" लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा "
काल अचानक गप्पाच्या ओघात लहानपणा विषयी गप्पा निघाल्या आणि मन अचानक गावाकडे चक्कर मारून आले. लहान पणाची मजा काही औरच, ती मजा, ती धमाल, तो बिनधास्त पणा मोठे पणी नाही सापडत हो. प्रत्येक गोष्टी मला आठवतात अजून. आमच्या गावाला पाणी टंचाई खूप मला तर आमच्या नळाला पाणी कधी आले ते पण आठवत नाही. नळाच्या खड्डया चा उपयोग आम्ही लपंडाव खेळायला करत असू , एखादा माणूस सहज गडप होईल असे ते खड्डे असत.
मग प्रत्येक मोसमात सगळ्या मित्र मंडळीची स्वारी कुठल्या तरी शेतावर असायची. टहाळ, ऊस, हुरडा, कैऱ्या, बोरे, चिंचा ह्या सगळ्या गोष्टी झाडावरून तोडून खाण्यात काही वेगळीच मजा असायची, जेव्हा शेतात पाणी आन न्या साठी आमी जायचो तेव्हा हंड्यात दोन चार कैऱ्या चोरून आणण्या मध्ये काहे वेगळेच शौर्य आहे असे आमाला वाटायचे. काही म्हणा शेतातल्या गोष्टी शेतात खाण्यात वेगळी टेस्ट असते. शेता मधल्या हुरड्याची चव इथे मार्केट मधून घेतलेल्या हुरड्याला नसते. गावाकडच्या गुराळात कधी उसाचा रस व गुळाची चव चाखली आहे का ?? इथे इथल्या वातावरणात एक आर्टीफिशीयल चव जाणवते.
विटी-दांडू , गोट्या, चिंचुके, सुरपारंबी हे आमचे आवडीचे खेळ असत.क्रिकेट पण खेळायचो पण जास्ती नाही कारण क्रिकेट खेळताना कॉलनी तल्या लोकांच्या जाम शिव्या पडायच्या व नेहमी आमचा बॉल जप्त व्हायचा आणि पैसे नसल्या मुले नवीन बॉल आणायला परवडा यचे नाही. तर मग जुने पायमोजे मध्ये चिंध्या भरून बॉल तैयार केल्या जायचा कारण तो हरवला तरी दुख: नसायचे.
खरच किती छान होते लहानपणीचे दिवस हे आता जाणवते, लहान पणीच्या आठवणी हा तर आता दंत कथा झाल्या सारखी वाटते. कधी वाटते लहान व्हावे आणि मुक्त पणे आयुष्य जगावे. आता म्हणजे यंत्र मानवासारखे घडाळ्याच्या काट्यावर पळावे लागते. आला दिवस गेला दिवस करून आठवडा complete करायचा आणि वीकेंड ला तंगड्या वर करून लोळत पडायचे.
बदलते राहणी मान आणि विचारसरणी या मुळे आता च्या लहान मुलावर पण खूप फरक पडला. आता हेच बघा शेत किवा गावाकडच्या गोष्टी सांगितल्या तर नवल वाटते हल्लीच्या लहान मुलांना, भावाच्या ४ वर्ष्याच्या मुली ला गाय म्हैस दाखवायला special गावाकडे ट्रीप करून यावी लागली. हातापायाला माती लागली म्हणून ती रडू लागली. आम्ही तर बिना चपलीचे अर्धा गाव पालथा घालून येत. खेळताना हात पाय तर मातीत रापलेले असत. अजूनही मी गावाकडे गेलो कि शेतात बूट न घालता फिरतो. मातीचा स्पर्श खूप सुखावून जातो. लहान पण फक्त आठवणीत उरले आहे.
