सुंदर 'खयाली पुलाव' पकवणार्या संजोपरावांचा हा असा 'आसपास' वावर बघून आम्हाला काही कळेनासे झाले की हे असे अचानक का व्हावे? आणि त्या स्तंभितावस्थेतच विडंबन आमच्या 'आसपास' भटकून गेले! ;)
ओढा खाली, पाडा त्याला, बोलत काही बाही
सूर वेगळे, नवी तुतारी जरी वाजवू पाही
जरा वेगळी टपरी दिसता पोटभरुन हासले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
सांजसकाळी जाऊ लागल्या कानोसा घेण्यात
मग्नच असती कोणी येथे कुजबुज ती करण्यात
दात विचकुनी, किचकिच करुनी घसे कसे बसले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
नमोगताला शरण जाउनी घाली की साकडे
जालावरचे वैर असे की शेपुट ते वाकडे
विडंबलेले काव्य पाहुनी सोगे का सुटले?
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
नकाच फेकू गुलाल, किंवा घालू पायघड्या,
असेल मैत्री खरिखुरी तरि नजरा का वाकड्या?
दुज्या सुरांचे, स्वागत येथे, वर्ज नसे कुठले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
जालावरती रंग निराळे, दोन असे तर दोन तसे
पूर्वसुरींचे आळवुनी स्वर काव्य नासले असे कसे
मेंढरातल्या लांडग्यास मग रट्टे की बसले
मिसळ निघाली जहाल आणिक सारक होऊन बसले!
चतुरंग
प्रतिक्रिया
30 May 2008 - 3:56 am | बेसनलाडू
मस्त विडंबन! ओघवते काव्य, चपखल शब्दरचना आणि प्रासंगिक!
हे विडंबन आणि मूळ रचना दोन्हीवर योग्य तितक्या गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, हे वेगळे सांगायला नको, असे वाटते.
(सूचक)बेसनलाडू
30 May 2008 - 6:48 am | सन्जोप राव
म्हणतो.
सन्जोप राव
30 May 2008 - 7:15 am | विसोबा खेचर
जरा वेगळी टपरी दिसता पोटभरुन हासले
अगदी खरं! :)
नकाच फेकू गुलाल, किंवा घालू पायघड्या,
असेल मैत्री खरिखुरी तरि नजरा का वाकड्या?
अरे हेच तर मी म्हणत होतो! :)
असो, रंगा विडंबन बाकी झकास... :)
जियो...!
तात्या.
30 May 2008 - 7:41 am | आजानुकर्ण
हेच म्हणतो :)
आपला,
(सहमत) आजानुकर्ण
30 May 2008 - 12:26 pm | प्राजु
विडंबन अगदी चपखल झाले आहे.
अभिनंदन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/