नविन भाग लिहिण्यापूर्वी , काही खूलासा करतो.
१. मारवाडीच का? : मी मूळचा डोंबिवलीचा, माझे काही मित्र , इमारत बांधणी ( कंट्रक्शन, हा डोंबिवलीकरांचा शब्द) व्यवसायात आहेत.डोंबिवलीतील , अन्न , वस्त्र आणि निवारा , ह्याच मंडळींच्या हातात आहे. नंतर कामानिमित्ताने, विविध ठिकाणी , गेलो आणि हाच अनूभव आला. अतिशय धोरणी पणे आणि संघटीत होवून हे व्यवसाय करतात.
२. बर्याच वेळा, सरकार एक धोरण आखते आणि त्याचा फायदा बनेल व्यापारी उठवतात.
३. ह्या अनूभवामूळे, ही कथामालिका लिहित आहे.... चूकून माकून वास्त्यव्याशी संबंध आलाच तो तर निव्वळ योगायोग आहे.
४. मी नौकरी निमित्ताने साडे पाच वर्षे , वलसाड (गुजरात) इथे होतो.बरेच व्यापारी, टॅक्स वाचवायला, दमणला , फॅक्टरी उघडतात असे एकून होतो.म्हणून, दमणचे नांव टाकले.
आणि
सर्वात महत्वाचे...
सध्या "मूलांची शेती " ह्या अतिशय मह्त्वाच्या लेख-मालिकेत व्यस्त असल्याने ह्या मालिकेकडे थोडे दिवस लक्ष देत नाही.
========================================================
आधीचा भाग : http://www.misalpav.com/node/22087
कामावर रुजू झालो.दूसर्या दिवशी साहेब आले.त्यांनी माझी आणि इतर कामगारांशी ओळख करून दिली.सगळ्यांना ते पार्टनर अशीच हाक मारायचे,सगळे कामगार दबूनच असायचे.थोड्यावेळाने अशोक आला.अशोक, सरीगामचा (सरीगाम म्हणजे, भिलाड रेल्वे स्टेशन पासून ५/६ किलोमीटर अंतरावरचे गांव.)कं.नीत सगळे कामगार गुजराथीच.आम्हा गुजराथी लोकांचा एक जन्मजात गूण म्हणजे, परीस्थितीला शरण न जाणे.तूम्ही आम्हाला कसेही फेका, आम्ही मार्ग काढणारच. मालकाचा धंदाच असा होता, की त्याला रिस्की गेम खेळणारीच माणसे हवी असत.मला आणि अशोकला घेवून साहेब. हॉटेल गूरूप्रसादला घेवून गेले.काय हवे ते घ्या म्हणाले. अशोकने बियर मागितल्यावर माझी पण भीड चेपली.बियर पिता-पिता, साहेबांनी आम्हाला विश्वासात घेतले. नविन धंद्याचे टेक्निक समजावून सांगीतले.
मला सरळ सांगीतले, की , "तूला सिलेक्ट केले ते तूझ्या प्रामाणिक पणामूळे आणि जोडीदाराचे नांव न सांगीतल्यामूळे. इथे आपला सगळा व्यवहार चोराचा आहे.सरकार काहीच करणार नाही.कोर्टाला कागदपत्रे लागतात, तर कामगारांना नोटा.कागदपत्रावर तर माझी सही नसते आणि नोटा देवून बरीच कामे होतात.तुम्ही बाहेर माझ्या पैशांनी काय खाता आणि पिता, ह्याच्याशी मला काहीही घेणे देणे नाही.पण मला १००% रिझल्ट पाहिजे.तूम्हाला सरकारी नोकरांचा त्रास होणार नाही.ती जबाबदारी माझी."
जेवण झाले आणि आम्ही कं.त आलो.अशोकने मला फ्रान्सची सगळी हकीकत सांगीतली.शेवटी त्याची सही घेतली होती ना?हा अशोक म्हणजे, साहेबांचा पूतण्या.नको नको ते सगळे धंदे करून हा माणूस, हा धंदा करायला आला.त्या ५% वाल्याची आज वाट लावणार आहेत म्हणाला.इथे सगळीच माणसे साहेबांची खास माणसे होती, की साहेब मूद्दामच आपले किस्से सांगत होता कूणास ठावूक.
आता कागदोपत्री जमिन कूणाची, तर ह्या अशोकची, मशीनरी सगळी बँकेकडून आणलेली आणि ती पण अशीच कूठली तरी सोसायटी का काय तरी होते.एक-दोन हप्ते भरले असतील -नसतील, त्यांनी पाठवलेल्या नोटीसांनीच एक फाइल भरून गेली होती.पहिल्यांदा जेंव्हा नोटीस आली, तेंव्हा मी ती साहेबांना दाखवली.त्यांनी लक्षच दिले नाही, म्हणून नंतर मी पण कधी हा विषय काढला नाही. नंतर समजले, की, जागा सरकारी मालकीची असल्याने, मुळात आम्हाला तिथे कूठलेच बांधकाम करता येत नाही.बँकेने ह्याची खातरजमा न करताच, त्या जागेच्या तारणावर कर्ज दिले होते.कोर्टात ती जागेची केस चालू असल्याने ना बँक त्या जागेचा ताबा घेवू शकत आहे ना ही आम्हाला जा म्हणू शकत आहे.सरकारच्या एका खात्याचा, दूसर्या खात्या बरोबर ताळमेळ नसतो, ह्या गोष्टीचा फायदा, छगनलाल बरोब्बर करून घेत होता.आता हेच बघाना, जागेचे व्यवस्थापन एका खात्याकडे आणि वित्त पुरवठा दूसर्या खात्याकडे.इकडून पेपर आला की तिकडे सार आणि तिकडून पेपर आला की इकडे सार..शेवटी बँकेने आमचे खाते, बूडीत असे टाकले ....आणि ह्या बॅक प्रकरणात कामाला आली, ती साहेबांची मेहूणी. साहेबांचे हे अंगवस्त्र फारच जोरदार असल्याने, ह्याचा ऊपयोग ते कसा करून घेत असत ते पुढे कधीतरी.