माझे लहान पण तसे खेड्यातले, ८ वी झाली कि घरच्यांनी मला शहरात पाठवले. शहरात राहण्याचे फायदे झाले पण तोटे मात्र जास्त झाले. शहरी वातावरणात माझा जीव मात्र गुदमरायला लागला. मी बर्यापैकी एकल-कोंडा आणि भावना शून्य झाले हा मात्र घर सोडल्याचा व शहराचा परिणाम आहे आहे हे मात्र मी नाही समजू शकलो. त्या मुळे "गड्या आपला गाव बरा" असे म्हणायची पाळी आली.
प्रतिक्रिया
1 Dec 2011 - 3:48 pm | पियुशा
टहाळ, ऊस, हुरडा, कैऱ्या, बोरे, चिंचा ह्या सगळ्या गोष्टी झाडावरून तोडून खाण्यात काही वेगळीच मजा असायची,
काहीतरी चुकल्यासारख वाट्तय नै ;)
1 Dec 2011 - 3:51 pm | विवेकखोत
सगळ्या साठी एक शब्द वापरला म्हुणुन असे वाटत असेल तुमाला अहो भावना समजून घेत जा कधी कधी
1 Dec 2011 - 3:55 pm | पियुशा
ब्वार्र...............
भावना पोहचल्या बर्र का ;)
1 Dec 2011 - 5:25 pm | कपिलमुनी
नव्या होतकरु लेखकांची पिळवणुक चालली आहे ..
1 Dec 2011 - 6:33 pm | वपाडाव
पिवशे, ते तु खौ घालणार आहेस ना.....५०रावांना प्रॉंमिस केलयंस ना!!!
येतच आहोत बघ सगळी मिपाकरं..... तुझ्या शेतात हुरडा खायला.......
1 Dec 2011 - 6:52 pm | सोत्रि
ए...
मी पण, मी पण...... माsssलाssss पण न्या नाsssss
- (बाल) सोकाजी
1 Dec 2011 - 7:07 pm | मन१
हे असे शिक्रेट शिक्रॅट प्लान ठरताहेत काय प्रायवेटम्धी?
आता इथं पब्लिकमधी हे प्लान सांगण्याचा शानपना केलाच हायसा तर जरा आवतन(आमंत्रण ) पन द्या की.
आमीबी येउ चार घास गिळायला अन दोस्तांना भेटायला.
2 Dec 2011 - 9:56 am | पियुशा
तुझ्या शेतात हुरडा खायला.......
माझ्याकडे शेतच नैय्ये ;)
2 Dec 2011 - 9:36 pm | कपिलमुनी
खेळयला चालु करा
1 Dec 2011 - 3:49 pm | तर्री
खोतानु ,
फॅश बॅक मधे आत्मचरित्र सुरु आहे असे वाटते आहे.
लग्नाचे प्रकरण ( व प्रतिसाद) जोरदार झाले. आता बालपण कसे जाते पाहुया !!!
वाचतो आहे.
1 Dec 2011 - 3:57 pm | विवेकखोत
अहो मला सांगा काल पासून मला वाटते बरेच entertainment झाले असेल न तुमचे पण लिखाण हळू हळू सुधारेल ते हि तुमच्या मार्ग दर्शाना मुळे थोड्या फार चुका होतील पोटात घालून घ्या. :)
1 Dec 2011 - 3:50 pm | स्पा
निबंध बरा होता
वार्षिक परीक्षेत अस लिहू नकोस हा
१० पैकी ५ मार्क
आणि हो .... जाताना परा गुर्जींकडून डायरी घेऊन जा आठवणीने
1 Dec 2011 - 3:55 pm | विनायक प्रभू
पौगंडावस्था?
1 Dec 2011 - 5:31 pm | कपिलमुनी
American Pie
इंग्रजी मधे लिहिलेले बरे ..नाहितर मिपाकर 'पाय' ओढायचे
1 Dec 2011 - 4:35 pm | मोहनराव
<<कधी वाटते लहान व्हावे आणि मुक्त पणे आयुष्य जगावे.>>
ते कशाला? खोतानु आता नको लहान व्हायला परत..लग्न होणार आता तुमचे!! मुक्तपणे (?) आयुष्य जगालच की आता!! ;)
हलकेच घ्या!! बाकी लेखन सुधारते आहे. लिहीत रहा असेच.
