फार पूर्वी मॅट्रिक परिक्षा झाली की गंगेत घोड नहायच. मग कुठेतरी शिक्षकाची अथवा सरकारी नोकरी आणि नंतर विवाह करून गृह्स्थाश्रम सांभाळला जायचा. कलांतराने त्यापेक्षा जास्त शिक्षण घेणा-यांची संख्या वाढली.तालुक्याला/शहरात जाऊन एखादी पदवी मिळवणे हे अनेकांच ध्येय्य झालं. काहींनी ते साध्य केलही.पदवी संपादन करणे तेव्हा कौतुक करण्याजोग होत आणि ते अतिशय सन्माननीयही समजल जायच.
माझे बाबा पदवीधर झाले तेव्हा त्यांनी घराच्या दरवाज्यावरची पाटी नविन करून घेतली. बाबांच नाव आणि खाली `बी .ए. ऑनर्स`. एवढच नाही तर त्यांनी स्टुडिओमधे जाऊन लहान, मोठे फोटो ही काढून घेतले होते. एक क्लोजअप आणि दुसरा संपूर्ण उभा.
मान ताठ धरून तिरकस उभे राहून काढून घेतलेले ते कृष्ण धवल फोटो आजही आमच्या संग्रही आहेत.क्लोजअप फोटोतून आपल्याकडेच पाहत `मी हे मिळवलं` असं अभिमानाने सांगणारे ते डोळे मला आठवतात. ते फोटो बाहेर काढून पाहिले की त्यातील चेह-यावरच्या स्मितहास्यातून दिसणारे यश मला आणि बाबांना अजूनही सुखावते.
त्यावेळी `पदवी` म्हणजे काय हे समजण्याइतकी मी मोठी झाले नव्हते. पण आपल्या बाबांना मिळालेल काहीतरी बक्षिस आहे हे नक्की ठाऊक झाल होत. त्यांच्या गळ्यातला तो टाय साहेबी वाटायचा वाटायचा. पांढ-या पट्ट्या असलेला काळा डगला का घातला आहे तेच कळायच नाही तेव्हा. पण ती हातात घेतलेली कागदाची गुंडाळी खूप आवडायची. मला समजायला लागल्यावर गोंड्याच्या काळ्या टोपीबद्दल बाबांना विचारल. पण म्हणे त्या वेळी त्या स्ट्युडिओत तशी टोपी नव्हती, म्हणून बिन टोपीचच फोटो काढला. मला मात्र त्या कमतरतेमुळे तश्या टोपीची कायमच आकर्षण लागून राहिल.
तो फोटो आणि ते पदवीच सर्टीफिकेट मग मोठ्या लाकडी फ्रेम मधे बसवून घेतल. कित्येक दिवस, नव्हे वर्ष, काचेच्या मागे अडकवलेला फ्रेम मधला फोटो मोठ्या दिमाखात घरातल्या भिंतीवर झळकत होता. त्या शेजारीच ते इंग्रजी अक्षरातले पदवीचे सर्टीफिकेट ही होते. खरच खूप ग्रेट अचिव्हमेंट होती ती. त्यासाठी हा देखावा उचितच होता.
माझे बाबा कोकणातले.वडिल भटपण करित. मोठे कुटुंब. आर्थिक चणचण नेहमीचीच. घरच्या गरीबीमुळे मॅट्रिक झाल्यावर पुढील शिक्षणाचा विचार करणेही शक्य नव्हते. शहरात येऊन स्वत:च्या आणि आपल्या भावंडांच्या चरितार्थासाठी आधी नोकरी मिळवणे अपरिहार्य होते. सरकारी नोकरीत चिकटल्यानंतर लग्न झाले. माझ्या जन्मा नंतर नोकरीत बढती मिळवण्याच्या उद्देशामुळे पदवीधर होणे गऱजेचे होते. म्हणून नाईट कॉलेज जॉईन केले. दिवसभर ऑफिसच काम. मग उशीरा संध्याकाळी तिथूनच परस्पर कॉलेजला जायच, लेक्चर्स अटेंड करायची. घरी यायला अर्थात रात्र व्हायची. मी तर झोपून गेलेले असायची. आई ही नोकरी करत होती तेव्हा. तिलाही लवकर उठून घरच सर्व काम करून ट्रेनने चर्चगेटला कामावर जायला लागायच. बाबा येऊन जेऊन झोपत असत. दुस-या दिवशी पुन्हा तेच रूटिन. परिक्षेच्या आधी महिनाभर सुट्टी घेऊन अभ्यास करायचा आणि परीक्षाला बसायच. अस करून प्रत्येक वर्षी पास होतच पदवी मिळवली तीही वयाच्या तीशी पस्तीशीत. त्याच पदवीचे ते सर्टीफिकेट. त्या कष्टाची आणि त्याच्या फलिताची आठवण करून देणारे. आणि पुन्हा काही तरी धेय्य, नविन उद्दिष्ट देणारे. उमेद वाढवणारे. मनाला उचल देणारे.
अधून मधून आणि विशेष करून दिवाळीला त्या फ्रेम्स खाली काढून साफसफाई होत असे आणि पुन्हा भिंतीवर त्याच दिमाखात त्या झळकत असत.
बाबांनी पुढे पदव्युत्तर शिक्षण चालू ठेवले.कायद्यांचा अभ्यास करून`लॉ` ची पदवी मिळवली. पण तेव्हा मात्र तसे फोटो काढले नाहीत.
काही वर्षानी घराला जेव्हा रंगरंगोटी केली तेव्हा जुन बरेचस सामान देऊन टाकण्यात आल आणि नविन आणल गेल.घरात नविन गोदरेजच कपाट आणल. ब्लॅक अन व्हाईट टिव्हीला दोन दार असलेल लाकडी कॅबिनेट आणल. सोफ्यासारख्या खूर्च्या आणल्या. त्यावर मऊ उश्या आणल्या. त्याच बरोबर खिडक्यांना रंगित मॅचिंग पडदे, जमिनीवर चमकदार कारपेट वगैरे बरेच बदल केले गेले. घरातील बाहेरच्या खोलीच्या मधोमध टिपॉय, त्यावरचा नक्षी भरलेला टेबल क्लॉथ, त्यावर काचेचा फ्लॉवरपॉट, त्यात अगदी खरे वाटतील अशी फुल ठेवल्यावर तर ते घर कसे मॉडर्न दिसायला लागले.
यावेळी त्या फ्रेम्स म्हणजे काळ्या गाऊन मधल्या त्या फोटोची फ्रेम आणि डिग्री सर्टीफिकेटची फ्रेम अश्या दोन्ही फ्रेम्स तिथे नव्हत्या. कारण आधीच त्या भिंतीवरून उतरवण्यात आल्या होत्या.आईने त्या फ्रेम्स कागदात व्यवस्थित गूंडाळून कपाटावरच्या मोठ्या बॅगेत नीट ठेऊन दिल्या होत्या. बाबांना बरेच दिवस हे लक्षात आले नाही.कारण सामान अजून लागायचे होते. आवरासावरीची काम चालू होती.
रोज दिसणारे नवनविन बदल कमी होऊन बंद झाले. घराची लावणी पूर्ण झाल्यावर बाबांना लक्षात आले की तो फोटो आणि ते सर्टिफिकेट जागेवर दिसत नाही आहे. लगेच विचारणी झाली त्याबद्दल. "त्या फ्रेम्स वरती ठेऊन दिल्या" म्हटल्यावर त्यांच्या रागाचा पारा इतका चढला की काय विचारून नका. कधी अबोला तर कधी धूसफूस. आदळआपट तर अनेकदा.
"तूला ना काही किंमतच नाही माझी" अस आईला ऐकवल गेल.
बाबांची नाराजी, रागाचा उद्रेक पाहूनही आई त्या जुन्या फ्रेम्स पुन्हा भिंतीवर लावायला तयार दिसत नव्हती. नवीन दिसणा-या घरात त्या जुन्या फ्रेम्स शोभत नव्हत्या.
त्या पदवीची, बाबांची, त्यांच्या कष्टांची आणि त्या यशाची तीला किंमत नव्हती असे अजिबात नाही. कारण त्या यशाची ती ही अर्धी भागीदारीण होती. तिनेच सर्व घर एकटीने सांभाळल आणि तिच्या सहाकार्याशिवाय पदवी पदरात पडण अवघड नव्हे तर अशक्यही होत.
पण आता नुसत्या एका पदवीचे कौतुक करण्याचे दिवस राहिले नव्हते. बरेच जण पदवीधर होत होते आणि बाबांनीही पुढिल पदवी मिळवली होती. घराच्या दारावरच्या पाटीवर बाबांच्या नावाखालीच `बी .ए., एल. एल. बी.` ह्या पदव्या अजूनही झळकत होत्या. घरातल्यांना तसेच बाहेरच्यांना घरात यायच्या आधीपासूनच त्याची जाणिव/माहिती दिली जात होती. मनात त्याचा अभिमानही होता. पण तोच आता घराच्या भिंतीवर दर्शवण्याची आवश्यकता नव्हता अस तिच मत होत तेव्हा.
दोघेही आपापल्या बाजून बरोबर!
यात विजयी कोण ठरले हे सांगायल हवं का?
काही दिवसांनी रागारागातच ते सर्टिफिकेट ठेवल गेल कुढल्याश्या फाईलला आणि मोठा फोटो ठेवला गेला कुठल्यातरी छोट्या अल्बमच्या शेवटच्या पानावर,पुठ्ठ्याचा आधी. आणि त्या जुन्या फ्रेम्स काचेसकट गेल्या डबाबाटलीवाल्याकडे.त्याही ते एक पैसा त्याच्याकडून न घेता!
तो फोटो,ते पदवी सर्टिफिकेट यांना भिंतीवरची जागा जरी सोडावी लागली असली तरी आमच्या सर्वांच्या मनात मात्र त्यांनी कायमच घर केलेले आहे.
क्रमशः
प्रतिक्रिया
22 May 2009 - 9:05 pm | रेवती
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
हा भाग मस्त जमलाय.....
मलाही बर्याच लोकांकडे असे फोटो व सर्टीफिकेटस पाहिल्याचे आठवते....
आमच्याकडे एक त्रिकोणी लाकडी ठोकळा होता त्यावर एका बाजूला मराठीत तर दुसर्या बाजूला इंग्लीशमध्ये बाबांचे नाव व पदव्या पेंट केलेल्या होत्या.
रेवती
22 May 2009 - 9:43 pm | धनंजय
आणि फोटो छानच.
वडलांना बी.ए (ऑनर्स्)चा वाटणारा अभिमान (लॉ डिग्रीपेक्षा अधिक!), घराची सजावट आधुनिक झाल्यावर त्या फ्रेमी जुनाट असल्याबद्दल चिघळलेला कौटुंबिक प्रश्न... आठवणी सांगायची तुमची शैली आवडली.
22 May 2009 - 9:44 pm | मनीषा
जे कष्टाने मिळवलेले असते ते खरच अनमोल असते ..
छान लिहिले आहेस ...
22 May 2009 - 9:56 pm | चतुरंग
अगदी बर्याच घरातून आलेला अनुभव. मीनलताई तुम्ही खूपच खुसखुशीत रंगवला आहेत अनुभव. पुढची डिग्री, सॉरी, पुढचा भाग पटापट येऊदेत!
आमच्याकडेही बाबांचा लॉ डिग्री घेतल्यानंतरचा फोटो असाच भिंतीवर अडकवलेला होता. नंतर नंतर बाबा स्वतःच त्या फोटोला हसायचे! ;) पुढे तो काढून पेटीत ठेवला गेला. सध्या कुठे आहे माहीत नाही!
कॉलेजच्या हॉस्टेलवरुन घरी पत्र पाठवताना बाबांचा 'पत्त्यावर डिग्री लिहीत जा' असा आग्रह असायचा. नंतर नंतर मी 'ते फारच औपचारिक वाटतंय' ह्या सबबीने शिताफीने टाळण्यात यशस्वी झालो.
माझे बाबा अजूनही पत्र लिहिताना त्या त्या व्यक्तीची पदवी पत्त्यावर टाकतात. अर्थात हा मोठेपणा वगैरेपेक्षा सवयीचा भाग असावा.
मला साध्या/अनौपचारिक पत्रव्यवहारात नावापुढे पदव्या लिहायला अजिबात आवडत नाही.
(डॉ.) चतुरंग
22 May 2009 - 11:07 pm | रेवती
(डॉ.) चतुरंग
मला तर लग्नाच्यावेळी नवरामुलगा इंजिनिअर असल्याचं सांगितलं होतं.
आता आली का पंचाईत! ;)
रेवती
23 May 2009 - 3:25 pm | टारझन
=))
=)) =))
=)) =)) =)) =))
बाकी .. लेख आवडला .. पु.ले.शु.
डॉ.टारझन
डॉक्टर ऑफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी
22 May 2009 - 9:59 pm | प्राजु
मस्त..! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 May 2009 - 10:40 pm | अनामिक
मस्तं जमलाय लेख.. अगदी ओघवत्या शब्दात अनुभव मांडलाय. पुढचा भाग लवकर येऊ द्या!
-अनामिक
22 May 2009 - 10:58 pm | क्रान्ति
छान लिहिलाय लेख. पुढच्या भागाची प्रतिक्षा आणि उत्सुकता आहे.
अवांतर :- ऑनर्स प्रकाराचं कौतुक माझ्या घरी खूप आहे! इकडे कोणी नामफलकावर ते लिहित नाहीत, कदाचित ती पद्धत नाही त्यामुळे लोक विचारतात, हे ऑनर्स म्हन्जे काय?
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
22 May 2009 - 11:02 pm | मदनबाण
छान लेख... पुढच्या भागाची वाट पाहतो आहे. :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
23 May 2009 - 12:12 am | मस्त कलंदर
जुन्या काळी शिकणारांचीही संख्या कमी होती.. त्यामुळे त्या काळचा नावासमोर पदवी लिहिण्याचा अट्टाहास समजून घेतला जाऊ शकतो.. पण आजच्या जमान्यातही लग्नपत्रिकांवर वर-वधूच्या पदव्या लिहिलेल्या मी वाचल्या आहेत...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
23 May 2009 - 6:01 pm | रेवती
पण आजच्या जमान्यातही लग्नपत्रिकांवर वर-वधूच्या पदव्या लिहिलेल्या मी वाचल्या आहेत...
आमच्या लग्नात बाबांचा आग्रह चालला होता पदव्या छापण्याचा.
मी,"शी.....कायतरीच काय." असं म्हणून तो मोडून काढला.
मग बाबा म्हणाले निदान फोटो तरी छापू....पण अंगावर पाल पडल्यासारखा माझा आविर्भाव बघून तो बेत रद्द केला.
रेवती
23 May 2009 - 12:37 am | चित्रा
फोटो आणि कथन दोन्ही आवडले.
पुढच्या भागाबद्दल उत्सुकता आहे.
24 May 2009 - 12:38 pm | स्वाती दिनेश
फोटो आणि कथन दोन्ही आवडले.
पुढच्या भागाबद्दल उत्सुकता आहे.
चित्रासारखेच म्हणते,
स्वाती
23 May 2009 - 2:53 am | भडकमकर मास्तर
मस्त लेख आहे....
माझे आजोबा त्यांच्या वयाच्या ६६ व्या वर्षी बी ए झाले, ते सर्टिफिकेत त्यांनी फ्रेम केले होते त्याची आठवण झाली...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
23 May 2009 - 7:14 am | सुबक ठेंगणी
कृष्णधवल दिवसांत नेल्याबद्दल धन्यवाद!
एकदा मी आईला एकदा गमतीने विचारलं होतं,"तू काय पाहिलंस गं बाबांच्यात?" तेव्हा तिने उत्तरादाखल बाबांचा एम. टेक झाल्यानंतरचा कृष्णधवल फोटो दाखवला होता मला.
:)
23 May 2009 - 7:26 am | सँडी
:) हे मस्तच!
लेख आवडला.
23 May 2009 - 5:57 pm | रेवती
मी आईला विचारल्यावर ती म्हणाली की त्या काळी नवरा सरकारी नोकरीत असणं म्हणजे फारच ग्रेट गोष्टं समजली जायची.
बाबा इंजिनिअर व सरकारी नोकरी..... म्हणजे भन्नाट काँबिनेशन समजले गेले व तसे स्थळ आल्यावर वधूपक्षाच्या उड्या पडायच्या.
तसेच पोस्टात नोकरी असली की लोक धन्य व्हायचे म्हणे. आईच्या मैत्रिणीसाठी त्यांच्या वडीलांनी पोस्टमनच स्थळ पसंत केलं होतं.
का? तर पोस्टात नोकरी.......मग इतर नातेवाईकांच्या विनंतीवरून ते लग्नं झालं नाही.
रेवती
23 May 2009 - 7:23 am | सहज
फोटो, आठवणी सुरेख.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
23 May 2009 - 8:46 am | विसोबा खेचर
मीनल,
सुंदर लिहिलं आहेस.. अजूनही येऊ द्या प्लीज..
तात्या.
23 May 2009 - 9:17 am | आनंद घारे
मस्त लेख. आता पुढला ग्रॅज्युएट कोण ?
मी तसा जुना असलो तरी आपल्या बाबांच्या मानाने लहान. शिवाय माझ्या बाबांच्यापासून घरात पदवीधरांची रांग लागलेली. त्यामुळे मी स्वतःच्या पदवीदानाच्या समारंभालाच गेलो नाही. पोस्टाने आलेली पदवीची गुंडाळी मात्र अजून जपून ठेवली आहे. ती कोणालाही कधी दाखवण्याची वेळ मात्र कधी आलीच नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
23 May 2009 - 9:50 am | विसोबा खेचर
पोस्टाने आलेली पदवीची गुंडाळी मात्र अजून जपून ठेवली आहे. ती कोणालाही कधी दाखवण्याची वेळ मात्र कधी आलीच नाही.
खरं आहे! आमच्या लेखी देखील पदवीला शून्य किंमत आहे. नायतर बी कॉम प्रथम वर्गात पदवीधर असूनही रंडीबाजारातल्या एका देशी दारूच्या गुत्त्यात कॅशरची नोकरी करायला लागली नसती!
च्यामारी, काय चाटायच्ये ती पदवी?! :)
तात्या.
23 May 2009 - 11:24 am | परिकथेतील राजकुमार
आठवणी आवडल्या.
पुलेशु
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
23 May 2009 - 11:43 am | प्राची
सुरेख झाला आहे आठवणींचा लेख....
पुढचा भाग लवकर टाका...:)
23 May 2009 - 1:18 pm | अवलिया
वा! मस्त लेखन आवडले!!
--अवलिया
23 May 2009 - 4:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!!
-दिलीप बिरुटे
24 May 2009 - 5:51 pm | मीनल
सर्वांना धन्यवाद. :)
दुसरा भाग लवकरच टाकते.
मीनल.