क्रुझची सफर -- टेक्सास ते मेक्सिको - १

टुकुल's picture
टुकुल in जनातलं, मनातलं
16 Jan 2012 - 7:41 am

लग्न होवुन एक वर्ष भरभर गेले आणि लग्नाचा पहिला वाढदिवस जवळच आला होता, बायकोला आधी एकदा म्हणालो होतो कि आपण कधीतरी क्रुझ वर फिरायला जावु. आता अस बोललोच होतो आणी काहीतरी वेगळे म्हणुन विचार केला कि लग्नाचा पहिला वाढदिवस क्रुझ वर साजरा करुयात.

एका मित्राच्या अनुभव आणी सल्ल्यानुसार, दोन एक महीने आधिच चौकशी सुरु केली. ठरवलेल्या दिवशी ऑफिसमधुन सुट्टी भेटायची पण खात्री नव्हती. विचार केला जे होईल ते बघता येईल, आधी बुकींग करुन टाकुत. लग्नाच्या तारखेला बोटीवर असु एवढी एकच अट ठेवुन सुरु केली शोधाशोध आणी कार्नीवलची गॅलव्हेस्टन -- प्रोग्रेसो -- कोझुमल -- गॅलव्हेस्टन अशी पाच दिवसांची सफर बुक केली. खाली दाखवल्याप्रमाणे आमच्या सहलीचा कार्यक्रम होता.

बुकींग तर झाली, पण आम्ही अमेरिका सोडुन मेक्सिकोला जात होतो आणी आमच्याकडे फक्त अमेरिकेचा व्हिसा होता, आता काय करायच? कार्नीवलच्या कस्टमर केअर ला फोन केला, तर त्यांनी सांगीतल कि तुमच्या देशाच्या दुतावासाशी सपंर्क साधा, या उत्तराने प्रश्न अजुनच अवघड झाला. परत एकदा प्रयत्न करुन पाहीला, आणी यावेळी कस्टमर केअरच्या एका महिलेला याबद्द्ल माहीती होती, तिने सांगितले कि आम्ही एकावेळी मेक्सिको च्या जमिनीवर २४ तासांपेक्षा कमी वेळ असणार, त्यामुळे आम्हाला तिकडच्या व्हिसाची गरज नव्हती, पण आम्ही अमेरिका सोडुन परत अमेरिकेत येणार होतो, त्यामुळे आमच्याकडे मल्टीपल एन्ट्री वाला व्हिसा हवा, जो आमच्याकडे होता. झालो निवांत. खाली दाखवलेली आमची बोट, बायकोला अजुन सांगीतल नव्हत, तिला थोडा संशय आला पण तिला वाटल नाही कि मी अस काही मोठ ठरवेल.

ठरवल्याप्रमाणे वाढदिवशी तिला तिकिटाचा लिफाफा दिला, वरती लावलेल्या फोटोवरुन तिला वाटल कि ते जहाजांच्या फोटोंच ग्रिटींग आहे . आत तिकिटं बघुन आभाळ ठेंगण झाल होत बाईसाहेबांच, नंतर जमिनीवर आल्यावर मला शिव्या पडल्या कि "आधी का नाही सांगीतल? मला तयारी करायला आता फक्त १० दिवस? तुम्ही नेहमी असच करता !!! " मी निशब्द.

सर्व काही सुरळीत चालु होत, सुट्टी पण मिळाली ऑफिसमधुन. आम्हाला डॅलस ते गेल्व्हेस्टन आमच्या गाडीने जायच होत म्ह्णुन लवकर निघायच ठरवुन उशीराच निघालो. जाता जाता ह्युस्टन लागल.

धावत-पळवत (गाडीला) बरोबर वेळेला पोहोचलो. समोरच आमच जहाज धक्याला लावलेल होत, फोटोसारख सुंदर आणी भव्य होत ते, आणी तिथुन सुरु झाला एक निंतात सुंदर प्रवास. प्रवाशांच्या सुविधांसाठी सर्व काळजी घेतली गेली होती. आमच्या बॅगां चेक ईन करुन आत गेलो. आत ३ ते ११ माळ्यापर्यंत रहायच्या रुम्स होत्या, १२ वा आणी तेरावा मजला हे खाणपिण आणी फिरण्यासाठी मोकळे होते. हा आमचा रुम, छोटासा पण एकदम मस्त.

