा. शांता आपटेच्या वास्तव अभिनयाने गाजलेला चित्रपट.
(याचे फोटो आंतरजालावर मिळाले नाहीत)
______________________________________________
१९५१
हम लोग
निर्माती - रणजित फिल्म्स
दिग्दर्शन - झिया सरहदी
संगीत - रोशन
कलाकार - नुतन, बलराज सहानी, दुर्गा खोटे, श्यामा अन्वर हुसैन, मनमोहन कृष्ण.
कथानक सारांश - लाला हरिचंद या बॅंक क्लार्कची कथा. अल्प पगारात तो तीन अपत्ये व पत्नी यांचे कसेबसे पोट भरतो. मुलीला टि.बी. होतो तेव्हा औषधोपचारासाठी खूप खर्च होतो. परिणामी धाकट्या मुलाच्या शाळेची फी भरता येत नाही व त्याला घरी पाठवले जाते. मोठा मुलगा बलराज हा बँक अधिकार्याचे पैसे चोरतो त्यामुळे लाला हरिचंदवर तुरूंगात जाण्याची पाळी येते. पुढे बलराजलाही एका गुन्ह्यात अटक होते व तो न्यायालयातच ह्रदयविकाराचा झटका येऊन मरतो. लालाची आजारी मुलगी पारो या सर्व घटनाक्रमावर 'हम लोग' नावाचे नाटक लिहते.
______________________________________________
१९५३
दो बिघा जमीन
निर्माती - बिमल रॉय प्रॉडक्शन
दिग्दर्शन - बिमल रॉय
संगीत - सलील चौधरी
कलाकार - बलराज सहानी, निरूपा रॉय, रतन कुमार, मुराद, राजलक्ष्मी, तिवारी, नुर, कुसूम, हिरालाल, मेहमूद, मीना कुमारी (ज्यु).
कथानक सारांश - जमीनदार-सावकाराच्या विळख्यात सापडलेल्या एका छोट्या शेतकर्याची कथा. कर्ज चुकवून आपली दोन एकर जमीन परत ताब्यात मिळवण्यासाठी शंभू कलकत्त्याला जाऊन रिक्षा ओढतो. त्याचा मुलगा बुट्पॉलिश करू लागतो. नवर्याच्या शोधात कलकत्त्याला आलेली त्याची पत्नी आणि अखेर त्याच्या जमिनीवर फॅक्टरी सुरू होते. तो भुमिहीन होतो!
(व्हिडीओ कॅसेट टी सिरीजवर उपलब्ध)
______________________________________________
१९५३
फुटपाथ
निर्माती - रणजीत प्रॉडक्शन
दिग्दर्शन - झिया सरहदी
संगीत - खय्याम
कलाकार - दिलीप कुमार, मीना कुमारी, अन्वर हुसैन, रमेश थापर, अचला सचदेव, रमेश ठाकूर, कुलदीप कौर, अख्तर, पी.कैलाश जानकीदास, मारूती सुमती लाजमी.
कथानक सारांश - द्वितीय महायुध्दादरम्यानचे कथानक. एक गरीब लेखक योगायोगाने, काळाबाजरवाल्यांच्या संपर्कात येतो. सहज मिळणारा पैसा पाहून तो सत्व, बांधिलकी विसरतो. भाऊ, प्रेयसी यांच्याशी प्रतारणा करतो व तत्वांना तिलांजली देतो. अखेर त्याला आपण भरकटल्याची जाणीव होते व लक्षाधीश होण्याचे स्वप्न तो सोडून देतो.
(गोल्ड व्हिडीओवर उपलब्ध)
प्रतिक्रिया
12 Apr 2012 - 12:11 am | प्रचेतस
धन्यवाद ग्रंथपाल.
उत्तम माहिती.
पुढचे भाग लवकर येऊ द्यात.
12 Apr 2012 - 5:21 pm | सुहास झेले
मस्त... दो बिघा जमीन आणि फुटपाथ हे खूप आधी बघितले आणि आवडले देखील
अजून अश्याच वास्तवदर्शी चित्रपटांची माहिती येऊ देत... :) :)
14 Aug 2012 - 8:39 pm | सोत्रि
+१
- (जुनं ते सोनं मानणारा) सोकाजी
14 Aug 2012 - 7:23 pm | पैसा
यातील बहुतेक चित्रपट पाहिले आहेत. पु भा प्र.