(चार दिवस मिळाले असता )

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
14 May 2024 - 7:10 am

पेरणा
वाचक सुज्ञ आहेत.

बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे
दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे

फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने
उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने

हे माझे भाग्य आहे,मित्रांसवे बसाया मिळाते
हरीवंशा विन मधुशालेचे महत्व कुणाला कळते

दुःख ना फटके आसपास आपले अथवा परक्याचे
का जाया करता,साधन हेच आहे,आनंदी जगण्याचे...

चार दिवस मिळाले असता चारजणांसवे घालवावे
इहलोकीचे तन,मन,धन इहलोकीच व्यतीत करावे

चार दिवस मिळाले असतां,खाऊन पिऊन जगावे
फुका शब्दच्छल करूनी का लोकांस उगा पिडावे?

आनंदकंद वृत्तउकळीविडंबन

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

14 May 2024 - 7:21 am | कर्नलतपस्वी

विडंबन हा मुळ कलाकृतीचा सन्मान असतो.

कृ. ह. घ्या.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2024 - 7:33 am | अमरेंद्र बाहुबली

आवडले

चार दिवस म्हणजे नेमके कोणते? आयुष्य चार दिवस असे समजून की पालथ्या तांब्याचे चार दिवस?

कर्नलतपस्वी's picture

14 May 2024 - 7:47 pm | कर्नलतपस्वी

एकविसावी शताब्दी आहे. तांब्या केव्हाच संग्रहालयात पोहचला आहे.

अहिरावण's picture

15 May 2024 - 10:28 am | अहिरावण

अरे बापरे ! चार दिवसांची "गरजच" संपली? जैव तंत्रज्ञान भलतेच पुढे गेलेले दिसतेय !! हर हर !!

चला ! चांगलंय !! जे जे होईल ते ते पहावे... :)

निसर्गात उत्क्रांती होते म्हणतात मग काहीही होऊ शकेल. शेपूट नाही का गळाली. आता बिना शेपटीचाच "शेपुट घालणे", हा वाक्प्रचार वापरावा लागतो.

अहिरावण's picture

16 May 2024 - 9:51 am | अहिरावण

>>> मी फक्त तांब्या बद्दल बोललोय.

अच्छा ! हे असं होतं बघा... "बसलं" की तारे तोडले जातात... असो. तुम्ही आहात म्हणून सांभाळून घेत आहात.

चौथा कोनाडा's picture

14 May 2024 - 5:34 pm | चौथा कोनाडा

आम्ही सुज्ञ वाचकांपैकी नाही.
मुळ प्रेरणा कळेल का ?

कर्नलतपस्वी's picture

14 May 2024 - 8:03 pm | कर्नलतपस्वी

आम्ही सुज्ञ वाचकांपैकी नाही

तुम्हांला शंका असेल मला नाही. तरी पण मागितली आहे तर ही घ्या.

https://www.misalpav.com/node/52184

चौथा कोनाडा's picture

15 May 2024 - 5:17 pm | चौथा कोनाडा

धन्यू कर्नलभाऊ !
अमंळ निराशा झाली .... ओरिजनल पेक्षा लैच उजवी आहे ! :-)

बसावे फक्त मित्रां सोबत अशी कल्पना आहे
दोन वेळा मधुशाले सोबत जिणे महनता आहे
फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने
उज्वल भविष्याचा मार्ग दावला हर प्याल्या,चकण्याने

व्वा, क्या बात ... माशाल्ला .. हृदयस्पर्शी ओळी !
कधी योग येतात ते काय माहीत ?

एक लघूशंका:

दोन वेळा

दिवसातुन ?

कर्नलतपस्वी's picture

15 May 2024 - 5:49 pm | कर्नलतपस्वी

दुपारी साॅफ्ट ड्रिंक लाईक बियर,जीन,व्होडका,वाईन (आमच्या सारखा एखादा कोकाकोल एम्बेडेड म्हातारा साधू)

संध्याकाळी हार्ड ड्रिंक्स लाईक सोलन न १,पिटर स्काॅट, पाईपर 3XXX (NOT THAT WHAT FIRST IMPRESSION VOMES IN MIND )इ.

म्हणून दोन वेळी....

गेले ते दिन गेले

चौथा कोनाडा's picture

16 May 2024 - 12:12 pm | चौथा कोनाडा

छान ! यादी छानच आहे !

"गेले ते दिन गेले" म्हणत त्या रम्य दिवसांची आठवण काढत सुख उपभोगणे आवडले आपल्याला !

भागो's picture

15 May 2024 - 9:59 pm | भागो

umr-e-darāz maañg ke laa.ī thī chaar din

do aarzū meñ kaT ga.e do intizār meñ

a long life, four days in all, I did negotiate

two were spent in hope and two were spent in wait