अंबानीचे लग्न: उधळपट्टी की गुंतवणूक

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
6 Mar 2024 - 4:36 pm
गाभा: 

मुकेश अंबानी ने मुलाच्या प्री वेडिंग सेरेमनी मध्ये 700 ते 1500 कोटी खर्च केले असे म्हटले जाते. अनेकांना प्रश्न पडला अशी पैशांची उधळपट्टी गुज्जू मुकेश अंबानी ने का केली असेल. हा पैसा गरिबांना वाटला असता किती उत्तम झाले असते.

गुजराती व्यक्ती कधीही पैसा व्यर्थ उडवत नाही. त्याची विचारसरणी त्याच्या सोबत त्याच्या समाजालाही जास्तीस जास्त फायदा झाला पाहिजे ही असते. जुनागड भगवान दततात्रेयांचे शक्तिपीठ आहे. अंबानी ने जुनागड मध्ये १४ मंदिरे बांधली. धार्मिक पर्यटन जुनागड मध्ये वाढणार. अंबानी ने चालवीत असलेल्या जानवरांच्या हॉस्पिटलचा प्रसार प्रचार ही भरपूर झाला. जुनागड चे आंबे ही प्रसिध्द झाले आहे. पर्यटक पाच दहा लिटरच्या बाटल्यांत पर्यटक सोबत घेऊन जाण्यासाठी आंब्याचे ज्यूस विकत घेतात. प्रसिध्द विदेशी पाहुण्यांना स्थानिक हस्तशिल्प इत्यादी उपहार दिले. गुजरातच्या हस्तशिल्पाची मागणी ही विदेशात वाढेल. त्याच्या फायदा जुनागड आणि गुजरातला होणार. गेल्या वर्षी सर्वात जास्त १८ लक्ष विदेशी पर्यटक गुजरात आले होते. त्यांची संख्या बहुतेक वीस ते पंचवीस लाख पर्यंत दोन-तीन वर्षात पोहोचणार, हे निश्चित. याशिवाय अंबानी त्या परिसरात विभिन्न व्यवसायात गुंतवणूक करेल. दुसऱ्या शब्दात खर्च केलेला पैसा आठ दहा वर्षात सूद समेत वसूल करणार. आपले काय मत आहे.

प्रतिक्रिया

बाय द वे...

हा खर्च म्हणजे, अंबानींच्या दृष्टीने एकदम किरकोळ खर्च..

अंबानींचे उत्पन्न...

९,३२,३४० कोटी रुपये...

त्याने खर्च केले १५०० कोटी...

म्हणजे जेमतेम... ०.१६%...

जाऊ द्या....

आपल्या कडे इतके रुपये नाहीत, म्हणुन काही लोकांचे रडगाणे आहे..

शिवाय , अंबानीने किती लोकांना रोजगार दिला? आणि जे रडत आहेत, त्यांनी किती लोकांना रोजगार दिला?

मित्तल कुटुंबाने देखील एका लग्नात प्रचंड खर्च केला होता आणि बॉलीवूड मधील कलाकार देखील लग्ना मध्ये प्रचंड खर्च करतात. तेंव्हा हे रडतराव का बोंबलले नाहीत?

वामन देशमुख's picture

6 Mar 2024 - 6:36 pm | वामन देशमुख

सहमत आहे.

हा पैसा गरिबांना वाटला असता किती उत्तम झाले असते.

या संदर्भात या विधानासारखे पराकोटीचे समाजवादी, कमालीचे समाजविघातक (द्विरुक्ती?), आत्यंतिक नकारात्मक, ठार तर्कशून्य दुसरे कोणते विधान नसेल!

श्रीमंतांनी अधिकाधिक पैसे खर्च केला तरच त्यातला बराचसा भाग गरिबांपर्यंत (== कमी श्रीमंतांपर्यंत) पोहोचतो.

---

साधारण मध्यमवर्गीयांची networth, स्वतःचे घर, वाहन, बँकेतील ठेवी, दागदागिने इत्यादी मिळून सुमारे दोन कोटी रुपये असते (चूभूदेघे). अपत्यांच्या लग्नात ते सुमारे १५-२० लाख रुपये खर्च करतात म्हणजे सुमारे दहा टक्के.

