नमस्कार लोकहो,
गेल्या महिन्यात मिपाकरांची सहल यशस्वि झाल्यापासुन सगळ्यांनी एकत्र जेवायला जावं असा विचार मनात होता, मागच्या सोमवारी मला श्री. स्पा यांच्या पंगतीचा लाभ झालाच होता तसंच श्री. वल्लींबरोबर ही खादाडी चर्चा चालुच होती,म्हणुन खालील प्रमाणे कार्यक्रम ठरवलेला आहे त्याचं हे खुलं आमंत्रण.
कार्यक्रम फक्त जेवणाचा आहे, -
हॉटेल पंचवटी (गुजराथी थाळी) , भांडारकर रोड, पुणे.
दिनांक - १४ फेब्रुवारी २०११. वेळ - संध्याकाळी ०७.१५.
जे येणार असतील, त्यांनी नुसतं इथे प्रतिसादात हो म्हणुन चालणार नाही, नंतर व्यनिने कळवावे च अगदी मोबाईल नंबर सहित. ह्यांचा कुठेही गैरवापर होणार नाही याची खात्री बा़ळगा. मोबाईल नंबर देणार नसाल तर न चुकता येण्याची जबाबदारी आपली आपण घ्यावी. आमंत्रण सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंतच खुलं राहील,( टेबल रिझर्वेशनचा प्रश्न येउ नये यासाठी) नंतर ३ वाजेपर्यंत मी सगळ्यांना व्यनिने येणा-या मित्र मैत्रिणींची युआयडींची यादि कळवेन.
या आधी पण काही जणांना खव मध्ये विचारणा केलेली आहे, त्यांनी खव मध्ये उत्तर पण दिलेलं आहे, परंतु , त्यांना सुद्धा नम्र विनंती की पुन्हा एकदा प्रतिसाद देण्याचे किंवा व्यनि करण्यावे कष्ट घ्यावेत.
वाहतुक व्यवस्था - सर्वांनी आपली आपली सोय करायची आहे.
खर्च - मी शेवटी गेलो होतो त्यानुसार रु. १९० की २१० प्रति थाळी अनलिमिटेड असा दर होता, हे पण व्यनितुन कन्फर्म करेनच.
अजुन एक नम्र विनंती की, सर्वांनी आपले आपले मिपावरचे परस्पर वाद मिपावरच सोडुन यावेत. ते सोडवायला पुन्हा मिपावर यायचे आहेच. ही सुचना फक्त खबरदारी म्हणुन आहे,इथलं फक्त हसतं खेळतं वातावरण तिथं यावं हाच उद्देश आहे. ( काही जुन्या व्हर्चुअल ग्रुपच्या, (विशेषत: अॅटो ग्रुप,)रिअल मिटिंगचे अनुभव आहेत अशा प्रकारचे) स्वानुभव हो अजुन काय ?
चला, सोमवार संध्याकाळ बुक करा तर मग खादाडिसाठी.
आमची प्रेरणा - श्री.विजुभॉ यांचा धागा - http://misalpav.com/node/16453 आणि त्यावरचा माझाच प्रतिसाद - http://misalpav.com/node/16453#comment-280995
हर्षद.
प्रतिक्रिया
11 Feb 2011 - 7:30 pm | प्रचेतस
येणार ..येणार.....नक्कीच येणार.
तिथे जाउन खादाडी करणार.
11 Feb 2011 - 7:31 pm | चिरोटा
गुजराती थाळी म्हणजे मांस मच्छर नसणार का?
11 Feb 2011 - 7:33 pm | प्रचेतस
शुद्ध शाकाहारी फक्त
11 Feb 2011 - 7:37 pm | ५० फक्त
महत्वाचा बदल - सोमवारी संध्याकाळी पंचवटी एका पार्टी निमित्त पुर्ण रिझर्व्ह आहे, त्यामुळे स्थळ बदलत आहे, त्यासाठी अतिशय क्षमस्व. काही वेळातच बदललेलं स्थळ क़ळवत आहे. आपण येण्याची तयारी करावी हि विनंती.
हर्षद.
11 Feb 2011 - 7:38 pm | स्वैर परी
प्रति थाळी
11 Feb 2011 - 7:43 pm | ५० फक्त
मा. सं.मं वरील धाग्यांत
"हॉटेल पंचवटी (गुजराथी थाळी) , भांडारकर रोड, पुणे" च्या ऐवजी " मयुर व्हेज थाळी - जंगली महाराज रोड, पुणे" - हा बदल करावा ही नम्र विनंती.
मित्र / मैत्रिणींनो, बाकी काहीही बदल नाही याची नोंद घ्यावी. तसदीबद्दल क्षमस्वः
हर्षद.
