मन न

फुंटी's picture
फुंटी in जनातलं, मनातलं
11 Jun 2021 - 7:18 pm

मस्त पाऊस पडतोय,विचार येतो मनात की हे धुंद वातावरण एन्जॉय करावं, अनेक पर्याय आहेत की समोर, छानशी गझल ऐकत वाईनचे घोट घेत बसावं की अपूर्ण राहिलेल्या पुस्तकात गुडूप होऊन जावं, मैत्रीणीशी चॅट करत मनसोक्त वेळ घालवावा की एखादा गरमागरम पदार्थ चाखत जिव्हेला तृप्त करावं ?? यातलं काही करून मानवरची मरगळ जाईल अस वाटत नाही, आयुष्यात एका क्षणी एकही पुस्तक जवळच वाटत नाही की एखाद्या गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेऊन मन रमेल असंही वाटत नाही.सगळा रंगमंच सजलेला असताना आतली अस्वस्थता स्टेजवर पाय ठेऊच देईना.या मन नावाच्या अवयवाच काही कळत नाही,भवताल मस्त धुंद तर हे आपलं अस्वस्थ ,काय हवं असत मनाला?? अस्वस्थता पसरवणाऱ्या नसा दारूत बुडवून काढल्यावर आनंदी होतील का??आपल्या अस्वस्थतेची कारण आपल्याला नेमकी न कळणं ,किंवा ही दुखरी नस पकडता न येणे ही स्वाभाविक गोष्ट म्हणावी का? की अस करणं ही तद्दन येडझवेगिरी ???

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

11 Jun 2021 - 10:26 pm | चित्रगुप्त

खालील व्हिडियो बघा आणि ठरवा काय लोच्या आहे:
https://www.youtube.com/watch?v=ybm0u56aqvI

सौन्दर्य's picture

11 Jun 2021 - 10:52 pm | सौन्दर्य

लेखात उपस्थित केलेले प्रश्न आणि त्याला दिलेले व्हिडियोरुपी उत्तर दोन्ही छान आहेत.

आतली अस्वस्थता...

अस्वस्थता हि एकमेव भावना आपल्यात अस्तित्वात आहे... आपल्या समग्र कृतींना करणीभूत आहे...

कोविड असो की बेरोजगारी,

अगदी पाय हलवण्या पासून कूस बद्दलण्या पर्यंत...
गिळलेले अन्न पचवण्या पर्यंत... कॉफी आणि दारू रिचवण्या प्रर्यंत..

खमंग सामोसा खाण्यापासून गणित सोडवण्या पर्यंत...
शीलाकी जवानी पासून ध्यान/जप/पूजा पाठ करण्या पर्यंत...

मिपावर रेंगाळन्यापासून मोठं मोठे वैज्ञानिक शोध लावण्यापर्यंत...
पापणी लवण्या पासून श्वासोश्वास करण्या पर्यंत...
विश्वात कुठलीही कृती जर आपण करणार असू ,आपल्या हातून होणार असेल तर त्यासाठी आधी कमी जास्त तीव्रतेची अस्वस्थता आपल्या मन/शरीरात (हे दोन्ही एकच, कसे ते दुसरीकडे सविस्तर स्पष्ट करायचा प्रयत्न करेन) निर्माण होणे आवश्यक ठरते, अनेकदा ती इतकी चटकन व क्षणिक असते की तिची जाणीव(जागृत मनी समज निर्माण) होईपर्यंत कृतीही झालेली असते...

या अर्थाने अस्वस्थता हे व्यक्ती जिवंत असण्याचे लक्षणही आहे

बऱ्याच लोकांचा हा समज असतो की मनुष्याच्या मूळ भावना दोनच १) आसक्ती २) तिरस्कार पण ही गोष्ट समग्र तथ्यप्रत नाही कारण मूळ भावना एकच अस्वस्थता, नन्तर तिचे प्रकटीकरण राग अथवा द्वेषात होते...

या अस्वस्थतेवरून लक्ष (अर्थातच तात्पुरतं) हटवलं जाणं याला आपण समाधान मानतो...

म्हणून म्हणावंसं वाटतं हो, आप ट्रिगर तो सही पकडे है रास्ते का पता नही
:)

अर्धवटराव's picture

12 Jun 2021 - 1:31 am | अर्धवटराव

.

