निर्लज्ज व्हा

आदिजोशी's picture
आदिजोशी in जनातलं, मनातलं
30 Sep 2010 - 12:34 am

आजकालच्या जगात जगणं मुश्किल झालंय. अतिताणाचे दुष्परिणाम आपण सर्वत्र बघत असतो. कुणाला तरूणपणी हॄदयविकाराचा झटका, कुणाला उच्चरक्तदाबाचा विकार, कुणी डिप्रेशन मधे जातं, अशा अनेक बातम्या आपण वाचतो, ऐकतो. ह्या स्पर्धात्मक युगात मानसीक ताण हा असणारच. प्रगती हवी तर ताणापासून सुटका नाही. पण मग हे दुष्टचक्र असंच सुरू ठेवायचं का? ह्यावर काही उपाय आहे की नाही?

उपाय आहे. आणि ह्या उपायाचा शोध इतक अनेक शोधांप्रमाणेच आपल्या पूर्वजांनी कैक शतकांपूर्वी लाऊन ठेवलाय. ते वचन आहे "निर्लज्जम् सदा सुखी". खरं म्हणजे हे वाक्य आम्हाला टोमणे मारण्यासाठी फार लहानपणापासून ऐकवण्यात आलंय. पण सकारात्मक दॄष्टीकोन वॄद्धींगत करणारी पुस्तकं वाचून वाचून नुकताच ह्या टोमण्यातल्या गर्भीत सुविचार आम्हाला सापडलाय "सुखी व्हायचं असेल तर निर्लज्ज व्हा".

काय वाट्टेल ते होवो टेंशन घेऊ नका. एखाद्या घटनेचा वाईटातला वाईट परिणाम काय होऊ शकतो ह्याचा विचार करा. म्हणजे तुम्हाला कळेल की आपण घेतलेलं टेंशन खरोखरंच वर्थ होतं का? "टेंशन लेनेका नहीं, देनेका" हे तत्त्व अंगात भिनवा. निर्लज्ज व्हा आणि सुखाने जगा.

बोलायला सोपं वाटत असलं तरी निर्लज्ज होणं काही येर्‍यागबाळ्याचं काम नव्हे. त्यासाठी दगडाचं काळीज आणि राजकारण्यांची कातडी लागते. कर्णाला लाभलेल्या कवचकुंडलांसारखंच निर्लज्जपणाची अभेद्य कवचकुंडलं जन्मतः लाभलेले आमच्यासारखे भाग्यवंत फार थोडे असतात. सकाळी नाश्त्याला दुध-साखर-पोळी अथवा शिकरण-पोळी खाऊन घराबाहेर पडणार्‍या अनेक बाळबोध व्यक्तिमत्वांना निर्लज्ज व्हा म्हणजे काय करा हेच समजणार नाही. त्यामुळे ते सोदाहरण स्पष्ट करणं ही आमचीच नैतीक जबाबदारी आहे. ते स्पष्ट करण्यासाठी ज्या घटनांमधे ताण येण्याची शक्यता असते त्या घटानांकडे आपण दोन वेगवेगळ्या दॄष्टीकोनांतून बघू.

घटना १ - सामान्य दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - चंद्र जांभया देत सूर्याला वर बोलावत झोपायच्या तयारीत आहे.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय.

बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - क क क काय झालं सर...
बॉस - काय झालं म्हणून काय विचारतोस? डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही -माझं काही चुकलं का?
बॉस - नाही, तुला नोकरी दिली हेच चुकलं माझं. अरे हे हे असं प्रेझेंटेशन कुणी लिहिलं होतं का?
तुम्ही - मी लिहिलं की सर...
बॉस - अरे गाढवा, ह्यात किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला दाखवायला काय धाड भरली होती?
तुम्ही -(तुम्हाला घाम फुटायला सुरुवात होते) सर हे तयार करता करता फार उशीर झाला, तुम्ही तोवर निघाला होतात.
बॉस - मग सकाळी दाखवायचं...
तुम्ही -सर ते कालच पाठवायचं होतं म्हणून पाठवलं. आय एम सॉरी...
बॉस - तुझ्या सॉरीचं काय लोणचं घालू?
(तुम्हाला थोडं भिरभिरल्यासारखं होतं)
बॉस - ही तुझ्या हातून झालेली शेवटची चूक. ह्यापुढे अजून एक जरी चूक झाली तरी तो तुझा ह्या कंपनीतला शेवटचा दिवस असेल.

