प्रश्न :- ताई, मी मिसळपाव वरील एक स्त्री सभासद आहे, माझे खुप मित्र आणी खुप फॅन्स पण आहेत. मी सगळ्या धाग्यांवर भरभरुन प्रतिसाद देते पण सभासद मला 'उगाच पुढे पुढे करणारी, अतिशहाणी आणी बालिश' म्हणतात. आजकाल तर काही सभासद मला तुझे खाते 'फेक' आहे म्हणतात. काहि स्त्री सभासद तर मला मुद्दामुन "काय रे कसा आहेस?" असे विचारतात. पुरुष सभासद "मला फोन कर म्हणजे तुझ्या आवाजावरुन तु मुलगी आहेस का नाही ते कळेल" म्हणतात. सगळेच माझ्या ज्ञानावर व रुपावर जळतात. ताई मी काय करु ? मला लिहायला, वाचायला सुचत नाही, आजकाल रात्री झोप देखील लागत नाही.
तुझी दुर्दैवी सुंदर लहान बहिण.
उत्तर :- एका स्त्रीचे दु:ख दुसरी स्त्रीच समजुन घेउ शकते असे म्हणतात पण मिसळपाव वरील स्त्री सभासदांनी तुझ्यावर केलेला अन्याय बघुन फारच वाईट वाटले. पुरुष तर काय मेले सगळे एकजात सारखेच.
तु वाईट वाटून घेउ नकोस. फोन नंबर देणार्या पुरुष सभासदांचे फोन नंबर गोळा करुन ते जमतील तेव्हड्या पॉलीसी, अॅंटीव्हायरस विकणार्यांना दे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड वाल्यांना हे नंबर फुकटात कळव. ऑर्कुटावर तुझा फोन नंबर मागणार्यांना हेच नंबर देत जा. चांगली अद्दल घडु दे.
मिसळपाव वरील स्त्री सभासदांकडे दुर्लक्ष कर, त्यांना जमेल तेव्हडे टोमणे मारत जा. शक्य असल्यास सतत सिरियल्स, सा रे ग म प, पाककृती, शाहिद कपुर, रणवीर ह्या विषयी जमेल तेव्हडी बालीश बडबड करत रहा. पुरुष सभासदांशी सतत कारणे काढुन भांडत रहा, त्यांच्या लेखावर उगीच आपल्याला फार अक्कल असल्यासारख्या टिपण्या करत रहा. लवकरच तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणी तु एक भांडकुदळ का होईना पण मुलगी आहेस अशी सगळ्यांची खात्री होउन जाईल.
शक्यतो स्वत:चा पाठमोरा, खुप लांबुन काढलेला, अंधारलेल्या खोलीत थर्डक्लास वेबकॅमने काढलेला असा कोणताही एखादा फोटो काही दिवस खरडवहीत लाव.
खरडवही मध्ये गुलाबी रंगाचे हृदय, गुलाबाची फुले, २ मराठी प्रेम कविता ह्यांचे फोटो हवेतच.
*************************************************
प्रश्न :- ताई, हे राम ! मी मिसळपाव वरील एक सत्यवादी आणी गांधीवादी सभासद आहे. इथे सभासद सतत गांधींचा अपमान करत असतात, त्यांची हेटाळणी करत असतात. मला सतत दुखावतात, 'तिरळ्या डोळ्याचा गांधी' म्हणतात. ह्या नालायक, संस्कारहिन लोकांना शासन करावेसे वाटत आहे, हात नुसते शिवशीवत आहेत. मनात भलते सलते विचार येत असतात, ह्या मनाला कसे शांत करु ?
उत्तर :- बंधो , मनात भलते सलते विचार आणु नकोस. "An eye for eye only ends up making the whole world blind" असे स्वत: बापु सांगुन गेलेत.