अंबानींनी त्यांच्या networthच्या किती टक्के खर्च केलाय?

माझा अंदाज, मी आधीच्या प्रतिसादात दिला आहे.

Google आणि www.xe.com वापरले..

अंबानींच्या लग्नाचा खर्च.... ०.१६%..

जास्त आनंद ह्या गोष्टीचा झाला की, काही लोकांना नाचवले... कोणे एकेकाळी, गोविंदा पण अभिनेता होण्या आधी, इतरांच्या लग्नात, पैसे घेवून नाचायचा.....

नाचने वाले से नचाने वाला बडा होता हैं...

अंबानीचा पैसा! त्याचा त्याने खर्च केला !! त्याच्याशी आपला काय संबंध? उगा पुरोगामी साम्यवादी लोकांसारखे रेकणे काय कामाचे?

आहे पैसे केले खर्च. ज्यांना नाचवता आले त्यांना नाचवले.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Mar 2024 - 7:59 pm | अमरेंद्र बाहुबली

अंबानीचा पैसा! त्याचा त्याने खर्च केला !! त्याच्याशी आपला काय संबंध? ऊगा सनातनी मनूवादी लेकांसारखे रेकणे काय कामाचे?

आहे पैसे केले खर्च. ज्यांना नाचवता आले त्यांना नाचवले.

अहिरावण's picture

6 Mar 2024 - 8:04 pm | अहिरावण

हॅ हॅ हॅ

सनातनी मनुवादी कधीच रेकत नाही. उलट लग्न आहे घरचं ! होऊ द्या खर्च !!

मस्त मांडव टाका, भटजी बोलवा ! पंगती उठू द्या !! थाट दिसु द्या !!! अशी विचारसरणी असते.

उगा आपला ५ रुपयांचा पेन घेऊन रजिस्टर हापिसात जाऊन सह्या करायच्या अन झालं म्हणे लग्न असली पुरोगामी विचारसरणी काय कामाची !

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Mar 2024 - 8:24 pm | अमरेंद्र बाहुबली

अनेक मनूवाद्यांचे पोट्टे जातीबाहेर लग्न करतात रजीस्टर ओफीस मध्ये जाऊन मनूवादी रेकतच राहतात. जातीभिमानी मनूवाद्याचे तोंड पाहण्यासारखे असते.

मनूवादी मनूवादी म्हणजे नेमके काय, कोण, हे मजसारख्या अज्ञ वाचकांना कळण्यासाठी मनुस्मृतीत नेमके काय काय आहे, यावर एक अभ्यासपूर्ण लेख लिहावा ही विनंती.

मिपाकर शरद काका यांनी खुप डिटेल लेखमाला लिहिली आहे ना..
मनुस्मृती अभ्यासावर
https://www.misalpav.com/node/40368
मी नरहर कुरुंदकर यांचं मनुस्मृती -काही विचार हे पुस्तक वाचल्यावर मिपावर उत्खनन केल्यावर ही लेखमाला सापडली.
पण यावर चर्चा करण्यात ऐसी अक्षरे..मेळवीन या माझ्या पुस्तक परिचय धाग्यात उल्लेख करणं म्हणजे जुने मढ उकरल्या सारख आहे तेव्हा मोह टाळला.
२१ व्या शतकात आहोत,आयटी बीटी आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करत जीवनमान उंचवाव!
उत्कट भव्य तेंचि घ्यावे । मळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणे विख्यात व्हावें । भूमंडळीं ।।

अहिरावण's picture

7 Mar 2024 - 10:27 am | अहिरावण

मनुवादी म्हणजे ब्राह्मण.
थेट ब्राह्मण म्हणता येत नाही म्हणून मनुवादी, सनातनी.
मुळात गेल्या शतकातील डाव्या डूकरांनी कर्मठ (ऑर्थोडॉक्स) या शब्दाऐवजी हेतुपुरस्सर सनातनी हा शब्द वापरला आणि हिंदू (एषः सनातन धर्मः मानणारे) लोकांना विशेषतः ब्राह्मणांना बदनाम केले. नवपुरोगामी लोक तोच कित्ता पुढे चालवत आहेत. कर्मठ वेगळे सनातनी वेगळे. पण लक्षात कोण घेतो !

