✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कल्पकतेची ऐशीतैशी

य
युयुत्सु यांनी
Wed, 04/09/2025 - 09:28  ·  लेख
लेख
कल्पकतेची ऐशीतैशी =========== सहसा कोणतीही नवजात कंपनी काही कल्पक उत्पादनाचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करते. उत्पादन बाजार पेठेकडून स्वीकारले गेले तर कंपनी व्यवसाय चालू ठेवते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काही भारतीय नवजात कंपन्यांवर अकलेचे तारे तोडले आहेत, ते अतिशय संतापजनक आहेत. त्याला संबंधितांकडून प्रतिसाद मिळत आहेच, पण या सर्वाच्या मुळाच्या असलेल्या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करायची गरज निर्माण झाली. आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्‍या राजकीय नेत्यांची कमी नाही. आपले खरे दुखणे कशात आहे, याचा जर थंड डोक्याने शोध घ्यायचा प्रयत्न केला तर जे सत्य गवसते त्यामुळे रक्त उकळायला लागते. काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. तेव्हा मी फोटोग्राफी करत असे. माझ्या फोटोग्राफीची नजर विकसित होण्यासाठी मी जगभर फोटोग्राफीमध्ये काय चालते याचा अभ्यास करत असे. तर सांगत काय होतो, की मी माझ्या आजीला तिच्या शेवटच्या दिवसात भेटायला नाशिकला गेलो होतो. माझ्या आजीचा मुक्काम माझ्या मावशीकडे होता. जाताना मी माझा कॅमेरा बरोबर नेला होता. आजीला नमस्कार करून निघताना फोटो काढण्यासाठी कॅमेरा बाहेर काढला, तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की "आजारी माणसांचे फोटो काढत नसतात!" या दोन मावशांनी आयुष्यात कॅमेरा हातात धरणं सोडा पण आयुष्यात कसलाही पराक्रम केलेला नाही, पण फोटो कशाचे काढावेत आणि नाहीत याबद्दल मात्र त्यांची ठाम मते होती. आणि मी त्यांचे ऐकले पाहिजे हा त्यांचा चमत्कारिक आग्रह मात्र अनाकलनीय होता. भारतात कल्पकता रूजणं शक्य नाही याची कारणे वरील (प्रातिनिधिक) प्रसंगात द्डलेली आहेत. समाजातले अडाणी आणि निर्बुद्ध लोक (विशेषत: संस्कृतीरक्षक) जेव्हा कला, सर्जनशीलता यांची व्याख्या करायला लागतात तेव्हा त्या समाजात कल्पकता कधीच विकसित नाही. आज ए०आय० अवतरल्यानंतर ट्रंप,पुतीन आणि पोप यासारख्या सारख्या जागतिक नेत्यांची यथेच्छ टिंगलटवाळी ए०आय० ने तयार केलेल्या चित्राद्वारे चालू आहे. पण यामुळे एकही जण कोर्टकचेर्‍यांची वारी करताना दिसत नाही. पण फक्त भारतात विडंबन हा गुन्हा ठरू शकतो. कुठेतरी असे वाचले आहे की ख्रिश्चन धर्म सर्वात टिंगलटवाळी झालेला धर्म आहे. कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही. मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्‍या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
12717 वाचन

💬 प्रतिसाद (96)

प्रतिक्रिया

सेम इनपुट = > सेम आउटपुट

आंद्रे वडापाव
गुरुवार, 04/10/2025 - 11:37 नवीन
सेम इनपुट = > सेम आउटपुट इनपुट = > नो व्हॅल्यू ऍडिशन प्रोसेस => सेम आउटपुट हेन्स " नो व्हॅल्यू ऍडिशन प्रोसेस " हीं काही जणांची कल्पकता ... हे राम ... उठालेंरें बाबा ... लेकिन मेरेको नै ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

लाख टके की बात, प्रगो.

चित्रगुप्त
गुरुवार, 04/10/2025 - 15:54 नवीन
अभिजाततेचे सोंग नाही आणता येत. ते आतूनच यावे लागते.
-- शंभर टक्के निखळ सत्य.... म्हणूनच,
आत जर विद्वेष भरला असेल तर तोच बाहेर येत राहतो, तिथं कलात्मकता वगैरे हुच्च लेबल लावली तरी पितळ उघडं पडतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हाहहा! खतरनाक आंद्रे!

