कल्पकतेची ऐशीतैशी
===========
सहसा कोणतीही नवजात कंपनी काही कल्पक उत्पादनाचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करते. उत्पादन बाजार पेठेकडून स्वीकारले गेले तर कंपनी व्यवसाय चालू ठेवते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काही भारतीय नवजात कंपन्यांवर अकलेचे तारे तोडले आहेत, ते अतिशय संतापजनक आहेत. त्याला संबंधितांकडून प्रतिसाद मिळत आहेच, पण या सर्वाच्या मुळाच्या असलेल्या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करायची गरज निर्माण झाली.
आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्या राजकीय नेत्यांची कमी नाही.
आपले खरे दुखणे कशात आहे, याचा जर थंड डोक्याने शोध घ्यायचा प्रयत्न केला तर जे सत्य गवसते त्यामुळे रक्त उकळायला लागते.
काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. तेव्हा मी फोटोग्राफी करत असे. माझ्या फोटोग्राफीची नजर विकसित होण्यासाठी मी जगभर फोटोग्राफीमध्ये काय चालते याचा अभ्यास करत असे.
तर सांगत काय होतो, की मी माझ्या आजीला तिच्या शेवटच्या दिवसात भेटायला नाशिकला गेलो होतो. माझ्या आजीचा मुक्काम माझ्या मावशीकडे होता. जाताना मी माझा कॅमेरा बरोबर नेला होता. आजीला नमस्कार करून निघताना फोटो काढण्यासाठी कॅमेरा बाहेर काढला, तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की "आजारी माणसांचे फोटो काढत नसतात!"
या दोन मावशांनी आयुष्यात कॅमेरा हातात धरणं सोडा पण आयुष्यात कसलाही पराक्रम केलेला नाही, पण फोटो कशाचे काढावेत आणि नाहीत याबद्दल मात्र त्यांची ठाम मते होती. आणि मी त्यांचे ऐकले पाहिजे हा त्यांचा चमत्कारिक आग्रह मात्र अनाकलनीय होता.
भारतात कल्पकता रूजणं शक्य नाही याची कारणे वरील (प्रातिनिधिक) प्रसंगात द्डलेली आहेत. समाजातले अडाणी आणि निर्बुद्ध लोक (विशेषत: संस्कृतीरक्षक) जेव्हा कला, सर्जनशीलता यांची व्याख्या करायला लागतात तेव्हा त्या समाजात कल्पकता कधीच विकसित नाही.
आज ए०आय० अवतरल्यानंतर ट्रंप,पुतीन आणि पोप यासारख्या सारख्या जागतिक नेत्यांची यथेच्छ टिंगलटवाळी ए०आय० ने तयार केलेल्या चित्राद्वारे चालू आहे. पण यामुळे एकही जण कोर्टकचेर्यांची वारी करताना दिसत नाही. पण फक्त भारतात विडंबन हा गुन्हा ठरू शकतो. कुठेतरी असे वाचले आहे की ख्रिश्चन धर्म सर्वात टिंगलटवाळी झालेला धर्म आहे.
कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही.
मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?
प्रतिक्रिया
9 Apr 2025 - 9:53 am | श्रीगुरुजी
मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणी अखेरच्या घटका मोजत असताना
कोणीही
फोटो काढत असेल तर मी विरोधच करेन. असा फोटो काढणे म्हणजे कल्पकता, सर्जनशीलता इ. समजूत असणाऱ्यांना _/\_.कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही.
सिंगापूर, चीन वगैरे देश भरपूर विकसित आहेत.
बाकी नेहमीच्याच दुगाण्या झाडणे सुरू राहू दे.
9 Apr 2025 - 10:41 am | युयुत्सु
<असा फोटो काढणे म्हणजे कल्पकता, सर्जनशीलता इ. समजूत असणाऱ्यांना _/\_.>
कॅमेरा (कल्पकता, सर्जनशीलताच्या पलिकडे) एक डॉक्युमेंटेशनचे साधन आहे, हे आपल्याला माहित नाही, याचे आश्चर्य वाटले नाही.
9 Apr 2025 - 11:17 am | श्रीगुरुजी
केविन कार्टरचे डॉक्युमेंटेशन जगाने पाहिलंय..
9 Apr 2025 - 11:22 am | प्रसाद गोडबोले
9 Apr 2025 - 11:59 am | युयुत्सु
<कोणी अखेरच्या घटका मोजत असताना कोणीही फोटो काढत असेल तर मी विरोधच करेन.>
रंगभूमीवर मृत्यु दाखवला म्हणून भवभूतीला वाळीत टाकणा-यांचे तुम्ही नक्की वंशज असणार याची खात्री आहे.
9 Apr 2025 - 1:25 pm | श्रीगुरुजी
रंगभूमीवर दिसते ते सत्य नसून अभिनय आहे हे अभिनेत्यांना तसेच प्रेक्षकांनाही माहित असते. आपल्याला माहिती नाही की कांगावा करताय?
9 Apr 2025 - 10:03 am | श्रीगुरुजी
या निमित्ताने अत्यंत कल्पक प्रकाशचित्रकार केविन कार्टरचे स्मरण झाले.
आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्या राजकीय नेत्यांची कमी नाही.
तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की . . .
बथ्थड डोक्याच्या अश्याच काही ढुढ्ढाचार्यांमुळे अत्यंत कल्पक प्रकाशचित्रकार असलेल्या केविन कार्टरला आत्महत्या करावी लागली होती.
9 Apr 2025 - 10:36 am | आंद्रे वडापाव
अज्ञानात सुखं असताना .. इथल्या भक्तांना, "ज्ञान" नकोय ...
9 Apr 2025 - 11:13 am | प्रसाद गोडबोले
अज्ञानात च सुख आहे, भक्ती हेच परम सुख आहे ! भक्तांना ज्ञान नकोच असते.
एकदम सत्य आहे , पण हे सांगायला कोणा विदेशी तत्त्वज्ञ माणसाचा क्वॉट शोधायची गरज नाही.
आपल्या तुकोबांनीच म्हणून ठेवले आहे
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव , मी भक्त तू देव अशी करी ॥१॥
समाधीचें सुख सांडा ओवाळून । ऐसें हें कीर्तन ब्रम्हरस ॥१॥
ज्ञान हे साधन आहे, साध्य हे भक्तीच आहे .
राम
9 Apr 2025 - 10:46 am | युयुत्सु
Creativity is a crime in India.
https://www.msn.com/en-in/news/opinion/creativity-is-a-crime-in-india-le...
9 Apr 2025 - 11:04 am | प्रसाद गोडबोले
काळजी नसावी.
2029 पर्यंत मिसळपाव वर "असे" लेख लिहिण्याच्या तुमच्या कल्पकतेला पुरेसा वाव आहे .
