कैफियत ....

बट्ट्याबोळ's picture
बट्ट्याबोळ in जनातलं, मनातलं
20 May 2009 - 10:58 pm

मगील रंगपंचमीच्या काहीच दिवस आधी विलासअण्णा ने राष्ट्रवादीत स्वीच मारला होता. तेव्हा तो ही फॊर्मात होता आणि साहेबही. मध्यांतरीच्या काळात विलासरावपुरस्क्रुत नवनिर्माणकारांनी राज्यपातळीवर राडा करून स्वत:चा मतहिस्सा रखून ठेवला होता. कार्याध्यक्शांनी देखील शेतक-यांच्या काळजाला हात घालून आपली मुळे ग्रामीण भागात पसरली होती. क्रिकेट आणि क्रुषी हे दोन्ही सांभाळता साहेबांचं राज्यपातळीवर तस दुर्लक्शच झालं. परिणामी लोकसभा निवडणूकीत विलासअण्णाच्या पक्शाने नांगी टाकली.

एव्हना विलासअण्णा च्या राष्ट्रवादी प्रवेशाने गल्ली-कोंग्रेसमधे तयार झालेली पोकळी सच्या कोल्हांडगे याने भरून काढली. तो युवा कोंग्रेस अध्यक्शपण झाला.

मडम आणि पगडी यांच्या विजयाने सच्या आनंदाने वेडापिसा झाला. "रफ़िक" स्पीकर्सची एक भिंतच त्याने आपल्या चौकात उभी केली. त्याचा प्रत्येक कार्यकर्ता मद्यानंदात बेभान होऊन नाचत होता.

कैफ़ियत इथे सुरु झाली:

विलासआण्णच्या गाडीचा ड्रायव्हरचा भाऊ, त्याच्या पतपेढीतले क्लार्क, केशीयर, जीमचे म्यानेजर, चहावाला, जनता वसाहतीतील बोडीबिल्डर्स (राडा करताना आण्णाबरोबर ! ), नवरात्र मंडळाचे संघटक, खजीनदार, कार्यवाहक, क्रिकेट क्लबचे मेंबर्स आणि इतर चिल्ले-पिल्ले त्या शत्रू-भिंतीसमोर घनआनंदात नाचत होती. आण्णा विखीन्न मनाने हा पराभव बघत होता. आघाडीच्या नियमामुळे त्याने कलमाडी-विजयाची खूषी जाहीर केली होती, पण त्याच्या मनाची व्याकूळता तोच जाणो.

आम आदमी आणि आम राजकारण्याने कोंग्रेस चा हात सोडू नये हे त्याला मनोमन पटत होत. राष्ट्रवादीच भवितव्य दिल्लीत, राज्यात आणि अपरिहार्यपणे गल्लीतही अंधारातच होत.

आण्णाच्या खांद्यावर थाप पडली. मागे वळून पहातो तो पिच्या होता. होय, फ़क्त पिच्याच होता. आण्णाच्या मनाची घालमेल तो जाणून होता. जेवणाची वेळ झाली. पिच्या दिवसभर गल्लीत पडीक असल्याने त्याची आई त्याला डबा पाठवते. गल्लीतल्या बाकड्यावर तो आणि आण्णा डबा खात होते. सवयीप्रमाणे पिच्या ने डब्यातली एक चपाती बाजूला फेकली. पहातो तर काय, नेहेमी तिथे बांधून असलेला टोम्या (लेब्राडोर) आज सच्या च्या मोफत वर्तमानपत्र वाचनालयासमोरच्या बाकड्याला बांधलेला होता.

आण्णा च्या डोळ्यातून आणखी एक आश्रू ओघळला. भाजी आणखी खारट झाली !!

विनोदसमाजराजकारणविरंगुळा

प्रतिक्रिया

अनंता's picture

21 May 2009 - 10:37 am | अनंता

बट्ट्याबोळ झाला हेच खरे!

फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!