अवांतर: तुम्ही मिपा सेलिब्रिटी झालात असं वाटाया लागलयं. फुलटु पॉप्युलर!!
1 Dec 2011 - 5:07 pm | प्रभाकर पेठकर
गावच्या आठवणींनी मन व्याकुळ होणे समजू शकते. गावच्या, बालपणीच्या आठवणी लिहीण्याचा प्रयत्न चांगला जमला आहे.
गावाची 'वाहवा!' करताना जिथे आपण उच्च शिक्षण घेतलं, नोकरी करून बर्यापैकी पैसा कमवला त्या शहराला कमी लेखताना आपण शहरावर काही अन्याय करतो आहोत असे नाही वाटंत?
शेता मधल्या हुरड्याची चव इथे मार्केट मधून घेतलेल्या हुरड्याला नसते. गावाकडच्या गुराळात कधी उसाचा रस व गुळाची चव चाखली आहे का ?? इथे इथल्या वातावरणात एक आर्टीफिशीयल चव जाणवते.
गुराळात नाही गुर्हाळात. इथल्या वातावरणात का आर्टिफिशियल चव जाणवते? उस गावाकडचा, (शहराचा नाही), रस काढणारा गावाकडचा (शहरी नाही), बर्फ नको असेल तर नाही सांगता येतो. आलं, लिंबू सुद्धा अस्सल असतं नकली नाही. मग चव आर्टिफिशियल का? तशी वाटत असेल तर तो रस पिणार्याचा दोष असेल (गावातून मनाने बाहेर पडता येत नाही हा..) शहराचा नाही.
भावाच्या ४ वर्ष्याच्या मुली ला गाय म्हैस दाखवायला special गावाकडे ट्रीप करून यावी लागली.
मी तर महात्मा फुले मंडई, दादर मंडई, अनेक देवळे इथे गायी बघितल्या आहेत. म्हशीही, जोगेश्वरी पासून पश्चिम उपनगरात सर्वत्र पाहिल्या आहेत.
शहरात राहण्याचे फायदे झाले पण तोटे मात्र जास्त झाले. शहरी वातावरणात माझा जीव मात्र गुदमरायला लागला. मी बर्यापैकी एकल-कोंडा आणि भावना शून्य झाले हा मात्र घर सोडल्याचा व शहराचा परिणाम आहे आहे हे मात्र मी नाही समजू शकलो
हे मात्र अती होते आहे. शहरात येऊन माणसे एकलकोंडी आणि भावनाशुन्य होतात? हा लेखकाच्या स्वभावातला दोष असेल. पण त्याचे असे सार्वत्रीकरण करता येत नाही. खेड्यातून शहरात येणार्या माणसांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडतात. 'केल्याने देशाटन...येतसे मनुजा चातुर्य फार' असे म्हंटलेलेच आहे. इथे देशाटन म्हणजे आपले राहते गाव सोडून इतर गावांमध्ये/शहरांमध्ये संचार करणे असे अभिप्रेत आहे.
गाव आणि शहरात थोडाफार फरक हा पडणारच. थोडा चांगला थोडा वाईट. पण म्हणून सरसकट गाव चांगला आणि शहर वाईट अशी वर्गवारी करणे अन्यायकारक आहे.
1 Dec 2011 - 5:11 pm | जाई.
+१
डाउन वुइथ नाँस्टाल्जिया
1 Dec 2011 - 5:21 pm | मन१
दरवेळी तुमच्या प्रतिसादाला +१ लिहायचा कंटाळा आला म्हणून आता +१ लिहायचे असले तरी बदल म्हणून -१ लिहितोय.
