शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती

जानु's picture
जानु in राजकारण
9 Dec 2020 - 10:43 pm

सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्‍यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्‍याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्‍याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्‍यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्‍यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्‍या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

19 Nov 2021 - 12:02 pm | मुक्त विहारि

अगदी अगदी

श्रीगुरुजी's picture

19 Nov 2021 - 12:17 pm | श्रीगुरुजी

कितीही दिलं आणि काहीही केलं तरी शेतकऱ्यांच्या तक्रारी थांबणार नाहीत.

आग्या१९९०'s picture

19 Nov 2021 - 3:40 pm | आग्या१९९०

काय दिलं हो शेतकऱ्यांना ह्या सरकारने? जीएसटी आणताना शेतकऱ्यांचा विचार केला होता का ह्या सरकारने? साधं उदाहरण : शेतीकरता घेतलेल्या वस्तूवर शेतकरी GST भरतो,परंतु त्याचे उत्पादन विकताना त्याला GST setoff मिळतो का? उत्पादक असूनही शेतकऱ्याचा १०० % GST सरकार हडप करते. शेतकरी सोडल्यास सगळेच उत्पादक GST परतावा घेऊ शकतात.

श्रीगुरुजी's picture

19 Nov 2021 - 4:22 pm | श्रीगुरुजी

फुकट वीज, कर्जमाफी, आयकर माफी . . . अजून किती हवं?

आग्या१९९०'s picture

19 Nov 2021 - 4:37 pm | आग्या१९९०

फुकट वीज? केंद्र सरकार भरते का शेतकऱ्यांचे वीजबिल ? शेतकरीच भरतो त्याचे कृषी वीजबिल.
आयकर लावावा केंद्राने शेतकऱ्यांना. फक्त शेतकऱ्यांकडून कसा वसूल करायचा ह्याचा अभ्यास करावा.
संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांकडून किती GST वसूल करते केंद्र सरकार ह्याचाही हिशोब द्यावा. शेतकरी काहीच फुकट घेत नाही सरकारकडून.

श्रीगुरुजी's picture

19 Nov 2021 - 5:07 pm | श्रीगुरुजी

फक्त महाराष्ट्रातच कृषीपंप विजबिलाची थकबाकी ५०,००० कोटींहून अधिक आहे. आयकर तर नाहीच. आणि कर्जमाफीचं काय?

आग्या१९९०'s picture

19 Nov 2021 - 5:29 pm | आग्या१९९०

५०,००० कोटी हा आकडा खोटा आहे. लवकरच बातमी येईल ह्यावर. कृषि वीजबिलमाफी आणि कृषी कर्जमाफी हे राज्यसरकार देते, केंद्राचा काहीही संबंध नाही.
शेतकऱ्यांवर आयकर केंद्राने लावावा हे मी वर म्हटलेच आहे. शेतकऱ्यांकडून वसूल केलेल्या GST बद्दल बोला की.

श्रीगुरुजी's picture

19 Nov 2021 - 6:02 pm | श्रीगुरुजी

जूनमध्येच थकीत बिल ६३००० कोटी होते.

https://m.timesofindia.com/city/mumbai/with-rs-63740-power-bill-arrears-...

कर्जमाफी केंद्र व राज्य या दोघांकडूनही होते. आयकर तर नसतोच. याशिवाय अजूनही काय हवं?

आग्या१९९०'s picture

19 Nov 2021 - 6:46 pm | आग्या१९९०

GST input credit देणार का शेतकऱ्यांना? केंद्राचा विषय आहे हा. मुख्य म्हणजे झेपेल का केंद्र सरकारला?

धर्मराजमुटके's picture

19 Nov 2021 - 6:50 pm | धर्मराजमुटके

GST input credit कसे घेता येते ?

आग्या१९९०'s picture

19 Nov 2021 - 7:08 pm | आग्या१९९०

तुम्ही उत्पादक असाल, वस्तू आणि सेवा घेत असाल तर तुमच्या CA ला विचारा. खरेदी पावत्या जपून ठेवा.