Bhakti's picture

12 Jun 2021 - 7:36 am | Bhakti

म्हणून म्हणावंसं वाटतं हो, आप ट्रिगर तो सही पकडे है रास्ते का पता नही
स्टेटस ठेवते चार दिवस ;)
सही लिखा है अस्वस्थता पर !

कारण मूळ भावना एकच अस्वस्थता

अस्वस्थता ही भावना म्हणजे नेमकं काय? ती मूळ कशी काय आहे?

- (साशंक) सोकाजी

गॉडजिला's picture

13 Jun 2021 - 10:50 am | गॉडजिला

कोणतीही रिएक्शन जर ओब्जर्व केली तर समजेल सर्वप्रथम अस्वस्थता निर्माण होते... मग कृती. अस्वस्थता नसेल तर मनुष्याला कृती करणे अशक्य होईल...

तुमच्या जावा प्रोग्रामिंग च्या भाषेत अस्वस्थता इस बेज क्लास ऑफ entire human behaviour object(स)

सीन्स इट हॅज नो नॉलेज इट कॅन बी क्लासिफाईड एज इमोशन

सोत्रि's picture

13 Jun 2021 - 2:55 pm | सोत्रि

जर एखादा १० कोटीची लॉटरी लागल्याने अत्यानंदाने हसत असेल (हसणे ही रीअ‍ॅक्शन ह्या उदाहरणात) तर कुठली अस्वस्थता निर्माण झाली ज्याने हसण्याची कृती झाली?

जावाचं उदाहरण दिलंत म्हणूनः
अस्वस्थता हा बेस क्लास असू शकतो पण अ‍ॅबस्ट्रॅक्ट क्लास नाही. अस्वस्थता कॉंक्रीट प्रॉडक्ट क्लास आहे जो संवेदना हा इंटरफेस इम्प्लीमेंट करतो. अस्वस्थता हवीशी असते की नकोशी असते? ह्याच उत्तर नसेल तरच तो अ‍ॅबस्ट्रॅक्ट क्लास किंवा इंटरफेस होऊ शकतो. पण अस्वथता नकोशी असते म्हणून तो कॉंक्रीट प्रॉडक्ट क्लास आहे.

सीन्स इट हॅज नो नॉलेज इट कॅन बी क्लासिफाईड एज इमोशन

हे काही कळल नाही. इमोशन इस ड्यू टू फुल्ल ऑफ नॉलेज!

- (अनुभवी जावा प्रोग्रामर) सोकाजी

गॉडजिला's picture

13 Jun 2021 - 4:36 pm | गॉडजिला

इमोशन इस ड्यू टू फुल्ल ऑफ नॉलेज!

येस बट दे आर इट्सेल्फ आर नॉट नॉलेज, इट्स रिअ‍ॅक्शन टु नॉलेज...
प्रॅक्टीकली नॉलेज इज जस्ट नॉलेज विदाउट अ‍ॅटॅअचमेंट/आयडेंटीफिकेशन (दॅट इज तठस्थता)...एमोशन इज अ‍ॅटॅचमेंट/आयडेंटीफिकेशन टु नॉलेज... कीप रीडींग फरदर..

अस्वस्थता हा बेस क्लास असू शकतो पण अ‍ॅबस्ट्रॅक्ट क्लास नाही.

अ‍ॅबस्ट्रॅक्ट क्लास नक्किच नाही... इट कॅन बी इनिशिअलाइजड... बट रेअरली इज सच अ प्रॅक्टीस...

अस्वस्थता कॉंक्रीट प्रॉडक्ट क्लास आहे जो संवेदना हा इंटरफेस इम्प्लीमेंट करतो.

आयडेंटीफिकेशन एक्स्टेंड अस्वस्थता दॅट इम्प्लेमेंट संवेदना इंटरफेस विच ओवेरराइड्स राग अँड द्वेश मेथड्स.

