' वर्षा सहल - ०१ - जुन २०११

५० फक्त's picture
५० फक्त in कलादालन
14 Jun 2011 - 12:35 am

चिंब भिजलेले....

तुम्हाला हे गाणं माहितच असेल ना,

चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले..
चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले..

काय नाही माहीत, असं कसं होईल, एवढं फेमस गाणं अन माहीत नाही, बघा बघा आठवा, छान पाउस पडतोय, आणि आजुबाजुला हिरवाई आहे, पाना पानातुन थेंब टपकताहेत आणि लांब कुठंतरी नदीच्या उफाणाचा आवाज येतोय, नेहमी करपट वाटणारे दगड पण जिंवत वाटतात, आणि त्यावेळी मनात हे गाणं घुमायला लागतं..

चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले..
चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले..

नाही आठवलं अजुन, अवघड आहे मग...

अरे हो, तुम्ही परवा म्हणजे ११ ला कोरीगड्ला आलाच नव्हता ना, हातिच्या मग तुम्हाला कसं माहीत असणार हे गाणं, छे एका युगप्रवर्तक रचनेचा स्रुजनात्मक अविष्कार होताना पाहणं तुमच्या नशिबातच नव्हतं.

सरुटॉबानेच्या कट्ट्यात ठरवलेली ही वर्षा सहल,तशी ठिणगी टाकली होती स्पानं, कट्ट्याच्या वेळी थोडं सरपण आणि तेल टाकलं गेलं आणि पठ्ट्यानं शेवटपर्यंत सर्वांना जमवत घडवुन आणली ही सहल.लोणावळ्यापासुन पुढं अ‍ॅम्बि व्हॅलीकडं जाणा-या रस्तावर साधारण २० किमि वर पेठशहापुर गाव आहे, गाव कसलं वस्ती आहे. तिथुनच रस्त्याच्या बाजुलाच आभाळात गेलेला एक डोंगर आहे, तोच कोरीगड.

किल्ला फारसा मोठा नाही, म्हणजे अंगावर येणारा तर मुळिच नाही. अगदी कुटुंबासहित जाउ शकतो असं ठिकाण, पण एक दोन पाउस झाले ना कि इथल्या प्रत्येक डोंगर किल्याला पुन्हा एकदा चैतन्य लाभतं, निसर्ग देत असतो आणि ते देणं अंगा खांद्यावर लेवुन हे डोंगर उभे राहतात,आपल्या सारख्या भटक्यांच्या स्वागताला.

आज जिथं लोकं ऑफिसच्या मिटिंगला वेळेत पोहोचत नाहित तिथं चक्क दोन महानगरातुन १२ जण वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांचा उपयोग करुन बरोबर ठरलेल्या वेळेत लोणावळ्यात आले. (आता हि वेळ कोणति ते विचारु नका, प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल), असो, वल्ली,मनराव,अन्या दातार तिघं चिंचवडहुन तर प्यारे१,वपाडाव,आत्मशुन्य आणि मी पुण्यातुन सातच्या सुमारास निघुन लोणावळ्यात आलो तर स्पा,सुधांशु आणि ईंटरनेटस्नेही भारतीय रेल्वेनं तर तिसरा ग्रुप गणेशा व किसन शिंदे हे दोघं गणेशाच्या गाडीकम रॉकेट ज्यादावर आले होते.

एकत्र आल्यावर गुरुक्रिपा नावाच्या शुद्धलेखनाला फाट्यावर मारणा-या हॉटेलात अर्धा नाष्टा केला,

डावीकडुन - सुधांशु, अन्या दातार, मनराव, आत्मशुन्य आणि वपाडाव.

डावीकडुन - वल्ली, स्पा, इंट्या आणि प्यारे१.

मग तिथुन उठुन शेजारी अन्नपुर्णा मध्ये गेलो, तिथले पोहे संपेपर्यंत खाल्ले. मग उप्पिट आणि शेवटी वडे पण. मग दोन चहा घेउन,मार्गस्थ झालो. पाउस इमानदारित पडत होता, पाण्यानं काळाभोर झालेला रस्ता, त्यावर उठुन दिसणारे पांढरे पट्टॆ यात रस्ता चुकलो नसतो तर हि सहल पुर्णच झालि नसती, रस्ता चुकुन पुन्हा योग्य मार्गाला लागुन, भुशि डॅम मार्गे पुढं निघालो. मध्येच मनरावांनी गाडी बाजुला घेतली, लगेच बाकीच्यांनी पण. खाली उतरुन उजव्या बाजुला पाहिलं,

आम्ही ड्युकच्या नाकासमोर टिच्चुन उभे होतो, टिच्चुन म्हणजे वारं फार होतं आणि खालचा दगड घसरडा झाला होता म्हणुन. पावसाला घाबरत घाबरत फोटो काढले, परत निघालो. रस्त्याच्या कडेला एक फोटोजनिक डेडबॉडी पडली होती, बिचारं अजुन कळत-नकळत वय होतं त्या जिवाचं. आठवण म्हणुन त्याचेही फोटो काढले,


त्याला रस्त्यावरुन आत मातीवर नेउन ठेवलं आणि पुढं निघालो.

