(आज अचानक गाठ पडे)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
15 Mar 2010 - 9:35 pm

सक्काळी सक्काळी ग्रासस्टांझाजचे अफलातून इडंबन, त्यावरच्या मुसुंच्या एक्सपर्ट कमेंट्स आणि मग मिभोकाकांचे नाडी शब्द न आणता करायच्या विडंबनाचे आव्हान असा तीनकलमी मसुदा पुढे असल्यावर देरी किस बात की? ;)

आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळी भलती खेळी
असता तन भलतीच कडे

बोटे वळता सहज कुठेतरि
एकाएकी गाठ पुढे

नसता मनिमानसी कसा हा
अवचित मेला टाका भिडे

दचकुनि जागत धाव नीजेतच
भरभर कपडेपट उघडे

निसटुन जाई लघुशंका क्षण
सदा बरी ती चेन गडे!

-चतुरंग

शृंगारबिभत्सकविताविनोदविडंबन

प्रतिक्रिया

शेखर's picture

15 Mar 2010 - 10:02 pm | शेखर

क्लास......
लोडशेअरींग मुळे परफॉरमन्स वाढतो हेच खरे.... :)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Mar 2010 - 10:04 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

(चेनप्रेमी) बिपिन कार्यकर्ते

शुचि's picture

15 Mar 2010 - 11:17 pm | शुचि

बोटे वळता सहज कुठेतरि
एकाएकी गाठ पुढे
=)) =)) =))
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

श्रावण मोडक's picture

15 Mar 2010 - 10:34 pm | श्रावण मोडक

वाटही पहात नव्हतो. खात्री होतीच. ;)

मिसळभोक्ता's picture

15 Mar 2010 - 10:38 pm | मिसळभोक्ता

रंगा,

तुझ्याकडून हेच, अगदी हेच अपेक्षित होते.

फस्क्लास.

आज आम्ही सुखाने मरतो म्हटले, तर कुठलातरी बाजीप्रभूप्रेमी निशेध व्यक्त करेल.

म्हणून एवढेच म्हणतो, की रंग्याच्या घरी आता एक अ‍ॅडिशनल संपादक आहेच, तेव्हा त्याला जरा मुक्त होऊ द्या हो, तात्या.

रंगाशेट, तुम्ही कृपया संपादकपदाचा राजीनामा देऊन, विडंबनाच्या सुपार्‍या स्वीकार्‍याव्यात.

धन्यवाद.

(गॉड के साथ बाता: रंगा संपादक आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेऊन त्याला आत्मशोध करायला सांगताय देवा ? शेम ऑन यू !)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

श्रावण मोडक's picture

15 Mar 2010 - 10:52 pm | श्रावण मोडक

रंगाशेट, तुम्ही कृपया संपादकपदाचा राजीनामा देऊन, विडंबनाच्या सुपार्‍या स्वीकार्‍याव्यात.

+१
आज दुसऱ्यांदा मिभोकाकांशी सहमत.

राजेश घासकडवी's picture

15 Mar 2010 - 10:51 pm | राजेश घासकडवी

मूळ (अमंगळ)सूत्राशी इमान राखून आहे...हा धागा घट्ट विणीचा आहे...बांधणी चांगली पिळदार झाली आहे.

राजेश

विसोबा खेचर's picture

15 Mar 2010 - 11:08 pm | विसोबा खेचर

फस्क्लास रे रंगा.. :)

वरील काही प्रतिसादातील म्हणण्यानुसार तुझं संपादकांच्या वर्गातून नाव कमी करू का बोल..:)

आमच्या रेवतीतै ते पद सांभाळायला समर्थ आहेतच..

तात्या.

शेखर's picture

15 Mar 2010 - 11:15 pm | शेखर

अनुमोदन

II विकास II's picture

15 Mar 2010 - 11:17 pm | II विकास II

+२

काही संदर रचना येणार असतील, तर चांगलेच आहे.

चतुरंग's picture

16 Mar 2010 - 12:08 am | चतुरंग

आपल्याला संपादकपदाचा लोभ कधी नव्हता आणि नाही!!
आम्ही संपादकपदी न राहून चांगली कामगिरी करु शकू असे लोकांना वाटत असेल तर पायउतार व्हायला एका पायावर तयार आहे! :)

(उंबरठ्यावरचा)चतुरंग

शेखर's picture

16 Mar 2010 - 12:23 am | शेखर

रंगाशेठ,
तुम्ही संपादक पदी राहुन ही चांगले लेख लिहीता पण कधी कधी संपादकीय कामा (बराच वेळ जातो लोकांवर नजर ठेवायला ) मुळे आम्हाला तुमच्या चांगल्या लेखांना मुकावे लागते.. आता हेच बघा ना किती दिवसात बुद्धीबळाशी संबधित तुमचा लेख आला नाही...

शेखर
( चतुरंगाच्या लेखणीचा फ्यॅन )

केशवसुमार's picture

15 Mar 2010 - 11:25 pm | केशवसुमार

सदा बरी ती चेन गडे!
हा हा रंगाशेठ.. काय ओळ आहे.. मस्त..
तुमच्या विडंबनावरून आमचे जुने विडंबन आठवले...
केशवसुमार

मुक्तसुनीत's picture

15 Mar 2010 - 11:40 pm | मुक्तसुनीत

पब्लिक खुळं झालंय आज , खुळं.

Nile's picture

16 Mar 2010 - 2:42 am | Nile

+१. लै भारी.

मेघवेडा's picture

16 Mar 2010 - 2:45 am | मेघवेडा

च्यामारी.. धरून फट्याक एकदम!!! जबराट!! रापचिक!!

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेडा!

टारझन's picture

16 Mar 2010 - 12:03 am | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=)) =))
=))

आणि हो .. तात्या कधी कधी चांगले णिर्णयही घेतात असं दिसतं :)
त्या मुसूंचाही मुकुट काढा .. त्यांच्यात पण मला छुपा सुप्तसुनित दिसतो :)

मुक्तसुनीत's picture

16 Mar 2010 - 12:20 am | मुक्तसुनीत

>>त्या मुसूंचाही मुकुट काढा .. त्यांच्यात पण मला छुपा सुप्तसुनित दिसतो..

आपल्याला संपादकपदाचा लोभ नेहमीच होता आणि राहील !!
आम्ही संपादकपदी न राहून चांगली कामगिरी करु शकू असे लोकांना वाटत असेल तर आपण त्यांना फाट्यावर मारायला एका पायावर तयार आहे!

चतुरंग's picture

16 Mar 2010 - 12:30 am | चतुरंग

खल्लास मुसुषेठ!! स्पष्टवक्तेपणा आवडला!! =)) =))

(आत्मशोधक)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Mar 2010 - 9:27 am | बिपिन कार्यकर्ते

ख ल्ला स ! ! !

(सर्वभोचक) बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

16 Mar 2010 - 11:03 am | श्रावण मोडक

+३

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Mar 2010 - 10:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुसुरावांच्या हावेला आमचा +१

रंगराव, लै लै लै हसले!

अदिती

टारझन's picture

16 Mar 2010 - 12:53 am | टारझन

मुसुशेठ,
तुम्ही संपादक पदी राहुन काह्ही चांगले लेख लिहीत नाही आहात पण कधी कधी संपादकीय कामा (आठवा .. शेवटचा लेख कधी लिहीला होता ? ) मुळे आम्हाला तुमच्या चांगल्या "दंगास्पद" धाग्यांना लागते.. आता हेच बघा ना किती दिवसात बनी शी संबधित तुमचा लेख आला नाही...

फेकर
(मुक्तसुनितच्या मस्तिखोर लेख/प्रतिक्रीयांचा प्यान )

प्रभो's picture

16 Mar 2010 - 12:06 am | प्रभो

जहबहरा =)) =)) =))

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

राघव's picture

16 Mar 2010 - 12:40 am | राघव

ठ्ठ्याँ.. =)) =))
बेक्कार लिहिलंय!! कितीतरीवेळ वेड्यागत हसत होतो..

राघव

रेवती's picture

16 Mar 2010 - 2:59 am | रेवती

मला तर कैच कळ्ळं नाही मेलं!
कालच न्यु हॅम्पशायरात पाच सहा तास चेस टुर्नामेंटला जाउन आले तेंव्हा कुणाशी तरी गाठ पडली असं म्हणत होते; मला वाटलं त्याबद्दल कैतरी लिहिलय.
रेवती

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Mar 2010 - 9:26 am | बिपिन कार्यकर्ते

सांभाळा हो... नाही म्हणजे गाठी अचानक पडायला लागल्या आहेत ना... म्हणून म्हणलं आपलं. तसे भावजी चांगले आणि सज्जन आहेत पण तरीही आपलं एक सांगून ठेवलं.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

16 Mar 2010 - 11:17 am | श्रावण मोडक

+१
:)

संदीप चित्रे's picture

17 Mar 2010 - 11:09 pm | संदीप चित्रे

भावजी तसे चांगले आणि सज्जन असले तरी अचानक गाठ पडलेली दुसरी पार्टीही सज्जनच असेल हे कशावरून? ;)

चतुरंग's picture

17 Mar 2010 - 11:22 pm | चतुरंग

(खुद के साथ बातां : च्यायला, गाठ पडली आमची आणि लोकांनाच कोण उत्सुकता की पलीकडची पार्टी कशी वगैरे? :?)

(नीरगाठीतला)चतुरंग

श्रावण मोडक's picture

18 Mar 2010 - 12:05 am | श्रावण मोडक

हाहाहाहा... चालायचंच चतुरंग. समोरून येणारं वाहन धडकू नये अशी सदिच्छा असतेच... ;)
(ह. घ्या.)

Nile's picture

18 Mar 2010 - 1:59 am | Nile

वाहन एखादी सनी किंवा स्कुटी असेल तर चालते हो. ;)

मुक्तसुनीत's picture

18 Mar 2010 - 2:03 am | मुक्तसुनीत

वाहन एखादी कुणीही असली तरी चालतेसे दिसते ! ;-)

Nile's picture

18 Mar 2010 - 2:06 am | Nile

तुम्हाला कधी एखाद्या सुमोने धडक दिली असती तर तुम्ही असे म्हणले नसते. ;)

प्रमोद देव's picture

16 Mar 2010 - 8:32 am | प्रमोद देव

वा! खरे शब्दप्रभू तुम्ही...रंगाशेठ!

मदनबाण's picture

16 Mar 2010 - 11:15 am | मदनबाण

हा...हा.हा... नारायण नारायण !!!
प्रभो हा सर्व मानससरोवरील भटकंतीचा परिणाम काय ? ;)

(यक्ष)
मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

जयवी's picture

16 Mar 2010 - 12:03 pm | जयवी

सही !!!!

चतुरंग's picture

17 Mar 2010 - 8:01 pm | चतुरंग

मारणार्‍या आणि न मारणार्‍या सर्वांना धन्यवाद! :)

(आतल्या गाठीचा)चतुरंग