'निर्लज्ज व्हा'च्या मागील भागात आपण बघितलं की नवरे कुठल्या पातळीपर्यंत घसरून आपला कार्यभाग साधू शकतात. 'मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधी सांगता येत नाही' अशी एक म्हण आहे. ह्या यादीत नवरा हा प्राणीही जोडायला हरकत नाही. खरं म्हणजे नवर्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू दिलं तर बायकांचं आयुष्य फार सुकर होईल. पण तसं होणे नाही. बायका गोष्टींकडे स्वतःच्या दॄष्टीकोनातून बघत असल्याने नवर्यांचं मन त्यांना कळत नाही आणि ह्यातूनच पुढे वांधे होतात.
बायकोकडे जसं रडण्याचं हुकमी हत्यार असतं तसंच नवर्यांकडेही भावनेला हात घालायचा जालीम उपाय असतो. एरवी नर्मदेतल्या गोट्याप्रमाणे अंगाला काहीही लाऊन न घेणारा, भावनेचा लवलेशही नसलेला आपला दगड अचानक भावूकपणे बोलायला लागला की बायका १०००००००% विरघळतात. मी स्वतः अनेक मोठे मोठे लोचे करून घरी जाताना दाराबाहेरच्या तगरीच्या एका फुलाच्या जिवावर स्वतःची कातडी कैक वेळा वाचवली आहे. त्यामुळे बायकांना असा सल्ला आहे की ह्या गोड-गोड बोलण्याला अजिबात फसू नये. नवरे सुधारक चळवळ जोमाने आणि नेटाने सुरू ठेवावी.
शतकानुशतकं नवरे भावनांना हात घालून आपल्या बायकांचा मामा करत आले आहेत. तर ह्यावर उतारा म्हणून नवरे काय म्हणतात आणि त्यांना काय अभिप्रेत असतं हे आता मी काही उदाहरणं देऊन समजावतो.
प्रकटः तुला बघितलं की एका क्षणात दिवसभराचा थकवा गायब होतो.
गर्भितार्थ: च्यायला आज पुन्हा उशीर झाला. ज्या दिवशी हिला जेवायला घेऊन जाणार असतो नेमकी त्याच दिवशी मित्रांची पार्टी ठरते.
प्रकटः तुझ्या हातचा डबा खाताना तुझ्यासोबत बसून जेवल्यासारखं वाटतं.
गर्भितार्थ: उगाच त्या डबेवाल्या बाईच्या डोंबलावर हजार-दोन हजार आदळायची गरज नाहिये. दोघांचा स्वयंपाक करणं जड नाहिये तुला. आणि सिगरेटचे भाव किती वाढलेत अंदाज आहे का?
प्रकटः हा विकेंड फक्त तू आणि मी, बाकी कोणीच नाही.
गर्भितार्थ: दोन दिवस मी मकरासनात लोळत पडणार आहे. इथे चल तिथे चल, शॉपिंग करू, फिरायला जाऊ असं म्हणून प्लीज माझं डोकं खाऊ नकोस.
प्रकटः तुला हवं तिथे फिरायला जाऊ आपण ह्या सुट्टीत.
गर्भितार्थ: च्यायला एक तर जागा शोधा, हॉटेलचं बुकींग करा, तिकिटं काढा आणि हॉटेलवाल्यांनी हिरव्या चादरीवर निळ्या उशा ठेवल्या म्हणून आपणच शिव्याही खा. अजिबात गरज नाही. तूच कर सगळं, मी बघतोय गंमत.
प्रकटः अगं तुझ्या आईला इथे यायचं म्हणजे किती दगदग होईल, त्यापेक्षा तूच जाऊन ये. भेटही होईल आणि त्यांना थकवाही येणार नाही
गर्भितार्थ: अर्थ सांगायची गरज आहे???
ही अशी आणि इतर अनेक वाक्य बायका येता जाता ऐकत असतात आणि येता जाता अशा वाक्यांना भुलतही असतात. त्यामुळे आता पुढल्यावेळी वाक्याची सुरुवात 'राणी, सोनू, डिअर' अशा शब्दांनी झाली की सवधपणाचा पावित्रा घ्यावा.
तर असे हे (माझ्यासारखे) निर्लज्जपणा, निगरगट्ट्पणा आणि कोडगेपणा कोळून प्यायलेले तुमचे नवरे अनेकवेळा तुम्हाला कोड्यात टाकण्यासारखं वागतात. वाल्याच्या वाल्मिकी होतो, पण इतका इंस्टंट? इतक्या पटकन तर मॅगीही बनत नाही. अनेकींना अंदाज येत नाही की नक्की चाललंय काय. नवर्याला वठणीवर आणण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश आलं असं समजून त्या बिचार्या खूष होतात. पण लवकरच ये ये माझ्या मागल्या सुरू होते. आता ह्या कोड्याची उकल आपण करू. नेहमीच घडणार्या घटना आपण आता बघू.
त्याचं असं आहे की ह्या घटना आपल्या आयुष्यात नेहमीच घडतात. पण जेव्हा आपण त्या दुसर्याच्या नजरेतून पाहतो तेव्हा जाणवतं की ह्या प्रचंड सेंटीमेंटल वाटणार्या घटना प्रत्यक्षात किती विनोदी आहेत.
घटना १ - सामान्य दॄष्टीकोन
वेळ - गुरुवार अथवा शुक्रवार रात्र
पार्श्वभूमी - तुम्ही रविवारी रात्री नवर्यासोबत शॉपिंग आणि नंतर डिनर असा आगळा-वेगळा, अभिनव, प्रचंड इंटरेस्टींग कार्यक्रम बनवलाय. प्लॅनींग सुरू आहे. इतक्यात नवर्याला मित्राचा फोन येतो. (फक्त नवरा काय बोलतोय हे ऐकू येतं)
"काय रे डुकरा कसा आहेस? (इथे बायको नवर्याला नीट बोल असं डोळ्यांनी दटावून चापटी मारते.) मी मजेत रे. फॅमिली लाईफ एकदम फर्स्ट क्लास. साल्या तू पण लग्न कर आता. खरं सांगतो तुला लग्न झाल्यावर आयुष्य कसं झकास होऊन जातं बघ. बरं बरं...फोन कशासाठी केलास? काय सांगतोस काय? कधी? काँग्रॅट्स बॉस. बघ आता प्रमोशनपण मिळालं, लग्न करायला काहीच हरकत नाही. हॅ हॅ हॅ... सॉरी यार मी नाही येऊ शकणार पार्टीला. अरे माझ्या बायकोनी छान प्लॅन बनवलाय विकेंडचा. तिचं मन नाही मोडवत. अरे किती तरी दिवसानी आम्हाला एकमेकांसाठी इतका वेळ मिळतोय. I don't want to miss it. मनापासून सॉरी यार. नेक्स्ट टाईम नक्की भेटू."
आता नवरा आनंदाने हसून बायकोकडे वळतो 'काय करायचं राणी रविवारी आपण?'
हे सगळं ऐकताना बायकोच्या चेहर्यावर आनंदाच्या २-५ हजार छटा झळकून जातात. तिने मनातल्या मनात जगातल्या यच्चयावत वडांना दोरे गुंडाळलेले असतात, गायींना मणभर चारा भरवलेला असतो. पण नवर्याने फोन ठेवतेवेळी मित्राला म्हटलेलं सॉरी तिच्या मनात अडकून राहतं. मग न राहवून ती विचारते.
बायको - काय झालं रे?
नवरा - काही नाही गं?
बायको - फोन कुणाचा होता?
नवरा - अगं आपला शिर्या गं...
बायको - कोण शिर्या?
नवरा - अगं असं काय करतेस? माझा जुन्या कंपनीतला मित्र. जरासा उंच आणि गव्हाळ आहे.
माझी बायको - तुझ्याहून गव्हाळ? (हे वाक्य इथे गैरलागू आहे पण स्वानूभव लेखनात उमटलाच पहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. त्यामुळे आधीचं वाक्य पुन्हा घेऊन पुढे जाऊ.)
नवरा - अगं असं काय करतेस? माझा जुन्या कंपनीतला मित्र. जरासा उंच आणि गव्हाळ आहे.
बायको - अरे हो, आपल्या लग्नाला आले होते ना ते?
नवरा - बरोब्बर (गुलाबजामावरून पाक ओघळावा तसं चेहर्यावरून कौतूक ओघळतंय नवर्याच्या. बघून घ्या.)
बायको - काय झालं त्यांना? कसली पार्टी देतायत ते?
नवरा - अगं त्याचं प्रमोशन झालं मागच्या आठवड्यात
बायको - हो का? अरे वा...
नवरा - आणि आता कंपनी त्याला लगेच पुढल्या महिन्यात पुण्याला पाठवतेय, किमान १ वर्षासाठी.