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/10/2025 - 09:53 नवीन
हाहहा! खतरनाक आंद्रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

या धाग्यावर मी आता अधिक

युयुत्सु
गुरुवार, 04/10/2025 - 09:08 नवीन
या धाग्यावर मी आता अधिक प्रतिसाद देऊ इच्छित नाही.
  • Log in or register to post comments

अभिव्यक्तीचा पोपट एकदा

माहितगार
गुरुवार, 04/10/2025 - 09:28 नवीन
अभिव्यक्तीचा पोपट एकदा प्रकाशित केल्यावर तुम्ही रजा घेत पोपट मेलाय म्हटलेतरी त्याला उडवण्याच्या प्रेममय प्रतिसाद अभिव्यक्ती करणे वाचक-श्रोत्यांना आवडू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

प्रकाशचित्र घेण्यासाठी अनुमती

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/10/2025 - 09:50 नवीन
प्रकाशचित्र घेण्यासाठी अनुमती प्रदान करण्यास अनिच्छुकता दर्शविल्यानंतर त्या अनुषंगाने पोथीनिष्ठ, भक्त, मागास विचारांचे बथ्थड मस्तिष्कधारी संस्कृतीरक्षक, पियूष गोयल इ. चा बादरायण संबंध प्रस्थापित करणे या कल्पनातीत कल्पकतेच्या शुकाच्या अकाली मृत्युनंतर भावपूर्ण श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

शेवटच्या घटका मोजत असलेल्या

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/10/2025 - 09:13 नवीन
शेवटच्या घटका मोजत असलेल्या आजीचे प्रकाशचित्र घेणे म्हणजे कल्पकतेची परमावधी आणि त्यास विरोध करणारे म्हणजे कल्पकतेस विरोध करणारे पोथीनिष्ठ, भक्त, मागास विचारांचे संस्कृतीरक्षक . . . हे नवीन ज्ञान प्राप्त जाहले. बाकी प्रकाशचित्रास विरोध आणि कल्पकता व त्या अनुषंगाने संस्कृतीरक्षक, भाजप, सनातन इ. चा बादरायण संबंध जोडला तसाच काहीही संबंध नसलेला पोपट आणून ठेवला. चित्रगुप्त या कलाकाराने सौम्य व स्पष्ट शब्दात कानउघाडणी करूनही मर्कट आपला रंगहट्ट त्यागण्यास अनिघ्छुक आहे.
  • Log in or register to post comments

बाकी प्रकाशचित्र घेण्यासाठी

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/10/2025 - 09:45 नवीन
बाकी प्रकाशचित्र घेण्यासाठी अनुमती प्रदान करण्यास अनिच्छुकता दर्शविणे आणि त्या अनुषंगाने पोथीनिष्ठ, भक्त, मागास विचारांचे बथ्थड मस्तिष्कधारी संस्कृतीरक्षक, पियूष गोयल इ. चा बादरायण संबंध प्रस्थापित करणे या कल्पनातीत कल्पकतेस २१ तोफांची मानवंदना!
  • Log in or register to post comments

ह्यावरून आठवले २.५ वर्षाआधी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/10/2025 - 11:38 नवीन
ह्यावरून आठवले २.५ वर्षाआधी मला मुलगा झाला, त्याचा फोटो काढू नये म्हणून फर्मान सुटले, पण मला तर स्टेटसला फोटो ठेवायचा होता, मग मी असा फोटो काढला, घरातल्या सगळ्यांना आवडला नी त्यानीदेखील स्टेट्सला ठेवला.
  • Log in or register to post comments

(No subject)

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/10/2025 - 12:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अमरेंद्रची कल्पकता आवडली.

