उनाड दिवस .... मेणवली घाट.

प्यारे१'s picture
प्यारे१ in कलादालन
27 Dec 2011 - 5:24 pm

वल्लीनं आमच्या अनुपस्थितीत आमच्या खोर्‍यात चढाई करुन सारा मुलूख काबीज केला म्हटल्यावर आम्हालाही स्फुरण आलं. पूर्वीच कधीतरी काढलेली ही प्रकाशचित्रं आम्हाला खुणावू लागली आणि आम्ही ठरवलं की काही अस्पर्श भूभाग लोकांसमोर आणावा.

बघा आवडला तर....
१. मेणवली घाट. पायर्‍या आणि झाड (स्वदेस )

२. मेणवली घाट. मंदिर (शिंगम/चिंगम)

३. मेणवली घाट.

४. डु.

५. हेच ते सिंघम मधले मंदिर .

६. कृष्णा नदी.

७. घाट थोडा शेवाळलाय.
temple

८. घंटा (स्वदेस मधलं चरणपूर वालं मंदिर)

९. शिवमंदिर (सिंघम)

१०. राजपाल यादव च्या लेडिज टेलरचं शूटिंग पण इथेच झालेलं. (लक्ष्याच्या तीळ वाल्या बाईच्या शोधा च्या फालतू पिक्क्चरचा फालतू रिमेक) :(

११. विष्णूमंदिर.

प्रवासवावरराहती जागाराहणीमौजमजाछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

27 Dec 2011 - 5:25 pm | प्यारे१

काहीतरी घोळ झालाय. संपादक मंडळ एफ१, एफ१, एफ१

प्रचेतस's picture

27 Dec 2011 - 5:50 pm | प्रचेतस

प्यारेकाका, कुठे घसरलात?

छोटा डॉन's picture

27 Dec 2011 - 6:46 pm | छोटा डॉन

फोटोंची दुरुस्ती केली आहे.
अजुनही काही समस्या असल्यास कळवणे.

- छोटा डॉन

प्यारे१'s picture

28 Dec 2011 - 9:16 am | प्यारे१

@छोटा डॉन.
धन्यवाद
चरणपूर मंदिराच्या ऐवजी आधीचाच फोटो आला आहे तो बहुधा लिंक मध्ये मिळू शकेल .
शेवाळलेला घाट हा फोटो दिसत नाहीये.

@ ऑल,
ह्या मंदिरांचा इतिहास मला खरंच ठाऊक नाही. नाना फडणवीसांचं मूळ गाव हेच आहे आणि त्यांच्या काळात ही मंदिरं उभारली गेली असावीत.
नानांचा वाडा जवळच आहे . पण तिथं भव्य दिव्य अथवा पेशवे कालीन विशेष काही मला तरी आढळले नाही.
वल्ली अथवा आणखी कोणी इतिहासकार जर बरोबर येईल तर त्याला हे डिटेल्स कळू शकतील.
हल्ली इथं चित्रपटाची/ जाहिरातींची चालणारी शूटींग्ज फारच जोरात असतात. म्हणून तो उल्लेख केला इतकंच.
जे जे चांगलं दिसतं/ दिसलं ते ते टिपावं एवढीच इच्छा मनी बाळगून हे फटु काढले आहेत. बस्स.
उगाच चुकीची माहिती न दिली जावी . माहिती करुन घेण्याची इच्छा एकाचवेळी आहे नी नाही देखील. कालौघात सगळंच बदलतं. इतिहासाला कवटाळून बसण्यापेक्षा त्यातून काही शिकून नवीन काही घडवता आलं पाहिजे. हे आपलं व्यक्तीगत मत. घर या परिसरात असल्यानं थोडंसं 'घर की मुर्गी दाल बराबर' झालंय हे मात्र तितकंच खरं.

पियुशा's picture

29 Dec 2011 - 10:23 am | पियुशा

झक्कास फोटुज ;)

आबे फटु का पुढच्या धाग्यात टाकणार आहेस काय......

वसईचे किल्लेदार's picture

27 Dec 2011 - 5:59 pm | वसईचे किल्लेदार

किमान क्रमशा: तरी लिहा बुवा☺

प्यारे, फोटो मस्त!

आणखी थोडं बरोबरीने माहितीपर लिखाण झालं असतं तर फोटोंचा लुफ्त अधिक उठवता आला असता....

वपाडाव's picture

28 Dec 2011 - 9:57 am | वपाडाव

लुफ्त हा शब्द लुत्फ असा लिहावा अन वाचावा सुद्धा

प्रास's picture

28 Dec 2011 - 4:22 pm | प्रास

धन्यवाद वपा.....!

पाषाणभेद's picture

29 Dec 2011 - 3:18 am | पाषाणभेद

अरे पण तो लुफ्त हा शब्द मिपा ने तयार केलेला आहे!

मदनबाण's picture

27 Dec 2011 - 7:18 pm | मदनबाण

मस्तच... :)

सुहास..'s picture

27 Dec 2011 - 7:23 pm | सुहास..

आआआआआआवडल्या गेले आहे

प्रशांत's picture

27 Dec 2011 - 7:27 pm | प्रशांत

सगळे फोटो मस्तच
दुसरा अप्रतिम..

निवांत पोपट's picture

27 Dec 2011 - 7:30 pm | निवांत पोपट

जिस देशमे गंगा रहता है मध्ये गोविंदा ज्या पारावर बसलेला दाखवलाय तो पार १० नंबरच्या फोटो मध्ये दिसतो.शिवाय खालील गाण्याचे शूटिंग पण मेणवली येथे झालेय.

अन्या दातार's picture

27 Dec 2011 - 7:34 pm | अन्या दातार

दादा, ते ६ आणि ८ लंबरचा फटू येकच दिसतुया की.
बाकीचे चांगले आहेत हे वे सां न ल :)

कुणाचेच कसे लक्ष गेले नाही या गोष्टीकडे???

प्रचेतस's picture

27 Dec 2011 - 7:44 pm | प्रचेतस

दिसले रे. फटू शेवटी दिसले. लैच भारी आहेत.
ही मंदिरे सगळी नाना फडणवीसांनी बांधलेली आहेत का?
नानांच्या मेणवलीतल्या वाड्याचे फोटो पण अपलोड कर.

(अन्याशी सहमत. शिवाय तो घंटा-स्वदेस मधलं चरणपूर वालं मंदिराचा फटू गायबलेला दिसतोय.)

गणेशा's picture

27 Dec 2011 - 8:26 pm | गणेशा

मस्त फोटो प्यारेजी

जयंत कुलकर्णी's picture

27 Dec 2011 - 10:06 pm | जयंत कुलकर्णी

मस्त फोटो ! खरेच मस्त फोटो.................

कवितानागेश's picture

27 Dec 2011 - 11:09 pm | कवितानागेश

सुन्दर

मी-सौरभ's picture

28 Dec 2011 - 12:17 am | मी-सौरभ

ईथे एवढे पिक्चर बनलेत प्रत्येक फोतोतली जागा बघितल्यासारखी वाट्ते
प्रकाश झा च तर हे आवडतं मिनी बिहार आहे. गंगाजल, अपहरण ईथेच बनवलेत त्याने.

चित्रपटांच्या उल्लेखांनी ह्या रमणीय परिसराची ओळख करून देणे योग्य नाही. आपल्या पुर्वजांनी केलेले अतूलनिय कर्तूत्वाची साक्ष या पुरातन वास्तू देत आहेत. त्याबद्दल आधी चार शब्द लिहून मग एखाद्या ओळीत चित्रपटांचा उल्लेख आला असता तर चांगले झाले असते असे वाटते.
फोटो बाकी फारच सुरेख आले आहेत. विष्णूमंदिरे फारशी आढळत नाहीत. येथील विष्णूमंदिरदेखील असल्याच मोजक्या मंदिरांपैकी असावे.

इन्दुसुता's picture

28 Dec 2011 - 7:20 am | इन्दुसुता

छान फोटो... बाकी पाभें शी बाडीस.

फोटो सुंदर..

बादवे सर्व चर्चा वाचली. मुदलात हे ठिकाण कुठेशी आहे हे कोणी सांगेल का?

धन्यवाद.

-(अडाणी) गवि

प्यारे१'s picture

28 Dec 2011 - 10:05 am | प्यारे१

पुणे महाबळेश्वर राज्य महामार्गावर वाई नावाचे एक तालुक्याचे शहर आहे.
वाईपासून २.५-३ किमी वर थोडे आत हे सुंदर ठिकाण आहे.
कधी येताय? ;)

जानेवारीत येणारय. तेव्हा थोडे डायव्हर्शन करुन नक्की बघीन.

तसंच पुढं धोम धरणाकडं जा. धरण देखील मस्त आहे.
धोम गावात नृसिंह मंदिर आहे.
तेही अतिशय सुंदर आहे.
तिथली पुष्करिणी तर लाजवाब आहे.
फटु आहे बहुतेक. बघतो.
(साला, फोटो टाकणं अजून नीट जमत नाय ओ आमाला)

michmadhura's picture

28 Dec 2011 - 11:08 am | michmadhura

सगळेच फोटो खूप छान आहेत प्यारे.

अमृत's picture

28 Dec 2011 - 3:36 pm | अमृत

रविवारीच तुनळीवर 'स्वदेस' पाहिला आणि विकीवर जाऊन मेणवली विषयी वाचाले. आणि आता हे सगळे फोटो. ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे.

फोटोंबद्दल धन्यवाद.

अमृत

धमाल मुलगा's picture

28 Dec 2011 - 4:08 pm | धमाल मुलगा

नाऽदखुळा फोटो अन नाऽदखुळा जागा!

कवा जायाचं रं भौ? :)

प्यारे१'s picture

28 Dec 2011 - 4:15 pm | प्यारे१

निसतं फोनवा द्येवा.... !
गावाला जायाला कोन न्हाई म्हनतंय व्हय?

धमाल मुलगा's picture

28 Dec 2011 - 4:38 pm | धमाल मुलगा

करु तिच्यामारी एखादा झटका! :)

~ वाहीदा (एक वाईकर)

वपाडाव's picture

28 Dec 2011 - 4:28 pm | वपाडाव

हा वाड्याचा फटु किती सालचा आहे ??

पैसा's picture

28 Dec 2011 - 6:42 pm | पैसा

गेले २/३ दिवस नेट बंद असल्याने मोबाईलवरून हे फोटो पाहता आले नव्हते. पण आज रुखरख गेली. फार छान.
त्या पिच्चरांच्या कहाण्यात मला फार रस नाही, पण नानांच्या वाड्यात जुनी चित्रं होती. त्यांचे फोटो मिळतील का?