मागे वळून बघू नये,
म्हातार्याने चळू नये,
आठवणीत जळू नये,
असं कुठं लिहिलंय?
अवचिता परिमळू नये,
शरदी मेघांनी पळू नये,
अवकाळी झरू नये,
असं कुठं लिहिलंय?
कातरवेळी झुरू नये,
कांचनसंध्यी उमलू नये,
गजरा भाळी माळू नये,
असं कुठं लिहिलंय?
एकांताशी बोलू नये,
भरल्या डोळी डोलू नये,
ओल्या शब्दीं भिजू नये,
असं कुठं लिहिलंय?
उंबऱ्याशी थांबू नये,
गवाक्षी झांकू नये,
प्रेमागंधी गंधू नये,
असं कुठं लिहिलंय?
सावलीं मागे धावू नये,
भूतकाळाशी भांडू नये,
शब्द मागे फिरवू नये ,
असं कुठं लिहिलंय?
हसू ओठी बांधू नये,
आंसू कुणाचे पुसू नये,
सुख दु:ख वाटू नये,
असं कुठं लिहिलंय?
जिवंतपणी मरू नये,
हरवलेलं शोधू नये,
गुंत्यात गुंतुनी राहू नये ,
असेच म्हणेन.
आला सांगावा टाळू नये,
मागे वळून बघू नये.
शिणियर बेतुक्या
प्रतिक्रिया
22 Aug 2025 - 11:10 am | अमरेंद्र बाहुबली
मस्त!
22 Aug 2025 - 12:39 pm | राजेंद्र मेहेंदळे
आवडली
ईतना दौडके क्या करोगे गालिब
ईतनी तो जिंदगी नही जितना तुम मर रहे हो
असे काहीतरी आठवले
22 Aug 2025 - 1:16 pm | कर्नलतपस्वी
उम्र तो खालिस गिनती है,
कोई बंदिश नहीं,
ख्वाब बुनने की कोई हद नहीं।
गिला ही तो है,कोई रंजिश नही||
22 Aug 2025 - 1:27 pm | राघव
हाहाहा..
पण काही ठिकाणी मागे वळून पाहायलाच लागतंय तपस्वी शेठ!! ;-)
22 Aug 2025 - 7:18 pm | Bhakti
मस्तच!
कांचनसंध्या , सुंदर शब्द आहे.
22 Aug 2025 - 7:31 pm | गणेशा
कितीतरी वेळा 'नये' शब्द आला तरी positive मनाची positive कविता
22 Aug 2025 - 7:56 pm | चित्रगुप्त
वा कर्नल सायेब. मस्त रचना केलीत. यावरून हे आठवले:
घायल की गति घायल जाणै, जो कोई घायल होय।
जौहरि की गति जौहर जाणै, की जिन जौहर होय॥
'पेर्णा' वाली कविता 'आचरट' रसातली आहे. तुमच्या कवितेचा रस कोणता म्हणायचा ?
22 Aug 2025 - 8:45 pm | अभ्या..
छान वाटली तरी प्रतिसाद द्यायचाच,
.
असं कुठे लिहिलंय?
;)
22 Aug 2025 - 9:43 pm | कर्नलतपस्वी
भक्ती-कांचनसंध्या कवीवर्य बोरकरांचा शब्द आहे.
मेहेंदळे सो. मुळ शेर काही वेगळाच आहे.
अभ्याशेठ-सृजनशील प्रतिसाद, आवडला.
चित्रगुप्त-पिकल्या पानाचा रस आहे.
22 Aug 2025 - 11:23 pm | सौन्दर्य
खूपच सुंदर कविता .
खास करून -
आला सांगावा टाळू नये,
मागे वळून बघू नये.
23 Aug 2025 - 8:33 am | प्रचेतस
झक्कास.
23 Aug 2025 - 8:16 pm | श्वेता२४
छान आहे. आवडली.
30 Aug 2025 - 11:26 pm | चिखलू
एकदम सुंदर.
ईतना दौडके क्या करोगे गालिब
ईतनी तो जिंदगी नही जितना तुम मर रहे हो
हा प्रतिसाद पण खूप आवडला