प्रसाद गोडबोले's picture

12 Jun 2021 - 9:12 am | प्रसाद गोडबोले

करोनामुळे जवळपास दीड वर्ष आपण लॉकडाउन मध्ये अडकलेलो आहोत. घरातच अडकुन पडल्याने अन अति सहवासाने घरातल्या लोकांच्या दुर्गुणांशीही ओळख झालीय अन त्यांनाही आपल्या आपल्या दुर्गुणांशी ओळख झालीय.
चॅट करणार्‍या मैत्रीणीलाही केवळ चॅट करत टाईमपास करायचा आहे हे सुध्दा खुप आधीच लक्षात आलंय .
आसस्पास समाजात वावरताना लोकांच्या स्वार्थी आपमतलबी वृत्तींशी ओळख झालीय . रिक्षावाले बसवाले भाजीपाला मंडई किराणामाल .... सगळेच.
आपल्याला पोलीसांनी थांबवुन स्वत्:च्या हातातील ताकतीचा गैरवापर करत विनाकारण दंड लावला अन आपण शामळुसारखा तो भरलाय.
डॉक्टरांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन सेवा दिलीय पण त्यातही काही कटु अनुभव आलेले आहेत, त्यातही काही जणांनी स्वत्:ची तुंबडी भरुन घेतली आहे.
ऑफीसतील राजकारण आता झूम च्या पडद्या आड गेलंय त्यामुळे कोण आपल्या बाजुने आहे अन कोण आपल्या विरुध्द ह्याचा अंदाज लावणं अशक्य झालंय .

ही बाहेरची अस्वस्थताचच न कळत आत झिरपत जात आहे, त्याला पर्याय नाही, आपण ह्या सगळ्यांपासुन अलिप्त असतो तर कदाचित अस्वस्थता जाणवली नसती इतकी !

पण मार्कस ऑरेलियस म्हणाला तसं - (बहुतांष वेळा) आपला डावा हात उजव्या हातापेक्षा कमी कार्यक्षम असतो पण म्हणुन आपण त्याचा तिरस्कार करतो का ? नाही ना, कारण शेवटी तो आपल्याच शरीराचा भाग असतो . किंवा आमचा एक स्टॉईक मित्र आजच्या भाशेत समजाऊन सांगतो तसं - एखाद्याला आपण अ‍ॅसहोल , गांडु , आणि अशा अनेक शरीर अवयवांवरुन शिव्या देतो , पण हेच आपल्या शरीराचे अवयव कसेही असले तरी आपण त्यांचा दुस्वास करतो का , नाही ना ! तसा विचारही आपल्या मनात येत नाही . तसेच समाजामध्ये हे असले अनेक भिन्न भिन्न प्रकारचे लोकं आहेत , त्यातील काही डाव्याहातासारखे अकार्यक्षम आहेत तर काही सरळ सरळ अ‍ॅसहोल सारखे आहेत, म्हणुन आपण त्यांचा मत्सर करणार का ?

आपल्याला आपल्या अस्वस्थतेची दुखरी नस पकडता आलीय, त्यातुन बाहेर पडायचे उत्तर तर आधीच माहीत आहे. ३०० वर्षांपुर्वीच आपल्यासारख्या एका प्रापंचिक माणसाने लिहुन ठेवलंय - बुडवल्या वह्या | बैसलो धरणे | केले नारायणे | समाधान || पण आपल्याला जमणार आहे का हे असं एकदम अलिप्त होणं ? तस्मात असो, तुर्तास अलिप्तपणे पाहात राहु आपल्याच मनाच्या विचारांची ही आवर्तने !
आता आहे तैसा दिसतो प्रकार | पुढीला विचार | देव जाणे ||

______/\______

गॉडजिला's picture

12 Jun 2021 - 1:02 pm | गॉडजिला

एखाद्याला आपण अ‍ॅसहोल , गांडु , आणि अशा अनेक शरीर अवयवांवरुन शिव्या देतो , पण हेच आपल्या शरीराचे अवयव कसेही असले तरी आपण त्यांचा दुस्वास करतो का , नाही ना

अक्चुअली हे आपल्या शरीराचे अवयव नसले तेही तरीही त्याचा दुस्वास केला नाही पाहिजे कारण People need assholes otherwise where the shit would go ?

छान छान ...

गॉडजिला's picture

12 Jun 2021 - 1:08 pm | गॉडजिला

People च्या जागी This world हा शब्द वाचला तरी चालेल

ही बाहेरची अस्वस्थताचच न कळत आत झिरपत जात आहे, त्याला पर्याय नाही

परफेक्ट! खालच्या माझ्या प्रतिसादातिल चित्रफितीत एखार्ट हे सुंदर समजावून सांगतो!