कंजूस
गुरुवार, 04/10/2025 - 12:59 नवीन
अमरेंद्रची कल्पकता आवडली. लेखाच्या विषयावर बोलायचे तर फोटो काढणाऱ्यांनाच नको असेल तर विषय संपतो. एखादी आजी नेहमीच फोटोसाठी उत्सुक असेल आणि तिचे अगोदरचे फोटो असतील तर फोटो ही तिच्यासाठी नवी गोष्ट नसते. तर अशा आजारपणात तिचा एकटीचाच फोटो न काढता सर्वांबरोबर फोटो काढता आला असता. मुलं मुली नातवंडं धरून एक फोटो. बाकी राजकारण चर्चा चालू दे. त्याचा विरोध अथवा सहमती दर्शवत नाही.
  • Log in or register to post comments

सहमत. काही वेळा घरातल्या

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/10/2025 - 13:06 नवीन
सहमत. काही वेळा घरातल्या लोकाना फक्त विशिष्ट व्यक्तीचाच फोटो घेतलेला आवडत नाही. सगळ्यांना घेऊन फोटो काढला असता तर त्याना आवडले असते, मोदी आईला भेटायला जायचे तेव्हा कुटुंबातील इतरांना घरातून हाकलले जायचे, फक्त आई, मोदी मी कॅमेरा, एवढ्याच गोष्टी असायच्या, घरातले वैतागले होते, एक इंटरविव मध्ये सांगत होते ली मोदी येणार असले की आमचे हाल व्ह्यायाचे, कधी जातील असे व्हायचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पितळ उघडे पडल्याने

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/10/2025 - 13:17 नवीन
पितळ उघडे पडल्याने धागाकर्त्याने धाग्यावरून काढता पाय घेतला आहे. परंतु मागे उभे असलेले धागाकर्त्याचे भक्तगण डावा हात कानावर ठेवून आणि उजवा तळहात पसरून जी जी रं जी जी रं जी जी जी . . . एकसुरात गात आहेत.
  • Log in or register to post comments

सत्यं वदन् यदि नरः, न खलु

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/10/2025 - 13:22 नवीन
सत्यं वदन् यदि नरः, न खलु रोचते जनान्धानाम्। वैरिणि ते परिशुद्धे, दोषं सन्ति विचिन्वन्ति॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कुटुंबातील बऱ्याच जणांचा

कंजूस
गुरुवार, 04/10/2025 - 15:01 नवीन
कुटुंबातील बऱ्याच जणांचा एकत्र फोटो काढल्याने एक फायदा होतो. आताची मोठी माणसं लहानपणी कशी दिसत होती किंवा आताची कच्चीबच्ची पंधरा वर्षांनी कशी दिसतील ते एक रेकाॅर्ड होतं. म्हाताऱ्यांचे फोटो काढण्यासाठी..त्यांना काम द्यावं (सुटीत दोरा ओवणे, कुंडीतील झाडांना पाणी देणे, नातीची वेणी घालणे, नातवाकडून मोबाईल शिकणे वगैरे) किंवा आइस्क्रीम खायला देऊन फोटो काढावा. चांगले हावभाव मिळतात.
  • Log in or register to post comments

रणछोडदासच निघून गेल्याने धाग्याचा पोपट मेलाय आता.

चित्रगुप्त
गुरुवार, 04/10/2025 - 15:59 नवीन
रणछोडदासच मैदान सोडून निघून गेल्याने धाग्याचा पोपट मेलाय आता. असो. कंटाळा आला आता. पोपटास श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

जबाबदार टिका कशी करावी?

माहितगार
Fri, 04/11/2025 - 08:28 नवीन
प्रिंट हे भाजपा विरोधी विचारधारेचे माध्यम आहे. त्यात करनजीत कौर यांचा लेख आला आहे. टिकाच असली तरी टिका करण्याची पद्धत जबाबदार वाटते. पियुष गोयल राजकारणी असले तरी त्यांनी उपस्थित केलेला विषय स्वदेशी उच्च तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र असा आहे. पॉलीटी़कल र्हेटॉरीक मध्ये न आणता स्वतंत्र चर्चा धागा काढावा एवढा महत्वाचा हा विषय. गोयलांनी टिका सामान्य इंडस्ट्रीअलीस्टवर केली नाही बिलिनियरांची नवी पिढी उच्च तंत्रज्ञाना मध्ये गुंतवणुकीकडे लक्ष देत नाही अशी टिका आहे म्हणजे जेणे करुन भारतीय बिलिनीयरांनी आधुनिक उच्च तंत्रज्ञान विषयक क्रिएटीव्हीटीत गुंतवणूकीस बळ द्यावे अशी अपेक्षा करताहेत ते. टिकाही करा पण उपरोक्त धागा लेखात आणि चर्चेत नेमके काय चालले होते?
  • Log in or register to post comments