अवांतर : आज एक नवीन म्हण सुचली : म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण फोटोग्राफर सोकावतो
=))))
9 Apr 2025 - 11:15 am | सुबोध खरे
सर्वच लोक सर्वज्ञ असतात असे नव्हे.
पण भारतरत्न लता मंगेशकर यांचा शेवटच्या दिवसांतील गलितगात्र व्हिडीओ प्रसारित झाल्यावर अनेक लोकांनाही त्यावर आक्षेप घेतला होता.
श्रीमती लता मंगेशकर यांना असे "गलितगात्र" पाहून लोकांच्या मनात असलेल्या त्यांच्या प्रसन्न हसत्या प्रतिमेस धक्का पोहोचला होता.
आपल्या घरातील स्त्रिया सुद्धा घरच्या कपड्यात फोटो काढण्यास नकार का देतात? तर आपली अशी प्रतिमा निर्माण होऊ नये म्हणून.
याला तुम्ही त्यांचे डोके बत्थड आहे असे म्हणाल का?
आपल्या दृष्टीने सर्व जग हे वस्तुनिष्ठ असायला पाहिजे. म्हणू लग्नाला जाताना तुम्ही घरच्या कपड्यात जाल का? (तुम्ही एखादे वेळेस जाल हि) पण आपल्या मातोश्री किंवा घरातील इतर स्त्रिया जातील का?
आपली समाजातील एक प्रतिमा असते त्याला धक्का लागलेला सामान्यपणे कोणालाही पटत नाही.
याच कारणासाठी आपल्या मावशानी ज्यांनी आपल्यावर आत्यंतिक प्रेम केले असेल त्यांना आपल्या आजीचा फोटो काढण्यास नकार दिला त्याबद्दल दोष देताय? आपल्या आईचा असा गलितगात्र फोटो लोकंना दाखवावा असे त्यांना वाटत नसेल तर त्यात त्यांची काय चूक आहे?
आपण आपल्याच मावश्याना बत्थड ठरवून सार्वजनिक न्यासावर त्यांना दूषणे सुद्धा देता?
इतकी हृदयशून्यता पाहायला मिळणे हे विरळाच
9 Apr 2025 - 11:25 am | श्रीगुरुजी
बऱ्याच वर्षांपूर्वी इंडिया टुडेने वर्षातील सर्वोत्तम प्रकाशचित्र असा एका प्रकाशचित्राचा गौरव केला होता.
दिल्लीतील एका तरूण मुलीने गळफास लावून आत्महत्या केली होती. तेव्हा खोलीच्या काचेच्या खिडकीतून रडत रडत आत बघणारा तिचा भाछ व तिचा पंख्याला लटकलेला मृतदेह त्या प्रकाशचित्रात होते. मला ती प्रकाशचित्रकाराची व्यावसायिक विकृती वाटली होती. त्या कुटुंबाच्या खाजगीपणाचाही त्याने भंग केला होता.
केविन कार्टर काय, हा प्रकाशचित्रकार काय किंवा अखेरच्या घटका मोजणाऱ्याचे प्रकाशचित्र काढणाऱ्याचा हट्ट धरणारा काय . . . प्रेताच्या टाळूवरील लोणी ओरपणे म्हणजेच कल्पकता. विरोध केला तर तुम्ही बथ्थड. केविन कार्टरला जनाची नसली तरी मनाची तरी शिल्लक होती.
9 Apr 2025 - 11:31 am | प्रसाद गोडबोले
अहो ते त्यांच्या सोयीने कल्पकता , कला वगैरेची व्याख्या अन् परिमाणे बदलत असतात.
मागे मी इथे मिसळपावर वर फ्रान्सिको डे गोया ह्याचे Saturn devouring his son नावाचे अत्यंत प्रसिद्ध चित्र मिपावर टाकले होते ते मिसळपाव संपादकांनी काहीही कारण न दाखवता संपादित केले होते.
आता मात्र हा अभिजात कल्पकतेचा धागा प्रशासन संपादित करणार नाही ह्याची खात्री आहे.
9 Apr 2025 - 11:49 am | युयुत्सु
< कल्पकता , कला वगैरेची व्याख्या अन् परिमाणे बदलत असतात.>
कला प्रवाही असल्यामुळे व्याख्या आणि परिमाणे बदलतच राहणार. प्रस्थापित निकषांना ओलांडायचे, धक्के देणे, विचार करायला लावणे हे नवनिर्मितीमध्ये अभिप्रेत असते.
The Rape of Proserpina हे बर्निनीचे शिल्प मग फोडून का टाकले जात नाही?
9 Apr 2025 - 1:13 pm | प्रसाद गोडबोले
ह्या शिल्पात रापे चे जसेच्या तसे चित्रीकरण केलेले आहे का ?
तुम्हाला कळत नाही की तुम्ही कळून न कळल्यासारखं करता ?
तुम्ही तुमच्या मरणासन्न आजीचा फोटो काढण्या ऐवजी तिच्या आजुबाजूचा , औषधांचा, वापरातून गेलेल्या काठीचा, जपमाळेचा , किंवा आजीने जपून ठेवलेल्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणीचा असा काहीसा फोटो काढला असता तर मी पैज लाऊन सांगतो की तुम्हाला तुमच्या कोणत्या मावशीने अडवले नसते.
पण सोडा. तुम्हाला नाही पटणार.
तुमचा हा लेख लिहिण्याचा उद्देश देखील कलात्मकता वगैरे वर काही लिहावे हा नसून काहीतरी निमित्त काढून मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू धर्माविषयी गरळ ओकने हा आहे हे काय न कळायला मिपाकर दुधखुळे आहेत का ?
आणि फक्त तुम्ही एकटे नाही आहात, इथे अनेक आयडी आहे जे कोणत्याही विषयात ओढून ताणून हिंदुद्वेष आणतात , ही वस्तुस्थिती आहे.
असो.
तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे.
9 Apr 2025 - 1:22 pm | श्रीगुरुजी
तुमचा हा लेख लिहिण्याचा उद्देश देखील कलात्मकता वगैरे वर काही लिहावे हा नसून काहीतरी निमित्त काढून मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू धर्माविषयी गरळ ओकने हा आहे हे काय न कळायला मिपाकर दुधखुळे आहेत का ?
अगदी बरोबर. कल्पकता हे फक्त अवगुंठन आहे, मूळ उद्देश मोदी, भाजप, हिंदू इ. विषयी गरळ ओकणे हाच आहे.
9 Apr 2025 - 2:20 pm | युयुत्सु
श्री० प्रसाद गोडबोले,
माझ्या मावशांनी जी चूक केली तीच तुम्ही परत करत आहात - कलाकाराने काय कलाकृती निर्माण करायची हे त्याच्या ऊर्मीवर ठरतं. ते
समाजाने नाही. एका वॅसिली शुल्झेन्को नावाच्या रशियन पेंटरचे आणखी एक चित्र उदा० म्हणून देत आहे. त्याची विक्रीची किंमत २००००-३०००० डॉलर इतकी आहे.
