अवघा रंग एक झाला ......

झुम्बर's picture
झुम्बर in जनातलं, मनातलं
5 Jun 2010 - 12:17 pm

रविवार सकाळ ...सुट्टीचा दिवस ...आरामात उठाव असा बेत मनाशी करताच होते ...तोच नेहमीच्या अलार्म पेक्षा जरा जास्तच मोठ्याने काहीतरी वाजू लागल थोड नॉर्मलला आल्यावर कळल त्या आवाजाच्या जनक खुद्द आईसाहेब होत्या ..... तो रिपीटेड अलार्म बंद व्हावा म्हणून नाईलाजाने उठलेच .....
थोडाफार आवरून चहा घेत असतानाच आई साहेबांनी डायरेक्ट युद्धाच पुकारला होत ..." संध्याकाळी आत्याला केळवण आहे मंडईतून भाजी आणायची आहे स्वयंपाक घरात तुझा उपयोग नाही तेव्हा तु मंडईत जायचं आहे " झाल ' हे धरणी माते मला उदरात घे ' असलं काहीतरी ओरडावस वाटल पण त्याचा उपयोग नव्हताच म्हणून मुकाट्याने शरणागती पत्करली.
रविवारी सकाळी ९.३० वाजता आवरून सावरून मी चक्क मंडईत निघाले ...बाबांच्या मते चेहरा पोचवून आल्यासारखा दिसत होता ... दीदीच्या मते मी रडणार होते ... कसबस चीड चीड करत निघाले ...नेहमीप्रमाणे पार्किंग लाही कटकट झाली ...सरतेशेवटी मी मंडईत प्रवेश केला ......
गर्दी आणि भाजीवाल्यांचे आवाज याने अक्षरशः "हे भगवान उठाले "असा झाल होत ..... एकेका दुकानासमोरून मी फेरी मारत होते ....त्या वातावरणाला सरावल्यावर हळूहळू मला तिथे असलेल्या चैतन्याचा साक्षात्कार व्हायला लागला .... विविध प्रकारच्या ताज्या भाज्या तिथे सुंदर पद्धतीने रचून ठेवल्या होत्या ... काही खी ठिकाणी तर रंगांची उत्तरं रंगसंगती साधली होती .... नेत्रसुखद वाटत होत ..... मग हळूहळू मी तिथल्या रंगांच्या उधळणीत स्वतःला हरवू लागले....
हिरवीगार कोथिंबीर तिच्याकडे पाहीले तरी डोळे शांतवून जात होते .... सुखद गारवा देणारा तिचा रंग पटकन उचलून तिला पिशवीत टाकले ..... नंतर नजर वळली ती लालबुंद टोमाटो वर वळली रसरशीत लाल लाल गोळे मला तर सलील च्या माझ्या भाच्याच्या गालांची आठवण झाली ...पटकन मी ते लाल चैतन्य पिशवीत भरलं..... पुढे पुढे जस जशी मी सरकू लागले तसं तशी रंगांचं एक नव जग हाती आल्यासारख वाटल ..... जणू निसर्गाने कसलेल्या चीत्राकाराप्रमाणे त्यात रंग ओतले आहेत .....पालेभाज्यांचे किती प्रकार सगळ्या हिरव्या पण त्या हिरवे पणातही वेगळे पण होत.... मेथी मखमली हिरवी .. शेपू पिवळट हिरवा... तर पालक रेघाळी हिरवा .... मग रंगातल वेगळ पण ओळखायला डोळे भिरभिरू लागले ,,,, बीटाचा गर्द गुलाबी रंग तर लाल मुळ्याचा माणकासारखा रंग ....नुसत्या मुळ्याचा पांढराशुभ्र रंग तर लसणाचा गौर गुलाबी कांती सारखा लोभसवाणा रंग ..... आल्या बटाट्याचा मातीशी नात सांगणारा तपकिरी रंग ... तर पाकळी गणिक उलगडत जाणारा कांद्याचा गुलाबी रंग .....गवारीच्या पिस्ता कलरची वेगळीच खुमारी तर तोंडल्याच्या अंगावर पंदुरकी नक्षी ..... रंगांच्या दुनियेत मी हरवूनच गेले ..प्रत्येक भाजी म्हणत होती जणू "बघ मी किती सुंदर आहे घेना मला" पिशवी बरीच जड झाली आणि मी भानावर आले....
निसर्गाची खरच कमाल वाटली किती सिध्दहस्त आहे टो की आहे एक कलंदर कलाकार??पण भाजी खरेदी हा माझ्यासाठी सोहळा झाला ...पण ज्या मूड मध्ये इथे आले होते तो पार कापरा सारखा उडून गेला आणि मागे उरले ताजी तवानी त्या भाज्यांसारखी टवटवीत मी... अवघा रंग एकची झाला होता.....

