रस्ते अपघातातील मृतांना श्रध्दांजली

Trump's picture
Trump in जनातलं, मनातलं
5 Sep 2022 - 12:25 am

रस्ते अपघातातील मृतांना श्रध्दांजली.
--
आज श्री सायरस मिस्त्री मरण पावले. भारताच्या प्रगतीला हातभार लावणारा कोणीही मनुष्य असा टाळण्याजोग्या अपघातात मृत्यु पावला की भयंकर वेदना होतात. एक माणुस घडवायला ३० - ३५ वर्षे लागतात. अशी उमेदीत माणसे सोडुन गेली की आपले नशीब कसले कपाळकरंटे आणि अजुन किती भोग भारतमातेच्या नशीबात आहेत त्याची जाणीव घ्यायला आपला आवाका कमी पडतो. आपण भारतीय किती नालायक आहोत याची भयंकर सल मनाला लागुन जाते. असली विषण्णता लवकर मनातुन जात नाही.
ह्या यादीत श्री विनायक मेटे, श्री वांजळे, श्री भक्ती बर्वे इ. अशी कितीतरी नावे टाकता येतील.
अश्याच वेदना श्री बिपीन रावत (हेलीकॉप्टर अपघातात) मृत्युमुखी पडले तेव्हा झाल्या होत्या.
--
मी हा धागा अश्यात लोकांसाठी काढत आहेत. जेव्हा कोणी दखलपात्र अपघात होईल तेव्हा ह्या धाग्यात त्याची नोंदी व्हावी. आपण किती नालायक आहोत याची जाणिव होत राहणे महत्वाचे आहे.
आज श्री सायरस मिस्त्री यांना श्रध्दांजली अर्पण करुन, मी एक नालायक भारतीय म्हणुन दुसर्‍या भारतीयाची क्षमा मागतो.

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

5 Sep 2022 - 12:31 am | कपिलमुनी

मेटे , मिस्त्री प्रकरणात ड्रायव्हर ची चूक आहे.
केवळ आपल्याकडे भारी गाडी आहे म्हणून कशीही दामटवायची वृत्ती या मृत्यू ना कारणीभूत ठरली आहे.

भारतात रस्त्यावर हायवे ला ९० व राज्य मार्गावर ८० चे लिमिट आहे. ते पाळले असते तर खूप कमी धोका असतो.

तर्कवादी's picture

5 Sep 2022 - 1:02 am | तर्कवादी

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर विरुद्ध दिशेने जाणारे वाहन अनियंत्रित झाल्याने दुभाजक ओलांडून मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या कारवर धडकले आणि त्या अपघातात श्री अभ्यंकर यांचा मृत्यू झाला. म्हणजे यात अभ्यंकर यांच्या वाहनचालकाची (बहुधा ते स्वतः की त्यांचे मित्र वाहन चालवत होते, आता नीट आठवत नाही) कोणतीही चूक नव्हती.

श्री सायरस मिस्त्री यांना श्रध्दांजली

---

धाग्यातील "जेव्हा कोणी दखलपात्र अपघात होईल तेव्हा ह्या धाग्यात त्याची नोंदी व्हावी." या विचाराशी सहमत.

>आपण किती नालायक आहोत याची जाणिव होत राहणे महत्वाचे आहे.
आज श्री सायरस मिस्त्री यांना श्रध्दांजली अर्पण करुन, मी एक नालायक भारतीय म्हणुन दुसर्‍या भारतीयाची क्षमा मागतो.

असहमत. तुम्ही एक चांगली, लायक व्यक्ती आहात असेच मला वाटते. तुम्ही अशी काय चूक केली आहे की क्षमा मागत आहेत?

सायरस मिस्त्री यांच्या अपघाताचे फोटो पाहिले, गाडीची कंडीशन पाहता (गाडीच्या काचासुद्धा शाबूत आहेत)आणि ती सुरक्षितता प्रथम या दृष्टिकोनातून डिझाईन केलेली मर्सिडीज आहे हे लक्षात घेऊन अपघात फक्त मागच्या दोघांनाच जागेवर प्राणघातक ठरला हे पटत नाही. ड्रायव्हिंग करणाऱ्यांकडून अधिक माहिती मिळेलच, त्यावेळी कळेल. कदाचित मागील दोघांनी सीटबेल्ट लावलेला नसावा असा माझा अंदाज आहे. तो जर लावलेला असता तर ते किरकोळ इजेनिशी नक्की वाचले असते असं वाटतं.