9 Apr 2025 - 2:39 pm | श्रीगुरुजी
कलाकाराने काय कलाकृती निर्माण करायची हे त्याच्या ऊर्मीवर ठरतं. ते समाजाने नाही.
अर्धसत्य. एखाद्या अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे प्रकाशचित्र/चित्र त्या व्यक्तीच्या अनुमतीविना निर्माण करणे अयोग्य आहे. एखादी युवती स्नान करीत असताना तिचे प्रकाशचित्र टिपणे व कलाकाराची उर्मी, इतरांनी यात पडू नये असे सांगून त्याचे समर्थन करणे हे निव्वळ चूक नाही तर गुन्हा सुद्धा आहे. कलाकार असो वा अजून कोणी सोम्या गोम्या . . . समाजबंधने, वैधानिक बंधने पाळणे बंधनकारक आहे.
9 Apr 2025 - 4:06 pm | प्रसाद गोडबोले
तुमच्या कल्पकतेची , कलाकृतीची "ही उर्मी " , "हे प्रेशर" पाहून तुमच्या मावशींनी तुम्हाला मरणासन्न आज्जीच्या फोटोसेशन करण्यापासून का रोखले हे मला सुस्पष्ट कळले आहे.
खरेच तुमच्या ह्या असल्या कल्पकतेची ऐशीतैशी =))))
बाकी, तुमच्या दोन्हीही बथथड डोक्याच्या मावशीना माझा नमस्कार कळवा .
माझी सहानुभूती आहे त्यांच्याप्रत _/\_
9 Apr 2025 - 4:22 pm | युयुत्सु
गोडबोले आणि गुरुजी आणि इतर सोवळ्या मानसिकतेच्या
वर्ल्डप्रेस फोटो या मानाच्या जागतिक स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवलेला फोटो-
https://www.worldpressphoto.org/collection/photo-contest/2013/s%C3%B8ren...
9 Apr 2025 - 4:50 pm | श्रीगुरुजी
तुमच्या कल्पकतेची , कलाकृतीची "ही उर्मी " , "हे प्रेशर" पाहून तुमच्या मावशींनी तुम्हाला मरणासन्न आज्जीच्या फोटोसेशन करण्यापासून का रोखले हे मला सुस्पष्ट कळले आहे.
परफेक्ट
9 Apr 2025 - 2:37 pm | युयुत्सु
<तुमचा हा लेख लिहिण्याचा उद्देश देखील कलात्मकता वगैरे वर काही लिहावे हा नसून काहीतरी निमित्त काढून मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू धर्माविषयी गरळ ओकने हा आहे हे काय न कळायला मिपाकर दुधखुळे आहेत का ?
आणि फक्त तुम्ही एकटे नाही आहात, इथे अनेक आयडी आहे जे कोणत्याही विषयात ओढून ताणून हिंदुद्वेष आणतात , ही वस्तुस्थिती आहे.>
मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू हे तीन ही शब्द माझ्या मूळ लेखात मी कुठेही वापरले नाहीत. पण कल्पकतेवर चर्चा करायची सोडून मला गरज नसताना नको ते शहाण्पण तुम्ही शिकवत आहात. बरं फोटोग्राफीतले कुणी जाणकार असता तर गोष्ट निराळी होती.
9 Apr 2025 - 2:43 pm | श्रीगुरुजी
मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू हे तीन ही शब्द माझ्या मूळ लेखात मी कुठेही वापरले नाहीत. पण कल्पकतेवर चर्चा करायची सोडून मला गरज नसताना नको ते शहाण्पण तुम्ही शिकवत आहात.
संस्कृतीरक्षक, गाईचे शेण हे शब्द आपणच आपल्या लेखात आणले आहेत. कल्पकता हा विषय असता तर त्या विषयाला चिकटून लिहिले असते. पण मुळात या लेखाचा कल्पकता हा विषयच नाही. केवळ भाजप, सनातन हिंदू इ. विषयी गरळ ओकणे हा आणि केवळ हाच लेखाचा विषय आहे.
9 Apr 2025 - 4:15 pm | प्रसाद गोडबोले
तुम्ही स्वतः तरी तुमचे लेखन वाचता का हो ?
पीयूष गोयल ह्यांच्या भाषणाचा उल्लेख तुम्ही केलेला आहे तुमच्या लेखात. जो की संपूर्ण पणे गंडलेला आहे. पीयूष गोयल बोलले ते 100% वस्तुस्थिती आहे.
त्यावर स्वतंत्रपणे बोलता आले असते पण लेखात पुढे संस्कृती रक्षक , गाय गोबर शेण वगैरे मुद्दे घालून तुम्हीच तुमचा बुरखा फाडला आहे. तुमचा मूळ उद्देश पीयूष गोयल बोलले ते कसे चुकीचे आहे हे दाखवून देणे हा नसून इन जनरल भाजप, अन् हिंदुत्ववादी कसे चुकीचे आहेत हे दाखवून देणे हाच आहे.
सोडा आता, उगाच सारवासारव करू नका.
बुंद से गयी वो हौद से नहीं आती.
9 Apr 2025 - 4:55 pm | श्रीगुरुजी
स्वत:हून शेण घेऊन आले, मग सारवासारव करणारच.
मारे मोठा आव आणला होता कल्पकतेचा. पण उर्मी होती हिंदू, भाजप इ. ला शिव्या द्यायची आणि एक त्या प्रेशरखाली एक बनावट कथा रचून आपला कार्यभाग साधला. पण तो न समजायला सगळेच मिपाकर काही वडापाव खाणारे बथ्थड शेणिक नसतात.
9 Apr 2025 - 4:59 pm | युयुत्सु
गुरूजी
एकाही विद्वानाने देशात कल्पकता वाढावी या करता काय करावे यावर न बोलता माझ्याशी वाद घातला यात सगळं आलं. निदान जपजाप्याने कल्पकता वाढते का यावर गोडबोल्यांनी काही प्रकाश टाकावा ही अपेक्षा होती. ती पण निष्फळ ठरली.
9 Apr 2025 - 5:05 pm | श्रीगुरुजी
प्रारंभ तुम्हीच केलात आणि तुम्हाला तुमच्याच शब्दात उत्तर मिळाले.
कल्पकता हा तुमचा हेतू नव्हताच. असता तर इतर पूर्ण अनावश्यक मुद्दे आणलेच नसते.
चित्रगुप्त व अनेक कलाप्रेमी येथे कला या विषयावर लिहितात व त्यांचे मिपावर कौतुकच करतात कारण त्यांचा हेतू कला, कलाप्रेम,.कलाविष्कार हाच असतो व त्याचे प्रकटीकरण करताना ते हळूच आपल्या मनातील अनावश्यक असंबद्ध मुद्दे पुढे रेटत नाहीत.