पुढच्या २ आठवड्यात साहेबाने २ चाली खेळल्या.साहेब मुंबईला गेल्या नंतर ५% वाल्याला ८-१० दिवसांनी ये, असे सांगीतले. साहेबाने १०,००० दिले होते ना? आता ५०,००० वसूल झाल्या शिवाय सोडेल का?मूदतवाढ मागणे, हा साहेबांचा जन्मसिद्ध हक्क.काय वाट्टेल ते करतील आणि मूदतवाढ मागतील.एकदा का समोरचे संकट टळले की झाले.त्या मूदतवाढीचा साहेब , असा काही वापर करून घेत की काही विचारू नका.प्रत्येकवेळी पैसा दिलाच पाहीजे, असे थोडीच आहे.साहेबांच्या ह्या वागणूकीचा , कळत नकळत माझ्यावर पण परीणाम होत होताच.
मारवाडी जान देयेगा लेकिन पैसा.... कभी नहीं, आणि खरे सांगायचे तर ह्या अशा माणसांकडून पैसे घेवू पण नयेत.थोडक्यात जितके दूर पळता येईल तितके पळा.कधी तूम्हाला त्यात अडकवेल , काही सांगता येत नाही.
४/५ दिवसांनी त्यांनी , फ्रेंच कं.ला पत्र पाठवले.पत्रात जास्त न लिहिता, एव्हढेच लिहिले की,
तूमचे मशीन चेक केले.त्याचा सेंसर फॉल्टी निघाला.तूमच्या मेकॅनिकने काय केले ते माहित नाही?तूमच्या सारख्या मातब्बर कं.ला हे असे शोभत नाही.
त्याने कूठेही, तो काय करणार आहे, ते लिहिले नाही.त्यांना कंफ्यूझ करून हा मोकळा झाला.तूम्ही लढवा तर्क वगैरे.
ह्या युरोपियन आणि जपानी कं.जपतात ते फक्त आपल्या नावाला.प्रत्येक व्यक्तीची आणि संस्थेची, एक दूखती नस असते.ती दाबली की झाले.आपल्या ब्रँडनेमला जपणे, ही त्यांची खोड साहेबाने ओळखली आणि तिथेच घाव घातला.आता एक तर प्रतिष्ठा जपा आणि माझे नुकसान भरून द्या,नाहीतर कोर्टात जा.बॉल दिला टाकून.आता त्या बॉल बरोबर साहेब खेळत बसणार होता,ह्यात त्या फ्रेंच कं.चा वेळ वाया जाणारच होता आणि साहेबाचा टाईमपास.त्यांनी कूठलाही स्टँड घेवू दे, फायदा साहेबाचाच होणार होता.
आपल्या क्वालिटी वर त्या फ्रेंच कं.चा विश्वास होता.इथे काय काय भानगडी चालतात, हे काही त्यांना माहीत न्हवते.त्यांनी तो बॉल, दूसर्या ठि़काणी टाकून दिला.
२/३ दिवसांतच तो मेकॅनिक बोंबलत आला.
प्रतिक्रिया
29 Jun 2012 - 9:20 pm | श्रीरंग_जोशी
मुवि - हा भाग वाचताना संपूच नये असं वाटत होतं. मागील भागात मालकाचे जे चित्र उभे केले होते त्याला पुरेपूर हा भाग झालेला आहे.
पुढे काय होणार याची फारच उत्कंठा लागलेली आहे.
ते दुसरे लेखन जरा वेळ बाजूला ठेवून इकडे वेग वाढवला तर मजा येईल.
पण अखेर मागणी तसा पुरवठा याच तत्वावर जालिय साहित्याचे दुकान चालते ;-).
29 Jun 2012 - 9:22 pm | मुक्त विहारि
मूले आणि त्यांची जडण घडण हे फार महत्वाचे आहे..
30 Jun 2012 - 12:51 am | संजय क्षीरसागर
(मी सगळी मदत करतो कारण तो विषय मला पूर्ण माहितीये) तू आधी ही लेखमाला पूर्ण कर
30 Jun 2012 - 2:32 am | खेडूत
झकासच..पुढचा भाग येऊ द्या लवकर..
पुण्यातले असेच चार-पाच छगनलाल आणि मगनलाल आठवले !
7 Aug 2018 - 2:31 pm | शाम भागवत
मग लिहा की राव. हव असल तर कुठल्यातरी वेगळ्या शहराचे वर्णन करत लिहा.
30 Jun 2012 - 3:24 am | सुनील
वाचतोय.
30 Jun 2012 - 12:54 pm | ५० फक्त
मस्त आहे रे, पण ह्या गोष्टी अशा छोट्या लेव्हलला होतात मग त्याला भ्रष्टाचार लफडी वगैरे म्हणुन हिणवले जाते बदनाम केले जाते जेंव्हा हे कार्पोरेट लेव्हलला होते तेंव्हा ते फार शुद्ध, सुंदर सात्विक असते असा एक समज आहे.
30 Jun 2012 - 3:31 pm | अन्या दातार
मस्त जमलाय भाग. पुभाप्र. :-)
30 Jun 2012 - 4:23 pm | स्पंदना
आवड्या.
7 Aug 2018 - 3:59 pm | चौथा कोनाडा
+१