बॉस असा ताणताणताणताण बोलत असताना इथे तुमच्या डोक्यात भुंगा सुरू होतो. नोकरी जाणार ह्या विचारासोबत डोळ्यासमोर होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते, ट्रिपची तयारी, मुलांच्या फिया, सिगारेटचे सतत वाढणारे दर ह्या गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि तुम्हाला अंधारी येते. चक्कर येऊन तुम्ही किबोर्डवर कोसळता.

बॉस - नॉनसेन्स, ह्या किबोर्डचा खर्च तुझ्या पगारातून कापला जाईल.

-----------------------------------------------------------------------------------------------------

घटना १ - निर्लज्ज दॄष्टीकोन

स्थळ - अर्थातच ऑफिस

वेळ - ऑर्कूट, फेसबूक, ट्विटर, सॉलिटेअर हे सगळे सोबत असताना किती वाजले ह्याकडे कोण लक्ष देतो? २० मिनिटांपूर्वी पिझ्झा आलाय. ती शेवटची ऑर्डर होती. म्हणजे साधारण १२ वाजले असावेत.

पार्श्वभूमी - तुम्ही नेहमीप्रमाणे असंख्य चुका केल्याने बॉसला वरून दट्ट्या मिळालाय. तोच दट्ट्या आता बॉस तुमच्याकडे घेऊन येतोय. तुम्ही Alt + Tab वापरून ०.००००००००१ सेकंदात कामाची विंडो उघडता.

बॉस - काय हा मूर्खपणा???
तुम्ही - हो ना... च्यायला ही काय वेळ आहे कामं करायची. चांगलं ए. सी. फुल स्पीड वर टाकून दुलई ओढून झोपण्याऐवजी आम्ही बसलोय इथे आकडे खाजवत. बरं, तुम्हाला काय झालं?
बॉस - काय झालं म्हणून काय विचारताय... डोक्यात मेंदू आहे की गुंतवळ?
तुम्ही - तुम्ही जो पगार देता त्या पगारात गुंतवळच सापडणार डोक्यात... मेंदू हवा असेल तर जरा कंपनीला सांगा पगार वाढवायला. (गायतोंडे साब) इतने पगार में घर नहीं चलता, दिमाग क्या चलेगा.
बॉस - तुला नोकरी दिली हीच माझी चूक झाली...
तुम्ही - अजून एक चूक झाली. मला काम दिलंत. हॅ हॅ हॅ....
बॉस - हॅ हॅ हॅ करून हसतोयस काय निर्लज्जासारखा. ह्या प्रेझेंटेशन मधे किती चुका आहेत... पाठवण्यापूर्वी मला का नाही दाखवलं?
तुम्ही - त्यासाठी ऑफिस मधे असावं लागतं. तुम्ही डिनरला उशीर होईल म्हणून ८ ला पळता घरी आणि आमची टीम मरतेय इथे रात्री २-२ वाजेपर्यंत. हे फार होतंय. मी मॅटर एस्कलेट करेन.
(बॉसला घाम फुटायला सुरूवात होते )
बॉस - आज थांबलोय ना मी?
तुम्ही - आज कशाला थांबलात? दांडिया खेळायला? काम काल होतं, काल थांबायचंत.
बॉस - रात्री नाही तर निदान सकाळी तरी दाखवायचं
तुम्ही - रात्री ३ च्या पुढे घरी गेल्यावर मी पुन्हा सकाळी लवकर ऑफिसला येऊ? जमणार नाही. तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्‍या पगाराइतक्याच ठेवल्यात तर बरं होईल...
(बॉसला थोडं भिरभिरल्यासारखं होतं. बॉस फारच भेदरला असेल तर आडलीच्या भाषेत "ज्यादा बोलियाचं काम नाय" असंही बोलून घ्या.)
तुम्ही - हे बघा, आज असं बोललात, पुन्हा बोलू नका. तुम्हाला माहिती आहे की माझी टीम निश प्रोजेक्टवर काम करते. ३ महिन्यानी रिलीज आहे. सगळ्या कोड फाईल्स आणि सोर्स कोड्स आमच्याकडे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला 'क्ष' कंपनीकडून दुप्पट पगाराची ओपन ऑफर आहे. एकाच वेळी ८ च्या ८ जणं सोडून जाऊ आणि जाताना क्लायंट पण घेऊन जाऊ. तुम्हाला काय वाटलं बॉस आहात म्हणून काय गुलाम झालो आम्ही तुमचे?