फ्रेश झालोत आणी जेवायला बाहेर पडलो. खायची प्यायची एवढी ऐश आणि प्रकार मि कुठे पाहिले नव्हते. एवढी ठिकठीकांणावरुन आलेली लोक होती, त्यामुळे सर्व प्रकारच जेवण उपलब्ध होत आणी गरमागरम पिझ्झा आणि डेली (मराठी?) पदार्थ तर चोवीस तास उपल्ब्ध होते

नंतर फिरायला निघालो आणि तिथे देवाची कृपा माझ्यावर झाली, झाल काय कि बाहेर पडल्यावर एक कर्मचारी तिथे काही ड्रींक देत होता, मला वाटल असेल काहीतरी चांगल म्ह्णुन बायकोसाठी घेतल. तिने विचारले हे "'टकीला' काय असत'". मी "दारु, का काय झाल?" बायको "यामधे ते आहे, तिकडे बारीक अक्षरात लिहिल होत". मि जावुन कर्मचार्‍याला विचारुन आलो, तर ते बर्‍याच 'दारवा' टाकुन बनवलेल ड्रिंक होत. बायकोने तोंड वाकड करुन ते माझ्या हातात दिल. मी वर देवाकडे बघुन देवाला धन्यवाद दिले आणी २ थेंब शिंपडले. देवाच्या कृपेशिवाय किंवा बायकोच्या माहेरी जाण्याशिवाय दुपारी दारु प्यायला भेटणे अशक्य.

संध्याकाळ झालेली होती, सर्वात वरच्या डेकवर हा भलामोठा टिव्ही लावला होता आणी गाणी चालु होती.

रात्रीच्या जेवणासाठी वेगळी व्यवस्था होती. सर्व प्रवाश्यांना दोन मोठ्या (पॅरीस आणी लंडन) डायनींग हॉल मधे विभागण्यात आल होत. प्रत्येकासाठी वेगवेगळा टेबल राखुन ठेवलेला होत, पुर्ण प्रवासादरम्यान तुमच रात्रीच जेवण तिथेच होणार. प्रत्येक रात्रीसाठी एक फिक्स्ड आणी एक नवा असे दोन मेनु होते. फिक्स्ड मेनु मधे भारतीय शाकाहारी पदार्थ पण होते. आमच्या टेबलवरुन काढलेला हा फोटो.

जेवण करुन आणी थोड फिरुन आम्ही रुमवर परत गेलो. अंथरुणात पडल्यावर जहाजाच्या हेलकाव्यांची थोडी थोडी जाणीव होत होती. थकलेलो असल्यामुळे लगेच झोप लागली आणी जाग आली ती दुसर्‍या दिवशी सकाळीच. हा दिवस आम्ही पुर्णपणे समुद्रात प्रवासातुन घालवणार होतो.

(क्रमशः)

प्रवासदेशांतरजीवनमानअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

रेवती's picture

16 Jan 2012 - 8:22 am | रेवती

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
क्रूझचे फोटू आणि वर्णन झकास.
पुढील लेखन लवकर येऊदे.

यकु's picture

16 Jan 2012 - 8:52 am | यकु

मस्त.
आणखी येऊ द्या.

मन१'s picture

16 Jan 2012 - 9:22 am | मन१

झक्कास.

सुनील's picture

16 Jan 2012 - 9:33 am | सुनील

सुंदर वर्णन!

शुभेच्छा!

मोदक's picture

16 Jan 2012 - 9:45 am | मोदक

छान वर्णन..