9 Apr 2025 - 1:22 pm | वामन देशमुख
अच्च झालं हो युयु बाला. काइ ओत नाइ माऊ, आपन नं त्या केंद्लिय मंत्ली पीयूचं घल उनात बांदू.
---
अनेक जाणकार मिपाखरं या वाळवीजन्य धाग्यावर खूपच गांभीर्याने प्रतिसाद देत आहेत म्हणून...
9 Apr 2025 - 1:25 pm | वामन देशमुख
बाकी, मिपावर शेणात वळवळणारे गोबरवादी दोन किडे सर्वज्ञात आहेत त्यात अजून एकाची भर हेच मागच्या दोन-तीन कल्पक धाग्यांचे फलित
- गिलिश कुबेल
9 Apr 2025 - 1:28 pm | श्रीगुरुजी
दोन तीन नाही, सहा सात आहेत. त्यातील एक तर आपले गलिच्छ किळसवाणे प्रतिसाद वेगवेगळ्या ठिकाणीपुन्हा पुन्हा टाकतात. परंतु सूज्ञ मिपाकर कणभरही लक्ष देत नाहीत.
9 Apr 2025 - 2:38 pm | अमर विश्वास
<<<<<मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?>>>>>>
बरोब्बर
मिपा वर असले दुर्गंधीयुक्त धागे टाकणाऱ्यांची मानसिकता ... यावर जे संशोधन व्हावे अध्यक्षमहोदय
9 Apr 2025 - 4:54 pm | युयुत्सु
आणि हा माझ्या आजीचा (मावशांना झुगारून त्यांच्या नकळत काढलेला) फोटो. गडबडीत लाढला असल्याने त्याला कलामूल्यनाही, पण डॉक्युमेंटेशन असल्याने भावनिक मूल्य नक्कीच आहे. यात "आक्षेप घेण्यासारखे काय होते" हे मला कोणीही आजतागायत सांगू शकलेले नाही.
9 Apr 2025 - 5:00 pm | श्रीगुरुजी
तुमच्या बथ्थड डोक्याच्या संस्कृतीरक्षक मावशींना दाखवा. यातील कल्पकता, डॉक्युमेंटेशन इ. सुद्धा समजावून सांगा.
9 Apr 2025 - 5:04 pm | युयुत्सु
गुरु़जी,
तुम्ही इतका वेळ मुक्ताफळ उधळ्त होता, तेव्हा तुमची पण जबाबदारी तितकीच आहे! चीन आणि सिंगापुरच्या नकाशाकडे बघत राहून कल्पकता विकसित होत असेल तर तसंही सांगा.
9 Apr 2025 - 5:07 pm | श्रीगुरुजी
धागानिर्माता मी नाही, आपण आहात आणि धाग्याच्या गाभ्यातच कलेच्या अवगुंठनाखाली भरपूर मुक्ताफळे उधळली आहेत व प्रतिसादातूनही उधळत आहात.
9 Apr 2025 - 6:20 pm | प्रसाद गोडबोले
ह्यात काहीही आक्षेप घेण्यासारखे नाहीये हो. आक्षेप तुमच्या शब्दांच्या निवडीवर आहे.
माणूस जन्माला आला आहे तर म्हातारा होणार त्यात काय विशेष !
तुम्ही त्याला उगाचच कल्पकता, कलात्मकता , पीयूष गोयल, संस्कृती रक्षक आणि शेण वगैरे मध्ये मिसळून मिसळ करू नका.
बाकी वर कुठेतरी तुम्ही जपजाप्य वगैरे परत काहीतरी व्यक्तिगत अवांतर टिप्पणी केली आहे म्हणून सांगतो, माझ्या अत्यंत जवळची एक व्यक्ती मरणासन्न अवस्थेत आहे , मी त्यांना भेटायला गेल्यावर मात्र त्यांचा चेहरा उजळून निघतो, मनस्वी हास्य येते. तेव्हा मी त्यांचे फोटो काढतो अन् त्यांना दाखवतो, नातवंडांच्या सोबत त्यांचे फोटो काढतो अन् तेही दाखवतो. माझ्या बालपणीच्या, नातवंडांच्या बालपणीच्या गप्पा मारतो.
इतकेच नव्हे तर आजुबाजूच्या इतरही जर्जर वृद्धांसोबत बोलतो गप्पा मारतो. उगाच त्याला कलात्मकता अन् डॉक्युमेंटशन वगैरे लेबल लावत बसत नाही.
आणि त्यांच्या सहवासात असताना नुसतं राम ह्या शब्दात किती आनंद आहे ह्याची प्रचिती मलाही येते अन् त्यांनाही येते. It's all perfect . It's all Ram. He is beautiful.
पण तुम्हाला ते कळणार नाही.
बालपणापासून लाडावून ठेवलेले पूर्वग्रह अन् अभिनिवेश हे गळून पडायला वार्धक्यासारखा दुसरा मित्र नाही.
9 Apr 2025 - 6:30 pm | श्रीगुरुजी
माणूस जन्माला आला आहे तर म्हातारा होणार त्यात काय विशेष ! तुम्ही त्याला उगाचच कल्पकता, कलात्मकता , पीयूष गोयल, संस्कृती रक्षक आणि शेण वगैरे मध्ये मिसळून मिसळ करू नका.
यांनी आपल्या "याचा बंदोबस्त कोण करणार" या चीनच्या नकाशाच्या धाग्यातही संपूर्ण अनावश्यक असलेले शेण, गोमूत्र इ. आणून आपला मूळ हेतू प्रकट केला होता. एकंदरीत यांना शेण, गोमूत्र इ. ची अतोनात आवड दिसते. काहीतरी विषय पकडायचा आणि त्यात पूर्णपणे अनावश्यक, असंबंधित असे शेण, गोमूत्र, हिंदू संस्कृती, भाजप इ. मुद्दे घुसडून शेणाने तोंड माखून घ्यायचे हे यांचे व्यवच्छेदक लक्षण असावे.
9 Apr 2025 - 9:01 pm | चित्रगुप्त
माझ्यासारख्या तिर्हाइताला आजीचा फोटो चांगला वाटत असला, तरी मावश्यांवर जे काही संस्कार झालेले असतील, आणि त्यातून ज्या काही समजुती त्यांच्या मनात घर करून असतील, त्याबद्दल आपण काय बोलणार ?
मी जेंव्हाही एकाद्या अंत्ययात्रेला जातो, तेंव्हा जळणार्या चितेचे, शोकमग्न लोकांचे, त्या परिसराचे उत्तम फोटो काढले जाऊ शकतात हे जाणवते, पण ते मृत व्यक्तीच्या परिवारातील लोकांना अशिष्टपणाचे वाटेल, या विचाराने ते मी टाळत आलेलो आहे.
बाकी कलात्मकता वगैरे विषय वेगळा आहे. कलात्मकता ही फार जटिल, काहीशी गूढ आणि सातत्याने बदलत रहाणारी संकल्पना असल्याने तिची काटेकोर व्याख्या कुणालाच करता येणार नाही, कुणाला कशात ती जाणवेल, तर कुणाला आणखी कश्यात.
