कवड्या तुझी धाव आहे
शुन्या कडून शुन्या कडे
पंच्याऐंशी वाचनांनंतरही
नि:शब्द जालाचे कडे
ऐकून होतो मायाजाली
दुर्लक्षील्या जातो जो नडे
समजती अनुभवांती वेडे
सरळास लाभती वाकडे
प्रतीसाद आभास मायावी
असतील काही सत्यही थोडे
का अट्टाहास करशी भूलीचा
जाणूनी पाखरू दूर जाया उडे
प्रतिक्रिया
28 Jul 2008 - 8:44 am | विसोबा खेचर
वेगळीच कविता...!
29 Jul 2008 - 2:38 am | चतुरंग
कुठल्या लिखाणाचा हा उल्लेख आहे?
बाकी काव्यात गुंफण्याची शैली आवडली!:)
चतुरंग
29 Jul 2008 - 4:27 am | अरुण मनोहर
९१ वाचनांनंतरही
http://www.misalpav.com/node/2687
कोई गम नही यार! मायावी दुनीयेत सारेच चालते.
29 Jul 2008 - 10:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऐकून होतो मायाजाली
दुर्लक्षील्या जातो जो नडे
समजती अनुभवांती वेडे
सरळास लाभती वाकडे
प्रतीसाद आभास मायावी
असतील काही सत्यही थोडे
का अट्टाहास करशी भूलीचा
जाणूनी पाखरू दूर जाया उडे
मनोहर साहेब, जालावरील काही गोष्टींचं फार मनावर घ्यायचं नाही. आपण लिहित राहावे आपल्यासाठी ( असे म्हणने सोपे आहे) वाचणारे वाचतील, प्रतिसाद देणारे देतील. तेव्हा आपल्या कवितेतला भाव आमच्यापर्यंत पोहचला आपण लिहित राहा !!!
अवांतर : कुबड्या तुझी धाव आहे, शुन्या कडून शुन्या कडे असे वाचले :) ( ह्.घ्या. )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
30 Jul 2008 - 2:09 am | llपुण्याचे पेशवेll
कोणी येतो लिहीतो कविता लिही अनुभव कोणी तगडे
लिहीतो कधी कोणी नवखा सुंदर काही बोल बोबडे
लिही कोणी चारोळी कोणी पाककृतीही बरवी
लिही कोणी विडंबनेही कवितेहून बरवी
लिही कोणी शास्त्रार्थ कोणी ऋषितुल्याची कहाणी
लिही कोणी संस्कृत कोणी गाण्याची कहाणी
लिही कोणी नाट्याची समिक्षा आणि पंढरीची वारी
प्रतिसादावीण नसे का कधी लिहीण्याची गंमत भारी
(अचंबित)
पुण्याचे पेशवे
30 Jul 2008 - 8:01 am | सखाराम_गटणे™
लिहणार्याने लिहीत जावे, वाचणाराने वाचत जावे,
ऐक दिवस दिवस, वाचता वाचता, लिहणाराचे हातच घ्यावेत.
भौ, इतकं मनावर नाही घ्यायचे.
सखाराम गटणे