आमची पहिली परदेशवारी.....3

विलासराव's picture
विलासराव in जनातलं, मनातलं
30 Jul 2010 - 7:47 pm

आमची पहिली परदेशवारी... भाग १ , भाग २

*******

नमस्कार
मंडळी , १६ तासाचा प्रवास करून विटोरियाला पोहोचलो.

एस्पिरीतो सांतो या ब्राझील मधील घटक राज्याची राजधानी म्हणजे हे विटोरिया शहर. साधारणत: आपल्याकडील पुणे शहराच्या तोडीचं फरक एवढाच कि हे एक बंदर आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेले हे ब्राझीलमधील प्रमुख बंदरापैकी एक आहे. मला प्रथम दर्शनीच आवडलेलं हे एक सुंदर शहर आहे.प्रशस्त अशा rodoviario (बस आगार) मधून बाहेर येऊन चालतच साधारण चार-पाच मिनिटात आम्ही घरी पोहोचलो. दरवाजा उघडला आणि मला आतमध्ये बसवून एडी लगेच बाहेर गेली आणि परतली ते लाडक्या अबुल ला घेऊनच.मला घ्यायला साओला आल्यामुळे एडीने त्याला पेट हाउस मध्ये ठेवले होते फी भरून . त्याला बेन्जामिन अबुल हे त्याच नाव.वय एक वर्ष आणि लोभस अस त्याच रूप.आल्याबरोबर त्याने माझ्याकडे झेप घेतली आणि माझ्या मांडीवरच बसला. माझी आणि याची ओळख सुद्धा वेबकॅम वरचीच पण कुठलेही आढेवेढे न घेता त्याने माझ्याशी दोस्ती केली. माझ्याकडून लाड करून घेतल्यावरच त्याने मला सोडलं.कुणीही घरी आल्यावर अबुलच पहिलं स्वागत करणार हा इथला शिरस्ता.जोपर्यंत तुम्ही याचे लाड करणार नाही तोपर्यंत हा तुमच्यावर ओरडत राहणार अगदी मालकिणीने गप्प बसायला सांगितले तरीही.एका महागड्या रेसचा हा कुत्रा (एडीला याला कुत्रा म्हणलेलं आवडत नाही) याची खासियत म्हणजे आता तो जेवढा आहे शरीराने तेवढाच तो आयुष्यभर असणार शेवटपर्यंत अगदी बोन्साय केल्यासारखा. एडीच्या सुख दुखाटला तिचा साथीदार.पुढील वर्षी जेंव्हा एडी भारतात येईल ती बेन्जामिन अबुल सोबतच.तो सुद्धा परदेशवारी करणार आमच्यासारखी. तर येथील आमच्या घरात आम्ही तीनच मेम्बर एडी मी आणि अबुल. खर सांगायचं तर एडीला याची जास्त चिता वाटत होती अबुल मला घरातील एक मेम्बर म्हणून स्वीकारेल कि नाही. त्याने माझ्या बाजूने कौल दिला आणि मी या घरातील सदस्य झालो. पुढे माझा घरातील निवांत वेळ अबुल बरोबर खेळण्यात मजेत गेला. याची समज अगदी माणसासारखी आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण एडी जर दुखी असेल तर हा दुखी होतो हे मी अनुभवाने सांगतो आहे. त्याचे सर्व नावागावासाहित रजिस्ट्रेशन आहे .आणि त्याची मेडीकल फाईलहि आहे रेगुलर चेक अप पण होते. ऐकून होतो पण प्रत्यक्ष प्रथमच पहिले. असो