......................................................................................................................
होने होने दे नशा खोने खोने को है क्या
एक सांस में पी जा जरा जिंदगी चढा
है है तो एक जशन तु थिरकने दे कदम
अभी सांसोन में है दम अभी चलने दे सितम

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

टारझन's picture

5 Jun 2010 - 12:25 pm | टारझन

व्वा , मजा आली शणिवारचा व्हेजिटेबल लेख वाचुन ;)

हे भगवान उठले असा झाल होत .....

डोळे पाणावले

-(उठलेला भगवान) गब्बर

jaypal's picture

6 Jun 2010 - 7:33 pm | jaypal

मी तर नेहमी आवडीने मंडईत जातो 8> . मला तिथली फळ खुप आवडतात =P~ .
आगदी बोरा पासुन पपई / कलिंगडा पर्यंत सर्वकाही चविने आस्वाद घेणारा.... @) फलाभिलाषी
जयफळ
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन's picture

6 Jun 2010 - 8:27 pm | टारझन

बोरं ? =)) च्यायला ... एखाद दिवषी "ब्रेकिंग ण्युज" मधे दिसु नका मालक =))

- बोरपाल

jaypal's picture

6 Jun 2010 - 9:03 pm | jaypal

किती मनकवडा आहेस रे ? माझ्या अव्यक्त भावना तुच सम्जु शकतोस रे मित्रा.
बोराच म्हणशील तर प्रत्येक फळाची चव निराळी. :* ;)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन's picture

7 Jun 2010 - 8:42 am | टारझन

हा हा हा ... बरोबर ... :)

-(शबरी) टारझन

शुचि's picture

5 Jun 2010 - 4:07 pm | शुचि

मस्त लेख! मंडई ची फेरी म्हणजे नेत्रसुख असतं खरं. पण तू खरच छान वर्णन केलयस.
असाच मासळीबजार म्हणजे जीव की प्राण - सुरमई, बांगडा, बोंबील, हलवा, चिंबोरी, पापलेट, मोरी. आई ग आय मिस इट.

लहान्पणी आम्ही गाणं गायचो -
मी छोटीशी भाजीवाली छान छान छान
अहो अहो पवार
घ्या ना हो गवार
मी छोटीशी भाजीवाली छान छान छान
अहो अहो शिंदे शिंदे
घ्या ना हो कांदे
मीव छोटीशी भाजीवाली छान छान छान

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Jun 2010 - 12:24 pm | llपुण्याचे पेशवेll

खरं आहे मंडईत जाणं म्हणजे खरंच नेत्रसुख असतं. ते देखील रविवारी दुपारी ३-४ वाजता.. आहाहा.. क्या केहेने.. त्यातही मला मंडईत जाताना लक्ष्मीरोडच्या आसपासच्या भागातूनच जावे लागते. त्यामुळे तर नेत्रसुखाची पर्वणीच असते.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

शुचि's picture

5 Jun 2010 - 4:07 pm | शुचि

मस्त लेख! मंडई ची फेरी म्हणजे नेत्रसुख असतं खरं. पण तू खरच छान वर्णन केलयस.
असाच मासळीबजार म्हणजे जीव की प्राण - सुरमई, बांगडा, बोंबील, हलवा, चिंबोरी, पापलेट, मोरी. आई ग आय मिस इट.

लहान्पणी आम्ही गाणं गायचो -
मी छोटीशी भाजीवाली छान छान छान
अहो अहो पवार
घ्या ना हो गवार
मी छोटीशी भाजीवाली छान छान छान
अहो अहो शिंदे शिंदे
घ्या ना हो कांदे
मीव छोटीशी भाजीवाली छान छान छान

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

इंटरनेटस्नेही's picture

5 Jun 2010 - 5:21 pm | इंटरनेटस्नेही

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

स्पंदना's picture

5 Jun 2010 - 7:21 pm | स्पंदना

सुन्दर!!

भाजी चा रंग तर सुन्दर असतोच पण मला ताज्या भाज्यांचा वास फार आवडतो. भारतात गेल की मी माग लागुन मंडई फिरुन येते. नुसत्या पॅकिंग केलेल्या भाज्या बघुन कंटाळा आलाय.थँक्स झुम्बर..

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मीनल's picture

6 Jun 2010 - 6:58 pm | मीनल

मला ही भाज्या घ्यायला आवडतात.
पण घरी आल्यावर त्याची स्वच्छता , निवडणे, आणि मग त्याची कापणी मग पकवणी .... ते नकोसे होते .
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

मनीषा's picture

6 Jun 2010 - 8:03 pm | मनीषा

सुरेख
रंगीत , ताजा ताजा लेख !

भडकमकर मास्तर's picture

7 Jun 2010 - 12:09 am | भडकमकर मास्तर

आणि मागे उरले ताजी तवानी त्या भाज्यांसारखी टवटवीत मी... अवघा रंग एकची झाला होता.....
हे वाक्य विशेष उल्लेखनीय...