पियुष गोयल राजकारणी असले तरी

युयुत्सु
Fri, 04/11/2025 - 09:22 नवीन
पियुष गोयल राजकारणी असले तरी त्यांनी उपस्थित केलेला विषय स्वदेशी उच्च तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र असा आहे. भारतीय बिलिनीयरांनी आधुनिक उच्च तंत्रज्ञान विषयक क्रिएटीव्हीटीत गुंतवणूकीस बळ द्यावे अशी अपेक्षा करताहेत ते तुम्ही जसे कायद्याचे अभ्यासक आहात तसा मी क्रिएटीव्हीटीचा अभ्यासक आहे. माझ्या कुवतीनुसार मी क्रिएटीव्हीटीचा चेताविज्ञान ते सांस्कृतिक या मोठ्यापटावर अभ्यास करायचा प्रयत्न करतो. क्रिएटीव्हीटी मग ती उच्चतंत्रज्ञानातील असो किंवा कलेतील असो - आडात नसेल तर पोह-यात येत नाही या उक्ती प्रमाणे पोषक वातावरण नसेल तर विकसित होत नाही. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात क्रिएटीव्हीटी येण्यासाठी अगोदर आजुबाजुच्या समाजाच्या दैनंदिन व्यवहारात ती यावी लागते. तरच ती विशिष्ट क्षेत्रात येऊ शकते. तुमच्या आजुबाजुला जर स्टिम्युलेटींग वातावरण असेल तर तुमच्यावर ते संस्कार होऊन तुम्ही तुमच्या क्षेत्रात स्टिम्युलेटींग करायची शक्यता वाढते... मुक्तपणा हा सर्जनशीलतेच्या विकासासाठी प्राथमिक आवश्यक घटक आहे. हा मुक्तपणा आज देशात आहे का तर त्याचे उत्तर नाही, असे द्यावे लागते. कल्पक उत्तरे शोधायच्या ज्या प्रचलित पद्धती आहेत त्या मांडली गेलेली कल्पना कितीही निरर्थक वाटली तरी ती नोंदविण्याची, तिची दखल घ्यायची पद्धत असते. आपल्याकडे पदाचा, सत्तेचा ताकदीचा वापर करून गप्प बसविण्याकडे (तुला/तुम्हाला काही कळत नाही असे म्हणून) कल असतो. मी जेव्हा मुक्तपणा अभिप्रेत आहे असे म्हटले, तेव्हा वर वानगीदाखल जी उदा० दिली त्यांच्या तोडीचा मुक्तपणा मलाअभिप्रेत आहे. अशा कलाकृती भारतात कुणी निर्माण करू शकेल का? तर नाही. मी आणखी बरीच सोवळ्या मानसिकतेच्या बालबुद्धीच्या लोकांची झोप उडेल अशी उदाहरणे देऊ शकेन. पण त्या कडे तटस्थ आणि प्रगल्भतेने बघायची क्षमता आपल्या समाजात नाही. याचे पुरेसे दर्शन वर घडले आहे.
  • Log in or register to post comments

मी आणखी बरीच सोवळ्या

श्रीगुरुजी
Fri, 04/11/2025 - 09:56 नवीन
मी आणखी बरीच सोवळ्या मानसिकतेच्या बालबुद्धीच्या लोकांची झोप उडेल अशी उदाहरणे देऊ शकेन. पण त्या कडे तटस्थ आणि प्रगल्भतेने बघायची क्षमता आपल्या समाजात नाही. याचे पुरेसे दर्शन वर घडले आहे. स्वत:स कल्पक समजणाऱ्या एका अडाण्यांचे उदाहरण आपल्या लेखाच्या गाभ्यातूनच दिसले. आपला द्वेषी हेतू पुढे रेटण्यासाठी एखादी हास्यास्पद काल्पनिक कथा निर्माण करणे हीच आपल्या कल्पकतेची परमावधी. अश्याच कहाण्या रचून आमचे मनोरंजन करीत रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

कल्पकशील सर्जकतेत मोडत नाही

रामचंद्र
Sat, 04/12/2025 - 22:36 नवीन
कल्पकशील सर्जकतेत मोडत नाही पण नियमातून पळवाटा काढणे आणि भ्रष्टाचाराचे नवनवीन मार्ग यात आपल्या देशातील लोकांनी प्रचंड कल्पकता दाखवली आहे असं नाही का तुम्हाला वाटत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

मी आज्जीला सांभाळतो पण एखादा

रात्रीचे चांदणे
Fri, 04/11/2025 - 17:19 नवीन
मी आज्जीला सांभाळतो पण एखादा फोटो आता घेऊद्या अशी विनंती बथ्थड डोक्याच्या मावशांकडे केली असती तर कदाचित काढून दिला असता.पण त्या बथ्थड डोक्याच्या मावशाना वाटलं असेल हा उंटावरून शेळ्या हाकतोय.
  • Log in or register to post comments

काल परवाच “अरेबियाचा लॉरेन्स”

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/11/2025 - 17:25 नवीन
काल परवाच “अरेबियाचा लॉरेन्स” (lawrence of arabia) हा १९६२ सालचा अतिशय सुंदर सिनेमा पाहिला! त्यात एका टोळीचा प्रमुख अमेरिकन छायाचित्रकाराला नेहमी तलवार दाखवून म्हणतो फोटो नाही फोटो नाही! :)
  • Log in or register to post comments

काय ठरलं मग शेवटी?

वामन देशमुख
Sun, 04/13/2025 - 16:39 नवीन
काय ठरलं मग शेवटी? ज्या देशातील स्टॉक मार्केटातून धागाकर्ते पैसे कमावतात तो भारत हा जगातला सर्वाधिक कल्पनादरिद्री देश आहे की नाही? बरं, कल्पनापूर्ण देश कोणता? समाजवादी वेनेझुएला?
  • Log in or register to post comments

"उजवी बुरशी"

युयुत्सु
Mon, 04/14/2025 - 10:17 नवीन
तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या वर्षापासून शाळेत ए०आय० शिकवायचे फर्मान काढले आहे आणि इथे "उजवी बुरशी" ए० आय० सुरूवातीच्या मर्यांदावर अजून आपल्या पोळ्या भाजायचा प्रयत्न करते आहे. ए० आय० चे नवनवे अवतात काय करू शकतात हे त्यांच्या बौद्धिक क्षमते पलिकड्चे आहे! लवकर शहाणे व्हा! नुकत्याच एका पाहणीत असे सध्या अस्तित्वात असलेले जवळ्जवळ सर्व ए०आय० "डावीकडे" झुकलेले आहेत असे लक्षात आले आहे. भारताचा ए० आय० (जेव्हाकेव्हा येईल तेव्हा) उजवी कडे झुकलेला असेल का, याची मला उत्सूकता आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

एकंदरीत भारतातील परिस्तिथी

आंद्रे वडापाव
Mon, 04/14/2025 - 10:23 नवीन
एकंदरीत भारतातील परिस्तिथी बघता... भारतात स्वतःचा 'ए आय' निर्माण होईल याची शक्यता मला कमी वाटते ... "ए आय" व्हावा अशी इच्छाशक्ती दिसत नाही ... आधीच्या पिढीत ज्या वैज्ञानिक संस्था किंवा त्यांचे आज मिळणारे संचित , यावरच "मिरवणं" चालू राहील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

भारत सरकारचा भर ए आय तयार

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/14/2025 - 10:59 नवीन
भारत सरकारचा भर ए आय तयार करण्यापेक्षा अंधभक्त तयार करण्यावर जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

युयुत्सु सर ती उजवी बुरशी

अमरेंद्र बाहुबली
Mon, 04/14/2025 - 11:00 नवीन
युयुत्सु सर ती उजवी बुरशी नसून “मनुवादी बुरशी” आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

“मनुवादी बुरशी”

युयुत्सु
Mon, 04/14/2025 - 11:13 नवीन
हा हा हा... हार्ड हीटींग!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या

श्रीगुरुजी
Mon, 04/21/2025 - 20:35 नवीन
तिकडे चीनमध्ये वयाच्या ६ व्या वर्षापासून शाळेत ए०आय० शिकवायचे फर्मान काढले आहे आणि आपल्याकडे वयाच्या ६ व्या वर्षापासून निरूपयोगी हिंदी भाषा सक्तीने शिकण्याचे फर्मान काढले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या

सुबोध खरे
Mon, 04/14/2025 - 10:48 नवीन
  • Log in or register to post comments

कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या

सुबोध खरे
Mon, 04/14/2025 - 10:49 नवीन
  • Log in or register to post comments

कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या

सुबोध खरे
Mon, 04/14/2025 - 11:26 नवीन
  • Log in or register to post comments

"कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या

युयुत्सु
Mon, 04/14/2025 - 11:28 नवीन
"कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या" लोकांच्या पोस्टी नियतीला मान्य नसाव्यात... हा हा हा.
  • Log in or register to post comments

कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या

सुबोध खरे
Mon, 04/14/2025 - 11:32 नवीन
  • Log in or register to post comments

कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या

सुबोध खरे
Mon, 04/14/2025 - 11:36 नवीन
कल्पकतेचे दारिद्र्य असणाऱ्या भारताने UPI हि प्रणाली विकसित करून व्यवस्थित पणे त्याचा विस्तार करून जगभरात अग्रभागी नाव कमावलं. पण चिदंबरम साहेबांच्या ओंजळीने पाणी पिणारे लोक अशा एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणून निरगाठ बांधून बसले आहेत. त्यांना कोण समजावणार?. अशा अनेक गोष्टी आहेत. नाविक हि जी पी एस प्रणाली काली म्हणजे KILO AMPERE LINEAR INJECTOR Directed-Energy Weapons DAPO धीरूभाई अंबानी पायोनियर ऑफर. हि गोष्ट अनेकांच्या विस्मरणात गेली असेल. पण ३५० रुपये महिना तीन वर्षा साठी ज्यात १० पैशात १५ सेकंद टॉक टाइम आणि भ्रमणध्वनी फुकट अशा या योजने मुळे तळागाळातील लोकांच्या हातात सुद्धा भ्रमणध्वनी आला हि वस्तुस्थिती डोळ्याआड करता येणार नाही. आणि त्यामुळे भारतात मोबाईल क्रांती आली.आज भारतात साधारण ८५ % लोकांकडे भ्रमणध्वनी आहे. दरडोई उत्पन्नाशी तुलना केल्यास हा एक चमत्कारापेक्षा कमी नाही. आज रिलायन्स जियोने फुकट विश्वचषकाचे प्रसारण करून बाकी सर्व स्टार सोनी सारख्या आंतरराष्ट्रीय वाहिन्यांचे धाबे दणाणले. यात कल्पकता नाही असे म्हणणाऱ्यांची किंवा करावी तितकी थोडी आहे. जिओ आणि एअरटेल यांनी वायर आणि फिक्स्ड वायर लेस क्रांती आणून जगभरात सर्वात स्वस्त डेटा उपलब्ध करून दिला आहे भारतात कल्पकता नाही म्हणणारे त्यावरच असे लेख पाडण्याचे काम करत आहेत Mobile data in India is the third cheapest in the world. बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात ( शारीरिक बद्धकोष्ठता मध्ये पोटात वात फिरतो तसेच )
  • Log in or register to post comments

ज्या लोकांचा ऊर किरकोळ

युयुत्सु
Mon, 04/14/2025 - 11:43 नवीन
ज्या लोकांचा ऊर किरकोळ अचिव्हमेंण्टने भरून येतो त्यांनी खालील क्लीप बघावी आणी "टेंपल इकॉनॉमी" आणि "पेटंट इकॉनॉमी" यावर मनन चिंतन करावे. https://www.youtube.com/watch?v=JMHuVIE4Jk8
  • Log in or register to post comments

आधीच्या पिढीत ज्या वैज्ञानिक

आंद्रे वडापाव
Mon, 04/14/2025 - 11:59 नवीन
आधीच्या पिढीत ज्या वैज्ञानिक संस्था किंवा त्यांचे आज मिळणारे संचित , यावरच आजचे "मिरवणं" चालू राहील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं

सुबोध खरे
Mon, 04/14/2025 - 12:01 नवीन
बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

असं कसं? गटारातून गॅस नळीने

आग्या१९९०
Mon, 04/14/2025 - 12:04 नवीन
असं कसं? गटारातून गॅस नळीने काढून स्टोव्ह पेटवून चहा बनवून विक्री करणे, ट्यूबमध्ये गॅस नेऊन शेतातील पंप चालवणे अशा कल्पक शोधांचे जनक पेटंट घेत नाही हा त्यांचा मोठेपणा आहे. "वसुधैव कुटुंबकम" हेच त्यांचे एकमेव पेटंट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तेच तेच प्रतिसाद प्रत्येक

सुबोध खरे
Mon, 04/14/2025 - 12:10 नवीन
तेच तेच प्रतिसाद प्रत्येक लेखात आणणे हे हि वैचारिक बद्धकोष्ठाचेच लक्षण आहे. बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

तेच तेच प्रतिसाद प्रत्येक

आग्या१९९०
Mon, 04/14/2025 - 12:21 नवीन
तेच तेच प्रतिसाद प्रत्येक लेखात आणणे हे हि वैचारिक बद्धकोष्ठाचेच लक्षण आहे. तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही त्याचे पालन करण्यात कुठलीही कसर ठेवत नाहीत हे जाणवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मुद्दा कल्पकते बद्दलचा आहे.

सुबोध खरे
Mon, 04/14/2025 - 11:46 नवीन
मुद्दा कल्पकते बद्दलचा आहे. मुद्द्याचा कात्रज करण्याचा हेतू अश्लाघ्य आहे.
  • Log in or register to post comments

नाविक जीपीएस प्रणालीला किरकोळ

सुबोध खरे
Mon, 04/14/2025 - 11:54 नवीन
नाविक जीपीएस प्रणालीला किरकोळ म्हणण्यासाठी आपल्या बुद्धीची कीव करावी का हा प्रश्न आहे. नीट पणे वाचून पहा त्याची गरज भारताला का झाली ते
  • Log in or register to post comments

बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं

श्रीगुरुजी
Mon, 04/14/2025 - 12:24 नवीन
बाकी वैचारिक बद्धकोष्ठ झालं कि तेच तेच विचार डोक्यात फिरत राहतात बाडिस. धागाकर्ता शेणाची टोपली कल्पकतेच्या फडक्याखाली झाकून घेऊन आला. परंतु टोपलीतल्या शेणाने स्वत:चेच तोंड माखले गेल्यानंतर "मी आता परत येथे लिहिणार नाही" असे सांगून पळ काढला. परंतु पुन्हा एकदा एक नवीन शेणाची टोपली घेऊन परत आला आणि पुन्हा एकदा शेणाने तोंड माखून घेतले. परंतु तरीही अक्कल आली नाही.
  • Log in or register to post comments

कोण म्हणतो भारतात कल्पकता

श्रीगुरुजी
Mon, 04/14/2025 - 14:50 नवीन
कोण म्हणतो भारतात कल्पकता नाही?
  • Log in or register to post comments

कल्पकता आणि भारतीय संस्कृती

मूकवाचक
Mon, 04/14/2025 - 15:12 नवीन
सनातन भारतीय संस्कृतीत १४ विद्या आणि ६४ कलांना सन्मानाचे स्थान आहे. देवदेवतांच्या सगुण रूपाला डमरू, बासरी, वीणा, मोरपीस या शिवाय पूर्णत्व येत नाही. प्रार्थनास्थळे देखील स्थापत्यशास्त्रातील बेजोड कलाकृतीच आहेत. अन्नब्रह्म ते नादब्रह्म अशा संकल्पना नवीन नाहीत- एखादी उत्तम जमलेली पाककृती ते जमून आलेली मैफिल अशा नानाविध कलात्मक अविष्कारातून आणि आस्वादातून ब्रह्मानंदाची अंशत: का असेना अनुभूती येऊ शकते याचा सहर्ष स्वीकार मूळ संस्कृतीतच आहे. असो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा