ध्रांगध्रा - १०

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 Jan 2022 - 11:15 pm

कुठल्याच घरात काही हालचाल दिसत नाहीये.
थोडे पुढे आलोय. समोर एक माणूस , एक बाई आणि त्यांचा हात धरून चालत जाणारे एक लहान मूल पुढे जाताना दिसतय.चला निदान कोणीतरी दिसलं तरी. चला यांना विचारूया.
आम्ही भरभर चालत त्या कुटुंबाला गाठतो.
नमस्कार दादा.....
मागील दुवा ध्रांगध्रा - ९ http://misalpav.com/node/49763
नमस्कार दादा... आम्हाला मंदीरात जायचंय. कसं जायचं हो? मी मागूनच प्रश्न विचारला.
त्या तिघांनीही माना वळवल्या. आम्ही दचकतो. त्या पुरुषाचा , त्याच्या बायकोचा आणि त्या लहान मुलीचा तिघांचेही चेहरे हुबेहूब . अगदी साच्यातून काढावेत तसे. आणि त्याही पेक्षा ते सगळेच झेलेआण्णा आजोबांसारखे दिसताहेत. त्यांना पाहून आम्ही दचकलो त्यापेक्षाही अधीक ते आम्हाला पाहून दचकलेत. भूत किंवा त्याही पेक्षा काहितरी महाभयंकर पहावे असे.
तो माणूस काहितरी बोलायचा प्रयत्न करतो. तोंडातून शब्द फुटत नाहीत. त्याच्या सोबतची बाई ! ती तर रडायलाच लागली आहे. लहान मुलीला काय करावे हे समजत नाही. ती फक्त विस्फारून वटारलेल्या डोळ्यानी पहातेय .मी तोढा पुढे होतो. ती बाई त्या माणसाच्या दंडाला पकडते, डोळे विस्फारून पहाणार्‍या मुलीला काखोटीला मारते आणि दंडाला धरून त्या माणसाला ओढतच आमच्यापासून दूर घेऊन जाउ लागते.मी महेशकडे पहातो. तो माझ्याकडेच पहातोय. यांना आम्हाला पाहून इतके दचकायला काय झाले तेच समजत नाही.
ते तिघेही आमच्यापासून लांब पळताहेत . एखाद्या अरिष्टापासून दूर पळावे तसे .
"ओ ताई .... ओ दादा.." मी हाका मारतू. महेश टाळ्या वाजवून त्यांना बोलावतोय. पण ते आमच्यापासून दूर पळताहेत. एकमेकांना अक्षरशः ओढत पळताहेत.
" काय माहीत काय आहे ते! " या आविर्भावात महेश ओठ मुडपतो. खांदे उडवतो.
काय झाले असेल यांना आपल्याला पाहून दचकायला ?असं भितीने दूर पळून जायला? हा प्रश्न पडला आहेच. लोक असं का वागतात काय माहीत!
ज्या प्रश्नांची उत्तरे माहीत नसतील त्यात वेळ घालवायचा नसतो. थोडिशी माहिती असेल तर पुढे धागे दोरे जुळवत तर्काने उत्तर काढता येते. पण जिथे मुद्दलातच काहीही माहीत नसते तिथे तर तर्कही करता येत नाही.
आम्हाला महेश म्हणत होता ते मंदीर शोधायचंय. त्यामुळे आम्हाला पडलेला प्रश्न तिथेच सोडून जायला हवं. आम्ही थोडे पुढे येतो.
घरांची विस्कळीत असलेली रांग आता दाट झाली आहे. आम्ही एका चौकात उभे आहोत.डावी ,उजवी ,आणि समोर अशा तीन दिशांना जाणे हे पर्याय उभे आहेत..गाव वाटलं होतं तेवढे लहान नाहिय्ये. डावीकडच्या बाजूला एक छोटेसे गावात असते तसले किराणाचे दुकान दिसतय. उजवीकडच्या वाटेवरही काही दुकाने असावीत.
त्यांच्या समोर काही पोती , बादल्या पडल्या आहेत. त्यावरून ती दुकाने असावीत असं म्हणायचं अन्यथा वेगळी ओळख नाही.कुठल्याच दुकानावर पाटी नाही.
समोरच्या बा़जूला पानटपरी सारखं काहितरी दिसतय. तिथे विचारता येईल. आम्ही पानटपरी कडे निघतो. नवल वाटतंय. या गावात माणसे दिसत नाहीत. आत्तापर्यंत तरी फक्त तो सायकलवाला मुलगा आणि ते नवराबायको हेच काय ते दिसलेत.या गावात मणसे रहात नाहीत का? पण मग तसं असतं तर घरं कशाला दिसली असती! इटलीत म्हणे पाँपे नावाचे एक शहर होते. ते ज्वालामुखीच्या उद्रेकात मुखातुन निघालेल्या राखेखाली एका रात्रीत गाडले गेले होते म्हणे.
कोणत्या वेळेस काय आठवावे याचा काही नियम असायला हवा!
मला पाँपेची आत्ताच आठवण का यावी? या पांढरी गावात पाँपेसारखे काहीतरी झाले असेल का? कधीतरी रात्री इथली माणसं जनावरं गाडली असतील राखेखाली चिखलात.
हॅ तसं कसं असेल? मग ही घरं कशी वाचली ? उगाच काहितरी खुळा विचार नको करूस.
आम्ही रस्ता ओलांडून पान अटपरी जवळ आलो. लहन गावात असते तशी पानपट्टी. बिस्किटाचे पुढे,कसलाश्या पिशव्या, छताला बांधलेल्या दोर्‍यांवर लटकताहेत. आणखी कसले डबे भिंतीलगत रचून ठेवले आहेत. या सगळ्या गदारोळातून आत एक माणूस पाठमोरा दिसतोय.
" नमस्कार ओ दादा" महेशच्या विचारण्याने तो पाठमोरा माणूस वळून सामोरा झाला. साधारणतः पंचविशीचा असेल. याचा चेहराही तसाच म्हणजे अगदी तस्सा. झेले आण्णां आजोबां सारखा. आतापर्यंत एका गावात एकाच आडनावाची माणसे रहातात हे ऐकून होतो. पण सगळी माणसे एकाच चेहेर्‍याची?
या वेळेस आम्ही दचकलो नाही. तो माणूस दचकला आम्हाला पाहून . एव्हाना या गोष्टीची सवय झाली आहे. तो माणूस आमच्या डोळे तस्साच डोळे फाडफाडून पहातोय. याला पळून जायला वाट नाही. हे एक बरंय. त्याच्या पळून जायच्या वाटेत आम्ही उभे आहोत.
पानपट्टीवाला इतका घाबरलाय क्त्त त्याच्या तोम्डून शब्द फुटत नाहिय्ये. दरदरून घाम फुटलाय.
महेश तिथे बाजूला असलेला पितळेचा त्यांब्या उचलतो. त्यात पाणी आहे.महेश पाण्याचा तांब्या त्या माणसाच्या समोर करतो. अभवित प्रतिक्रीया व्हावी तसा तो माणूसही तांब्या घेऊन घटघटा पाणी पितो.पाणी पिताना त्याच्या घशाचे हनुवटीखाले हाड वरखाली हलतय.
" सावकाश .... सावकाश.... हळू प्या ठसका लागेल." महेश घटा घटा पाणी पिणार्‍या त्या तरुणाला समजावत विचारतो. " दादा इथे एक कसलंसं मंदीर आहे. तिथे कसं जायचं हो?"
त्या तरुणाने यांत्रीकपणे उजवी कडच्या रस्त्याकडे हात दाखवला. पण हात दाखवताना तो मानेने नाही नाही म्हणतोय. मंदीर हा शब्द ऐकताच त्याचे डोळे अचानक भेदरल्यासारखे जाहेत. त्याच्या कपाळाची शीर तडतडायला लागली. कसलीशी अनामीक भिती त्याच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसतेय.
काही का असेना शिवासाठी काम झालंय हे महत्वाचं. मंदीर आहे हे निश्चित झाले. आणि तिथे कस्म जायचं ते समजलंय . या क्षणी आम्हाला या पेक्षा कसलीच माहिती नको आहे.
त्या माणसाला तिथेच सोडून आम्ही उजवी कडची वाट धरतो
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीगणेशा's picture

