दिवसभराचं पाट्या टाकणं झालं आणि मी ऑफिस बंद करत होतो. तेवढ्यात फोन वाजला.
"दत्ता. . मी मंदार. तू ऑफिसमध्येच आहे कां ?"
मी म्हणालो " हे काय बंद करून निघतोच आहे. कां रे ?"
तुझ्याकडे तासभर वेळ आहे कां ?
हो आहे. कुठे जायचंय कां ?
हो. जरा गप्पा मारंत बसू.
कुठे ?
भोलाकडे. वडा-पाव बर्याच दिवसांत खाल्ला नाही.
च्यायला, नुसता वडापाव ? आणि वडापाव खायला तास कशाला लागतो? मला वाटलं तू 'कवी'मध्ये बसायचं म्हणतोयस.
लेका . . . श्रावण चालू आहे.
नेहमी पिणार्यांना श्रावण. मला नाही.
तरीसुध्दा नको. तू भोलाकडे ये. मी निघतोय लगेच.
मी भोला वडेवाला कडे पोहोचलो. वडापावच्या गाडीभोवती गर्दीमध्ये तोंडाला रुमाल बांधलेला मंदार मला दिसला. मी त्याच्या खांद्याला हात लावून आल्याची दखल दिली, आणि बाजूला जाऊन थांबलो. थोड्याचवेळात मंदार दोन्हीही हातात वडापावच्या डिश घेऊन, गर्दीतून बाहेर आला. कुणाच्यातरी हिसडण्याने त्याच्या तोंडावरचा रुमाल जरा सरकला आणि एक नाकपुडी दिसायला लागली. त्या व्यक्तीकडे अत्यंत घृणास्पद बघत रुमालातल्या रुमालातच त्याने शिवी हासडली. बोलतातर येत नव्हतं. पण त्याच्या डोळ्यावरून आणि फुगलेल्या नाकपुडीवरून मी अंदाज बांधला कि मंद्यानी शिवी दिली असावी.
घे !, तुला अजून मिरची हवी ?
नको. लेका तो रुमाल काढ कि.
हसत.. हो हो म्हणत ..त्याने रुमाल काढला. वडा पाव खाता खाता आमच्या गप्पा सुरू झाल्या.
बायको, पोरंबाळं, ऑफिस अश्या नेहमीच्याच शिळोप्याच्या गप्पा झाल्या. वडापाव संपला. मोटारसायकल्स काढून चहा कुठं घ्यायचा ह्यावर बोलणं होईतोवर आम्ही स्विकार हॉटेलजवळ आलोच होतो. मग स्विकार मध्येच चहाला थांबलो. परत गप्पा. विषय स्वाईन फ्लू.
मंदारने विचारलं "अन्नातून ते विषाणू पोटात जावू शकतात कां रे ?"
त्याच्या शंकेखोर स्वभावाविषयी आमचा सगळा ग्रुप चांगलाच जाणून होता. त्यावरून त्याची नेहमी चेष्टाही होत असे.
मी त्याला शांतपणे म्हणालो "काही कल्पना नाही, पण ते विषाणू उकळत्या तेलातसुध्दा मरत नाहीत हे मात्र कळलंय"
त्याचा कावराबावरा झालेला चेहरा पोटातल्या वडाजोडीबद्द्ल विचार करत असावा.
काही न बोलता शंकायुक्त नजरेनी पहात चहा पोटात अक्षरशः ढकलून मंद्या म्हणाला " चल.. निघायचं ? "
आम्ही बाहेर पडलो आणि आपापल्या वाटेला लागलो.
हा मंदार देशपांडे. बी.कॉमपासून ते एम्.कॉमपर्यंत माझ्या बरोबर होता. एक नंबरचा शंकेखोर अन् चिंतामणी. कायम काही ना काही चिंतेत गढलेला. त्यातून निर्माण होणार्या चिडचिडीमुळे घरदारी सगळीकडे प्रसिध्द पावलेलं व्यक्तीमत्व.
नोकरी - ब्यांक ऑफ महाराष्ट्र. अश्यांना बहुतेक ह्याच ब्यांकेत नोकरी लागत असावी. ब्यांकेची गिर्हाईकसुध्दा ह्याला गिर्हाईक करत असतात.
बी.कॉम्.ची परीक्षा चालू असताना एका भाकड दिवशी आमचा ग्रुप "शांतेचं कार्ट चालू आहे "ला गेला. मंदारही होता. नाटकात सुधीर जोशी आणि लक्ष्या ह्या बापलेकांचा संवाद रंगात आला होता. लक्ष्याचं टायमींग दाद देण्यासारखं होतं.सगळं नाट्यगृह बेफाम हसंत होतं.
मंद्यानी मला कानाशी येऊन हळूच विचारलं " उद्या इकोच्या पेपरला केन्सची थिअरी आली तर ? . . . . च्यायला वाट लागेल !"
पुढचं राहिलेलं शांतेचं कार्ट आख्खं माझ्या डोक्यातून निघून गेलं आणि मी . . .
केन्सची थेरी, से'ज मार्केट लॉ, इक्विलिब्रीयन, डिमांड सप्लाय . . . आठवत बसलो.
च्यायला, ह्या मंद्याच्या. . स्वतःही जेवायचं नाही आणि दुसर्याच्याही जेवणात माती कालवायची.
सहा-सात महिन्यांपूर्वी मला भेटला तेव्हाही मला विचारलं " त्या कोलायडरचं पुढे काय झालं रे ?"
कुठला कोलायडर ?
"अरे तो नाही कां शास्त्रज्ञानी जमिनीखाली सोडलेला? नाही कां ? पृथ्वीच्या निर्मितीचे रहस्य शोधून काढण्यासाठी सोडलेला ?
"काही कल्पना नाही बुवा पुढे काय झालं ते. पण तुला आत्ता कसं आठवलं हे "?
"हे नेहमीच माझ्या मनात येत अस्तं. बघ ना, हे शास्त्रज्ञ साले, स्वतःच्या अभ्यासासाठी माणसांनाही गिनीपीग बनवायला निघालेत".
"अरे मंद्या, पण अजून कुठे काय हानी झालीये आणि होईल हे ही कशावरून ?"
दत्त्या . . तो मोठा प्रयोग आहे शेवटी. त्याच्यातून काहीतरी विनाश हा घडणारच. म्हणतात नां -विनाशकाले विपरीत बुध्दी .
असा हा स्वतःच विपरीत बुध्दी असलेला मंदार.
सगळ्यात हाईट म्हणजे आम्ही "वर्हाड निघालंय लंडनला"ला गेलो होतो. आल्यावर त्यातले किस्से आठवून, चर्चा चाललेली होती.
त्यातला विमानातला प्रसंग आमचा एक राजा नावाचा मित्र सांगत होता. त्यातलं - आई, हे बुंग वर ग्येल आन् बदकन खाली पडलं, तर गं"ह्या वाक्यावर आम्ही हसत असतानाच मंद्या म्हणाला "त्या पोराची शंका बरोबर आहे, त्याला तसं वाटलं तर काय चुकीचं आहे"
ह्याच्या घरीसुध्दा त्याच्या ह्या स्वभावामुळे ख्खिल्ली उडवली जाते.
एका रविवारी, सुट्टीच्या दिवशी, मी त्याच्या घरी गेलो होतो. महाराज बाहेर बसले होते.
मला म्हणाला " आत जाऊ नको, बाहेर इथेच आपण जरा गप्पा मारू, मग नंतर आत जावू."
म्हटलं " कां रे ? "
म्हणाला " बायको पाल मारतीये " मी विचारलं " म्हंजे काय ? "
अरे ! स्वैपाकखोलीत भिंतीवर पाल आहे. बायको ती मारती आहे.
"मग, तू कां नाही तिला मदत करंत, खरंतर तू पाल मारायला हवीस"
तेवढ्यात त्याची बायको बाहेर आली. एका हातात झाडू आणि दुसर्या हातात सुपल्यामध्ये मेलेली पाल.
तिनं माझं शेवटचं वाक्य ऐकलेलं होतं.
ती म्हणाली " अहो काळे, काय सांगायचं- म्हणे पाल अंगावर पडली तर माणूस वेडं होतं, म्हणून साहेब बाहेर येऊन बसलेत. पाल मारणं तर सोडाच साधी मदतही करायला माणूस तयार नाही" असं म्हणून पाल दूरवर फेकून त्या घरात निघून गेल्या.
त्यानंतर घरात जाता जाता त्यांनी टाकलेलं वाक्य मला भारी आवडलं.
त्या म्हणाल्या " ह्या असल्या पाली कितीही मारता येतील हो, पण डोक्यातली शंकेची पाल मारणं शक्य नाही".
प्रतिक्रिया
26 Aug 2009 - 2:20 pm | लिखाळ
हा हा हा .. शीर्षक एकदम मस्त :)
लेख वाचतोच आता..पण शीर्षक वाचून पटकन प्रतिसाद द्यावासा वाटला..
-- लिखाळ.
'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)
26 Aug 2009 - 2:29 pm | विशाल कुलकर्णी
मस्त जमलाय ! पुलेशु.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
26 Aug 2009 - 2:30 pm | निखिल देशपांडे
अरे लेख छानच जमला आहे...
वर लिखाळांनी म्हणाल्या प्रमाणे शिर्षक मस्त्च..
बाकी आमच्या पण भोला वडापाव, त्या समोरचे संजय दाबेली ह्यांचा आठवणी उफाळुन आल्यात... पुढचा वेळेस भोला नक्की...
निखिल
================================
26 Aug 2009 - 2:45 pm | निखिल देशपांडे
प्रकाटाआ
26 Aug 2009 - 2:35 pm | भोचक
मस्त लेख. क्वचित माझ्याविषयीच लिहिताय की काय असं वाटलं? हाहाहाहा.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
26 Aug 2009 - 2:37 pm | अवलिया
हा हा हा
मस्त लेख ! :)
--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
26 Aug 2009 - 2:37 pm | झकासराव
राशीच्कक्रात कन्या राशीच्या माणसाची ही लक्षण उपाध्ये बुवानी सांगितल्याच आठवतय.
विमानात बसल्या वर शेजार्याला विचारतील की काय हो पायलटला हार्ट अटॅक आला तर विमान कोण चालवणार? असा प्रश्न विचारुन त्याची झोप उडवुन हे सुखाने झोपतील. असा किस्सा देखील त्यानी सांगितला.
जमतय की. अजुन किस्से येवुदेत. :)
26 Aug 2009 - 3:33 pm | पर्नल नेने मराठे
माझ्या पहिल्या विमान प्रवासाच्या वेळेस पुढिल सिट वरिल कार्ट आइला सार्खा १ च प्रश्न विचारि 8| कि आइ हे विमान खालि पड्ले तर..
मी तर बाइ सार्खी स्वमिन्चा जप करत होते :S कार्ट कन्या राशिच असावे ;)
चुचु
26 Aug 2009 - 4:29 pm | प्रमोद देव
.
माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे
26 Aug 2009 - 4:36 pm | झकासराव
मी तर बाइ सार्खी स्वमिन्चा जप करत होते. कार्ट कन्या राशिच असावे .
=)) =)) =)) =)) =))
दोन वाक्यांचा संबंध नाही अशी नोट लिवा चुचुताई तिथ.
भलताच अर्थ निघतोय.
26 Aug 2009 - 4:30 pm | प्रमोद देव
मी तर बाइ सार्खी स्वमिन्चा जप करत होते :S कार्ट कन्या राशिच असावे ;)
=)) =)) =)) =))
अशा वेळी स्वामी काय विमानाला खालून आधार देतात की काय? ;)
काळेसाहेब तुमचा लेखही भन्नाट आहे.
मजा आली. :)
माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे
26 Aug 2009 - 9:52 pm | चतुरंग
(स्वामी)चतुरंग
27 Aug 2009 - 8:52 am | अवलिया
वरिल प्रतिसाद अवांतर आहे.
चर्चा स्वामींची रास काय असावी याबद्दल नाही.
अवांतर प्रतिसादाची एक आणि संपादकाचा अवांतर प्रतिसाद शोधला म्हणुन दहा अशा अकरा चांदण्या मिळाल्याच पाहिजेत.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
27 Aug 2009 - 5:28 pm | महेश हतोळकर
हा चिंतातूर आख्या वर्हाडाची मज्जा घालवत असेल का?
-----------------------------------------------------------------
येथे तेराव्याचे कूपन्स जमा करून घेतले जातील आणि त्यांचे नि:पक्षपाती पणे वाटप केले जाईल.
-----------------------------------------------------------------
26 Aug 2009 - 2:40 pm | शाल्मली
लेख छानच जमला आहे.
राशीचक्रकार शरद उपाध्ये त्यांच्या लाडक्या कन्या राशीचे किस्से ऐकवण्याआधी तुमच्या या मित्राला भेटलेले दिसताहेत.. ;)
--शाल्मली.
26 Aug 2009 - 2:42 pm | नंदन
=))
हलकाफुलका लेख आवडला. झकासराव म्हणतात तसं राशिचक्रातले किस्से आठवले :). बैठकीत सगळे चहाचा पहिला घोट घेणार इतक्यात 'चहाला रॉकेलचा वास येतोय का?' असं म्हणून सगळ्यांच्या तोंडची चव घालवणार्याचा एक किस्सा होता त्यात.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
26 Aug 2009 - 3:28 pm | कानडाऊ योगेशु
मलाही शरद उपाध्येंनी दिलेली उदाहरणे आठवली.
बाकी लेख छान.
26 Aug 2009 - 4:21 pm | ए.चंद्रशेखर
छ्या! त्या बोअर उपाध्यांचं नाव या प्रतिसादात आणून लेखाची सगळी मजा प्लीज घालवू नका.
चंद्रशेखर
26 Aug 2009 - 4:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शंकेखोर नमुना आवडला.
त्या म्हणाल्या " ह्या असल्या पाली कितीही मारता येतील हो, पण डोक्यातली शंकेची पाल मारणं शक्य नाही".
अहाहा ! क्या बात है ! =D>
-दिलीप बिरुटे
26 Aug 2009 - 4:28 pm | सुधीर काळे
एका काळेकडून दुसर्या काळेंचे अभिनंदन! छान लेख व छान शीर्षक! आमच्यासारख्या स्टीलप्लांट चालविणार्याना तर याची चांगली कल्पना आहे!
आणि वृत्तातही फिट्ट बसवले आहे! व्वा भाई व्वा!!
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
26 Aug 2009 - 5:39 pm | कानडाऊ योगेशु
स्टीलप्लांट
आधी चुकुन स्त्रीलंपाट असेच वाचले.! (नजर दूषित झाली आहे वाटते.) ह.घ्या.!
26 Aug 2009 - 7:50 pm | सुधीर काळे
"कानडा गं विठ्ठलू"ने अशी चूक न केलेली बरी!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
26 Aug 2009 - 4:46 pm | स्वाती दिनेश
शीर्षकासकट लेख आवडला, मस्त !
स्वाती
26 Aug 2009 - 5:24 pm | चतुरंग
नक्कीच कन्याराशीचा असणार हा मंदार!
आपण शंका काढायची आणी विसरुन जायचं आणी बरोबरचे सगळे भंजाळून वेडे होतात ही खासियत.
पालीचा किस्सा खासच.
(शीर्षक वाचूनच लेख वाचण्याची उत्सुकता चाळवली.)
(चिंतातुर)चतुरंग
27 Aug 2009 - 12:23 am | भडकमकर मास्तर
हेच मन्तो..
पालीचा किस्सा:
रविवरी सकाळी घोरत पडलेल्या नवर्याला खडसावून उठवून "ती पाल मारा" असा आदेश देणार्या बायका माहिती आहेत... त्यानिमित्ताने होणारे " दरवेळी काय मीच मारायला पायजे काय?"
आणि " पाल ही नेहमी नवर्यानेच मारायची / हाकलायची असते"
किंवा " अगं जाउदेत, जाईल ती आपलीआपली, तू लक्ष नको देऊस"..असे संवाद अंमळ परीचयाचे. :) ;)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
26 Aug 2009 - 5:34 pm | दत्ता काळे
प्रतिसाद / प्रतिक्रिया देणार्या सर्व मिपाकरांचे आभार.
26 Aug 2009 - 6:14 pm | प्राजु
मस्त!!! खूप दिवसांनी असा छान लेख वाचायला मिळाला. शरद उपाध्येंची आठवण झाली. असे खूप किस्से ते सांगतात राशीचक्र मध्ये.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Aug 2009 - 6:33 pm | स्वाती२
मस्त!
26 Aug 2009 - 6:48 pm | सहज
मस्त
26 Aug 2009 - 7:20 pm | रेवती
हीहीही!
छान हसवणारा लेख.
रेवती
26 Aug 2009 - 7:20 pm | क्रान्ति
लेख आवडला. अशा नमुन्यांसाठी "चिंतामणी" ही उपाधी खासच! :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
26 Aug 2009 - 8:05 pm | सुधीर काळे
चिंतामणी हे नाव "मनी"बद्दल "चिंता" करणार्या "चिंतासुरा"साठी (माणसासाठी) "आयसीआयसीआय"ने त्यांच्या जाहिरातीत वापरले होते.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
26 Aug 2009 - 7:33 pm | ऋषिकेश
हा हा अगदी शिर्षकासकटा अख्खा लेख आवडला
:)
मस्त!
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ३२ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक शंकेखोर गीत ;) "पप्पा सांगा कुणाचे? मम्मी सांगा कुणाची?...."
26 Aug 2009 - 8:08 pm | सूहास (not verified)
सू हा स...
26 Aug 2009 - 8:52 pm | तेन्नालीराम
दत्तासाहेब,
लेख आवडला बर का. भन्नाट आहे.
ते. रा.
26 Aug 2009 - 8:56 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त लेख. हलक्या फुलक्या खुसखुशित शैलीत छान लिहिलंय. चिता आणि चिंता यात फरक एका अनुस्वाराचा असला तरी एक मेल्यावर जाळते तर दुसरी जिवंतपणीच जाळते.
बिपिन कार्यकर्ते
27 Aug 2009 - 6:47 am | छोटा डॉन
बिकांशी सहमत ...
लेख आवडला असेच म्हणतो
------
छोटा डॉन
26 Aug 2009 - 9:09 pm | विदेश
एक्दम्बेष्ट ,खुस्खुशीत वल्ली-चित्रण!
26 Aug 2009 - 9:51 pm | धनंजय
मित्राची गंमत वाटते.
आता बायकोच्या अंगावर पाल पडली आणि तिला वेड लागले, म्हणजे आयुष्यभराचा त्रास - त्यापेक्षा साहेबांनी स्वतःच्या अंगावर पाल पडण्याचा धोका पत्करायला हवा होता!
लघुकथाप्रसंग आवडला.
26 Aug 2009 - 11:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता बायकोच्या अंगावर पाल पडली आणि तिला वेड लागले, म्हणजे आयुष्यभराचा त्रास - त्यापेक्षा साहेबांनी स्वतःच्या अंगावर पाल पडण्याचा धोका पत्करायला हवा होता!
सहमत आहे...! :)
-दिलीप बिरुटे
26 Aug 2009 - 11:31 pm | चतुरंग
मिपाच्या विजिटिंग फॅकल्टीवर नाहीत ना? एकदा खात्री करुन घ्या प्राडॉ नाहीतर आफत ओढवायची! :T
(खात्रीशीर)चतुरंग
27 Aug 2009 - 8:53 am | अवलिया
वरिल प्रतिसाद अवांतर आहे.
चर्चा चिषय सौ बिरुटेंबद्दल नाही.
अवांतर प्रतिसादाची एक आणि संपादकाचा अवांतर प्रतिसाद शोधला म्हणुन दहा अशा अकरा चांदण्या मिळाल्याच पाहिजेत.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
27 Aug 2009 - 12:26 am | भडकमकर मास्तर
आता बायकोच्या अंगावर पाल पडली आणि तिला वेड लागले, म्हणजे आयुष्यभराचा त्रास - त्यापेक्षा साहेबांनी स्वतःच्या अंगावर पाल पडण्याचा धोका पत्करायला हवा होता!
=)) =)) =)) =))
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
27 Aug 2009 - 4:30 pm | सुधीर काळे
भडकमकर गुरुजी,
"ओ सजना बरखा बहार आयी" या गाण्याबद्दलची आपली आवड अगदी अभिजात वाटली. ते माझेही आवडते गाणे आहे व ते मी फ्लूटवर छान वाजवतो असे (फक्त मलाच) वाटते!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
27 Aug 2009 - 5:04 pm | लिखाळ
ही अभिजात आवड नसून मनुष्यमात्राची जन्मजात गरज आहे. आपण त्या वाक्यापुढचे जय बालाजी हे शब्द वाचले नसावेत :)
बालाजी तांबे यांनी उलगडले 'जीवनसंगीत'
त्या बातमीतला एक लहानसा भाग... "ओ सजना बरखा बहार आयी' हे "परख' चित्रपटातील गीत रानडे यांनी गायले. त्यावर भाष्य करताना डॉ. श्री. तांबे म्हणाले, ""या गाण्यात अतिउत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा परमेश्वराच्या मीलनाची आहे. मलविसर्जन तसेच आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे.
रात्री झोपताना भिजवलेल्या दहा मनुका खायचे विसरले तर सकाळी गाणे ऐकावे ;)
-- लिखाळ.
चालतं एकवेळ चालते पण चालत मात्र चालत नाही ;)
26 Aug 2009 - 10:11 pm | रामदास
हलका फुलका लेख आवडला.
काही वेळा मी पण असाच वागतो असं इकडून म्हटलं जातं.
मी लहानपणी गडकर्यांची चिंतातूर जंतू नावाची कविता वाचली होती ती आठवली.
27 Aug 2009 - 10:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त लिहिलं आहेत.
आमच्याइथे एक असाच चिंतामणी आहे, तो तर एवढा घाबरट आहे की शेजारी कोणी शिंकलं किंवा खोकलं तर तो थोडा वेळ श्वास घेत नाही. ही स्वाईन फ्लूच्या आधीचीच गोष्ट, आतातर तो किती घाबरत असेल याचा विचार करूनच मला हसायला येतं.
अदिती
27 Aug 2009 - 11:48 am | महेश हतोळकर
थोडा वेळ श्वास घेत नाही.
किती वेळ. :& रामदेव बाबांचा शिष्य आहे का?
-----------------------------------------------------------------
येथे तेराव्याचे कूपन्स जमा करून घेतले जातील आणि त्यांचे नि:पक्षपाती पणे वाटप केले जाईल.
-----------------------------------------------------------------
27 Aug 2009 - 11:22 am | कपिल काळे
मस्त लेख.
चिंतातुर जंतु चे वर्णन झकास!!
27 Aug 2009 - 11:25 am | अरुण वडुलेकर
शीर्षक आणि लेख एकदम भन्नाट.
असले चिंतातूर चिंतू बहुदा सर्वत्र भेटतात.
आम्ही मित्र मित्र एकदा सहलीला निघालो. हंसत खिदळत प्रवासाला सुरुवात झाली. मात्र अपवाद एका मित्राचा. खोलीला कुलूप नीट लागलेले नाही की काय आणि टपालपेटीतील टपाल बघायचे राहून गेले या शंकासुराने त्याला घेरले आणि सबंध सहलीचा मजा त्याने किरकिरा केला.
27 Aug 2009 - 12:06 pm | दत्ता काळे
प्रतिसाद देणार्या सर्व मिपाकरांचे परत एकदा आभार !
27 Aug 2009 - 2:07 pm | जे.पी.मॉर्गन
अहो काळे.... शीर्षक वाचूनच मी हसायला लागलो तर आख्खं ऑफिस माझ्याकडे बघायला लागलं ! लेख पण मस्तच !
27 Aug 2009 - 5:34 pm | दिनेश५७
त्या उपाध्यांची रास कोणती असेल?
वृष्चिक?
28 Aug 2009 - 12:06 pm | झकासराव
त्यांची धनु रास आहे अस ऐकल आहे.