1 Dec 2011 - 5:29 pm | तर्री
" म्हशीही, जोगेश्वरी पासून पश्चिम उपनगरात सर्वत्र पाहिल्या आहेत "
पूर्व ऊपनगरात ही म्हशी आहेत हो....दादर पासून कल्याण पर्यंत .....
जरा अवांतर ...
1 Dec 2011 - 5:36 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या दृष्टी आवाका (आ वाका.. नाही) तेवढा नाही.
1 Dec 2011 - 5:29 pm | तर्री
" म्हशीही, जोगेश्वरी पासून पश्चिम उपनगरात सर्वत्र पाहिल्या आहेत "
पूर्व ऊपनगरात ही म्हशी आहेत हो....दादर पासून कल्याण पर्यंत .....
जरा अवांतर ...
1 Dec 2011 - 5:47 pm | विवेकखोत
नमस्कार
हा शहराचा दुस्वास नाही तर एक गावाकडची आंतरिक ओढ आहे माझा उद्देश हा होता कि तबेल्यात गाई म्हशी बघणे आणि मोकळ्या शेतात बघणे
ह्या दोन गोष्टी मध्ये बराच फरक आहे ना ! !
शहरात राहण्याचे फायदे झाले पण तोटे मात्र जास्त झाले. शहरी वातावरणात माझा जीव मात्र गुदमरायला लागला. मी बर्यापैकी एकल-कोंडा आणि भावना शून्य झाले हा मात्र घर सोडल्याचा व शहराचा परिणाम आहे आहे हे मात्र मी नाही समजू शकलो नाही हो मी अजून. हे हे मला सांगायचे होते
1 Dec 2011 - 6:00 pm | प्रभाकर पेठकर
तुम्हाला हतोत्साहित करण्याचा प्रयत्न नाही. परंतु, तुमचे स्पष्टीकरण पटणारे नाही.
खेड्याचे, गावाचे गोडवे जरूर गा. आम्हाला कौतुकच असेल पण तसे करण्यासाठी शहरी जीवनाची मोजपट्टी कशा करीता?
कुठलीही मोजपट्टी न वापरता खेडेगावच्या जीवनाचे रसभरीत वर्णन करा.
तुमच्या एकल कोंडे आणि भावनाशुन्य होण्याचे खापर शहराच्या माथी फोडू नका. हा शहराचा नाही तुमच्या स्वभावातला दोष आहे. डॉक्टरांकडे जा.(खेड्यातल्या नको, शहरातल्या डॉक्टरकडे जा).
1 Dec 2011 - 6:36 pm | उदय के'सागर
" तबेल्यात गाई म्हशी बघणे आणि मोकळ्या शेतात बघणे"
अहो ४ वर्षाच्या मुलीला हे काय कळणार हो? म्हणजे तुम्हि तिच्या साठी गेलात गावाकडे "स्पेशल" म्हणुन नमुद करावे वाटले.
बादवे, "गाई/म्हशी" गोठ्यात असतात, तबेल्यात असतात ते घोडे . नाहि, म्हणजे ईथे चुकुन लिहिलं असेल तुम्हि पण असं तुमच्या पुतणिला काही सांगु नका नाही तर लहान वयात ऐकलेली माहिती (चुकीची) ती तशीच पुढे नेईल.(ह.घ्या.)
1 Dec 2011 - 6:36 pm | उदय के'सागर
" तबेल्यात गाई म्हशी बघणे आणि मोकळ्या शेतात बघणे"
अहो ४ वर्षाच्या मुलीला हे काय कळणार हो? म्हणजे तुम्हि तिच्या साठी गेलात गावाकडे "स्पेशल" म्हणुन नमुद करावे वाटले.