तुम्हाला असे निर्लज्जपणे ताणताणताणताण बोलताना पाहून इथे बॉसच्या डोक्यात भुंगा सुरू. अख्खीच्या अख्खी टीम सोडून जाणार आणि सोबत क्लायंटपण नेणार ह्या विचारासोबत बॉसच्या डोळ्यासमोर परफॉर्मन्स रिव्ह्यू, ऑफशोअरचा चान्स, रिटेन्शन बोनस, त्याच्या होम लोनचे हफ्ते, गाडीचे हफ्ते ह्या गोष्टी फेर धरून नाचू लागतात आणि त्याला अंधारी येते. चक्कर येऊन तो तुमच्या किबोर्डवर कोसळतो.

तुम्ही - मोडलास किबोर्ड. मोड तिज्यायला... माझ्या बापाचं काय जातंय.

(तुम्ही लगेच मोबाईलवरून फेसबूकचं स्टेटस अपडेट करता "बॉसला झीट आणली". तुम्हाला दुसर्‍या क्षणी कंपनीतल्या लोकांकडून अभिनंदनाचे १७६० मेसेजेस येतात.)

घटना १ समाप्त

बघितलंत? आपला दॄष्टीकोन थोडासा बदलल्याने आपण कसे सुखात आणि निश्चिंतपणे जगू शकतो. निर्लज्जपणाच्या एक दगडात तुम्ही किती पक्षी मारलेत? बॉसला गप्प केलंत, लवकर निघायची सोय केलीत, पगार वाढवायची सोय केलीत, स्वतःच महत्त्व वाढवलं. म्हणून म्हणतो "निर्लज्ज व्हा. सुखी व्हा".

(निर्लज्जपणे) क्रमशः

धोरणविचार

प्रतिक्रिया

रश्मि दाते's picture

30 Sep 2010 - 12:53 am | रश्मि दाते

:)) मस्त

मेघवेडा's picture

30 Sep 2010 - 12:55 am | मेघवेडा

हा हा हा! लै भारी! निर्लज्ज व्हा, सुखी व्हा >> १००% खरंय!

पुढच्या घटना वाचण्यास उत्सुक!

वाळवंटात ओअ‍ॅसिस सापडल्याचा आनंद झाला रे अ‍ॅड्याभाव.
लगे रहो.. पुढचा भाग लौकर टाक आता.

शुचि's picture

30 Sep 2010 - 1:10 am | शुचि

मजा आली ...... ये हुई ना बात ऐसा खुसखुशीत लेख मंगताय वाचनेकू!!!

शिल्पा ब's picture

30 Sep 2010 - 1:23 am | शिल्पा ब

लै भारी...
एकदा नुकतीच नोकरीच्या शोधात असताना एका कंपनीच्या म्यानेजरला असाच तडकावला होता..वर नको तुझी नोकरी म्हणून हाडतुड करून निघून गेले..

अनिल २७'s picture

30 Sep 2010 - 12:27 pm | अनिल २७

डीटेलात सांगावे..

पाषाणभेद's picture

30 Sep 2010 - 7:17 pm | पाषाणभेद

अगदी अगदी. तुम्ही सांगाच जरा. म्हणजे त्यांचे कुठे चुकते अन अशी चुक नको करायला असे समजेल त्यांना.

कुंदन's picture

30 Sep 2010 - 1:28 am | कुंदन

परवाच बॉसच्या बॉसला निर्लज्ज दॄष्टीकोन दाखवला , तुटेपर्यंत ताणु नका अशी तंबी दिलीये.

