जॉर्ज ऑरवेलच्या ऍनिमल फ़ार्मवरील चर्चेच्या निमित्ताने त्याच्याच दुसया एका कादंबरीची आठवण अनेकांना झाली. ऍनिमल फ़ार्ममधील "ऑल ऍनिमल्स आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल" या प्रसिद्ध वाक्यासारखेच "बिग ब्रदर इज वॉचिंग" हे १९८४ मधील प्रसिद्ध झालेले वाक्य बहुतेकांना माहिती असते. परंतु प्रत्यक्ष कादंबरी फ़ार जणांनी वाचलेली असण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्या कादंबरीचा थोडक्यात परिचय. मला ही कादंबरी वाचून दहाएक वर्षे झाली आहेत पण त्यातली कथावस्तू आणि सोशल कॉमेंट मनावर कोरली गेलेली आहे.
पार्श्वभूमी :
ऑर्वेलने ही कादंबरी १९४८ मध्ये लिहिली आहे आणि १९८४ मधली परिस्थिती कल्पिली आहे. १९४८ हे साल म्हणजे दुसरे महायुद्ध संपून फ़ार काळ लोटला नव्हता. महायुद्धाचा परिणाम म्हणून पूर्व युरोप सोव्हिएट रशियाच्या अंमला खाली आला होता. त्याचप्रमाणे पाश्चात्यांच्या साम्राज्यातून अनेक देश हळूहळू मुक्त होत होते. त्यांतल्या बर्याच देशांच्या नव्या नेतृत्वावर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा पगडा होता. त्यामुळे सर्व जग साम्यवादाकडे वळण्याची शक्यता त्याकाळी वास्तव समजली जाई. त्यानुसार १९८४ पर्यंत सगळे जग साम्यवादी बनलेले असेल अशी कल्पना करून ही कादंबरी लिहिली आहे.
संपूर्ण जग साम्यवादी बनले आहे आणि आता जगात वेगवेगळे देश राहिलेले नसून तीनच देश राहिले आहेत. एक ओशियानिया म्हणजे अटलांटिक महासागराच्या पश्चिमेचा प्रदेश आणि ब्रिटन, दुसरा युरेशिया, म्हणजे सगळा युरोप आणि रशिया, मध्यपूर्वेतला प्रदेश, आफ़्रिका, आणि तिसरा इस्टेशिया म्हणजे पूर्वेकडील आशियाई देश. (ही विभागणी साधारण अशी असल्याचे स्मरते. चूभूदेघे.)
अशा जगातल्या ओशियानिया देशात राहणाया एका सामान्य माणसाची ही कथा आहे. त्या अनुषंगाने राज्यकर्त्यांची वर्तणूक. राज्य करण्याच्या आणि टिकवण्याच्या युक्त्या, सामान्यांचे राज्यकर्त्यांविषयीचे मत, परंतु सर्वंकष सत्तेमुळे ते व्यक्त न करण्याची घ्यावी लागणारी काळजी यांचे अतिशय सिकनिंग वर्णन कादंबरीत आहे.
बिग ब्रदर इज वॉचिंग
या मनुष्याच्या घरात एक टीव्हीचा पडदा आहे आणि त्या पडद्यावर पार्टीच्या सर्वोच्च नेत्याची - बिग ब्रदरची (पार्टीचे सर्व सदस्य म्हणजे ब्रदर आणि हा नेता बिग ब्रदर)- भाषणे सतत चालू असतात. तो टीव्ही बंद करण्याची कोणतीही सोय नाही. इतकेच नाही तर त्या टीव्हीतून या मनुष्यावर नजर ठेवली जाते. आणि तो काही चुकीचे वागताना दिसला तर त्या पडद्यातून त्याची कानउघाडणी केली जाते. ही परिस्थिती देशातील प्रत्येक माणसाच्या घराची आहे. त्यावरून "बिग ब्रदर इज वॉचिंग" हे वाक्य जन्माला आले.