दुसरया दिवशी सकाळी बाहेर निघालो. एडी एक-दोन शेजार्यांना अभिवादन केले मी आपला मागे उभा . कुणीही एडीकडे हा कोण म्हणून चौकशी केली नाही कि माझ्याकडे पाहिलेही नाही.मला आश्चर्य वाटले पण बरेही वाटले कारण भाषेची अडचण होतीच. आम्ही चालतच निघालो. रस्त्यावर छोटी मोठी दुकाने होती, बहुतेक दुकाने मुली/बायका च चालवत होत्या. बरयापैकी स्री पुरुष समानता दिसत होती. काही दुकानात मुली अगदी केस कापण्याचे काम करताना दिसत होत्या. तुम्ही माणसाकडे किंवा बाईकडे कटिंग करा पैसे तेवढेच हे ज्ञानही मला इथेच झाले. आपल्याकडे असे नाही असे ऐकून आहे अनुभव नाही. रस्त्यावर फेरीवाले दिसत नव्हते.गाड्या सुसाट धावत होत्या कारण कुणीही रस्त्यामधून चालत नाही. रस्ते चकाचक आणि सगळ्यात विशेष म्हणजे कुणीही होर्न वाजवत नव्हते याचे मला आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. आमच्या इथे गिरगावात घराबाहेर पाच मिनिट पडलात तरी कर्कश आवाजांनी कान बधीर होऊन जातात.मारुती होंडा फियाट अनेक प्रकारच वाहने धावत होती. सकाळची कामावर जाण्याची वेळ असल्याने बसमध्ये गर्दी होती. आम्ही एका बँकेमध्ये शिरलो .एडीने टोकन घेतले आणि आम्ही आमचा नंबर येण्याची वाट पाहत बसलो. वातानुकुलीत वातावरण होते. बाहेर मुंबैसार्खीच गर्मी असल्याने सुखावलो. बँकेमध्ये जास्त स्टाफ लेदिएस दिसत होता. ज्याचा नंबर आहे त्याचे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय दुसऱ्याकडे कर्मचारी लक्ष देत नाहीत. कितीही वेळ लागला तरी. फारशी गर्दी नसल्याने आमचे काम लवकरच आटोपले.मी एक कॉफी प्यायलो इथे एक बंर आहे बहुतेक बँक ,मॉल,शोप्पिंग सेंटरमध्ये कॉफ्फी ठेवलेली असते ती अगदी मोफत.ब्राझील हा कॉफ्फी उत्पादन करणारा जगातील १ नंबरचा देश आहे याची खात्री पटली आणि खरोखरच अप्रतिम चवीची कॉफी प्यायची असेल तर तुम्हालाही ब्राझीलला जावे लागेल.

फिरत फिरत आम्ही एका पार्कमध्ये आलो. फारशी मोठी नसली तरी तेथील आंबा फणस आणि वडाची झाडे पाहून मला एक क्षण तरी मी भारतात असल्याचा भास झाला.जरासं भटकून काही फोटो काढले.आणि संध्याकाळी परत फिरलो.रस्ता समुद्राच्या बाजूने होता. तिथे काही जहाज होते.आणि msc कंपनीचे एक जहाज पाहून मला खूप बरे वाटले ,कारण माझा एक मित्र या कंपनीत काम करतो आणि जानेवारीमध्ये याच पोर्टला त्याचं जहाज येणार होतं आणि तो मला भेटणार होता.नेहमीच्या प्रथेप्रमाणे एक बंर गाठला, चायनीज हॉटेल होते आणि जापनीज पण.चायनीज जवळचे वाटले मस्त चिकन फ्राय आणि बटाटा फ्राय मागवले. स्कोल(ब्राझील मधील सर्वां प्रसिद्ध बियर ) होतीच. मला आवडलेली ब्राझीलमधील हि एकमेव डिश. ब्राझील मध्ये बटाट्याला बतातच म्हणतात हे विशेष. मस्त ताव मारला अन घर गाठले.

क्रमश:

हे काही फोटो:-

प्रवासदेशांतरअनुभव

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2010 - 7:50 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरी चालू आहे. लेखनसुधारणा आवडली. फोटो जरा क्लिअर करता आले तर बघा. अगदीच अस्पष्ट आहेत.

गणपा's picture

30 Jul 2010 - 8:05 pm | गणपा

एकदम समहत.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2010 - 8:10 pm | बिपिन कार्यकर्ते

विलासराव, फोटो सुधारले आहेत बघा. आता कसे एकदम झ्याक दिसत आहेत.