एखाद्या गुंडानी रस्त्यात आपल्या बहिणीचा हात धरला, तर धावत जाउन आपण तिचा दुसरा हातही त्याच्या हातात द्यावा. येव्हडे करुन न थांबता त्या गुंडाला सन्मानाने आपल्या आईचा सुद्धा हात धरण्यासाठी घरी बोलवावे. ह्यामुळे त्या गुंडाचे मन परिवर्तन होईल, त्याला स्वत:च्या कृत्यांचीच लाज वाटु लागेल, तो पुर्णपणे बदलुन जाईल, स्वत:च्या बायकोचाही हात धरताना दहा वेळ विचार करेल. अहिंसेनी आणी विनम्रतेने काय साध्य होत नाही ?
असाच व्यवहार मिसळपाव वरील त्या 'वाट चुकलेल्या' सभासदांशी ठेव. लवकरच ते बदलतील हा विश्वास बाळग.
*****************************************************
प्रश्न :- ताई हाय हॅलो ग. मला मिसळपाव वर रोज रोज एक नविन फेक आयडी घेउन यायचा छंद आहे. आधी मी ह्या आयडींनी माझ्या विरोधकांना चांगलाच इंगा दाखवला होता, भल्या भल्यांचा वाटेल त्या शब्दात अपमान केला होता. हिंदु, मुस्लीम, गांधीवादी ह्यांच्यात मस्त भांडणे लावुन दिली होती. पण आता अचानक काय घडले आहे समजत नाही, मी कोणत्याही चित्र-विचित्र आयडीनी आलो तरी सभासद मला ओळखतात, लगेच खर्या नावानी हाक मारतात. हे असे कसे झाले?
उत्तर :- माझ्या नालायक भाऊराया, एक छानशी गोष्ट ऐक आणी तुच मतितार्थ काढ.
अबक नावाचा एक स्वत:ला फार अक्कलवान समजणारा माणुस एकदा एका इलेक्ट्रॉनीक्सच्या दुकानात गेला आणी मालकाला म्हणाला "काय हो हा टि व्ही ची किंमत काय ?"
मालक म्हणाला "आम्ही मुर्खांना टि व्ही विकत नाही."
आता अबक संतापला. दुसर्या दिवशी एका मद्राशाचा वेष घालुन त्याच दुकानात गेला. म्हणाला "अय्ययो ये टि व्ही कितनेको दिया जी?"
दुकानदार आपला मख्ख. म्हणाला "अहो आम्ही खरच मुर्खाना टि व्ही विकत नाही हो."
अबक रागारागनी बाहेर पडला. दुसर्या दिवशी एका सरदारजीचा वेष करुन त्या दुकानात गेला आणी म्हणाला "ओय पापे टि व्ही दि किमत बताओ."
दुकानदार म्हणाला "अहो पण आम्ही नाही विकत मुर्खांना टि व्ही सांगतोय तर. कळत नाही का ?"
आता मात्र हद्द झाली अबक पुढच्या दिवशी तोंडाला आणी अंगाला काळे फासुन एका निग्रोचा वेष करुन दुकानात गेला, म्हणाला "हय मान व्हातस द प्राइस ओफ दॅत ति व्हि ??"
दुकानदार आता चिडुन म्हणाला "तुम्हाला एकदा सांगुन कळत नाही का हो ? मुर्खांना आम्ही टि व्ही विकत नाही !!!"
अबक आता मात्र हतबद्ध झाला, अक्षरश: दुकानदाराच्या पाया पडला आणी म्हणाला "मी मान्य करतो मी मुर्ख आहे, पण मला एकच उत्तर द्या की मी रोज येव्हडे वेगवेगळे वेष पालटुन आलो तरी तुम्ही दरवेळी मला अचुक असे कसे काय ओळखलेत ?"
दुकानदार एकदम छदमी हसला आणी म्हणाला "त्याचे काय आहे ना की रोज येउन तुम्ही ज्या टि व्ही ची चौकशी करताना, तो टि व्ही नाहिये ओव्हन आहे."
*******************************************************
प्रश्न :- ताई नमस्ते. मी एक गृहीणी आहे, माझे पतिदेव सतत मिसळपाववर व्यस्त असतात. आधी ते आमच्या बाल्कनीत व्यस्त असायचे आता इंटरनेट वरच्या मिसळपाववर व्यग्र असतात. हल्ली माझ्याकडे लक्ष सुद्धा देत नाहीत.