(मला नक्की आठवत नाही पण बहुधा लोकांना लग्न करण्याचीसुद्धा परवानगी नाही).
प्रचार
या मनुष्याच्या कामाचे स्वरूपही रोचक आहे. सरकारी रेकॉर्डस् सांभाळण्याचे काम त्याच्याकडे आहे. रेकॉर्डस् सांभाळणे म्हणजे सध्याच्या सरकारी धोरणाशी रेकॉर्डस् सुसंगत राखणे. उदा. मागच्या आठवड्यात रेशनचा कोटा क्ष आहे आणि या आठवड्यात तो कमी करून य इतका केला गेला आहे. असे असूनही सरकारी घोषणा "सरकारला हे कळवण्यात आनंद होत आहे की या आठवड्यापासून रेशनचा कोटा वाढवून य इतका करण्यात आला आहे. आपल्या शेतकरी बांधवांच्या उत्कृष्ट प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे" अशी होते. आता या घोषणेला अनुसरून मागच्या आठवड्यापर्यंतचे जुने रेकॉर्ड बदलून घेणे हे या माणसाचे काम आहे. मागच्या कुठच्याही रेकॉर्डमध्ये हा कोटा आधी य पेक्षा जास्त होता असे पुरावे राहता कामा नयेत. रेकॉर्ड बदलल्यावर जुने रेकॉर्डचे कागद तो एका नळकांड्यात टाकतो.
सरकारी प्रचाराचा दणका एवढा असतो की पूर्वी हा कोटा जास्त होता हे हा रेकॉर्डची अफरातफर करणार्या माणसालाही नीटसे आठवत नाही.
हे तीनही देश एकमेकांशी कायम युद्ध करीत असतात. देशातल्या बहुतेकांसाठी हे युद्ध कुठेतरी लांबवर सीमेवर चालू असते. पण त्या युद्धाशी संबंधित प्रचार मात्र प्रसारमाध्यमातून चालू असतो.
तीन देशातले कोणतेतरी दोन देश युतीत असतात. आणि ते तिसर्याविरुद्ध लढत असतात. पण या युत्या स्थिर नसतात आणि युती बदलेल त्यानुसार शत्रू आणि मित्रांची नावे प्रचारात बदलतात. आपल्या सैन्याने मोठा विजय मिळवला असल्याची बातमी अधूनमधून सांगितली जाते. प्रत्यक्ष वस्तुस्थितीत काहीही फरक पडत नाही.
क्रमश:
प्रतिक्रिया
12 Aug 2010 - 10:55 pm | छोटा डॉन
थत्तेशेठ, जबरा परिचय आहे पुस्तकचा, एकदम आवडला.
पुस्तकही एकदम वेगळेच वाटत आहे.
पुढचा भाग लिहा पटकन , वाचत आहे. :)
- छोटा डॉन
12 Aug 2010 - 11:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
१९८४ वाचण्याची इच्छा निर्माण झाली आहे ... पण इथेही क्रमशः?
13 Aug 2010 - 12:11 am | बेसनलाडू
(वाचनोत्सुक)बेसनलाडू
12 Aug 2010 - 11:40 pm | राजेश घासकडवी
सर्व मिनिस्ट्र्या कशा चालतात, न्यूस्पीक वगैरेवर वाचायला उत्सुक. १९८४ वर एका लेखात लिहिणं शक्य नाही तेव्हा क्रमशः आहे हे ठीकच, पण पुढचे भाग लवकर येऊ द्यात.
13 Aug 2010 - 6:20 am | बबलु
+ १.
गुर्जींचा वरील प्रतिसाद वाचून त्या विविध मिनिस्ट्र्यांची आठवण झाली.
मला वाटतं, एक "लव्ह मिनिस्ट्री" पण होती असं अंधूकसं आठवतंय.
13 Aug 2010 - 6:15 pm | श्रावण मोडक
हो. एक लव्ह मिनिस्ट्रीही आहे.
थत्ते, परिचयाचा पुढचा भाग कधी?
13 Aug 2010 - 8:06 pm | रामदास
ती तर आहेच पण त्यासोबत
under the spreading chstnut tree
I sold you and you sold me
there lie they ,and here lie we
under the spreading chestnut tree
अशा काही ओळी पण आहेत
14 Aug 2010 - 5:43 am | पंगा
'ज्युनियर अँटाय-सेक्स लीग' असाही काहीतरी प्रकार होता, नाही का? (ऐकीव माहिती.)
बाकी, (आतापर्यंतचे) परीक्षण आवडले. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
13 Aug 2010 - 12:07 am | पुष्करिणी
छान परिचय, पुढील भागांच्या प्रतिक्षेत
13 Aug 2010 - 12:19 am | कवितानागेश
यावरचा मूव्ही पण आहे ना?
13 Aug 2010 - 1:19 am | आळश्यांचा राजा
वाचतोय.
13 Aug 2010 - 3:05 am | आत्मशून्य
मि वाचलेय अत्यंत slow आणि कंटाळवाने आहे ते. 1984 चे भविश्य अजून २०१० ला match होत नाहि . किव्हा मला कादाचित "अतिशय सिकनिंग वर्णनाचा" वैताग आला असावा.
Animal farm was nice. All animals are equals,some animals are more equal. :)
13 Aug 2010 - 9:56 am | नितिन थत्ते
बरोबर.
अॅनिमल फार्म थोडे खेळकर आहे.
१९८४ अंगावर काटा येण्यासारखे भयंकर आहे.
13 Aug 2010 - 6:53 am | सहज
कृपया रोज एक भाग टाकावा.
"Your worst enemy, he reflected, was your nervous system. At any moment the tension inside you was liable to translate itself into some visible symptom."
13 Aug 2010 - 7:31 am | विंजिनेर
१९८४चा पुप. टाकून मजाच आणली आहे तुम्ही थत्ते साहेब. पुढचे भाग पटापट टाका.
बायदवे, १९८४चा मेहेता पब्लिशिंगने बर्याच वर्षांपूर्वी अनुवाद प्रसिद्ध केला आहे (अनुवादक भा. द. खेर - चुभुद्याघ्या) तो सुद्धा तितकाच ताकदवान झाला होता.
सध्या मिसळपावर ऑरवेल-ओळखसत्र चालू आहे. त्या सत्राचाच भाग म्हणून ऑरवेलच्या इतर काही गाजलेल्या पण बर्याच जणांना कदाचित ठाऊक नसणार्या
१. डाऊन अँड आउट इन पॅरिस अँड लंडन,
२. बर्मिज डेज
३. रोड टू विगान पिअर
४. इ. इ.
पुस्तकांचा परिचय करायचा किडा डोक्यात वळवळतो आहे.
13 Aug 2010 - 9:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
विंजिनेरसायब, तुमच्या धाग्यांचीही वाट पहात आहे.
13 Aug 2010 - 11:32 am | ऋषिकेश
छान परिचय!! वाचनीय पुस्तकात भर पडली. पुढील भागाची वाट पाहतोय.
परिक्षण कृपया पुस्तकविश्ववरही टाकावे म्हणजे भविष्यात सहज शोधता येईल.
मात्र जर काही सस्पेन्स फोडणार असाल किंवा अख्खी गोष्ट सांगणार असाल तर मुळ पुस्तकाचा रसभंग टाळण्यासाठी कृपया डिस्क्लेमर टाकावा ही विनंती
13 Aug 2010 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्रामो कादंबरीतील कल्पना मस्तच आहे राव......!
पुढील भाग पटापटा टाका. :)
-दिलीप बिरुटॅ
13 Aug 2010 - 7:26 pm | स्वाती दिनेश
परिचय आवडला, इतरांसारखीच पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
स्वाती
13 Aug 2010 - 10:06 pm | क्रेमर
वाचत आहे.