12 Jan 2022 - 12:30 am | श्रीगणेशा

सगळे चेहरे सारखे हे गूढ जाणायची उत्सुकता निर्माण झाली आहे!

निमिष ध.'s picture

12 Jan 2022 - 1:22 am | निमिष ध.

भन्नाट चालू आहे गोष्ट - कुठे जाणार कळत नाहीये

गवि's picture

12 Jan 2022 - 8:34 am | गवि

वाचतोय.

चौथा कोनाडा's picture

12 Jan 2022 - 11:13 am | चौथा कोनाडा

बाप रे !
भेटतायत ते सगळेच झेलेअण्णा !
प्रचंड गुढ निर्माण झालंय !
झेलेअण्णाच्या तावडीतुन कधी एकदा सुटतोय अन मंदिर बघतोय असं आम्हालाही झालंय !

|| पु भा प्र ||

कानडाऊ योगेशु's picture

12 Jan 2022 - 2:48 pm | कानडाऊ योगेशु

वेगळ्या उंचीवर कथा नेली आहे विजुभौ!

श्वेता२४'s picture

12 Jan 2022 - 5:15 pm | श्वेता२४

जरा मोठे भाग टाकले तर वाचायला अजून मजा येईल. उत्सुकता खूप वाढली आहे. पु.भा.प्र.

कोण आहेत झेले अण्णा,
रात्रीस खेळ मधले अण्णा पण गूढ हे अण्णा पण गूढ!
😐

कर्नलतपस्वी's picture

12 Jan 2022 - 6:19 pm | कर्नलतपस्वी

एक गाव बारा भानगडी मधले झेले आण्णा निळू फुले अजुनही आठवतात, तुमचे आण्णा पण भारी, उत्सुकता आहे ती काय पुढे घडते हे बघायला.

विजुभाऊ's picture

12 Jan 2022 - 10:17 pm | विजुभाऊ

पुढील भाग ध्रांगध्रा-११ http://misalpav.com/node/49775

शित्रेउमेश's picture

13 Jan 2022 - 10:06 am | शित्रेउमेश

पुढे काय होईल? अजिबात अंदाज नाही बांधता येत आहे... पण जे चालूये ते लय भारीये... एकदम भन्नाट...

बरं झालं मी सगळे भाग पूर्ण व्ह्यायची वात बघितली ते

सुखी's picture

31 Jan 2022 - 12:25 pm | सुखी

वाट