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Mar 2024 - 10:35 am | अमरेंद्र बाहुबली

अरे बापरे! म्हणजे पंडीत नेहरू, विनोबा भावे, साने गुरूजी, फूलेंना वाडा देणारे भिडे, काॅंग्रेस मधले असंख्य ब्राम्हण नेते, सावरकर वगैरे असंख्य समाजसुधारक, नी लोकचळवळीतले नेते मनूवादी होते??
किती ती खालची पातळी गाठनार?? स्वतः मनूवादी आहात म्हणून सर्व ब्राम्हण जातीला मनूवादी घोषीत केलेत व्वा?? तुमच्या सारखे जातीवादी लोकच ब्राह्मण समाजाकडे इतर समाजांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलवतात.
ब्राह्मण समाजाला शत्रूंची गरज नाही, कारण आतच बरेच भरलेत.

अहिरावण's picture

7 Mar 2024 - 10:39 am | अहिरावण

तुम्ही असे जेमीनी एआयसारखे प्रतिसाद का देता हो? नीट वाचा सगळे आणि समजून घ्या !!

तुमचा प्रतिसाद हास्यास्पद आहे. अंगावर बाजी आली तर बोटावरची थुंकी इकडून तिकडे करण्यात पटाईत. चालू द्या तुमचे गरळ ओकणे... मी थांबतो.

या प्रतिसादावर पळून गेले, हरले, मीच जिंकलो असा प्रतिसाद देऊन तुम्ही पावशेर अधिक टाकू शकता. तुम्हाला तेवढे नक्की जमेल. बेस्ट ऑफ लक !!

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Mar 2024 - 11:01 am | अमरेंद्र बाहुबली

तुमच्या सारख्या ब्राह्मण समाजाला मनूवादी ठरवनार्यांशी काय बोलावे, करा ब्राह्मण समाजाची बदनामी.

अहिरावण's picture

7 Mar 2024 - 10:23 am | अहिरावण

हॅ हॅ हॅ

बाकी ते जाऊ द्या पण अंबानीच्या लग्नामुळे नवपुरोगाम्यांचे थोबाड पहाण्यालायक झाले होते आणि त्यात लै मज्जा आली.

वामन देशमुख's picture

6 Mar 2024 - 10:40 pm | वामन देशमुख

सनातनी मनूवादी लेकांसारखे रेकणे काय कामाचे?

सनातनी रेकतात? फारच विनोदी लिहिता भाऊ तुम्ही, अजून येऊ द्या!

अहिरावण's picture

7 Mar 2024 - 10:23 am | अहिरावण

सहमत

श्रीमंत खर्च करतील, तेंव्हाच ते कमी श्रीमंतांना मिळणार ना.
गरीब कोण ? तर ज्याला 'आणखी मिळायला हवे' असे वाटत असते तो. अशी ज्याला हाव नाही, तो श्रीमंत. मग त्याच्याकडे लौकिकार्थाने काही असो वा नसो.

श्रीमंत खर्च करतील, तेंव्हाच ते कमी श्रीमंतांना मिळणार ना.
गरीब कोण ? तर ज्याला 'आणखी मिळायला हवे' असे वाटत असते तो. अशी ज्याला हाव नाही, तो श्रीमंत. मग त्याच्याकडे लौकिकार्थाने काही असो वा नसो.

आग्या१९९०'s picture

6 Mar 2024 - 8:55 pm | आग्या१९९०

रिहानाला ७२ कोटी मिळाले. नाचो नाचो नाचायला शाहरुख , सलमान, आमिर खानावळीला बक्कळ पैसे मिळाले. अक्षय कुमारला प्रेक्षक आणि कंगनाला घरी फुसफूस करायला जे मिळाले त्यात ते खूष आहेत. माझ्या कंपनीच्या मालकाने हे गुंतवणूक म्हणून केले असल्यास एक भागधारक म्हणून मीसुद्धा खूष आहे.