असो.
रच्याकने, आजच सकाळी "याद न जाये, बीते दिनों की' हे 'दिल एक मंदिर' मधले गाणे ऐकत असताना काही जुन्या आठवणी जागृत होऊन मी अतिशय भावविव्हल झालो होतो. तेवढ्यात सुचले की आपण आपला या अवस्थेतला फोटो काढावा. मग मोबाईल जुळवून सेल्फी काढायला घेतली, पण त्या प्रयत्नात ती भावविव्हलता ओसरून गेलेली होती. ('फोटो काढावा असे सुचणे' यातच ती संपली, असे म्हणता येईल)
असे क्षण टिपणे - तेही स्वतःबद्दलचे, हे फारच अवघड काम असल्याचे जाणवले.
याद ना जाये, बीते दिनों की.... रफी/शैलेन्द्र/ शंकर जयकिशनः
https://youtu.be/CYodWERGaro?si=UZtFXtzjUVeCXjp1
9 Apr 2025 - 9:20 pm | चित्रगुप्त
एकाद्या कलावंताची 'कलात्मक ऊर्मी' केंव्हा,कश्याने जागृत होईल, हे सांगता येत नाही. हल्ली मोबाईलमुळे समोरचे दृश्य तात्काळ टिपून घेणे शक्य झालेले असले, तरी विविध कारणांमुळे ते जमेलच, असे नाही. माझा आजचा अनुभव आणि युयुत्सु यांनी वर्णिलेला प्रसंग, ही दोन्ही याचीच उदाहरणे आहेत.
बाकी,
-- हे इथे लिहीण्याची खरेतर काहीच गरज नव्हती.
-- एकाद्या घटनेकडे निर्लिप्त- त्रयस्थतेने बघून ती शब्दात/चित्रात्/फोटोत मांडणे, ही कलावंताची भूमिका असावी.
9 Apr 2025 - 10:26 pm | श्रीगुरुजी
सोनारानेच कान टोचले हे उत्तम झाले.
10 Apr 2025 - 7:48 am | युयुत्सु
हे इथे लिहीण्याची खरेतर काहीच गरज नव्हती.
"पोपट मेला आहे" हे सांगायला बंदी आहे का?
9 Apr 2025 - 9:44 pm | माहितगार
"पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात वैयक्तिक सीमारेषा या लेखात कंसेंट पर्सनल बाऊण्ड्री" इत्यादीचे महत्व वर्णन केले आहे. हा लेख आणि आज्जीची आणि मावशांची कंसेंट नसलेल्या आज्जीचा फोटोचा आग्रह या परस्पर विरोधी दृष्टीकोणांना युयुत्सु कसे reconciliate करु इछितात ते जाणून घेणे आवडेल.
10 Apr 2025 - 7:47 am | युयुत्सु
आज्जीची आणि मावशांची कंसेंट नसलेल्या
श्री० माहितगार,
आजीची परवानगी नव्हती असे मी कुठे लिहीले आहे? आ़जीला अल्झायमर झाला होता, त्यामुळे ती स्वतःला व्यक्त करू शकत नव्हती. ती चांगली होती तेव्हा ती आम्हाला भरपुर फोटो काढू द्यायची. ती माझी आणि आजीची शेवटची भेट ठरली. मी जास्त लिहीत नाही...
10 Apr 2025 - 8:45 am | माहितगार
".. आ़जीला अल्झायमर झाला होता, त्यामुळे ती स्वतःला व्यक्त करू शकत नव्हती. .."
अशा स्थितीत तिच्या बद्दलच्या निर्णयांचा पहिला अधिकार तिच्या मुला मुलींना की नातवंडांना ?
10 Apr 2025 - 8:57 am | युयुत्सु
तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे असूनही मी देणार नाही, कारण ते अनेकांसाठी गैरसोईचे असेल. शिवाय घरातील अनेक गोष्टी चव्हाट्यावर येतील, जे मलाही नको आहे.
आजी--आजोबा मुलांपेक्षा नातवंडांवर जास्त प्रेम करतात, तेव्हा नातवंडाच्या आणि त्यांच्या नात्याचा आदर ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. सदर फोटोमुळे कुणाचीही गैरसोय होणार नव्हती (जे फोटोमुळे पुरेसे सिद्ध झाले आहे), ते कृपया निरर्थक मुद्दे काढू नयेत, ही विनंती...
10 Apr 2025 - 9:14 am | माहितगार
कायेना युयुत्सु, तुमचा कसा फोटोग्राफीचा अभ्यास आहे, तसा माझा कायदा आणि पुर्वानुमती विषयाचा जरा जरासा अभ्यास आहे (अर्थशास्त्राचा पण आहे पण त्याकडे आपण नंतर येऊ).
माझ्या आज्जीवर माझे लाख प्रेम आहे गैरसोय पण नाही आहे; माझ्या आज्जी निर्णय घेण्याच्या क्षमतेत नसताना पण माझे वडील काका आणि माझ्या आत्त्या त्यांचा फोटो घेऊ नको म्हणून सांगतात. कायदेशीर दृष्ट्या मला त्यांच्या निर्णयाचे उल्लंघन करण्याचा कोणता अधिकार पोहचतो?
10 Apr 2025 - 8:27 am | आंद्रे वडापाव
१५००० वर्ष्यांपुर्वी ... त्याकाळातील ... आदिमानव "युयुत्सु" .. त्याकाळातील "भक्तांना" चाकाचे महत्व सांगत असतानाचे ... कल्पनाचित्र ...
10 Apr 2025 - 8:33 am | युयुत्सु
हा हा हा!
"वेगळा विचार करायची क्षमता" ही कल्पकतेसाठी आवश्यक अट आहे. ही क्षमता पोथीनीष्ठांना, भक्ताना, मागास विचाराच्या संस्कृती रक्षकांना लोकांना त्रासदायक ठरते हे वरील प्रतिसादांवरून परत एकदा सिद्ध झाले - "वेगळा विचार करायची क्षमता" समाजात निर्माण कशी करायची यावर कुणाकडेही उत्तरे नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांचा आवाज सध्याच्या काळात कायम दाबला जाईल.
सबब - पोपट मेला आहे हे सत्य आहे!
10 Apr 2025 - 10:41 am | प्रसाद गोडबोले
धन्यवाद
ह्या प्रतिसादावरून सिद्ध झाले की तुम्हाला कल्पकता ह्या विषयावर बोलायचेच नव्हते, तुमचा मूळ अजेंडा तुमच्या पूर्वग्रह विचारसरणीने दूषित झालेल्या विचारांच्या मते जे पोथीनीष्ठ, भक्त, मागास विचाराच्या संस्कृती रक्षक वगैरे अर्थात भाजप, मोदी, आणि हिंदू धर्मावर टीका करणे हाच होता.