काल मी त्यांना म्हणाले "तुमचे माझ्यावरचे प्रेम आजकाल कुठे गेले आहे ?"
तर म्हणाले "अग चुकुन संपादीत झाले असेल." ताई ह्या वाक्याचा अर्थ काय ? मला बाई काही कळाले नाही.
आजकाल ते खरडवही का काय असतेना त्यात प्रेमकवीता वगैरे डकवायला लागले आहेत म्हणे, सतत मुलींशी खरडीतुन संवाद साधत असतात असेही कळाले आहे. कोणतीही हिरॉईन पाहिली की "हिच्यावर आमचा फार जीव" असले काय काय बडबडत असतात. ताई मी काय करु ? खुप भिती आणी काळजी सुद्धा वाटत आहे.
उत्तर :- सखे, अशी हातपाय गाळु नकोस. गोष्ट चिंतेची आहे खरी पण माझ्या सल्ल्यानी सगळे काही ठिक होईल. तु खालील प्रमाणे उपाय कर :-
१) सर्वात आधी आपण देखील नवर्या मागोमाग मिसळपाववर खाते उघडुन मिसळपाववर प्रवेश करावा.
२) मिसळपाव वरील सर्व मुली, स्त्रीया ह्यांना मला 'वहिनी' म्हणा असा आग्रह करावा.
३) नवर्याच्या खरडवही वर सतत लक्ष ठेवुन रहावे.
४) अधेमधे 'खास' वेळी हळुच नवर्याकडुन त्याचा पासवर्ड घेउन त्याच्या अनुपस्थीतीत त्याच्या खात्या वरुन लॉगईन होउन परिस्थीतीचा अंदाज घेत रहावे.
५) काही हुषार नवरे आपण जॉइन केल्या केल्या आपल्याला खरड वगैरे लिहुन खुष करण्याचा प्रयत्न करतात. अशा भुलथापांना बळी पडु नये.
६) शक्यतो मिसळपाव वरील सर्वच स्त्रीयांशी ओळख करुन घ्यावी.
७) नवर्याला शक्यतो ज्यात तो सगळ्यात जास्त बावळट दिसतो असा फोटो खरडवहीत लावायला लावावा. ("आमचे हे तर सगळ्याच फोटोत बावळट दिसतात" साधारण सर्वच गृहिणींचे हे मत असतेच)
८) सहसा नवरा मिसळपावावर असताना आपण लॉगईन होउ नये.
९) आपल्या खात्या मधुन नवरा आणी नवर्याच्या खात्या मधुन आपण बर्याचदा लॉग इन होतो अशी अफवा पसरवुन द्यावी.
१०) शक्यतो नवर्याच्या खरडवही मध्ये आपल्या लग्नाचे अथवा एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी केलेल्या ट्रिपचे जोडीने काढलेले फोटो टाकावेत.
११) स्वत:च्या खरडवही मध्ये मुलाच्या लहानपणीचे वडलांबरोबरचे फोटो आवर्जुन टाकावेत.
तुझीच लेडी तेनालीरमन
तायडी
***********************************************************
प्रश्न : ताई नमस्ते. मी मिसळपाव वरील एक 'अधीकारी' सभासद आहे. सतत वाद घालणार्या, लोकांचे वाटेल तसे अपमान करणार्या सभासदांना सुधारण्याची संधी देतच राहिले पाहिजे असे माझे मत आहे. त्यांची हकालपट्टी करणे पुर्णपणे चुक आहे. "हृदयपरिवर्तनावर' माझा विश्वास आहे. पण लोक मला मुर्ख समजतात, गुन्हेगारांचा साथीदार म्हणतात.
उत्तर :- माझ्या भोळ्या भावा, तुझी अडचण वाचुन एक गोष्ट आठवली बघ.
एकदा एक शिकारी पहिल्यांदाच शिकारीसाठी जंगलात जातो. अचानक समोर एक अक्राळ विक्राळ वाघ येउन उभा राहतो. त्या वाघाला बघुन शिकारी साहेबांचे सगळे धैर्य पळुन जाते,बंदुक लांब जाउन पडते. आता हा आपल्याला खाणार हे निश्चीत असल्याचे त्यांना कळुन चुकते.