शेखर's picture

30 Sep 2010 - 1:31 am | शेखर

>> तुटेपर्यंत ताणु नका अशी तंबी दिलीये
म्हणुनच की काय तु वसुलीची ट्रिप प्लान करतोस? ;)

मिसळभोक्ता's picture

30 Sep 2010 - 1:33 am | मिसळभोक्ता

व ह डी ही ल ह !!

लय भारी रे आद्या !

बेसनलाडू's picture

30 Sep 2010 - 1:46 am | बेसनलाडू

मस्त लेखन! आवडले.
(सामान्य)बेसनलाडू

संदीप चित्रे's picture

30 Sep 2010 - 1:48 am | संदीप चित्रे

(गायतोंडे साब)... डायलॉग तर एकदम धासू !
डायरेक हॉस्पिटलच्या खाटेवर बसलेला वि दी चौ आठवला :)

सुहास..'s picture

30 Sep 2010 - 2:05 am | सुहास..

ओ अ‍ॅडीजोशी !!

आहात कुठे आजकाल ? परवाच आठवण काढली होती ??

बाकी नेहमी प्रमाणे जोशी'ले' लेखन !!

अवांतर : वरील प्रतिसादाशी आपल्या वादाचा काही ही संबध नाही ,तो तसाच चालु राहील अशी आशा आहे

ओकार्‍यान्ती

हाहाहाहाहा...फार आवडला लेख :D
या वर्षी जवळजवळ काहीच लिहिल नाहीस तू. पूर्वीसारख लिहायला सुरुवात कर.

निशदे's picture

30 Sep 2010 - 3:33 am | निशदे

मस्त लिहिलं आहे.......अजून येऊ देत

खी खी खी!
असे लेखन तुम्हीच करू जाणे जोशीसाहेब!
आम्ही शिकरण पोळीवाले!;)

नंदन's picture

30 Sep 2010 - 4:26 am | नंदन

भन्नाट लेख, अ‍ॅडीभौ. पुढच्या भागाची वाट पाहतो.

दिपाली पाटिल's picture

30 Sep 2010 - 4:48 am | दिपाली पाटिल

सही आहे...लवकरच हे संवाद फेकून मारेन म्हणतेय. आजच डोकं खराब केलंय बॉसने.

मी-सौरभ's picture

2 Oct 2010 - 10:59 pm | मी-सौरभ

घरोघरी गॅस..

राजेश घासकडवी's picture

30 Sep 2010 - 5:00 am | राजेश घासकडवी

मस्त रंगलेत प्रसंग.

एक सूचना - हे अतिशय नम्र रडवेल्या वाटतील अशा शब्दांमध्ये लिहिलं तर खूपच बहार येईल.

(मला सगळं कंप्लिट करायची इच्छा आहे सर. पण काय करू?... वगैरे वगैरे)

प्राजु's picture

30 Sep 2010 - 5:05 am | प्राजु

भन्नाट!!
मस्तच आहे.

गांधीवादी's picture

30 Sep 2010 - 5:47 am | गांधीवादी

गेली साठी वर्षे ह्याचेच तर क्लासेस चालवून पोट भरत आहे आम्ही आमची.
आमच्या इथे ह्याचे कोर्सेस चालतात, इच्छुकांनी संपर्क साधावा,
संपर्क,
मनोरंजन (निर्लज्ज) सिंग, दिल्ली.
(दिल्लीत आल्यावर कोणत्याही शेंबड्या मुलाला विचारा, इथे निर्लज्ज सिंग कुठे राहतात ? थेट आमच्याकडे आणून सोडतील.)