अभिजाततेचे सोंग नाही आणता येत. ते आतूनच यावे लागते.
आणि आत जर विद्वेष भरला असेल तर तोच बाहेर येत राहतो, तिथं कलात्मकता वगैरे हुच्च लेबल लावली तरी पितळ उघडं पडतेच.
१=१
२=२
असो. तुम्ही तुमच्या अंतरंगात जे आहे ते लिहित रहा.
आम्ही आमच्या अंतरंगात जे आहे , पोथी, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, अध्यात्म, "राम" ते लिहित राहतो .
राम
10 Apr 2025 - 11:37 am | आंद्रे वडापाव
सेम इनपुट = > सेम आउटपुट
इनपुट = > नो व्हॅल्यू ऍडिशन प्रोसेस => सेम आउटपुट
हेन्स
" नो व्हॅल्यू ऍडिशन प्रोसेस " हीं काही जणांची कल्पकता ...
हे राम ...
उठालेंरें बाबा ... लेकिन मेरेको नै ...
10 Apr 2025 - 3:54 pm | चित्रगुप्त
-- शंभर टक्के निखळ सत्य.... म्हणूनच,
10 Apr 2025 - 9:53 am | अमरेंद्र बाहुबली
हाहहा! खतरनाक आंद्रे!
10 Apr 2025 - 9:08 am | युयुत्सु
या धाग्यावर मी आता अधिक प्रतिसाद देऊ इच्छित नाही.
10 Apr 2025 - 9:28 am | माहितगार
अभिव्यक्तीचा पोपट एकदा प्रकाशित केल्यावर तुम्ही रजा घेत पोपट मेलाय म्हटलेतरी त्याला उडवण्याच्या प्रेममय प्रतिसाद अभिव्यक्ती करणे वाचक-श्रोत्यांना आवडू शकते.
10 Apr 2025 - 9:50 am | श्रीगुरुजी
प्रकाशचित्र घेण्यासाठी अनुमती प्रदान करण्यास अनिच्छुकता दर्शविल्यानंतर त्या अनुषंगाने पोथीनिष्ठ, भक्त, मागास विचारांचे बथ्थड मस्तिष्कधारी संस्कृतीरक्षक, पियूष गोयल इ. चा बादरायण संबंध प्रस्थापित करणे या कल्पनातीत कल्पकतेच्या शुकाच्या अकाली मृत्युनंतर भावपूर्ण श्रद्धांजली!
10 Apr 2025 - 9:13 am | श्रीगुरुजी
शेवटच्या घटका मोजत असलेल्या आजीचे प्रकाशचित्र घेणे म्हणजे कल्पकतेची परमावधी आणि त्यास विरोध करणारे म्हणजे कल्पकतेस विरोध करणारे पोथीनिष्ठ, भक्त, मागास विचारांचे संस्कृतीरक्षक . . . हे नवीन ज्ञान प्राप्त जाहले.
बाकी प्रकाशचित्रास विरोध आणि कल्पकता व त्या अनुषंगाने संस्कृतीरक्षक, भाजप, सनातन इ. चा बादरायण संबंध जोडला तसाच काहीही संबंध नसलेला पोपट आणून ठेवला.
चित्रगुप्त या कलाकाराने सौम्य व स्पष्ट शब्दात कानउघाडणी करूनही मर्कट आपला रंगहट्ट त्यागण्यास अनिघ्छुक आहे.
10 Apr 2025 - 9:45 am | श्रीगुरुजी
बाकी प्रकाशचित्र घेण्यासाठी अनुमती प्रदान करण्यास अनिच्छुकता दर्शविणे आणि त्या अनुषंगाने पोथीनिष्ठ, भक्त, मागास विचारांचे बथ्थड मस्तिष्कधारी संस्कृतीरक्षक, पियूष गोयल इ. चा बादरायण संबंध प्रस्थापित करणे या कल्पनातीत कल्पकतेस २१ तोफांची मानवंदना!
10 Apr 2025 - 11:38 am | अमरेंद्र बाहुबली
ह्यावरून आठवले २.५ वर्षाआधी मला मुलगा झाला, त्याचा फोटो काढू नये म्हणून फर्मान सुटले, पण मला तर स्टेटसला फोटो ठेवायचा होता, मग मी असा फोटो काढला, घरातल्या सगळ्यांना आवडला नी त्यानीदेखील स्टेट्सला ठेवला.
10 Apr 2025 - 12:26 pm | अमरेंद्र बाहुबली
10 Apr 2025 - 12:59 pm | कंजूस
अमरेंद्रची कल्पकता आवडली.
लेखाच्या विषयावर बोलायचे तर फोटो काढणाऱ्यांनाच नको असेल तर विषय संपतो.
एखादी आजी नेहमीच फोटोसाठी उत्सुक असेल आणि तिचे अगोदरचे फोटो असतील तर फोटो ही तिच्यासाठी नवी गोष्ट नसते. तर अशा आजारपणात तिचा एकटीचाच फोटो न काढता सर्वांबरोबर फोटो काढता आला असता. मुलं मुली नातवंडं धरून एक फोटो.
बाकी राजकारण चर्चा चालू दे. त्याचा विरोध अथवा सहमती दर्शवत नाही.
10 Apr 2025 - 1:06 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत. काही वेळा घरातल्या लोकाना फक्त विशिष्ट व्यक्तीचाच फोटो घेतलेला आवडत नाही. सगळ्यांना घेऊन फोटो काढला असता तर त्याना आवडले असते, मोदी आईला भेटायला जायचे तेव्हा कुटुंबातील इतरांना घरातून हाकलले जायचे, फक्त आई, मोदी मी कॅमेरा, एवढ्याच गोष्टी असायच्या, घरातले वैतागले होते, एक इंटरविव मध्ये सांगत होते ली मोदी येणार असले की आमचे हाल व्ह्यायाचे, कधी जातील असे व्हायचे!
10 Apr 2025 - 1:17 pm | श्रीगुरुजी
पितळ उघडे पडल्याने धागाकर्त्याने धाग्यावरून काढता पाय घेतला आहे. परंतु मागे उभे असलेले धागाकर्त्याचे भक्तगण डावा हात कानावर ठेवून आणि उजवा तळहात पसरून जी जी रं जी जी रं जी जी जी . . . एकसुरात गात आहेत.
10 Apr 2025 - 1:22 pm | अमरेंद्र बाहुबली
सत्यं वदन् यदि नरः, न खलु रोचते जनान्धानाम्।
वैरिणि ते परिशुद्धे, दोषं सन्ति विचिन्वन्ति॥
10 Apr 2025 - 3:01 pm | कंजूस
कुटुंबातील बऱ्याच जणांचा एकत्र फोटो काढल्याने एक फायदा होतो. आताची मोठी माणसं लहानपणी कशी दिसत होती किंवा आताची कच्चीबच्ची पंधरा वर्षांनी कशी दिसतील ते एक रेकाॅर्ड होतं.
