Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गड्डा झब्बू on Tue, 12/08/2020 - 14:19
लेखनविषय (Tags)
धोरण
नृत्य
संगीत
वाङ्मय
बालगीत
विडंबन
गझल
उखाणे
वाक्प्रचार
व्युत्पत्ती
सुभाषिते
विनोद
आईस्क्रीम
उपहाराचे पदार्थ
कैरीचे पदार्थ
ग्रेव्ही
पारंपरिक पाककृती
मटणाच्या पाककृती
मत्स्याहारी
मायक्रोवेव्ह
राहती जागा
वन डिश मील
शेती
सिंधी पाककृती
फलज्योतिष
शिक्षण
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
विरंगुळा
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती. गटारीसाठी यायचे असले तर त्यांच्या बरोबर चार मित्रही यायचे. घरात एकच धांदल असायची. आजी तेव्हा जावयांच्या गावातच स्थायीक होती. जावई पियक्कड माणूस. त्यांच्या बाटलीतुन आज्जी पण प्यायची. आईचा जीव खालीवर व्हायचा. घरात सहा पोरं. एवढे बेवडे येणार म्हणजे महीन्याचं दारूचं बजेट डळमळायला सुरुवात व्हायची. आमचा गुत्तेवाला पास्कल उधार द्यायचा पण वडीलांना उधारी खपायची नाही. बेवडे म्हणजे जीवाला घोर. तोंड दाबून चखण्याचा मार. आम्ही पोरं मात्र खूष असायचो. का खूष असायचो हे आजतगायत कळलं नाही. आत्या येणार म्हणजे सकाळी लवकर प्यायला मिळणार. आत्याचा नवरा मोठ्ठा पेताड. घरची दारूभट्टी. मराठवाड्यात अट्टल दारुड्याला पेताड म्हणायचे. बुधवारपेठेतल्या घरातून रस्त्यावर उभं राहीलं की चमेलीच्या घरापर्यंतचा रस्ता दिसायचा. पोरं आळीपाळीनी रस्त्यावर उभी रहायची. जीपडं येताना दिसलं की आनंदानी नाचायला सुरुवात. बेवडे येणार म्हटल्यावर बहीणी मात्र मुक्या व्हायच्या. चार दिवसात कामानी पिट्ट्या पडायचा. बहीणी सगळ्या आमच्यापेक्षा मोठ्या. आईच्या मदतीला सैपाकघरात. दप्तरं गुंडाळून ठेवायची. शाळेला नाही गेलं तरी चालायचं. जीपड्यातून आजी पायउतार झाली की तिची पिशवी , गाठोडं घ्यायला आम्ही पुढे. गावठी दारूची ट्यूब एकाच्या हातात , दुसर्‍याच्या हातात इंग्लिशच्या बाटल्यांची पेटी. मग आत्याचा पेताड नवरा. सगळ्यात शेवटी आत्या उतरायची. वडील आपल्या हातानं पहिल्या धारेची पावशेर पाजून आत्याच्या नवर्‍याचं स्वागत करायचे. बाहेरच्या खोलीत सतरंजीवर मोठी माणसं ऐसपैस पसरायची. आजी आणि आत्या मधल्या खोलीत .आम्ही पोरं आजीचं गाठोडं सोडवण्याच्या मागे. अफूची बोंडं आणि तुरीच्या शेंगा , गाजरं, मटाराच्या शेंगा, आंबट बोरं असा ऍसॉर्टेड चखणा बाहेर पडायचा. दारूच्या ट्यूबला हात लावायची डेरींग नसायची. मग आजीच मेहेरबान होऊन एकेक नौटाक कपात भरून आमच्या हातात दयायची. थंडीनी ओठ उलून गेलेले असायचे. आंबुस दारूनी ओठ चुरचुरायचे. पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची. दारूचे ग्लास बाहेरच्या खोलीत गेले की पिण्यासाठीची हाकाटी सुरु व्हायची. आत्या सैपाकघराच्या बाहेरच्या उंबरठ्यावर विडी ओढत बसायची. हातात मशेरी घेऊन दात घासत बसायची. आई दादासाहेबांसाठी ताटात गरम वजडी काढायची. चखण्यासाठी वजडी. कलेजी, नळ्या असा काही प्रकार नसायचाच. दादासाहेब प्यायला बसले की बायका तात्पुरत्या बाहेर विड्या फुंकत बसायच्या. आत्या बहीणींच्या हातात रिकामा ग्लास देऊन म्हणायची माझा पेग भरा गं पोरींनो. असली कामं करायला मुली नाराज असायच्या. पण सांगणार कुणाला? घरात बाटली एकच. जी.एम संत्रा. आत्या फणफणायची. काय बाई देशी दारू देता पाहुण्याला असं म्हणायची. आपली पेटी उघडून व्हिस्कीची बाटली काढायची. पेग भरून झाल्यावर बाटली परत पेटीत जायची. पेग भरण्यासाठी बाटली उघडली की व्हिस्कीचा सुगंध दरवळायचा. मुली उत्सुकतेनी पुढं व्हायच्या पण आत्या पटकन बाटली बंद करायची. आता त्या वेळी नशा-पाण्यासाठी आमच्या घरात असणार काय. जी.एम संत्राची बाटली, मशेरी, तपकीर, तम्बाकुची पुडी आणि चुन्याची डबी, विडी बंडल. संपलं या पलीकडे काही नसणार .कुठल्याच घरात नसायचं.मुलींना उत्सुकता त्यातच असायची..... ### आता पळा.....
  • Log in or register to post comments
  • 24169 views

प्रतिक्रिया

Submitted by आनन्दा on Tue, 12/08/2020 - 16:24

Permalink

बोंबला...

बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..
  • Log in or register to post comments

Submitted by अथांग आकाश on Tue, 12/08/2020 - 17:29

In reply to बोंबला... by आनन्दा

Permalink

+१

+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 12/08/2020 - 20:35

In reply to +१ by अथांग आकाश

Permalink

हेच म्हणायचे आहे

हेच म्हणायचे आहे
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Tue, 12/08/2020 - 17:55

In reply to बोंबला... by आनन्दा

Permalink

+११११११११११११११

ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 12/09/2020 - 10:37

In reply to बोंबला... by आनन्दा

Permalink

+१

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Tue, 12/08/2020 - 18:07

Permalink

थुंकी

काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
  • Log in or register to post comments

Submitted by गड्डा झब्बू on गुरुवार, 12/10/2020 - 11:59

In reply to थुंकी by विनायक प्रभू

Permalink

पिचकारी

काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Sat, 02/05/2022 - 23:30

In reply to पिचकारी by गड्डा झब्बू

Permalink

चपखल प्रतिसाद

तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 12/08/2020 - 18:59

Permalink

लसावी मसावि

नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 12/10/2020 - 15:42

In reply to लसावी मसावि by कंजूस

Permalink

मोकलायादहीदिश्या चे विडंबन

मोकलायादहीदिश्या चे विडंबन करुन दाखवा. चॅलेंज अ‍ॅक्सेप्ट करताय का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on Fri, 12/11/2020 - 08:18

In reply to मोकलायादहीदिश्या चे विडंबन by विजुभाऊ

Permalink

मोकलाया दाहिदिशा क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे.

विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300
  • Log in or register to post comments

Submitted by Yogesh Sawant on Wed, 12/09/2020 - 10:23

Permalink

येकच नंबर

येकच नंबर झालंय. लिहिते राहा.
  • Log in or register to post comments

Submitted by रंगीला रतन on Wed, 12/09/2020 - 10:33

Permalink

भन्नाट विडंबन. हहपुवा :-) :-)

भन्नाट विडंबन. हहपुवा :-) :-)
  • Log in or register to post comments

Submitted by सुचिता१ on Wed, 12/09/2020 - 14:03

Permalink

नाही आवडले ... काही कलाकृती

नाही आवडले ... काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by गड्डा झब्बू on गुरुवार, 12/10/2020 - 12:06

In reply to नाही आवडले ... काही कलाकृती by सुचिता१

Permalink

चालतंय की...

नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 12/10/2020 - 04:40

Permalink

विडंबन झालं की भावना सौम्य होतात.

शामच्या आई कृतीचंही विडंबन झालं. शामची मम्मी. विडंबन जुन्या कृतीकडे घेऊन जातंच.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 12/10/2020 - 08:27

In reply to विडंबन झालं की भावना सौम्य होतात. by कंजूस

Permalink

हो हे देखिल आहेच म्हणा

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 12/10/2020 - 08:49

In reply to विडंबन झालं की भावना सौम्य होतात. by कंजूस

Permalink

हो हे देखिल आहेच म्हणा

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 12/10/2020 - 09:12

Permalink

विडंबनाची काही ठीकाणी एक काही

विडंबनाची काही ठीकाणी एक काही ठीकाणी दुसरी मतं बघुन गमत वाटली
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on गुरुवार, 12/10/2020 - 10:26

In reply to विडंबनाची काही ठीकाणी एक काही by मराठी_माणूस

Permalink

बाकी तुम्ही बोला.. पण मी

बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 12/10/2020 - 10:55

Permalink

विडंबन एकदम भन्नाट जमलंय.

विडंबन एकदम भन्नाट जमलंय. मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by गड्डा झब्बू on गुरुवार, 12/10/2020 - 11:57

Permalink

ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला

ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 12/10/2020 - 17:35

Permalink

विडंबनाचे कशाशी तरी संबंध

विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by अथांग आकाश on गुरुवार, 12/10/2020 - 19:55

In reply to विडंबनाचे कशाशी तरी संबंध by मराठी_माणूस

Permalink

हे हि बरोबर आहे

हे हि बरोबर आहे! आमची जास्ती भावनिक गुंतवणूक झाली असेल त्या कथेत!! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 12/11/2020 - 08:23

Permalink

विडंबन छान.

विडंबन छान.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Fri, 12/11/2020 - 10:54

Permalink

पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून

पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Mon, 12/14/2020 - 13:19

Permalink

=))))))))))))))))))))))))))))

=)))))))))))))))))))))))))))))))))))))
  • Log in or register to post comments

Submitted by ॲबसेंट माइंडेड… on Tue, 02/01/2022 - 10:23

Permalink

भारीच! खुप हसलो.

भारीच! खुप हसलो.
  • Log in or register to post comments

Submitted by रंगीला रतन on Tue, 02/01/2022 - 22:48

Permalink

भंकस आवडत नसेल त्यांनी विडंबन

भंकस आवडत नसेल त्यांनी विडंबन वाचू नये :=) आपल्याला मूळ कथा आणि विडंबन दोन्ही आवडते.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 02/02/2022 - 18:02

Permalink

हा .... हा .... हा .... !

एक नंबर विडंबन !

+१

ज्याम हसलो, लै हसलो ! गड्डा झब्बू _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Fri, 03/10/2023 - 19:45

Permalink

मुळ कलाकृतीचे विडंबन

हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com