सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.
प्रतिक्रिया
2 Mar 2024 - 7:23 pm | चित्रगुप्त
-- अगदी खरे. भावनेच्या भरात मनात आले ते लिहीण्यातून लेखक/प्रतिसादकर्त्याविषयीचा आदर वाचकांच्या मनातून ओसरत जातो, याचे भान बाळगून, विचारपूर्वक प्रतिसाद देणे श्रेयस्कर. आचरट हिंदी चॅनेलांनी प्रचलित केलेले 'गोदी मिडिया' वगैरे सारखे शब्दही मिपासारख्या दर्जेदार मराठी संस्थळावर वाचणे कसेतरीच वाटते. त्यापेक्षा त्या अर्थाचे चपखल मराठी शब्द न मिळाल्यास स्वतः निर्माण करावेत. कोणत्याही प्रकारच्या लेखनाचा/संस्थळाचा दर्जा या अश्या लहान-सहान बाबींमधूनही घडत-बिघडत असतो.
2 Mar 2024 - 10:02 pm | अमरेंद्र बाहुबली
जसं तुम्हाला माहीतच नाही. :)
2 Mar 2024 - 7:57 pm | अहिरावण
>>>गोदी मिडीयाच्या बातम्या फक्त अंधांनाच सत्य वाटतात
आपणास डोळे आहेत ही चांगली बाब आहे. अभिनंदन
2 Mar 2024 - 8:23 pm | रात्रीचे चांदणे
गोदी मीडिया म्हणणं कदाचित चूक असेल नसेल पण आपल्या देशातील बहुतांश हिंदी आणि इंग्लिश चॅनल्स ही भजपाला सोयीस्कर भूमिका घेत आहेत.
2 Mar 2024 - 10:09 pm | चित्रगुप्त
'गोदी मीडिया' वर विश्वास न ठेवणारी 'पब्लिक' 'जिहादी मीडिया' वर ठेवत असावी का ?
2 Mar 2024 - 10:22 pm | अमरेंद्र बाहुबली
कुठलाच मायेचा पूत ध्रूव राठीला चुकीचं सिध्द करू शकला नाही. ह्यावरूनच कळतं का गोदी मिडीयाने किती चाटाचाटी केलीय.
6 Mar 2024 - 4:14 pm | वामन देशमुख
इथे तर ते साफ चूक सिद्ध झालेले दिसताहेत!
20 Fake Claims of the so called ‘Neutral’ Youtuber Dhruv Rathee
---
अवांतर: काही मिपाखरं हल्ली "मायेचा पूत", "चाटाचाटी" अशीही भाषा वापरताहेत हे पाहून एक किरकोळ मिपाखरू म्हणून कमालीची लाज वाटली.
13 Mar 2024 - 4:11 pm | वामन देशमुख
काहीतरी खोट्या पिंका टाकून जायच्या आणि चांगल्या ज्येष्ठ मिपाखरांवर फुसकुल्या सोडण्याचे आरोप करत सुटायचे!
अर्थात उडदामाजी काळेगोरे असणारच, मिपाखरे काही अपवाद नाहीत!
6 Mar 2024 - 2:40 pm | मुक्त विहारि
Terrorism: पन्नू ने करतारपुर और राजस्थान सीमा पर जुटाया हथियारों का जखीरा! किसान आंदोलन को भड़काने की साजिश
https://www.amarujala.com/india-news/terrorism-khalistani-terrorist-gurp...
-------