आज या धाग्याच्या निमित्ताने एका सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहे. विषय आहे डास व त्याचे चावणे. हसू नका किंवा धाग्याला नाक देखील मुरडू नका. त्याचप्रमाणे हा धागा एकोळी-बहूओळी, गणपतीला स्वेटर, गुलाबजामाच्या पाकाचे काय करायचे, सोफा, फुडप्रोसेसर कसा घ्यावा असा वर्गीकृत करू नका.
डास, त्याच्या चावण्याने होणारे आजार, मलेरिया या कारणांमुळे सरकारे, महानगरपालिका, पालिका, ग्रामपंचायती, गल्या, कॉलन्या, आपली घरे व पर्यायाने आपण सर्वसामान्य जनता वैतागून त्याचप्रमाणे हादरून जातात. तुम्ही घरे बंद ठेवा, जाळ्या लावा, आजूबाजूला असणारे पाण्याचे साठे साफ करा, आठवड्यातून एक दिवस कोरडा ठेवा आदी अनेक उपाययोजना करूनही डास कुठेतरी असतातच.
डासांच्या चावण्यापासून टाळण्याजोगे उपाय खालीलप्रमाणे आहेत:
१) मच्छरदाणी लावून झोपणे:- झोपेपुरता हा उपाय रामबाण आहे पण मनुष्य सारखा दिवसभर घरात काही झोपूनच राहत नाही. काममाजाच्या वेळी डासांचा त्रास हा होतोच.
२) गुडनाईट, कासवछाप वा तत्सम डासांकरताच्या वड्या, द्रव, चक्री जाळणे:- हा उपाय करून डास खरोखर पळतात की नाही यावर आपल्याला अनुभव असतोच. डास या वड्यांनाही दाद देत नाहीत हे खरेच.
३) शरीरावर डासांविरूद्ध असलेले मलम चोपडणे:- हा खर्चीक उपायदेखील दररोज करून कंटाळा यायला लागतो.
४) इतर काही उपाय (जे मी केलेले नाहीत पण आंतरजालावर शोधले असता सापडले):- जसे:- शरीरावर वेगवेगळे रासायनीक औषधे लावणे, कोरफडीचा रस लावणे, लिंबूरस लावणे आदी. (पण हे उपाय डास चावल्यानंतर होणार्या वेदना कमी करण्यासाठीचे आहेत/ असावेत.)
आताशा काही मोबाईल अॅप पण तयार केलेले आहेत पण त्याबाबत शंका आहे. काही ईलेक्ट्रॉनीक किट्स पण बाजारात आहेत की ते अल्ट्रासाउंड आवाज बाहेर टाकतात की त्यामुळे डास पळून जातात. हा उपाय कितपत योग्य आहे?
डास घरात शिरू नयेत किंवा शिरलेल्या डासांनी चावू नये किंवा कमीतकमी चावावे (!) यावर काय काय उपाययोजना असू शकतात?
त्याचप्रमाणे डास चावण्यामुळे होणार्या वेदना कमी कशा करतात?
वरील काही युक्त्यांपेक्षा निराळ्या युक्त्या मिळाल्यास सर्वांचे प्रबोधन होईल.
प्रतिक्रिया
10 Jun 2012 - 3:34 am | श्रीरंग_जोशी
मला आठवते की मी लहान असताना फार डास झाले की माझ्या घरी दिवेलागणीच्या वेळी कडुनिंबाचा सुका पाला जाळून धूर केला जायचा.
परंतु ते घर जुन्या काळातील कौलारू पद्धतीचे होते. आजच्या काळात हा प्रयोग केल्यास शेजारी अग्निशमन दलास दूरध्वनी करतील.
10 Jun 2012 - 7:04 pm | पक पक पक
तुमच्या अमेरिकेत कसे मारतात हो डास...?
11 Jun 2012 - 8:24 am | श्रीरंग_जोशी
ठाऊक नाही बुवा....
येथील घरांच्या रचनेमुळे गवत वा झुडुपात निर्माण झालेले डास आत येऊ शकत नाहीत त्यामुळे असा प्रश्नच सहसा उद्भवत नाही.
विरंगुळा म्हणून छावणीगिरी करताना येथील लोक अंगावर काही विशिष्ट सौम्य फवारे मारतात ज्याने डास जवळपास फिरकत नाही.
10 Jun 2012 - 5:47 am | कौतिक राव
खिड्क्याना जाळी लावणे..
डास मारायची कचकड्याची रॅकेट वापरणे..
अंग सगळे झाकले जाईल असे कपडे परिधान करणे..
10 Jun 2012 - 7:58 am | अशोक पतिल
मच्छरदाणी लावून झोपणे. हाच एक सर्वोत्तम उपाय आहे. बाकी डास दिवसा जास्त करुन चावत नाहीत .
हो अजुन म्हणजे नशेत असेलेल्या मानसास डासांचा काहिच त्रास होत नाही .
10 Jun 2012 - 12:05 pm | मुक्त विहारि
+१ = मच्छरदाणी लावून झोपणे.
+१०० = नशेत असेलेल्या माणसाला , डासांचाच काय, पण ऐहिक जगातील कशाचाच , त्रास होत नाही . झोपण्यापुर्वी एक ९० मि.ली.चा डोस घ्यावा आणि गप-गुमान झोपून जावे.
10 Jun 2012 - 7:13 pm | पक पक पक
झोपण्यापुर्वी एक ९० मि.ली.चा डोस घ्यावा आणि गप-गुमान झोपून जावे.
