आधीचा भाग : http://www.misalpav.com/node/22131
दोन दिवसांनी साहेब मुंबईला गेले.जातांनाच माझ्याकडे ३/४ चेकबूक्स देवून गेले.विविध बँकामध्ये त्यांची खाती होती.मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी.
साहेबांनी स्वतः फोन करून त्याला (५% वाल्याला) बोलावून घेतले.लवकरात लवकर त्याला, हे काम निपटायचे होतेच.येतांना तो . फ्रेंच कं.ने त्याला पाठवलेले पत्र घेवून आला.सुदैवाने त्याच्या कं. चे हेड ऑफीस मुंबईलाच असल्याने, साहेबाला फार बरे वाटले. (बहूदा हे साहेबाला माहित असावे.कारण दुसर्या विभागातील ऑफीस बरोबर त्यांनी पंगा नसता घेतला.) त्याला सांगीतले, की हा सगळा मॅनेजमेंटचा निर्णय आहे.मी प्रयत्न करत आहे.पण बहूदा ते पोलिस केस करतील असे वाटत आहे.
पोलिसांचे , नाव काढल्यावर, ५%वाला घाबरला."कोंबडी" तयार झाली. हे ओळखून त्याने मधाचे बोट लावले, की माझ्या कं.च्या वकीलाला फोडता येइल.मी प्रयत्न करून बघतो.तो ५% वाला पण लगेच म्हणाला, बघा ना जमत असेल तर.
साहेब म्हणाले, मी प्रयत्न करतो.१/२ दिवसांनी फोन कर.मी तुझ्या बरोबरच आहे.दुसर्याच दिवशी साहेबाने स्वतः होवून त्याला फोन केला आणि सांगीतले, की ," वकील तयार झाला.पण तो पैसे मागत आहे.साधारण ६०-७० हजार खर्च येईल.चालेल का? " तो म्हणाला, की, " पैसे बरेच जास्त आहेत पण मी प्रयत्न करतो."
साहेबाने त्याला, त्याच्या कं.तुन काय सपोर्ट लागेल ते सांगीतले.
इथे साहेबाचे अजून एक अनूमान सत्य निघाले. परदेशी कं. जास्त करून कोर्ट-कचेर्या टाळायचा प्रयत्न करतात. शक्यतो, त्यांच्या माणसांना कामावरून कमी करतात किंवा, बढत्या रोखून ठेवतात आणि जबाबदारीची कामे देत नाहीत.दुसर्याच दिवशी तो माणूस योग्य ती माहिती घेवून, साहेबांना भेटला.त्याच्या समोरच साहेबांनी एक कच्चा मसुदा त्याच्या समोर ठेवला.
त्याला, त्याच्या कं.तर्फे हे लेटर पाठवायला सांगीतले.थोडक्यात मसूदा असा होता, आम्ही आमच्या इथे चौकशी केली.
आमच्या माणसाची काहीच चूक नाही.सेंसर बरोबरच होता.कदाचित तूमच्या माणसाने, तुम्हाला योग्य ती माहिती दिली नसावी.तुम्ही चौकशी करा.
खरे तर असे लेटर प्रत्येक कं. पाठवते.तरी पण ह्या माणसाने, साहेबांचे पाय का धरले, तर , त्याच्यात मुळातच असलेला अप्रामाणिक पणा. (ज्या अर्थी, हा मला सेंसर देवू शकतो, त्याअर्थी त्याने इतर ठिकाणी पण ही भानगड केली असणार. हा साहेबाच तर्क आणि त्याने लगेच केलेली धावपळ आणि त्याच्या कं.तून, ऑफीशियल लेटर झालेला उशीर साहेबांना योग्य ती माहिती देवून गेला.वरचे अधिकारी सामील असल्या शिवाय ह्या अशा गोष्टी होत नाहीत.विशेषतः ऑफीशियल लेटरच्या बाबतीत.जर ते पण ह्या भानगडीत सामील असले तर, तूझा तू घोळ निस्तर, आम्हाला त्रास देवू नकोस , असेच शक्यतो वरच्या माणसांचे धोरण असते.)
२/३ दिवसांतच , असे लेटर आमच्या कं.ला मिळाले.साहेबाने शांत पणे उत्तर लिहिले.
आमच्या माणसाकडून चूक झाली असावी.खरे तर तो साधा ड्रायव्हर होता.त्याने हे मशीन कधीच बघितले न्हवते.सेंसरचे नांव त्याने, तुमच्या माणसाच्या तोंडूनच ऐकले.काहीतरी गफलत आमच्या कडून पण झाली असावी.आमची चौकशी चालू आहे.चौकशी पूर्ण झाली की, तुम्हाला कळवूच.सध्या आम्ही आमच्या . त्या कामगाराला सस्पेंड , केले आहे.
बर्याच लोकांना हे दोन शब्द खूप आवडतात आणि ते म्हणजे , चौकशी आणि सस्पेंड.साहेबांनी त्याच दोन शब्दांना पुढे करून मूदतवाढ मागीतली.
साहेबाने, बॉल तसाच लोंबकळत ठेवला.त्याला ना आपल्याकडे आणला , ना त्याला , दूसरी कडे टोलावला.त्या बॉलला साहेब कधीही हात लावू शकत होता.त्यांच्या नोटीशीला , आमचे फायनल उत्तर , न गेल्याने, तिथून कुठलेही उत्तर आले नाही.फ्रान्स मधले पण खूष, मुंबई वाले पण खूष , पैसे मिळाले आणि सेंसर पण मिळाले म्हणून साहेब पण खूष पण नूकसान झाले ते फक्त त्या ५ % वाल्याचे आणि ते पण त्याने ओढवून घेतले , ते त्याच्या अप्रामाणिकमूळे.हो-ना करता , साहेबाने ६०,००० वर सौदा केला.माणूस , दुसर्याच्या अनूभवातून पण शिकत असतो ते असे.हा ५% वाला किस्सा मला एक महत्वाचा धडा देवून गेला.ह्याचा मला पुढे उपयोग पण झाला.
साहेब मला , काही सुचना देवून गेले होते.प्रत्येक चेकबूक वर त्यांनी A,B,C,D असे मार्किंग करून ठेवले होते.मला ह्यातील गौडबंगाल काही समजत न्हवते.रोज सकाळ आणि संध्याकाळ , साहेब डोके खात होते.(नंतर समजले, की ते मला ट्रेन करत होते.)किती मशीन पुर्ण झाली? कुठे कुठे पाठवली?किती सामान स्टॉक मध्ये आहे?कुठले कमी आहे?कुणाची ऑर्डर आली?पेंट मारला का? रोज हजारो प्रश्न आणि शंका.कानाचे पार बूजगावणे झाले होते आणि मेंदू बथ्थड..साहेब स्वतः मस्त झोपत होते आणि मला मात्र अजिबात झोप येत न्हवती.कधी कोण येईल आणि धाड टाकेल काही सांगता येत न्हवते.सुदैवाने, दारूचे व्यसन लागले नाही, कारण सुनीलची अवस्था बघतच होतो. हा साहेब आता मला छळत होता.
अर्थात तेंव्हा असेच वाटत होते.तुम्ही परिंदा बघितला आहे का? त्यात नाना पाटेकरचा एक मस्त डायलॉग आहे,"हम धंदा करते है बेईमानीका, लेकिन करना पडता है बहोत इमानदारीसे."
एक महिना झाला आणि एक दिवस साहेब आले.ते कधीही सांगून आले नाहीत. यायचे ते अचानकच. त्यांची पहिली धाडच मला जबरदस्त धक्का देवून गेली.
प्रतिक्रिया
8 Jul 2012 - 5:49 am | मराठमोळा
मस्त पण छोटा वाटला हा भाग.
कथा रंगतेय हळू हळू, :)
8 Jul 2012 - 9:21 am | मन१
हाही भाग मस्तच.......
कथा रंङते आहे.
8 Jul 2012 - 12:02 pm | किसन शिंदे
आत्ताच सगळे भाग एकत्र वाचले. :) जबरा आहे तुमचा साहेब.
पुढचा भाग येऊ द्या लवकर.
8 Jul 2012 - 12:14 pm | रणजित चितळे
आधीचे भाग आजच वाचले. मजा आली वाचून.
8 Jul 2012 - 1:10 pm | धिन्गाना
आत्ताच सगळे भाग एकदम वाचले. लै भारि. असेच चालु द्या.
9 Jul 2012 - 11:51 am | ५० फक्त
लई भारी, आम्ही उमेदीच्या काळात गावातल्या ४ वेगवेगळ्या बँकातुन पैसे काढुन पुन्हा त्याच बँकेतल्या वेगवेगळ्या खात्यावर भरायचो त्याची आठवण झाली.
9 Jul 2012 - 11:58 am | प्यारे१
>>>उमेदीच्या काळात
कुणाच्या? नि तुमचीच असेल तरे आता रि-टायर्ड का? ;)
9 Jul 2012 - 2:03 pm | कवटी
कथा विंटरेश्टींग व्हायला लागलीय....
जरा मोठे मोठे भाग टाकाहो मुवि.
9 Jul 2012 - 9:45 pm | मदनबाण
वाचतोय...
9 Jul 2012 - 11:32 pm | अर्धवटराव
लईच पोचलेलं दिसत्यात छगनभाऊ. पुढं काय झालं ?
अर्धवटराव
11 Jul 2012 - 2:34 pm | गणेशा
अप्रतिम लिहित आहात...
सर्व भाग आज वाचले.. मस्त एकदम.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
7 Aug 2018 - 4:06 pm | चौथा कोनाडा
हा भाग पण थरारक, विंटरेश्टींग !