तिचा कुत्रा - १
एक प्रयत्न.
(विवेकरावांची क्षमा मागून)
लहानपणापासुन ओळख होती आमची
भेटत होते तसे रोजच.
“मित्रच माझा” म्हणाली.
'हुषार आहे अगदी'
हसले मी.
'कुत्रे असतातच हुषार'
म्हणाले.
'नाही, पण हा. म्हणजे....' ती म्हणाली
'हुशार हो अगदी
सकाळी बाहेर जातो न चुकता
घरावर तर लक्ष फार
सगळे दारूडे, चोर, अगदी “यांच्यावर” सुद्धा.
माझ्याकडं बघताय ना? वाटते का तिशीची?
याच्याशी खेळणे अगदी रोजच्या रोज
रेग्युलर आहे तसा तो सगळ्यातच
आणि पर्टिक्युलरही. समोरच्या कुत्रीला रोज भेटायला जातोच.
एखादी मैत्रीण होती लग्नाआधी
पण आता तीही सोडायला लावली डॉक्टरांनी त्याला.
मागच्याच आठवड्यात केल ना त्यांच ते...!
तशी स्कॉचबिच असते घरी
नवरा पिऊन पडतो दिवसाकाठी.
अडखळत चालला तरी हा नाही भुंकत त्याच्यावरती.
दारू चाटतो कधीतरी हळूच ग्लासात उरलेली.
अगदी इर्माला ड्यूस... शुक्रवारी संध्याकाळी हा ढूस्स...
पण ह्याला वास नाही हो आवडत बीअरचा
भुंकतो मग जबरदस्त नवर्यावर.
आणि खाजही किती पळायची
खांबांवर तर कायकाय करत असतो हा.
बागेत म्हणे
कुठलीशी कम्युनिटी आहे त्याची...
शिवाय हा जॉबही आहेच.
मेटींग नेटवर्किंगही जबरदस्तंय त्याच !
त्याच्या मैत्रिणींची गेट-टुगेदर्स होतात ना आमच्याकडेच
माझे? हो, हो, आहेत ना मित्र आणि एक नवरा.
बिझी असतात ग पण सगळेच,
आणि त्यांच्या कुत्र्यांशी विशेष जमत नाही याच
कधी बोलवावं म्हटलं की याची भांडणं
सकाळी लवकर उठायचं असतं ना याला शूसाठी
एकही दिवस
मग जाग्रणं नको म्हणतो हा
म्हणून तर हल्ली.....तोही आणि हाही.. जागत नाहीच
मग तसं नाहीच होत भेटणं कुणाला
इच्छा असूनही...'
सांगत राहिली असती अजूनही कुत्र्याचे कौतूक..
पण फोन वाजला अचानक तिचा..
'हो, अरे निघालेच आहे, पोचतेच, पोचते...
सॉरी, व्हेरी सॉरी हं...
अग विवेकला आज न्यायचय ना.... बाय.. ..'
हातातल्या साखळीला झटका बसताच घाईघाईत
पाय घसरला तिचा
सावरताना लक्ष गेलं माझं
अँटीडिप्रेसंट होतं गळ्यात
नवीन...
ती अवघडली
'अग, चालायचंच..' मी म्हणाले
'त्यात काय?
इतक्या हुशार कुत्र्यांना.. होतात असे काही त्रास..
काळजी घे विवेकची'
म्हणाले.
'होतील पिल्ले त्याला'.
'ते ....नाव माझ्या...' ती चाचरली,
'माझ्या नवर्याच आहे'
म्हणाली.
प्रतिक्रिया
15 Nov 2011 - 5:33 pm | विजुभाऊ
झक्कास.
15 Nov 2011 - 9:02 pm | जयंत कुलकर्णी
//अँटीडिप्रेसंट होतं गळ्यात///
आवडल !
//'होतील पिल्ले त्याला'.
'ते ....नाव माझ्या...' ती चाचरली,
'माझ्या नवर्याच आहे'
म्हणाली///
हा हा :-)
26 Dec 2011 - 5:51 pm | अनिकेतपन्त
दादा, 'क्रीडा 'मध्ये ही पोस्ट कशाबद्दल ?????
26 Dec 2011 - 6:30 pm | वपाडाव
आ डौ ली !!!