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 7:41 am | जेम्स वांड

आता तुम्ही स्वतःच, स्वतः लिहून

मी एक नालायक भारतीय म्हणुन दुसर्‍या भारतीयाची क्षमा मागतो.

असे म्हणताच आहात तर,

एक लायक भारतीय म्हणून मी तुमच्यासारख्या नालायक भारतीयाची क्षमायाचना स्वीकार करून श्री सायरस मिस्त्री ह्यांच्यासाठी प्रार्थना करतो.

आशा आहे आपले दुःख अंमळ कमी होईल.

शाम भागवत's picture

5 Sep 2022 - 7:46 am | शाम भागवत

सीटबेल्ट लावलेला नसेल तर मानेला बसलेला हिसका सहन होत नाही. साधारणत: बेसावध स्थितीत अचानक ब्रेक दाबला गेल्यास डोके पुढच्या सीटवर जोरात आदळते. हे आदळणे सीटबेल्टमुळे कमी हानीकारक ठरते. मानेचे विकार असल्यास, सीटबेल्ट लावाच असे मी सुचवीन. अगदी २५-३० वेग असतानासुध्दा गाडी अपघाताने अचानक थांबल्यास, मोठा धोका संभवू शकतो.

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 7:55 am | जेम्स वांड

असो, नसो, सीटबेल्ट लावणे हे कम्पल्सरी असेलच पाहिजे, नालायक भारतीय त्यात पण चोरी करतात, गाड्या बनवणाऱ्या कंपन्या सीट बेल्ट न लावल्यास सतत बीप साऊंड, इंजिन immobilizer, warning lights असे सगळ्या सुविधा पुरवतात, तरी नालायक भारतीय ते लावत नाहीत, उलट तो साऊंड बंद करायला, बेल्ट ओढून तो अंगावरून न ओढता सीटच्या मागून नेऊन लॉक मध्ये अडकवून कारला पण मामु बनवतात !

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 8:17 am | जेम्स वांड

वाचा ही बातमी,

सीट बेल्ट नाहीत, ओव्हर स्पीडिंग, ९ मिनिटांत २० किलोमीटर अंतर कापलं. आता काय बोलणार !

१. नालायक भारतीयांच्या यादीत दिवंगत सायरस मिस्त्री पण जोडावेत ?

२. का सरकारला शिव्या देऊन, सरकार अकार्यक्षम आहे हे माहिती असून आपण राष्ट्रीय महामार्ग म्हणवला गेलेल्या मृत्यूच्या सापळ्यावर आपण जीवावर खेळून असली स्टंट करून नंतर परत सरकार वर आगपाखड करावी ?

श्री जेम्स वांड, तुमच्या प्रतिसादासाठी धन्यवाद.

तुम्हाला मी काय म्हटले आहे ते समजले नाही किंवा मी समजुन द्यायला कमी पडतो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
मी स्वत:ला नालायक एक भारतीय समाजाचा घटक म्हणुन म्हटले. कृपया त्याला राजकीय रंग देऊ नये.
--
लहान मुलांना शाळेमध्ये शिकवले जाते, नेहमी नियमांचे पालन करावे, जात भेद पाळु नये, भष्टाचार करु नये इ. इ. पण त्यातील किती गोष्टी मोठे झाल्यावर त्याच मुलांना आत्मविश्वासाने सांगु शकतो ? आपण किती लोकांना अभिमानाने भारतीय व्यवस्थेबद्दल एक समाज म्हणुन आपण अयशस्वी झालो आहोत.

जेम्स वांड's picture

6 Sep 2022 - 6:40 am | जेम्स वांड

अयशस्वी, सामाजिक घटक नालायक का काय म्हणता तसे, मी नाही तसा. तुमच्या मताचा आदर आहेच अर्थात.

त्यातील किती गोष्टी मोठे झाल्यावर त्याच मुलांना आत्मविश्वासाने सांगु शकतो ?

मी सांगतो ना, द्वेषमूलक पिंड नसल्यामुळे मी बहुसंख्य गोष्टी अभिमानाने सांगतो पोरांना माझ्या तरी, त्या सांगण्यासाठी मला ओढूनताणून प्रयत्न करावे लागत नाहीत म्हणजेच मी बऱ्यापैकी अभिमानास्पद तत्व पाळतो बुआ.

विनोदपुनेकर's picture

5 Sep 2022 - 6:47 pm | विनोदपुनेकर

रस्ते अपघात होतात त्या मधे मनुष्याच्या चुका काय कमी आहेत काय ?

ना सीटबेल्ट लावायचे
ना स्पीड लिमिट पाळायचे
ना लेण ची शिस्त पाळायची

अर्थात सरकार म्हणून त्यांची जबाबदारी खूप जास्त आहे की कमीत कमी रोड सुरक्षित बनवून सामान्य पामर लोकाना वापर्णया साठी तयार करावा,

मला वाटत चूक सर्वांचीच आहे त्यामुळे तुम्ही उगाच स्वताला नालायक वगैरे म्हणून घेऊ नका

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 7:16 pm | जेम्स वांड

त्यांच्या वैयक्तिक इच्छेचा मान ठेवायला हवा असे वाटते.

विनोदपुनेकर's picture

5 Sep 2022 - 7:22 pm | विनोदपुनेकर

जशि श्रिचि इछा

कर्नलतपस्वी's picture

5 Sep 2022 - 7:35 pm | कर्नलतपस्वी

जब होवेगी उमर पुरी
जब छुटे हुकूम हुजूरी
जम के दूत बडे मजबूत
जम से पडा झमेला रे!
उड जायेगा हंस अकेला

माणूस काहीच करू शकत नाही व परमेश्वर कुणाच्या मृत्यूचे श्रेय घेत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली.

चौथा कोनाडा's picture

5 Sep 2022 - 10:44 pm | चौथा कोनाडा

मी एक नालायक भारतीय म्हणुन दुसर्‍या भारतीयाची क्षमा मागतो.

यातच सर्व आले !

चौथा कोनाडा's picture

7 Sep 2022 - 5:32 pm | चौथा कोनाडा

मी एक नालायक भारतीय म्हणुन दुसर्‍या भारतीयाची क्षमा मागतो.

मी " एक नालायक आशियाई " असं म्हणत " दुसर्‍या आशियाईची क्षमा मागतो" असं म्हटलं तर जास्त समर्पक होईल का ?

मी " एक नालायक आशियाई " असं म्हणत " दुसर्‍या आशियाईची क्षमा मागतो" असं म्हटलं तर जास्त समर्पक होईल का ?

तसे म्हणु शकत नाही.
१. भारतीयांचा घटनात्मक हक्क फक्त भारतावरच पोचतो. आणि आशिया म्हटले, तर एकादा म्हणु शकतो. आशियाच का, जग का नाही ?
२. आशियातील काही देश, सिंगापुर, जपान, दक्षिण कोरीया, तैवान इ. देशामधील वाहतुकव्यवस्थेबद्दल अजुन तरी वाईट ऐकले नाही.

तुर्रमखान's picture

11 Sep 2022 - 4:12 pm | तुर्रमखान

आपण किती नालायक आहोत याची जाणिव होत राहणे महत्वाचे आहे.

दुर्दैवाने सहमत व्हावं लागत आहे.

अश्या अपघाताचं खापर वेगावर फोडलं की झालं अशी समजूत आहे. मुळात 'वाहने सावकाश हाका', 'हळू जा' वगैरे रस्त्यावरच्या सुचना शुद्ध मुर्खपणा आहे. हळू म्हणजे किती? ८०, ६०, ५० की १०? स्पीड लिमिट किती रत्यांवर असतो. ते रस्ते त्यापर्यंतच्या वेगाने चालवण्यासारखे असतात का? लेन मार्कींग असतात का?
बरं, सिटबेल्ट्साठी तरी साधे नियम आहेत का? जवळ जवळ सगळ्या टॅक्सीत मागचे सिटबेल्ट काढून टाकलेली किंवा (तीन पेक्षा प्रवासी बसत असल्याने त्यांच्या ढुंगणाला टोचू नये म्हणून) सीट कवरने झाकलेली असतात. रिक्षाला सीटबेल्ट का असू नये? हे मला न उलगडलेलं कोडं आहे. (जागतीक नियमानुसार वाहनाचा वेग तीसपेक्षा जास्त असेल तर सीट बेल्ट आवश्यक आहे).

प्रत्येक गोष्टीत जबाबदारी नागरिकांवर टाकून मोकळं व्हायचं असं ठरवलेलं आहे. आत्ताच वाचलेल्या बातमीनुसार रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्याने चावा घेतला तर तर त्याला खायला देणार्‍याला जबाबदार धरणार म्हणे. हास्यास्पद आहे हे सगळं.