विलासराव's picture

30 Jul 2010 - 10:25 pm | विलासराव

फोटो जरा क्लिअर करता आले तर

कसे करायचे ते शिकवा

भाग तिसरा चांगला झालाय!
जरा मोठे भाग लिहिता का?
फोटू दोन तीनच दिसले तेही अस्पष्ट!

मारुती होंडा फियाट अनेक प्रकारच वाहने धावत होती.
अरे वा! आपली मारूती तिकडे आहे असे दिसते. वाचून आनंद झाला.

केशवसुमार's picture

30 Jul 2010 - 8:12 pm | केशवसुमार

विलासशेठ,

भाग तिसरा चांगला झालाय!
फोटू दोन तीनच दिसले तेही अस्पष्ट!

मारुती :ऑ.. तुम्हाला सुझुकी म्हणायचे आहे का?

विलासराव's picture

30 Jul 2010 - 10:59 pm | विलासराव

मारुती :ऑ.. तुम्हाला सुझुकी म्हणायचे आहे का?
होय

विलासराव's picture

30 Jul 2010 - 10:56 pm | विलासराव

जरा मोठे भाग लिहिता का?
अहो माझा टायपिंग स्पीड खुप कमी आहे.एवढ लिहील कि हात दुखतात.लिहायची सवय नाही
फोटू दोन तीनच दिसले तेही अस्पष्ट!
काही जणांणा दिसतात मीही बघितले ,अस्पष्ट असतील तर सुधारणा कशी करावी ते सुचवा
अरे वा! आपली मारूती तिकडे आहे असे दिसते. वाचून आनंद झाला.
मलाही झाला होता. मारुती ८०० पाहुन. गाडी सेम होती पण फियाटचा लोगो होता.

पुष्करिणी's picture

30 Jul 2010 - 7:55 pm | पुष्करिणी

फोटो दिसत नाहीयेत मला..

नगरीनिरंजन's picture

30 Jul 2010 - 8:03 pm | नगरीनिरंजन

लेखन चांगलं जमायला लागलंय. फोटोत मात्र नुसते चौकोन चौकोन दिसत आहेत.
आणि हो बटाटा पोर्तुगीजच आहे . (स्वगतः तरी किंवा म्हणूनच उपवासाला चालतो का?).

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2010 - 8:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखन आवडलं; आणि (मी थोडीबहुत स्नॉब असल्यामुळे) विरामचिन्हांचा सुकाळ संपल्यावरच प्रतिक्रिया दिली.

तुमच्या धाडसाच्या पुढच्या गोष्टी ऐकायची अजूनही उत्सुकता आहे.

विलासराव's picture

30 Jul 2010 - 11:04 pm | विलासराव

लेखन आवडलं; आणि (मी थोडीबहुत स्नॉब असल्यामुळे) विरामचिन्हांचा सुकाळ संपल्यावरच प्रतिक्रिया दिली.
धन्यवाद.

गोगोल's picture

30 Jul 2010 - 9:16 pm | गोगोल

जबर्‍या अनुभव. वाचतोय, येऊ देत अजुन.
बाय द वे, कुत्र्याची जात कुठली?

विलासराव's picture

30 Jul 2010 - 11:01 pm | विलासराव

बाय द वे, कुत्र्याची जात कुठली?
विचारुन कळवतो

विजुभाऊ's picture

31 Jul 2010 - 10:22 am | विजुभाऊ

कुत्र्याची जात कुठली?

पेकीनीज

मीनल's picture

31 Jul 2010 - 12:44 am | मीनल

मोकळेपणाने लिहिले आहे. पहिल्यांदा परदेशात गेल्यावरचे बारिक सारिक आश्चर्य ही नि:संकोच पणे लिहिले आहे.
तूमच्य लेखनात खूप सुधारणा दिसते आहे. लिहित रहा.
पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत.
तूमच्या बरोबर सर्व काही चांगलेच घडले असावे अशी मनातून सदिच्छा.

आळश्यांचा राजा's picture

31 Jul 2010 - 1:31 am | आळश्यांचा राजा

प्रत्येक भागागणिक कमालीची सुधारणा होतेय. मस्त!

एडी मॅडमचा फोटो?

एडी मॅडमचा फोटो?

यावरून लहानपणी ऐकलेली बिरबलाची एक गोष्ट आठवली. (लहानपणी ऐकलेली असल्यामुळे तपशिलांत काही गडबड झाली तर सांभाळून घ्या मायबाप!)

एकदा काय झाले, बादशहाच्या पदरी असलेला एक बडा उमराव अल्लाघरी गेला. सगळे अंत्यसंस्कार वगैरे पार पडल्यावर मग इष्टेटीच्या वाटणीची (वाटपाची?) वेळ आली. देखरेखीकरिता अर्थातच बिरबल.

उमरावसाहेबांना तीन मुले. त्यांच्यामध्ये इष्टेट कशी वाटावी याच्या डिट्टेलवार सूचना त्यांनी वसीयतनाम्यात लिहून ठेवल्या होत्या. त्याबरहुकुम सोनेनाणे, जडजवाहिर वगैरे गोष्टींचे वाटप विनाअडचण पार पडले.

त्यानंतर प्रश्न आला उमरावसाहेबांच्या हत्तींच्या वाटपाचा. एकूण सतरा हत्ती. वाटपाची पद्धत अशी: थोरल्या मुलास एकूण हत्तींपैकी अर्धे हत्ती द्यावेत. मधल्याला एक तृतीयांश द्यावेत आणि धाकट्याला एक नवमांश द्यावेत. त्यातून काही उरलेच तर ते इष्टेटवाटपाची देखरेख करणार्‍याची (म्हणजे बिरबलाची) फी.

आता आली का पंचाईत! कारण हत्ती कापता तर येत नाहीत, आणि त्याशिवाय असे वाटप होणार कसे?

मग बिरबल म्हणाला, "अरे गुरू, अप्पन को एक ऐडिया सूझ रहेला है|" मग तो स्वतःचा एक हत्ती घेऊन आला. (बुद्धिबळातला की जिवंत हा प्रश्न इथे गौण आहे.) आणि त्या सतरांमध्ये जमा केला. अशा रीतीने अठरा झाल्यावर मग वाटप सोपे झाले. थोरल्याला नऊ, मधल्याला सहा आणि धाकट्याला दोन हत्ती दिल्यावर एक हत्ती उरला. तो बिरबलाने घरून आणलेला. वसीयतनाम्यातील सूचनेप्रमाणे बिरबल तो हत्ती घेऊन चूपचाप आपल्या घरी गेला.

असो. प्रश्नाचे उत्तर मिळाले असेलच. समझने वाले को इशारा काफ़ी|

भारतीय's picture

31 Jul 2010 - 10:13 am | भारतीय

विलासराव तुम्ही लय भारी.. तुमचे तीनही लेख वाचले..त्यावरुन आम्हास असा बोध झाला आहे कि तुम्ही कोणीतरी असामान्य व्यक्तिमत्व आहात.. आता पुढील लेखाची अतुरतेने वाट बघत आहे.. त्यात एडी बाईंचा फोटो बघायला भेटला नाही तरी चालेल पण तुमच्या चरणकमलांचा फोटो मात्र टाकाच.. मिपावर संत ज्ञानेश्वर्-तुकारामांचा फोटो आहेच त्याखाली तुमच्या चरणकमलांचा फोटो कायमचा चिकटून द्यावा असे मी संपादक मंडळींना सुचवीन म्हणतोय...

मी-सौरभ's picture

31 Jul 2010 - 3:04 pm | मी-सौरभ

:)

मृत्युन्जय's picture

31 Jul 2010 - 10:24 am | मृत्युन्जय

अहो चरणकमलांचा फोटो टाकलाच आहे त्यांनी. जोड्यांसकट टाकला आहे एवढेच.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Aug 2010 - 3:05 pm | प्रकाश घाटपांडे

ईलासराव आपल्याला अबुल भुभु जाम आवडल ब्वॉ! आपन तर आख्खा टाईम घालवला असता त्या भुभु सोबत. एकदम रेशमी केसाच दिसतोय.
बाकी धाडसा बद्दल कौतुक