(चाल : देहाची तिजोरी - भक्तीचाच ठेवा )
फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा
पकडणार चोरांना त्या - पकडणार केव्हा ?
नसे दूर चौकी इथुनी फार पोलिसांची ,
तरी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची -
सरावल्या चोरांनी का दंड थोपटावा ?
उजेडात होते पहाणी - अंधारात साsssफ
चोरट्यांच्या हाती लागे द्रव्य ते अमाप -
दक्ष पोलिसांची कैसी नसते गस्त तेव्हां ?
फार्स जणू जप्तीकरता - कायदा कचेरी
आपुलीच वर्दी होते आपुलीच वैरी -
माल मनी तो जप्तीचा सत्वरी मिळावा !!
प्रतिक्रिया
17 Apr 2011 - 3:01 pm | निनाव
:) सह्हीच. वास्त्वयच. 'जे न देखे रवि...' प्रचिती पुन्हा एकदा. खूप छान.
17 Apr 2011 - 7:06 pm | नरेशकुमार
स्विस बँकेत अकाउण्ट कसे काढतात, हे कोनीतरी सांगा राव !
ही कविता वाचुन घरघर लागुन राहीली आहे.