बादवे, "गाई/म्हशी" गोठ्यात असतात, तबेल्यात असतात ते घोडे . नाहि, म्हणजे ईथे चुकुन लिहिलं असेल तुम्हि पण असं तुमच्या पुतणिला काही सांगु नका नाही तर लहान वयात ऐकलेली माहिती (चुकीची) ती तशीच पुढे नेईल.(ह.घ्या.)
1 Dec 2011 - 5:34 pm | विजुभाऊ
अरेच्चा तुमचा प्रवास लग्नाकडुन लहानपणाकडे चाललाय.
गावाकडे शेतात मोकळी हवा असते. घड्याळाला बांधुन जगावे लागत नाही.
बाकी हल्ली गावातली मंडळी सुद्धा बर्यापैकी बिझ्झी असतात.
तुम्ही जे म्हणताय ते गाव कदाचित ३०/३५ वर्षांपूर्वीचे असावे.
हुरडा खाताना शेतावरचे वातावरण शहरात घरात हुरडा खाताना मिळत नाही.
मुम्बई ला तर सुरतहून हुरडा येतो तो नीत बघुन घ्यावा लागतो. ( हिरव्या रंगात भिजवलेली ज्वारी असू शकते)
शहरात आल्यामुळे तुम्ही एकलकोंडे झालात हे म्हणणे चूक आहे. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न
अवांतरः पेठकर काकांच्या उपस्थितीमुळे शुद्धलेखनाकडे लक्ष्य नीट द्यावे लागणार
अतीअवांतरः पुरी शिग्रेटेचिया धूर फुंकणे | त्याचि नाम जैसे ष्टाईलणे |
तैसे कर्मनिषे अॅडिक्टणे | वाट शिध्धी ||
.
1 Dec 2011 - 5:40 pm | दादा कोंडके
तुमच्या आंघोळ करण्याची फ्रिक्वेंसी काय होती?
चोरी करण्यात शौर्य? मग उसाच्या फडामधले पराक्रम पण येउ द्या मग! :)
असो, लग्नाच्या शुभेच्छा! आधिच्या धाग्यात द्यायच्या राहिल्या होत्या.
धन्यवाद.
1 Dec 2011 - 5:52 pm | विवेकखोत
अहो ते गाव होते नळाला पाणी येत नसले तरी विहिरी वरून आमी पाणी भरत असू हे मी नमूद केले आहे
आणि शौर्य वाटत असे कारण लपवून आमी त्या कैऱ्या आणत तेवा आमी लहान होतो हो खूप जवळ पास १५ वर्षापूर्वी ..
1 Dec 2011 - 6:06 pm | दादा कोंडके
मला वाटलं पाणी टंचाई म्हणजे विहिरीलापण उन्हाळ्यात पाणी येत नसणार.
असो गैरसमज दूर केल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
तसंच तुमच्या दुसर्या स्पष्टीकरणा बद्दलपण धपन्यवाद!
पुलेशु.
1 Dec 2011 - 5:53 pm | विवेकखोत
अहो ते गाव होते नळाला पाणी येत नसले तरी विहिरी वरून आमी पाणी भरत असू हे मी नमूद केले आहे
आणि शौर्य वाटत असे कारण लपवून आमी त्या कैऱ्या आणत तेवा आमी लहान होतो हो खूप जवळ पास १५ वर्षापूर्वी ..
2 Dec 2011 - 12:26 pm | विनायक प्रभू
आंधळी कोशींबीर विसरु नका.
1 Dec 2011 - 5:58 pm | तर्री
विटी-दांडू , गोट्या, चिंचुके, सुरपारंबी हे आमचे आवडीचे खेळ असत
असो, लग्नाच्या शुभेच्छा! आधिच्या धाग्यात द्यायच्या राहिल्या होत्या.
1 Dec 2011 - 6:20 pm | उदय के'सागर
लिखाण बरे आहे.
तुम्हि पियुशातैंना मगाशी म्हणालात "अहो भावना समजून घेत जा कधी कधी", भावना समजावुन घेतल्या गेल्या आहेत, पण त्या भावना मनाला भिडल्या नाहित हो (तुमचा प्रयत्न दिसला म्हणा). म्हणजे कसं असतं ना कि गाव, बालपण, मित्रं, परिवार हे असे काहि विषय आहेत कि त्या बद्दल काहि लिहीलेलं वाचलं कि कसं आपण त्या विषयातल्या आपल्या भुतकाळात वा अनुभवात रमुन जायला हवं. आणि आपल्याला तसा अनुभव वा भुतकाळ नसेल तर कमित कमी त्या लेखातील रेखाट्लेल्या चित्राचा वा त्या पात्रांचा, परीस्थीतीचा हेवा वाटावा (म्हणजे हेवा वाट्ण्यासारखं असेल तर) असं लिखाण असावं... तसं काही वाटलं नाहि. असो, हे माझं वैयक्तीक मत आहे.
बाकी पेठकरांच्या मतांशी सहमत आणि आपणास पु.ले.शु. !
1 Dec 2011 - 6:35 pm | वपाडाव
तेव्हा येवो न येवो..... आजघडीला पाणी येणे महत्वाचे.....
काय म्हणता मास्तर !!!
1 Dec 2011 - 6:59 pm | मोहनराव
अश्लिल अश्लिल!! ;)
1 Dec 2011 - 11:00 pm | अत्रुप्त आत्मा
+११११११११११११११११११११११११११११११११ ;-) मोहनराव
2 Dec 2011 - 6:18 pm | मी-सौरभ
वाईट मनांवर कोवळे संस्कार.... ;)
1 Dec 2011 - 7:45 pm | तिमा
ग. वा. बेहेर्यांच्या 'सोबत' मधे एक टीकेविना नांवाचे सदर असायचे. ते मिपावर चालू झाले आहे काय?
2 Dec 2011 - 4:34 am | सुहास झेले
आजघडीला सुद्धा ते शौर्य टिकून आहे, याची जाणीव ह्या दोन दिवसात झालीय.....अजुन येऊ द्यात :) :)
2 Dec 2011 - 5:48 am | प्राजु
>>>>खरच किती छान होते लहानपणीचे दिवस हे आता जाणवते, लहान पणीच्या आठवणी हा तर आता दंत कथा झाल्या सारखी वाटते.
दंतकथा?? एकदम??? बापरे!!
चाफ्याला पुढची दंतकथा मिपावरच मिळाली ते बरं झालं.
2 Dec 2011 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार
लेखन वाचले नाही.
प्रत्येक प्रतिसादावरती आपला एक उपप्रतिसाद देण्याची सवय तर अतिशय डोक्यात जाणारी. ह्या अशा प्रकारांमुळे भिकार,टूकार,निरस* लेखन सतत वर राहते आणि खरच चांगल्या कविता, कथा, पाकृ मात्र तळाला जायला सुरुवात होतात. १०/१२ प्रतिसादांना मिळून एकाच उपप्रतिसादात उत्तर द्यायला काय हरकत आहे ?
ही अशी उपप्रतिसादांची रांग लावायची वृत्ती नविनंच नाही तर काही जुन्या खोडांच्यात देखील आढळते. 'काथ्याकूट' सारख्या ठिकाणी हे योग्य आहे, मात्र स्वतःच्या इतर लेखनावरती देखील हे चाळे का ?
संपादक मंडळ ह्यावर काही भाष्य करणार आहे का ? का पुन्हा एकदा 'पहीले पाढे पंचावन्न' आणि 'बोलून आपण कशाला वाईट व्हा ? इतर संपादक आहेतच की' हेच धोरण राबवले जाणार आहे ?
*माझे वैयक्तिक मत.
3 Dec 2011 - 6:41 pm | मन१
पराला(पण) संपादक करा अशी मागनी मी औपचारिकरित्या करत आहे. :)