म्हाताऱ्यांचे फोटो काढण्यासाठी..त्यांना काम द्यावं (सुटीत दोरा ओवणे, कुंडीतील झाडांना पाणी देणे, नातीची वेणी घालणे, नातवाकडून मोबाईल शिकणे वगैरे) किंवा आइस्क्रीम खायला देऊन फोटो काढावा. चांगले हावभाव मिळतात.
10 Apr 2025 - 3:59 pm | चित्रगुप्त
रणछोडदासच मैदान सोडून निघून गेल्याने धाग्याचा पोपट मेलाय आता.
असो. कंटाळा आला आता. पोपटास श्रद्धांजली.
11 Apr 2025 - 8:28 am | माहितगार
प्रिंट हे भाजपा विरोधी विचारधारेचे माध्यम आहे. त्यात करनजीत कौर यांचा लेख आला आहे. टिकाच असली तरी टिका करण्याची पद्धत जबाबदार वाटते. पियुष गोयल राजकारणी असले तरी त्यांनी उपस्थित केलेला विषय स्वदेशी उच्च तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र असा आहे. पॉलीटी़कल र्हेटॉरीक मध्ये न आणता स्वतंत्र चर्चा धागा काढावा एवढा महत्वाचा हा विषय.
गोयलांनी टिका सामान्य इंडस्ट्रीअलीस्टवर केली नाही बिलिनियरांची नवी पिढी उच्च तंत्रज्ञाना मध्ये गुंतवणुकीकडे लक्ष देत नाही अशी टिका आहे म्हणजे जेणे करुन भारतीय बिलिनीयरांनी आधुनिक उच्च तंत्रज्ञान विषयक क्रिएटीव्हीटीत गुंतवणूकीस बळ द्यावे अशी अपेक्षा करताहेत ते.
टिकाही करा पण उपरोक्त धागा लेखात आणि चर्चेत नेमके काय चालले होते?
11 Apr 2025 - 9:22 am | युयुत्सु
पियुष गोयल राजकारणी असले तरी त्यांनी उपस्थित केलेला विषय स्वदेशी उच्च तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र असा आहे.
भारतीय बिलिनीयरांनी आधुनिक उच्च तंत्रज्ञान विषयक क्रिएटीव्हीटीत गुंतवणूकीस बळ द्यावे अशी अपेक्षा करताहेत ते
तुम्ही जसे कायद्याचे अभ्यासक आहात तसा मी क्रिएटीव्हीटीचा अभ्यासक आहे. माझ्या कुवतीनुसार मी क्रिएटीव्हीटीचा चेताविज्ञान ते सांस्कृतिक या मोठ्यापटावर अभ्यास करायचा प्रयत्न करतो.
क्रिएटीव्हीटी मग ती उच्चतंत्रज्ञानातील असो किंवा कलेतील असो - आडात नसेल तर पोह-यात येत नाही या उक्ती प्रमाणे पोषक वातावरण नसेल तर विकसित होत नाही. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात क्रिएटीव्हीटी येण्यासाठी अगोदर आजुबाजुच्या समाजाच्या दैनंदिन व्यवहारात ती यावी लागते. तरच ती विशिष्ट क्षेत्रात येऊ शकते. तुमच्या आजुबाजुला जर स्टिम्युलेटींग वातावरण असेल तर तुमच्यावर ते संस्कार होऊन तुम्ही तुमच्या क्षेत्रात स्टिम्युलेटींग करायची शक्यता वाढते...
मुक्तपणा हा सर्जनशीलतेच्या विकासासाठी प्राथमिक आवश्यक घटक आहे. हा मुक्तपणा आज देशात आहे का तर त्याचे उत्तर नाही, असे द्यावे लागते.
कल्पक उत्तरे शोधायच्या ज्या प्रचलित पद्धती आहेत त्या मांडली गेलेली कल्पना कितीही निरर्थक वाटली तरी ती नोंदविण्याची, तिची दखल घ्यायची पद्धत असते. आपल्याकडे पदाचा, सत्तेचा ताकदीचा वापर करून गप्प बसविण्याकडे (तुला/तुम्हाला काही कळत नाही असे म्हणून) कल असतो.
मी जेव्हा मुक्तपणा अभिप्रेत आहे असे म्हटले, तेव्हा वर वानगीदाखल जी उदा० दिली त्यांच्या तोडीचा मुक्तपणा मलाअभिप्रेत आहे. अशा कलाकृती भारतात कुणी निर्माण करू शकेल का? तर नाही.
मी आणखी बरीच सोवळ्या मानसिकतेच्या बालबुद्धीच्या लोकांची झोप उडेल अशी उदाहरणे देऊ शकेन. पण त्या कडे तटस्थ आणि प्रगल्भतेने बघायची क्षमता आपल्या समाजात नाही. याचे पुरेसे दर्शन वर घडले आहे.
11 Apr 2025 - 9:56 am | श्रीगुरुजी
मी आणखी बरीच सोवळ्या मानसिकतेच्या बालबुद्धीच्या लोकांची झोप उडेल अशी उदाहरणे देऊ शकेन. पण त्या कडे तटस्थ आणि प्रगल्भतेने बघायची क्षमता आपल्या समाजात नाही. याचे पुरेसे दर्शन वर घडले आहे.
स्वत:स कल्पक समजणाऱ्या एका अडाण्यांचे उदाहरण आपल्या लेखाच्या गाभ्यातूनच दिसले. आपला द्वेषी हेतू पुढे रेटण्यासाठी एखादी हास्यास्पद काल्पनिक कथा निर्माण करणे हीच आपल्या कल्पकतेची परमावधी.
अश्याच कहाण्या रचून आमचे मनोरंजन करीत रहा.
12 Apr 2025 - 10:36 pm | रामचंद्र
कल्पकशील सर्जकतेत मोडत नाही पण नियमातून पळवाटा काढणे आणि भ्रष्टाचाराचे नवनवीन मार्ग यात आपल्या देशातील लोकांनी प्रचंड कल्पकता दाखवली आहे असं नाही का तुम्हाला वाटत?
11 Apr 2025 - 5:19 pm | रात्रीचे चांदणे
मी आज्जीला सांभाळतो पण एखादा फोटो आता घेऊद्या अशी विनंती बथ्थड डोक्याच्या मावशांकडे केली असती तर कदाचित काढून दिला असता.पण त्या बथ्थड डोक्याच्या मावशाना वाटलं असेल हा उंटावरून शेळ्या हाकतोय.
11 Apr 2025 - 5:25 pm | अमरेंद्र बाहुबली
काल परवाच “अरेबियाचा लॉरेन्स” (lawrence of arabia) हा १९६२ सालचा अतिशय सुंदर सिनेमा पाहिला! त्यात एका टोळीचा प्रमुख अमेरिकन छायाचित्रकाराला नेहमी तलवार दाखवून म्हणतो फोटो नाही फोटो नाही! :)
13 Apr 2025 - 4:39 pm | वामन देशमुख
काय ठरलं मग शेवटी? ज्या देशातील स्टॉक मार्केटातून धागाकर्ते पैसे कमावतात तो भारत हा जगातला सर्वाधिक कल्पनादरिद्री देश आहे की नाही?
बरं, कल्पनापूर्ण देश कोणता? समाजवादी वेनेझुएला?
14 Apr 2025 - 10:17 am | युयुत्सु
तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या वर्षापासून शाळेत ए०आय० शिकवायचे फर्मान काढले आहे आणि इथे "उजवी बुरशी" ए० आय० सुरूवातीच्या मर्यांदावर अजून आपल्या पोळ्या भाजायचा प्रयत्न करते आहे. ए० आय० चे नवनवे अवतात काय करू शकतात हे त्यांच्या बौद्धिक क्षमते पलिकड्चे आहे! लवकर शहाणे व्हा!
नुकत्याच एका पाहणीत असे सध्या अस्तित्वात असलेले जवळ्जवळ सर्व ए०आय० "डावीकडे" झुकलेले आहेत असे लक्षात आले आहे. भारताचा ए० आय० (जेव्हाकेव्हा येईल तेव्हा) उजवी कडे झुकलेला असेल का, याची मला उत्सूकता आहेच.
14 Apr 2025 - 10:23 am | आंद्रे वडापाव
एकंदरीत भारतातील परिस्तिथी बघता... भारतात स्वतःचा 'ए आय' निर्माण होईल याची शक्यता मला कमी वाटते ...
"ए आय" व्हावा अशी इच्छाशक्ती दिसत नाही ...
आधीच्या पिढीत ज्या वैज्ञानिक संस्था किंवा त्यांचे आज मिळणारे संचित , यावरच "मिरवणं" चालू राहील...
14 Apr 2025 - 10:59 am | अमरेंद्र बाहुबली
भारत सरकारचा भर ए आय तयार करण्यापेक्षा अंधभक्त तयार करण्यावर जास्त आहे.
14 Apr 2025 - 11:00 am | अमरेंद्र बाहुबली
युयुत्सु सर ती उजवी बुरशी नसून “मनुवादी बुरशी” आहे.
14 Apr 2025 - 11:13 am | युयुत्सु
हा हा हा... हार्ड हीटींग!!
21 Apr 2025 - 8:35 pm | श्रीगुरुजी
तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या वर्षापासून शाळेत ए०आय० शिकवायचे फर्मान काढले आहे
आणि आपल्याकडे वयाच्या ६ व्या वर्षापासून निरूपयोगी हिंदी भाषा सक्तीने शिकण्याचे फर्मान काढले आहे.
14 Apr 2025 - 10:48 am | सुबोध खरे
14 Apr 2025 - 10:49 am | सुबोध खरे
14 Apr 2025 - 11:26 am | सुबोध खरे
14 Apr 2025 - 11:28 am | युयुत्सु
"कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या" लोकांच्या पोस्टी नियतीला मान्य नसाव्यात... हा हा हा.
14 Apr 2025 - 11:32 am | सुबोध खरे
14 Apr 2025 - 11:36 am | सुबोध खरे
कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या भारताने UPI हि प्रणाली विकसित करून व्यवस्थित पणे त्याचा विस्तार करून जगभरात अग्रभागी नाव कमावलं.
पण चिदंबरम साहेबांच्या ओंजळीने पाणी पिणारे लोक अशा एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणून निरगाठ बांधून बसले आहेत. त्यांना कोण समजावणार?.
अशा अनेक गोष्टी आहेत. नाविक हि जी पी एस प्रणाली
काली म्हणजे KILO AMPERE LINEAR INJECTOR
Directed-Energy Weapons
DAPO धीरूभाई अंबानी पायोनियर ऑफर. हि गोष्ट अनेकांच्या विस्मरणात गेली असेल. पण ३५० रुपये महिना तीन वर्षा साठी ज्यात १० पैशात १५ सेकंद टॉक टाइम आणि भ्रमणध्वनी फुकट अशा या योजने मुळे तळागाळातील लोकांच्या हातात सुद्धा भ्रमणध्वनी आला हि वस्तुस्थिती डोळ्याआड करता येणार नाही. आणि त्यामुळे भारतात मोबाईल क्रांती आली.आज भारतात साधारण ८५ % लोकांकडे भ्रमणध्वनी आहे. दरडोई उत्पन्नाशी तुलना केल्यास हा एक चमत्कारापेक्षा कमी नाही.
आज रिलायन्स जियोने फुकट विश्वचषकाचे प्रसारण करून बाकी सर्व स्टार सोनी सारख्या आंतरराष्ट्रीय वाहिन्यांचे धाबे दणाणले. यात कल्पकता नाही असे म्हणणाऱ्यांची किंवा करावी तितकी थोडी आहे.
जिओ आणि एअरटेल यांनी वायर आणि फिक्स्ड वायर लेस क्रांती आणून जगभरात सर्वात स्वस्त डेटा उपलब्ध करून दिला आहे भारतात कल्पकता नाही म्हणणारे त्यावरच असे लेख पाडण्याचे काम करत आहेत Mobile data in India is the third cheapest in the world.
बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात ( शारीरिक बद्धकोष्ठता मध्ये पोटात वात फिरतो तसेच )
14 Apr 2025 - 11:43 am | युयुत्सु
ज्या लोकांचा ऊर किरकोळ अचिव्हमेंण्टने भरून येतो त्यांनी खालील क्लीप बघावी आणी "टेंपल इकॉनॉमी" आणि "पेटंट इकॉनॉमी" यावर मनन चिंतन करावे.
https://www.youtube.com/watch?v=JMHuVIE4Jk8
14 Apr 2025 - 11:59 am | आंद्रे वडापाव
आधीच्या पिढीत ज्या वैज्ञानिक संस्था किंवा त्यांचे आज मिळणारे संचित , यावरच आजचे "मिरवणं" चालू राहील...
14 Apr 2025 - 12:01 pm | सुबोध खरे
बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात
14 Apr 2025 - 12:04 pm | आग्या१९९०
असं कसं? गटारातून गॅस नळीने काढून स्टोव्ह पेटवून चहा बनवून विक्री करणे, ट्यूबमध्ये गॅस नेऊन शेतातील पंप चालवणे अशा कल्पक शोधांचे जनक पेटंट घेत नाही हा त्यांचा मोठेपणा आहे. "वसुधैव कुटुंबकम" हेच त्यांचे एकमेव पेटंट!
14 Apr 2025 - 12:10 pm | सुबोध खरे
तेच तेच प्रतिसाद प्रत्येक लेखात आणणे हे हि वैचारिक बद्धकोष्ठाचेच लक्षण आहे.
बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात