ग्रॅज्युएशन भाग-१
http://www.misalpav.com/node/7889
ग्रॅज्युएशन भाग-२
http://www.misalpav.com/node/7905
ग्रॅज्युएशन भाग-३
फार पूर्वी भारतात मॅट्रिक परिक्षा म्हणजे इयत्ता ११ वी झाली की गंगेत घोड नहायच.अमेरिकेत भारतापेक्षा वेगळ नव्हत.अमेरिकेत हायस्कूल संपल म्हणजे १२ वी पास झाल की गंगेत घोड नहायच. एकदा का १२ वी झाली की त्यालाच ग्रॅज्युएशन म्हणून कोड कौतुक व्हायच. प्रॉम, ग्रॅज्युएशन सेरिमनि, पार्ट्या व्हायच्या. १८ वर्ष पूर्ण झालेला मुलगा घर सोडून दुसरीकडे रहायला जायचा, त्याच स्वतःच असं स्वतंत्र आयुष्य सुरू व्हायच. कुठेतरी नोकरी/ धंदा सुरू करून नंतर विवाह करून अथवा न करता गृह्स्थाश्रम सांभाळला जायचा.
आज १२वी पास केल्याच अमेरिकेतही काहीच महत्त्व नाही. अधिक शिक्षणाच्या अनेक संधी, सोयी, शिष्यवृत्त्या इथे उपलब्ध आहेत. आणि संपूर्ण जगातले अनेक विद्दार्थी अमेरिकेच्या `जाने माने` अश्या शिक्षणासाठी येण्याची धडपड करतात. शक्य असेल तर येतात, शिकतात आणि पदव्या घेतात.तेव्हा ही खरे खुरे म्हणजे भारतीय भाषेत सांगायचे तर पदवी मिळाल्यानंतरच्या ग्रॅज्युएशनचे सेरिमनि होतात.
अस असल तरीही अमेरिकेत अजूनही हायस्कूल ग्रॅज्युएशनचा सोहळा/ COMMENCEMENT CEREMONY मोठ्या थाटात केला जातो.
माझ्या सासूबाई म्हणतात की "आजकाल आपल्याकडे पहिली पदवीच काय, त्यापुढे अजून कितीतरी पदव्या घेतल्या तरी त्याच कुणाला काही कौतुकच नाही.कुणी पाच पेढेही आणून देत नाही. अमेरिकेत लहानातल्या लहान यशाची दखल घेतली जाते ते छान आहे.” त्यांच्या मते यामुळे पुढे शिकायला अधिक उत्साह येतो. आपल्या छोट्याश्या यशाच ही कौतुक केल की मुलांनाही बर वाटत.प्रोत्साहन मिळत. अजून अभ्यास करायला उमेद वाढते.
माझा मुलगा नचिकेत नुकताच ग्रॅज्युएट झाला. म्हणजे तसा पदवीवाला ग्रॅज्युएट नाही तर हायस्कूलवाला ग्रॅज्युएट. म्हणजे १२ वी चा अभ्यासक्रम पूर्ण करून तो पास झाला.
ऑगस्टमधे १२वी सुरू झाल्यावर साधारण ऑक्टोबर पासून कॉलेज आडमिशनच्या अर्जाचे वारे वाहू लागले. अर्ज केवळ ऑनलाईनवरच भरायचे होते. फी ही तशीच भारायची होती. जानेवारी/फेब्रुवारी पर्यंत अर्जाची मुदत दिली गेली होती. ९ ते १२तील सहामहीच्या मार्कांवर अवलंबून, तसेच एस. ए. टी स्कोअर, नोकरीचा अनुभव, समाजसेवा, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टीव्हीटी, स्पोर्ट्स, नागरिकत्व असे आणि अजून अनेक मुद्दे लक्षात घेऊन साधारण एप्रिलपर्यंत निकाल दिला गेला. नचिकेतला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यावर आम्हा सर्वांना आनंद झाला.
आता काय? अभ्यास असला तरी तो चिंतारहित.आपला स्कोर मेंटेन केला की झाल.
मजाच मजा. नुसत बागडायच!
त्याच दिवसात शाळेत COMMENCEMENT CEREMONY ची कुणकुण सूरू झाली होती.पण त्या आधीच प्रॉमची अनाउंसमेंट झाली, गप्पांची सुरवात झाली. आणि त्याची तयारी घरी कधी सुरू झाली ते आम्हालाच कळलच नाही.
प्रॉम म्हणजे शालेय वर्षाच्या शेवटी हायस्कूल ग्रॅज्युएशनचा सोहळ्याचा आधी आयोजित केलेला हायस्कूल किंवा कॉलेज मधल्या मुलामुलींचा फॉर्मल डान्स. प्रॉम हा ग्रॅज्युएशनचा अविभाज्य भाग आहे असं म्हटल तरी चालेल. अर्थात शाळेतून प्रॉमला न जाणारे काही थोडीफार मुल मुली होत्या अस ऐकल. पण ती म्हणजे अगदी दोन चार, हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकी.कारण सर्वच जण समवयस्कर मित्रमैत्रीणींबरोबर पॉश रेस्टोरंट मधे रूचकर पदार्थांचा आस्वाद घेताना हास्यविनोद, गप्पा गोष्टीसाठी, म्युझिकच्या तालात रंगित दिव्यांच्या प्रकाशात नाच करण्यासाठी आणि जवळिक वाढवण्यासाठी उत्सुक असतात. शिक्षकांच्या उपस्थितीत होणा-या या पारंपारिक मौजमजेत तसे `धोकादायक` असे काही वाटत नसल्यामुळे पालकांची ही अनुमती असते.
अश्या प्रकारच्या आम्ही न अनुभवलेल्या प्रॉमला नचिकेतला `जाऊ नकोस` अस जाण्यास सांगण्यासारख आम्हा पालकांना काहीच वाटले नाही. आम्ही ही खर्चाकडे न पाहता तयारीला लागलो.
प्रॉमसाठी फॉर्मल वेअर लागणार होते.म्हणून पांढरा फूल शर्ट, त्यावर वेस्ट कोट (शर्टावरच बिनबाहीचे जॅकेट), त्यावर नव्या फॅशनचा काळा टॅक्सिडो घेतला. त्याला साजेसा नेकटाय घेतला. आता एवढा थाट!मग काळे फॉर्मल शूज ही हवेत. ते ही घेतले. नचिकेतच्या बरोबरीच्या काही मुलांनी हे सर्व भाड्याने घेतले होते. भाड्याची किंमत विकत घेण्यापेक्षा अर्धी होती. आम्ही ते विकत घेतल कारण हा जामानिमा अजून दोनचार वेळा लागणार होता. शिवाय पुढल्या वर्षी कॉलेजमधे ही लागला तर होईल उपयोगी असा विचार केला.
माझे यजमान म्हणाले "हा सुट छान आहे रे. माझा लग्नातला सुट ग्रे होता. आताचे सर्व वेगळ्या वेगळ्या रंगाचे आहेत. पण काळा नव्हता माझ्याकडे. मी घालू कधी तरी?"
“बाबा, It’s a Tuxedo not a Suit.”उत्तर मिळण्यापेक्षा बाबाची अक्कलच निघाली.“ Tuxedo आणि Suit मधला difference असा आहे की Tuxedoच outer jacketच lapel satin or silkच असत. आणि pantच्या बाहेरच्या बाजूला त्याच कापडाची पट्टी असते that runs till end of the bottom. ”
“lapel?” प्रश्न विचारून बाबाने अज्ञानाचा अधिकच उजेड पाडला.
जॅकेट्ची छातीवरची दुमडलेली कॉलरची लांब पट्टी उचलून तो म्हणाला “This is lapel. The folded flaps of cloth on the front of a jacket or coat.” अधिक माहिती कळली सर्वांना.
“अस अस! कुणाच्या बापाने घातला आहे इथे टॅक्सिडो किंवा बिक्सीडो?” बाबाने प्रामाणिकपणे कबूल केले.
असो...
तर प्रॉमच्या दिवशी नचिकेतने ओठावरची आणि गालवरची असली नसलेली बारिक लव (तीला मिशी आणि दाढी हा अगदी राठ शब्द आहे.) घोटून सफाचट केली. दुस-यालाही स्वच्छ वाटेल अशी आंघोळ झाली. केसांना जेल लावून छानसे बसवले. अमेरिकन फॉर्मल कपडे घालून खोलीच्या बाहेर आल्यावर कोण बाप्या माणूस दिसायला लागल ते माझ बाळ. पाणीच आल डोळ्यात!
"ए बाबा, हा Tie लावून दे ना. I messed it up." अस म्हणून त्याने क्षणात सर्वांना हसू आणवल.
मग बाबाने नचिकेतच्या पाठीमागे उभे राहून त्याच्या गळ्यात टाय छानसा अडकवून दिला. तो व्यवस्थित आत खोचला.
मी आतून माझी फेस पावडर आणली.लेडिज फेस पावडर लावून तो घ्यायला तयारच होईना.
"अरे, चेह-याला लावल्यावर काय कळतय की ती पावडर लेडिज होती की जेन्ट्स?" अस म्हणून जबरदस्तीने त्याच्या मानेला, कपाळाला लावून त्याला गोर करण्याचा प्रयत्न केला.
आता नचिकेत खरच हॅडसम दिसत होता. तरीही बाबाने अल्युरिंग सेंट्चा फावारा मारून त्याला सुगंधित करून अधिक आकर्षित केल. तयारी पूर्ण झाल्यासारखी वाटली. काळे बूट चढवून मुलगा प्रॉमला निघाला. पण त्यापूर्वी आमच्या कॅमेरात फोटो घ्यायला आम्ही विसरलो नाही.
प्रॉमला एकट्याने कार घेऊन जाता यावी म्हणून आधीपासून चांगली प्रॅक्टीस करून नचिकेतने ड्रायव्हिंगच परमनंट लायसन्स मिळवलेले होत.
भूरकन कार घेऊन निघालेल्या माझ्या मुलाला पाहून घरट्यातल्या भूरकन उडणा-या पिलाची आठवण झाली. डोळे पाण्याने डबडबले. आता कारच काय समोरच सर्वच दिसेनासे झाले होत.
मी बाथरूममधे जाऊन डोळे पुसले, बेसिनवर तोंड धुतल आणि समोरच्या आरश्यात पाहिल. आजवर कपाळावर अवखळपणे रूळणारी केसांची बट आता चेह-यावरील चुणीदार कुंपणाला पाहून दचकली होती आणि पांढरी फटक पडून मागे हटली होती.
क्रमशः
प्रतिक्रिया
27 May 2009 - 12:26 am | धनंजय
पहिल्या भागात आजोबांचा फोटो, या भागात त्यांच्या नातवाचा.
तीन पिढ्यांतील वेगवेगळे अनुभव.
मजेत वाचतो आहे.
27 May 2009 - 11:27 am | स्वाती दिनेश
तीन पिढ्यांतील वेगवेगळे अनुभव.
मजेत वाचतो आहे.
धनंजय सारखेच म्हणावेसे वाटले,
अनुभव छान लिहिले आहेत,
स्वाती
27 May 2009 - 12:45 am | चतुरंग
प्रॉमबद्दल मला इतकी माहिती नव्हती. सूट आणि ट्क्सीडोही मला नवीनच.
नचिकेत देखणा दिसतो आहे. व्हेरी स्मार्ट बॉय! (त्याच्या कॉलेजातल्या मुलींचं काही खरं नाही! ;) )
तीन पिढ्यांचे अनुभव अतिशय मनोरंजक आहेत.
(खुद के साथ बातां : रंगा, मुलं-मुली ही अशी बघता बघता मोठी होऊन भुर्रकन उडून जाण्यासाठीच असतात का रे?)
चतुरंग
27 May 2009 - 12:46 am | बिपिन कार्यकर्ते
वॉव !!! वॉव !!! वॉव !!!
बिपिन कार्यकर्ते
27 May 2009 - 12:49 am | वजीर
अरे वा मस्त वर्णन...एक महत्वाचा तपशील राहिला... प्रॉमसाठी डेट कोण होती? प्रॉमनाईटचा कदाचित सगळ्यात महत्वाचा भाग... ;)
27 May 2009 - 1:12 am | अनामिक
अगदी हेच विचारणार होतो... डेट कोण होती?
असो, मस्तं उतरलाय हा भागसुद्धा!
मला आजपर्यंत टक्सवर फक्तं बो-टायच वापरतात असं वाटायचं, पण खरा फरक आज कळला!
नचिकेतला ग्रॅडस्कूलसाठी शुभेच्छा!
-अनामिक
27 May 2009 - 5:10 am | रेवती
हा भाग मस्तच!
मुलगा खरच हँडसम दिसतोय.
नचिकेतला शुभेच्छा!
रेवती
27 May 2009 - 9:08 am | मदनबाण
हाही भाग सुरेख झाला आहे !!! :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
27 May 2009 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार
अगदी असेच म्हणतो.
एका वेगळ्या विषयावरची सुंदर लेखमाला.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
27 May 2009 - 10:51 am | कपिल काळे
अरे वा !! तीन भागात तीन पिढ्यांचे ग्रॅज्युएशन !! छान आहेत तिन्ही लेख.
28 May 2009 - 7:49 am | क्रान्ति
मस्तच लिहिलंय मीनल! तीनही भाग अगदी छान जमले आहेत. नचिकेतला हार्दिक शुभेच्छा! :)
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
28 May 2009 - 8:26 am | प्राजु
मस्त!!
लेख खूपच रंजक होतो आहे. लवकर लिहि.
नचिकेत मस्त दिसतो आहे टक्सिडो मध्ये. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/