सन्जोप राव's picture

30 Sep 2010 - 6:20 am | सन्जोप राव

एक विनोद वाचला होता की 'अमेरिकेबाहेरच्या जगात सकस अन्नाचा खाजगी वितरणव्यवस्थेतून होणारा प्रामाणिक पुरवठा' या विषयावर जगभर केलेला एक मोठा सर्व्हे का अयशस्वी झाला? तर आफ्रिकेतल्या लोकांना 'सकस अन्न' म्हणजे काय हे कळाले नाही, कम्युनिस्ट देशांना 'खाजगी वितरणव्यवस्था' म्हणजे काय हे कळाले नाही, युरोपिय देशांना 'प्रामाणिक' म्हणजे काय हे कळाले नाही आणि अमेरिकन्सना 'अमेरिकेबाहेरचे जग' म्हणजे काय हे कळाले नाही वगैरे...
आयटी म्हणजे जग आणि आयटीमधले प्रश्न म्हणजे जागतिक प्रश्न त्यामुळे आयटीमधली उत्तरे हीच जागतिक उत्तरे असा समज लोकप्रिय होताना दिसतो आहे. चालू द्या. प्रबोधन करणार्‍यांची पिढी संपली आहे. आता निर्लज्ज होणे हा पर्याय नसून ते अपरिहार्य आहे असे दिसते आहे.

मिसळभोक्ता's picture

30 Sep 2010 - 8:28 am | मिसळभोक्ता

किंवा सांदीपनी, किंवा जे काही आहे ते.

तिकडे जरा शिक्षकांचा पगार ह्या विषयावर आपले बहुमूल्य मत हवे आहे. इथे आय टी वाल्यांचा भुगा करत बसू नका, तिकडे या.

सहज's picture

30 Sep 2010 - 8:48 am | सहज

आम्हाला पाहीजे तिथे पाहीजे तेव्हा आमचे फूटेज घेणारच!

लेखकाने प्रामाणिकपणे त्याला मनाला पटेल तसे लेखन केले व एक उत्तम लेख लिहला. ते बघायचे सोडून, आयटी सोडून इतर सर्वसमावेशक लेखन करा हा अनाहूत सल्ला जास्त महत्वाचा आहे. भले कोणी धारवाडकर कधी लोकप्रिय व्हायला अथवा इतरांना पटायला म्हणून लेखन करत नव्हते याचा जाज्वल्य अभिमान वगैरे आहे म्हणून काय झाले? खणायला माती मउ आहे. शिवाय आजकाल एमबीए प्रायव्हेट कॉलेजात ३, ४ लाख (सरासरी) फिया आहेत. जानम समजा करो.

इन्द्र्राज पवार's picture

30 Sep 2010 - 9:34 am | इन्द्र्राज पवार

"धारवाडकर....."

~ यांचा दाखला नको. गेले मरून शांतपणे. तेव्हा कोणत्याही कारणास्तव त्यांची माती निघायला नको. गेल्या महिन्यात इथे पांडोबाची निघाली तेव्हढी पुष्कळ झाली.

इन्द्रा

मिसळभोक्ता's picture

30 Sep 2010 - 10:03 am | मिसळभोक्ता

मेल्यानंतर माती निघायला नको? मग काय जगताना निघायला हवी ?

माती असशी मातिस मिळशी.. अर्र मातित मिळशी...

मेल्यानंतर माती निघायला नको? मग काय जगताना निघायला हवी ?

ओ विरझणनवाझ...
कालचा कावळ्या/कोकिळेचा धागा वाचला नाय का ;)

सन्जोप राव's picture

30 Sep 2010 - 3:29 pm | सन्जोप राव

आजकाल एमबीए प्रायव्हेट कॉलेजात ३, ४ लाख (सरासरी) फिया आहेत. जानम समजा करो.
हे हे हे. टीकेसाठी उदाहरणे द्यायची तर किमान माहिती तरी बरोबर गोळा करा. एमबीए प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय? कॉलेज प्रायव्हेट किंवा पब्लीक नसते. यूजीसी किंवा एआयसीटीईने प्रमाणित केलेले कोर्सेस असतात. आणि फियांचे म्हणाल तर सिम्बॉयॉसिस पुणे वार्षिक फी सहा लाख. आय आय एम अहमदाबाद बारा लाखाच्या वर.
बोथट हत्याराने हल्ला केला तर स्वतःलाच इजा होण्याची शक्यता आहे.
बाकी एकंदरीत प्रतिसाद वाचून बाळासाहेब ठाकरेंचे भाषण आठवले. एका वाक्याचा दुसर्‍या वाक्याशी संबंध नाही. संभाषणकला शिकवताना 'कोहेरन्ट' नसलेली भाषा म्हणून हे उदाहरण देता येईल. त्यासाठी धन्यवादच.

