चप्पलच्या दुकानातंही आत
चपला काढून शिरावं लागतं .
धर्म नावाचं मूल्य मनात,
असं खो Sssलपर्यंत जिरावं लागतं
नुसतच," हे असं कसं !? "
असं म्हणून भागत नाही .
एकट्यानीच जगायचं . . ?,
तर मग
यापेक्षा काहीच लागत नाही .
पण टोळीत जगणार ना तुम्ही ?
मग द्यायला हवी हमी .
पत्ते आवडत नसले खेळायला,
तरी जमवावी लागेल रम्मी !
जिंदगीचा डाव शिकायला
मनाविरुद्ध वागावं लागतं .
चप्पलच्या दुकानातंही आत
चपला काढून शिरावं लागतं .
सालं त्याचं बिचाऱ्याचं तरी काय चुकलं ?
आपणच चपलेला "इथे" आणून ठेवलं !
त्याचा मान राखायचा नादात नादात
तिचाच मान राखायला लागलो आपण !
आणि तिच्याच दुकानात जाताना
तिलाच काढून ठेवायला लागलो आपण !
सालं, मूल्य कुठलं ?चप्पल कुठली ?
नक्की कोण कुणाला मारतय ?
माझच खेटरं आता माझ्याकडे
पाहून खुदुखुदु हसतय!
आज चांगलीच तोंडात बसली
माझा मीच म्हणालो .
आणि नव्या चपला घेऊन
जुन्या पायात घालून निघालो !
==============
अतृप्त . .
प्रतिक्रिया
13 Aug 2024 - 8:58 am | कंजूस
हल्ली कविता भावूक होऊ लागल्या आहेत.
खट्याळपणा हरवत चालला आहे.
मागे मागे वळून बघण्याचं वय सुरू झालंय
खेटरं नवीन पण पावलं जुनी होत आहेत.
13 Aug 2024 - 9:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत. कवीच्या पूर्वजीवनातील काव्य पाहता ही वेगळ्या धाटनीची कविता.
कवीच्या भूतकाळातील जाणीवा लक्षात घेवून काव्याचा आस्वाद घ्यावा काय ?
यावर चिंतन-मनन होऊ शकते.
कवीचं आनंदमयी जीवन जाऊन आता संसारातील कारुण्य कवितेत येते.
साध्या 'चपला'ही कवीस वेदना देत आहेत, हे फार दु:खदायक आहे,
तरल भावकाव्य भिडले. लिहिते राहा. पुलेशु. :)
-दिलीप बिरुटे
13 Aug 2024 - 9:02 am | कंजूस
माझाच वर्गमित्र
हाकेला आता ओ देत नाही ......मनोबा.
इतरांना हाका घालण्यात
जुन्यांना तो विसरत आहे.
स्वतःला सावरण्यात
ओळख आणि चिन्हं हरवत आहेत
13 Aug 2024 - 10:55 am | कर्नलतपस्वी
कधी कुठं चप्पल काढायची याचं भान हवं
कधी,कुठली चप्पल घालाची याचं ज्ञान हवं
एकवेळ चप्लेचं ठिक, पण अस्मितेच काय?
कधी ती पण बाहेर ठेवावी लागते, नस्तो काही उपाय.
म्हणतात ना,सत्तेपुढे शहाणपण चालत नाय
आवडली.
14 Aug 2024 - 7:13 am | प्रचेतस
भावगंभीर तरल काव्य रचना. कवीचा एकूण काव्यक्षेत्रातला एकूण प्रवासच ही कविता संगते आहे असे वाटून गेलं. चपलांच्या ह्या काव्यात कवीने खुबीने आजकालच्या जगात विरून जाणारी धर्ममुल्ये पेरली आहेत.
14 Aug 2024 - 10:46 am | गवि
सहमत. आणि यात असलेली व्यामिश्रता, त्यातील खोली आणि एक नवीन मिती तुझ्या नजरेतून कशी सुटली?
21 Aug 2024 - 11:18 am | अत्रुप्त आत्मा
@चपलांच्या ह्या काव्यात कवीने खुबीने आजकालच्या जगात विरून जाणारी धर्ममुल्ये पेरली आहेत. >>>>> ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु :P
14 Aug 2024 - 8:28 am | कंजूस
ही हरेश्वरची दिवादांडी* आहे.
*दिवादांडी* - लाइट हाऊस.