नमस्कार.
सर्व मिपाकराना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि आपल्या लाडक्या मिपाला २ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
असो,तर मुळ सांगायचा मुद्दा असा की आत्ता झी टॉकीजवर आयुष्यावर बोलु काही चे पुनःप्रक्षेपण चालु आहे.
आणि मगाशीच मी त्यात एक गाणे ऐकले.
हे गाणे खरेतर मी काही दिवसापुर्वीच यु नळीवरुन उतरवुन घेतले आहे, व सध्या त्याचे पारायण चालु आहे,अगदी या गाण्याव लिहायचे,त्याचे रसावलोकन का रसग्रहण जे काही म्हणतात ते करायचेच असे ठरवुन मनात लेखही तयार केला होता. पण्,नंतर लक्षात आले की काही गाण्यांचे अवलोकन करण्यात वेळ घालवायचा नसतो, ती फक्त अनुभवायचीच असतात.तसाच हा अनुभव.मी आजपर्यंत ज्यांना ज्यांना हे गाणे पाहताना वा ऐकताना पाहिले आहे त्या सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याचेही पाहिले आहे आणि याला एकही अपवाद नाही.....
म्हणुनच काहीही न लिहिता ते गाणे तुमच्यापुढे ठेवत आहे.
खरेच सांगतो,मी हे गाणे जवळ जवळ १०० वेळा ऐकले असेल पण एकदाही माझ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलेले नाही. मिपावर आज अनेक परदेशस्थ नागरीक्,संगणक क्षेत्रातील राबणारे लोक आहेत,त्या सर्वांची व्यथा हे गाणे मांडते हे नि:संशय . त्या सगळ्याना जे म्हणता आले नसेल ते हे गाणे सांगते. म्हणुनच मिपावरच्या बर्याचशा लोकानी हे गाणे ऐकले असण्याची शक्यता असतानाही हे गाणे मी इथे टाकत आहे. खरेतर गणेश चतुर्थीच्या प्रसन्न वातावरणात हे गाणे इथे द्यावे का नाही याविषयी अजुनही संभ्रम आहे.पण ,निदान या शुभदिनी हे सर्व लोक आपल्यावर अशी वेळ येवु देणार नाहीत अशी प्रतिज्ञा करतील असे वाटत असल्याने किंवा तशी इच्छा असल्याने हे गाणे इथे देत आहे. बाकी हा गजानन सर्वाना सद्बुद्धी देवो हीच त्याच्याकडे प्रार्थना.
आणि हो, या गाण्यावर लिहिण्यासाठी शिवशिवणारा हात थांबवण्यात जरी मला यश आले असले,तरी या कार्यक्रमावर लिहिणे मात्र मी टाळु शकलो नाही,त्यामुळे या कार्यक्रमावर लिहिलेला लेख
सलाम आबोका
http://beta.esakal.com/2009/08/19141213/Muktapeeth-on-experience-of-sa.html
इथे वाचु शकता.(जरुर वाचा,चांगला झाला आहे असे वाटत आहे.)
याच संदर्भातील लेख पुर्वी मिपावर लिहिला असल्याने हा लेख मिपावर प्रकाशित केला नव्हता. मात्र,तुम्ही लेखाला अनुसरुन प्रतिसाद इथे दिल्यास आनंद वाटेल.
बाकी सर्वाना पुन्हा एकदा शुभेच्छा.
आपला,
(गणेशभक्त आणि मिपाप्रेमी) विनायक
प्रतिक्रिया
22 Aug 2009 - 11:05 pm | लवंगी
:(
22 Aug 2009 - 11:15 pm | बिपिन कार्यकर्ते
हे गाणं ऐकवत तर नाही आणि परत ऐकावंसं वाटतं. हा कार्यक्रम पहिल्यांदा झाला तेव्हाच वाईट अवस्था झाली होती. असो.
बिपिन कार्यकर्ते
22 Aug 2009 - 11:46 pm | गणपा
अगदी मनातल बोललास बिपिनदा...
24 Aug 2009 - 3:14 am | बिपिन कार्यकर्ते
ज्याचे जळते त्यालाच कळते... नाही तर नुसतेच वारे जाते. आणि माझ्या मते हा विषय चर्चा वगैरे करायचा नाहीच्चे.
बाकी ते गाणे त्यातल्या शब्दामुळे भावले आहे. सूर, ताल वगैरे आ.का.का.क.ना.हे.ज.जा.आ.
बिपिन कार्यकर्ते
22 Aug 2009 - 11:38 pm | दादा कोंडके
अप्रतिम शब्द, तितकीच सुंदर चाल!
सर्व पालकानी ऐकण्यासारखं गाणं.
22 Aug 2009 - 11:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनेक परदेशस्थ नागरीक्,संगणक क्षेत्रातील राबणारे लोक आहेत,त्या सर्वांची व्यथा हे गाणे मांडते
हम्म, पैशासाठी धावाधाव करणार्यांसाठी असा अनुभव असेल, त्यात नवल काय ? मी हा कार्यक्रम पाहिलेला आहे. पण रडवेला वगैरे काही होत नाही. लोक कुठे आणि किती भावनिक होतील याची काही गॅरंटी नाही.
असो, अजून काय, बारावीचा अभ्यास काय म्हणतो ?
-दिलीप बिरुटे
23 Aug 2009 - 12:18 am | छोटा डॉन
विनायका, मस्त गाण्याची लिंक दिली.
बिपीनदा म्हणतात तसे च्यायला ह्या गाण्याने पहिल्या पाहण्यातच पार हळवे करुन टाकले, वाटले आता नको पहायला, मग शेवटी डाऊनलोड करुन ५-६ वेळा पुन्हा पाहिले ...
असो, चालायचेच ...
>>हम्म, पैशासाठी धावाधाव करणार्यांसाठी असा अनुभव असेल, त्यात नवल काय ?
आश्चर्य वाटले सर तुमच्याकडुन ह्या टाईपची प्रतिक्रिया वाचुन.
असो, असो. असतील बाबा लोक पैशासाठी धावाधाव करणारी आणि बेगडी भावना आणि हळवेपण दाखवणारी ...
च्यायला लोक रडताना पाहताना आम्हाला वाटले की गाणे पार आतपर्यंत घुसते आहे पण ह्याचा संबंध फक्त "पैशासाठी धावाधाव" करणार्यांपुरताच मर्यादित असेल असे अजिबात वाटले नव्हते ...
बाय द वे, आता अशा टाईपच्या प्रतिक्रिया मला "स्टेरिओटाईप (साचेबद्ध ? )" वाटत आहेत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे हे ओघाने आलेच ...
>>मी हा कार्यक्रम पाहिलेला आहे. पण रडवेला वगैरे काही होत नाही.
मीसुद्धा हा कार्यक्रम पाहिला नाही, मात्र आत्ताचे ही क्लिप पाहिली ....
खोटं कशाला बोला, हे गाणे मला ५ मिनीटे हळवे करुन गेले, जर कधी भविष्यात हा कार्यक्रम प्रत्येक्षात पाहिला तर काय सांगावे डोळ्यात पाणी येईल सुद्धा ...
जे आहे तसे आहे, उगाच कशाला लपवा ?
>>लोक कुठे आणि किती भावनिक होतील याची काही गॅरंटी नाही.
खरं आहे तुमचे म्हणणे ...
आजकाल लोकांच्या ह्या भावनिक होण्याचा संबंध कशाकशासी लावला जाईल ह्याचीही काही गॅरेंटी नाही. ;)
चालायचेच ...
अवांतर : मी अजुन बाप वगैरे झालो नाही पण हे गाणे टच करुन गेले यार, बाप झालेल्या व समकक्ष परिस्थीतीतुन जाणार्या लोकांना काय लेव्हलचा हळवापणा वाटत असेल ह्याचा अंधुक अंदज येत आहे.
जियो संदिप-सलिल ...!!
-----
छोटा डॉन
22 Aug 2009 - 11:53 pm | विनायक पाचलग
बरोबर आहे सर.
बाकी कोण किती भावनीक होईल हे व्यक्तीसापेक्ष आहे.
मग तुम्ही लेख वाचा आणि त्यावर तुम्हाला काय वाटते ते लिहा.
अभ्यास चालु आहेच,आपले आशिर्वाद असु देत इतकेच सांगणे
(अभ्यासु गणेशभक्त)
विनायक
22 Aug 2009 - 11:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सकाळमधील लेखाबद्दल अभिनंदन चांगलं लिहिलंय !
>>आपले आशिर्वाद असु देत इतकेच सांगणे
अरे, देवाचे आशिर्वाद असले पाहिजे.
माणसाचे काय खरे नसते.
असो, पुढील लेखनासाठी शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
23 Aug 2009 - 7:48 am | प्राजु
हे गाणं जितक्या वेळेला ऐकलं तितक्या वेळा मनात कल्लोळ माजला आहे.. बास्!! बाकी काही लिहित नाही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Aug 2009 - 10:27 am | शैलेन्द्र
अतिशय सुंदर, साधे शब्द आणि मनातल्या कल्लोळाला साथ देणारी चाल.. हे गान आतुन हलवतं.
23 Aug 2009 - 12:04 pm | विसोबा खेचर
ठीक!
तूर्तास इतकेच. सवड झाल्यास बाकी विवेचन करेन..
तात्या.
23 Aug 2009 - 10:58 pm | निमीत्त मात्र
तात्या सलील बर्याच ठीकाणी सुरात घसरल्या सारख्या माझ्या कानांना वाटतो आहे. सवड मिळाली की तुमच्या तज्ञ कानांनाही तसेच वाटले का ते कळवा.
निमीत्त मात्र
23 Aug 2009 - 11:21 pm | विसोबा खेचर
तशी ती मुलं गुणी आहेत...
सवड मिळाल्यास नक्की लिहीन. पण फारसं काही लिहू शकेन असं वाटत नाही..परंतु मुलं काहीबाही प्रयत्न करताहेत हे चांगलं आहे..
तात्या.
23 Aug 2009 - 11:41 pm | छोटा डॉन
>>पण फारसं काही लिहू शकेन असं वाटत नाही..परंतु मुलं काहीबाही प्रयत्न करताहेत हे चांगलं आहे..
हम्म्म्, एकदम मान्य आहे.
तरीपण आपण ह्यावर लिहावे अशी विनंती करतो ...
आम्हाला चाल, लय आणि गाण्यातल्या टेक्निकल बाबी काहीही कळत नाही, अजिबातच कळत नाही म्हटले तरी चालेल.
मात्र ते शब्द आणि काव्य फारच आवडले, तेव्हा आता ह्याचेच सादरीकरण उत्तम कसे करता येईल व त्यात अजुन रंग कस्सा भरता येईल हे जाणणे आम्हाला आवडेल.
ह्यातले एक दर्दी म्हणुन तात्या तुम्ही जरुर लिहा ...
सवडीने लिहा, आम्ही वाट पाहु, अजिबात गडबड नाही पण आग्रह मात्र जरुर आहे ...
------
छोटा डॉन
24 Aug 2009 - 3:29 am | बिपिन कार्यकर्ते
मी वर लिहिलंय तसं, मला हे गाणं त्यातल्या शब्दांमुळे आवडलं. बाकी काही कळत नाही. पण मलाही तात्यासारख्यांकडून सादरीकरणाबद्दल काही लिहिले गेले तर वाचायला आवडेल नक्कीच. कधी कधी अगदी उत्तम काव्यही किंवा कोणतीही कलाकृती सुमार सादरीकरणामुळे पार ढेपाळते. त्या अनुषंगाने काही वाचायला आवडेल.
बिपिन कार्यकर्ते
23 Aug 2009 - 11:21 pm | दादा कोंडके
मला गाण्यातलं खूप कळत नाही. पण मला तरी चाल आवडली. बाकी त्यांनी सुरवातीलाच सांगीतलं की चाल अजून नीट बसलेली नाहीय, सांभाळून घ्या. गाणं संपूर्ण तयार झाल्यानंतर खूप छान असेल.
स्टेज वर गाणं सादर करणं अवघड असतं. कितीतरी स्टेज शोज मध्ये मोठे-मोठे गायक मूळ गाणं लाउन फक्त लीप मुव्हमेंट्स करतात.
"I always win, except when I loose. But then I just don't count" :D
23 Aug 2009 - 10:46 pm | प्रमोद देव
चालीत अजिबात दम नाही.एकदम सामान्य. :(
सलील कुलकर्णी उगाचच ताणून गातोय.
माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे
23 Aug 2009 - 10:50 pm | शैलेन्द्र
चाल आणि संगीत सोडा हो काका, ते साधे शब्द वेड लावतात...
23 Aug 2009 - 10:55 pm | प्रमोद देव
काव्य बर्यापैकी आहे.
पण मी तरी इतका भावूक नाहीये. :)
माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे
23 Aug 2009 - 10:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चालीत अजिबात दम नाही.एकदम सामान्य. :(
सलील कुलकर्णी उगाचच ताणून गातोय.
गाण्याने तुम्ही आतुन हलला नाहीत, भावनांचा कल्लोळ उठला नाही.
छ्या, एकतर तुम्हाला गाणं कळलं नसावं किंवा तुम्ही त्या भावनांशी एकरुप होऊ शकला नाहीत. अहो, त्यासाठी हळवं मन असावं लागतं ?
तुम्ही आयटी क्षेत्रात निवृत्त झाला नसाल म्हणून तुम्हाला ते फिलींग येत नसेल असे वाटते.
असो, आता अशा टाईपच्या प्रतिक्रिया मला "स्टेरिओटाईप (साचेबद्ध ? )" वाटत आहेत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे हे ओघाने आलेच
;)
-दिलीप बिरुटे
(साचेबद्ध)
23 Aug 2009 - 11:01 pm | काळा डॉन
हॅहॅहॅ...और ये लगा सिक्सर!! :D
23 Aug 2009 - 11:09 pm | टारझन
अक्षरशा: टॉवेल्स पिळून पिळून रडलोय ! आताशा घरातले रुमाल आणी टॉवेल्स संपलेत .. आता कर्टन्स पिळणे चालू आहे !!
आयच्यान एवढा तर मी लहानपणी रडलेलो .. आईनं पाठ लाल केलेली तेंव्हा !
सलिम खरे , जियो दोस्ता !
आपला
खुप खुप रडलेला
कोकि
24 Aug 2009 - 2:27 am | चतुरंग
रोजच्या रगाड्यात मुलीपासून दूर रहावे लागलेल्या बाबाची ही कैफियत आहे. घरोघरी असलेली ही भावना अतिशय आर्त शब्दात संदीपने मांडली आहे. ते शब्द बर्याच आई-बाबांच्या आणी त्यांच्या मुलामुलींच्या हृदयाचा ठाव घेणारे असणार ह्यात शंका नाही. मी आत्ता हे गाणं प्रथमच ऐकलं आणी डोळे ओले झाले.
सलीलनं एका वेगळ्या चालीचा प्रयोग केलाय. ही चाल मला तितकीशी भावली नाही. जरा शांत, संयत चाल आणी कमी आरडाओरडा आणखीन भावपूर्ण गाणे देऊ शकेल असे वाटते.
चतुरंग
24 Aug 2009 - 4:11 pm | विसोबा खेचर
सहमत...
तात्या.
24 Aug 2009 - 9:51 am | आशिष सुर्वे
संदीपने सुरेख शब्द गुंफले आहेत ह्या गाण्यात.
खरेच छान आहे गाणे..
राहीला भाग चालीचा, तर गाण्याच्या सुरुवातीलाच सलीलने स्पष्ट केलेय की ही चाल अगदी 'कोरी' आहे आणि चाल अजून 'बसतेय'..
अर्थात, संगीताच्या जाणकारांमध्ये एक मुद्दा नक्कीच वादाचा विषय होऊ शकतो तो असा की, चाल कोरी असताना हे गाणे जाहीरपणे सादर करण्याची घाई करणे योग्य होते का?
असो, माझ्यासारख्या सामान्य संगीतप्रेमीला हे गाणे फार भावले!!
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
24 Aug 2009 - 3:56 pm | सूहास (not verified)
सू हा स...
24 Aug 2009 - 8:10 pm | टिउ
खरेंची कविता खरंच सुंदर आहे. चाल वगैरे ठीकठाकच आहे. जुलैत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात संदीप-सलीलचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी हे गाणं ऐकलं होतं. तेव्हाही बर्याच लोकांचे डोळे पाणावले होते.
अवांतरः त्या कार्यक्रमात सलील म्हणाला होता की अगदी नवीन चाल आहे. पहिल्यांदाच कुठल्या शो मधे गातोय. तेव्हा सांभाळुन घ्या...एक महिन्यानंतर 'आयुष्यावर बोलू काही' मधे पुन्हा तेच ऐकलं तेव्हा थोडी गंमत वाटली...असो, चालायचंच!
26 Aug 2009 - 12:47 am | भडकमकर मास्तर
अवांतरः त्या कार्यक्रमात सलील म्हणाला होता की अगदी नवीन चाल आहे. पहिल्यांदाच कुठल्या शो मधे गातोय. तेव्हा सांभाळुन घ्या...एक महिन्यानंतर 'आयुष्यावर बोलू काही' मधे पुन्हा तेच ऐकलं तेव्हा थोडी गंमत वाटली...असो, चालायचंच!
हे फार आवडले ..
धन्यवाद...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
26 Aug 2009 - 12:53 am | बिपिन कार्यकर्ते
आत्ताच थोड्या वेळापूर्वी झालेल्या सारेगमपच्या आजच्या एपिसोडमधे सलिल एका स्पर्धकाला 'स्टेजवर कधी खोटे बोलू नये' असे म्हणाला !!!
बिपिन कार्यकर्ते
26 Aug 2009 - 1:12 am | आंबोळी
सलिल एका स्पर्धकाला 'स्टेजवर कधी खोटे बोलू नये' असे म्हणाला !!!
हे लैच आवडले.
(धारी)आंबोळी
26 Aug 2009 - 8:18 am | विनायक पाचलग
या कार्यक्रमाचे शुटींग जुन एंडला का जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेले आहे.
संदर्भ-एका वृत्तपत्रात आलेली बातमी
तुमचा कार्यक्रम त्यानंतर झाला आहे असे मला वाटते.
आणि हा कार्यक्रमही पहिल्यांदा २६ जुलैला प्रसारीत झाला होता...
धन्यवाद
विनायक
25 Aug 2009 - 8:19 am | विनायक पाचलग
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार.
या गाण्याची चाल जाणकाराना आवडणार नाही अशी शंका होतीच, ती काही प्रमाणात खरी ठरली.
पण ,एक मात्र राहुन राहुन वाटते की आजपर्यंत आपल्याला सर्व भावुक किंवा सीरीयस गाणी ही शांत आणि संयत चालीवर बांधलेली होती,असतात,(यात काही अपवाद असु शकतात.).मात्र ही प्रथा मोडण्यासाठी जर सलीलने या गाण्याला अशी चाल दिली असेल तर मग मात्र तो यशस्वी ठरला आहे, कारण त्याने त्याला जो मेसेज पोहोचवायचा आहे तो व्यवस्थीतपणे पोहोचवला आहे.
राहिता राहिला प्रश्न, न बसलेली चाल एवढ्या मोठ्या कार्यक्रमात म्हणावी का?
याचे कारण असे असु शकते की जरी झी वर बर्याच जणानी हा कर्यक्रम पहिल्यांदा पाहिला असला तरी प्रेक्षागृहातील बर्याच लोकानी तो पुर्वी पाहिलेला होता,त्यामुळे त्याना काही नवे देणे भाग होते ,(कदाचित तीच त्यांची खासीयत असावी,कारण मी जेव्हा कोल्हापुरच्या कार्यक्रमात देतो कोण हे गाणे ऐकले त्यानंतर जवळ जवळ दोन महिन्यानी त्या चित्रपटाचे शुटींग सुरु झाल्याची बातमी वाचली, म्हणजे चित्रपट यायच्या जवळ जवळ एक वर्षे आधीच त्याने ते गाणे लोकांसमोर आणले)आणि अजुनही त्याने बालगीतांचा नवीन अल्बम काढायचे ठरवलेले नाही, त्यामुळे ही चाल लोकांपर्यंत यायला बराच वेळ गेला असता म्हणून कदाचित त्याने ते गाणे म्हणले असावे.
थोडक्यात काय,
सलील- संदिप हे आजच्या पीढीचे प्रतिनिधी आहेत,ते आजच्या पीढीवर गाणी करतात आणि त्याना ती आवडतात,मॅटर खतम.
पण महत्व म्हणजे ते जुन्याशी धरुन आहेत,त्यांना योग्य मान देतात,आणि नवीन पीढीचा म्हणून उगाचच नेटवर मिळणारे चार पीस एकत्र करुन गाणी करत नाहीत.म्हणूनच
जीयो सलिल्-संदीप
आपला नम्र,
( तात्यांच्या विष्लेषणाच्या प्रतिक्षेत असलेला) विनायक
25 Aug 2009 - 8:44 am | मुक्तसुनीत
इंग्रजीमधे "टिअर जर्कर" असा एक शब्दप्रयोग आहे. त्याचा मूळ अर्थ जरी "भावनाना हात घालणारे काही" असा असला तरी , कालपरत्वे त्याची छटा ही "प्रयत्नपूर्वक डोळ्यातून पाणी काढणारे" अशा अर्थाची आणि त्यामुळे काहीशी व्यंगात्म झालेली आहे. प्रस्तुत गाणे ऐकताना थोडे तसे वाटले.
या गाण्यावर अश्रू टिपणार्यांनी "माहेरची साडी" , "लेक चालली सासरला" वगैरे चित्रपटांना रडणार्याना , "संत गजानन शेगावीचा" या चित्रपटाच्या वेळी भावव्याकूळ होणार्या गोरगरीब जनतेला हसू नये इतपत म्हणणे सयुक्तिक होईल. कारण माझ्यामते प्रस्तुत सादरीकरणामधे , वरील आवरण जरी शहरी, सोफिस्टिकेटेड असले तरी आतला पदार्थ हा उपरोल्लेखित रेसिपीचाच आहे.
अर्थात मला जरी असे वाटले तरी इथे कुणाच्या भावनाना दुखावायचा हेतू नव्हता. चित्रपट, नाट्य, संगीत, काव्य या सार्यांपैकी कशाना कशाने मला कधी ना कधी स्पर्श केलेला आहे हे खुल्या मनाने मान्य करतो. मात्र, एखादी गोष्ट सरळसरळ असा हिशेब ठेवून सादर केल्यासारखी वाटली तर त्याचे मूल्य फार जाणवत नाही इतकेच म्हणायचे आहे.
25 Aug 2009 - 9:25 am | शैलेन्द्र
"या गाण्यावर अश्रू टिपणार्यांनी "माहेरची साडी" , "लेक चालली सासरला" वगैरे चित्रपटांना रडणार्याना , "संत गजानन शेगावीचा" या चित्रपटाच्या वेळी भावव्याकूळ होणार्या गोरगरीब जनतेला हसू नये इतपत म्हणणे सयुक्तिक होईल. कारण माझ्यामते प्रस्तुत सादरीकरणामधे , वरील आवरण जरी शहरी, सोफिस्टिकेटेड असले तरी आतला पदार्थ हा उपरोल्लेखित रेसिपीचाच आहे."
असहमत,
या गाण्यात कुणीही कुणावर अन्याय करत नाही, मार-झोड नाही. चांगल्या वाइटाचे काळे पांढरे रंग नाही, इतकच काय, दैवाने केलेला पराकोटीचा अन्यायही नाही... जवळ राहुनही हळु-हळु सुकत जाणार्या एका आदिम नात्याची ही व्यथा आहे. मुळात ही एक कविता आहे. मुक्तक म्हणा हवतरं. आणि आज ३५-४० मधे असलेल्या अनेक बाबांना ही कथा स्वतःची वाटते. हे सगळ असच असेल असही नाही, पण अस होवु शकत ही धास्ती मनाला खंतावते. डोळ्यातुन येणारे पाणी या खंतेतुन येते. पुढच्या जगण्याची तरतुद करताना "आज" जगयचा राहुन जातोय ही वेदना तशी जुनीच आहे तिचेच आजचे रुप घेवुन ही कविता येते.
बाकी चाल, संगीत मला फारस कळत नाही, पण शब्द कळतात आणि म्हणुनच हे गाण आणि कविता असं कॉम्बिनेशन आवडतं
"गाडी सुटली रुमाल हलले" हेही असच एक छान मुक्तक...
25 Aug 2009 - 9:50 am | मुक्तसुनीत
या गाण्यात कुणीही कुणावर अन्याय करत नाही, मार-झोड नाही. चांगल्या वाइटाचे काळे पांढरे रंग नाही, इतकच काय, दैवाने केलेला पराकोटीचा अन्यायही नाही... जवळ राहुनही हळु-हळु सुकत जाणार्या एका आदिम नात्याची ही व्यथा आहे. मुळात ही एक कविता आहे. मुक्तक म्हणा हवतरं.
प्रस्तुत सादरीकरणात मारझोड वगैरे आहे असे मी लिहिल्याचे मला स्मरत नाही. ही कविता आहे , मुक्तक आहे हेदेखील आपल्याला अमान्य नाहीच. माझा मुद्दा मी वर मांडला आहे. आणि तो काहीशा हिशेबी वाटेल अशा भावनिक आवाहनाचा आहे इतकेच.
बाकी तुमच्या आमच्या असहमतीबद्दल सहमत आहे. (वी अग्री टू डिसॅग्री.)
25 Aug 2009 - 10:01 am | शैलेन्द्र
तुम्ही दिलेल्या उदाहरणांमधे ते प्रकार आहेत. म्हणुन मला ही तुलना पटली नाही.
बाकी सहमत- असहमत किंवा कुणाला कुठला अनुभव कसा भिडावा हे व्यक्तिसापेक्ष आहे.
वी अग्री टू डिसॅग्री.
26 Aug 2009 - 12:55 am | भडकमकर मास्तर
गाण्यतल्या हिशोबीपणाचा आदर ठेवत आणि गाणे आवडलेल्या सर्व रसिकांच्या भावनांचा आदर ठेवत असे म्हणावेसे वाटतेच की अगदी हिशोबी गाणे वाटले...
..
म्हणजे स्वतःच लिहिलेल्या एका एकांगी हिशोबी गाण्याला ( म्हणजे लहान मूल बापाला म्हणते की तू मला सोडून जातोस वगैरे)अजून एका दुसर्या टोकाच्या एकांगी हिशोबी गाण्याचे उत्तर द्यायचे... ( बाप पोराला म्हणतो की मी रे किती कष्ट करतो)
... फार बनावट वाटले...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
26 Aug 2009 - 1:01 am | बिपिन कार्यकर्ते
मी हे गाणे ऐकले प्रथम तेव्हा मला हे बाकीचे संदर्भ काहीच माहिती नव्हते. आणि त्यात जे वर्णन आहे ते कुठेतरी संबंधित असल्यासारखे वाटले म्हणून एक वेगळाच प्रत्यय देऊन गेले. कदाचित हे संदर्भ माहित असते तरीही आवडले असते ते वैयक्तिक संदर्भामुळे.
बिपिन कार्यकर्ते
26 Aug 2009 - 3:43 am | निमीत्त मात्र
मुक्तसुनित ह्यांच्याशी पूर्ण सहमत आहे. अतिशय हिशेबी प्रकार आहे हा. विशेषतः संदीपने शेवटच्या काही ओळीत आवाजात मुद्दाम आणलेला हुंदका वगैरे प्रकार तेच दर्शवतात.
26 Aug 2009 - 9:36 am | नीधप
टिअर जर्कर आणि हिशोबी पणाबद्दल संपूर्ण सहमत!
कॉपिरायटींग मधला हिशोबी पणा खर्यांच्या इतर कवितातही येतो असं आपलं माझं मत.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
25 Aug 2009 - 10:03 am | मुक्तसुनीत
या कवितेच्या निमित्ताने एका जुन्या इंग्रजी कवितेची आठवण झाली. कवी मराठी आहेत : दिलीप पुरुषोत्तम चित्रे. पण कविता इंग्रजी आहे. ही कविता मला आवडते. (म्हणजे ती वाचताना मी रुमाल काढतो असे नाही. पण आवडते बुवा. ) प्रस्तुत विषयाशी ही कविता थोडीशी मिळतीजुळती आहे असे एखाद्याला वाटेल.
Father Returning Home
My father travels on the late evening train
Standing among silent commuters in the yellow light
Suburbs slide past his unseeing eyes
His shirt and pants are soggy and his black raincoat
Stained with mud and his bag stuffed with books
Is falling apart. His eyes dimmed by age
fade homeward through the humid monsoon night.
Now I can see him getting off the train
Like a word dropped from a long sentence.
He hurries across the length of the grey platform,
Crosses the railway line, enters the lane,
His chappals are sticky with mud, but he hurries onward.
Home again, I see him drinking weak tea,
Eating a stale chapati, reading a book.
He goes into the toilet to contemplate
Man's estrangement from a man-made world.
Coming out he trembles at the sink,
The cold water running over his brown hands,
A few droplets cling to the greying hairs on his wrists.
His sullen children have often refused to share
Jokes and secrets with him. He will now go to sleep
Listening to the static on the radio, dreaming
Of his ancestors and grandchildren, thinking
Of nomads entering a subcontinent through a narrow pass.
25 Aug 2009 - 7:06 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता आवडली.
बिपिन कार्यकर्ते
25 Aug 2009 - 10:44 pm | मुक्तसुनीत
या कवितेच्या निमित्ताने या कवितेवर झालेली एक सुरेख चर्चा.
इथे अर्नब नावाच्या एकाचा प्रतिसाद मी भाषांतर करून टंकतो आहे. एखाद्या उत्तम कवितेकडे , त्या कवितेच्या आशयघनतेला न्याय देणारा रसास्वाद याचे हे एक उत्तम उदाहरण आहे :
"या कवितेमधे शेवटी आलेल्या खिंडीचा उल्लेख खैबरखिंडीचाच आहे असे मला वाटत नाही. ही कुठलीही खिंड असू शकते. त्यामुळे कवितेच्या एकूण सुरामधे काही फरक पडत नाही. कवितेमधे अनेक घटकांची अदलाबदल किंवा सरमिसळ केलेली आहे : नेहमीच्या लोकलट्रेनमधले कंटाळवाणे येणे-जाणे आणि स्थलांतरितांच्या प्रवासातली अर्थपूर्णता, बाह्यपरिस्थिती आणि मनःस्थिती , माणसाचे सभोवतालपासूनचे सांधलेपण-तुटलेपण या सगळ्याची अदलाबदल म्हणजे कवितेचा गाभा होय असे मला जाणवले. कवितेची ही बहुपेडीशैली सुद्धा त्याचे प्रतिबिंब दाखवते. कवितेतल्या खिंडीचा अरुंदपणा आणि त्यातून जाणार्या भटक्यांच्या उपयोजनाकडे एकंदर प्रतीकात्म अर्थाने पहाणे योग्य. त्यातून काही विशिष्ट ऐतिहासिक/भौगोलिक अर्थाचे काही मला दिसले नाही. "
25 Aug 2009 - 11:10 am | पूजादीप
अतिशय भावुक गाणे. बापाच्या मनाचा कोंडमारा छान उलगडुन दाखवला आहे.
पूजा
26 Aug 2009 - 12:11 am | मी_ओंकार
विनायका,
छान लिहिलयस. सकाळ मधला लेख ही छान. कार्यक्रम पाहिला तेव्हाच आवडले होते गाणे. बाकी चालीबद्दल या गाण्याच्या सुरुवातीला संदीपने 'दूरदेशी गेला बाबा' या गाण्याची दुसरी बाजू म्हणून ही कविता लिहिली असे सांगितले होते. त्या गाण्याची चाल भावूक असल्याने कदाचित सलील ने ही चाल अशी बनवली असावी.
बाकी संदीप सलील बद्दल लिहावे तितके थोडेच. तू मात्र असाच लिहीत रहा.
- ओंकार.
अवांतर : सवड असेल तेव्हा मी लिहिलेला हा लेख वाच.