सहज's picture

30 Sep 2010 - 7:51 pm | सहज

स्वारी - एमबीए प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय? मला डिम्ड युनिव्हर्सीटी, कोण्या शिक्षणमहर्षीच्या मॅनेजमेंट इन्स्टीट्युट म्हणायचे होते. (पुम्बा वगैरे नाही)

आणी बघा रकमा जास्तच आहेत की.

असो शिकवा शिकवा. प्रयत्न चालू ठेवा. जमेल कधीतरी.

शिक्षकांचा पगार ह्या विषयावर आपले बहुमूल्य मत हवे आहे
हाण्ण तेज्यायला.. मिभो काका एकदम छप्पर फाड प्रतिसाद.

आदिजोशी's picture

30 Sep 2010 - 10:51 am | आदिजोशी

मी आय टी मधला नाही. आय टी शी माझा दूर दूर पर्यंत काहिही संबंधा नाही. परंतु काय लिहावे, कशावर लिहावे हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. तुमच्या मनात जे विषय आहेत त्यावर लिहिण्यास तुम्ही मोकळे आहात.

लेखावर सल्ला दिलात तर विचार करण्यात येईल. लेखाच्या विषयावर सल्ला दिलात तर दुर्लक्ष करण्यात येईल.

हॅ हॅ हॅ... सप्रमाण सिद्ध केलस लेका ;)
पण तु आयटितला नाही अस वाटल नाही तुझा लेख वाचुन.
अर्थात हा अविश्वास नाही, यात तुझ्या समर्थ लेखणीचं कौतुकच दडलय. :)

पाषाणभेद's picture

30 Sep 2010 - 7:40 am | पाषाणभेद

अच्छा, मला झीट आणून स्व:ता त्याची जाहिरात करतो काय रे फेसबुकमधून. थांब उद्या ऑफिसला ये बघतोच काय ते!

पैसा's picture

30 Sep 2010 - 4:08 pm | पैसा

निर्लज्जं सदा सुखी! चं आणखी प्रत्यक्षिक हवंय वाटतं?

सहज's picture

30 Sep 2010 - 8:18 am | सहज

लेख भन्नाट.

पुढचा भाग लवकर येउ द्या.

निवेदिता-ताई's picture

30 Sep 2010 - 9:14 am | निवेदिता-ताई

हा हा हा हा ...............मस्त आहे लेख............

बोलणार्याची माती पण विकली जाते...

न बोलणाराचे सोनेही विकले जात नाही...

रणजित चितळे's picture

30 Sep 2010 - 10:55 am | रणजित चितळे

छान फारच मस्त. फार क्वचित असे छान व कान पिचक्या (छान अर्थाने) देणारे वाचायला मीळाले.

दत्ता काळे's picture

30 Sep 2010 - 11:17 am | दत्ता काळे

लेख आवडला.
पण आम्हाला वेळेला 'टाच' लावून काम करून घेणारे बॉसेस कधी नव्हते. त्यामुळे मिळेल ते काम एन्जॉय करत गेलो आणि 'कामाच्या तुलनेत पैसा' अशी गणित मांडत नसल्यामुळे आम्ही सुखी होतो.

मस्त कलंदर's picture

30 Sep 2010 - 12:02 pm | मस्त कलंदर

आवडले रे अ‍ॅडी....

यशोधरा's picture

30 Sep 2010 - 12:07 pm | यशोधरा

मस्त रे अ‍ॅड्या! :)

नेत्रेश's picture

30 Sep 2010 - 12:21 pm | नेत्रेश

लै भारी....अजुन येउदे

श्रीराजे's picture

30 Sep 2010 - 12:24 pm | श्रीराजे

मस्तच लिहिले आहे.
भन्नाट...!

परिकथेतील राजकुमार's picture

30 Sep 2010 - 1:16 pm | परिकथेतील राजकुमार

अ‍ॅडीभौ ज ह ब र्‍या !!
अ‍ॅडीभौ म्हणले की मनोरंजन निश्चीत :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2010 - 3:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अ‍ॅडीभौ म्हणले की मनोरंजन निश्चीत

अगदी सहमत!

झक्कास जमला आहे निर्लज्जपणा!

वाचताना छान वाटले ..
मस्त आहे

प्रमोद्_पुणे's picture

30 Sep 2010 - 3:57 pm | प्रमोद्_पुणे

एक नं. लिवलय..

मराठमोळा's picture

30 Sep 2010 - 4:05 pm | मराठमोळा

मस्त रे अ‍ॅड्या..
:) ह्युमरस

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2010 - 8:10 pm | बिपिन कार्यकर्ते

झक्कासच, आवडलं ब्वॉ!!!

अ‍ॅड्या, *ड्या, कुठे गायब होतोस रे मधून मधून?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2010 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, निर्लज्जपणाची गरज असतेच असे वाटायला लागले आहे. :)

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

4 Oct 2010 - 3:31 pm | धमाल मुलगा

अ‍ॅड्या सुटलाय नुसता!

येलकम ब्याक अ‍ॅड्या. झकास जमलाय भाग.

(स्वगतः गाडी परत रुळावर आलेली दिसते, लग्नाला वर्ष उलटून गेलेलं दिसतंय. ;) )

-(निर्लज्ज बॉसचा टीममेंबर) ध.

आदिजोशी's picture

4 Oct 2010 - 4:41 pm | आदिजोशी

सगळ्यांचे मनापासून आभार

वारा's picture

12 Oct 2010 - 12:58 pm | वारा

आत्ताच अस्सा प्रसंग येणार आहे असे वाटतय.....
तुमचे बहूउपयोगी सल्ले खरोखर कामी येणार आहेत..

मस्त लिहिलयं. खूपच मजेदार.

श्रिया's picture

10 Apr 2013 - 2:40 pm | श्रिया

हे हि मस्तच लिहिले आहे.

हि प्रतिक्रिया ह्या लेखाच्या दुसर्‍या भागासाठी होती, चुकून इथेच आली.

सूड's picture

24 Oct 2013 - 2:12 pm | सूड

मस्तच!!

सदासुखि's picture

24 Oct 2013 - 2:45 pm | सदासुखि

या शिवाय दुसरा उपाय आहे का?टेन्शन जातच नसेल तर?

माझीही शॅम्पेन's picture

24 Oct 2013 - 2:51 pm | माझीही शॅम्पेन

एकदम झकास लेख _____/|\______

आशु जोग's picture

24 Oct 2013 - 2:54 pm | आशु जोग

घागा वर आला

प्रमोद देर्देकर's picture

25 Oct 2013 - 1:18 pm | प्रमोद देर्देकर

अ‍ॅड्या मस्तच रे! तुझ्या स्वत:च्या ब्लॉग वरची ती गोष्ट टाक नारे ! ती नाही का कट्टा असलेली. किती हिंट मिळतील बघ १०० च्या वर नक्किच.

अर्धवटराव's picture

16 Dec 2015 - 3:22 am | अर्धवटराव

=))
हे निर्लज्जपणाचे धडे कितीदा गिरवुन झालेत.. =))

हाहा वा उत्तम प्रबोधनकारी कथा ! :D

बाळ सप्रे's picture

7 Jun 2016 - 10:40 am | बाळ सप्रे

हा हा हा हा
खोदकाम करून अजून एक मास्टरपीस वर काढल्याबद्दल धन्यवाद !!

वेल्लाभट's picture

7 Jun 2016 - 11:23 am | वेल्लाभट

कडक.... ल..हीच.. आवडलंय..
शैली पण आणि बॉसला आलेली झीट पण...

पसरवू का? चेपु, कस्काय वर?

नीलमोहर's picture

7 Jun 2016 - 11:40 am | नीलमोहर

हे असं निर्लज्ज होता यायला पाहिजे होतं, असं एकेकाला ऐकवलं असतं ना..

'तुमच्या अपेक्षा आम्हाला मिळणार्‍या पगाराइतक्याच ठेवल्यात तर बरं होईल...'
- हे तर लईच भारी !!

सध्या अपेक्षांबद्दल असाच एक चेंडू पलीकडे टोलवून दिलेला आहे, बघू काय होतेय.
जबर लेख, पोहोचला, आवडला.