पेरणा http://misalpav.com/node/50380
कर्नलसाहेबांची त्रिवार क्षमा मागून
*दळण नसलेल्या गिरणीवर*
जेंव्हा कोणीतरी पीठ पाडतं
मग त्या पिठावरच्या सरळ रेषाच
कंटाळून नागमोडी होऊन जातात
टोमणे आणि कुचकट बोलणे
जेव्हा नित्याच होतं तेव्हा
वादळा पूर्वीची शांतता
सोसण मात्र असह्य होतं
बदललेला गिरणी चालक आणि
त्याच्या भूलथापांचा मारा
सततची कुचंबणा, अन अवहेलना
आणि नको नकोसे असमान वाटप
वाटेवर नाराजी पसरवते
भिजलेला सैनिक,त्याचा दबलेला आवाज
पुन्हा एकदा गर्जना करतो
अन नाराज वाटेवरली मरगळ
त्वरीत निघून जाते
अतिरेक झाला की असेच कुणीतरी
खास भेटतेच
त्यावेळेला दळणाऱ्याही भीती वाटते
मग जात्यातले
सुध्दा हसायला लागतात
पैजारबुवा,
२७-६-२०२२
प्रतिक्रिया
27 Jun 2022 - 11:41 am | कर्नलतपस्वी
शालजोडीतला आहेर आवडला.
27 Jun 2022 - 11:53 am | विजुभाऊ
झकास पैजारबुवा
मिडीयासाठी एक आवाज लागतो
गिरणीचा भोंगा सकाळीच वाजू लागतो
मग त्या गंजक्या आवाजाने
टीव्हीचा पडदाच कंटाळून फाटू लागतो.
27 Jun 2022 - 3:04 pm | कुमार१
झ का स च !
27 Jun 2022 - 3:33 pm | यश राज
झकास पैजारबुवा
27 Jun 2022 - 8:08 pm | कंजूस
पीठ चिकाट झालं.
28 Jun 2022 - 1:14 pm | शशिकांत ओक
जळण नसलेल्या तिरडीवर
अशा कविकल्पनेचा पतंग हवेत आरूढ होऊन स्वर्गसुख, हूर पऱ्या याची दोस्ती यावर काव्य निर्मिती व्हावी.
28 Jun 2022 - 2:58 pm | चौथा कोनाडा
एक नंबर !!!!
+१ पैजार बुवा !
1 Jul 2022 - 1:07 pm | Marathi_Mulgi
शेअर करू का सोशल मिडिआवर?
1 Jul 2022 - 2:19 pm | ज्ञानोबाचे पैजार
अगदी बिनधास्त
पैजारबुवा,