मस्त रे, येउद्या प्रत्यक्ष प्रवासाची वर्णनं,

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

लग्नाच्या तारखेला बोटीवर असु एवढी एकच अट ठेवुन सुरु केली शोधाशोध ,

ठरवल्याप्रमाणे वाढदिवशी तिला तिकिटाचा लिफाफा दिला, वरती लावलेल्या फोटोवरुन तिला वाटल कि ते जहाजांच्या फोटोंच ग्रिटींग आहे . आत तिकिटं बघुन आभाळ ठेंगण झाल होत बाईसाहेबांच, नंतर जमिनीवर आल्यावर मला शिव्या पडल्या कि "आधी का नाही सांगीतल? मला तयारी करायला आता फक्त १० दिवस?

हे काय समजले नाही ?

टुकुल's picture

16 Jan 2012 - 10:08 am | टुकुल

टप्या ट्प्यात लिहिल आहे, त्यामुळे काही लिहायच राहुन गेल.

बायकोचा वाढदिवस २ नोव्हेंबरला असतो आणि लग्नाचा १४ नोव्हेंबरला, त्यामुळे मि ती तिकिटे तिच्या वाढदिवशी तिला दिली आणि आमची क्रु़झ १२ नोव्हेंबर पासुन सुरु होणार होती.

(एका दगडात दोन पक्षी मारले :-) एकच गिफ्ट दोन्ही वेळेसाठी )

--टुकुल.

खुलाश्याबद्दल धन्यवाद. मलाही असेच काहीसे वाटले होते.

अहो तुमच्या कडे अमेरीकेचा व्हिसा असेल तर मेक्सिकोला जायला व्हिसा लागत नाही... हा पण अमेरिकेचा व्हिसा मात्र मल्टीपल ऐंट्री असावा लागतो .. मी कॅन्कून ला फक्त अमेरिकेच्या व्हिसावर जाउन आलो आहे... ४ दिवसांसाठी...
शिवाय आमची कंपनी ही आय-९४ वाढवायचा असेल तर मेक्सिकोला पाठवते कारण कॅनडाला व्हिसा लागतो... असो .. टेक्सासलाच आहात तर परत जाता येईल...
बाकी वर्णन आणि फोटो येऊद्यात...

टुकुल's picture

17 Jan 2012 - 2:17 am | टुकुल

हे मला माहीत नव्हते, पहिल्यांदाच ऐकले, नवीन माहीती बद्दल धन्यवाद.

--टुकुल.

मर्द मराठा's picture

16 Jan 2012 - 10:33 am | मर्द मराठा

काही तरी लोच्या झाला वरील प्रतिक्रिया प्रकाशित करताना .. क्षमस्व ...

कुंदन's picture

16 Jan 2012 - 10:48 am | कुंदन

मल्टीपल ऐंट्री मु़ळे मल्टीपल प्रतिसाद आलेले दिसतायत. ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2012 - 12:27 pm | अत्रुप्त आत्मा

छान..छान..अता पुढचा भाग येऊद्या लवकर... :-)

छान छान.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..

बाकी क्रूझचा प्लान मात्र सॉलिड..

- पिंगू

गणेशा's picture

18 Jan 2012 - 4:46 pm | गणेशा

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
क्रूझचे फोटू आणि वर्णन झकास.
पुढील लेखन लवकर येऊदे.

बाकी तुमच्या सारखे आम्हाला पण असे एका दगडात दोन पक्षी मारता येणे खुप सोप्पे असल्याने हायसे वाटले..
तुमच्याकडे १२ दिवसांची गॅप आहे, आमच्याकडे फक्त १ दिवसाचीच.. त्यामुळे आनखिनच मज्जा

[:)]
चला एक एक होउन जावुद्या

खेडूत's picture

19 Jan 2012 - 1:14 am | खेडूत

सुंदर वर्णन, आणि फोटोपण!

मराठमोळा's picture

19 Jan 2012 - 4:33 am | मराठमोळा

शुभेच्छा आणि पुढील भाग लवकर येऊद्या.

अवांतरः माझ्या एका मित्राने नुकतीच ही मेक्सीको क्रुझ परीक्रमा पुर्ण करुन फटु चेपुवर टाकले होते.. ते फार आवडले होते.

पैसा's picture

19 Jan 2012 - 2:52 pm | पैसा

आणि फोटो सुद्धा. पुढचा भाग लौकर येऊ द्या!

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2012 - 3:54 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचतोय.