सैरभैर डायरी - २.२

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in जनातलं, मनातलं
8 Jan 2026 - 12:26 am

२.१

मॅडम, त्या पोरींना घेऊन या. पोरी लंगडत आल्या.. थोड्या जखमा दिसत होत्या..
"हाच होता का तो?"
पोरींनी मान डोलावली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली.
आई, बाप ,नोकरी ते जेलमधला संडास सगळ गरगर फिरायला लागले

२.२

"जा मॅडम पोरींना घेऊन, मेडिकल झाली असाल तर वॉश करून येऊ दे."
मॅडम पोरींना घेऊन गेल्या.
"पोरींना ओळखता का या?" साहेबांचा प्रश्न .
"हो साहेब . काल सकाळचे मॅटर झाले त्यामधल्या वाटत आहेत.अशाच होत्या"

"अशाच की ह्याच ?"

"साहेब झोपेतून उठून आलो होतो त्यामुळे नीट लक्षात नाही.आता पण बघितला नाही बरोबर"

बरं म्हणून साहेबांनी वाजणारा फोन उचलला. दूर जाउन बोलत होते, मी दीर्घ श्वास घेऊन मी खिडकीतून बाहेर नजर टाकली.हातात मोबाईल घेऊन ऑफिसला मेसेज टाकला.
"मोबाईल वापरता का तुम्ही ? भारी आहे,मला पण घ्यायचा आहे.बघू कोणता मॉडेल"
साहेबांनी गोडीत मोबाईल तपासून घेतला. गॅलरी, कॉल्स पाहीले.
आतापर्यंत हाणला नाही किंवा आत टाकला नाही म्हणजे साहेबांकडे पक्का असा काही नाही याची मला खात्री पटली. कालचा मॅटर म्हणजे या पोरींनी बाहेर काहीतरी काशी केली असणार. फक्त आपण अडकायचे नाही. पैसे मिळतील अशा प्रत्येकाला अडकवायचा ही खास पोलिसी पद्धत असते.
साहेब फेकणार, आपण गुंडाळणार की आपण फेकायच आणि साहेबाला गुंडाळायचा ही गेम आता सुरू होणार.
मगाशी बाल्याला बाहेर हाकलल्यावर त्याने कॉइन बॉक्स गाठून लगेच फोनाफोनी केली.. मॅटर झालाय आणि चौकीत बसलोय कळल्यावर बाहेर २०-२२ पोर जमा झाली. अर्थात आत कोणीच आले नाही.

"कुलकर्णी, .मोठा मॉब आणला तुम्ही ,काय विषय?"

"मित्र आहेत साहेब. काळजीपोटी आलेत"

"आणि फोन ? "

मी : म्हणजे ? कळल नाही साहेब..

"आमदारांचा फोन आला होता.आमच्या माणसाला का उचलला?अजून काय झाला तुम्हाला सांगितले नाही, चौकशी नाही तरी एवढी तयारी करून आलात . लैच बाप्पा पोचलेले तुम्ही .काय केलं नक्की ते तरी सांगा?"

"ते हवालदार साहेब घरी आले होते ना.म्हणून एवढी चर्चा झाली .मी काही नाही केले.काल जे झाले ते सांगितले साहेब."

बाल्याने बाहेर बोंबाबोंब केली असावी. त्याशिवाय एवढा लगेच फोन आला नसता.
"तो कॉन्ट्रॅक्टर कोण होता?त्याचा नंबर द्या"
"माहिती नाही साहेब .तो सोबत नसतो.त्याची साईट चालू आहे कॉलनीत"

पुढची १० मिनिटे साहेबांनी उस्मानची कुंडली काढण्यात घालवली आणि बाहेर बसायला सांगितले..

बाकड्यावर बसताच बाल्या कानाशी लागला. "उस्मान आणि त्याच्या पोरांनी काल भंगारवाल्या पोरी उचलून नेल्या आणि गँगरेप केला अशी केस आहे. पोरी मायनर सांगत आहेत त्यात कास्टवाल्या आहेत. अट्रॉसीटी पण घुसणार आणि भेंचो या सगळ्या मॅटरचा ओन्ली आय विटनेस तू आहेस भाई ,जपून पत्ते खेळ
अभी गेम चालू हो गया. "

पहिला म्हणजे आपण आरोपी नाही याचा धीर आला पण प्रकरण आपल्याकडून निस्तरणार नाही याची जाणीव झाली.
आपला पाव्हणा तालुक्याला वकील होता. त्याला फोन लावला. शिस्तीत सगळा कर्म कांड सांगितला.

"बाबाना सांगितला आहे का ?" नको असलेला प्रश्न आलाच..
"अजून नाही, इथे काय होतं ते बघतो , त्यांची तब्येत बरी नाही म्हणून अजून काही बोललो नाही"
"मी येतो तिथे आता तोवर कुठे सही करू नकोस"

माझा अर्धा जीव भांड्यात पडला.
तेवढ्यात एका खाकीने काहीतरी लिहून पेपर आणले होते. साहेबानी सांगितला आहे, स्टेटमेंटवर सही करा.वाचायला द्या म्हणताच त्यांनी फक्त सही कुठे करायची तिथे बोट दाखवला. टिपिकल पोलिसी खाक्या . ( सहीचे पानावर फक्त १-२ वाक्ये आणि सही असते .. मुख्य मजकूर नसतो , तुम्हाला सहीला देताना फक्त तेवढेच पान ओपन करून सही करायला सांगतात , भावी उमेदवारांसाठी महत्वाची नोंदे )
आपला काळा कोट येणार असल्याने मला धीर आला होता.
"थोडा वेळ द्या साहेब, माझा भाऊ येतोय त्याच्याशी बोलून सांगतो"

"तू आतमध्ये जे बोलला तेच आहे यात, खोटा लिहितो का आम्ही ?" खाकी गुरकावली.
"बरोबर आहे साहेब , जोशी वकीलसाहेब येणार आहेत मग करतो सही.मी चहा घेऊन येतो"

"कुठे जाऊ नको, आज ही रेकॉर्ड ला द्यायचा आहे" म्हणत वैतागून हवालदार साहेब गेले.

बाहेर आलो, बाल्याला घेऊ टपरी गाठली.. चहा २ - २ वडापाव हाणले.. टेन्शन गेले की भुकेची जाणीव होते.. बाल्याच्या पोटात पेट्रोल पडताच त्याने फुल स्टोरी सांगितली..

काल दुपारी उस्मानला हाकलले आणि त्यांनी पोरींचे भंगार हिसकावून घेतले आणि आधीचे चोरलेले भंगार कुठे आहे ते विचारले.हे सगळ करायला त्याने पोरींना गावाबाहेरच्या साईटवर नेले म्हणजे धाक दाखवून माल मिळवता येईल.३ पोरींना तिथे नेले आणि एकीला सोडले. तिला सांगितले माल घेऊन ये आणि यांना घेऊन जा.. त्या पोरीने काय चोरलेले.लोखंड वगैरे आणले नाही आणि परत आली नाही मग उस्मान रात्र झाल्यावर त्या साईटला कुलूप लावले आणि आला. दोन पोरी रात्री त्या अर्ध्या बांधलेल्या बिल्डिंग मध्ये होत्या. पहाटे त्यांनी पहिल्या मजल्यावरून वाळूत उडी मारली आणि वस्तीत गेल्या . तिथून त्यांनी स्टेशन गाठले आणि रेप कम्प्लेंट केली.
ये चमडी बहोत हरामी, ऊपर से बिल्डर है , तो पोलिसला सबूत पाहिजे ! इस सबको जोडनेवाली कडी तू है मेरी जान !
बाल्याने हे सगळ एका दमात सांगून टाकले. त्या येडझव्याला यात कय थ्रिल वाटत होता तोच जाणे.फुकट माझ्या डोक्याला शॉट...

"बाल्या, मग उस्मान ने रातभर डिंग डाँग केला का काय ? "
"काय माहिती रे! पण फसला तर तो आहे.खाया पिया की पता नहीं.बिल तो फटेगा"

पोलिस स्टेशनमध्ये येताना पाव्हण्याची गाडी दिसली तर आतमध्ये गेलो. वकील बाबू आणि साहेबांचे हास्य विनोद चालले होते.
"अहो कुलकर्णी, मगाशीच बोलायचे नाही का ? कशाला थांबवले असते इतका वेळ" साहेबांचा अमरीश पुरी वरून आसरानी झाला होता..
" मी घेऊन जातो याला, पुन्हा लागला तर मलाच फोन करा, याचे स्टेटमेंट शेवटी रेकॉर्ड करू. अजून आयडेंटिफीकेशन वगैरे बाकी आहे. भेटू पुन्हा"
असे सांगून वकिलांनी मला बाहेर नेले.
पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.काल सकाळपासून काय झालेची उजळणी. बाल्याने आणलेली माहिती पण सांगितली.
"ठीक आहे, बाहेर कोणाला काही सांगू नको.पुढे बघू आपण आणि घरी सगळे सांग" वकील गेले.

बाल्याला कट्ट्यावर सोडले.घट्ट मिठी मारली.सकाळपासून दोन वडापाववर पोरगा दिवसभर माझ्यासाठी पळत होता. याला फोन त्याला फोन , फाटकी पोरं पण पक्की मैत्री !

घरी आलो.फ्रेश झालो.६ वाजत आले होते. आई बाबा आले.त्यांचा आवरला की सगळ सांगावा असा प्लॅन केला. साडेसहा वाजता दरवाजा वाजला , समोर अमचा क्रिकेटमित्र, मामू (मोहम्मद चा मामू कधी झाला होता आता आठवत नव्हता,एवढा जुना मित्र) आज बरेच दिवसांनी भेटला. आजच याला मॅच खेळायची हुक्की आली काय ?
भाई, २ मिनिट बाहेर भेटतो का?जरा बोलायचा आहे.
आलोच सांगून बाहेर पडलो.मामूच्या सिक्स सीटर मध्ये बसलो , आतमध्ये २- ४ पोर बहुतेक क्रि़केट टीममधली असतील अशी शंका येईतो समोर उस्मान दात विचकत होता.
"मामू गाडी बाहेरवाली साईटला घे, देखते है ,क्या बताया भाईंने पोलिस को "उस्मानने थंड आवाजात सांगितले.

कलाकथालेखअनुभव

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

8 Jan 2026 - 10:52 am | विजुभाऊ

मस्त लिहीताय मुनीवर्य
लिखाणाची स्टाईल आवडली.

वाह.. भारीच. उत्कंठा वाढत चालली आहे.. असल्या लफड्यातून वकिलाने सोडवल्यावर उगाच इकडे तिकडे न जाणेच उत्तम. घरात शिरून गप पडावे.. ;-)

पुभाप्र..

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Jan 2026 - 12:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

अनुभव उपयोगी पडतील. रस्त्यावर कायतरी मॅटरमध्ये पडायचो व्हाईट कॉलर लोकांची विकेट जायची असल्या लफड्यात फुकटची. काही नाहीतरी खिशाला खार लागणार नी डोक्याला टेन्शन.

प्रचेतस's picture

8 Jan 2026 - 7:39 pm | प्रचेतस

डायरीतलं हे पान पण लै भारी.

स्वधर्म's picture

9 Jan 2026 - 1:50 am | स्वधर्म

लिहीत रहा मुनीवर.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

9 Jan 2026 - 4:23 am | हणमंतअण्णा शंकर...

कपिलमुनी,
उत्कंठा वाढत आहे.

पण तुम्ही लिहिताना स्वतःला थोडे सैल केले आहे असे वाटले. म्हणजे, अजून जरासे कष्ट घेऊन जरा गंभीरपणाने (म्हणजे लिहिताना स्वतःला, कंटेट गंभीर नव्हे, आहे तो टोन मस्त आहे)

खूप मस्त लिहिता तुम्ही. आवडले मला.

टर्मीनेटर's picture

10 Jan 2026 - 2:01 pm | टर्मीनेटर

सकाळपासून दोन वडापाववर पोरगा दिवसभर माझ्यासाठी पळत होता. याला फोन त्याला फोन , फाटकी पोरं पण पक्की मैत्री !

क्या बात... क्या बात... ही श्रीमंती सगळ्यांच्या नशिबात नसते!
2.2 पण मस्त 👍 और आनेदो फटाफट...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2026 - 4:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त लिहिलंय. वाचतोय.

-दिलीप बिरुटे

निनाद's picture

12 Jan 2026 - 6:36 am | निनाद

डायरी वाचतो आहे. पुढील भागाची उत्सुकता आहे...

कपिलमुनी's picture

23 Feb 2026 - 11:25 am | कपिलमुनी