बायको - अच्छा…
नवरा - म्हणून तो म्हणत होता की जायच्या आधी सगळ्यांना एकदा भेटायचंय. लग्नाआधी दिड-दोन वर्ष आमची भेटच नव्हती. आता आहे पुन्हा टच मधे.
बायको - आणि लग्नात कुठे काय बोलणं होतं. (इथे बायकोला लग्नाच्यावेळी हिला विसरून कोंडाळं करून फिदी-फिदी हसत आईसक्रीम झोडणार्या तिच्या जिवलग मैत्रीणी आठवत असतात.)
नवरा - आणि आता चालला बेटा पुण्याला.
बायको - अरे मग इतकं म्ह्णतोय तर भेट की, पुन्हा कधी योग येईल सांगता येतं का?
नवरा - काहीही काय अगं? आपला प्लॅन कधी पासून ठरलेला आहे. मागच्या शनिवारी पण असंच काही तरी झालं आणि आपला बेत रद्द करावा लागला. मला नाही आवडत असं. एक तर आपण एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही.
बायको - अरे ठीक आहे. आता रोज रोज का कुणी जुन्या मित्रांना भेटतं. जा तू... आपण पुढल्या विकेंडला बाहेर जाऊ...
नवरा - नको, मी त्याला आधीच नाही सांगितलंय. मला माझी बायको सगळ्यात महत्वाची आहे.
बायको - तुझी बायकोच सांगतेय तुला जा म्हणून.
नवरा - नाही म्हणजे नाही
बायको - हो म्हणजे हो... तुला माझी शप्पथ आहे.
नवरा - तू पण ना... शप्पथ नको घालूस. जातो मी.
बायको 'आपला नवरा कसला लय भारी आज्ञाधारक, माझं मन जपणारा, भावनाप्रधान, वगरे वगरे आहे' ह्या समजूतीत रमते आणि नवरा मनातल्या मनात हसत पण वरवर दु:ख दाखवत झोपी जातो.
----------------------------------------------------------------------------------------
घटना १ - बायकोचा दॄष्टीकोन
वेळ - गुरुवार अथवा शुक्रवार रात्र
पार्श्वभूमी - तुम्ही रविवारी रात्री नवर्यासोबत शॉपिंग आणि नंतर डिनर असा आगळा-वेगळा, अभिनव, प्रचंड इंटरेस्टींग कार्यक्रम बनवलाय. प्लॅनींग सुरू आहे. इतक्यात नवर्याला मित्राचा फोन येतो. (फक्त नवरा काय बोलतोय हे ऐकू येतं) पुढचं सगळं बोलणं आधीसारखं होतं.
बायको - कुणाचा फोन होता रे?
नवरा - अगं आपला शिर्या गं...
बायको - हो का? कसा आहे तो?
नवरा - तू ओळखतेस त्याला?
बायको - अरे, आपल्या लग्नाला आले होते ते.
नवरा - बरोब्बर, पण तुझ्या लक्षात आहे म्हणजे कमाल झाली (इथे नवर्याच्या डोक्यात प्रचंड वेगाने आकडेमोड सुरू आहे.) (पहिला पॉइंट सर)
बायको - काय झालं त्याला?
नवरा - अगं त्याचं प्रमोशन झालं मागच्या आठवड्यात
बायको - हो का? अरे वा...
नवरा - आणि आता कंपनी त्याला लगेच पुढल्या महिन्यात पुण्याला पाठवतेय, किमान १ वर्षासाठी.
बायको - अच्छा…
नवरा - म्हणून तो म्हणत होता की जायच्या आधी सगळ्यांना एकदा भेटायचंय. लग्नाआधी दिड-दोन वर्ष आमची भेटच नव्हती. आता आहे पुन्हा टच मधे.
बायको - अरे वा. मग बोलाव ना सगळ्यांना आपल्या घरी, मस्त पार्टी करू.
नवरा - घरी??? अगं तो बाहेर जायचं म्हणत होता.
बायको - बाहेर कशाला? मी करीन घरीच सगळं. शिर्याच्या बायकोला बोलावेन तयारीला आधी.
नवरा - तिला कशी ओळखतेस तू? (दुसरा पॉइंट सर)
बायको - झाली रे ओळख. माझ्या फ्रेंडलिस्ट मधे पण आहे ती. आम्ही खूप गप्पा मारतो. पण हा प्लॅन फिक्स्ड. सगळ्यांना उद्याच कॉल करून टाक.