ताबडतोब डोळे बंद करुन शिकारी देवाचा धावा करायला लागला, वाघाचे 'हृदयपरिवर्तन' व्हावे त्यानी आपल्याला सोडावे असे देवाकडे साकडे घालु लागला. वाघाकडून काहिच हालचाल होईना हे बघुन थोड्यावेळानी त्याने डोळे उघडुन पाहिले तर वाघ पण समोर हात जोडुन डोळे मिटुन उभा....
शिकार्याला परमानंद झाला, वाघाचे हृदयपरिवर्तन बघुन तो वाघाला म्हणाला "मी तर जिव वाचावा म्हणुन प्रार्थना करतोय, तु डोळे मिटुन हात जोडुन काय करत आहेस ?"
"मी वदनी कवल घेता म्हणतोय..." वाघ शांतपणे उदगारला.
***************************************************************
(शक्य झाल्यास क्रमशः)
प्रतिक्रिया
28 Oct 2009 - 2:52 pm | नंदन
पराशेठ! कं लिवलंय, कं लिवलंय
=)) =))
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
28 Oct 2009 - 4:04 pm | छोटा डॉन
हाण्ण तिच्यायला ...
खतरनाक फोडला आहे, पार बाजार उठवला ( एकेकाचा ) ...
बर्याच वाक्यांना दाद देतो ...
लिखाणाचा फॉर्मॅट मस्तच, आता उगाच क्रम्शः नको ठऊ, पुढचा भाग येऊद्यात फटाफट ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
28 Oct 2009 - 4:07 pm | ब्रिटिश टिंग्या
तुम्ही ठमाकाकुंच्या बहीण का? ;)
28 Oct 2009 - 4:10 pm | प्रभो
फोन करून आवाज ऐका की...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
28 Oct 2009 - 5:14 pm | ब्रिटिश टिंग्या
फोन केल्यावर आवाज ऐकुनच म्हणालो होतो!
असो, ह्या आमच्या परीकाकु.....आमचा ह्यांच्यावर फार जीव :)
28 Oct 2009 - 5:57 pm | सूहास (not verified)
असो, ह्या आमच्या परीकाकु.....आमचा ह्यांच्यावर फार जीव >>>
एकतोय का निखील !!!
आणी पर्या ...मी आधीच बोललो होतो..तु बरा झालास आता बरेच जण आजारी पडण्याची शक्यता आहे...
एक नंबर ...उद्या पर्यंत पुढचा भाग टाकला तर एक शि.री. माझ्याकडुन...
सू हा स...
28 Oct 2009 - 7:28 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
फुटलोय .. अक्षरशः .... येडा रे येडा ... लेका .. अल्पवयिन मुलांना ताई सल्ले नाही का रे देत ? च्यामारी ..त्यांनाही गरज आहे सल्ल्यांची ...
बाकी पहिल्याच प्रश्नाला मी नेमकं .. दिल्ली-६ चं ते उड फुर्र फुर्र गाणं ऐकत होतो ..
-- टारा
28 Oct 2009 - 7:30 pm | दशानन
=))
=))
=))
भाड्या........................
28 Oct 2009 - 7:33 pm | अवलिया
हा हा हा हा हा हा हा
=))
टा-या दि ग्रेट !!! !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
31 Jul 2012 - 2:33 pm | विजुभाऊ
तायडे पुढचा भाग कधी ल्हिणार?
अवांतर : तायडी हा शब्द डु.आयडी या शब्दाला यमक म्हणुन छान शोभेल
28 Oct 2009 - 2:54 pm | sneharani
=))
=)) =))
खुपच मजेशीर.
पुढचा भाग पटकन येऊ द्या.
=))
28 Oct 2009 - 7:23 pm | अवलिया
हा हा हा
हाणतिच्यायला ! दणंक्यात पराशेट !!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
काय काय लिहिलंय... जबरा.. !
