आमची पहिली परदेशवारी....५
भाग-१ http://www.misalpav.com/node/13410
भाग-२ http://www.misalpav.com/node/13436
भाग-३ http://www.misalpav.com/node/13450
भाग-४ http://www.misalpav.com/node/13473
नमस्कार मंडळी,
आज मी आपल्याला रिओ दि जानेरियो या शहराची ओळख करून देणार आहे. ब्राझील मधील क्रमांक-२ चे हे शहर, १८२२ ते १९६० हि ब्राझीलची राजधानी होती. नैसगिक सौंदर्य लाभलेलं हे अतिशय सुंदर अस शहर आहे. इथे Christ the Redeemer ,Corcovado ,Sugarloaf mountain आणि जगप्रसिद्ध अशी फुटबॉलची पंढरी मेराकाना स्टेडीयम हि प्रेक्षणीय स्थळे आहेत.आज आम्ही Christ the Redeemer या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देणार आहोत. कॉर्कॉवाडो या पर्वतावर हा पुतळा उभा आहे. हे रिओ मधील सर्वात उंच ठिकाण, शहराच्या कुठल्याही भागातून हा पुतळा आपले लक्ष वेधून घेतो.हॉटेलपासून अर्ध्या तासातच आम्ही या पर्वताच्या पायथ्याशी पोहोचलो. लगेचच एक मुलगी सामोरी आली, तिने या पर्वतावर कार अथवा ट्रेनने जाता येईल अशी माहिती पुरवली. मी ट्रेनसाठी उस्सुक होतो पण ट्रेनला वेळ असल्याने आम्ही कारने जायचे ठरवले,आम्ही दोघे आणि बसमधून उतरलेल्या दोन लेडीज असे आम्ही चारजण कारमध्ये बसलो , ज्या मुलीने हि माहिती दिली ती स्वतः कार चालवत होती. रस्त्यामध्ये एक दोन ठिकाणी थांबून आम्ही काही फोटो काढले. आणि पुढे मार्गस्थ झालो. संपूर्ण असा घाटाच्या या वळणदार रस्त्याने हि मुलगी सफाईने गाडी चालवत होती. मध्ये मध्ये काही माहिती पुरवत होती.रस्त्याच्या दुतर्फा हिर्वेगर्द जंगल आणि थंडगार हवेचे झोत अंगावर घेत ९-१० कि मी चढण चढून गेल्यावर आम्हाला उतरवण्यात आले. आता इथून पुढे रस्ता धोकादायक असल्याने पुढचा प्रवास तेथील प्रशासनाच्या छोट्या छोट्या मिनी बसने करावा लागणार होता .त्या मुलीनेच ती बसची तिकिटे आणून दिली .बसने ३-४ कि मी चा थरारक प्रवास करून आम्ही उतरलो. येथे आम्ही चहापान करून पुढे मार्गस्थ झालो. आता दोन पर्याय होते. इथून लिफ्टची सोय आहे किंवा तुम्ही चालत जाऊ शकता. आम्ही चालत निघालो कारण ते सुंदर असे रिओ शहर इतक्या उंचावरून आणखी सुंदर दिसत होते आणि आम्हाला फोटोहि काढायचे होते. त्या दोन बायका ज्या आमच्या कारमध्ये होत्या त्याही आमच्या बरोबर होत्या. एडीशी गप्पा मारत आणि नाही काही माहिती विचारत होत्या. मी हा एवढा भारतातून आलोय याचं त्यांना आश्चर्य वाटत होते. त्यातली एक मुलगी केप्री तेथिल फायर ब्रिगेड मध्ये काम करत असल्याचे समजले. जोरदार हवा आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटलं आम्ही वर पोहोचलो जिथे लिफ्ट मधील लोक बाहेर येत होते . इथून पुढे २ टप्पे सरकत्या जिन्याने पार करून आम्ही त्या पुतळ्या जवळ पोहोचलो.त्या पुतळ्याची भव्यता आणि ते रेखीव शिल्प पाहून मी नतमस्तक झालो. येथे पर्यटकांची चांगलीच गर्दी होती.देश विदेशातले ते लोक फोटो काढण्यात मग्न आणि तेथून दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत होते . काही लहान मुलांची किरकिर चालू होती.तरुण तरुणीचे डोळ्यात डोळे घालून गुप्तगु चालू होते. आम्ही येथे २ तास थांबलो. भरपूर फोटो काढले ते खाली देत आहे. मला आवर्जून सांगावे वाटते कि एवढ्या उंच ठिकाणी एवढ्या छोट्याशा जागेत तिथल्या प्रशासनाने पर्यटकांसाठी शक्य त्या सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आम्ही येथील हॉटेलमध्ये लंच करून परतीच्या प्रवासाला लागलो. ती मुलगी आमची वाट पाहत थांबलेली होती. कारने खाली येऊन हॉटेल गाठले. तुम्हाला कल्पना यावी म्हणून थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. फार रोचक असे मला काही लिहिता येत नाही. आहे ते गोड मानून घ्यावे हि विनंती. कधी आमच्यासारखा योग आल्यास अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण.
क्रमश:
काही फोटो:-
प्रतिक्रिया
1 Aug 2010 - 3:57 pm | पुष्करिणी
झकास , उत्तम झालाय हा भागही
2 Aug 2010 - 12:17 am | गणपा
प्रत्येक भागा गणिक ही लेख-मालिका जास्त जास्त आवडायला लागली आहे.
आणि हे भागही इतक्या पटापट येत आहेत की बाकी क्रमशः लेखकांनी हा आदर्श समोर ठेवावा.
1 Aug 2010 - 6:10 pm | बहुगुणी
..आणि सफाई देखील! लेखमाला आवडते आहे हे वेगळे सांगायला नकोच, पुढील भागांच्या प्रतीक्षेत!
(आणि हो, दिवस आणि शिल्लक पैसे किती संपले तो हिशोबही येऊ द्या पुढच्या भागात!)
1 Aug 2010 - 8:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुढील भागांच्या प्रतीक्षेत!
1 Aug 2010 - 11:20 pm | मस्त कलंदर
पुढील भागांच्या प्रतीक्षेत!
2 Aug 2010 - 4:31 am | प्रभो
पुढील भागांच्या प्रतीक्षेत!
1 Aug 2010 - 7:29 pm | रेवती
वाचतीये.
1 Aug 2010 - 8:15 pm | माया
वाचतेय.
1 Aug 2010 - 8:35 pm | बिपिन कार्यकर्ते
एक अगदीच वेगळी वाट चललात तुम्ही. छान चाललंय. पण भाग थोडे मोठे आणि थोडं अजून डिट्टेलवार येऊ द्या.
2 Aug 2010 - 9:47 am | विजुभाऊ
रीओ पाहिल्यावर ब्लेम इट ऑन रीओ असे का म्हणतात ते कळ्ळे ! :)
2 Aug 2010 - 11:26 am | रंगासेठ
फोटो चांगले आलेत. वर्णनही मस्त. पुढील लेखांच्या प्रतिक्षेत. :-)
24 Jul 2024 - 5:26 pm | nutanm
फोटोज् तर बरेच आहेत.पण एकही दिसत नाही.