नवरा - नको अगं तुला किती त्रास होईल... (तिसरा पॉइंट सर)
बायको - त्रास कसला अरे. आणि तू आहेसच ना मदतीला. सकाळी लवकर उठून करू सगळं पटापट.
नवरा - पण मग आपल्या प्लॅनचं काय?
बायको - आपण जाऊ रे पुढल्या आठवड्यात. पटकन कॉल कर शिर्याला आणि सांगून टाक.
नवरा - हो हो...
(नवरा फोन लावतो.)
अरे बायको म्हणतेय की घरीच पार्टी करूया आमच्या. तुझ्या बायकोला सकाळी बोलावून घेणार आहे मदतीसाठी. काय सांगतोस काय? हे कधी घडलं? ओके ओके. सांगतो मी बायकोला.
नवरा - अगं ऐकलंस का? शिर्याची ट्रांसफर रद्द झाली आहे. आता इथेच असणार आहे.
बायको - वा... मग आपला प्लॅन फिक्स्ड?
नवर - (काय बोलणार बिचारा) (मोहिम फत्ते)
घटना १ समाप्त.
समोरच्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्यात काय मजा असते. आणि तो समोरचा जर नवरा असेल तर अजूनच धमाल येते. ह्या वानगीदाखल घह्याल्या उदाहरणा वरून नवर्यांची सर्वसाधारण मेंटॅलिटी समजायला हरकत नाही.
ह्या भागात इथेच थांबू. पुढल्या भागात नवर्यांचे काही प्रताप, आजमावलेले हातखंडे आणि त्यावरचे पहिल्या धारेचे उतारे बघू. तोवर निर्लज्ज होण्याचा सराव सुरू असू द्या.
निर्लज्जपणे (पुन्हा क्रमश:)
प्रतिक्रिया
14 Oct 2010 - 10:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही हा हा हा ... मजा येत्ये रे वाचायला!
14 Oct 2010 - 10:44 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
14 Oct 2010 - 11:48 pm | मिसळभोक्ता
मस्त रे अॅड्या !
14 Oct 2010 - 10:46 am | नगरीनिरंजन
हा भाग लै भारी!
(पण आता नवरर्यांना नवा निर्लज्जपणा शोधावा लागणार.)
14 Oct 2010 - 11:07 am | आदिजोशी
हम है ना :-)
14 Oct 2010 - 11:20 am | नगरीनिरंजन
होय. परमनिर्लज्ज आणि पतिपशुतारक अशा तुमचाच आधार आम्हाला :-) . पण नवा निर्लज्जपणा सार्वजनिकरित्या शिकवल्यावर तो पण बायकाना कळेल ना राव.
14 Oct 2010 - 11:43 am | आदिजोशी
व्य. नि. ची सोय त्यासाठीच आहे मालक :-)
14 Oct 2010 - 10:52 am | मराठमोळा
=)) =))
लग्न झालेले पुरुष त्यांचे सिक्रेट उघड केले म्हणुन मोर्चा काढणार आता बहुतेक तुझ्या विरुद्ध!!
लेख जबरा!!!!
14 Oct 2010 - 10:56 am | शिल्पा ब
ही ही ही... :beer:
14 Oct 2010 - 11:00 am | ब्रिटिश टिंग्या
:)
14 Oct 2010 - 11:16 am | Pain
गद्दार!
14 Oct 2010 - 11:21 am | Nile
बरं केलंस रे अॅडीभौ खर्या गमती नाही सांगितल्यास ते बायकांना. राहुदे गाफिल हे वाचुन. ;-)
14 Oct 2010 - 11:24 am | Pain
हाहाहा :D
एका दगडात २ पक्षी !
14 Oct 2010 - 11:25 am | sneharani
हाही भाग मस्त.
मजा येतेय वाचायला!
:)
14 Oct 2010 - 11:35 am | श्रावण मोडक
या अॅड्याला आत्तापर्यंत आपला हितचिंतक, मित्र मानणार्यांची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार करतोय.
बाकी, लेखन फर्मास. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.
14 Oct 2010 - 11:47 am | पाषाणभेद
एकदम फर्मास फार्स! मजा आली वाचून!
14 Oct 2010 - 11:50 am | स्वैर परी
हहपुवा !!! स्वानुभव दिस्तोय! :D
14 Oct 2010 - 11:57 am | sagarparadkar
छ्या ..... समस्त 'नवरे' जमातीला आता बरंच संशोधन करावं लागणार आहे. पारंपारिक ज्ञानावर आता विसंबून चालणार नाहीच ....
14 Oct 2010 - 12:07 pm | sagarparadkar
पहिल्या व्हर्शन मधे शिर्या अविवाहित होता .... तर दुसर्या व्हर्शन मधे त्याची बायको कशी मदतीला येणार ... थोडा घोळ होतोय ...
14 Oct 2010 - 3:38 pm | रेवती
हेच म्हणते!
14 Oct 2010 - 5:40 pm | स्वाती२
सहमत!
14 Oct 2010 - 3:47 pm | धमाल मुलगा
तसंच जसा मी 'अॅड्याचं लग्न आहे' असं सांगून ३ वेळा नाईटआउट आणि बोंबलत हिंडणं केलं होतं. ;)
(साला, अॅड्याचं खरोखर लग्न झाल्यानंतर जेव्हा त्याचं हायकमांड आणि आमचं हायकमांड भेटले त्यानंतर लै मार पडला. :( )
14 Oct 2010 - 4:50 pm | आदिजोशी
पहिल्या व्हर्जन मधे शिर्या अविवाहित आहे असं कुठेच म्हटलेलं नाहिये. फक्त बायको असल्याचा उल्लेख नाहिये.
14 Oct 2010 - 4:52 pm | सहज
काय रे डुकरा कसा आहेस? (इथे बायको नवर्याला नीट बोल असं डोळ्यांनी दटावून चापटी मारते.) मी मजेत रे. फॅमिली लाईफ एकदम फर्स्ट क्लास. साल्या तू पण लग्न कर आता. खरं सांगतो तुला लग्न झाल्यावर आयुष्य कसं झकास होऊन जातं बघ. बरं बरं...
14 Oct 2010 - 5:08 pm | गणपा
सहज राव स्काट्लंड्यार्डात होते वाटते.
तसा मुद्दा एकदम पर्फेक्ट आहे. वाचताना मझ्या पण लक्षात आला हा घोळ, पण अॅड्या आपाला माणुस है म्हणुन सोडला. (सगळ कस मनातल लिहितो. पण अस सगळ डिट्टेलवारी सांगुन आता आमची गोची करुन ठेवली आहे बेण्यानं.) ;)
14 Oct 2010 - 6:15 pm | धमाल मुलगा
>>सहज राव स्काट्लंड्यार्डात होते वाटते.
एक्स केजीबी.
14 Oct 2010 - 10:39 pm | पिवळा डांबिस
सहज राव स्काट्लंड्यार्डात होते वाटते.
आम्ही चुकून सहज राव लांड्या स्कर्टात होते असं वाचलं!!!! म्हटलं हे काय नवीन? :)
बाकी तुमचं नवविवाहितांचं चालू द्या....
:)
14 Oct 2010 - 10:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
14 Oct 2010 - 10:53 pm | श्रावण मोडक
खल्लास... ;)
14 Oct 2010 - 11:11 pm | मस्त कलंदर
आताच तात्यांच्या प्रतिसादात वाचले की आगामी लेख 'तात्या-धर्मेंद्र भेट' आहे म्हणून. तोवर इथे सहजकाका लांड्या स्कर्टात!!! आणि धरमवीरमधल्या स्कर्टातल्या धर्मेंद्रच्या ठिकाणी सहजकाका दिसले. आणि डोळे गपकन मिटून घेतले!!!





15 Oct 2010 - 7:46 am | सहज
>आणि डोळे गपकन मिटून घेतले!!!
डोळे बंद केले की चांगले कॉण्संट्रेशण होते म्हणे!
चालू द्या!
14 Oct 2010 - 11:27 pm | Nile
मेलो मेलो मेलो!
=)) =)) =))
15 Oct 2010 - 7:11 am | सहज
हुशार!!! स्कॉटलंडात पुरुष 'स्कर्ट' घालतात (त्या स्कर्टला किल्ट म्हणतात)त्यामुळे पिडाआजोबा अहो नवीन असे काही नाही. तसेही डोन्राव आयपी ड्रेस चेक करतायत म्हणल्यावर स्कर्टची फॅशन परत आली मिपाकरांच्यात!
15 Oct 2010 - 7:24 am | राजेश घासकडवी
तो फोटोतला पाय फार वर करू नका... आणि हो, ती करवत जरा धारदार दिसते आहे.
15 Oct 2010 - 7:46 am | गांधीवादी
लेखाचे शीर्षक (बायकांनो तुम्ही सुद्धा) निर्लज्ज व्हा - असे आहे.
स्वगत : ठेवला का हात धारधार करवतीवर, आता कधी कापला जाईल सांगता येत नाही...
15 Oct 2010 - 7:39 am | सहज
>पाय फार वर करू नका
तो एक स्टील फोटो आहे, लाइव्ह शो नाही. धन्यवाद.
पण तुम्ही नियमीत कुठल्या साइटींवर पडीक दिसता हे कळले बरं.
करवत धारदार दिसते!
बर मग? फार तर मोडेल ती करवत ना? त्यात काय एवढे अजुन करवती आहेत. काळजी नसावी. धन्यवाद!
15 Oct 2010 - 10:03 am | राजेश घासकडवी
फोटो आणि लाइव्हमधला फरक कळतो हो, फक्त असले स्कर्ट घालून पाय वर करू नका, इतकंच म्हटलं.
आम्ही विकिपीडियावर पडीक असतो. http://en.wikipedia.org/wiki/Kilt इथे आम्हाला हे लिहिलेलं दिसलं.
Tradition has it that a "true Scotsman" should wear nothing under his kilt.
म्हणून काळजी वाटली इतकंच.
बाकी करवतीने शेंडी तुटो वा पारंबी, तुम्ही ती काही सोडणार नाही म्हणताय. बरं, जशी तुमची मर्जी.
14 Oct 2010 - 5:13 pm | मेघवेडा
साल्या तू पण लग्न कर आता. खरं सांगतो तुला लग्न झाल्यावर आयुष्य कसं झकास होऊन जातं बघ.
या वाक्यात दोन वेळा "दुसरं" हा शब्द टाकायचा राहून गेला असावा! ;)
14 Oct 2010 - 12:15 pm | सविता००१
ही ही ही.....
14 Oct 2010 - 12:41 pm | सहज
मस्त!
बीबीसी प्रस्तुत कपलिंग नावाच्या एका जबरी सिरीयल मधला एक प्रसंग आठवला. काही वर्षापुर्वी घडलेल्या प्रसंगाची आठवण एक स्त्री व एक पुरुष आपल्या मित्र/मैत्रींणींना सांगत आहेत. एकच घटना व वेगळे संवाद!
एन्जॉय द क्लिप - ४मिनिटे ३२ सेकंदांनी सुरु
10 Jun 2016 - 5:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा धागा वर काढणाऱ्या माणसाचे आभार. कपलिंग बघायच्या कितीतरी वर्षं आधी हा सीन बघितला होता; मिसळपाववरून लिंक मिळाली होती, हे सगळं आठवत होतं. पण बाकी काहीच आगापिछा आठवत नव्हता. त्यामुळे खरंच हा प्रसंग बघितला होता का उगाच आठवत होतं हे काही समजत नव्हतं.
14 Oct 2010 - 12:47 pm | स्पंदना
निर्लज्ज्ज प्रतिपालक?????????????
पहिले दोन नाही मिळाले वाचायला पण मागचा अन हा भाग वाचला.
धन्य आहात.
14 Oct 2010 - 12:53 pm | अवलिया
:)
14 Oct 2010 - 1:13 pm | इंटरनेटस्नेही
चांगला लेख आहे!
14 Oct 2010 - 1:15 pm | गणपा
अॅड्या साष्टांग दंदवत रे तुला. =)) =))
साला पुढच्या भागाची आवर्जुन वाट पाहातोय. :)
14 Oct 2010 - 3:14 pm | मेघवेडा
साला असाच बोल्तो भौ!
एकदम क आणि ड आणि क! लौकर लिवा..
14 Oct 2010 - 1:23 pm | इंटरनेटस्नेही
असच प्रसंग माझा माझ्या मैत्रीणीसोबत घडलेला आहे..! ;)
14 Oct 2010 - 2:03 pm | सुहास..
ड्या जिंदाबाद !!
14 Oct 2010 - 2:47 pm | राजेश घासकडवी
शाळेत असल्या गोष्टी कधी का शिकवत नाहीत कोण जाणे. खरं तर इतरांना मॅनिप्युलेट करता आलं तर एक अक्षरही वाचता आलं नाही तरी चालेल अशी परिस्थिती आहे. खरीपाची व रब्बीची पिकं कुठची हे माहीत नसलं तर काय बिघडतंय? पण नवरा नाटकं कधी करतोय, किंवा बायको मस्का कशी लावतेय हे ओळखता येणं अत्यंत आवश्यक आहे.