11 Feb 2011 - 8:03 pm | मीली
पुण्यात असती तर मी पण आली असती ....!
आता सोमवारी पोटात दुखणार असे दिसत आहे!
दुर्वांकुर मध्ये पण छान असते थाळी ...सहज आठवले म्हणून लिहिले.
13 Feb 2011 - 4:27 pm | पर्नल नेने मराठे
दुबईत असती तर मी पण आले असते ....!
आता सोमवारी पोटात दुखणार असे दिसत आहे!
राजधानी (रोला स्त्रिट) मध्ये पण छान असते थाळी ...सहज आठवले म्हणून लिहिले.
चिली
11 Feb 2011 - 8:19 pm | मितालि
हर्षद,
या कार्यक्रमा साठी तू व्हॅलेंटाईन डे ची संध्याकाळच का निवडलीस? यासाठी खालील पैकी ए़खादं कारण तर नाही ना?
१. तुझ्या बायकोने ए़खादं महागडं गिफ्ट मागु नये म्हणुन पळवाट.
२. तिच्याशी भांडण झाल्याने तुला सेलिब्रेट करायला दुसरा कोणीच पर्याय नाही.
३. तुझी एक्स किवा एक्स्ट्रा व्हॅलेंटाईन मिपाच्या निमित्ताने भेटणार आहे.
Just Joking. Just Joking. Hope you take it lightly.
11 Feb 2011 - 8:21 pm | गवि
somvar pakadalaat mhanoon vaeet vatale
2 divas leave connecting Sunday impossible.
Next time pakka.
11 Feb 2011 - 8:38 pm | स्पा
हर्षद साहेब.. चायला सोमवार कीस ख़ुशी मे निवडलात?
असो.. यायची इच्छा असून सुद्धा येता येणार नाही.. क्षमंस्व
असो तुम्ही धमाल करालच... सो "चिल माडी"
(वृतांत वाचण्याच्या प्रतीक्षेत) स्पा
12 Feb 2011 - 10:52 am | सूड
स्पाकाकांना 'माडी'चा बराच अनुभव दिसतोय !! माडी चिल असते म्हणताय्त. गायकही आहेत म्हणे, त्यामुळे माडीवरी चल गं गडे गाऊन माड्यांची सफर सहज करत असतील. :D
12 Feb 2011 - 11:07 am | स्पा
त्यामुळे माडीवरी चल गं गडे गाऊन माड्यांची सफर सहज करत असतील
तुम्ही येताय का सफरीला बोला ;)
13 Feb 2011 - 8:12 am | सूड
कशाला कशाला !! तुमच्यासोबत suffer करण्यापेक्षा आम्ही एकटेच छान सफर करु. चिंता नसावी. :D
11 Feb 2011 - 10:24 pm | ५० फक्त
@ स्पा आणि गवि,
- सोमवार का निवडला, अरे पुण्यातल्याच काय पण कोणत्याही हॉटेलात रविवारी एवढी गर्दी असते की विचारता सोय नाही, जेवायला अर्धा तास आणि वेटिंगला दोन तास असा प्रकार होतो.
@ मिताली - Just Joking. Just Joking. Hope you take it lightly. अगदि अगदि, अगं मी स्वताच एवढा हेवि आहे की, मला डॉक्टरांनी सगळंच लाईट घ्यायला सांगितलं आहे.
@ स्पा, तु मुंबईत ठरव की शनिवारी रविवारी येईन मी. तुला खरड केली होती कि रे दिवा महाराष्ट्राच्या बद्दल, काय झालं त्याचं.
12 Feb 2011 - 12:04 am | गोगोल
देणारे?
12 Feb 2011 - 12:22 am | ५० फक्त
गोईंग ड्च, सगळ्यांनी शेअर करायचं आहे, माझ्या सगळ्या खादाड्य याच बेसिसवर असतात.
12 Feb 2011 - 12:24 am | गोगोल
फिलॉसॉफी आवडली :)
12 Feb 2011 - 11:00 am | चिंतामणी
गेल्या महिन्यात मिपाकरांची सहल यशस्वि झाल्यापासुन ......
कधी निघाली होती सहल? कुठे गेली होती? संयोजक कोण होते?
माझ्या वाचनात तर गेल्या महीन्यात झालेली पार्टी आहे. सहल कधी निघाली ते कळले नाही.
ठरावीक सभासदांपुरती मर्यादीत होती का?????
12 Feb 2011 - 11:46 am | पिवळा डांबिस
सोमवारी मनसोक्त मैफल करण्याचा बेत करणार्यांना शुभेच्छा!!!
;)