दोन पाच वेडीवाकडी वळणं आणि पुढं मठ्ठपणे जाणा-या गाड्यांना शिव्या घालत पेठ शहापुरला पोहोचलो.गाड्या तिथल्या मारुति मंदिराच्या बाजुला लावल्या. बरोबर घ्यायचं सामान घेतलं, नको होतं ते तिथंच ठेवलं आणि रस्ता ओलांडुन सुरु झाली वर्षा सहल, एक छोटुकली टेकडी ओलांडली की लगेच वर जायची पायवाट सुरु होते, लाल माती मस्त निसरडी झालेली, एकमेकांच्या साथीनं कधी संपली आणि सिमेटाच्या पाय-या सुरु झाल्या, पायवाटेवर जास्त बरं वाटत होतं. थोड्या पाय-या चढुन गेल्यावर एका बाजुला एक पाण्याचं टाकं आहे, पिण्याचं स्वच्छ पाणी, नंतर थोडं पुढं गेल्यावर एक गणपतीचं देउळ, म्हणजे एका दगडात एक कोनाडा आणि देव एकत्रच कोरलेला, सभामंडप, गाभारा असला पसारा नाही थेट देव आणि समोर भक्त, डायरेक्ट हॉटलाईन, फारसा रेखिव नसला तरि गणपती प्रसन्न वाटला, हल्ली प्रत्येक गल्लीच्या कोप-यावर लोखंडाच्या जाळीत कैद करुन ठेवलेल्यांपेक्षातरी जास्त प्रसन्न.

थोडं अजुन चाललं की एक गुहा लागते, दगडात कोरलेली, बहुधा फर्स्ट लेवल सिक्युरिटी चेक पॉईंट असावा. तिथुन गडाचा मुख्य दरवाजा १५ मिनिटात येतो, दरवाज्याच्या दोन्हि बाजुला मशाली ठेवण्यासाठी दगडी हुक सारखी सोय केलेली आहे. दरवाज्याला कधितरी ओसरि असावि असं वाटतं खरं, पण समोरचा बुरुजावर जाउन कधी एकदा उभारतो असं झालेलं असतं, मग आत आलो की दोन्हि बाजुला गेलेली तटबंदीची भिंत दिसते. काहि काहि ठिकाणी चांगली ३-३ फुट रुंद आहे, आजच्या घडीला किल्यावर चांगल्या अवस्थेत असलेला अवशेष, बाजुलाच एक दोन छोट्या तोफा पडलेल्या आहेत. डाव्या बाजुनं भिंतीवरुन चालायला सुरुवात केली,

आणि पहिल्याच बुरुजावर कुणालातरी सुरुवातीला उल्लेख केलेलं गाणं सुचलं,चिंब भिजलेले झाडाखाली बसलेले, अहाहा काय शब्द आहेत, लगेच तिथल्या तिथं यावर एक कॊल आणि एक काथ्याकुट टाकला गेला, आणि त्यावरचे प्रतिसाद किल्यावरुन खालि रस्त्यापर्यंत गेल्यानंतर ते उडवुन टाकुन पुढं चालायला लागलो. अजुन दिवस काढायचा होता, इथंच सर्वरला लोड होवुन चालणार नव्हतं. गडावर जेवढे काढता आले त्यापैकी हे काही फोटो वल्लिनं काढलेले.

आता डाव्या हाताला खाली अ‍ॅम्बी व्हॅलि दिसायला लागते, मस्त घरं आणि मोठे मोठे हॉल, छानसे रस्ते. हळुहळु त्या मानवनिर्मित जगाचं कवतिक संपतं कारण गडावर जमा होणा-या पावसाच्या पाण्यानं गडाचा निरोप घेताना घेतलेलं धबधब्याचं रुप फक्त डोळ्यात साठवावं असंच असतं, मावत नसलं तरीही

. इथं प्रत्येकालाच फोटो काढायचेत पण भन्नाट वारा आणि बेभान पाउस असल्यानं ते शक्यच नाही, त्यामुळं जे दिसतंय ते पुन्हा स्वप्नात पाहण्यासाठी प्रत्येकजण साठवुन ठेवत होता.

आता एकदम गडाच्या मागच्या बाजुला आलो कि खाली दिसते ती अ‍ॅम्बी व्हॅलिची धावपट्टी, आजुबाजुच्या हिरव्यागार गालीच्यावर एकच रेघ मारलेली, पाउस हे रसायनच असं आहे की ते जिवंत नसलेल्या गोष्टीपण जिवंत करुन दाखवतं, या बुरुजाच्या खाली अजुन एक बुरुज आहे पण तिथं जायची वाट बिकट आहे, कुठंही आधार नाही, त्यामुळं ते कॅन्सल केल्म आणि थोडं पुढं धबधब्यात आलो, दोन-तीन टप्यात असलेला हा छोटासाच धबधबा पण एकदम सुरक्षित आहे, तिथं सगळेजण मनसोक्त पाणी खेळलो, मग गडावरच्या कोराईदेवीच्या देवळात आलो, छोटंसं छान रंगवलेलं देउळ, बाहेर एक स्तंभ आहे दगडी कसला तो कळालं नाही, वल्लिनं सांगितलं कि आज जे दागिने मुंबैतल्या मुंबादेवीच्या अंगावर आहेत ते मुळचे या देवीचे आहेत. देवीची साधीच मुर्ती पण फुलांच्या हारामुळं खुप छान दिसत होती. संपुर्ण गडावर फोटो काढण्यास योग्य हि एकच जागा होती, तिथं फोटो घेतले

आणि किल्याचा परिघ पुर्ण करण्यासाठी निघालो, इथं पण ब-याच ठिकाणी विशेषत: कड्याजवळ आडवा पाउस अनुभवता येतो, खालच्या दरीतुन फिरत फिरत वर येणारं वारं आभाळातुन पडणा-या थेंबाची दिशाच बदलुन टाकतो. या भागात बरीच तळी आहेत छोटी छोटी. दोन तासात सगळा किल्ला पाहुन होतो, फिरुन होतो.