पण मग त्यासाठी मी जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत असले पाहिजे ना ? शेतकरी जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत असतात काय ?

आग्या१९९०'s picture

19 Nov 2021 - 9:41 pm | आग्या१९९०

हा प्रश्न केंद्र सरकारला पडायला हवा. GST आणताना मध्यम आणि छोट्या शेतकऱ्यांचा विचारच केला नाही.

धर्मराजमुटके's picture

19 Nov 2021 - 9:47 pm | धर्मराजमुटके

माफ करा पण जीएसटी आणि शेतकर्‍यांचा काय संबंध कळाले नाही. या अगोदर वॅट आणि त्याच्या अगोदर सेल्स टॅक्स होता. त्याचा देखील शेतकर्‍यांशी काय संबंध होता कळाले नाही.

आग्या१९९०'s picture

19 Nov 2021 - 10:09 pm | आग्या१९९०

बरोबर आहे ,तेव्हा पावती न घेता टॅक्स सोडून वस्तू विकत घेता येत होती. आता ट्रॅक्टरपासून दूध काढणी यांत्रापर्यंत gst भरून खरेदी करावी लागते.
शेतकऱ्याला सरकार अमुक फुकट तमुक फुकट देते असे म्हणणारे शेतकऱ्याच्या अप्रत्यक्ष कराच्या योगदानाबद्दल काहीही बोलत नाही म्हणून GST चा मुद्दा आला. असंही सरकारला शेतकऱ्यांचे भले व्हावे असे वाटत असेल तर शेतकऱ्यांना आयकर लावावा आणि त्याच्या कृषि उत्पादनाला GST लावावा. सगळ्या सबसिडी काढून टाकल्या तरी हरकत नाही.

श्रीगुरुजी's picture

19 Nov 2021 - 10:22 pm | श्रीगुरुजी

अप्रत्यक्ष कर सगळेच भरतात. पण आयकर माफी, वीजबिल माफी, कर्जमाफी काही ठराविक लोकांनाचमिळते.

सरकारने भूतकाळात कधीही आपला टॅक्स सोडलेला नव्हता, आजही सोडत नाही आणि भविष्यात देखील सोडणार नाही.
जीएसटी मुळे मधे चोरी करणार्‍यांना त्रास होतो आहे हेच खरे.
उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो.
समजा शेतकरी हा उत्पादक आहे. पुर्वीच्या टॅक्स नियमांप्रमाणे उत्पादकाला सेल्स टॅक्स / मुल्यवर्धित टॅक्स- वॅट तर भरावा लागतच होता. त्याबरोबरच जास्तीची एक्साईज ड्युटी देखील भरावी लागत होती. त्याशिवाय प्रत्येक राज्याच्या नियमाप्रमाणे जकात / लोकल बॉडी टॅक्स इ. विविध प्रकारचे कर भरावे लागत होते. ह्या सगळ्या करांचे एकूण प्रमान २०% किंवा त्यापेक्षा देखील जास्त भरत होते.
हे सगळे कर शेतकर्‍याला देखील भरावे लागले असते. आजच्या नियमाप्रमाणे जीएसटी भरावा लागला असता.

कोणत्याही उत्पादकाला पुर्वी देखील १००% टॅक्स चोरी करणे कधीच शक्य नसायचे आणि आज जवळजवळ अशक्य बनले आहे.
मात्र ह्या सगळ्या करखात्यांचा एकमेकांशी होणार्‍या व्यवहारात पुरेशी पारदर्शकता नसायची.