गंमत म्हणजे टीका करणारेही लग्नाच्या पार्टीचे आमंत्रण टाळू शकले नाहीत. गुपचूप गेले आणि आल्यावर पत्रकार परिषद वगैरे घेतली नाही.
चमको लोकांनी चमकून घेतलं. इथे नाही चमकणार तर कुठे? नेहमी एक धुवट टीशर्ट घालणाऱ्याने चांगले कपडे घातले. मुख्य म्हणजे प्रत्येकाने शक्यतो एकच सूटकेस आणा सांगितलं होतं. नाहीतर दर दोन तासांनी पाहुण्यांनी नवेनवे कपडे घालून इन्स्टाग्रामवर फोटो टाकले असते.

______________
जाऊ द्या.
काश्मिरच्या नव्या रेल्वे मार्गाची माहिती टाका काका.

धर्मराजमुटके's picture

6 Mar 2024 - 9:51 pm | धर्मराजमुटके

मित्रहो, तुम्हाला माहित आहे का की मुकेश अंबानी श्रीमंत का आहेत ?
कारण त्यांच्या मुलाचा लग्नसोहळा चालू आहे. एवढे मोठे कार्य चालू असताना माझा जीओ चा रिचार्ज संपला तर मुकेशभाईंनी (जीओने) मला मेसेज केला की तुमचा रिचार्ज संपला आहे, लवकर रिचार्ज करा.
:) :)

कर्नलतपस्वी's picture

7 Mar 2024 - 6:34 am | कर्नलतपस्वी

कुकू(कुंकू) सांडलं म्हणून रंडकी का रडती
दुभती दुध देती म्हणून ठांगळ का उड्या मारती
पोटुशीला दुखणं आणी वांझोटीला त्रास
उंटाच्या गांडीचा मुका घेणे
आडात (आडानी पाशी)असेल तरच पोहर्यात दिसेल
कोल्ह्याला द्राक्षे आंबट
..........

अंबानींना शुभेच्छा!
वनताराला शुभेच्छा!
भारतीय अर्थव्यवस्थेला शुभेच्छा!

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2024 - 2:53 pm | चौथा कोनाडा

आमच्या (म्हंजे माझ्या) सारख्या गरिबाचा काही संबंध नाही या विषयाशी.
अब्जाधिश लोकांचे शेकडो सोहळे (यात विवाह सोहळे आलेच) नित्यनेमाने पार पडत असतात.
कमवणारा कमावतो, खर्चणारा खर्च करतो ... समाजातील खालच्या उतरंडीला आर्थिक लाभ होत राहतात ... चांगलंय की
अर्थात या सगळ्याच्या हिशेब ठेवणारी यंत्रणा कार्यक्षम आणि प्रामाणिक हवी ..
उल्लेखलेल्या सोहळ्यात काही यम नियम चुकवले असतील तर त्याचा शोध घेण्याची जबाबदारी आपली !
बा़की पैसा देशविघातक कृत्यांसाठी वापरला गेला नसेल आणि देशालाच आर्थिक फायदा झाला तर कल्याणच म्हणायचे !

सुबोध खरे's picture

7 Mar 2024 - 7:35 pm | सुबोध खरे

श्री मुकेश अंबानी यांनी केलेला समाजसेवेसाठी खर्च

२०१८-- ४३७ कोटी
२०१९-- ४०२ कोटी
२०२०--४५८ कोटी
२०२१--५७७ कोटी
२०२२--४११ कोटी

एकूण - २२८५ कोटी

लग्नात खर्च ७०० कोटी

पाच वर्षातील समाजसेवेच्या ३०%

https://www.indiatodayne.in/visualstories/webstories/how-much-mukesh-amb...

सरकारी नोकर आपल्या मुलांच्या लग्नात खर्च करणार १० - ५० लाख

दान धर्म करणार १००- ५००० रुपये ते सुद्धा आपल्या आईच्या/ वडिलांच्या नावाने कुठेतरी पायरी पाणपोई बांधण्यासाठी.

०. १ %.

पण अंबानींच्या नावाने खडे फोडायला सर्वात पुढे.

कारण दळभद्री समाजवादी वृत्ती.

श्री अडानि ६० हजार कोटी समाजसेवेस देणार

https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/adani-commit....

आणि

दळभद्री समाजवादी लोक काय देणार? कासेची लंगोटी?

काही लोकांच्या डोक्यात सकाळ होत नाही किंवा त्यांना वैचारिक सामना करता येत नाही...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Mar 2024 - 1:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे. अंबानींच्या नवाने नेहमी खडे फोडणार्या उद्धव ठाकरे ह्यांना सपत्नीक ,मुलासह जामनगरला जातानाचा व्हिडियो पाहिला. उद्धव थोडे लाजतच समारंभात वावरत होते अशी बातमी आहे. मुंबईचा हिरे व्यापार गुजरातने पळवला म्हणुन टाहो फोडणारे हे महाराष्ट्राचे हिरे-उद्धव-आदित्य गुजरातमध्ये सुऱक्षित असतील का , अशी ह्याना भीती ह्याना वाटत होती. पण सुदैवाने सगळे सुखरूप परतले.

जाऊ द्या...

मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी...

अहिरावण's picture

12 Mar 2024 - 2:49 pm | अहिरावण

सहमत आहे.

नव ठाकरे उगा काहीतरी ढुसकुल्या सोडतात आणि त्या हवेत शीड भरुन फुर्रोगामी फुर्र फुर्र करतात आणि स्वतःचे हसे करुन घेतात असे निरिक्षण आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Mar 2024 - 9:36 pm | अमरेंद्र बाहुबली

उद्धव थोडे लाजतच समारंभात वावरत होते अशी बातमी आहे. हॅ हॅ हॅ. कुठून कळतात अश्या बातम्या?? कुजबूज गॅंगमधील एखाद्या प्रातशाखीय म्हातार्याने अशी फूसकूली सोडली असेल कारण प्रातशाखेत जाणार्या एखाद्याला अंबानीने लग्नाच्या कार्यक्रमात झाडू मारायला ही बोलावले नसेल. :) ठाकरेद्वेष्टे सुधारणार नाहीत.

वामन देशमुख's picture

13 Mar 2024 - 12:06 pm | वामन देशमुख

हॅ हॅ हॅ. कुठून कळतात अश्या बातम्या?? कुजबूज गॅंगमधील एखाद्या प्रातशाखीय म्हातार्याने

ज्येष्ठ मिपाखरु माईसाहेब कुरसूंदीकर (किंवा त्यांचे हे) यांच्याबद्धल अशी भाषा वापरलेली पाहून एक किरकोळ मिपाखरु म्हणून मला शरम वाटली.

---

अवांतर: माईसाहेब, तुमचे हे कसे आहेत? बरेच दिवस झाले भेट नाही झाली. नमस्कार सांगा.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Mar 2024 - 12:33 pm | अमरेंद्र बाहुबली

ज्येष्ठ मिपाखरु माईसाहेब कुरसूंदीकर (किंवा त्यांचे हे) यांच्याबद्धल अशी भाषा वापरलेली पाहून एक किरकोळ मिपाखरु म्हणून मला शरम वाटली. वामन सर काड्या करणे बंदं करा. ज्याने कुणी ही बातमी पसरवली त्याच्या बद्दल हे लिहीलंय. माईसाहेबांबद्दल नाही. इतकं तुम्हाला कळत असेलच.

वामन देशमुख's picture

13 Mar 2024 - 4:18 pm | वामन देशमुख

वामन सर काड्या करणे बंदं करा.

तुमची कामे माझ्यावर सोपवू नका.

व्हिडियो पाहिला

माईसाहेबांनी बातमीचा source आधीच सांगितलाय तरीही त्यांच्याबद्धल

हॅ हॅ हॅ. कुठून कळतात अश्या बातम्या?? कुजबूज गॅंगमधील एखाद्या प्रातशाखीय म्हातार्याने अशी फूसकूली

अशी अवमानकारक भाषा वापराने योग्य आहे का?

आणि उलट मलाच अप्रस्तुत सल्ला देताय!

मोराच्या उलट्या बोंबा, दुसरं काय!

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Mar 2024 - 4:21 pm | अमरेंद्र बाहुबली

माईसाहेबांना तुम्ही मिपाखरू कसं म्हणू शकता?? :) निषेध.

वामन देशमुख's picture

13 Mar 2024 - 4:26 pm | वामन देशमुख

बरोब्बर सापडलात!

चला, इतर मिपाखरांचा पोल घ्या -

अ. तुमची भाषा अवमानकारक आहे
आ. तुमची भाषा खूप अवमानकारक आहे
इ. तुमची भाषा अती अवमानकारक आहे

---

अवांतर: अरण्यातील काही सजीवांना पकडण्यासाठी मानव सापळे लावतात.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Mar 2024 - 12:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अहो पण महाराष्ट्राच्या अस्मितेचे काय?"गुजरातने आमचे उद्योग पळवले, मोदीनी सगळा देश अंबानी/अडानीच्या घशात घातला" असे आरोप उद्धव्/राउत रोजच्या रोज करत होते. "मी स्वाभीमानी मराठी आहे. झक मारला तुमच्या मुलाचा विवाह. आम्ही नाही येणार जामनगरला" असे उद्धव ह्यानी 'परखड'पणे साण्गितले असते तर अनेक मराठी लोकांचा ऊर अभिमानाने भरुन आला असता.

अहिरावण's picture

13 Mar 2024 - 12:55 pm | अहिरावण

>>>अनेक मराठी लोकांचा ऊर अभिमानाने भरुन आला असता.

अनेक मराठी लोकांचा उर भरुन आला की नसता ते माहीत नाही, पण निदान सकाळी ९ च्या बातमीदाराचा नक्की भरुन आला असता.

हे जे काही घडले त्यावर नक्की प्रतिक्रिया काय द्यायची हे ऩ कळल्याने सदर बातमीदार नुसताच इकडून तिकडे पंख्यासारखी मान हलवून एका बाजुला खाली करायचा आणि दुस-याबाजुला भुवया उडवायचा असे उपस्थित पत्रकारांनी सांगितले.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Mar 2024 - 1:05 pm | अमरेंद्र बाहुबली

शरद पवारांना गुरू माननार्याला हा सल्ला दिला का? निवडणूकांत पवारांविरूध्द बांग द्यायची नी हात डोक्याला लावून म्हणायचे “पवार माझे गुरू.” :)

एक भारतीय म्हणून मला अंबानींबद्धल* आदर आहे.

---

* इथे अंबानी हे केवळ एक placeholder** आहेत; अंबानीच नव्हे तर लोकांना पांढरा रोजगार देणारे कुणीही व्यावसायिक हे आदरस्थानी*** आहेत.

---

** मराठी?

---

*** कारण तुलनेने रोजगार करणे (नोकरी) सोपे आहे, रोजगार देणे (व्यवसाय) हे कठीण आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Mar 2024 - 4:58 pm | अमरेंद्र बाहुबली

आज अडाण्याचे ९० हजार कोटी बुडालेत. भक्तांच्या ह्या दुखात मी सहभागी नाही.
आवंदा आनंदं गडे….. (नाचनारे सुधीर जोशी आठवावे)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Mar 2024 - 7:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हे मुरलेले गडी दु:खात असतील का ?
adani

विवेकपटाईत's picture

14 Mar 2024 - 10:35 am | विवेकपटाईत

खऱ्या भावापेक्षा शेअरचे भाव कधीच कमी होत नाही. त्यामुळे वास्तविक पुंजी अंबानीची कधीच कमी होणार नाही. शेअर मार्केटमध्ये पैसा लावून कमी वेळात श्रीमंत बनण्याचे स्वप्न पाहणारे बुडतात.

चित्रगुप्त's picture

13 Mar 2024 - 9:48 pm | चित्रगुप्त

कचरापेटी धागे असा नवीन विभाग सुरू करून हा धागा तिकडे हलवावा.

विवेकपटाईत's picture

14 Mar 2024 - 10:39 am | विवेकपटाईत

टाईमपास साठी असे धागे. बाकी या धाग्यातील गुंतवणूक या मुद्द्यावर प्रतिसाद नाही.
कचरापेटी ची गरज सर्वांनाच असते.

पाषाणभेद's picture

19 Mar 2024 - 1:18 pm | पाषाणभेद

त्यांचा पैसा आहे, करू द्या खर्च.