आता फक्त एकच जाणीव होत होती, ती म्हणजे भुक, पटापटा खाली आलो, जिथं गाड्या लावल्या होत्या त्या मागच्या मारुतीच्या देवळात ओले कपडे बदलुन समोरच्या हॉटेलात चहा प्यायला गेलो आणि चांगलं अडीचशे रुपये बिल होइपर्यंत वडे,
आम्लेट खाउनच निघालो,

उजवीकडुन - किसन शिंदे, ५० फक्त, प्यारे१, अन्या दातार.

व्यनित ब-याच गाजलेल्या शंकरपाळ्या खाल्या, किसन शिंदेनी खास घरुन करुन आणल्या होत्या, आता त्यांनी धागा टाकला कि प्रत्येक शंकरपाळीसाठी एक असे चांगले प्रतिसाद द्यायचं ठरलं आहे.(हल्लि खरडी करुन कुणी देत नाहि ओ प्रतिसाद.) मग परत लोणावळ्यात येताना ट्रॅफिक जॅम व रस्ता चुकणे हि नित्यकर्मे करुन परत एकत्र आलो, परत जाताना प्रत्येकाचे प्लॅन वेगळे होते, गणेशा डायरेक्ट पुण्याला आला तर, आत्मशुन्य तिथुनच त्याच्या दुस-या मित्राबरोबर राजमाचिला गेला, इंट्या पुण्यात पुस्तक खरेदी साठि येणार होता. सगळ्यांचं टाटा बाय बाय झालं आणि आम्हि पण आमच्या मार्गाला लागलो.

या वर्षातली मिपासद्स्यांबरोबरची तिसरी सहल, मी आणि गणेशा तिन्हि सहलीत होतो, या अशा सहली भविष्यात पण करत राहु एवढं ठरवुनच हा व्रुतांत संपवतो, पुढच्या महिन्यात एक खादाडिचा कार्यक्रम ठरवत आहोत, पक्कं झालं की कळवतोच आहे, तोपर्यंत पावसाची मजा लुटा.

प्रवासइतिहाससमाजमौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

14 Jun 2011 - 12:47 am | आनंदयात्री

वाह वा. मस्त मजा केलेली दिसतेय !!

यात्री काकांशी सहमत. ! मजे करे गुरु .. ते फिप्टीसेंट दिसले नाही कुठे फोटो मध्ये फक्त ;)

बाकी अँबी व्हॅली रोडच्या बर्‍याच चकरा मारल्याची .. त्या नागमोडी वळणांवर फुटरेस्ट घासेस्तो बाईक झुकवल्याच्या आणि वेगाचा थ्रील घेतल्याच्या आठवणी ह्या लेखाच्या निमित्ताने जाग्या झाल्याचे या क्षणी णमुद करावेसे वाटते .

अंमळ रोमँटिक वातावरण आहे .. फक्त पोरंपोरं जाणं जमणार नाही ;)

-(रेड मिस्चिफ) टारझन

मालोजीराव's picture

15 Jun 2011 - 2:49 pm | मालोजीराव

अंमळ रोमँटिक वातावरण आहे .. फक्त पोरंपोरं जाणं जमणार नाही ;)

कंपनी चा डेस्क बडवत सहमती दर्शवत आहे

सूड's picture

14 Jun 2011 - 9:25 am | सूड

छे छे !! गाणं कसं विसरणार, या गाण्याचा शोध गडावरच तर लागला. आय मीन आठवण झाली. वृत्तांत अतिशय छान, फोटु उत्तम. वेळात वेळ काढून आपण हा लिहीलात त्याबद्दल आभार. हा गड ट्रेकसाठी निवडल्याबद्दल वल्ली महाशयांचे विशेष आभार. ट्रेकला जाण्याची तशी माझी ही पहिलीच वेळ, मूळगावातल्या खंडोबाच्या टेकाडावर जाऊन येत असू. पण तो ट्रेक काय, मिनी ट्रेक सुद्धा म्हणू नये.

आता पुढला ट्रेक कधी ??

प्रचेतस's picture

14 Jun 2011 - 9:08 am | प्रचेतस

एकदम झक्क्कास वृत्तांत, परत आठवणी ताज्या केल्यास. गडावरचा भर्राट वारा, कोसळणारा पाउस, उसळणारं धुकं, कंच हिरवाई सगळे एकदम वर्णनातीतच. पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला हा असा बेभान अनुभव येईल असे तिथे जाताना वाटलेच नव्हते.
तो मंदिरासमोरचा दगडी स्तंभ म्हणजे दीपमाळ-एकदम साधीशी. असाच स्तंभ राजमाचीच्या भैरवनाथाच्या मंदिरासमोरही आढळतो.

गडावर येण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आंबवणे गावातून येणारी वाट, ही जराशी अवघड आहे, दरीच्या कडेकडेने सरकणारी व मोठ्या प्रमाणा घसारा असणारी अशी आहे.