वरचा धडा शाळांच्या अभ्यासक्रमात येईल तो सुदिन.
14 Oct 2010 - 2:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हाला माहित असायचं काही कारण नाही तरीही सांगते, भारतात आता बालविवाह बेकायदेशीर आहेत.
14 Oct 2010 - 3:02 pm | राजेश घासकडवी
पण ट्रेनिंग लहानपणापासूनच नको का? नवराबायकोचं नातं उशीरा येतं खरं, पण दहावीतली पोरं दोनचार वर्षांत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड वगैरे करायला लागतातच ना? मग असल्या गोष्टी माहीत हव्याच. तहान लागल्यावर विहीर का खणावी?
14 Oct 2010 - 3:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मान्य आहे, पण शाळा वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरू होते ती पंधरा-सोळाव्या वर्षापर्यंत सुरू असते (सामान्यतः)! यातल्या नक्की कोणत्या यत्तेत हा धडा शिकवणे अभिप्रेत आहे? खरीप, रब्बीची पिकं पाचवी, सहावीतच शिकवतात (बहुतेक) तेव्हा हा धडा घ्यायचा का पहिल्या, दुसर्या महायुद्धाच्या जोडीला घरातलं शीतयुद्धही शिकायचं?
हे प्रश्न अनुत्तरीत असल्यामुळे गोंधळ होतो.
14 Oct 2010 - 3:52 pm | गांधीवादी
विहीर इतक्या लवकरही खणू नये कि लहान लागेपर्यंत पाणी आटून जाईल.
पहिली ते चौथीतले सगळे धडे मनुष्य मोठा झाला कि ठार विसरतो असा माझा अनुभव आहे.
जसे काही धडे आम्हाला होते , सगळ्यांना हि होते.
१) एकी हेच बळ.
२) लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा.
३) अति तेथे माती
४) दोघांचे भांडण, तिसर्याचा लाभ.
मला मते हे सगळे धडे, सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठातून पदवी घेताना शिकवावे.
ज्ञान हे योग्य वेळीच शिकविले गेले पाहिजे.
14 Oct 2010 - 3:58 pm | धमाल मुलगा
>>लहान लागेपर्यंत पाणी आटून जाईल.
हे मी 'तहान लागेपर्यंत' असं सभ्यपणे वाचतो. ;)
14 Oct 2010 - 5:04 pm | गणपा
आत तु अशी पाचर मारल्यावर आम्हाला पण झक मारुन सभ्यपणेच वाचाव लागणार ;)
14 Oct 2010 - 3:10 pm | Nile
छ्या, साले सगळे चांगले बदल हे उशिरानेच का करतात.
14 Oct 2010 - 3:51 pm | धमाल मुलगा
'सेव्ह नवरा मुव्हमेंट ऑफ इंडिया' चे ट्रेड सिक्रेट्स असे जाहीर केल्याबद्दल तुझ्यावर लवकरच कोर्ट मार्शल करण्यात येत आहे.
आता विसर बेट्या ग्लेन ड्रमॉन्ड.. आता तुलाही पोलिओ डोसचा पेग.
14 Oct 2010 - 4:53 pm | आदिजोशी
अरे धम्या, तू सुद्धा गंडलास इतरांप्रमाणे. खरंच तुला वाटतं का की ही बाळबोध सिक्रेट्स ओपन केल्याने आपली गोची होईल? आपण इतके कमकुवत आहोत का?
14 Oct 2010 - 5:04 pm | धमाल मुलगा
असं म्हणावं लागतं रे बाबा!
च्यायला...तुला 'वेड पांघरुन पेडगावला जाणे' हे ठाऊक नाही काय?
बरं ते जाऊ दे, पुढच्या विकेंडला मी अलीबागच्या रिसॉर्टला चाललोय 'मेन विल बी मेन...ऑलवेज' पार्टीसाठी. अर्थातच 'अभिज्ञ दोन वर्षांसाठी यु.एस.ला चाललाय, त्याला पॅकिंगला मदत करायला मुंबईला चाललोय तिथेच अॅड्याही येणार आहे आणि आम्ही अभिज्ञला एअरपोर्टावर पोचवून मग येऊ' असं सांगितलंय....काही नाही, तुला ठाऊक असावं म्हणुन सांगतोय. ;)
14 Oct 2010 - 5:12 pm | आदिजोशी
ए बाबा, काही तरी वेगळं कारण शोध. मी अभिज्ञ ला कधीच पाठवलाय अमेरिकेला
14 Oct 2010 - 6:14 pm | धमाल मुलगा
आयला! झाला का आता लोचा?
अं...अं......
आर्ये हांऽऽ आता ह्या अभिज्ञचं आडनाव बदलुन टाकू ;) हॅ हॅ...आर्ये हाऽऽय काय नाऽऽय काय?
14 Oct 2010 - 5:30 pm | गणेशा
मस्त लिखान
वाचायला मजा येते आहे
14 Oct 2010 - 5:31 pm | गणेशा
मस्त लिखान
वाचायला मजा येते आहे
14 Oct 2010 - 5:31 pm | गणेशा
मस्त लिखान
वाचायला मजा येते आहे
14 Oct 2010 - 10:48 pm | शिल्पा ब
ओ गन्पाभाऊ, कळलं त्यांना ...कितीदा सांगताय.
15 Oct 2010 - 2:13 am | गणपा
शिल्पा तै अॅड्रेस चुकला की गल्ली ??
वर गणेशाराव कोकलुन र्हायले ३-३ दा :)
15 Oct 2010 - 4:40 am | शिल्पा ब
अर्रर्र...आम्हाला मिपावर ग म्हंटला कि गणपाच माहिती..
14 Oct 2010 - 6:39 pm | प्रभो
भारी रे अॅड्या...
14 Oct 2010 - 10:45 pm | समई
गुलाबजामावरून पाक ओघळावा तसं चेहर्यावरून कौतूक ओघळतंय नवर्याच्या. बघून घ्या
14 Oct 2010 - 11:12 pm | तर्री
अॅडी ,
लै भारी .
सई परांजपेंचे "नांदा सौख्यभरे " नावाचे नाटक होते . त्याची आठवण करू देणारे लेख . ( ह्या पूर्वी प्रतिसाद देणे रहून गेले )
खूप हसलो.
15 Oct 2010 - 1:52 am | चतुरंग
(सलज्ज)रंगाकाका
15 Oct 2010 - 4:22 am | शुचि
मस्त!!!
15 Oct 2010 - 8:27 am | एमी
वाचुन भ्रमनिरस झाला...अजिबात मजा नाही आली
"बायको साठी शॉपिंग आणि नंतर डिनर असा आगळा-वेगळा, अभिनव, प्रचंड इंटरेस्टींग कार्यक्रम असतो...."
---तर नवरा साठी दारु पिणे आणि मुली/बॉस बद्दल च्या शिळोप्या च्या गप्पा आणि आपण त्यांना कसे मुर्ख बनवतो अशा फुशरक्या असा आगळा-वेगळा, अभिनव, प्रचंड इंटरेस्टींग कार्यक्रम असतो"
आणि
"बायको - बाहेर कशाला? मी करीन घरीच सगळं. शिर्याच्या बायकोला बोलावेन तयारीला आधी."
-- याऐवजी "बायको - बाहेर कशाला? तू आणि शिरा घरीच करा सगळं. तेवठाच मला आणि शिर्याच्या बायकोला आराम." अस असत तर योग्य वाटल असत...
15 Oct 2010 - 10:43 am | गांधीवादी
वरचे सर्व वाचून ह्याची आठवण झाली.
14 May 2012 - 5:51 pm | बॅटमॅन
कुणाची खव/प्रतिसाद ते विसरलो पण वाक्य अल्टिमेट होतं:
"पापभीरूणां न सुखं न मज्जा" ;)
14 May 2012 - 11:53 pm | आशु जोग
आदि जोशी
>> खरं म्हणजे नवर्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू दिलं तर बायकांचं आयुष्य फार सुकर होईल.
हे बरं आहे
आता काही नवर्यांसाठी सल्ले द्या की
9 Jun 2016 - 5:16 pm | शाम भागवत
मस्त.
10 Jun 2016 - 8:20 am | साहेब..
हा भाग लै भारी!
10 Jun 2016 - 1:23 pm | स्वीट टॉकर
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत . . .
10 Jun 2016 - 1:29 pm | रमेश भिडे
अपरिहार्य कारणांमुळे पुढचे भाग लिहिलेले नाहीत.
(या धाग्याचे परिणाम लेखक अजून भोगत आहे त्यामुळे लेखमाला स्थगित आहे असं विशेष सूत्रांकडून समजलेलं आहे.)
10 Jun 2016 - 2:01 pm | टवाळ कार्टा
आग्गाग्गा =))
10 Jun 2016 - 3:18 pm | आदिजोशी
लेखमाला संपली आहे