डिस्क्लेमर : प्राजुतैच्या दिवाळीच्या सुंदर कवितेची अशी चिरफाड केल्याबद्दल तिची जाहीर माफी मागतो. प्रस्तुत कवितेत नवर्याचे कपडे धुवून धुवून वैतागलेली बायको आपली व्यथा मांडते आहे. समस्त स्त्रीमुक्तीवाद्यांनी कृपया ह. घ्यावे! ;)
रस्त्यावरती लोळत येता का हो तुम्ही संध्याकाळी
सदरे, लेंगे आणिक पंचे, काय काय मी धुवू सकाळी?
चमचमणारे ओले दुपटे, दिवसामधुनि शतदा वाळी
प्लास्टीक घाला गादीवरती, निजण्यापूर्वी अपुली बाळी
सजून जाते अंगण अवघे कपड्यांनी या तिन्ही त्रिकाळी
दाटीतून त्या मार्ग काढता, नाडी यांची लागे भाळी
कष्टांची मम किंमत ऐसि, एकच माझी साडी चोळी
नाही घेतली नवीन कधिही, गेला दसरा गेली दिवाळी
सप्तजन्मी संसार चालू दे, पण ईशा! कर अदलाबदली
मी नवरा अन ह्यांना माझी करी बायको पुढल्या वेळी
- तराजु
प्रतिक्रिया
5 Nov 2010 - 6:17 pm | यशोधरा
=))) =)))
5 Nov 2010 - 6:18 pm | मितान
:)
शेवटची ओळ फार्फार आवडली :)
5 Nov 2010 - 6:22 pm | मस्तानी
विडंबन मस्तच !
8 Nov 2010 - 8:26 pm | प्राजु
शेवट्ची ओळ लय भारी. किती छान होईल ना.. असं झालं तर! ;)
5 Nov 2010 - 7:18 pm | अनामिका
सप्तजन्मी संसार चालू दे, पण ईशा! कर अदलाबदली
मी नवरा अन ह्यांना माझी करी बायको पुढल्या वेळी
मेघ वा वा !
शेवट एकदम ब्येश्ट म्हणते मी!
5 Nov 2010 - 7:21 pm | प्रीत-मोहर
मेवेमहाराज की जय!!!!!
5 Nov 2010 - 7:24 pm | रेवती
विडंबन छान झालय.
थोडी वैतागाची आणि दु:खाची किनार आहे.
5 Nov 2010 - 7:25 pm | पैसा
जीव गेला..
अरे ती बिचारी पुढच्या जन्मात 'आयटी नवरा' झाली आणि 'या नवर्याला' आयटी बायको मिळाली तर...
5 Nov 2010 - 9:21 pm | पुष्करिणी
असच होणार आहे, म्हणून देवाकडे वर ( किंवा वधू ) मागताना नीट विचार करावा!
मेवे विडंबन छान हो !
5 Nov 2010 - 7:45 pm | प्रभो
क ड क!!!
5 Nov 2010 - 7:53 pm | असुर
मेव्याच्या 'प्रस्तुत' विडंबनाला मानाचे पहिले पाचही प्रतिसाद 'पाशवी' असल्याचे पाहून ड्वॉले पाणावले! :-)
मेव्या, खल्लास रे! म्हणजे, विडंबन खल्लास रे!
--असुर
5 Nov 2010 - 9:38 pm | राजेश घासकडवी
जबरी विडंबन! मजा आली.
5 Nov 2010 - 10:55 pm | मराठमोळा
मेवे,
=)) =))
>>रस्त्यावरती लोळत येता का हो तुम्ही संध्याकाळी
सुरुवातीलाच फुटलो.
जबराट.
6 Nov 2010 - 2:26 am | नंदन
जबरी विडंबन!
6 Nov 2010 - 11:59 am | अवलिया
जबरदस्त !!!
6 Nov 2010 - 5:19 pm | परिकथेतील राजकुमार
लै खास मेवे !
एकदम ज ह ब र्या द स्त झाले आहे विडंबन.
6 Nov 2010 - 10:54 pm | सूड
सह्ही !!
7 Nov 2010 - 2:14 pm | स्पंदना
सह्ही सही !
वाचणार्या प्रत्येकाचा फाड दिशी फुटणारा फटाका होतो. काय विषय आहे व्वा!
7 Nov 2010 - 2:18 pm | sneharani
मस्त झालयं विडंबन!
8 Nov 2010 - 10:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अल्लाऽऽऽऽऽऽऽ जीव गेला! आणि ज्योची प्रतिक्रियाही खल्लास आहे.
अवांतरः आता काय नवीन आयडी घेणार का काय, 'तराजु' नावाचा? ;-)
8 Nov 2010 - 10:41 am | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा.. मस्तं विडंबन. :)
8 Nov 2010 - 10:59 am | विसोबा खेचर
मस्त.. :)
8 Nov 2010 - 12:36 pm | सुधीर काळे
मेघवेडा-जी,
विडंबन आवडले!