जेव्हा उत्पादक, डिस्ट्रीब्युटर ला माल देतो तेव्हा तो कर लावतच असतो.
डिस्ट्रीब्युटर पुढे डिलर ला माल देतो तेव्हा तो पण कर लावतच असतो.
खरी चोरी डिलर पासून पुढे चालू व्हायची. डिलर अंतिम ग्राहकाकडून कर वसूल करायचाच मात्र अंतिम ग्राहकाला कर लावलेले बिल देत नसे. जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत अंतिम ग्राहकाला १०० रुपये सांगीतले जाते त्यात कर अंतरभूत असतोच मात्र ग्राहकाने कर लावलेले बिल मागीतले की त्याच्याकडून जास्तीचे पैसे उकळले जायचे. त्यामुळे ग्राहक देखील बिना पावतीचा माल खरेदी करुन पैसे वाचवल्याच्या खोट्या समाधानात असतो. त्यामुळे पहिले बिना टॅक्स चा माल मिळत होता ही अंतिम ग्राहकाची केवळ दिशाभूल होती. सरकारचे यात नुकसान होत होतेच आणी अंतिम ग्राहकाला खोटा दिलासा दिला जात होता.

जीएसटी मधे याला बर्‍याच प्रमाणात आळा बसलेला आहे.

आता शेतकर्‍याला एक व्यावसायिक म्हणून जीएसटीचा परतावा हवा असेल तर खालील गोष्टी कराव्या लागतील.

१. त्याला सर्वप्रथम एक व्यावसायिक आस्थापना म्हणून नोंदणी करावी लागेल.
२. त्यानंतर त्याला बँकेत चालू खाते उघडावे लागेल ज्यात करोडो रुपये असले तरी त्याला एक रुपया देखील व्याज मिळत नाही.
३. त्यानंतर त्याला जीएसटी साठी नोंदणी करावी लागेल. वरील ३ मुद्यांसाठी खर्च साधारण ५००० ते १०,००० पर्यंत आहे.
४. आता दर महिन्याचा ११ तारखेपर्यंत किती विक्री केली त्याची नोंद सादर करावी लागेल.
५. दर महिन्याच्या २२ तारखेपर्यंत किती खरेदी केली त्याची नोंद सादर करावी लागेल.
६. हे सगळे शेतकरी स्वतः करु शकणार नाही तर त्याला एखाद्या व्यावसायिकाची मदत घ्यावी लागेल ज्याची मासिक फी रु. ५०० ते जास्तीत जास्त कितीही असू शकेल.
७. त्यानंतर वार्षीक नोंद / अहवाल सादर करावा लागेल.
८. जीएसटी नोंद झाली म्हणजे आयकर भरावाच लागेल. मग त्यासाठी परत ५०० ते जास्तीत जास्त कितीही खर्च असू शकतो.
९. एकदा व्यावसायिक झाला की त्याला नोकरदारासारखं वागव येत नाही. दर चार महिन्यांनी अ‍ॅडव्हास इन्कम टॅक्स भरावा लागतो. सगळे कर वेळच्या वेळी भरले नाही तर दंड भरावे लागतात. जीएसटी, व्यवसाय कर, आयकर सगळेच कर भरावे लागतात शिवाय कामगार, कंत्राटदारांकडून पैसे कापून सरकारला द्यावे लागतात.
१०. एकदा व्यावसायिक आस्थापना म्हणून नोंद झाली की प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो. रोख रकमेच्या वापरावर मर्यादा येतात.
११.साधारण अगदी लहानात लहान व्यावसायिकाला देखील सरकारी व्यवहारांची पुस्तके सांभाळण्यासाठी किमान २५,००० वार्षिक खर्च येतो.

आपण जे अप्रत्यक्ष कर भरतो त्यात पैसा जातो पण डोक्याला बाकी त्रास नसतो. तुम्हाला कोणी हिशोब विचारायला येत नाही.

हे सगळे करता करता भिक नको पण कुत्रं आवर म्हणायची पाळी येते. तेव्हा शेतकर्‍याने ह्या गोष्टींच्या मागे लागू नये. जे चाललेय ते ठीक आहे. तेव्हा जीएसटी इनपूट च्या मागे लागू नका. आतबट्याचा व्यवहार होईल.