- (पर्याय शोधणारा) सोकाजी

ही बाहेरची अस्वस्थताचच न कळत आत झिरपत जात आहे, त्याला पर्याय नाही

परफेक्ट! खालच्या माझ्या प्रतिसादातिल चित्रफितीत एखार्ट हे सुंदर समजावून सांगतो!

- (पर्याय शोधणारा) सोकाजी

गॉडजिला's picture

13 Jun 2021 - 11:00 am | गॉडजिला

बाहेरील गोष्टी तिची इंटेसिटी प्रभावित करतील पण अस्वस्थतेचे बीज फक्त आणि फक्त अंतर्गत आहे, योग्य मार्ग वापरून हे बीज प्रभावहीन बनवता येते ज्यानन्तर बाहय बाबी मन अस्वस्थ करायला कुचकामी ठरतात

ही बाहेरची अस्वस्थताचच न कळत आत झिरपत जात आहे, त्याला पर्याय नाही,

तुम्हाला अस्वस्थता नसलेले बाह्य जग देतो (जिथे ना मृत्यु आहे ना वृद्धत्व) सर्व कसं छान छान स्वान्त सुखीय जग आहे तिथेही काही काळाने तुम्ही अस्वस्थच व्हाल... कारण अस्वस्थता आत आहे आणि तीचे प्रगटीकरण बाह्य आहे उलट न्हवे...

आपण ह्या सगळ्यांपासुन अलिप्त असतो तर कदाचित अस्वस्थता जाणवली नसती इतकी

आहो आपण अलिप्तच आहोत की... पडद्यावर जर rithik रोशन पळताना दिसला तर त्याची धाप आपण अनुभवतो का ? अर्थातच नाही पण तो पळत आहे विश्लेषण मात्र अचूक होते

अगदी तसेच आपण सर्व जग हे प्रत्यक्ष वा त्याच्याशी संबंध मुळी कधीच अनुभवत नाही त्याच्याशी कधीच संबंध जोडत नाही तर पंचेंद्रियांचा संवेदनातुन त्याचे फक्त विश्लेषण (अनुभव) करतो.

म्हणूनच जर इंद्रिय कार्यरत नसेल अथवा त्याला संवेदना देणारी एखादी बाब समोर नसेल तर तिचे विश्लेषण (अनुभव) तयार होऊ शकत नाही...

उदा समोर मारुती गाडी उभी आहे व तुमचे डोळे उघडे आहे तर ती दिसण्याचे विश्लेषण (अनुभव) होईल पण जर ती गाडी तिथे असून तुमचे डोळे मिटले असतील तर ती असूनही तिचे विश्लेषण(अनुभव/ज्ञान) होणार नाही...

थोडक्यात आपण अखंड सदैव जगापासून फक्त अलिप्त आणि अलिप्तच असतो फक्त जग आहे हे आपण पंचेंद्रियांच्या संवेदनातुन विश्लेषित करतो

आणि आत्मस्वरूप या भौतिक जगात असूनही ते थोरा मोठ्यानी अलिप्त आहे असे का लिहले आहे याचे हे वैज्ञानिक स्पष्टीकरण मी देत आहे असे हि हवं तर तुम्ही समजू शकता

गॉडजिला's picture

12 Jun 2021 - 2:17 pm | गॉडजिला

अस्वस्थता पसरवणाऱ्या नसा दारूत बुडवून काढल्यावर आनंदी होतील का??

नाही कारण नसा फक्त संवेदनांचे वहन करतात सुखद असो की दुःखद... मुळात अस्वस्थता आत आहे म्हणून नसा दारूत बुडवून बधिरतेचा तात्पुरता अनुभव निर्माण होईल ज्यातून मूळ अस्वस्थता काही काळ झाकली जाईल दुर्लक्षित होईल पण ती तशीच असेल व हळूहळू विस्तारत जाईल... हि आतली अस्वस्थता कायमची नाहीशी करायला कोणताही बाहय मार्ग कुचकामी ठरतो मग तो मार्ग मनोरंजन असो, जप तप असो, कि दारू, भांग गांजा सदृश्य व्यसने असोत... हे सर्व क्षणिक बधिरता अथवा साल्वेशनचा भ्रम निर्माण करायला कामी येते

सोत्रि's picture

13 Jun 2021 - 8:57 am | सोत्रि

ह्या चित्रफीतीत एक महिला नेमका हाच प्रश्न विचारते आहे. त्यावर एखार्ट अत्यन्त सुन्दर उत्तर देतोय.

(https://youtu.be/rWFVi1cPUZo)

- (विचार करणारा) सोकाजी

आपण सदैव फक्त वर्तमानातच असतो पण आपले मन सतत भूतकाळ अथवा भविष्यकाळात (संबंधी विचारात) फिरत असते यातून आपल्या व्यक्तिमत्वात जी क्लॉक टाइम गॅप तयार होते त्यातून अस्वस्थता जन्माला येते... जर आपण नाऊ मधे स्थिर झालो तर ही अस्वस्थता थांबते

क्लॉक टाइम

एखार्ट क्लॉक टाइम आणि सायकोलॉजिकल टाइम अशा दोन बाबी विशद करतो ज्याचे सार वेळ अस्तित्वात नाही तर ती फक्त मनाची उत्पत्ती आहे हे आहे.

माझ्या अल्प अभ्यासानुसार त्याच्या म्हणण्यात मला सकृत दर्शनी तथ्य वाटते

गॉडजिला's picture

13 Jun 2021 - 11:13 am | गॉडजिला

थिंकिंग इज अल्वेज कन्फ्युस्ड विथ बिईंग

गॉडजिला's picture

13 Jun 2021 - 4:42 pm | गॉडजिला

बीइंग कॅन बी एक्स्पीरीअन्स्ड ओन्ली बियाँड थिंकींग... ओर व्हेन थिंकीग निग्लेक्टेड ऑर स्टॉप्पड... सो एखार्ट इज राइट वेन ही सेज थिंकींग इज पजेशन इट टुक कंट्रोल ओवर बीइंग(रीयल सेल्फ)....

गॉडजिला's picture

13 Jun 2021 - 6:39 pm | गॉडजिला

एखादा माणुस पाय घसरुन पडला, दॅट्स इट. हे नॉलेज आहे... ( जस्ट अ सिचुएशन)

पण तो तुमचा शत्रु होता , मित्र होता, पिता होता अथवा कोणीच न्हवता हे आयडेंटीफिकेशन झाले... यातुन त्या नॉलेज प्रती भावना तयार झाली...

भावनेचा प्रोब्लेम काय आहे ? तर इट अपिअर अ‍ॅज पार्ट ओफ द सेन्स ऑफ बीइंग सेल्फ ...

काहीही झाले तरी नॉलेज हे पंचेद्रीयांच्या सहायाने विश्लेशीत झाले असल्याने त्याच्यात एक परकेपणा आहे, की हे बाहेरुन आले, माझ्या आत मधे हे न्हवते सबब हे नॉलेज इजंट मी ऑर पार्ट ऑफ मी हा तर्क... पण भावना मात्र (भलेही बाहेरील ज्ञानामुळे/ संवेदनांमुळे तयार झाली हे सोयीस्कर दुर्लक्षीत करुन) आपली आहे असे ठसते कारण त्यात नॉलेज नाही फक्त रिअ‍ॅक्षन आहे ती देखील तुमची स्वताची (हीच ती अ‍ॅटॅचमेंट) म्हणून इमोशन म्हणजेच आपण आहोत असाही प्रकार सुरु होतो... म्हणजेच माझ्यात आनंद आहे न्हवे तर मीच आनंद आहे, दुख्ख आहे हा समज द्रुढ ठरुन धुंद होणे निराश होणे... वगैरे

आता दुसरे उदाहरण

कपील शर्माने काही निवेदन केले... वरील प्रोसेसने ते विनोदी आनंददायी ठरले.. आता तो आनंद तुमच्या व्यक्तीमत्वाचा भाग तुम्ही मानला असल्याने जेंव्हा जेंव्हा तुमी कपील शर्मा काही निवेदन करेल सर्वप्रथम तुम्ही त्यात विनोद मानाल/अनुभवाल...पुढे पुढे त्याचे बहुतांश चाळे हसण्यायोग्य विनोद गणले जाउ लागतील. त्याला फार श्रमही करावे लागणार नाहीत...

थोडक्यात आपल्याला हळु हळु सिचुएशन इमोशनने विश्लेशीत करयाची सवय लागली व सिचुएशनचा अविभाज्य भाग नॉलेज दुर्लक्षीत होउ लागला... जर शर्माच्या क्रुतीचे विष्लेषण इमोशन ऐवजी नॉलेज वापरुन केले तर तुम्ही हसणार नाही अथवा तठस्त रहाल.. पण तुम्हाला किक हवीय...

अनुभवास येणारी प्रत्येक सिचुएशन इमोशन मधे बदलुन आपलेसे कराचे व्यसन लागले आहे आणी हे करु नये ही जागृतीच कुणी न दिल्याने आता सर्वच भावनांच्या बाबतीत हे इतके घट्ट झाले आहे की तुम्ही तठ्स्थता परीणामी वास्तवता गमावली आहे... बरं विनोदाची जागा परिस्थीतीनुसार भिती, संताप अशा अनेक भावना घेतात तेंव्हा आपली तठ्स्थता/काँन्शीअसनेस किती गमावलं जात असेल ? अन हे चक्र चालुच आहे आणी आपल्यालाही फिरवतं आहे आणी जग,जगणं परीणामे आपलं आख्ख अस्तित्वच भावना\पंचेद्रीयांच्या संवेदना आहेत हा भास द्रुढ होत जातो त्या पलिकडे न पाहता येतं न काही आहे हे नुस्तं सांगुन पटतं...

विपश्यना नेमकं हीच बाब रिवर्स करते ते सिचुएशन ला इमोशन ने न्हवे तर फक्त आनी फक्त नॉलेजने इंट्प्रिट करायला शिकवते.. एखादी गोश्ट जशी आहे तशी आहे... तिचे भावनेत रुपांतरण गरजेचे नाही.... म्हणून आयडेंटीफिकेशन व अ‍ॅटॅचमेंट शक्य होत नाही परिणामी पाण्यातील गढुळता जशी खाली बसली तर त्याचा तळ दिसु लागतो तसे मनातील भावनांचा कचरा खाली जाउन आत्मस्वरुपाचे जसे आहे तसे वास्तव समोर यायला सुरुवात तर नक्कि होते... पण.... जाउदे त्यात पुर्ण यश मिळवणे हा एक वेगळा विषय आहे.

अमर विश्वास's picture

13 Jun 2021 - 8:29 pm | अमर विश्वास

लेखापेक्षाही लांबलचक प्रतिक्रिया वाचून ते लेखात लिहिलंय तस एन्जॉय वगैरे केलं ...

दोनच गोष्टी सांगतो .... दारू कुठल्याच प्रश्नाचे उत्तर होऊ शकत नाही ...

दुसरं म्हणजे असं काही वाटायला लागलं तर एक इंग्लिश लक्षात ठेवा (आमच्या जिम मध्ये नेहमी लागत)
kick up the ass .. pick up the pace

चित्रगुप्त's picture

13 Jun 2021 - 9:44 pm | चित्रगुप्त

'पारसमाणी' (१९६३) चं हे गीत आज आठवण्याचं कारण म्हणजे असा एकादा धागा आला, की संक्षि सरजींची बहुत याद येते. त्यांनी हां हां म्हणता सगळ्यांचा फडशा पाडत या सगळ्या प्रकरणाचा नेमका भेद घेत सोक्षमोक्ष लावून टाकला असता, वरून बोनस म्हणून कसलीतरी रिंग वा बोटांची गुंफण वगैरे नेमका उपायही सांगितला असता...
वो जब याद आये, बहुत याद आये.

... वो जुदा क्या हुए ज़िन्दगी खो गई
शम्मा जलती रही रोशनी खो गई
बहुत कोशिशें कीं मगर दिल ना बहला
कई साज़ छेड़े कई गीत गाए
वो जब याद आए...
अवांतरः आचार्य रजनीश त्यांच्या सुरुवातीच्या काळात ज्याच्या मुंबईतील लहानश्या घरात थोड्याश्या मंडळींसमोर प्रवचने देत असत, तोच या गाण्यातला 'पारसमणि' चा नायक महिपाल.

त्याचे पावर ऑफ नाउ पुस्तकातील तत्वज्ञान इथे मराठीत सांगण्यात संक्षि सरजीं माहीर होते(?) आहेत असे त्यांचे वीवीध प्रतिसाद व धागे वाचुन वाटते... ते इथं खरच हवे होते.