आता गडाच्या इतिहासाबद्दल- हा किल्ला शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये आदिलशाहीकडून जिंकला व गडावर भगवे निशाण लागले. गडावरील सद्यस्थितीतले पडिक वाड्यांचे, तटाबुरुजांचे अवशेष त्या काळातले. पण ह्या किल्ल्याचा इतिहास इतकाही अर्वाचीन नाही. हा किल्ला मुळात सातवाहनकाळातला. सुरुवातीच्या टप्प्यात लागणारी खोदीव गुहा, वरच्या टप्प्यातले एक पाण्याचे टाके, तसेच गडाच्या माथ्यावर पश्चिम बुरुजापाशी असलेली जमिनीच्या अतंर्भागात कडा वर ठेउन खोल खोल गेलेली पाण्याची टाकी ही सातवाहनकालीन रचना दर्शवते. मूळात हा किल्ला बांधला गेला तो सातवाहनकाळात चालत असलेल्या व्यापारावर कोकणातून वर येणार्‍या सवाष्णी आणि वाघजाई या दोन घाटवाटांवर लक्ष्य ठेवण्यासाठी. याच वाटांवर कोकणात खाली सरसगड, सुधागड, घाटमाथ्यावर घनगड, कोराईगड व पुढे तिकोना, तुंग हे किल्ले बांधले गेले. हे सर्व पूर्वीच्या भरभराटीला आलेल्या मार्गांचे संरक्षक दुर्ग.

वा..

त्या रस्त्याने इतक्या वेळा जाऊनही आसपास असा सुंदर गड आणि तोही चढून जाता येईल असा, आहे याची कल्पनाही नव्हती.

खूपच सुंदर वातावरण आहे. खादाडी पण झकास झालेली दिसतेय. विशेषतः ट्रेक संपल्यावर कडाडून भूक लागली असेल तेव्हा.. :)

वपाडाव's picture

14 Jun 2011 - 10:49 am | वपाडाव

फटु अन वृत्तांत दोनीबी ब्येष.....
अजुन अशाच वर्षा सहली आयोजिल्या जाव्यात अन त्यांना अमुचा उदंड प्रतिसाद असाच लाभत राहो....
हीच इ. प्रा..

मनराव's picture

14 Jun 2011 - 10:58 am | मनराव

वाह.....!!!, सुरेख..............

फोटू पण झक्कास..... या पावसाळ्यात अणखी असे बरेच ट्रेक व्हावेत हिच सदिच्छा........ :)

किसन शिंदे's picture

14 Jun 2011 - 11:02 am | किसन शिंदे

मिसळपाव सदस्यांबरोबरची पहिलीच सहल, सगळ्यांना पहिल्यांदाच भेटत होतो पण पहिल्यांदा भेटतोय असं कधीच जाणवलं नाही.

आत्मशून्य's picture

14 Jun 2011 - 8:48 pm | आत्मशून्य

अश्याच मस्त चवदार शंकरपाळ्यां पून्हा पून्हा घेऊन या आन बघा कधी कूठेही कोणाला पहिल्यांदाच भेटतोय असं जाणवलं तर ;)

अन्या दातार's picture

14 Jun 2011 - 11:51 am | अन्या दातार

अ प्र ति म

ट्रीप तर भन्नाटच झाली, वृत्तांतही झक्कास........
पुढच्या ट्रीपच्या प्रतिक्षेत.

झकास वर्णन
आणि फोटो सुद्धा झकास

११ जून ला ट्रेक ला जातोय हे कळल्यावर हापिसातल्या काही ट्रेकर नि वेड्यात काढल
अरे इतक्यात का जातोयेस? अजून पावसाला सुरुवात तर होऊद्नेत, आता जाऊन काही मजा येणार नाही वगेरे वगेरे
पण......
नशिबाने मजबूत साथ दिली , ज्या दिवशी ट्रेक होता,त्याच्या अद्ल्यादिव्सा पासूनच मजबूत पावसाला सुरुवात झाली. सकाळी कल्याण ला पोहोचलो तेंव्हा सुद्धा धाक धुक होती.. कारण २ ३ ट्रेन रद्द केल्या होत्या. पण सुदैवाने इंद्रायणी वेळेवर पोहोचली, माझ्याबरोबर सूड होता, इंट्या ने तिकीट आधीच बुक केल्याने बसायला आरामात मिळाल. गप्पा टप्पा करत लोणावळा आल सुद्धा. लोणावळ्याला पोचल्यावर अजूनच आनंद झाला... वातावरण गारेगार झाल होत..
पावसाची रिप रिप सुरु होती.. बस स्थानकाजवळ अक्खा कंपू भेटला, किसन आणि गणेशा नंतर जॉईन झाले..

पण खरी मजा कोरीगडाच्या पायथ्याशी पोचल्यावर आली , अक्खा गड धुक्यात लपेटलेला होता, काहीच दिसत नव्हत.
पण वल्ली असल्याने रस्ता चुकायच काही टेन्शन नव्हत, आणि गड चढायला पण सोप्पा होता, सकाळी मजबूत चापलेल असल्याने, पोटोबा शांत होता :D
त्यानंतर जी काय पावसाला सुरुवात झाली , फुल रानटी ... :)
मध्ये एका ठिकाणी वल्लीने पाण्याच टाक, दाखवलं.. एकदम ताज. आणि गारेगार भूजल , वेगळीच चव होती ....
गणेशा तर पार येडा झालेला, :)
अर्ध्या तासात वर पोचलो, आणि निसर्गाने रौद्ररूप धारण केल, सोसाट्याचा वारा, अंधारलेल आकाश, जिकडे बघाव तिकडे ढगच ढग, १० फुटांच्या पुढच दिसत नव्हत, पाऊस खालून वरून कुठ्नही आदळत होता... अक्खा गड ओसाड पडलेला, आणि आम्ही फक्त बारा मावळे :)
वारा एवढा तुफान होता कि बास्स ... असा अनुभव मी तरी या पूर्वी घेतला नव्हता, साला हाच स्वर्ग .. बास्स... इकडे तिकडे नुसता बघत होतो , गूढ वातावरण झालेलं . पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता, तरीही आम्ही ती दीड दोन किलोमीटर ची तटबंदी चालत पूर्ण फिरलो , मग गडावरच्या कोराई देवीच्या देवळात आडोश्याला घुसलो. बाहेर मुसळधार पडणारा पाऊस, आता गाभार्यात देवीची करारी मुद्रा, आणि बाजूलाच शांतपणे जळणारा नंदादीप, नकळत हात जोडले गेले . आत्ता कुठे वल्ली ने कॅमेरा बाहेर काढला, मग काय सगळ्यांनी फोटो काढायची हौस भागवून घेतली,
थोड्या वेळाने बाहेर आलो, आणि परतीची वाट धरली. सगळ्यांना भूक सडकून लागली होती.
खाली एका हाटेलात किसान ने आणलेल्या शंकरपाळयांवर सर्वांनी ताव मारला, सोबतीला वाफाळलेला चाय, ओम्लेट आणि उकडलेली अंडी :)
बाकी वर हर्षद ने लिहिल्याप्रमाणे .......

पण खूप म्हणजे खूपच मजा आली, एक अविस्मरणीय ट्रेक
वल्ली चे विशेष आभार , वल्ली द लीडर :)

किसन शिंदे's picture

14 Jun 2011 - 12:31 pm | किसन शिंदे

भले शाब्बास !

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Jun 2011 - 1:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मला सांगितले असते तर मी सुद्धा आलो असतो की!!! :-|
जाऊ दे!!
पुढच्या वेळेस सांगा! जमल तर!!
बाकी, ट्रेक तर तुफानच झालेला दिसतोय!! :)
इनो घ्यावे लागणार आता!! :(

वपाडाव's picture

14 Jun 2011 - 6:43 pm | वपाडाव

मला सांगितले असते तर मी सुद्धा आलो असतो की!!!

म्हणुनच तर नाही ना सांगितले....
२ कवी एकत्र आल्यनंतर त्यांनी काय केले असते हे आम्हाला तुर्तास तरी पाहावयाचे नव्हते....
असो...
@स्पावड्या :: तिथे (गडावर) मुग गिळल्याबद्दल अन इथे (धाग्यावर) भडभड वकल्याबद्दल स्पष्टीकरण मागणेत येत आहे.... सविस्तर चर्चा व्यनिद्वारे....

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Jun 2011 - 10:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

>>२ कवी एकत्र आल्यनंतर त्यांनी काय केले असते हे आम्हाला तुर्तास तरी पाहावयाचे नव्हते
म्हणजे? गणेशाने बौद्धीक घेतले की काय तुमचे?

मनराव's picture

15 Jun 2011 - 10:44 am | मनराव

नाही.......

तसा चान्स त्याला दिल्या गेला नाही............. :)

खुपच मस्त,
चला वर्षा विहार चालू झाले....

नगरीनिरंजन's picture

14 Jun 2011 - 2:39 pm | नगरीनिरंजन

जळवा (जळूचे अनेकवचन नाही) तेज्यायला.

अन्या दातार's picture

14 Jun 2011 - 4:18 pm | अन्या दातार

इनो घ्या.
(जळवा लागल्या असतील तर तंबाखूचे पाणी लावा)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jun 2011 - 2:55 pm | बिपिन कार्यकर्ते

छान!

एकुनच मस्त झालेला आहे ट्रेक :)

विसोबा खेचर's picture

14 Jun 2011 - 5:23 pm | विसोबा खेचर

मस्त.. :)

बाय द वे, मयत साप कोणत्या जातीचा वाटतो आहे?

तात्या.

सूड's picture

14 Jun 2011 - 5:29 pm | सूड

कोब्रा !! :D

गवि's picture

14 Jun 2011 - 5:47 pm | गवि

हॅहॅहॅ..

धामण दिसते आहे.

सूड's picture

14 Jun 2011 - 5:49 pm | सूड

असो.

कळले होते हो देवरुखकर.. तुम्हाला काय म्हणायचे होते..

;)

जातिवाचक चर्चेस फाटा फोडण्यासाठी कमेंटलो.. ;)

रेवती's picture

14 Jun 2011 - 7:00 pm | रेवती

फोटू आणि वृत्तांत छान.
पावसाचे फोटू भारी आहेत.

इंटरनेटस्नेही's picture

14 Jun 2011 - 8:36 pm | इंटरनेटस्नेही

वा वा चान चान

प्रभो's picture

14 Jun 2011 - 8:58 pm | प्रभो

भारी रे!!!!

आत्मशून्य's picture

14 Jun 2011 - 11:53 pm | आत्मशून्य

वल्ली (द-वाइल्ड-लीडर) यांचा साहसी मोहीमांचा अनूभव आणी ५०फक्त यांची केवळ उपस्थीती म्हणजेच आवश्यक गरजांचा काटेकोरपणे विचार व नीयोजन आधीच झाले असल्याची खात्री, म्हणूनच ट्रेक मस्तच होणार याबाबत शंकाच न्हवती.

पण निसर्ग आणी मिपाकरांच्या उपस्थीतीने खरी रंगत भरली... ज्यात दाक्षीणात्य चीत्रपट सृष्टीचे आद्य अभ्यासक, उपासक, प्रशंसक वपाडाव (अयो ऐयय्यो न्हवे) यांच्याशी झालेल्या चर्चा असोत, की किसन शिंदेंनी (गणेशापासून) व्यवस्थीत सांभाळून आणलेल्या शंकरपाळया खाणे असो... साहसांची आवड व ध्रूढ्नीश्चयता जोपासूनही कवीमनाची तरलता जिवंत ठेवणारे स्पश्टवक्ते मनराव असोत, की मिश्कीलता जपणारे व नेमकं बोलून मजेशीर फिरकी घेणारे व वातावरण सतत "हॅपनींग" ठेवणारे प्यारे१ असोत. विंडचीटरमधे गडावर हूंदडताना पाठमोर्‍या आकृतीत कॅप्टन जॅक स्पॅरो शी साधर्म्य भासणारे, व स्वभावाने मिश्कील पण काहीसे (तात्पूरते ) शांतस्वरूप धारण केलेले स्पा असोत की.... दीलखूलास हास्य व मोकळ्या स्वभावाने समोरच्याला लगेच आपलेसे करणारे सूधांशू देवरूखकर व अन्या दातार असोत. टेकसॅव्ही इंट्या व रॉकेट रायडर गणेशा सूध्दा भारीच.... सोबतीला सूसाट पाऊस आणी वारा... आणी लोणावळ्यातील हवामानात चमचमीत नाश्टा .... बस आणखी काय हवय एखादा ट्रेक यशस्वी करायला ? आपली तर रोज तयारी आहे... असा ट्रेक करायची ... आणी "मिपाकरांची सोबत म्हणजेच आयूष्याला रंगत" या म्हणीचा पून्हा पून्हा प्रत्यय घ्यायची :)

स्पा's picture

15 Jun 2011 - 9:10 am | स्पा

आपली तर रोज तयारी आहे... असा ट्रेक करायची ... आणी "मिपाकरांची सोबत म्हणजेच आयूष्याला रंगत" या म्हणीचा पून्हा पून्हा प्रत्यय घ्यायची

जे बात :)

अन्या दातार's picture

15 Jun 2011 - 11:15 am | अन्या दातार

काही लोक मिपाकरणींबद्दल जास्तच आपुलकीने बोलत असल्याचे निदर्शनास आणुन देउ इच्छितो! ;)

टारझन's picture

15 Jun 2011 - 12:12 pm | टारझन

=)) =)) =)) हे बाकी खरे हो !!

____________________________

- साखर्‍या ( गरीबांचा गोबो*)

*गोडबोल्या

सूड's picture

15 Jun 2011 - 12:44 pm | सूड

अन्या, सांमकें खरें उलयलें तुवें !!

काही लोक मिपाकरणींबद्दल जास्तच आपुलकीने बोलत असल्याचे निदर्शनास आणुन देउ इच्छितो!

सर्व सोडून "स्पा"च्याच प्रतिक्रियेखाली हे विधान लिहिण्याचे प्रयोजन कळले. :) ;)

याला म्हणतात 'खाया नाय पिया नाय गिलास तोडा बारा आना' , बिच्चारा स्पा, त्यानं फक्त खाण्यासाठी अन +१ म्हणायला तोंड उघडलं होतं आख्या दिवसात. असो, काय करणार आता.

आणि त्यानं भेळ आणली नाही याचा पण राग असेल ओ गवि, बरोबर बरोबर आता आठवलं.

सूड's picture

15 Jun 2011 - 1:09 pm | सूड

लेकी बोले सुने लागे टाईप आहे हे गवि!!

गवि's picture

15 Jun 2011 - 1:44 pm | गवि

लेकी बोले "सुडे" लागे का? ;)

सूड's picture

15 Jun 2011 - 2:07 pm | सूड

या स्पावड्याच्या बाजूने बोलायची पण सोय नाही. गवि, वेस्टर्नची लोकल सेंट्रलला कुठं आणताय ?? :D

मुलूखावेगळी's picture

15 Jun 2011 - 3:00 pm | मुलूखावेगळी

काही लोक मिपाकरणींबद्दल जास्तच आपुलकीने बोलत असल्याचे निदर्शनास आणुन देउ इच्छितो!

सर्व सोडून "स्पा"च्याच प्रतिक्रियेखाली हे विधान लिहिण्याचे प्रयोजन कळले. Smile

मला तर असे कळले कि स्पावड्याकडे मिपाकरणींची डिरेक्टरीच आहे ;)

अन्या दातार's picture

16 Jun 2011 - 3:53 pm | अन्या दातार

मुवे, त्या डीरेक्टरीच्या कॉपीज निघाल्या असाव्यात. अनेक सदस्यांनी त्यातले रेफरंसेस दिले ट्रेक च्या दरम्यान :D

लेकी बोले "सुडे" लागे का?

=))

सूड's picture

15 Jun 2011 - 2:16 pm | सूड

अपेक्षित कृती, आपण नेहमी कुंपणावरच असता हे ठाऊक आहे आम्हांस.

मुळात मुंबैवरुन गेलेले तुम्ही तिघे (किंवा पाच).

त्यात तू, स्पा गणेशा आणि किसन शिंदे "सेंट्रल"लाईनचे..

मग वेस्टर्न.. ?! ................... ओके ओके.. आलं लक्षात.. ;)

चालायचंच..

किसन शिंदे's picture

15 Jun 2011 - 2:24 pm | किसन शिंदे

खुप वेळ घेता राव तुम्ही सगळं समजायला..:)

आपण नेहमी कुंपणावरच असता हे ठाऊक आहे आम्हांस.

मग आपणास "कुम्पणी" द्यावयास नको का कोण :D

मग चुकताय तुम्ही, त्यासाठी कुंपणाच्या अलिकडे की पलिकडे हे स्वतःचं मत असावं लागतं आणि तुमची 'कुंपणी' ?? मला वाटतं माझी राहूची महादशा सुरु व्हायला वेळ आहे अजून. :D

मग चुकताय तुम्ही, त्यासाठी कुंपणाच्या अलिकडे की पलिकडे हे स्वतःचं मत असावं लागतं आणि तुमची 'कुंपणी' ?? मला वाटतं माझी राहूची महादशा सुरु व्हायला वेळ आहे अजून.

आमची कुम्पणी कुठे म्हटलंय आम्ही.. तुमची कुम्पणी हो....
आणि तुमची अशी दशा असताना , कोण राहू येणारे त्रास द्यायला तुम्हाला =))

असो बाकी वाद व्यनीत घालू, उगा विषयांतर नको

धमाल मुलगा's picture

15 Jun 2011 - 2:54 pm | धमाल मुलगा

ह्या आमच्या घरगुती कामांच्या तर आयलाऽऽऽऽ....

गेल्या वर्षीच्या कोराईगडाच्या भटकंतीच्या आठवणी फिकुटतात न फिकुटतात तोवर पुन्हा पावसाळा आला, आणि हा हा म्हणता गडभेटीचे मनसुबे पक्के झाले. ऐनवेळी आमच्या नशीबानं घात केलाच पण. माशी शिंकली ती शिंकलीच!

मजा केलीत लेको...हेवा वाटतोय.
काय रे, आणि त्या तळ्यात उतरला नाहीत काय रे? भरगच्च धुक्यातून त्या तळ्यातून चालताना लै मज्जा येते राव.

@वल्ली: च्यायला, ग्यांगला मैदानातल्या तोफा नीट ठेवायच्या कामाला नाही का लावलं रे? ;)

प्रचेतस's picture

15 Jun 2011 - 3:20 pm | प्रचेतस

तळं पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यातच बर्‍यापैकी भरलेलं पाहून अंमळ आश्चर्यच वाटलं. धुकटातून दिसणारं तळ्याचं दृष्य जबराच रे एकदम.

@वल्ली: च्यायला, ग्यांगला मैदानातल्या तोफा नीट ठेवायच्या कामाला नाही का लावलं रे?

पब्लिक आधीच भिजून भिजून चिंबगार पडलेलं होतं, त्यात एकाला तर कोरीगड म्हणजे स्टॅमिनाची सत्वपरीक्षा पाहणारा ट्रेक वाटत होता. ;) मग रे कुठून त्यांना त्या जडशीळ तोफा उचलायला सांगायच्या. :)

किसन शिंदे's picture

15 Jun 2011 - 3:31 pm | किसन शिंदे

त्यात एकाला तर कोरीगड म्हणजे स्टॅमिनाची सत्वपरीक्षा पाहणारा ट्रेक वाटत होता.

:D :D :D

वल्ली,
तुम्ही तर डायरेक बाँड्रीच्या बाहेरच बॉल मारताय.;)

और ये लागा bsnl चौक्का

बाकी वल्ली थोडा सेहवाग सारखा वाटाय लागलाय हल्ली :D

प्रचेतस's picture

15 Jun 2011 - 3:39 pm | प्रचेतस

कसचं कसचं ;)

धमाल मुलगा's picture

15 Jun 2011 - 4:55 pm | धमाल मुलगा

>>त्यात एकाला तर कोरीगड म्हणजे स्टॅमिनाची सत्वपरीक्षा पाहणारा ट्रेक वाटत होता.
चूकलंच राव. कोराईगडाऐवजी हरिश्चंद्रगडच ठरवायला हवा होता. किंवा अंमळ जूना वासोटा! ;)

>>तळं पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यातच बर्‍यापैकी भरलेलं पाहून अंमळ आश्चर्यच वाटलं
आठवड्याभरात किती मर मर करत बदाबदा कोसळलाय राव पाऊस...नशीब ते तळं उतू नव्हतं जात. :D

५० फक्त .. तळ्यात उतरायच्या मार्गावर होतेच...
पण तळ किती खोल आहे याचा अंदाज नसल्याने बेत रद्द झाला

इंटरनेटस्नेही's picture

15 Jun 2011 - 4:22 pm | इंटरनेटस्नेही

कॅमेरा कोणता वापरला? तसेच फोटो काढताना कोणती विशेष टेक्निक अवलंबली त्याची माहिती हवी आहे.

किसन शिंदे's picture

15 Jun 2011 - 5:44 pm | किसन शिंदे

ईंट्या,
बाळा ट्रेकला झोपला होतास का रे?

वपाडाव's picture

15 Jun 2011 - 7:00 pm | वपाडाव

=)) =)) =))
तिच्या मारी....
किसन रावांनी तर DLF Maximum मारलेला आहे....
त्यांचा हार अन तुरे देउन सत्कार करण्यात येत आहे....

पण त्यांचं कदाचित लक्ष नसेल (निसर्गातील सौंदर्य पाहताना) पण इंट्याने रेनकोट घातलेला होता....
हे त्यांच्या लक्षात नसावे.... असो...

प्रचेतस's picture

15 Jun 2011 - 9:20 pm | प्रचेतस

अंगावर रेनकोट, डुईवर टोपी असलेली एक आकृती एकाच जागी स्थिर असूनही आम्ही फुडं फुडं जात असल्यामुळे हळूहळू धुक्यात लुप्त होताना दिसून येत होती. :)

इंटरनेटस्नेही's picture

15 Jun 2011 - 9:28 pm | इंटरनेटस्नेही

अंगावर रेनकोट, डुईवर टोपी असलेली एक आकृती एकाच जागी स्थिर असूनही आम्ही फुडं फुडं जात असल्यामुळे हळूहळू धुक्यात लुप्त होताना दिसून येत होती.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

इंटरनेटस्नेही's picture

15 Jun 2011 - 9:46 pm | इंटरनेटस्नेही

तो माझा रेन्कोट नसुन..विंड्चिटर विथ ट्राऊजर होते..

५० फक्त's picture

15 Jun 2011 - 10:15 pm | ५० फक्त

तो माझा रेन्कोट नसुन..विंड्चिटर विथ ट्राऊजर होते..

आणि ते एवढे जड होते की तुला चालता पण येत नव्हते,

इंटरनेटस्नेही's picture

15 Jun 2011 - 10:21 pm | इंटरनेटस्नेही

आणि ते एवढे जड होते की तुला चालता पण येत नव्हते,

सामके बरोबर!

अन्या दातार's picture

16 Jun 2011 - 3:59 pm | अन्या दातार

>>पण इंट्याने रेनकोट घातलेला होता....
हे त्यांच्या लक्षात नसावे.... असो...

रेनकोट घातल्याने झोप येते काय या प्रश्नावर रिसर्च करावा म्हणतोय!

प्रचेतस's picture

17 Jun 2011 - 8:44 am | प्रचेतस

रेनकोट घातल्याने झोप उडते (उकाड्यामुळे) असे आमचे निरीक्षण आहे.

नगरीनिरंजन's picture

17 Jun 2011 - 9:01 am | नगरीनिरंजन

कधी कधी झोप मोडल्यावर करायचे काय म्हणूनही रेनकोट घातला जातो असे आमचे निरीक्षण आहे.

प्रचेतस's picture

17 Jun 2011 - 9:16 am | प्रचेतस

रेनकोट रेनकोट जय इंटेश.....!!!!

सूड's picture

17 Jun 2011 - 12:37 pm | सूड

मग पुढे काय ?? 'ठाकुर्लीच्या स्पावडुदेवा जागराला या या' ?? :D

बाकी सर्व आपोआप सूरळीत होतं जात.

इंटरनेटस्नेही's picture

17 Jun 2011 - 12:39 pm | इंटरनेटस्नेही

उत्तम धागा.. लेखन आवडले.

पैसा's picture

21 Jun 2011 - 8:09 pm | पैसा

आणि फोटो फारच छान! तुमची धमाल ट्रेकवरून परत आल्यावर मिपावर चालू राहिलेली दिसतेय!

जातीवंत भटका's picture

28 Jun 2011 - 11:46 am | जातीवंत भटका

मस्तच रे !!
तुम्हा भटक्यांना पहिल्यांदाच पहातो आहे (फोटोत)
दंगा घातला आहे राव !! मस्तच.

इंटरनेटस्नेही's picture

28 Jun 2011 - 12:47 pm | इंटरनेटस्नेही

मस्तच रे !!
तुम्हा भटक्यांना पहिल्यांदाच पहातो आहे (फोटोत)
दंगा घातला आहे राव !! मस्तच.

ईन्शाअल्लाह लवकरच भेटु, अश्या एखाद्या ट्रेक मध्ये!
-
इंट्या.

प्यारे१'s picture

28 Jun 2011 - 2:39 pm | प्यारे१

>>>ईन्शाअल्लाह लवकरच भेटु, अश्या एखाद्या ट्रेक मध्ये!

कशाला? त्यांच्या ट्रेक ची ...... करायला?

मी विंडचिटर घालून आक्खा ट्रेक करणार...!
मी इथे थांबतो. तुम्ही येता का जाऊन....?
बी पी वाढलंय रे थोडं...
वारं फारच आहे...
स्टॅमिना संपला...
किती बरं चढ आहे इथे?
फारच तिखट आहे रे हे...

इन्ट्या बास का रे?????

वपाडाव's picture

28 Jun 2011 - 6:37 pm | वपाडाव

लहान-लहान मुलांवर चढ-चढ चढणार्‍या प्यारे आजोबांचा णिषेद !!!!!
-------------------------------------------------
!! आज हे करुयात, उद्या ते करुयात !!

अन्या दातार's picture

31 Jul 2011 - 9:46 am | अन्या दातार

वप्या काका, शब्द सांभाळून वापर ;)