आग्या१९९०'s picture

20 Nov 2021 - 12:13 am | आग्या१९९०

असं कसं ? छोटे व्यावसायिक धंदा चालू रहावा म्हणून gst नोदणी करतातच ना? नोंदणी नसेल तर कोण खरेदी करेल त्यांच्याकडून? त्यांना हा वाढीव खर्च परवडतोच ना? शेतकऱ्यांना आयकर आणि gst न लावण्यामागे
खरे कारण आहे कृषि मालाचे उत्पादन मूल्य ठरविण्याचे. सरकारला ते एकदा मान्य करावे लागले की msp चे भूत मानगुटीवर बसेल ह्याची भीती आहे. सरकारने शेतीला उद्योग दर्जा द्यावा. इतर उद्योगांना जे जे कर आहेत तेही लावावेत. शेतकऱ्यांच्या क्षमतेची काळजी करू नये. विषय क्लिष्ट आहे पण अशक्य अजिबात नाही.

हो. पण ती त्यांची मजबूरी आहे. मात्र ४० लाखांपे़क्षा कमी उलाढाल असलेले व्यापारी जीएसटी नोंदणी न करता व्यवसाय करु शकतात. पण ते इनपुट क्रेडीट घेऊ शकत नाही. कायद्याने शेतकर्‍याला जीएसटी नोंदणी करण्यास प्रतिबंध नाही. कोणत्या शेतकर्‍याची इच्छा असल्यास ते नोंदणी करुन अनुभव घेऊ शकतात.

आग्या१९९०'s picture

20 Nov 2021 - 8:56 am | आग्या१९९०

परंतु त्याचा कृषीमाल gst मुक्त असल्याने मर्यादा येतील इनपुट क्रेडिटवर.
मागे COVID लसींच्या किंमती कमी करण्यासाठी त्यावरील GST शून्य करायचं ठरले होते,परंतु लस उत्पादकांनी इनपुट क्रेडिट मिळणार नाही म्हणून त्याला विरोध केला होता. शेवटी ५% GST लावला गेला.

धर्मराजमुटके's picture

20 Nov 2021 - 9:48 am | धर्मराजमुटके

कृषीमाल gst मुक्त असल्याने मर्यादा येतील इनपुट क्रेडिटवर.

नुसते इनपुट क्रेडीट घ्यायचे म्हणून शेतमालाच्या विक्रिवर जीएसटी लावला तर शेतमालाचे भाव अजुन वाढतील.
म्हणूनच जीएसटीचा संबंध शेतकर्‍यांशी जोडल्यास तो आतबटटयाचा व्यवहार ठरेल असे पहिल्या प्रतिसादात म्हटले होते.
शिवाय एकदा कागदी घोडे नाचवायला घेतले की ते शेवटपर्यंत नाचवावे लागतात.
त्यापेक्षा शेतकर्‍यांना आयकराच्या कक्षेत आणले तर जे जास्त योग्य ठरेल आणि सरकार आणि शेतकरी दोघांनाही सोयीस्कर (फायद्याचे असेलच असे नाही) ठरेल.

आग्या१९९०'s picture

20 Nov 2021 - 11:02 am | आग्या१९९०

नुसते इनपुट क्रेडीट घ्यायचे म्हणून शेतमालाच्या विक्रिवर जीएसटी लावला तर शेतमालाचे भाव अजुन वाढतील.
You said it!
त्यापेक्षा शेतकर्‍यांना आयकराच्या कक्षेत आणले तर जे जास्त योग्य ठरेल आणि सरकार आणि शेतकरी दोघांनाही सोयीस्कर (फायद्याचे असेलच असे नाही) ठरेल.
किती परस्परविरोधी आणि सोयीचे बोलता. आयकर लावण्यासाठी नफा कसा मोजणार? शेतमालाचे भाव वाढू नये म्हणून GST लावायचा नाही.मग आयकर कृषी विम्याप्रमाणे " आणेवारी " काढून ठरवणार का? एक ट्रॅक्टर खरेदी केला तर कमीतकमी ९० हजार GST भरतो शेतकरी,तो सगळा सरकारच्या तिजोरीत.बाकीचे उद्योजक आयकर भरतात त्यांना GST input credit द्यायचे. कृषीमाल महाग होणार म्हणून शेतकऱ्याला GST इनपुट क्रेडिट पडून दूर ठेवायचे? हा कुठला न्याय? शेतकऱ्यांकडून आयकर घ्या आणि GST इनपुट क्रेडिटही द्या.

किती परस्परविरोधी आणि सोयीचे बोलता.

तुम्हाला वाटले तरी परिस्थिती तशी आहे. आयकर मोजण्यासाठी जीएसटी कशाला हवा ? वकील लोक आयकर कसा भरतात ? डॉक्टर लोक (मी हॉस्पीटलबद्दल बोलत नाही.) आयकर कसा भरतात ? किंवा कोणताही प्रोफेशनल सर्विस मधे गणला जाणारा व्यक्ती आयकर कसा भरतो याचे उत्तर तुम्हाला माहित असेल तर त्याचप्रमाणे शेतकरी देखील आयकर भरु शकतो.

एक ट्रॅक्टर खरेदी केला तर कमीतकमी ९० हजार GST भरतो शेतकरी.

तुमच्या या विधानातून बहुधा शेतकर्‍यालाच इनपुट क्रेडीट न मिळाल्यामुळे त्याचे नुकसान होते असा अर्थ निघतो. पण कोणत्याही क्षेत्रातील अंतिम ग्राहक असेल तर त्याला इनपुट क्रेडीट मिळतच नाही. त्याला फक्त शेतकरी अपवाद नाही. मी किंवा शेतकर्‍याने घरात वापरायला टिव्ही घेतला तर त्याला इनपुट क्रेडीट मिळत नाही म्हणून वाईट
वाटावे काय ?

GST इनपुट क्रेडिटही द्या.

तुम्हाला GST इनपुट क्रेडिट इतके आकर्षक का वाटते ते समजत नाही. तुम्ही व्यावसायिक आहात की नोकरदार माहित नाही. पण तुम्ही समजता तेवढा फायदा यात मिळत नाही. किंबहूना तो फायदा मिळविण्यासाठीचे पेपरवर्क करण्यात लहान व्यावसायिकांची (आणि शेतकर्‍यांना हवे असेल तर) त्यांचीसुद्धा बरीचशी उर्जा आणि पैसा खर्च होतो.

शेतमालाचे भाव वाढू नये म्हणून GST लावायचा नाही

वाढिव किंमतीचा फायदा शेतकर्‍याला मिळत असता तर माझे काहीच म्हणणे नाही. मात्र ह्या वाढीव किंमतीमुळे शेतकर्‍याला काही फायदा होईल असे वाटत नाही.

असो.

सरकारने शेतीला उद्योग दर्जा द्यावा.
अनि फक्त संकटकाळी थोडी मदत करावी किंवा निर्यातीसाठी मदत जगातील एका शेती निर्यात मोठी करणाऱ्या देशातील परिस्थिती पाहून लिहितोय

श्रीगुरुजी's picture

19 Nov 2021 - 10:02 pm | श्रीगुरुजी

GST returns शेतकऱ्यांनी नियमित भरले तर input credit मिळेल.

GST returns शेतकऱ्यांनी नियमित भरले तर input credit मिळेल.

यात शेतकर्‍यांना कसा काय फायदा होईल कळाले नाही. हा तर आतबट्याचा व्यवहार होईल ना ?

आग्या१९९०'s picture

19 Nov 2021 - 10:13 pm | आग्या१९९०

कसा काय?

चौकस२१२'s picture

23 Nov 2021 - 3:17 am | चौकस२१२

बरोबर
पण कोणत्याही क्षेत्रातील अंतिम ग्राहक असेल तर त्याला इनपुट क्रेडीट मिळतच नाही. हे पन

शेतीकरता घेतलेल्या वस्तूवर शेतकरी GST भरतो,परंतु त्याचे उत्पादन विकताना त्याला GST setoff मिळतो का?
शेतकरी कोणाला विकतोय अंतिम ग्रहकाला? कि होलसेल विक्रेत्याला?
त्यावर हे अवलंबून नाही का ?

गणेशा's picture

19 Nov 2021 - 1:13 pm | गणेशा

अरे पण हे terrorist होते ना?
मोदी terrorist समोर झुकले काय निवडणुका पाहून?
अवघड आहे..

मोदी जी ने किया होगा तो कुछ सोच समज के हि किया होगा..
थोडा time जादा लगा.. But चलता है..

Masterstoke.. आता सगळ्यां शेतकऱ्यांचे आणि ग्राहकांचे पण कंबरडे मोडून पडेल आणि त्यांना गप्प बसावे लागेल..

आग्या१९९०'s picture

19 Nov 2021 - 2:12 pm | आग्या१९९०

"आंदोलनजीवी" अशी हेटाळणी केली होती ना पंतप्रधानांनी ? ते प्रिय कसे झाले अचानक? एक चांगले केले आंदोलनजीवींशी चर्चा न करता कृषी कायदे मागे घेऊन थोडीफार लाज राखली. असेही त्या कायद्यात दम नव्हताच.

आंदोलक खलिस्तानी होते म्हणणार्या आयटी सेलची लाज तरी राखायला हवी होती ब्वा.

चौकस२१२'s picture

23 Nov 2021 - 3:15 am | चौकस२१२

कॉ भय्या
तुम्ही आय ती सेल म्हणून अवहेलना करा हवे तर पण जे दिसले त्यावर बोलतोय , भारतातही विडिओ द्वारे आणि परदेशात जे प्रत्यक्ष जाणवले ते
आणि एवढे करून कायदा कसा चुकीचा होता ते सांगितलेच नाही !
असो हे आंदोलन अगदी खरे असले असे गृहीत धरले आणि पंजाबात खूप शेती आहे हे हि खरे असले तरी खालील मुद्दे विसरता येत नाहीत
१) भारताबाहेर आंदोलनाचं पाट्या गुरुमुखीतून का? देशभर काही पंजाबी बोलली जात नाही २) धार्मिक शिकांची चिन्हे का? निशांग का काय म्हणतात ते
३) मेलबर्न क्रिकेट ग्रॉऊंडनं वॉर सुरवातीला जेव्हा निदर्शन झाली तेव्हा १९८४ चा उल्लेख का? काय संबंध
४) सिडने ला हर्षी पार्क ला तिरंगा रॅली ( भारतोयांनी काढलेली) त्याला विरोध शिकांकडूनच का?
५) ब्रिस्बेन गुरुवंदरातून शिकांच्यातच झालेलया मारामारीचे खरे कारण ( भारताशी निगडित असलेली शीख आणि नवीन पिढी यातील वाद)
६) ऑस्ट्रेलयातील दिवाळी कार्यक्रमात फक्त पंजाब चाय समूहाने फार्मर वैगरे घोषणा दिलाय स्सतेज वॉर, केरळ, मराठी , बंगाली नि नाही? का तिथे फार्मर नाहीत ? त्यांचे नातेविकं इथे नाहीत
६) ऑस्ट्रेलियन फार्मर या नावाखाली सहानुभूती मिळवतात येथे पण त्यात एकही खरा ऑस्ट्रेलियन फार्मर दिसत नाही ( हेतू हा असतो कि अडानि ला येथे जो विरोध आहे त्यात आपली पण पोळी भाजून घ्यायची अडाणी = मोदी इत्यादी नेहमीचे धिंगरी रडगाणे

जगभर शिख समुदायाला भारतीय हिंदूंचाय विरुद्ध भडकवत जातंय हे तुम्हाला भारतात कदाचित दिसत नसले किंवा फरक पडत नसेल कारण तिथे जेमतेम २ टक्के शीख आहेत पण येथे त्यामानाने खूप % आहे आणि ते त्यांचं संख्येचं मानाने जास्त आवाज उठवतात
तेवहा उगा आय ती सेल म्हणून ओरडून काही होणार नाही

कॉमी's picture

19 Nov 2021 - 2:55 pm | कॉमी
कपिलमुनी's picture

19 Nov 2021 - 3:11 pm | कपिलमुनी

एकही हात है, मोदी जी
कितने स्ट्रोक मारोगे?

कॉमी's picture

22 Nov 2021 - 11:03 pm | कॉमी

धन्यवाद
(r/sarcasm)

ह्या बाबतीत सहमत आहे ....

पण सर कायद्यामध्ये काय चुकीचं होत हे तुम्ही शेवट पर्यंत सांगितलंच नाही.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2021 - 8:14 pm | मुक्त विहारि

पण, दलाल जिंकले आणि मोदी हरले, अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे....

दलाल लोकांची वाट लागली असती ... शेतकर्‍याला योग्य मोबदला मिळाला असता . . .
यापेक्षा अजुन काय वाईट असु शकते . .

धनावडे's picture

20 Nov 2021 - 7:30 am | धनावडे

मला ही तेच म्हणायच आहे, हे आपल्या कळतय पण सरांना का नाही कळत, की नोटबंदी ची जखम अजून बरी नाही झाली..

हे आंदोलन देशद्रोह्याचं आहे, अतिरेक्यांचं आंदोलन म्हटल्या गेले जे की चूक होते.
तुमचं जिल्ह्यात नसेल तसे हो पण जगात इतरातर तेच चालू आहे पण तुम्ही ते बघणार नाही कारण आता उन्माद असेल ना मोदी ला हरवले याचा...
बार कायदा नक्की चुकायचा का? हे कोण सांगणार

कपिलमुनी's picture

19 Nov 2021 - 1:59 pm | कपिलमुनी

शेठ घाबरला,
आता पंजाब हरयाणा यूपी चे इलेक्शन आहेत.
त्यामुळे सेंटी मारतोय.

गोवा मणिपूर जाऊदे, पण युपी मध्ये तरी निवडणूक नको होती लका...
- कुणी तरी मास्टरस्ट्रोक मारलेला...

(खाटकांनी दिशाभूल केल्यामुळे)

बोकडांनी खाटकांची बाजू घेऊन सत्याग्रह केला होता.

तेंव्हा सरकारने नमते घेऊन बोकडांचा हलाल होण्याचा हक्क पुनः प्रस्थापित केला आहे.

कोणाला त्याचे काय वाईट वाटते आहे आणि का? हेच समजत नाही.

चित्रगुप्त's picture

21 Nov 2021 - 8:34 am | चित्रगुप्त

साम - दाम- दंड - भेद यापैकी सामोपचाराचा मार्ग खुंटला. आता 'दाम करी काम राणी करी सलाम' हा मंत्र अजमावून बघत टिकैत यांनी भाजपत येऊन मुख्यमंत्रीपद उपभोगावे अशी योजना असावी, असे 'ह्यांचे' मत.
- चित्राताईसाहेब गुप्तगंगातीरकर.

सुक्या's picture

21 Nov 2021 - 10:20 am | सुक्या

दलाल लोकांच्या मागण्या तर मान्य झाल्याच आहेत .. आत हे लोक बघा कसे मागण्या वाढवतात ते! एम एस पी हवी / फुकट वीज हवी / आम्ही काहीही करु आमच्यावरचे खटले रद्द करा / मेलेल्या दलालांच्या मुलांना सरकारी नोकरी किंवा पैशे द्या / स्मारक बांधायला जागा द्या / आमचे पाय दाबुन द्या / दारु पाजा ... वगेरे वगेरे ...
खरे दात आता दिसतील बैठकी नंतर !!

मजा अशी की जे अगोदर या आंदोलनाचे समर्थन करत होते ... आत बघु काय बोलतात ते . ..

दारु पाजा ... वगेरे वगेरे ...

अन्न परवडत नसेल तर, स्काॅच प्या....

कपिलमुनी's picture

21 Nov 2021 - 10:55 am | कपिलमुनी

किती तो जळफळाट

मुक्त विहारि's picture

21 Nov 2021 - 11:05 am | मुक्त विहारि

आई जेऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही ....

दलाल भाव देत नाही आणि सरकार खुल्या बाजारात विकू देत नाही ...

------

शाकाहारी कोंबडी खा, चकणा म्हणून, शाकाहारी अंडी खा आणि स्काॅच व्हिस्की प्या

-------