"नेकी कर और दर्या में डाल"

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
2 Jul 2012 - 4:55 pm

माझ्या आईने माझ्यावर अजून एक चांगला संस्कार केला.

"नेकी कर और दर्या में डाल."

कं.त काम करत असतांना पण , मी माझ्या हाताखालच्या माणसांना, मनापासून शिकवायचो.त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होतो.कधी-कधी परीक्षा पण घेत होतो.कामावर असतांना, वाद-विवाद करायचो आणि त्याचा अंत सूसंवादाकडे कसा होइल ह्याकडे लक्ष द्यायचो.हाताखालून हजारो माणसे गेली तशीच पाठीवर शाबासकीची थाप ठोकून पण शेकडो गेली.

सध्यी मी नौकरी बदलायच्या विचारात आहे.जे शिकायचे होते , ते शिकून झाले. आता थोडा चेंज हवा आहे.मागच्या आठवठ्यांत एक मेल आली.ज्याने मेल पाठवली तो सेक्शन हेड आहे.मी उत्तर पाठवले.३/४ दिवस मेलो-मेली झाली. (पत्रो-पत्री झाली असे समजले , तरी चालेल).त्याने माझा CV फॉरवर्ड केला. त्याला एक थँक्स गिव्हिंग मेल पाठवला.

आज , त्याचा मेल आला.

"Dear Phatak bhai,

First of all don’t call me Sir, we have worked together in ATIC when I was in contract and have learnt lots of things from you and because of that only I am here on this position."

ह्या माणसाला, मी ओळखत नाही.मला ह्याचा चेहराही आठवत नाही.मी ATIC (वलसाड, गुजरात), मध्ये असतांना, हा बहुदा माझ्या हाताखाली , काम करत असावा.१९९८ला मी ATIC सोडली.आज १४ वर्षे झाली.त्यानंतर आमचा कधीही संबंध आला नाही.मी तर त्याला पार विसरून गेलो आहे.पण तो नाही विसरला.हा त्याचा मोठेपणा आहे आणि मी त्याला विसरून गेलो , हा माझ्या मनाचा कद्रूपणा आहे.

आज मला ही गोष्ट, तूमच्या बरोबर शेयर करावीशी वाटली, म्हणून लिहीत आहे.आता मला नौकरी नाही मिळाली, तरी चालेल. पण एक गोष्ट तर सिद्ध झाली.

पेरावे तसे उगवते....त्यामूळे ह्यापूढे जे काही पेरीन, ते चांगलेच पेरीन.

आणि जर मला नौकरी मिळाली तर, त्याच्या मागे माझ्या आईने केले संस्कार आहेत.आजचा दिवस माझ्या साठी मात्रु-दिन आहे.तिने केलेल्या ह्या संस्काराचे फळ , मला ४५ वर्षांनी मिळाले.अजून काय लिहू? आज देवाला सांगीन, की जगातील प्रत्येक मुलाला, माझ्या आई सारखीच आई दे, की जिने तिचा प्रत्येक क्षण, आमच्यासाठीच वेचला.

"नेकी कर और दर्या में डाल."

समाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

तुम्ही छानच लिहीलंय, पण ही सीरीज एकत्रितपणे पाहताना टाईमलाईनविषयी एक गोंधळ मनात उत्पन्न झाला. तुम्ही गुजरातेतील नोकरीचा उल्लेख केलात, काही ठिकाणी गल्फमधील नोकरीचाही. अर्थातच मराठी माध्यमात शिकलेली मुले तुमच्यापासून बराच काळ दूर असणार आणि तुम्ही या सर्व ठिकाणी एकटेच राहिले असणार असं तर्कदृष्ट्या वाटतं. (किंवा त्यावेळी त्यांचा जन्म झाला नसेल, पण तसं स्पष्ट होत नाहीये.. )तुम्ही उल्लेख केलेले संस्कारविषयक प्रयोग (जे बर्‍याच प्रमाणात यशस्वी झालेले आहेत) ते नेमके मुलांच्या कोणत्या वयोगटात केले होते ते सांगू शकाल का?

हे विचारण्याचं कारण असं की सलग लहानपण ते आत्ता या काळात सतत तुम्ही तुमच्या मुलांसोबत नसावेत असं दिसलं म्हणून .. अधुनमधून भेटणार्‍या पालकाचे संस्कार मुलं कितपत स्वीकारतात? की तुम्ही नोकरीनिमित्ताने जिथे गेलात तिथे कुटुंबासहितच राहिलात?

आणि निरीक्षणातून (स्वगृही आणि आजुबाजूला) असा अनुभव आहे की ठराविक वयोगटाच्या पोरांना आईबापांनी कितीही 'मित्रवदाचरेत' न्यायाने त्यांच्या बरोबरीने आणि कलाने त्यांच्यासोबत सर्वकाही शेअर करण्याचा प्रयत्न केला तरी पोरांना ते नको असतं आणि आमच्यावर "वॉच' ठेवतात, सगळ्या गोष्टीत आईबाबा नकोत...गिव्ह अस सम स्पेस असा रोख पोरांच्या वागण्यात दिसतो..
कोणत्या वयापर्यंत काय करावं /कशात लक्ष घालावं हेही एकदम क्रिटिकल आहे असं वाटतं.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2012 - 6:29 pm | मुक्त विहारि

व्य. नि. केला आहे...

उदय के'सागर's picture

2 Jul 2012 - 6:46 pm | उदय के'सागर

खरंतर मलाहि गविंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणुन घ्यायला आवडेल. मी तुमच्या प्रतिसादाची (गविंच्या प्रतिसादाला) वाट बघतच होतो, पण तुम्ही व्य.नी. केल्याने मला ती उत्तरं नाहि कळणार :(....

बाकि धन्यवाद तुमचा अनुभव इथे शेअर केल्याबद्दल :)

मुक्त विहारि's picture

2 Jul 2012 - 7:27 pm | मुक्त विहारि

पुढल्या भागात ह्या सगळ्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीन..

उदय के'सागर's picture

2 Jul 2012 - 7:32 pm | उदय के'सागर

धन्यवाद मु.वि. :)

चौकटराजा's picture

2 Jul 2012 - 5:10 pm | चौकटराजा

मी ज्या स्त्रीला ट्रेनिंग दिले ती दहा वर्षानी माझीच बॉस म्हणून रुजू झाली. पहिल्याच दिवशी इतराना सोडून
मला तिने तिचा टिफिन शेअर करायला बोलविले. मला वाटले. आता कंपनीच्या गलिच्छ राजकारणाला बाजूला सारून माझे ( हर कुत्तेके या चालीवर ) दिवस आता सुरू झाले. पण कसचे काय! पुरेसे अधिकार नाहीत या सबबीवर तिने आठच दिवसात राजीनामा दिला.

कुंदन's picture

2 Jul 2012 - 5:20 pm | कुंदन

सहमत !
चला आज इथे दर्या शोधायला जुमैराह बीच वर जायला हवे.

मराठमोळा's picture

2 Jul 2012 - 7:46 pm | मराठमोळा

(लहान तोंडी मोठा घास) मुवि... मुवि.. थांबा..... (/लहान तोंडी मोठा घास)
थांबा व्यनी करतो इथे पुन्हा काहींचा उद्धार व्हाय्चा :)

गोंधळी's picture

2 Jul 2012 - 8:35 pm | गोंधळी

आज देवाला सांगीन, की जगातील प्रत्येक मुलाला, माझ्या आई सारखीच आई दे, की जिने तिचा प्रत्येक क्षण, आमच्यासाठीच वेचला.

तुमची ईच्छा पूर्ण होवो ही देवाकडे प्रार्थना

अर्धवटराव's picture

3 Jul 2012 - 12:26 am | अर्धवटराव

तर आमचे मराठी प्रमाणे हिंदीदेखील बोंबल्लय. "नेकी कर दर्यामे डाल" याचा अर्थ आपण चांगुलपणा दाखवावा पण जगाकडुन तशी अपेक्षा करु नये ("समुद्रात साखर टाकणे" या पद्धतीचे) असा वाटत होता मला.

बाकी मु.वी., तुमची लेखणी मात्र चतुरस्त्र हां.

अर्धवटराव

मुक्त विहारि's picture

3 Jul 2012 - 1:01 am | मुक्त विहारि

मी तर , मी काही मदत केली आहे, ते पण विसरून गेलो होतो..

अर्धवटराव's picture

3 Jul 2012 - 3:26 am | अर्धवटराव

म्हणजे अगदीच गंडलं नाहि तर :)

अर्धवटराव

योगप्रभू's picture

3 Jul 2012 - 1:14 am | योगप्रभू

लेखन आवडले. सगळे असंच वागले तर जग कितीतरी सुंदर होईल.

अवांतर व गंमत - सूसंवाद हा एक नवा शब्द समजला. :)

दादा कोंडके's picture

3 Jul 2012 - 1:49 am | दादा कोंडके

नेकी कर, दर्या में डाल और लीख मिपा पर. :P

अवांतरः मुक्तक आवडलं :)

प्रभाकर पेठकर's picture

3 Jul 2012 - 3:38 am | प्रभाकर पेठकर

'नेकी कर दर्यामे डाल' ह्या वाक्प्रयोगाचा अर्थ 'चांगले कार्य करुनही त्याचे अपेक्षित फळ न मिळणे' (दर्यामें डाल म्हणजे आपले चांगले कार्य वाया जाणे असा आहे) अस विषादपूर्ण आहे. लेखकाला असा अर्थ अपेक्षित नाही, सबब, वाक्प्रयोग चुकला आहे.

इथे, 'कर्मंण्ये वाधिकारस्ते मा फलेशू कदचन' हे संस्कृत सुभाषित चपखल बसते आहे. आशा बाळगली की निराशेचा धोका निर्माण होतो आणि निराशेने माणूस हतोत्साहित होतो (ज्या योगे प्रगती खुंटते) म्हणूनच, '(चांगले) 'कर्म' करीत राहा पण फळाची आशा धरू नकोस, पर्यायाने हतोत्साहित होण्याचा धोका टाळ'. असे संस्कार हे सुभाषित आपल्यावर करते.

जो उपकार करतो त्याने ते सर्वप्रथम विसरायचे असतात (जे मुक्त विहारींबाबत घडले) त्यामुळे उपकार कर्त्याला 'ग' ची बाधा होत नाही. आणि ज्याने उपकार स्विकारलेले असतात त्याने ते कधीच विसरायचे नसतात त्यामुळे कृतज्ञतेची भावना सतत त्याच्या मनांत राहते आणि विधायक उर्जा (Positive Energy) त्याला प्राप्त होते.

हातिम ताई मध्ये नेकी कर और दरिया मे डाल, असा सवाल आहे. बहुतेक त्याचा अर्थ नेकी कर आणि विसरून जा . ( फलाची अपेक्षा करु नकोस, पण ते तुला मिळेलच.) असा वाटतो.

neki kar

मुक्त विहारि's picture

3 Jul 2012 - 6:36 am | मुक्त विहारि

"हातिमताई" ह्या पुस्तकात हाच अर्थ दिला आहे.

प्रभाकर पेठकर's picture

3 Jul 2012 - 12:14 pm | प्रभाकर पेठकर

ज्या माझ्या हिन्दी भाषिक मित्रांकडून जेंव्हा जेंव्हा ह्या वाक्प्रयोगाचा वापर झाला तेंव्हा तेंव्हा तो विषादपूर्णच होता. जसे, 'मी अनेकदा मित्रांना आर्थिक मदत केली पण माझी वेळ आली तेंव्हा सर्व जणं तोंड लपवून फिरले, म्हणतात नं, नेकी कर दर्यामे डाल.' 'ज्याला मी मदत केली तो हल्ली साधी ओळखही दाखवत नाही, नेकी कर और दर्यामें डाल, असा हिशोब झाला.' ह्या आणि अशा वाक्यांमध्ये आपण केलेल्या चांगल्या कार्याचे फळ आपल्याला मिळाले नाही हा विषाद दडलेला आहे. असो.

गुगल वर दोन्ही अर्थाने वापर दिला आहे. पण असो. मी आग्रही नाही. 'चुकीच्या वाक्प्रयोगाचा' आरोप, मी क्षमा मागुन, मागे घेतो.

मुक्त विहारि's picture

3 Jul 2012 - 6:15 pm | मुक्त विहारि

तुमच्या मनांत जे आले, ते तुम्ही विचारले..

इतरांना , जे समजले, ते त्यांनी लिहिले..

प्रभाकर पेठकर's picture

3 Jul 2012 - 6:19 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. मुक्त विहारी.

JAGOMOHANPYARE's picture

3 Jul 2012 - 10:40 am | JAGOMOHANPYARE

jj

या कथेतलामनुष्य एक दरोडेखोर असतो. पण त्याला एक चाम्गली सवय असते. रोज तो एक भाकरी समुद्रातल्या ( पाण्यातला) माश्याना खायला देत असतो.. तो मेल्यावर नरकात जातो. पण अल्लाचा तेवढ्यात मेसेज येतो की हा माणूस एक काम नेक करत होता... माश्याना खायला देणे, म्हणून त्याला परत पाठवा आणि जगू द्या.

नेक काम करत असताना त्याला जानीवही नसते की याचे आपल्याला चांगले फळ मिळनार आहे. म्हणून नेकी करावी आणि दरियात टाकावी.. विसरुन जावे. कधीतरी त्याचे चांगले फळ मिलतेच.

ऋषिकेश's picture

3 Jul 2012 - 11:50 am | ऋषिकेश

चांगली शिकवण आहे. माझ्या पालकांकडून कोणतीही गोष्ट (अगदी पैसादेखील)"इतरांना दिल्याने वाढते" ही शिकवण मिळालेली असल्याने इतरांना काहीही देताना वाईट वाटत नाही.

किसन शिंदे's picture

3 Jul 2012 - 12:10 pm | किसन शिंदे

लेख आवडला.

याचप्रमाणे नेकी और पूछ पूछ या विचित्र वाक्यरचनेमागे काय उद्देश आहे हे कोणी सांगेल का?

स्मिता.'s picture

3 Jul 2012 - 1:58 pm | स्मिता.

साधारणपणे काहितरी काम करण्याआधी आपण म्हणातो की असं करू का? जर ते काम 'नेक' असेल तर असं विचारण्याचीच गरज नाही, ते करायलाच हवे अश्या अर्थाने तो वाक्प्रचार असावा.
उदा. बायकोने नवर्‍याला विचारलं की आज तुझ्या आवडीचं चमचमीत जेवण बनवू का? तर नवर्‍याप्रती नेकी करतांना प्रश्न कशाला हवेत म्हणूअन तो हा वाक्प्रचार वापरू शकतो ;)

धन्यवाद्स..

तसा तर अर्थ माहीत आहे कारण लोकांना ते शब्द वापरताना ऐकलं आहे. उदा. आपल्याला अगदी मनापासून आवडेल अशी गोष्ट कोणी समोरुन देत असेल आणि देण्यापूर्वी "दिली तर चालेल का" असं आपल्याला विचारत असेल तर हे शब्द वापरतात असं पाहिलं आहे. पण नेकी और पूछ पूछ अशी क्रियापद आणि अन्य आगापीछा नसलेली विचित्र शब्दरचना कोणत्या कथेवरुन किंवा संदर्भावरुन जन्माला आली असावी असा विचार आला होता..

अर्थ छान समजवलात स्मितातै, पण दिलेलं उदाहरण कितपत योग्य आहे हे अनुभवी लोकांकडून ऐकायला आवडेल. ;)

स्मिता.'s picture

3 Jul 2012 - 11:58 pm | स्मिता.

घरातलंच उदाहरण दिलंय रे! आणखी कोणत्या अनुभवी लोकांकडे जातोस आता? ;)

प्यारे१'s picture

4 Jul 2012 - 11:29 am | प्यारे१

आपण पण चांगलं चमचमीत जेवण बनवू शकतो हे दाखवून देण्याचा क्षीण प्रयत्न....! :P

एखादी पाकृ 'इकडे' टाका की. ;)

अमित's picture

3 Jul 2012 - 5:01 pm | अमित

बाकी, गविंनी उपस्थित केलेल्या शंकांवरील तुमचा प्रतिसाद वाचायला आवडेल.