दारुचा नाद लय वाइट्,दारु माण्साला जनावर बनवते.डास म्हण्जे आधीच लय डेंजर ,त्यात त्याला तुम्ही दारुचा नाद लावणार.मग तो डोस रोज घ्यावा लागेल्...नाय तर ज्या दिवशी घेणार नाय त्या दिवशी चाउन चाउन सुजवतील.....
:crazy: :crazy: :crazy:
11 Jun 2012 - 1:05 pm | मुक्त विहारि
उलट डासांना पण त्याची सवय झाल्याने, ते पण दारू प्यायलेला माणूस शोधतील. त्यामूळे जे दारू प्यायलेले नसतील, त्यांच्याकडे डास आपली सोंड वळवणार नाहीत.
10 Jun 2012 - 8:31 pm | कापूसकोन्ड्या
शिवाय, कमीतकमी खिडकीपाशी असा ''लास'' झालेला माणूस झोपवला तर त्याला चावणारे डास पण तसेच होतील आणि इतराना चावण्य्या ऐवजी '' पिलेल्या रक्ताला'' जागून तसेच पडून राहतील.
10 Jun 2012 - 11:18 am | निवेदिता-ताई
संध्याकाळीच डास जास्त असतात. अशा वेळी खिडक्या दारे बंद करुन घरात उद जाळावा, त्यासाठी
एक दांड्याचे उदपात्र मिळते, ते आणावे.
10 Jun 2012 - 1:10 pm | ५० फक्त
मच्छरदाणी लावून झोपणे:- झोपेपुरता हा उपाय रामबाण आहे पण मनुष्य सारखा दिवसभर घरात काही झोपूनच राहत नाही. काममाजाच्या वेळी डासांचा त्रास हा होतोच. - या वाक्यातली चुक झाली आहे की केली आहे, अर्थात त्यामुळे प्रश्नाचे महत्व कमी होत नाही हे खरे.
10 Jun 2012 - 11:34 pm | मोदक
:-D
11 Jun 2012 - 7:56 am | ५० फक्त
हसु नका, उगाच आताच वाचलेल्या बातमीनुसार अशा वेळी डास चावणे हेच उ**** चे मुख्य कारण असल्याचे अमेरिकेत युरोपिय आफ्रिकेन माणसांवर केलेल्या संशोधनातुन सिद्ध झाले आहे.
10 Jun 2012 - 3:58 pm | मन१
डासच नव्हे मिपावरचे अनेक धागेही बरेच "चावतात". त्यांचं काय करावं म्हणता?
10 Jun 2012 - 7:01 pm | पक पक पक
डासच नव्हे मिपावरचे अनेक धागेही बरेच "चावतात". त्यांचं काय करावं म्हणता?
प्रतिसाद देउन उलट चावायची चांगली सोय आहे ..... अन चावरे प्रतिसाद असतातच की :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
10 Jun 2012 - 7:29 pm | विजय मुठेकर
कुठेतरी आंजावर वाचल्याचे स्मरते .........
डासांवर जालीम उपाय म्हणजे त्यांची नसबंदी करायची ........ हसू नका.....
म्हणजे, आजूबाजूची डबकी साफ करावी, झाडांवर औषधे फवारावी, वगैरे वगैरे.......
10 Jun 2012 - 8:34 pm | कापूसकोन्ड्या
डासांवर जालीम उपाय म्हणजे -------
लोक आंजा वर काहीही वाचतात उद्या म्हणाल, **ध फुकट वाटा (अर्थातच डासांसाठी)
10 Jun 2012 - 9:09 pm | आशु जोग
ढेकणांबद्दल का मूग गिळून गप्प बसलेत सगळे
त्यांच्या दहशतवादाने झोप उडवलीये आमची
डास डास डास. ढेकूण दिसत नाहीत वाटते कुणाला...
डासांना निदान मच्छरदाणी तरी आहे, ढेकणांना काय ?
पांघरूण डोक्यावरून घेतले तरी मेले शिरतात आत. निलाजरे कुठले ?
डास आवाज करत, वॉर्निंग देत येतात. ढेकणांचे काय...
सगळ आपलं गुपचूप.
या दहशतवादाचा सामना कसा करायचा ते सांगा...
11 Jun 2012 - 7:53 am | ५० फक्त
रिंग रिग रिंगा हे गाणं ऐकवत जा, गणपतीची गाणी लावुन गणपति प्रसन्न होतो अशी एक भावना आहे, तसं हे ढेकणांचं गाणं लावल्यानं ते प्रसन्न होतील अशी एक अंधश्रद्धा असायला काय हरकत आहे.
11 Jun 2012 - 2:09 pm | बाळ सप्रे
इलेक्ट्रिक चार्ज असलेली रॅकेट खूपच प्रभावी आहे.
जेवढे जास्त डास तेवढी जास्त मजा येते डास मारायला :-)
11 Jun 2012 - 10:14 pm | सुनील
जीवो जीवस्य जीवनम्
तुमच्या रक्तावर डासांचा प्राण अवलंबून आहे. त्यांच्या तोंडाचा घास असा काढून घेणे योग्य नाही!
कुठे फेडाल ही पापं?
नरकात जाल (आणि पुढचा जन्म डासांचा मिळेल! ;))
11 Jun 2012 - 11:12 pm | विकास
डासाचे ऑम्लेट केले तर काय होईल? :-)
12 Jun 2012 - 12:53 am | सुनील
डासाचे ऑम्लेट केले तर काय होईल?
डास कमी करण्याचा प्रभावी उपाय!!
कारण आम्प्लेट करायचे झाले तर ते डासांच्या अंड्यांचे करावे लागेल. म्हणजेच शेकडो-हजारो "भावी" डास मूळात पैदाच होणार नाहीत!!
काय भन्नाट ऐड्या आहे :)