टिव्ही ओव्हन... दि बेस्ट... ! =))
आजच सकाळी एक टिव्हीओव्हनवाला सापडला होता =))
वाघाची कथा अल्टिमेट... ! =)) =)) =))
चला मी पण आता वदनीकवल घेता म्हणायला सुरवात करतो.. लवकरच गरज पडेल अशी चिन्हे आहेत. ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Oct 2009 - 2:57 pm | विजुभाऊ
परी ताई...अर्र चुकलो.
परा ताई.
अगोदर मला बरेच सदस्य "मज्यशी मयत्री कर्र्शील्का. हे हे कल्जी घ्ने"
असे रडतरडत खरड पाठवतात.
मी खरेतर पुरुष असून अशा खरडी मला का याव्यात हे उमजत नाही. सुप्रीम कोर्टाच्या नव्या निर्यणाची मला भिती वाटते
म्हणून मी पुरुषाचे नाव घेतले की लोक मला कमरेखाली नवी वस्त्रे मिळाली का असे विचारतात?
माझा काय दोष यात? मी काय करावे यासाठी एखादी गोष्ट सांग ना.
तुझाच दुशली ब मधला
.....फिरंगी टिंग्या
अवांतरः दोन वर्षात एकही लेख न लिहिताही माझी प्याप्यूल्यारीटी अजून शाबूत कशी याचे विरोधकाना आश्चर्य वाटते
28 Oct 2009 - 2:59 pm | श्रावण मोडक
बरं वाटलं!!!
28 Oct 2009 - 2:59 pm | गणपा
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
परा मस्त रे. बर्याच दिवसांनी असा निखळ हसलो..
28 Oct 2009 - 3:04 pm | प्रभो
अगगगगग...
पर्या लेका काय हे..भाड्या अमेरिकेला जाय्च्या आधीच तू माझी नोकरी घालवणारेस ...हसून हसून तोंड दुखायला लागलं..सगळे क्युबिकमधले पण येडे झाले मला पाहून.....
बाकी नेहमीप्रमाणे आपलं
जियो!!!!
एक्सलंट!!!
वा वा वा ! छान!
आणी वरच्यांना सगळ्यांना +१
नवर्याला शक्यतो ज्यात तो सगळ्यात जास्त बावळट दिसतो असा फोटो खरडवहीत लावायला लावावा. ("आमचे हे तर सगळ्याच फोटोत बावळट दिसतात" साधारण सर्वच गृहिणींचे हे मत असतेच)
=))
मी कोणत्याही चित्र-विचित्र आयडीनी आलो तरी सभासद मला ओळखतात, लगेच खर्या नावानी हाक मारतात. हे असे कसे झाले?
बाकी मराठी माणून हुशार झाला म्हणायचा आता (अधिक माहितीसाठी धम्या किंवा सूहासला विचार...)
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
28 Oct 2009 - 3:51 pm | गणपा
नक्की कोणता सु/सू हास रे :?
28 Oct 2009 - 3:56 pm | प्रभो
सू सू सू वाला आताच लग्नाळलेला सूहास
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
28 Oct 2009 - 3:10 pm | नेहमी आनंदी
:O गरगयायला झालय असले सल्ले ऐकुन...
29 Oct 2009 - 9:15 am | विजुभाऊ
गरगयायला झालय
बापरे फारच मोठी रीस्क घेतलीत.
७२ तासाच्या आत उपाय होतो म्हणे हल्ली
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
28 Oct 2009 - 3:12 pm | पर्नल नेने मराठे
:D
चुचु
28 Oct 2009 - 3:12 pm | स्वाती२
मस्त सुरु झाला माझा दिवस =))
28 Oct 2009 - 3:14 pm | भाग्यश्री कुलकर्णी
लै भारी.
28 Oct 2009 - 3:15 pm | विनायक प्रभू
झालास की रे तु पण स्मुपदेशक
28 Oct 2009 - 3:16 pm | विनायक प्रभू
झालास की रे तु पण स्मुपदेशक
28 Oct 2009 - 3:16 pm | विनायक प्रभू
झालास की रे तु पण स्मुपदेशक
28 Oct 2009 - 3:27 pm | सुप्रिया
मस्त सल्ला ! हसून हसून पुरेवाट झाली.
28 Oct 2009 - 3:31 pm | प्राजक्ता पवार
:) :) :)
28 Oct 2009 - 3:32 pm | दिपक
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
28 Oct 2009 - 3:36 pm | सहज
सही रे सही!
क्रमशः ची वाट पहात आहे.!!
29 Oct 2009 - 11:40 am | Nile
येउद्या पुढचा लवकर.
28 Oct 2009 - 3:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अतिशय ही&ही लेखन! हे लिखाण वाचून मिपाची सभासद असल्याबद्दल लाज वाटली. पुरूष तर जाऊ देत, पण स्त्री आयडीने लॉगिन होणार्यांनीही लिखाणाला चांगलं म्हटल्याचं अपरंपार दु:ख झालं. स्वतंत्र करता येत नाही, स्वतंत्र असावं, व्हावं लागतं असं म्हणणार्या आयेशा टाकिया यांच्या देशातल्या स्त्रियाही या ही&ही लिखाणाला दाद देत आहेत ... हा हन्त हन्त!!
अदिती
28 Oct 2009 - 3:53 pm | अजय भागवत
ताईचे सल्ले खूपच गमतीशीर...कल्पक लेखन! :-)
28 Oct 2009 - 4:06 pm | किट्टु
:D
28 Oct 2009 - 4:20 pm | ऍडीजोशी (not verified)
तिच्यायला परा सुटलाय नवटाक मारल्या सारखा. हान रे हान भावा
28 Oct 2009 - 4:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अॅडी, हान (व्)हान का (म)हान?
अदिती
28 Oct 2009 - 4:42 pm | अनामिका
परा !
खल्लास...........झाले वाचुन.........२२ तारखेनंतर आजच मनसोक्त हसले .......थांकू............. :))
काल मी त्यांना म्हणाले "तुमचे माझ्यावरचे प्रेम आजकाल कुठे गेले आहे ?"
तर म्हणाले "अग चुकुन संपादीत झाले असेल." हे अफलातुनच
शक्यतो नवर्याच्या खरडवही मध्ये आपल्या लग्नाचे अथवा एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी केलेल्या ट्रिपचे जोडीने काढलेले फोटो टाकावेत.
झक्कास
स्वत:च्या खरडवही मध्ये मुलाच्या लहानपणीचे वडलांबरोबरचे फोटो आवर्जुन टाकावेत.
जबरा
नवर्याला शक्यतो ज्यात तो सगळ्यात जास्त बावळट दिसतो असा फोटो खरडवहीत लावायला लावावा. ("आमचे हे तर सगळ्याच फोटोत बावळट दिसतात" साधारण सर्वच गृहिणींचे हे मत असतेच)-
हे म्हणजे कळसच झाला म्हणायचे
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
28 Oct 2009 - 4:45 pm | धमाल मुलगा
तू!
काय बोलावं..
च्यायचं हलकट इतकंच म्हणेन मी...
=)) =))
28 Oct 2009 - 6:57 pm | आनंदयात्री
सहमत आहे ... पार हसुन हसुन मुरकुंडी वळली !!
पराशेठ आता पुढला लेख बाईंचा सल्ला म्हणुन येउ द्या ;)
28 Oct 2009 - 7:31 pm | टारझन
च्यायचं बेणं ... विडंबणाचे सुर कानात घुमायलाच लागले होते ... तेवढ्यात तू फटाका फोडून मोकळा ... लिही बाबा पर्या तुच ह्या विषयावर :)
28 Oct 2009 - 6:04 pm | माधुरी दिक्षित
मस्त लिहिल आहे ........
28 Oct 2009 - 7:02 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री राजकुमार, फारच छान जमवले. टिव्हीवाला हसतो की अबक हसतो? (अबक तर एकाच भाषेत प्रश्न विचारतो फक्त वेश बदलून येतो. )
28 Oct 2009 - 7:03 pm | पाषाणभेद
वा मस्त.
हा ताईचा सल्ला पण अंमलात आणा.
--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
28 Oct 2009 - 7:13 pm | मनिष
__/\__
धन्य आहात. आपल्या विषयी आदर होताच, तो द्विगुणीत झालाय! :)
28 Oct 2009 - 7:40 pm | अजुन कच्चाच आहे
अगा बाब्बो माज्जे.
तरी बर आमची बायकु या कंपुटराच्यामाग नाय जात (नी फुड्यातबी नाय बसत).
.................
(तरी बर)
अजून कच्चाच आहे.
28 Oct 2009 - 8:22 pm | चतुरंग
पराताईचे सल्ले अफलातून आहेत! ;)
'मोठ्या आजारपणात' तू एवढा बदलशील असे वाटले नव्हते. :D
(दादा)चतुरंग
28 Oct 2009 - 9:54 pm | प्रकाश घाटपांडे
साप्ताहिक कहार मध्ये नीला ताईचा सल्ला या सदरासाठी पराला नीमंत्रण होते अशे म्हंत्यात खर हाय का?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
29 Oct 2009 - 9:59 am | सायली पानसे
=)) सही परा.... मस्त लेख.
29 Oct 2009 - 10:36 am | वेताळ
काय काय करता तुम्ही राव? एक नंबर चे सल्ले दिले आहेत. हसुन हसुन बेजार झालो.
वेताळ
29 Oct 2009 - 10:44 am | llपुण्याचे पेशवेll
वाहवा. छान. असेच लिहीत रहा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
29 Oct 2009 - 12:51 pm | बाकरवडी
कुठल्या औषधाचे डोस घेउन आलाय हा परा ?
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
29 Oct 2009 - 1:19 pm | यशोधरा
आज वाचलं हे! भ न्ना ट! जबरी! =))
29 Oct 2009 - 1:41 pm | झकासराव
पुतण्या लाज राखलीस काकाची. (बारामतीच्या)
भारी फलंदाजी केलीस रे. :)
29 Oct 2009 - 6:42 pm | क्रान्ति
पावली आजची! भारी आहेस रे परा! =)) =)) =)) =)) =))
क्रान्ति
अग्निसखा
29 Oct 2009 - 11:20 pm | अनिल हटेला
एकदम फूल्टूस हसलो यार ............. =))
आंदे और भी....=))
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
29 Aug 2010 - 5:21 am | इंटरनेटस्नेही
ही ही ही.... मस्तच! कौतुक करावे तेवढे कमी आहे! अ प्र ति म!
29 Aug 2010 - 8:23 am | शिल्पा ब
अग्गो परीमावशी !!! शेवटी सांगीतलीस का आपली ओळख?
29 Aug 2010 - 10:04 am | पैसा
वाचून गडाबडा लोळायची पाळी आली! मी विचार करत होतेच की मिसळपाव वर ताईचा सल्ल हे सदर/उपविभाग का नाही?
आता हा धागा असाच चालू राहू दे म्हणजे इतर सल्ले मागणार्याना असेच छान छान अनाहूत सल्ले मिळत राहतील आणि नवे धागे विणत रहावे लागणार नाहीत.
वाटलं तर " सल्ला अमलात आणल्यास होणार्या परिणामास ताई जबाबदार राहाणार नाही" असा एक वैधानिक इशारा दे हवा तर!
5 Jan 2012 - 5:38 pm | मृत्युन्जय
बाजार उठवला आहेस रे परा हजारभर तरी लोकांचा.
क्रमशः टाकच रे याचा. बाकीचे लेख अर्धवट राहिले तरी चालतील.
5 Jan 2012 - 6:02 pm | मी-सौरभ
हा धागा वर आणल्याबद्दल धन्स :)
6 Jan 2012 - 1:56 am | चिंतामणी
:O :-O :shock:
तीथे मी लिंक टाकली म्हणून धागा वर आला. :) :-) :smile:
6 Jan 2012 - 2:18 pm | मी-सौरभ
तुम्हाला तर मोठा धन्स :) आता खुष??
कट्ट्याला आलात तर प्रतेक्ष पण धन्स म्हणेन.....
5 Jan 2012 - 6:04 pm | मी-सौरभ
सल्ला १ नं आहे....
एक मिपाकर म्हणुन सल्ला हवाय
या दिवट्याच काय करावं???
5 Jan 2012 - 6:51 pm | तिमा
शालजोडीतले चांगले बसले आहेत . अजून बर्याच जणांचे ऑडिट बाकी आहे, येऊ द्या अजून.
6 Jan 2012 - 2:02 pm | मन१
पोटभर हसवल्याबद्दल परा(ज)साहेबांचे आभार. वाचनखूण साठवली आहे.
13 Jan 2012 - 2:23 pm | श्यामल
हसुन हसुन पुरेवाट झाली ! परा, पुढचा क्रमश: भाग लवकर टाक बाबा.
याच आणि अशाच सणसणीत, खणखणीत लेखांकरीता आणि तेवढ्याच तोलामोलाच्या खमंग, झणझणीत प्रतिसादां करीता
मी मिपावर नियमित येत होते. दिवाळीनंतर मधल्या काळात मात्र जाणिवपुर्वक मिपावर यायचे टाळल्यानंतर आज बर्याच दिवसांनी मिपावर डोकावले आणि धन्य धन्य झाले ! .......... मिपाचे पुर्वीचे निरभ्र, निर्मळ रुप बघुन आनंद झाला. आता मात्र मिपावर पुन्हा नियमित यायलाच हवे.
13 Jan 2012 - 4:23 pm | विशाखा राऊत
काय परा... जीव घेत आहेस.. हसुन वाट लागली आहे
4 Feb 2012 - 12:51 pm | प्रशांत उदय मनोहर
==))
11 May 2012 - 1:57 pm | वपाडाव
लय भारी रे...
11 May 2012 - 2:36 pm | चिंतामणी
आजच्या काळातसुद्धा हे लागू आहे असे दाखवायचे आहे का?
असो
(शक्य झाल्यास क्रमशः) हे वाचून प-याच्या सगळ्या अपु-या धाग्यांची आठवण ताझी झाली.
12 May 2012 - 10:24 am | नाखु
भन्नाट अपुरी रहिली आहे.... याचे नम्रपणे स्मरण .........
12 May 2012 - 11:08 am | स्पंदना
सुरेख रे परा.
मस्त लिहिलय.
6 May 2013 - 4:23 am | ढालगज भवानी
फुटले रे परा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
6 May 2013 - 9:10 am | तर्री
४ वर्षांनी सुध्दा ताईचा सल्ला फिट्ट ! सो केवळ "कालातीत" लेखन.
6 May 2013 - 9:33 am | मूकवाचक
_/\_
6 May 2013 - 11:07 am | आदूबाळ
व्हिंटेज पराण्णा! :))
6 May 2013 - 1:39 pm | प्यारे१
भविष्याचा अचूक वेध घेणं म्हणजे हेच काय रे परा?
सुपरमार्केट उठवलंय पार!
6 May 2013 - 2:20 pm | बॅटमॅन
+१११११११११११११११.
असेच म्हणतो. पार वॉलमार्टच उठवलंय एकदम =)) =)) =))
6 May 2013 - 10:57 pm | ढालगज भवानी
"द्रष्टा" हा शब्द आहे त्याला ;)
6 May 2013 - 3:57 pm | सविता००१
बेक्कार लिहिलयस अगदी. ह.ह.पु.वा.
6 May 2013 - 4:36 pm | सुधीर
लय भारी!
10 May 2013 - 3:01 pm | प्रकाश घाटपांडे
हल्ली लव्गुरु चा सल्ला जास्त फेमस दिसतो
17 May 2013 - 2:11 am | उपास
पर्या भ न्ना ट.. काळाच्या कसोटीवर उतरणारं लिखाण :प
(ब्याकलॉग भरत असताना निसटलेलं वाचायला मिळालं.. तृप्त झालो) :)
17 May 2013 - 10:38 pm | प्रेरणा पित्रे
एखाद वर्षापुर्वी हा लेख वाचण्यात आला होता तेव्हाच ह.ह.पु.वा. झाली होती..
आजही तितकाच "एव्हरग्रीन"...आणि भविष्यातही नक्कीच असणार यात तिळ्मात्र शंका नाही..