परिकथेतील राजकुमार's picture

7 Jun 2010 - 12:27 pm | परिकथेतील राजकुमार

मास्तरांशी सहमत आहे.

आजकाल उल्लेखनीय अशी वाक्ये दिसणारा लेख विरळाच.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

Pain's picture

7 Jun 2010 - 11:41 pm | Pain

हिरवीगार कोथिंबीर तिच्याकडे पाहीले तरी डोळे शांतवून जात होते .... सुखद गारवा देणारा तिचा रंग पटकन उचलून तिला पिशवीत टाकले ..... नंतर नजर वळली ती लालबुंद टोमाटो वर वळली रसरशीत लाल लाल गोळे मला तर सलील च्या माझ्या भाच्याच्या गालांची आठवण झाली ...पटकन मी ते लाल चैतन्य पिशवीत भरलं..... पुढे पुढे जस जशी मी सरकू लागले तसं तशी रंगांचं एक नव जग हाती आल्यासारख वाटल ..... जणू निसर्गाने कसलेल्या चीत्राकाराप्रमाणे त्यात रंग ओतले आहेत .....पालेभाज्यांचे किती प्रकार सगळ्या हिरव्या पण त्या हिरवे पणातही वेगळे पण होत.... मेथी मखमली हिरवी .. शेपू पिवळट हिरवा... तर पालक रेघाळी हिरवा .... मग रंगातल वेगळ पण ओळखायला डोळे भिरभिरू लागले ,,,, बीटाचा गर्द गुलाबी रंग तर लाल मुळ्याचा माणकासारखा रंग ....नुसत्या मुळ्याचा पांढराशुभ्र रंग तर लसणाचा गौर गुलाबी कांती सारखा लोभसवाणा रंग ..... आल्या बटाट्याचा मातीशी नात सांगणारा तपकिरी रंग ... तर पाकळी गणिक उलगडत जाणारा कांद्याचा गुलाबी रंग .....गवारीच्या पिस्ता कलरची वेगळीच खुमारी तर तोंडल्याच्या अंगावर पंदुरकी नक्षी ..... रंगांच्या दुनियेत मी हरवूनच गेले ..प्रत्येक भाजी म्हणत होती जणू "बघ मी किती सुंदर आहे घेना मला" पिशवी बरीच जड झाली आणि मी भानावर आले....
निसर्गाची खरच कमाल वाटली किती सिध्दहस्त आहे टो की आहे एक कलंदर कलाकार??पण भाजी खरेदी हा माझ्यासाठी सोहळा झाला ...पण ज्या मूड मध्ये इथे आले होते तो पार कापरा सारखा उडून गेला आणि मागे उरले ताजी तवानी त्या भाज्यांसारखी टवटवीत मी... अवघा रंग एकची झाला होता.....

छे..किती रटाळ, कंटाळवाणे

झुम्बर's picture

8 Jun 2010 - 10:42 am | झुम्बर

लोक अलग नजरिये अलग .........

एवढा कन्टाळवाणा लेख तुम्हि चक्क पुन्हा छापला ..........
आभरि आहे मी.......
तुम्हाला बर्याच मोठ मोठ्या आनन्दा ची सवय आहे असा दिसतय आम्हि साधि माणस... या लहान सहान गोश्टी तच आनन्द वाटतो.......
.......................................................................
निन्द्काचे घर असावे शेजारी.....

बाकी बाजारात जायला मला नको वाटते.धक्काबुक्की खुप असते. कुजलेल्या भाज्याचा वास नाकात भरुन राहतो.पांचट लोक बायाना धक्के मारत फिरत असतात.मासळी बाजारात तर ह्या पेक्षा वाईट परिस्थिती असते.

वेताळ

झुम्बर's picture

8 Jun 2010 - 11:14 am | झुम्बर

नाही हो बाजार उठ्ल्यावर आम्हि जात नाहि .....कारण तिथे तुम्हि वर उल्लेख केलेल्या भाज्या घ्यायला मेस वाले होटेल वाले येत असावेत ...
बाकि तुमचा अनुभव दाण गा दिसतोय .... आपण च अनुभव सिध्ह लेख लिहवा नम्र विनन्ती .......
क लो अ चु भु

वेताळ's picture

8 Jun 2010 - 11:29 am | वेताळ

मग आत्यांच्या केळवणाचा बेत काय काय केला होता?

वेताळ

झुम्बर's picture

8 Jun 2010 - 12:41 pm | झुम्बर

ह्म्म .....
कोथिम्बिरिच्या वड्या , टोमटो चि कोशिम्बिर .... बटाट्याची भाजि ... दाल मेथि .... पोळी ....आनि गोड दुधि चा हलवा ....